महाराष्ट्रातील समाजसुधारक (3) / पश्‍नमंजुषा (१३९)

  • महाराष्ट्रातील समाजसुधारक (3) / पश्‍नमंजुषा (१३९)

    महाराष्ट्रातील समाजसुधारक (3) / पश्‍नमंजुषा (१३९)

    • 18 May 2021
    • Posted By : vaishali
    • 2315 Views
    • 5 Shares
     महाराष्ट्रातील समाजसुधारक (३)
     

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात महाराष्ट्रातील समाजसुधारक या विषयावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील काही समाजसुधारकाशी संबंधित महत्त्वाच्या संस्थात्यांचे विचार आणि कार्य, परीक्षेत विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
     
    *   राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :  
     
    १.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्य - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा.
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व  चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    १) विष्णुशास्त्री पंडित (१८२७-७६)
     
    १)  समाजसुधारकाला ओळखा.
        a) त्यांनी स्त्री मुक्तीसाठी काम केले व पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले.
        b) त्यांनी स्वत: विधवेशी विवाह केला.
        c) त्यांनी ईश्‍वरचंद्र विद्यासागरांच्या विधवाविवाह’ चे मराठीत भाषांतर केले.
        d) त्यांनी हिंदुस्थानाचा इतिहास, अभंगाज ऑफ तुकाराम व बर्‍याच इंग्रजी व मराठी डिक्शनर्‍या काढल्या.
        पर्यायी उत्तरे :
        १) बाबा पदमनजी
        २) विष्णुशास्त्री पंडित
        ३) गोपाळ गणेश आगरकर
        ४) वरीलपैकी कोणतेही नाही
     
    २)  विष्णुशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दु:खांना वाचा फोडली ?
        १) संवाद कौमुदी
        २) पूना ऑब्झर्व्हर
        ३) सुधारक
        ४) इंदुप्रकाश
    २) लहुजी साळवे (१७९४-१८८१)
     
    १)  लहानपणापासूनच ते शस्त्रांच्या सोबत खेळत असत, त्यामुळे त्यांना शस्त्र हाताळताना भिती वाटत नसे. कमी कालावधीत ते शस्त्र वापरण्यात पारंगत झाले. ते अति वेगाने डोंगर चढत आणि घोड्यावर बसून डोंगर चढत. त्यांचे वडील त्यांना पुरंदरचा किल्ला पहायला नेत. ते कोण होते?
        १) राघोजी साळवे
        २) लहुजी साळवे
        ३) शिवाजी साळवे
        ४) राणोजी साळवे
     
    २)  ते लहूजींचे शिष्य होते.
        लहूजींना त्यांचा अभिमान होता.
        ते लहूजींकडून मल्लविद्या, तलवार चालवणे, दांडपट्टा, बंदूक चालविणे इत्यादी शिकले.
        त्यांचा कल सामाजिक सुधारणांकडे होता. ते कोण?
        पर्यायी उत्तरे :
        १) ज्योतिबा फुले
        २) यशवंत फुले
        ३) मेघाजी लोखंडे
        ४) नारायण लोखंडे
     
    ३)  ....... यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
        १)  राघोजी साळवे
        २) लहुजी वस्ताद साळवे            
        ३) मोरोर विठ्ठल साळवे
        ४) नानाजी साळवे
     
    ३) सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी (१८२८-८०)
     
    १)  म. गांधीपूर्वी ’स्वदेशीचा’ पुरस्कार ४०-५० वर्षा अगोदर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केला होता?
              a) गणेश वासुदेव जोशी
        b) वासुदेव बळवंत फडके
        c) दादोबा पांडुरंग तर्खडकर                      
              d) आत्माराम पांडुरंग तर्खडकर
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b) फक्त
              २) (b) आणि (c) फक्त
        ३) (c) आणि (d) फक्त
        ४) (a) आणि (d) फक्त
     
    २)  ............ हे पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक नव्हते.
        १) म. गो. रानडे
        २) गो. ग. आगरकर
        ३) जी. व्ही. जोशी
        ४) एस. एच. साठे
     
    ३)  पुण्यात गणेश वासुदेव जोशी यांनी ‘सार्वजनिक सभा’ ही संस्था स्थापन केली. सभेच्या स्थापनेच्यावेळी सभेचे/सभेची पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट/उद्दिष्टे होते/होती?
        अ) पुण्याच्या पर्वती संस्थानातील भ्रष्टाचार व गोंधळ दूर करणे
        ब) पुण्याचा विकास करणे.
        क) म. फुलेच्या सत्यशोधक समाजास मदत करणे.
        ड) इंग्रजी शासनाच्या विरोधात जनमत तयार करणे.
        १) अ फक्त
        २) अ आणि क फक्त
        ३) ब, क आणि ड फक्त
        ड) अ, क आणि ड फक्त
     
