अस्पृश्यता निर्मूलन / प्रश्‍नमंजुषा (१३५)

  • अस्पृश्यता निर्मूलन / प्रश्‍नमंजुषा (१३५)

    अस्पृश्यता निर्मूलन / प्रश्‍नमंजुषा (१३५)

    • 17 May 2021
    • Posted By : study circle
    • 5197 Views
    • 10 Shares
    अस्पृश्यता निर्मूलन
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात अस्पृश्यता निर्मूलन व जाती व्यवस्था उच्चाटनाच्या चळवळीयावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, व्यक्ती, त्यांचे विचार आणि कार्य, प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
     
       राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
     
    १.३.१ सामाजिक - धार्मिक सुधारणांच्या चळवळी - ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन व थिऑसॉफिकल सोसायटी.
    १.३.२  डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणेत्तर चळवळ व जस्टीस पार्टी.
    १.७     जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाकरिता चळवळी -
        डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा दृष्टिकोनगांधीजींचा दृष्टीकोन, इतर प्रयत्न
     
        (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    अस्पृश्यता निर्मूलन व जाती व्यवस्था उच्चाटन
     
    १)  अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावे यासाठी लढणार्‍या ....... यांनी १९०३ मध्ये ’सन्मार्ग बोधक निराश्रित समाज’ आणि १९०७ मध्ये चोखामेळा मुलींची शाळा सुरू केली.
        १) शिवराम जानबा कांबळे        
        २) किसन फागोजी बंदसोडे
        ३) गोपाळबाबा वलंगकर          
        ४) विठ्ठल रामजी शिंदे
     
    २)  पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ?
        अ) ते पुण्यातील एक लेखक होते.
        ब) अस्पृश्यांच्या वस्तींमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत.
        क) १९४५ सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते.
        ड) ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते.
        पर्यायी उत्तरे :
              १) द. कृ. पेठे
        २) मामाराव दाते
        ३) श्री. म. ऊर्फ बापूसाहेब माटे
        ४) कृष्णराव मराठे 
     
    ३)  शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा १९१० मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता?
        १) जी. बी. वालंगकर
        २) ज्योतिबा फुले
        ३) वरील दोघांचाही
        ४) वरील कोणाचाही नाही.
     
    ४)  जोड्या लावा -
        a) महाराजा सयाजीराव गायकवाड                    i)  न्यायपक्षाची स्थापना
        b) पी. त्यागराव आणि टी. एम. नायर         ii)  ‘विटाळ विध्वंसन‘ ग्रंथाचे लेखन
              c) गोपाळ बाबा वलंगकर                                iii) चोखामेळा सुधारणा मंडळाची स्थापना
              d) किसन फागुजी बंदसोडे             iv) अस्पृश्यता निवारक परिषदेचे आयोजन
        पर्यायी उत्तरे :
                       (a)      (b)       (c)        (d)                                                             
        १)  (iv)      (i)        (ii)       (iii)
        २)  (iii)      (iv)       (i)        (ii)
        ३)  (ii)        (i)        (iv)       (iii)
        ४)    (i)        (iii)      (iv)        (ii)
     
    ५)  हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रचार कोण करीत असे?
        १) लाला लजपतराय व पं. मदन मोहन मालवीय
        २) महात्मा गांधी व पं. जवाहरलाल नेहरू
        ३) लो. टिळक व न. चि. केळकर
        ४) वि. रा. शिंदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
     
    ६)  दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी या संघाची स्थापना यांनी केली.
        अ) सत्यशोधक समाज - महात्मा फुले
        ब) भारत सेवक संघ - ना. गोपाळकृष्ण गोखले
        क) दलित संघ - डिप्रेस्ड क्लास मिशन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
        ड) सोशल सर्व्हिस लिग- ना. म. जोशी
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ आणि क
        २) फक्त ब आणि ड
        ३) फक्त क
        ४) फक्त ड
     
