तौक्ते ’चक्रीवादळ / प्रश्‍नमंजुषा (१५४)

  • तौक्ते ’चक्रीवादळ / प्रश्‍नमंजुषा (१५४)

    तौक्ते ’चक्रीवादळ / प्रश्‍नमंजुषा (१५४)

    • 19 May 2021
    • Posted By : study circle
    • 1080 Views
    • 2 Shares
     प्रश्‍नमंजुषा (१५४)

     

    १)  भारतात हवामानाचा आढावा घेण्यासाठी कधीपासून उपग्रहांचा वापर सुरू झाला ?

        १) १९९० पासून 
        २) १९८० पासून
        ३) २००० पासून 
        ४) १९९६ पासून
     
    २)  खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
        अ) १५ मे रोजी अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाला तौक्ते हे नाव म्यानमार देशाने दिले.
        ब)  हायली व्होकल लिझार्ड (गेच्को) अर्थात बोलका सरड्याच्या नावावरून म्यानमारने हे नाव दिले.
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ    
        २) फक्त ब    
        ३) अ आणि ब दोन्ही  
        ४) कोणतेही नाही
     
    ३)  भारतीय उपखंडातील वादळांसाठी सध्या किती देशांच्या समूहाद्वारे नावे दिली जातात ?
        १) ८
        २) १०
        ३) १२
        ४) १४
     
    ४)  हवामानतज्ज्ञ व त्याविषयी काम करणार्‍या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे म्हणून चक्रीवादळांचे नामकरण करतात. या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
        अ) चक्रीवादळाचा वेग ३४ नॉटिकल मैल प्रति तासांपेक्षा जास्त असेल तर त्याला विशेष नाव देणे आवश्यक असते.
        ब)  यासाठी मियामी येथील राष्ट्रीय हरिकेन सेंटरने पुढाकार घेतला होता.
        क) १९५० मध्ये चक्रीवादळांचे नाव ठेवण्याची सुरुवात अटलांटिक क्षेत्रात एका करारानुसार झाली.
        ड) ही पद्धत ऑस्ट्रेलियातील हवामानतज्ज्ञांनी सुरु केली.   
        पर्यायी उत्तरे :
        १) अ, ब आणि क बरोबर       
        २)  ब, क आणि ड बरोबर
        ३) अ, ब आणि ड बरोबर                      
        ४)  अ, क आणि ड बरोबर
     
    ५)  खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
        १) चक्रीवादळाच्या आतील बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.
        २) चक्रीवादळाच्या बाहेरील बाजूचे वारे प्रचंड वेगाने फिरल्यास वादळाचे केंद्र खूपच अशांत असते.
        ३) चक्रीवादळाच्या आतील बाजूचे वारे कमी वेगाने फिरल्यास वादळाचे केंद्र शांत होते.
        ४) चक्रीवादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.
     
    ६)  चक्रीवादळाच्या निर्मितीसंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
        अ) यासाठी साधारणपणे  ८ ते १० दिवसांचा (२४० ते २५० तास) कालावधी लागतो.
        ब) चक्रीवादळांच्या निर्मितीची पूर्वकल्पना १० ते १२ दिवस अचूक मिळू शकते.
        क) चक्रीवादळामध्ये बाष्पाचा पुरवठा जोपर्यंत होतो आहे, तोपर्यंत ते जिवंत राहते.
        वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ    
        २) फक्त अ आणि ब           
        ३) फक्त अ आणि क                         
        ४) अ, ब आणि क
     
    ७)  जेव्हा चक्रीवादळ जमिनीवर तयार होते, तेव्हा त्याला ......... असे म्हणतात.
        १) सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉॅर्म
        २) स्टॉर्म सर्ज
        ३) टोरनॅडो
        ४) डिप डिप्रेशन
     
    ८)  खालील जोड्या अचूक जुळवा :
                   स्तंभ अ (स्थान)                      स्तंभ ब (नाव)
        अ) हिंदी महासागरात तयार होणारे चक्रीवादळ                     I)   विली-विलीस
        ब) अटलांटिक महासागरात तयार होणारे चक्रीवादळ          II)   टायफून
        क) प्रशांत महासागरात तयार होणारे चक्रीवादळ                  III)  सायक्लोन
        ड) ऑस्ट्रेलियातील चक्रीवादळ                                                     IV)   हरिकेन
        पर्यायी उत्तरे :
                    अ    ब     क    ड
              1)           II           III          I             IV
              2)           II           I             III          IV
              3)           III          IV          II           I
              4)           IV          III          I             II
     
    ९)  खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
        १) ब्राऊन क्लाउड म्हणजे हवेतील प्रदूषणाचा थर होय.
        २) ब्राऊन क्लाऊडमुळे अरबी समुद्रात मान्सूनपूर्व चक्रीवादळांची तीव्रता वाढली आहे.
        ३) चक्रीवादळांमुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ स्टॉर्म सर्ज म्हणून ओळखली जाते.
        ४) स्टॉर्म सर्जमुळे अरबी समुद्रावर ब्राऊन क्लाऊड निर्माण झालेला आहे.
     
