महात्मा फुले / पश्‍नमंजुषा (१३८)

  • महात्मा फुले / पश्‍नमंजुषा (१३८)

    महात्मा फुले / पश्‍नमंजुषा (१३८)

    • 18 May 2021
    • Posted By : study circle
    • 4953 Views
    • 11 Shares
    महात्मा फुले 

       महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात महात्मा फुले यांच्यावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य, त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, त्यांच्यावर परीक्षेत विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
     
    *   राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :  
     
    १.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्य - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा.
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    महात्मा फुले (१८२७-९०)
     
    १)  महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती?
        १) इ.स. १८८७
        २) इ.स. १८८८
        ३) इ.स. १८८९
        ४) इ.स. १९९०
     
    २)  जोड्या लावून योग्य पर्याय निवडा :
        a) सत्यशोधक समाजाची स्थापना                                  i) १८५२
              b) बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना                      ii) १८६३
        c) अस्पृश्यांसाठी शाळा सुरू                   iii) १८७३
        d) शेतकर्‍यांचा आसूड                                      iv) १८८३
        पर्यायी उत्तरे :
                  (a)      (b)       (c)        (d)                                                             
              १)  (i)       (ii)       (iii)       (iv)        
        २)  (ii)      (i)        (iv)       (iii)
        ३)  (iii)     (ii)       (i)         (iv)
        ४)  (iv)     (iii)      (ii)        (i)
     
    ३)  शिक्षणाशी संबंधित असलेल्या ‘झिरपणी सिद्धांता’ला कोणी विरोध केला होता?
        १) डॉ. आंबेडकर
        २) महात्मा फुले
        ३) महर्षी शिंदे
        ४) न्यायमूर्ती रानडे
     
    ४)  एक ब्राह्मण, सदाशिव बल्लाळ गोवंडे जे त्यांचे आयुष्यभर मित्र बनून राहिले ते ........ पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये भेटले.
        १) भीमराव आंबेडकरांना
        २) ज्योतीराव फुलेंना
        ३) विठ्ठल रामजी शिंदेंना
        ४) लहुजी साळवेंना
     
    ५)  फुलेंचे शेजारी ...... यांनी त्यांना शाळेत जाण्यास भाग पाडले.
        १) गफार बेग मुन्शी
        २) सार्वजनिक काका
        ३) म. गो. रानडे
        ४) सादिक अली
     
    ६)  जोतिबा फुलेंबाबत काय खरे नाही?
        a) जोतिबांच्या यात्रेदिवशी जन्म म्हणून नाव जोतिबा.
        b) आजोबांचा फुलांचा व्यवसाय म्हणून आडनाव फुले.
        c) राइट्स ऑफ मॅन या थॉमस पेनच्या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता.
        d) विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांचे टीकाकार होते.
        e) त्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामीळ, गुजराती भाषा येत
        f) विद्येविना अनर्थ हे त्यांनी प्रामुख्याने जाणले.
        १) (a) (b)
        २) (b) (d)
        ३) (e) (f)
        ४) सर्व विधाने खरी आहेत.
     
    ७)  थॉमस पेनच्या लिखाणाने प्रभावित झालेल्या समाजसुधारकाचे नाव सांगा.    
       १) गोपाळ गणेश आगरकर
       २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
       ३) न्यायमूर्ति रानडे
       ४) महात्मा ज्योतिराव फुले
     
    ८)  महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव दिसतो ?
        १) जस्टीस ऑफ पीस
        २) रिलीफ अ‍ॅक्ट
        ३) राइट्स ऑफ मॅन
        ४) हू बेअर शुद्राज
     
    ९)  महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक कोणाला म्हणतात?
        १) छ. शाहू महाराज
        २) महात्मा जोतिबा फुले
        ३) अण्णा हजारे
        ४) ना. ग. गोरे
     
    १०) ’महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर’ म्हणून कोणास ओळखले जाते?
        १) जोतिबा फुले
        २) वि. रा. शिंदे
        ३) डॉ. आंबेडकर
        ४) छत्रपती शाहू महाराज
     
    ११) ‘महाराष्ट्राचे बुकर टी-वॉशिंग्टन’ म्हणून कोणाला ओळखले जाते ?
        १) महात्मा फुले
        २) कर्मवीर भाऊराव पाटील
        ३) महर्षी धोंडो केशव कर्वे
        ४) महर्षी विठ्ठल शिंदे
     
    १२) विख्यात इतिहासकार य. दि. फडके म्हणतात कर्मठ सनातन्यांनी त्यांच्या व्याकरणाच्या चुका दाखवून बाजी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मानवी हक्क आणि समतेबद्दलचा विचार प्रतिपक्षाला दडपून टाकता आला नाही“. हे विचारवंत कोण ?
        १) बाबा पदमनजी
        २) भी. रा. आंबेडकर
        ३) गो. ग. आगरकर
        ४) ज्योतीराव फुले
     
    १३) ‘वेदांकडे परत चला‘ या विचारावर त्यांचा विश्‍वास नव्हता त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते तरीही त्यांनी दयानंद सरस्वतीच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचे मान्य केले. ते कोण ?           
        १) विठ्ठल रामजी शिंदे
        २) जोतिबा फुले
        ३) गोपाळ गणेश आगरकर
        ४) गोपाळ हरी देशमुख
     
    १४) वेद हे अपौरुषेय नसून आर्यांनी त्यांची निर्मिती केली आहे”, असा विचार मांडणारे विचारवंत कोण ?
        १) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
        २) विठ्ठल रामजी शिंदे
        ३) महात्मा जोतिबा फुले
        ४) शाहू महाराज 
     
    १५) ...... यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत.
        १) महात्मा गांधी
        २) लोकमान्य टिळक
        ३) महात्मा फुल
        ४) दयानंद सरस्वती
     
