पंजाबच्या शेतीवरील हमीभावाचे दुष्परिणाम

  • पंजाबच्या शेतीवरील हमीभावाचे दुष्परिणाम

    पंजाबच्या शेतीवरील हमीभावाचे दुष्परिणाम

    • 13 Nov 2020
    • Posted By : Study Circlel
    • 246 Views
    • 0 Shares

     पंजाबच्या शेतीवरील हमीभावाचे दुष्परिणाम

    केंद्र सरकारने शेती सुधारणा संबंधाचे तीन कायदे संमत केल्यानंतर पंजाबमध्ये त्याला जोरात विरोध सुरू आहे. केंद्रीय कायद्यांना छेद देणारे स्वतंत्र कायदे पंजाब सरकारने संमत केले. त्यानुसार शेतमालाची खरेदी हमीभावापेक्षा कमी भाव देऊन खरेदी करणे हा गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद केली. तथापि, अत्यंत अहमहमिकेने होत असलेल्या या चर्चेमध्ये, हमीभावाचे पंजाबच्या एकूण शेतीक्षेत्रावर कोणते अनिष्ट परिणाम होत आहेत आणि होत राहतील याचा विचार होत नाही.

    पंजाब राज्यास भारताच्या अन्नधान्याचे कोठार म्हणतात. ते सर्वार्थाने योग्य आहे. आजमितीस,

    1) भारताच्या एकूण जमिनीपैकी कमी जमीन असूनही पंजाबमध्ये देशात सर्वात जास्त अन्नधान्य उत्पादन होते.

    2) देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये पंजाबचा वाटा (तीन कोटी) म्हणजे जेमतेम 2.50 टक्के एवढाच आहे.

    •3) भारत सरकारच्या एकूण अन्नधान्य खरेदीमध्येसुद्धा पंजाबचा सिंहाचा वाटा आहे, 2018-19 मध्ये सरकारच्या एकूण खरेदी पैकी 24 टक्के तांदूळ आणि 36 टक्के गहू एकट्या पंजाबने पुरविला आहे.

    •4) हरितक्रांतीची सुरुवात पंजाबमध्येच झाली. या कामगिरीसाठी इतर सर्व गोष्टी त्या राज्यामध्ये अनुकूल होत्या.

    •    गेली अनेक वर्षे देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनातील पंजाबचा वाटा पुढीलप्रमाणे आहे -

         1)   गहू उत्पादनापैकी 38 टक्के गहू

         2)   तांदूळ उत्पादनापैकी 26 टक्के तांदूळ

         3)   एकूण सर्व अन्नधान्य उत्पादनापैकी 12 टक्के

         शेतीक्षेत्राचे पंजाबसाठी महत्त्व -

    1)   पंजाब राज्य खर्या अर्थाने शेतीप्रधान राज्य आहे. कारण पंजाब राज्यामध्ये, एकूण उत्पादनापैकी शेतीक्षेत्राचा वाटा 25 टक्के आहे. (महाराष्ट्र 13 टक्के, गुजरात 19 टक्के, अखिल भारत साधारण 17 टक्के)

    2)   बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यांत शेतीचा वाटा पंजाबपेक्षा मोठा असला तरी ती राज्ये आर्थिकदृष्ट्या विकसित नाहीत. पंजाब आर्थिकदृष्ट्या विकसित राज्य आहे. हा विकास शेतीमुळे घडून आला आहे.)

    3)   पंजाबच्या एकूण लोकसंख्येपैकी अजूनही साधारण 36 टक्के लोकसंख्या पोट भरण्यासाठी शेतीवर अवलंबून आहे.

    4)   पंजाबमध्ये दारिद्य्र केवळ 8 टक्के आहे.

         पंजाबच्या शेतीमध्ये गहू, तांदूळ यांचे महत्त्व  -

    1)   भारतातील हरितक्रांती म्हणजे केवळ गहू व तांदूळ यामधीलच क्रांती आहे किंवा होती असे अनेक तज्ज्ञ मानतात. या दोन पिकांना भारत सरकारने हमी भाव, सरकारी खरेदी आदी मार्गांनी दिलेले उत्तेजन सर्वज्ञात आहे. साहजिकच, पंजाबमध्ये सिंचन सोय उत्तम असल्यामुळे शेतकर्यांचा या दोन पिकांकडे ओढा वाढला. अधिकाधिक जमीन या दोनच पिकाखाली येत गेली.