    १०) चक्रीवादळाची पूर्वसूचना देण्यासाठी कोणती माहिती उपयोगी ठरते ?
        अ) उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे
        ब) बिनचूक अंदाज देणारी रडार यंत्रणा
        क) भूपृष्ठावरील निरीक्षणांवरून मिळालेली वार्‍याची दिशा
        ड) चक्रीवादळाबाबतची पूर्वमाहिती
        पर्यायी उत्तरे :
        १) विधाने अ, ब आणि क बरोबर  
        २) विधाने ब, क आणि ड बरोबर
        ३) विधाने अ, ब आणि ड बरोबर
        ४) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    चक्रीवादळ व त्सुनामी
     
    १)  बांगला देशामधील चक्रीवादळ जगातील सर्वात भीषण नैसर्गिक दुर्घटनांपैकी एक आहे. सुमारे ३,००,००० लोकांनी प्राण गमावले, असे म्हणतात. बांगला देशामध्ये, म्हणजे त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात ही दुर्घटना कधी घडली ?
        १) १९७०
          २) १९६०
        ३) १९५०
        ४) १९४०
     
    २)  समुद्रसपाटीला हवेचा भार किती असतो ?
        १) ७६ से.मी.    
        २) २९.९ इंच    
        ३) १०१३.२ मिलीबार             
        ४) वरीलपैकी सर्व
     
    ३)  तामिळनाडूच्या किनारपट्टीवर ३० डिसेंबर २०११ रोजी थडकलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?
        १) थेन
        २) झेन
        ३) कॅटरिना
        ४) मॅटिझ
     
    ४)  चक्रीवादळे आणि त्यांची निर्मितीस्थाने पुढे दिलेली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा ः
             नाव         निर्मिती स्थान
              a) टोरनॅडो         i) हिंदी महासागर
              b) हरिकेन         ii) जमिनीवर
              c) टायफून        iii) वेस्ट इंडीज बेटे व अटलांटिक महासागर
              d) सायकलोन      iv) चीनचा समुद्र व पॅसिफिक महासागर
        योग्य जोडीचा पर्याय निवडा :
                 (a)     (b)     (c)     (d)
             १)      (ii)     (iii)    (iv)    (i)
             २)      (iv)    (iii)    (ii)     (i)
             ३)      (i)      (ii)     (iii)    (iv)
             ४)      (iii)    (iv)    (i)      (ii)
     
    ५)  हिंदी महासागराच्या उत्तरेस डिसेंबर २०१७ मध्ये चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्या चक्रीवादळाचे नाव काय?
        १) लायला
        २) कॅटरिना
        ३) वरदाह
        ४) ओखी
     
    ६)  जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा :
          वादळाचे नाव           ठिकाण
        a) ऐला            i) पश्‍चिम किनारपट्टी
        b) फियान         ii) पूर्व किनारपट्टी
        c) बिजली         iii) पूर्व किनारपट्टी
              d) लैला           iv) आग्नेय किनारपट्टी
               (a)  (b)    (c)     (d)
        १) (i)    (ii)    (iii)   (iv)
        २) (ii)     (i)    (iv)   (iii)
        ३) (ii)   (iii)    (i)    (iv)  
        ४) (iv)    (i)     (ii)    (iii)
     
    ७)  खालील विधाने पहा.
        a) फिलिपाइन्सच्या किनार्‍यावरील वादळांना टायफून्स म्हणतात.
        b) व्हिक्टर, कतरीना ही हरिकेन-चक्री वादळाची नावे आहेत.
              c) यूएसएच्या फ्लॉरिडा किनार्‍याजवळ निर्माण होणार्‍या वादळांना टोरनॅडो म्हणतात.
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त विधान (a) बरोबर आहे.
        २) विधाने (a) आणि (b) बरोबर आहेत.
        ३) विधाने (b) आणि (c) बरोबर आहेत.
        ४) विधाने (a), (b) आणि (c) बरोबर आहेत.
     
    ८)  खालीलपैकी कुठले भूरूपशास्त्रीय घटक पुरांकरिता कारणीभूत ठरतात?
        a) अतिवृष्टी
        b) ढगफुटी
        c) उष्णकटिबंधीय वादळ
        d) जंगलतोड / निर्वणीकरण
        e) मोठे पाणलोट क्षेत्र
              f) पाण्याचा अपुरा निचरा
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b) आणि (c)
        २) (a), (b), (c) आणि (d)
        ३) (d), (e) आणि (f)
              ४) (e) आणि (f) फक्त
     
    त्सुनामी
     
    १)  ....... वर्षी पूर्वी भारतीय किनारपट्टी त्सुुनामी या आपत्तीपासून मुक्त असल्याचे मानले जात होते.
        १) १ डिसेंबर २००४              
        २) २६ डिसेंबर २००४             
        ३) २६ डिसेंबर २००१             
        ४) १ डिसेंबर १९९३
     
    २)     खालीलपैकी कोणत्या देशावर २६ डिसेंबर २००४ रोजी झालेल्या त्सुनामी लाटांचा परिणाम झाला नाही ?          
        १) थायलंड      
        २) मलेशिया    
        ३) भारत       
        ४) श्रीलंका’
     
    ३)  त्सुनामी हे नामकरण मूळ ............ आहे.
        १) रशियन
        २) भारतीय
        ३) इंडोनेशियन
        ४) जपानी
     
    ४)  २००४ मध्ये हिंदी महासागरात आलेल्या प्रलयकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली?
        १) अंदमान निकोबार बेटे         
        २) तामिळनाडू व केरळ राज्यातील किनारपट्टी        
        ३) लक्षद्वीप आणि मालदीव बेटे
        ४) महाराष्ट्राची पश्‍चिम किनारपट्टी
     
    ५)  ‘त्सुनामी’ या जपानी शब्दातील ‘त्सु’ आणि ‘नामी’ म्हणजे
        १) संपूर्ण विनाश
        २) राक्षसी लाट
        ३) बंदर लाट
        ४) हिंस्र लाट
     