    १६) पुढील वाक्यात खाली दिलेल्या कोणाचे वर्णन केले आहे ?
        स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव सर्वत्र समान असतो, हे तत्त्व शिकले होते.
        ख्रिश्‍चन मिशनर्‍यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे, सामाजिक सुधारणांचे आणि जागतिक मानवतावादाचे महत्त्व कळले.
        त्यांनी विधवा पुनर्विवाहाला उघड-उघड पाठिंबा दिला आणि स्त्री भ्रूण हत्येच्या प्रथेला विरोध केला.
        पर्यायी उत्तरे :
        १) दुर्गाराम मंछाराम
        २) दादोबा पांडुरंग तर्खडकर
        ३) ज्योतिबा फुले
        ४) नारायण गुरु
     
    १७) महात्मा फुलेंच्या मते जगात सत्यासारखा अन्य कोणताही धर्म नाही. ते म्हणतात सत्य म्हणजे -
              a) मानव धर्म
        b) कृती
              c) मूर्तिपूजा
              d) समाजसेवा
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b)
              २) (c) आणि (d)
        ३) (a) आणि (c)
        ४) (a) आणि (d)
     
    १८) सन १८८८ पासून जोतिबा फुले हे ‘महात्मा’ म्हणून का ओळखले जाऊ लागले ?
        १) त्यांनी जनतेच्या हितासाठी कार्य केले.    
        २) त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाचे योगदान दिले.
        ३) त्यांनी कनिष्ठ जमातींसाठी अव्याहतपणे कार्य केले.
        ४) त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली.
     
    १९) ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी ...... यांनी दिली.
        १) मुंबईचे नागरिक
        २) ब्रिटिश सरकार
        ३) पुणेकर जनता
        ४) सातारकर जनता
     
    २०) महात्मा फुले यांच्याबाबत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?
        १) त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले.
        २) त्यांनी जातिभेद विवेकसार हे पुस्तक लिहिले.
        ३) त्यांना मोरो विठ्ठल बाळवेकर यांनी मदत केली.
        ४) त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला.
     
    २१) ‘पाणी पुरवठ्यासाठी, धरणाची उभारणी, रीतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यान शास्त्र व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम ...... यांनी मांडल्या.
        १) न्यायमूर्ती म. गो. रानडे       
        २) महात्मा ज्योतिबा फुले
        ३) महाराजा सयाजीराव गायकवाड
        ४) लोकमान्य टिळक
     
    २२) ......... हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.
        १) भाऊ दाजी लाड
        २) विष्णुशास्त्री चिपळूणकर       
        ३) विष्णुबुवा ब्रह्मचारी
        ४) महात्मा ज्योतिबा फुले
     
    २३) सर्वसाक्षी जगत्पती/त्याला नको मध्यस्थी/हे कोणाच्या धर्मविचारातील प्रमुख सूत्र होते?
        १) लोकमान्य टिळक
        २) राजा राममोहन रॉय          
        ३) महात्मा जोतिबा फुले
        ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
     
    २४) महात्मा फुले यांनी १८७३ साली पहिला सत्यशोधक पद्धतीचा विवाह कोणाचा केला?
        १) सिताराम आल्हाट
        २) ज्ञानोबा ससाणे
        ३) कृष्णाराव भालेकर
        ४) यशवंत फुले
     
    २५) बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?
        १) महर्षी धोंडो केशव कर्वे
        २) पंडित रमाबाई
        ३) गोपाळ गणेश आगरकर
        ४) महात्मा जोतिबा फुले
     
    २६) महात्मा फुले यांनी मुंबईत कोणत्या हेतूने नाभिकांचा संप घडवून आणला?
        १) कर जादा भरावा लागत होता.
        २) केश वपनाची चाल बंद व्हावी म्हणून
        ३) नाभिकांना सन्मानाने वागवावे.
        ४) वेतन वाढीसाठी
     
    २७) म. ज्योतिबा फुल्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली?
        १) सायमन आयोग
        २) हंटर आयोग
        ३) नेहरू आयोग
        ४) मोर्ले-मिंटो आयोग
     
    २८) ...... यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली.
        १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
        २) महर्षी शिंदे
        ३) म. ज्योतिबा फुले
        ४) गोपाळ हरी देशमुख
     
    २९) खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाज सुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली ?
        १) डॉ. बी.आर.आंबेडकर
        २) महात्मा फुले
        ३) गोदुताई कर्वे
        ४) विठ्ठलदास ठाकरसी
     
    ३०) मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते ?
              a)  सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे
        b) सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर
        c) विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर
        d) देवराव ठोसर, सौ. इ. सी. जोन्स
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b) फक्त
        २) (a), (b) आणि (c) फक्त
        ३) (b), (c) आणि (d) फक्त
        ४) वरील सर्व बरोबर
     
    ३१) महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा ‘विश्‍वकुटुंबाचा जाहीरनामा’ म्हणून उल्लेख केला जातो ?
        १) गुलामगिरी
        २) तृतीयरत्न
        ३) सार्वजनिक सत्यधर्म
        ४) शेतकर्‍यांचा आसूड
     
    उत्तरे : पश्‍नमंजुषा (१३८)
    १-२
    २-३
    ३-२
    ४-२
    ५-१
    ६-४
    ७-४
    ८-३
    ९-२
    १०-१
    ११-१
    १२-४
    १३-२
    १४-३
    १५-३
    १६-३
    १७-१
    १८-३
    १९-१
    २०-२
    २१-२
    २२-४
    २३-३
    २४-१
    २५-४
    २६-२
    २७-२
    २८-३
    २९-२
    ३०-४
    ३१-३

Share this story

Total Shares : 11 Total Views : 4953