    ४)  हाताने विणलेल्या खादीचा वेष परिधान करून ’राजदरबारात (१८७७)’ कोण उपस्थित होते?
        १) गणेश वासुदेव जोशी
        २) एम. जी. रानडे
        ३) रविंद्रनाथ टागोर
        ४) बाळेंद्रनाथ टागोर
     
    ४) न्या. म. गो. रानडे (१८४२-१९०१)
     
    १)  महादेव गोविंद रानडे यांच्याबाबत पुढे दिलेल्या विधानापैकी कोणते विधान सत्य नाही?
        १) ते मुंबर्ई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो होते.
        २) त्यांची एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये व्याख्याता पदावर नेमणूक झाली होती.
        ३) विष्णुशास्त्री पंडितांसोबत ते विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळाचे संस्थापक सदस्य होते.
        ४) आत्माराम पांडुरंग यांच्यासह ते प्रार्थना समाजाचे एक संस्थापक होते.
     
    २)  न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे केवळ समाज सुधारकच नव्हते, तर ते ...... ही होते.
        a) इतिहासकार
        b) अर्थशास्त्रज्ञ
        c) शिक्षणतज्ज्ञ
        d) कवी
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (c) फक्त
              २) (b) आणि (d) फक्त
              ३) (c) आणि (d) फक्त
        ४) (a), (b), (c) फक्त
     
    ३)  पुढीलपैकी कोणते दोन वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते?
        अ) रानडेंच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू
        ब) राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी
        क) बौद्ध
        ड) जैन
        १) फक्त अ आणि ब
        २) फक्त अ आणि ड
        ३) फक्त ब आणि क
        ४) फक्त अ आणि क
     
    ४)  महादेव गोविंद रानडे यांच्या संदर्भात पुढील विधाने पहा :
        अ) त्यांच्यावर संत तुकारामांचा प्रभाव होता.       
        ब) त्यांनी बर्‍याच संस्था स्थापन केल्या
        क) ते मवाळ शिक्षण व पुनर्विवाहाचा पुरस्कार केला 
        ड) त्यांनी प्रौढ शिक्षण व पुनर्विवाहाचा पुरस्कार केला
        १) ब व क बरोबर
        २) अ,,क बरोबर
        ३) ब,,ड बरोबर
        ४) सर्व बरोबर
     
    ५)  ............ यांनी १८६५ मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले.     
       १) म. गो. रानडे आणि विष्णुशास्त्री पंडित
       २) धों. के. कर्वे आणि विष्णुशास्त्री पंडित
       ३) गोपाळ गोखले आणि धों. के. कर्वे
       ४) धों. के. कर्वे आणि पंडिता रमाबाई
     
    ५) न्या. का. त्र्यं. तेलंग (१८५०-९३)
     
    १)  पुढील विधाने वाचून त्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा?
        a) ते स्टुडंट्स लिटरररी अ‍ॅण्ड सायंटिफिक सोसायटीचे १८७२-१८८९ पर्यंत सचिव होते.
        b) ते हंटर कमिशनचे बिगरसरकारी व स्वतंत्र सदस्य होते.
        c) ते रखमाबाई विरुद्ध तिचा पती दादाजी या खटल्यात तिचे सल्लागार होते.
        पर्यायी उत्तरे :
              १)  बद्रुद्दिन तय्यबजी
        २) फिरोजशहा मेहता
        ३) काशिनाथ त्रिंबक तेलंग
        ४) बाळ मंगेश वागळे
     
    उत्तरे : पश्‍नमंजुषा (१३९)
     
    १) विष्णुशास्त्री पंडित  (१८२७-७६)
    १-२
    २-४
     
    २) लहुजी साळवे (१७९४-१८८१)
    १-२
    २-१
    ३-२
     
    ३) सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी (१८२८-८०)
    १-१
    २-२
    ३-१
    ४-१
     
    ४) न्या. म. गो. रानडे (१८४२-१९०१)
    १-
    २-४  
    ३-१
    ४-४
    ५-१
    ५) न्या. का. त्र्यं. तेलंग (१८५०-९३)
    १-३

Share this story

Total Shares : 5 Total Views : 2315