    ६)  खालीलपैकी कोणत्या शक्ती या त्सुनामी लाटांच्या निर्मितीस कारणीभूत असतात ?
              a) भूकंपामुळे (सागरी) पाण्याचे उभ्या दिशेने विस्थापन
        b) भूकंपामुळे (सागरी) पाण्याचे आडव्या दिशेने विस्थापन
        c) महासागरातल्या प्रचंड उग्र ज्वालामुखी उद्रेकांमुळे
        d) सागरतळावर वेगवान राशी हालचालीमुळे
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b)
        २) (c) आणि (d)
        ३) (b) आणि (c)
        ४) वरीलपैकी सर्व
     
    वारे व स्थानिक वारे
     
    १)  वार्‍याचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात ?
        १) अ‍ॅनिमोमीटर
        २) सायनोमीटर
        ३) अक्टीनोमीटर
        ४) क्लायनोमीटर
     
    २)  पुढील दोनपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
        a) जमीन लगतच्या समुद्रापेक्षा लवकर गरम होते.
        b) वरील कारणामुळे जमिनी वारे निर्माण होतात.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a) अयोग्य आहे.
        २) केवळ (b) अयोग्य आहे.
        ३) दोन्ही अयोग्य.
        ४) एकही अयोग्य नाही.
     
    ३)  मोसमी वार्‍याच्या नेहमीच्या तारखांबाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही?
        a) दक्षिण-पश्‍चिम मोसमी पावसाच्या भारतातील परतीचा प्रवास उत्तर-पश्‍चिममध्ये जवळपास १ सप्टेंबरला सुरू होतो व दक्षिण-पूर्वेच्या भागातून सुमारे १ डिसेंबरला परततो.
        b) मध्य महाराष्ट्रातून दक्षिण-पश्‍चिम मोसमी वारे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परततात.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही
     
    ४)  स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या जोड्या जुळवा :
        स्तंभ अ (स्थानिक वारे)          स्तंभ ब (आढळणारे प्रदेश)
        अ) चिनूक                     i) युरोपमधील आल्प्स पर्वत
        ब) फॉर्न                       ii) दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्र
        क) लू                         iii) उत्तर भारतातील मैदानी प्रदेश
        ड) मिस्ट्रल                     iv) उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत
              पर्यायी उत्तरे :
                    अ    ब     क    ड
        १)    IV          I             III          II
        २)    III          II           I             IV
        ३)    II           III          IV          I            
        ४)        I             IV          II           III
     
    ५)  जागतिक हवामानासंदर्भातील खालील विधाने पहा ः
        a) न्यूझिलंडमध्ये स्थानिक वार्‍यांना नॉर्वेस्टर म्हणतात.
              b) फॉन हे रॉकी पर्वतातील वार्‍याचे नाव आहे.
        पर्यायी उत्तरे :
        १) विधान (a) बरोबर आणि विधान (b) चूक आहे.
        २) विधान (a) चूक आणि विधान (b) बरोबर आहे.
        ३) विधान (a) आणि विधान (b) चूक आहे.
        ४) विधान (a) आणि विधान (b) बरोबर आहे.
     
    ६)  रॉकीजमधील अतिशुष्क व उष्ण वारा म्हणजे :
        १) फॉन  
        २) लू 
        ३) चिनूक
        ४) मिस्ट्रल
     
    ७)  चिनूक वार्‍यासंदर्भातील कोणती विधाने बरोबर नाहीत?
             a) हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात.
        b) हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत.
             c) हे वारे आल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजूवरून वर चढतात.
             d) हे वारे र्‍हाईन नदीखोर्‍यातून वाहतात.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b)
        २) (a), (c)
        ३) (b), (c)
        ४) (c), (d)
     
    ८)  खालीलपैकी कोणत्या वार्‍यास स्नो ईटरम्हटले जाते?
        १) फॉन
        २) चिनूक
        ३) आंधी
        ४) बर्ग
     
    ९)  जोड्या जुळवा :
        स्थानिक वारे    विभाग/देश
        a) बोरा         i) मध्य आशिया
              b) बुरान        ii) ऑस्ट्रिया
              c) मिस्ट्रल      iii) ग्रीन लॅन्ड
              d) ट्रॅमॉन्टेना     iv) फ्रान्स
              (a)          (b)          (c)          (d)
        १)    (iv)         (ii)          (i)           (iii)
        २)    (ii)          (iv)         (iii)         (i)
        ३)    (i)           (iii)         (ii)          (iv)
        ४)    (iii)         (i)           (iv)         (ii)
     
    १०) खालीलपैकी कोणत्या वार्‍यास ’डॉक्टर’ असे म्हणतात ?
        १) मोसमी वारे
        २) मतलई व खारे वारे
        ३) पर्वतीय वारे
        ४) दरीतील वारे
     
    ११) खालीलपैकी कोणत्या स्थानिक वार्‍यांना ‘डॉक्टर वारे’ या नावांनीही संबोधिले जाते?
        १) खारे व मतलई वारे          
        २) मान्सूनपूर्वी वारे             
        ३) पर्वतीय/डोंगरी वारे           
        ४) दरी वारे
     
    १२) खालील नकाशात बाणाने दाखवलेला वारा कोणता आहे ?
       