    ७)  दलित चळवळीबाबत पुढील दोन विधानांपैकी काय बरोबर आहे?
        a) गोपाळ बाबा वलंगकर यांनी दापोली येथे दलितासाठी अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला.
              b) शिवराम जानबा कांबळे यांनी दलितांना शिक्षण मिळावे म्हणून चोखामेळा मंडळ सुरू केले.
              १) केवळ (a) परंतु (b) नाही
        २)  केवळ(b)  परंतु  (a) नाही
        ३) (a) (b) पैकी कोणतेही नाही
        ४) (a) (b)  दोन्ही
     
    ८)  योग्य जोड्या लावा :
          यादी - I                           यादी - II
        a) गोपाळबाबा वलंगकर           i )  बहिष्कृत हितकारणी सभा
        b) राजर्षी शाहू महाराज           ii)  सन्मानबोधक निराश्रित समाज
        c) डॉ. बाबासाहेब आंबेडकर        iii)  वेदोक्त प्रकरण
        d) किसन बनसोडे                                 iv)  अनार्य दोष परिहारक मंडळी 
            (a)  (b)   (c)   (d)
        1)  (ii)  (iii)  (i)    (iv)
        2)  (iv)  (iii)  (i)    (ii)
        3)  (ii)  (i)   (iii)   (iv)
        4)  (iv)  (i)   (iii)   (ii)
     
    ९)  १९१२ साली झालेल्या ’महाराष्ट्र अस्पृश्य परषिदे’चे अध्यक्ष ...... होते.
        १) विठ्ठल रामजी शिंदे
        २) रामकृष्ण भांडारकर
        ३) नारायण चंदावरकर
        ४) बाबासाहेब आंबेडकर
     
    १०) खालील घटनासंबंधी वाचा.
        १) सत्यशोधक समाजाची स्थापना, ज्योतिबा फुले यांच्या कडून
        २) स्वामी दयानंद यांच्या कडून आर्य समाजाची स्थापना.
        ३) केशव चंद्र सेन यांच्या मार्गदर्शनात मुंबईला प्रार्थना समाजाची स्थापना.
        वरील घटनांचा अचूक क्रम आहे.
        पर्याय :
        १) १-२-३
        २) २-३-१
        ३) ३-१-२
        ४) ३-२-१
     
    ११) औपनिवेशिक भारतात खालील जाती संबंध आंदोलनासंबंधित नेत्यांचे वक्तव्य वाचा.
        १) बी आर आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन वर्ष १९४२ मध्ये केले.
        २) स्वामी अच्युतानंद बिहार मधील दलित आंदोलनातील प्रमुख नायक होते.
        ३) महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक धार्मिक विचार आपले पुस्तक गुलामगिरी यात व्यक्त केले आहे.
        ४) ई वी रामस्वामी नायकर पेरियार, मद्रास प्रॉव्हिन्स मधील जस्टीस पार्टीचे संस्थापक सदस्य होते.
        वरीलपैकी कोणते वक्तव्य बरोबर आहे ?
        १) १,,३ आणि ४
        २) १,२ आणि ३ फक्त
        ३) २ आणि ३ फक्त
        ४) १ आणि ३ फक्त
     
    १२) जोड्या जुळवा :
        a) छत्रपती शाहू महाराज            i)  मुंबई येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या परिषदेचे अध्यक्ष
        b) सयाजीराव गायकवाड            ii)  श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज
        c) गोपाळराव वलंगकर             iii)  मिस क्लार्क होस्टेलची स्थापना
        d) शिवराम जानबा कांबळे                       iv) अनार्य दोष परिहार समाज संस्थेची स्थापना
        पर्यायी उत्तरे :
                       (a)      (b)       (c)        (d)
        १)  (ii)      (iii)      (i)         (iv)
        २)  (iii)     (i)         (iv)       (ii)
        ३)  (i)       (iv)      (ii)        (iii)
        ४)  (ii)      (i)        (iv)       (iii)
     
    १३) १९२० मधील ‘अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद’ कुठे संपन्न झाली होती?
        १)  सोलापूर
        २) मुंबई
        ३) नागपूर
        ४) पुणे
     