    2)   1966-67 मध्ये पंजाबमध्ये गहू-तांदूळ यासाठी 45 टक्के तर इतर आवश्यक पिकासाठी 55 टक्के जमीन होती. आजमितीस गहू तांदूळ यासाठी साधारण 90 टक्के तर इतरांसाठी 10 टक्के जमीन आहे.

    3)   पंजाब राज्यातील एकूण शेती उत्पादनापैकी 77 टक्के इतके उत्पादन केवळ गहू तांदूळ यांचेच आहे. इतर सर्व पिके उरलेल्या फक्त 23 टक्क्यांमध्ये. गहू आणि तांदूळ हेच पंजाब शेतीचे आधारस्तंभ झाले आहेत.

         हमीभावाचे महत्त्व  -

    हमीभाव व्यवस्थेमुळे पंजाबचे शेतकरी, राज्य सरकार आणि दलाल हे सर्वजण समाधानी आहेत. केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे लागू झाले तर, शेतकर्यांना भाव मिळेल. परंतु, राज्य सरकार आणि अडत दलाल यांचे उत्पन्न जाणार हे नक्की. यामुळे केंद्रीय कायद्यांना प्रामुख्याने पंजाबकडून विरोध झाला.

    1) पंजाबमध्ये होणार्या एकूण गहू व तांदळापैकी 99 टक्के उत्पादन केंद्र सरकार हमीभावाने खरेदी करते.

    2) बाजार समित्यामार्फत ही खरेदी झाल्यामुळे राज्य सरकारला मंडी फीद्वारे भरपूर महसूल मिळतो. 2019 साली केंद्र सरकारने मंडी फी देण्यासाठी एकूण 8600 कोटी रुपये खर्च केले. पंजाब सरकारला त्यापैकी 1750 कोटी रुपये मिळाले.

    3) बाजार समित्यांमध्ये काम करणार्या मध्यस्थ, दलाल आदी मंडळींना भरपूर कमिशन मिळते. अडत दलाल मंडळींना कोट्यवधी रुपये दलालीसाठी केंद्र सरकारकडून मिळतात.

    4) वरील सर्व खर्चाचा बोजा केंद्र सरकारवर - म्हणजे सर्वसाधारण भारतीय करदात्यावर पडतो.

          हमीभावाचे दुष्परिणाम -

    हमीभावाची ही पद्धत गेली 50 वर्षे तरी अव्याहतपणे पंजाबमध्ये सुरू आहे. या हमीभावामुळे पंजाबच्या शेतीक्षेत्रावर झालेले दुष्परिणाम-

    1) एकसुरी (मोनो कल्चर) शेतीकडे वाटचाल - शेतीक्षेत्राच्या एकूण उत्पन्न आरोग्यासाठी शेतीक्षेत्र वैविध्यपूर्ण असणे आवश्यक असते. विविध प्रकारची पिके घेणे आवश्यक परंतु हमीभावामुळे फक्त गहू व तांदूळ शिवाय इतर पिके घेण्यास कोणीच तयार नाही. कारण, तेथे हमीभाव किंवा सरकारी खरेदी नाही. शेती एकसूत्री होत आहे.

    2) जमिनीचे नैसर्गिक पुनर्भरण थांबले - हमीभाव आणि शंभर टक्के सिंचन यामुळे वर्षातून दोन-दोन, तीन-तीन पिके घेणे सुरू झाले जमिनीस विश्रांती नाही. गेलेली सुपिकता उत्पादन क्षमता भरून काढण्यास वेळच नाही. उत्पादन भरमसाट वाढवले; पण जमीन नापिक होऊ लागली.

    3) पाण्याची पातळी खालावली - सिंचनाची उत्तम सोय आणि फुकट वीज (हमीभाव आहेच) यामुळे पाण्याचा अनिर्बंध वापर सुरू झाला. विहिरींचे जाळे झाले. भूगर्भजलाची पातळी दरवर्षी साधारण अर्धा मीटर या वेगाने खाली जाऊ लागली. सुजलाम सुफलाम भागाचे वैराण वाळवंट नजीकच्या भविष्य काळात होऊ शकेल, असा इशारा तज्ज्ञ देऊ लागले.

    4) इतर पिकांची उपासमार - सर्व पाणी दोनच पिकांनी ओढून घेतल्यामुळे मका, कापूस आणि इतर पिकांची पाण्याअभावी उपासमार होऊ लागली.