        १) चिनूक
        २) झोंडा
        ३) कामसीन
        ४) फॉन
     
    १३) जोड्या लावा ;                               
         स्तंभ-I (स्थानिक वारे)          स्तंभ-II (प्रदेश)
              a) सांता अ‍ॅना                                                i) द. आफ्रिका
              b) सिरोक्को                                          ii) कॅलिफोर्निया
              c) बर्ग                                               iii) दक्षिण-पूर्व ऑस्ट्रेलिया
              d) ब्रिक फायढर                                       iv) उ. आफ्रिका
        पर्यायी उत्तरे :
                 (a)     (b)     (c)     (d)
        १)  (iv)    (ii)     (i)      (iii)
        २)  (ii)     (iv)    (i)      (iii)
        ३) (i)      (iii)    (ii)     (iv)
        ४)    (iii)    (i)      (iv)    (ii)
     
    १४) बोरा वारे .......... प्रदेशात वाहतात. 
        १) सैबेरिया
        २) सहारा वाळवंट
        ३) अ‍ॅड्रियाटिक समुद्र
        ४) अंटार्क्टिका
     
    १५) भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणार्‍या कोरड्या वार्‍यांमुळे खालील पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो?
        १) कारवार
        २) कवस्ती
        ३) मच्छलीपट्टण
        ४) मंगळूर
     
    १६) खालील चार स्थानिक वारे व नकाशातील 1, 3, 3, 4, आकड्यांनी दर्शविलेल्या वार्‍यांच्या जोड्या लावा:
        
        अ) सिरोक्को
        ब) खामसीन
        क) हार्मेटन
        ड) बर्ग
                    अ    ब     क    ड
        १)    I             II            III          IV   
        २)    I             II            IV          III   
              ३)    II            I             IV          III          
              ४)    IV          III           II            I    
     
    १७) लू हे उष्ण व शुष्क वारे आहेत जे उन्हाळ्यात वाहतात. त्याबाबत काय खरे नाही?
        a) जमिनीच्या वरच्या पापुद्र्यांची उष्णता अतिशय वाढून हवेच्या वर वाहण्याने लू तयार होते.
        b) लू मध्यान्ह पूर्व काळात सर्वाधिक असते.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही
     
    १८) ’लू’ हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने ......
        १) एप्रिल-मे
        २) मे-जून
        ३) जून-जुलै
        ४) ऑक्टोबर-नोव्हेंबर
     
    १९) जोड्या जुळवा :
        स्तंभ-I (स्थानिक वारे)           स्तंभ-II (प्रदेश/देश)
        a) फॉन                                               i) पश्‍चिम आफ्रिका
        b) चिनूक                                            ii) चिली
        c) हारमॅट्टन                                          iii) आल्प्स
        d) झोंडा                                             iv) रॉकी
        पर्यायी उत्तरे :
                            (a)         (b)         (c)         (d)
        १)    (iv)        (iii)        (ii)         (i)
        २)    (iii)        (iv)        (i)          (ii)
        ३)    (iii)        (i)          (ii)         (iv)
        ४)    (iv)        (iii)        (i)          (ii)
     
    २०) आम्रसरी या मान्सूनपूर्व काळात पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात या प्रामुख्याने पाऊस देतात ?
        १) गुजरात आणि महाराष्ट्र        
        २) दक्षिणी पठार                
        ३) केरळ आणि कर्नाटक किनारपट्टी
        ४) पश्‍चिम बंगाल आणि आसाम
     
    २१) कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व पर्जन्य ......... या नावाने ओळखतात.
        १) आम्रसरी
        २) कॉफीबहार सरी
        ३) कालवैशाखी
        ४) आँधी
     
    २२) हिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भात कोणत्या घटकांमुळे पाऊस पडतो?
        १) अरबी समुद्रावरून येणारे मोसमी वारे
        २) बंगालच्या उपसागरावरून येणारे मोसमी वारे
        ३) बंगालच्या उपसागरावरून येणारी चक्रीवादळे
        ४) अरबी समुद्रावरून येणारी चक्रीवादळे
     
    २३) खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो?
        १) प्रत्यावर्त
        २) पश्‍चिमी चक्रवात
        ३) मान्सूनची माघार
        ४) नैर्ऋत्य मान्सून
     
    आवर्त व प्रत्यावर्त
     
    १)  ...... किलोमीटर किंवा अधिक व्यास असलेला प्रत्यावर्त हा पृथ्वीवरील एक अत्यंत विनाशकारी आणि धोकादायक वातावरणीय झंझावात आहे.
        १) ४०० कि.मी.
        २) ६०० कि.मी
        ३) ८०० कि.मी.
        ४) १००० कि.मी.
     
    २)  खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा ५ अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?
        १) जून  
        २) सप्टेंबर
        ३) डिसेंबर      
        ४) मार्च 
     
    ३)  केंद्रभागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे वक्राकार दिशेत वाहणारे वारे ............
        १) खारे
        २) मतलई
        ३) प्रत्यावर्त
        ४) आवर्त
     
    ४)  आवर्तात वार्‍याची दिशा दक्षिण गोलार्धात कशाप्रकारे आढळते?
        १) अधिक वार्‍याच्या दाबाच्या दिशेने
        २) कमी वार्‍याच्या दाबाच्या दिशेने
        ३) घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने
        ४) घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने
     
    ५)  विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणार्‍या ग्रहीय वार्‍यांचा योग्य क्रम ओळखा.
        १) पश्‍चिमी वारे, व्यापारी वारे, ध्रुवीय वारे
        २) व्यापारी वारे, पश्‍चिमी वारे, धु्रवीय वारे
        ३) व्यापारी वारे, ध्रुवीय वारे, पश्‍चिमी वारे
        ४) ध्रुवीय वारे, पश्‍चिमी वारे, व्यापारी वारे
     
    ६)  उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब विभागाकडे वाहणार्‍या वार्‍यांना ...... म्हणतात.
        १) स्थानिक वारे
        २) पश्‍चिमी वारे
        ३) व्यापारी वारे
        ४) डोंगर वारे
     
    ७)  विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला कमी दाबाचा पट्टा, जो साधारणपणे ५० ते ३०० अक्षांशापर्यंत आढळतो त्याला ...... म्हणतात.
        १) डोलडूम
        २) व्यापारी वार्‍याचा पट्टा         
        ३) पश्‍चिमी वारे 
        ४) ध्रुवीय पूर्वी वारे
     
