क्रीडा क्षेत्रातील जेंडर गॅप

  • क्रीडा क्षेत्रातील जेंडर गॅप

    क्रीडा क्षेत्रातील जेंडर गॅप

    • 17 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 281 Views
    • 0 Shares

    क्रीडा क्षेत्रातील जेंडर गॅप

    जागतिक स्तरावर प्रचंड मोठी मोहीम आणि समान वेतनासाठी अनेक कायदे असूनसुद्धा महिलांना अजूनही पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन मिळते. संयुक्त राष्ट्रांपासून वेगवेगळ्या मानवाधिकार संघटनांपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले; परंतु ही विषमता कमी करण्यात फारसे यश आले नाही. समान कामासाठी समान वेतन हा नियम जगभरात सर्वत्र लागू आहे; परंतु महिला खेळाडू मात्र मैदानात अजूनही असमानतेचा शाप भोगत आहेत. हे मानवाधिकारांचे उल्लंघन ठरते.

    1) 2004 मध्ये अॅथलेटिक्सच्या ऑलिम्पिक चार्टरमध्ये सुधारणा करून त्यात महिला समानतेला महत्त्व देण्यात आले. परिणामी 2008 मध्ये पेइचिंग ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांचा सहभाग 42 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.

    2) सप्टेंबर 2020 मध्ये ब्राझीलच्या फुटबॉल फेडरेशनने महिलांच्या संघाला पुरुषांच्या संघाएवढेच वेतन देण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया, नॉर्वे आणि न्यूझीलंड या देशांमध्ये हा नियम आधीपासूनच लागू आहे. मात्र अन्य देशांमधील महिला फुटबॉलपटूंना हा हक्क अद्याप मिळालेला नाही. ब्राझीलच्या महिला फुटबॉल खेळाडूंना त्यासाठी त्यांना प्रदीर्घ संघर्ष करावा लागला. 2019 मध्ये फिफा महिला विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलची स्टार फुटबॉलपटू मार्ता द सिल्वा हिने आत्मविश्वास आणि ध्यास या जोरावर 13 जून 2019 रोजी स्पर्धेतील सोळावा विक्रमी गोल केला. हा सामना ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये झाला. या गोलनंतर मार्ताने आपल्या बुटांकडे इशारा केला. समान मानधन मिळावे, या मागणीसाठी ‘गो इक्वल’ असा लोगो असलेले बूट घालून ती खेळली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये ब्राझीलच्या महिला फुटबॉल खेळाडूंनी पुरुष खेळाडूंच्या तुलनेत कमी मानधन मिळत असल्याच्या निषेधार्थ एका सामन्यात गोल स्कोअर 20 टक्क्यांनी कमी करून दाखविला; कारण पुरुष खेळाडूंपेक्षा त्यांना 20 टक्के कमी मानधन मिळते.

    असमान वेतनाची समस्या -

    1) असमान वेतनाची ही समस्या संपूर्ण जगभरात आहे. अमेरिकी महिला फुटबॉल संघ आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजे चार वेळा विश्वविजेता ठरला आहे. या संघाने 1991, 1999, 2015 आणि 2019 या वर्षीचे विजेतेपद पटकावले होते. अमेरिकेचा महिला फुटबॉल संघ अनेक वर्षांपासून समान वेतनासाठी संघर्ष करीत आहे. त्यासाठी संघाच्या सदस्या न्यायालयातही गेल्या; परंतु त्यांचे अपील फेटाळण्यात आले. जो बायडेन यांनी पुरुषांच्या संघाप्रमाणेच महिलांच्या संघातील खेळाडूंना वेतन देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

    2) मार्च 2019 मध्ये भारतीय क्रिकेट संघाची तसेच महिला क्रिकेट संघाची जी  कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जारी झाली होती त्यात महिला क्रिकेटपटूंना देऊ केलेले वेतन पुरुष क्रिकेटपटूंच्या तुलनेत 90 टक्के कमी होते.

    महिला पुरुषांपेक्षा शारीरिकदृष्ट्या कमी सक्षम -

    1) महिला खेळाडूंना पुरुष खेळाडूंच्या तुलनेत कमी वेतन देण्यामागे असा तर्क दिला जातो की, त्या पुरुषांपेक्षा शारीरिकदृष्ट्या कमी सक्षम असतात.

    2) जॉन मॅकेनरो यांनी 2017 मध्ये एका ट्विटमध्ये म्हटले होते कीमहिला टेनिसमध्ये पहिल्या रँकमध्ये खेळणारी सेरेना जर पुरुष खेळाडूंसोबत खेळत असती, तर तिची रँक 700 वी असती.

    3) महिला टेनिसमध्ये काही दम नाही, असा दावा सत्तरीच्या दशकात टेनिस स्टार बॉबी रिग्जने केला होता. तत्कालीन क्रमांक एकची खेळाडू बिली जीन किंग हिला त्याने आव्हान दिले होते. ‘बॅटल ऑफ सक्सेस’ या नावाने प्रचार करण्यात आलेल्या या सामन्यात 1973 मध्ये बॉबी रिग्जचा पराभव झाला होता आणि त्याच्यावर सार्वजनिकरीत्या नामुष्कीची वेळ ओढवली होती.

