पंडिता रमाबाई / प्रश्‍नमंजुषा (१४२)

  • पंडिता रमाबाई / प्रश्‍नमंजुषा (१४२)

    पंडिता रमाबाई / प्रश्‍नमंजुषा (१४२)

    • 18 May 2021
    • Posted By : study circle
    • 4980 Views
    • 5 Shares
    पंडिता रमाबाई
     

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात पंडिता रमाबाई यांच्यावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. पंडिता रमाबाई यांचे विचार आणि कार्यत्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, त्यांच्यावर परीक्षेत विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

     सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल

    *   राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक : १.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्य - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा. 

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व  चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)


    पंडिता रमाबाई (१८५८-१९२२)
     

    १)  पंडिता रमाबाई ज्या खूप शिकलेल्या, सुंदर आणि बुद्धिमान होत्या, त्यांच्याबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?
        १) श्रीनिवास शास्त्री त्यांचा एकुलता एक भाऊ होता.
        २) बरेच आय.सी.एस. अधिकारी त्यांच्याशी लग्न करायला तयार होते.
        ३) त्यांनी बिपिन बिहारी दासशी लग्न केले.                   
        ४) वरील एकही नाही.
     
    २)  मुंबईचे ‘शारदा सदन’ कोणी स्थापन केले ?
        १) पंडिता रमाबाई
        २) अ‍ॅनी बेझंट
        ३) आनंदीबाई
        ४) सावित्रीबाई फुले
     
    ३)  मुक्तीसदन, कृपासदन, सदानंदसदन या संस्था कोणी सुरू केल्या ?
        १) पंडिता रमाबाई
        २) आनंदीबाई जोशी
        ३) रमाबाई रानडे
        ४) ताराबाई शिंदे
     
    ४)  गिरगांव (मुंबई) येथे शारदा सदनाची स्थापना कोणी केली?
        १) सावित्रीबाई फुले
        २) श्रीमती अ‍ॅनी बेझंट
        ३) पंडिता रमाबाई
        ४) महर्षी धोंडो केशव कर्वे
     
    ५)  ‘कैसर-इ-हिंद’ ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती?
        १) विजयालक्ष्मी पंडित
        २) पंडिता रमाबाई
        ३) सरोजिनी नायडू
        ४) इंदिरा गांधी
     
    ६)  ज्या सुशिक्षितांनी सुरुवातीच्या काळात पंडिता रमाबाईंना प्रोत्साहित केले, ते नंतर टीका करू लागले कारण -
        १) पंडिता स्वतःची मते अत्यंत निर्भीडपणे मांडू लागल्या.
        २) त्यांनी प्रचलित समाज व्यवस्थेला आव्हान दिले.
        ३) त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार व प्रसार केला.
        ४) त्यांनी शारदा सदन सुरू केले.
     
    ७)  पंडिता रमाबाईंबद्दल कोणती विधाने बरोबर आहेत?
              a) त्या संस्कृत भाषेत निष्णात होत्या.            
              b) त्या वेदांवर प्रवचन देत
        c) त्यांनी ख्रिश्‍चन धर्माचा स्वीकार केला.
        १) (a)
        २) (a), (b)
        ३) (a) (b), (c)
              ४) कोणतेही नाही
     
    ८)  मुंबईचे ‘शारदा सदन’ कोणी स्थापन केले ?
        १) पंडिता रमाबाई
        २) अ‍ॅनी बेझंट
        ३) आनंदीबाई
        ४) सावित्रीबाई फुले
     
    ९)  पंडिता रमाबाई यांच्या संघटना व कार्य यांच्या जोड्या लावा.
        (i) शारदा सदन                                    (A) दुष्काळग्रस्तांना मदत
        (ii) मुक्ती सदन                                     (B) निराधार स्त्रियांना मदत
              (iii) कृपा सदन                 (C) ख्रिश्‍चन धर्माचा प्रसार
        (iv) रमाबाई असोसिएशन          (D) विधवा स्त्रियांना मदत
        पर्यायी उत्तरे :
        १) (i) - (A), (ii) -  (B), (iii) - (C), (iv) - (D)
        २) (i) - (D), (ii) -  (C), (iii) - (B), (iv) - (A)
        ३) (i) - (B), (ii) -  (A), (iii) - (D), (iv) - (C)
        ४) (i) - (D), (ii) -  (C), (iii) - (A), (iv) - (B)
     