    ८)  गरजणारे चाळीस हे ........ वारे आहेत.
        १) ईशान्य - व्यापारी
        २) आग्नेय - व्यापारी
        ३) नैऋत्य - प्रतिव्यापारी
        ४) वायव्य - प्रतिव्यापारी
     
    ९)  दक्षिण गोलार्धात पश्‍चिमी वारे हे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त जोमदार आणि स्वतंत्रपूर्ण असतात. त्याचे कारण सांगा
        a) दक्षिण गोलार्धात उत्तर गोलार्धापेक्षा कमी भूमी आहे.
        b) उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धात कोरी ऑलीस फोर्स जोमदार असतो.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही
     
    १०) उष्णकटिबंधीय आवर्तांच्या खालील नमूद वैशिष्ट्यांमधून योग्य पर्याय निवडा :
        अ) उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
        ब) उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात
        क) उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
        ड) उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी ५० ते १०० सेंमी पाऊस पडतो.
        योग्य पर्याय निवडा :
        १) अ, ब आणि क
        २) ब, क आणि ड
        ३) अ,ब आणि ड
        ४) क आणि ड
     
    ११) मध्य कटिबंधातील आवर्ताचा व्यास :             
        १) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासाइतका असतो
        २) कधी उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षाही कमी तर कधी जास्त असतो.
        ३) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा जास्त असतो.
        ४) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा कमी असतो. 
     
    १२) जोड्या जुळवा :
                     स्तंभ-I                                                             स्तंभ-II               
              a) विषुववृत्तीय कमी भाराचा पट्टा             i) या भागातील हवा पृष्ठभागाचे घर्षण व पृथ्वीच्या परिवलनामुळे वर ढकलली जाते.         
              b) मध्य कटिबंधीय जास्त भाराचा पट्टा        ii) वर्षभर तापमान ०C पेक्षा कमी असते.
              c) उप-धु्रवीय कमी भाराचा पट्टा             iii) या भागामध्ये वर्षभर सूर्याची किरणे प्रामुख्याने   लंबरुप पडतात.  
              d) ध्रुवीय जास्त भाराचा पट्टा                iv) थंड हवा २५ आणि ३५ अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली उतरते.
                      (a)         (b)         (c)         (d)                      
        १)    (i)          (ii)         (iv)        (iii)        
        २)       (iv)        (i)          (ii)         (iii)       
        ३)    (iii)        (iv)        (i)          (ii)        
        ४)        (ii)         (iii)        (iv)        (i)
     
    १३) उष्मागतिक रूपांतरणाचा वायूराशीवर होणारा परिणाम ः
        १) शीत किंवा उबदार
        २) स्थिर व अस्थिर
        ३) शीत व स्थिर
        ४) उबदार व अस्थिर
     
    १४) सापेक्ष आर्द्रता जेव्हा कमी असते तेव्हा ........
        १) शुष्क व द्रव तापमानमापक समान तापमान दर्शवतात.
        २) शुष्क आणि द्रव तापमानमापकातील तापमानात जास्त फरक असतो.
        ३) जास्त तापमान असेल          
        ४) कमी तापमान असेल.
     
    १५) वातावरणातील बाष्पाचे प्रमाण ...... कमी कमी होते.
              a) विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे                     
              b) ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे
              c) कर्कवृत्ताकडून विषुववृत्ताकडे
              d) मकरवृत्ताकडून विषुववृत्ताकडे
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त (a)
        २) फक्त (b)
        ३) फक्त (c) आणि (d)                             
        ४) फक्त (a) आणि (b)
     
    १६) तापमान सर्वसामान्यपणे विषुववृत्तीय प्रदेशापेक्षा धु्रवीय प्रदेशात कमी असते याचे भौगोलिक कारण .........
        अ) वार्‍याची गती धु्रवीय प्रदेशात जास्त असते.      
        ब) थंड हवेमुळे भूपृष्ठाचे तापमान एकदम कमी होते.  
        क) धु्रवीय प्रदेशात उष्णतेचे उत्सर्जन खूप जास्त असते.
        ड) धु्रवीय प्रदेशात सूर्याची किरणे तिरकस पडतात.
        १) फक्त (ब)
        २) फक्त (ड)
        ३) (अ) आणि (ब)
        ४)(क) आणि (ड)
     
    १७) सांद्रिभवना दरम्यान उत्सर्जित होण्याच्या उष्णतेस .......... म्हणतात.  
        १) आर्द्रता
        २) अनुद्भूत उष्णता
        ३) बाष्पीभवन
        ४) संप्लवन
     
    १८) वाफेचे रुपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस ....... म्हणतात.
        १) संप्लवन
        २) अभिसरण
        ३) बाष्पीभवन
        ४) बाष्पोश्‍वसन
     
    १९) ’जेटस्ट्रीम’चे गुणधर्म खाली दिलेले आहेत. त्यातील योग्य विधानांच पर्याय निवडा.
        a) हे दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्‍चिमी वार्‍यांच्या दरम्यान आढळतात.
        b) हे विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवांजवळील भागात आढळतात.
              c) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.
              d) यांचा भूपृष्ठावरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.
        पर्यायी उत्तरे ः
        १) (a) आणि (b)
        २) (b) आणि (c)
        ३) (a) आणि (c)
        ४) (b) आणि (d)
     
    २०) खालील विधाने पहा :
        a) जेट वायुच्या प्रभावामुळे हिवाळ्यात काश्मिर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो.
              b) हिवाळ्यात तामिळनाडूमध्ये ईशान्य मान्सून वार्‍यामुळे पाऊस पडतो.
              c) बंगालमध्ये उन्हाळ्यात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतात.     
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त विधान (a) बरोबर आहे
        २) फक्त विधान (b) बरोबर आहे
        ३) फक्त विधान (c) बरोबर आहे
        ४) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
     