    १४) अस्पृश्यांना ‘लष्करात व पोलिसात’ नोकर्‍या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली?
        अ) शिवराम जानबा कांबळे
        ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
        क) अ‍ॅड. बी. सी. कांबळे         
        ड) गोपाळबुवा वलंगकर
        १) अ फक्त
        २) ब फक्त
        ३) क आणि ड
        ४) ड फक्त
     
    १५) मार्च १९२७ मध्ये कुलाबा जिल्ह्यात डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली ‘कुलाबा डिस्ट्रिक्ट डिप्रेस्ड क्लासेसची सभा’ झाली त्यात ..... हा ठराव कार्यान्वित करण्याचे ठरले.
        १) मंदिर प्रवेश
        २) महाड तळे
        ३) बोले ठराव
        ४) पर्वती प्रदेश
     
    १६) गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला ...... म्हणून संबोधावे असे म्हटले होते.
        १)  महार
        २) हरिजन
        ३) प्रोटेस्टंट हिंदू
        ४) नवबौद्ध
     
    १७) १९४६ साली पुणे कराराच्या निषेधार्थ दलित सत्याग्रहींनी मोर्चे काढले होते. त्यातील स्त्री-सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत ...... या सहभागी होत्या.
        १) बेबी कांबळ
        २) ताराबाई शिंदे
        ३) शांताबाई दाणी
        ४) अवंतिकाबाई गोखले
     
    १८) बर्‍याच वादविवादानंतर खालच्या जातींच्या लोकांना काही सवलती मान्य करण्यात आल्या.
        या संदर्भात कोण पुढील प्रमाणे बोलले, “आमची हजारो वर्षे मुस्कटदाबी झाली. तुम्ही आम्हाला स्वत:च्या फायद्यासाठी ठेवले आणि आम्हाला एवढे दाबून ठेवले की न आमची मने, न आमचे शरीर न आमचे हृदय काम करते आणि न आम्ही पुढे वाटचाल करू शकतो !    
        १) बी. आर. आंबेडकर
        २) एम. के. गांधी 
        ३) एच. जे. खांडेकर
        ४) विठ्ठल रामजी शिंदे
     
    १९) समर्पक जोड्या जुळवा
        a) केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना                                i) १९३६
        b) सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क      ii) १८२८
        c) सत्यशोधक समाजाची स्थापना                                   iii) १९५३
        d) ब्राह्मो समाजाची स्थापना                                  iv) १८७३
        पर्यायी उत्तरे :
                       (a)      (b)       (c)        (d)
        १)     (i)       (ii)       (iii)       (iv)
              २)     (ii)      (iv)      (i)         (iii)
              ३)     (iii)     (i)        (iv)       (ii)
              ४)     (iv)     (iii)      (ii)        (i)
     
    २०) ‘अनार्यदोषपरिहारक मंडळा’ ची स्थापना पुढीलपैकी कोणी केली?
        अ) शिवराम जानबा कांबळे
        ब) गोपाळबुवा वलंगकर          
        क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
        ड) विठ्ठल रामजी शिंदे
        १) अ व ब
        २) क व ड
        ३) ब फक्त
        ४) क फक्त
     
    (१) सत्यशोधक समाज (१८७३)
     
    १)  महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
        १) ८ सप्टेंबर, १८७३
        २) १० ऑक्टोबर, १८७३
        ३) १४ सप्टेंबर, १८७३
        ४) १५ ऑगस्ट, १८७३
     
    २)  अज्जन एलायजा सॉलोमन हे ज्यूधर्मीय गृहस्थ ........ च्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते.
        १) प्रार्थना समाज
        २) सत्यशोधक समाज
        ३) ब्राह्मो समाज
        ४) डिप्रेस्ड क्लासेस मिशन
     
    ३)  ...... हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते.       
              १) ज्योतीबा फुले
        २) नारायणराव कडळक
        ३) ग्यानोबा सासने
        ४) विठ्ठल शिंदे
     