    १०) ‘पंडिता रमाबाईंशी’ निगडीत चुकीचे  विधान ओळखा.
        १) ‘शारदासदन’ आणि ‘मुक्तिसदना’ची स्थापना.
        २) ‘स्त्रीकोश’ या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले
        ३) निराश्रित विधवा स्त्रियांसाठी ‘कृपासदन’, ‘प्रितीसदन’
        ४) त्यांच्या कार्याबद्दल ‘कैसर-र्ई-हिंद‘ ही पदवी बहाल
     
    ११) खालीलपैकी कोणत्या संस्थांशी पंडिता रमाबाई संबंधित होत्या ?
        अ) मुक्ती सदन
        ब) कृपा सदन
        क) सदानंद सदन
        ड) बातमी सदन
        वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
        १) फक्त अ आणि ब
        २) फक्त अ,ब आणि क
        ३) फक्त ब, क आणि ड
        ४) वरील सर्व बरोबर
     
    १२) स्त्री-शिक्षणासाठी व स्त्री-जागृतीसाठी ‘शारदा-सदन’ ही संस्था कोणी स्थापन केली?
        १) रमाबाई रानडे
        २) पंडिता रमाबाई
        ३) ताराबाई शिंदे
        ४) सावित्रीबाई फुले
     
    १३) अंधांसाठी पहिली शाळा ‘बातमी सदन‘ ...... यांनी सुरु केली.
        १) रमाबाई रानडे
        २) पंडिता रमाबाई
        ३) धों. के. कर्वे
        ४) र. धों. कर्वे
     
    १४) ......... या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या.
        १) पंडिता रमाबाई
        २) आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे 
        ३)ताराबाई शिंदे
        ४) रमाबाई रानडे
     
    १५) पुण्यात बालविवाहावर बंदी आणि स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देणारी संस्था पुढीलपैकी कोणी सुरू केली ?
        १) सरोजिनी नायडू
        २) पंडिता रमाबाई
        ३) कमला नेहरू
        ४) अ‍ॅनी बेझंट
     
    १६) ...... यांची दुरुस्ती शाळा ’मुक्ती’ पुण्याजवळ केडगाव येथे होती.
        १) धों. के. कर्वे
        २) पंडिता रमाबाई
        ३) महात्मा फुले
        ४) रमाबाई रानडे
     
    १७) आर्य महिला समाजस्त्री-सुधारणा करिता ........... ह्यांनी स्थापना केली.
        १) ताराबाई शिंदे
        २) आनंदीबाई जोशी
        ३) सावित्रीबाई फुले
        ४) पंडिता रमाबाई
     
    १८) पंडिता रमाबाई यांनी स्त्री मुक्तीकरणासाठी केलेले हे कार्य उल्लेखनीय आहे.
        १) त्यांनी महिलांच्या स्थिती सुधार आणण्याकरता आर्य महिला समाज सुरू केला.
        २) त्यांनी स्त्रियांना आरोग्य सुविधा पुरवण्याकरता लेडी डफरीन फंड सुरू केला.
        ३) त्यांनी विधवांकरता शारदा सदन स्थापित केले.    
        ४) त्यांनी अनाथांकरता कृपा सदन सुरू केले.
     
    १९) पंडिता रमाबाईंना कैसर-ए-हिंद किताब का देण्यात आला?
        १) त्यांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला म्हणून
        २) त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी
        ३) दुष्काळग्रस्त स्त्रियांना आश्रय दिला म्हणून
        ४) रमाबाई असोसिएशन स्थापन केले म्हणून
     
    २०) आगरकर, पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते ?
        १) महिलाश्रम
        २) स्त्री-सुधार केंद्र
        ३) स्त्री-आधार केंद्र
        ४) शारदा सदन
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१४२)
    १-४
    २-१
    ३-१
    ४-३
    ५-२
    ६-३
    ७-३
    ८-१
    ९-४
    १०-२
    ११-४
    १२-२
    १३-२
    १४-२
    १५-२
    १६-२
    १७-४
    १८-४
    १९-२
    २०-४

     

Share this story

Total Shares : 5 Total Views : 4980