    २१) हिवाळ्यातील ढगाळ रात्री या निरभ्र आकाश ....... रात्रीच्या तुलनेत जास्त उबदार असतात. कारण:
        १) ढग उष्णतेचे उत्सर्जन पृथ्वीकडे करतात           
        २) ढग शीत लहरी ज्या आकाशातून येतात, त्या सामावून घेऊन पृथ्वीकडे पाठवतात.
        ३) ढग पृथ्वीकडून होणार्‍या उष्णतेचे उत्सर्जन रोखतात.
        ४) ढग हे अतिउंचीवर असल्याने सूर्याच्या उष्णतेचे शोषण करुन उष्णता पृथ्वीकडे पाठवतात. 
     
    २२) जेव्हा हवामान अंदाजाची उपयुक्तता ३ ते १० दिवस असते, तो .......
        १) कमी कालावधीचा हवामान अंदाज
        २) मध्यम कालावधीचा हवामान अंदाज
        ३) जास्त कालावधीचा हवामान अंदाज
        ४) वरील सर्व
     
    नैसर्गिक आपत्ती व तिचे व्यवस्थापन
     
    १)  खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
        a) आपत्ती, ह्या सहसा आकस्मिक आणि हानिकारक असतात.
        b) आपत्ती किंवा अनर्थ ही नैसर्गिक घटना असून हानी/नुकसान हा त्यांचा परिणाम आहे.
        c) भूकंप आणि पूर नैसर्गिक आपत्ती आहे.
        पर्यायी उत्तरे ः 
        १) (a) आणि (b)
        २) (b) आणि (c)
        ३) वरील सर्व
        ४) फक्त (c)
     
    २)  ज्यामुळे समाजाचे सामान्य कामकाज विस्कळीत होऊन समाजाची मूलभूत शिवणच बिघडते अशा अचानकपणे उद्भवणार्‍या मोठ्या दुर्दैवास काय म्हणतात?
        १) अपघात
        २) धोका
        ३) आपत्ती
        ४) संकट
     
    ३)  खालीलपैकी कोणता प्रदेश हा जगातील नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे सगळ्यात जास्त पीडित प्रदेश आहे?
        १) दक्षिण आशिया
        २) दक्षिण अमेरिका
        ३) दक्षिण आफ्रिका
        ४) न्यू साउथ वेल्स
     
    ४)  अ) भारत हा नेहमीच नैसर्गिक आपत्तीच्या संकटात गुरफटलेला आढळतो.
        ब) या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी  होते.
        १) फक्त विधान अ बरोबर        
        २) विधान फक्त ब बरोबर
        ३) विधान अ बरोबर असून ब हे त्याचे कारण आहे.   
        ४) विधान ब बरोबर असून अ हे त्याचे कारण आहे.
     
    ५)  आपत्ती व्यवस्थापनाकरिता कोणत्या उपग्रहाचा उपयोग करण्यात येतो?
        १) जी सॅट (GSAT)
        २) इन्सॅट (INSAT)
        ३) अणूसॅट (ANUSAT)
        ४)हॅमसॅट (HAMSAT)
     
    ६)  यूएनएफसीसीच्या मार्गदर्शनाखाली ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी १७५ देशांनी क्योटो प्रोटोकॉलवर कोणत्या साली स्वाक्षर्‍या केल्या.
        १) २०००
        २) २००४
        ३) २००७
        ४) २००८
     
    ७)  महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का केव्हा बसला होता ?
        १) ३० सप्टेंबर १९९६
        २) २४ सप्टेंबर १९९६
        ३) १५ नोव्हेंबर १९९५
        ४) २६ जानेवारी १९९८
     
    ८)  भारताचा किती टक्के भूभाग भूकंप प्रणव व दरडी कोसळण्याची शक्यता असलेला आहे.
        १) २० टक्के
        २) ४० टक्के
        ३) ५० टक्के
        ४)  ६० टक्के
     
    ९)  देशातील दरवर्षी महापुरामुळे किती टक्के जमीन वाहून जाते.
        १) १५%
        २) १२%
        ३) १९%
        ४) १८%
     
    १०) खालीलपैकी कोणती घटना नैसर्गिक आपत्ती नाही?
        १) भूकंप
        २) वायू गळती
        ३) चक्रीवादळ
        ४) त्सुनामी
     
    ११) खालीलपैकी कोणती आपत्ती पृथ्वीच्या भूगर्भातून उद्भवते?
        १) भूकंप
        २) दरडी कोसळणे
        ३) पूर
        ४) वादळ
     
    १२) भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे?
        १) नैसर्गिक आपत्ती
        २) रासायनिक आपत्ती
        ३) जैविक आपत्ती
        ४) आण्विक आपत्ती
     
    १३) मुंबईमध्ये इमारतींच्या उंचीमुळे कोणत्या खालील आपत्तीची संभाव्यता वाढू शकते?
        १) ज्वालामुखी
        २) आग
        ३) वादळ
        ४) त्सुनामी
     
    १४) मुंबईकर आजही पावसाळ्याच्या दिवसांत पुराच्या भीतीने घाबरतात कारण जोरदार, सतत धार पाऊस समुद्राच्या भरतीच्या वेळेस येणारा पाऊस. त्याची तीव्रता वाढवितो. यावर उपाय म्हणून खालील मार्ग सुचविण्यात आले आहेत. तुम्ही योग्य ते निवडा.
        १) सांडपाणी वाहून नेणारी गटारे, नाले यांची सफाई करणे.
        २) समुद्रपातळीच्या खाली ब्रिमस्टोवाड नावाची आधुनिक उपाय योजना (जागतिक पातळीवर वापरलेली)
        ३) मल निःसारण प्रकल्प आणि पाणी साचणार्‍या स्थानांवर ते साचणार नाही अशी व्यवस्था करणे
        ४) मुंबईकरामध्ये जाणीव निर्माण करणे.
     