    ४)  महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख, सक्रिय कार्यकर्ते कोण होते?
        १) डॉ. विश्राम धोले, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, मामा परमानंद
        २) कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, डॉ. विश्राम धोले, हरी चिपळूणकर
        ३) नारायण मेघाजी लोखंडे, डॉ. विश्राम धोले, हरी चिपळूणकर, मामा परमानंद
        ४) कृष्णराव भालेकर, डॉ. विश्राम धोले, मामा परमानंद, हरी चिपळूणकर
     
    ५)  १८७४ मध्ये जोतिबा फुले यांनी ..... यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई मध्ये सुरू केली.
        १) व्यंकू काळेवार
        २) कृष्णराव भालेकर
        ३) मेघाजी लोखंडे
        ४) विठ्ठल शिंदे
     
    ६)  सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना ...... यांनी केली.
              a) रामय्या व्यंकय्या अय्यावारू     
              b) नरसिंगराव सायबू वडताळ
        c) जाया यल्लप्पा लिंगू
        d) व्यंकू बाळोजी कालेवार
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (d) फक्त
        २) (a), (b), (d) फक्त              
        ३)  (a), (b), (c) आणि (d)   
        ४) (a) आणि (c) फक्त
     
    ७)  खालीलपैकी कोणत्या व्यक्तिने १२०० रुपये खर्च करुन सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला?
        १) माया कराडी लिंगू 
        २) रामशेठ उरवणे                 
        ३) व्यंकू बाळोजी काळेवार       
        ४) पोलसानी राजन्ना लिंगू
     
    ८)  सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात ...... येथून प्रकाशित होणार्‍या ‘दिनमित्र’ वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती.
        १)  सातारा
        २) महाड
        ३) तरवडी
        ४) वाई
     
    ९)  सत्यशोधक समाजाचे बाले किल्ले म्हणजे ....व...... होत.
        अ) कोल्हापूर संस्थान, सातारा जिल्हा
        ब) औंध संस्थान, भोर संस्थान
        क) जंजिरा संस्थान, सावनूर संस्थान
        ड) सांगली संस्थान, जत संस्थान
        १) फक्त अ आणि ब
        २) फक्त क
        ३) फक्त क आणि ड
        ४) फक्त अ
     
    १०) सत्यशोधक समाजाविषयी कोणती विधाने बरोबर आहेत?
              a) डॉ. विश्राम रामजी घोले स्थापनेच्या वेळी अध्यक्ष होते.
        b) अधिवेशनाची सुरुवात सन १९११ पासून झाली.
        c) पहिल्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष रामय्या व्यंकय्या अय्यावरून हे होते.
        d) पुण्यातील थिएटर मध्ये महात्मा फुले यांनी स्त्रियांचा निबंध वाचनाचा कार्यक्रम घडवून आणला.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b) आणि (d)
        २) (a), (c) आणि (d)
        ३) (b), (c) आणि (d)
        ४) (a), (b), (c) आणि (d)
     
    ११) आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थांची जरुरी नसते. त्याप्रमाणे परमेश्‍वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची आवश्यकता नसतेहे तत्त्व कोणत्या समाजाचे आहे?
        १) प्रार्थना समाज
        २) ब्राह्मो समाज
        ३) सत्यशोधक समाज
        ४) आर्य समाज
     
    १२) सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्ये काय होती ?
        अ) परिवर्तनवादी चळवळ
        ब) वर्गीय चळवळ
        क) कृतिशील चळवळ
        ड) क्रांतिवादी चळवळ
        १) अ फक्त
        २) ब आणि क
        ३) अ, ब आणि क
        ४) ड फक्त
     
    १३) सन १८७३ मध्ये ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना कोणी केली ?
        १) महात्मा ज्योतीबा फुले
        २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
        ३) महर्षी कव
        ४) छत्रपती शाहू
     
    १४) खालीलपैकी कोणते तत्त्वज्ञान सत्यशोधक समाजाचे नाही ?
        १) जगात ईश्‍वर एकच असून त्याचे स्वरूप सर्वव्यापी, निर्गुण व निर्विकारी आहे.
        २) सर्व मानवप्राणी त्याची लेकरे आहेत.
        ३) भिन्न भिन्न धर्मांमध्ये ईश्‍वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्वशक्तिमान अशा एकाच परमेश्‍वराची  स्वरूप आहेत असे मानणे.
        ४) मनुष्य प्राणी हा गुणाने श्रेष्ठ ठरतो, जातीने नाही.
     