     महिला खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरुषापेक्षा चांगली कामिगिरी केलेली आहे-

    1) वेस्ट इंडिजची महिला खेळाडू स्टेफनी टेलरने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3000 धावांचा टप्पा पार केला. महिला आणि पुरुष अशा दोहोंच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा टप्पा पार करणारी ती दुसरी खेळाडू ठरली असून, वेस्ट इंडिजकडून असा विक्रम करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. तिच्या आधी हा विक्रम न्यूझीलंडच्या सूजी बेट्सने केला होता.

    2) टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक धावा करणार्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या टॉप-5 यादीतील पहिल्या दोन क्रमांकांवर महिला खेळाडू आहेत.

    3) 2019 साली भारतीय महिला संघातील मिताली राज ही 200 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली होती. प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरीने धावा काढण्याच्या बाबतीत मिताली राज ही महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यापेक्षाही अव्वल आहे.


     प्रश्नमंजुषा (19)

    1) 2019 सालच्या फिफा महिला विश्वचषक स्पर्धे संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

    अ) या स्पर्धेत ब्राझीलची स्टार फुटबॉलपटू मार्ता द सिल्वा हिने स्पर्धेतील सोळावा विक्रमी गोल केला.

    ब) मार्ता द सिल्वा  ही ‘गो इक्वल’ असा लोगो असलेले बूट घालून खेळली होती.

    क)ब्राझीलच्या महिला फुटबॉल खेळाडूंनी कमी मानधन मिळत असल्याच्या निषेधार्थ एका सामन्यात गोल स्कोअर 20 टक्क्यांनी कमी करून दाखविला.

    पर्यायी उत्तरे :

    1) फक्त अ

    2) अ आणि ब

    3) अ आणि क

    4) फक्त क

    2)   प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरीने धावा काढण्याच्या बाबतीत मिताली राज ही भारतीय क्रिकेटपटू यांच्यापेक्षा अव्वल आहे -

         )   विराट कोहली

         स्टेफनी टेलर

         )   महेंद्रसिंह धोनी

         वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत

         पर्यायी उत्तरे ;

         1)   फक्त बा

         2)   फक्त अ आणि ब

         3)   फक्त अ आणि क

         4)   , ब आणि क

    3)   अमेरिकी महिला फुटबॉल संघाने खालीलपैकी कोणत्या वर्षीचे िविश्ववजेतेपद पटकावलेले नाही ?

         1)   2019

         2)   1999

         3)   1991 

         4)   2011

    4)   ‘बॅटल ऑफ सक्सेस’ या नावाने प्रचार करण्यात आलेल्या 1973 सालच्या टेनिस सामन्यात 1973 मध्ये बिली जीन किंग हिने कोणाचा पराभव केला होता ?

         1)   सेरेना विल्यम्स  

         2)   जॉन मॅकेनरो

         3)   बॉबी रिग्ज

         4)   यापैकी नाही.

    5)   कोणत्या देशातील महिला फुटबॉल संघाला खेळाडूना पुरुषांच्या संघाएवढेच वेतन मिळते ?

         a )   ऑस्ट्रेलिया

         b)   ब्राझील

         c)   न्यूझीलंड

         d)   वेस्ट इंडिज

         e)   अमेरिका

         f)    नॉर्वे

         पर्यायी उत्तरे :  

         1)   (a), (b), (c), (d), (e), (f)

         2)   (b), (c), (e), (f)

         3)   (a), (d), (e), (f)

         4)   (a),  (b), (c), (e), (f)

    6)   खाली दोन विधान दिलेली आहेत () विधान असून () हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.

         विधान () : 2012 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांचा सहभाग  60 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.

         कारण () : 2004 साली अॅथलेटिक्सच्या ऑलिम्पिक चार्टरमध्ये सुधारणा करून त्यात महिला समानतेला महत्त्व देण्यात आले.

         पर्यायी उत्तरे :

         (1)  () आणि () दोन्ही सत्य असून () हे () चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.

         (2)  () आणि () दोन्ही सत्य असून () हे () चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.

         (3)  () सत्य असून विधान () असत्य आहे.

         (4)  () असत्य असून विधान () सत्य आहे.

    7)   खालील जोड्या जुळवा ः

         स्तंभ अ (खेळाडू)                स्तंभ ब (देश)

         .   सूजी बेट्स           I. वेस्ट इंडिजची क्रिकेट खेळाडू

         .   सेरेना विल्यम्स        II. न्यूझीलंडची क्रिकेट खेळाडू

         .   मार्ता द सिल्वा        III. ब्राझीलची फुटबॉल खेळाडू

         .   स्टेफनी टेलर            IV. अमेरिकेची टेनिस खेळाडू

         पर्यायी उत्तरे :

                       

         (1)  II       III      I        IV

         (2)  II       IV      III      I

         (3)  III      II       IV      I

         (4)  IV      I        III      II

    उत्तरे ः प्रश्नमंजुषा (19)

    1-2

    2-3

    3-4

    4-3

    5-4

    6-4

     

    7-2

Share this story

Total Shares : 0 Total Views : 281