    १५) पूर आपत्ती व्यवस्थापनासाठी संरचनात्मक उपायांपैकी एक कोणता आहे?
        १) पूर विमा
        २) पूर पूर्वानुमान
        ३) ड्रेनेज सुधारणा
        ४) बाधित लोकांना मदत
     
    १६) पुरामळे होणार्‍या हानीस टाळण्यासाठी जिथे नेहमी पूर येतो त्या भागात कोणती उपाययोजना करणे जास्त परिणामकारक राहील?
        १) अशा ठिकाणी हवामान खात्याचे कार्यालय उघडावे जेणे करून पूराबद्दल पूर्वसूचना देता येईल
        २) अभियंते आणि तंत्रज्ञ यांच्या सल्ल्यानुसार योग्य ती स्थायी उपाय योजना करावी
        ३) पुरात बळी पडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी एक मोठा स्वयंसेवकाचा जथ्था तयार ठेवावा
        ४) पूरत्रस्थ विभागातील नागरिकांना पावसाळ्यापूर्वी हलवावे
     
    १७) खालीलपैकी कोणते विधान चूक आहे.
        १) वायव्येला सर्वाधिक पाऊस पडतो.
        २) ईशान्येला सर्वाधिक पाऊस पडतो.
        ३) ईशान्येला पावसाचे दुर्भिक्ष आहेत.
        ४) वरील सर्व बरोबर आहे.
     
    १८) सुमारे १००० यात्रेकरू असलेल्या एका तंबूला आग लागली. बरेच मृत्युमुखी पडले. भविष्यकाळात जीवितहानी होऊ नये म्हणून कोणत्या प्राथमिक योजनांची गरज लागेल?
        १) यात्रेकरूची पक्क्या घरांत सोय करावी  
        २) त्वरित पोलीससहाय्य मिळावे, म्हणून तंबूजवळ दूरध्वनीची व्यवस्था करावी
        ३) अशा तंबूला खूप दरवाजे ठेवावेत 
        ४) तंबूजवळ पोलीस स्टेशनची व्यवस्था करावी
     
    राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण
     
    १)  नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा केंद्र सरकारने कधी पारित केला ?
        १) २३ डिसेंबर २००५
        २) २४ नोव्हेंबर २००५ 
        ३) २२ ऑगस्ट २००६
        ४) यांपैकी नाही.
     
    २)  देशातील एकूण ७५१६ कि.मी. लांबीच्या किनारपट्टीपैेकी .... किनारपट्टी ही वादळे व त्सुनामीला बळी पडू शकते.
        १) ६४६० कि.मी
        २) ५७०० कि.मी 
        ३) ५२४० कि.मी
        ४) ४५०० कि.मी
     
    ३)  भारतीय हवामान विभागाचे प्रमुख कोण आहेत (२०२१) ?
        १) डॉ. मृत्युंजय महापात्रा
        २) डॉ. रंजन केळकर             
        ३) डॉ. बलराम भार्गव
        ४) वरील सर्व
     
    ४)  खालीलपैकी कोणते आपत्तीकालीन व्यवस्थापनात संस्थाविषयक हितसंबधीय आहेत?
        १) पोलीस आणि मदतनीस सैन्य 
        २) वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी 
        ३) बिनसरकारी संस्था            
        ४) वरील सर्व
     
    ५)  जोड्या लावा.
                     ’अ’ गट                              ‘ब’ गट
              a) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र     i) नवी दिल्ली
              b) आपत्ती नियोजन केंद्र                                                               ii) पुणे
              c) आपत्ती निवारण (मिटिगेशन) संस्था                                iii) अहमदाबाद
              d) आपत्ती  व्यवस्थापन संस्था             iv)  भोपाळ
              १) a-ii, b=i, c=iv, d=iii
              २) a-iii, b=i, c=iii, d=ii             
        ३)  a-i, b=ii, c=iii, d=iv
        ४) a-iii, b=iv, c=i, d=ii
     
    ६)  अमेरिकेच्या .... या प्रांतातील इमारती या भूकंपाला विरोध करणार्‍या सेस्मिक रेट्रोफिटिंग तंत्रज्ञानाने बांधलेला आहेत.
        १) कॅलिफोर्निया
        २) सनफ्रॅन्सिस्को 
        ३) न्यूयॉर्क
        ४) वरील सर्व
     
    ७) खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
        १) भारताचे राष्ट्रपती
        २) भारताचे पंतप्रधान     
        ३) राष्ट्रीय योजना आयोगाचे अध्यक्ष  
        ४) भारताचे गृहमंत्री
     
    ८)  नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार ती जबाबदारी कोणाकडे सोपविण्यात आली.
        १) कृषी मंत्रालय
        २) गृहमंत्रालय
        ३) अर्थमंत्रालय
        ४) वरील सर्व
     
    ९)  नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद बल या दलावर कोणाचे प्रत्यक्ष नियंत्रण असते.
        १) एनडीएमए
        २) डीडीएनए
        ३) एसडीएमए
        ४) एनडीआरएफ
     
    १०) मानवनिर्मित नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कोणत्या यंत्रणेच्या नियंत्रणाखाली येते ?
        १) NDMA
        २) DDMA
        ३) SDMA
        ४) तिन्ही बरोबर
     