    १५) सन १८७३ मध्ये महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ...... साठी केली.
        १) धार्मिक चळवळीसाठी
        २) इंग्रज सरकारविरुद्ध बंड करण्यासाठी
        ३) ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी
        ४) राजकीय घडामोडींसाठी
     
    १६) महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला ?
        १) स्त्री-गुलामगिरी
        २) धार्मिक गुलामगिरी
        ३) सामाजिक गुलामगिरी
        ४) शेतकर्‍यांची गुलामगिरी
     
    १७) सत्यशोधक समाज स्थापन करण्यापाठीमागे महात्मा फुलेंचा मुख्य उद्देश कोणता होता?
        १) इंग्रजांच्या वर्चस्वाला विरोध
        २) ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध
        ३) संस्थानिकांच्या वर्चस्वाला विरोध
        ४) मिशनर्‍यांच्या वर्चस्वाला विरोध
     
    (२) डिप्रेस्ड क्लासेस मिशन (१९०६)
     
    १)  मुंबई येथे ’डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ची स्थापना कोणी केली?
        १) कर्मवीर भाऊराव पाटील
        २) कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे
        ३) महात्मा ज्योतिबा फुले         
        ४) महर्षी धोंडो केशव कर्वे
     
    २)  ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ ही संस्था ..........  यांनी स्थापन केली.
        १) राजर्षी शाहू महाराज
        २) महर्षी धोंडो केशव कर्वे 
        ३) विठ्ठल रामजी शिंदे
        ४) महात्मा जोतिबा फुले
     
    ३)  ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ ने प्रामुख्याने खालील कोणत्या घटकासाठी कार्य केले.
        १) दलितांच्या उद्धारासाठी
        २) विधवाविवाह
        ३) आदिवासी सेवा
        ४) स्त्री - सबलीकरण
     
    ४)  डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
        a) १९१० मध्ये मुरळी प्रतिबंधक सभा भरविली.
        b) १९१२ मध्ये अस्पृश्यता निवारण परिषद भरविली.
              c) पुणे येथे अहिल्याश्रमाची स्थापना.
              d) समता संघाची स्थापना
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b) आणि (c) फक्त
        २) (b) आणि (c) फक्त
        ३) (b), (c) आणि (d) फक्त
        ४) (a) आणि (d) फक्त
     
    ५)  डिप्रेस्ड क्लासेस मिशन संबंधी पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
        a) मंगलोर, इंदौरे व भवानी येथे केंद्र स्थापन केली.
        b) शिवणकाम, पुस्तक बांधणी व काथ्याच्या कामाचे व्यवसायशिक्षण वर्ग सुरू केले.
        c) १९१३ मध्ये आपले कार्यालय पुण्याहून मुंबईला हलवले.
        पर्यायी उत्तरे :
        १) सर्व (a), (b), (c) सत्य आहेत.
        २) सर्व (a), (b), (c) सत्य नाहीत.
        ३) (a) (b) सत्य आहेत, (c) सत्य नाही
        ४) (b) (c) सत्य आहेत, (a) सत्य नाही
     
    ६)  या संस्थेच्या तिसरा वर्धापन दिन १८ ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबईत टाऊन हॉल मध्ये साजरा केला होता. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, सर नारायण चंदावरकर आणि नामदार गोखले त्यावेळी उपस्थित होते. सयाजीरावांनी संस्थेला दोन हजार रुपयांची देणगी दिली होती.
        १)  डिप्रेस्ड क्लासेस मिशन        
        २) प्रार्थना समाज
        ३) ब्राह्मणेतर पक्ष
        ४) बहिष्कृत हितकारिणी सभा
     
    (३) ब्राह्मणेतर चळवळ (१९१३)
     