    ११) जिल्हा नैसर्गिक व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख कोण असतात ?
        १) जिल्हाधिकारी 
        २) जिल्ह्याचे पालकमंत्री           
        ३) मुख्य कार्यकारी अधिकारी
        ४) विभागीय आयुक्त
     
    १२) आपत्ती व्यवस्थापनाची कार्ये खालील कोणत्या व्यवस्थापन तत्त्वांवर आधारित आहेत ?
        i) नियोजन     
              ii) संघटन      
              iii) कर्मचारी नियुक्ती आणि मानव संसाधन व्यवस्थापन
              iv) नेतृत्व करणे 
              v) नियंत्रण     
              vi) अहवाल सादर करणे
        vii) अंदाजपत्रक बनवणे          
              viii) संप्रेरणा देणे
        १) (i) (ii) (iii) (iv) (v)
        २) (ii) (i) (iii) (iv) (v)
        ३) (v) (ii) (iii) (iv) (i)
        ४) (iii) (ii) (i) (iv) (v)
     
    १३) नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यकता आहे.
        १) आपत्तीपूर्वी किंवा आपत्ती आल्यानंतर प्रयत्नाचे नियोजन करावे. 
        २) साधने, समाज व प्रदेश यांचा समन्वय साधणे.
        ३) प्रेरणा निर्माण करून नियोजन साधणे.             
        ४) वरील सर्व
     
    १४) कोणत्याही स्वरूपाच्या आपत्तीमुळे होणार्‍या, सर्व प्रकारच्या हानीचे स्वरूप, अल्प व्हावे म्हणूनकोणत्या कृती करणे उचित ठरेल ?
        १) आपत्ती-प्रवण नकाशे तयार करणे.
        २) धोकादायक वस्तूंची ओळख करून देणे.
        ३) रासायनिक साठ्यांची नियमित तपासणी करणे.
        ४) वरील सर्व
     
    १५) नैसर्गिक आपत्तीपूर्व व्यवस्थापनाबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे.
        १) प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे.
        २) पूर्वनियोजन आणि पूर्वतयारी प्रकल्प
        ३) समुदाय पातळीवरील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन
        ४) आपत्ती आल्यानंतर त्यातील बेघर लोकांना मदत करणे.
     
    १६) नैसर्गिक आपत्तीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो.
        १) संघटनात्मक पातळीवर सामूहिक प्रयत्न करण्यासाठी जनतेला तयार करणे.
        २) एनडीएमए ला सहकार्य करणे.
        २) नियमितपणे मॉक एक्झरसायझेस आयोजित करणे.
        ४) वरील सर्व
     
    १७) आपत्ती व्यवस्थापन कोणती गोष्ट करू शकत नाही?
        १) जीवितहानी कमी करू शकत नाही
        २) मालमत्तेची हानी कमी करू शकत नाही
        ३) आपत्ती टाळू शकत नाही      
        ४) प्रभावित लोकांना मुदत पुरवू शकत नाही
     
    १८) आपत्ती व्यवस्थापन प्रणालीतील पहिली पायरी कोणती?
        १) तयारी
        २) प्रतिबंध
        ३) पूर्व सूचना
        ४) पुनर्वसन
     
    १९) भारताने २००५ साली नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासंबंधी कोणता कार्यक्रमावर  स्वाक्षरी केली.
        १) क्योटो प्रोटोकॉल              
        २) रिओ फ्रेमवर्क                
        ३) दोन्ही वर स्वाक्षर्‍या केल्या
        ४) यांपैकी नाही.
     
    २०) कोणत्या कामाचा आपत्ती पश्‍चात कामांमध्ये समावेश होत नाही?
        १) सुटका कार्य
        २) दुरुस्ती कार्य
        ३) पुनर्निर्माण
        ४) लोक जागृती
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१५४)
    १-२
    २-३
    ३-४
    ४-४
    ५-४
    ६-४
    ७-३
    ८-3
    ९-४
    १०-१
    चक्रीवादळ व त्सुनामी
    १-१
    २-४
    ३-१
    ४-१
    ५-४
    ६-२
    ७-४
    ८-२
    त्सुनामी
    १-२
    २-२
    ३-४
    ४-२
    ५-३
    ६-४
    वारे व स्थानिक वारे
    १-१
    २-२
    ३-१
    ४-१
    ५-१
    ६-३
    ७-४
    ८-२
    ९-४
    १०-२
    ११-१
    १२-२
    १३-२
    १४-३
    १५-३
    १६-१
    १७-२
    १८-२
    १९-२
    २०-३
    २१-२
    २२-३
    २३-२
    आवर्त व प्रत्यावर्त
    १-२
    २-१
    ३-३
    ४-४
    ५-२
    ६-३
    ७-२
    ८-४
    ९-१
    १०-३
    ११-३
    १२-३
    १३-१
    १४-२
    १५-१
    १६-२
    १७-२
    १८-१
    १९-१
    २०-४
    २१-३
    २२-२
    नैसर्गिक आपत्ती व तिचे व्यवस्थापन
    १-३
    २-३
    ३-१
    ४-३
    ५-२
    ६-३
    ७-१
    ८-४
    ९-२
    १०-२
    ११-१
    १२-२
    १३-२
    १४-२
    १५-३
    १६-४
    १७-२
    १८-३
    राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण
    १-१
    २-२
    ३-१
    ४-४
    ५-३
    ६-१
    ७-२
    ८-२
    ९-१
    १०-१
    ११-१
    १२-१
    १३-४
    १४-४
    १५-४
    १६-४
    १७-३
    १८-२
    १९-३
    २०-४

     

Share this story

Total Shares : 2 Total Views : 1080