    १)  प्रसिद्ध विचारवंत आणि तत्त्वज्ञ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भारतीय प्रबोधनाची चर्चा करताना आपल्या लेखामध्ये महाराष्ट्रातील ............. ची तुलना युरोपातील धर्मसुधारणा चळवळीशी केली आहे.
        १) भक्ती चळवळ
        २) राष्ट्रीय चळवळ
        ३) ब्राह्मणेत्तर चळवळ
        ४) आदिवासींची चळवळ
     
    २)  पुण्याची सार्वजनिक सभा ही शेतकरी व अशिक्षित लोकांच्या उपयोगाची नाही असे वाटून ....... यांनी दीनबंधू सार्वजनिक सभा स्थापन केली.
        १) महात्मा फुले
        २) नारायण मेघाजी लोखंडे        
        ३) कृष्णराव भालेराव
        ४) गणपतराव पाटील
     
    ३)  ब्राम्हणेत्तर चळवळीच्या पुढीलपैकी कोणत्या नेत्यांना ‘देशाचे दुश्मन‘ पुस्तक लिहिल्यामुळे न्यायालयीन शिक्षा केली?
        a) भास्करराव जाधव
              b) केशवराव जेधे
              c) प्रबोधनकार ठाकरे
              d) दिनकरराव जवळकर
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (c)
        २) (b) आणि (d)
        ३) (c) आणि (b)
        ४) (d) आणि (a)
     
    ४)  पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे?
        a) ते उत्तम वक्ते होते.
        b) ते ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी होते.
        c) १९३२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
        d) त्यांनी ’क्रांतीचे रणशिंग’ हे पुस्तक लिहिले होते, ते त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले होते.
        पर्यायी उत्तरे :
        १) सिद्धप्पा कांबळी
        २) दिनकरराव जवळकर
        ३) भास्करराव जाधव
        ४) केशवराव जेधे
     
    ५)  ब्राह्मणेतर चळवळीचा हेतू काय होता ?
        अ) समाजातील ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध न करणे.
        ब) कनिष्ठ जातीच्या लोकांना सन्मानाने स्थान देणे.
        क) बहुजन समाजाचे राजकीय संघटन घडवून आणणे.
        ड) ब्राह्मणेतरांना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात स्थान मिळावे.
          वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
        १) अ आणि ब
        २) ब आणि क
        ३) ब, क आणि ड
        ४) ड फक्त
     
    ६)  ब्राह्मणेतर व सत्यशोधक चळवळीतील फरक कोणता?
        a) ब्राह्मणेतर राजकीय, तर सत्यशोधक सामाजिक व धार्मिक चळवळ होती.
        b) ब्राह्मणेतरमध्ये मराठा तर सत्यशोधकमध्ये माळी जातीचे वर्चस्व होते.
        c) ब्राह्मणेतर, दिनकर जवळकर व इतरांच्या तर सत्यशोधक, महात्मा फुलेंच्या विचारांवर आधारित होती.
        १) (a) (b)
        २) (a) (c)
        ३) (b) (c)
        ४) (a), (b) (c)
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१३५)
     
    १-२
    २-३
    ३-३
    ४-१
    ५-१
    ६-३
    ७-१
    ८-२
    ९-२
    १०-३
    ११-४
    १२-२
    १३-३
    १४-१
    १५-३
    १६-३
    १७-३
    १८-३
    १९-३
    २०-३
    (१) सत्यशोधक समाज (१८७३)
    १-३
    २-२
    ३-२
    ४-२
    ५-२
    ६-३
    ७-३
    ८-३
    ९-४
    १०-४
    ११-३
    १२-३
    १३-१
    १४-३
    १५-३
    १६-३
    १७-२
    (२) डिप्रेस्ड क्लासेस मिशन (१९०६)
    १-२
    २-३
    ३-१
    ४-१
    ५-३
    ६-१
    (३) ब्राह्मणेतर चळवळ (१९१३)
    १-३
    २-३
    ३-२
    ४-२
    ५-३
    ६-४

Share this story

Total Shares : 10 Total Views : 5197