    5) पाण्याची अप्रत्यक्ष निर्यात - आजमितीस तांदूळ निर्यातीमध्ये भारताचा प्रथम क्रमांक आहे. पंजाबमधून तांदूळ निर्यात होतो. तांदूळ हे प्रचंड पाणी पिणारे पीक आहे. त्याची निर्यात म्हणजे एक प्रकारे पाणी निर्यात करणे आहे हे योग्य नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

    •    हमीभाव दिला की त्याचे ताबडतोब दुष्परिणाम होतात, असे नाही. आर्थिक धोरणे- अर्थशास्त्राचे सिद्धांत - स्थळ, काळ सापेक्ष असतात. अशी धोरणे बाह्य परिस्थिती अनुरूप असावी लागतात. एकच धोरण किंवा एकच सिद्धांत सदा सर्वकाळ योग्य असत नाही. बाह्य परिस्थिती बदलली की धोरण, सिद्धांत, मतांमध्ये योग्य असे बदल करणे इष्ट असते. असे झाले नाही तर मात्र बाह्य आर्थिक परिस्थिती आणि धोरण यामध्ये विसंवाद होऊन त्याचे अवांछित दुष्परिणाम भोगावे लागतात. हमीभाव किंवा सरकारी खरेदी यांचे असेच झाले आहे. पुनर्विचार आवश्यक आहे. आर्थिक धोरणांमध्ये तत्त्वप्रणालीपेक्षा व्यवहार्यवादाचा अंश थोडा जास्त असावा. मात्र, त्यासाठी बाह्य परिस्थिती आणि प्रचलित धोरण याचे सातत्याने पुनरावलोकन करणे अत्यावश्यक असते.

     

    सौजन्य : दैनिक पुढारी


         प्रश्नमंजुषा (15)

    1)   भारत सरकारच्या अन्नधान्य खरेदीमध्ये पंजाबचा वाटा जास्त असून 2018-19 मध्ये केंद्र सरकारच्या एकूण अन्नधान्य खरेदीमध्ये त्याचे प्रमाण कसे होते ?

         1)   36 टक्के तांदूळ आणि 24 टक्के गहू

         2)   26 टक्के तांदूळ आणि 34 टक्के गहू

         3)  24 टक्के तांदूळ आणि 36 टक्के गहू

         4)   34 टक्के तांदूळ आणि 26 टक्के गहू

    2)   पंजाब राज्याबाबत खालील विधाने विचारात घ्या ः

         )   पंजाबमध्ये दारिद्य्र केवळ 18 टक्के आहे.

         )   पंजाबच्या एकूण शेती उत्पादनापैकी 77 टक्के इतके उत्पादन गहू तांदूळ यांचे आहे

         )   पंजाबच्या एकूण लोकसंख्येपैकी 36 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.

         वरीलपैकी कोणते विधान/ने चूक आहेत ?

         1)   फक्त अ  

         2)   , ब आणि क  

         3)   ब आणि क

         4)   अ आणि क

    3)   हमीभावामुळे पंजाबच्या शेतीक्षेत्रावर कोणते दुष्परिणाम झालेले आहेत ?

         )   पाण्याची पातळी खालावली

         )   पाण्याची अप्रत्यक्ष निर्यात

         )   जमिनीचे पाणथळीकरण व क्षारीकरण

         )   तांदूळ व गहू सोडून इतर पिकांची उपासमार

         )   जमिनीचे नैसर्गिक पुनर्भरण थांबल

         )   एकसुरी (मोनो कल्चर) शेतीकडे वाटचाल

         )   आर्थिक व सामाजिक विषमता

         पर्यायी उत्तरे :

         1)   वरील सर्व 

         2)   ड आणि फ वगळता सर्व 

         3)   क आणि ग  वगळता सर्व

         4)   , , ग वगळता सर्व

    4)   देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनातील पंजाबचा वाट्याबाबत योग्य विधाने शोधा.

         )   तृणधान्य उत्पादनापैकी 32 टक्के

         )   गहू उत्पादनापैकी 38 टक्के गहू

         )   तांदूळ उत्पादनापैकी 26 टक्के तांदूळ

         )   एकूण सर्व अन्नधान्य उत्पादनापैकी 12 टक्के

         पर्यायी उत्तरे :

         1)   , , क आणि ड

         2)   , ब आणि क

         3)   , क आणि ड

         4)   ब आणि क

    5)   खालील जोड्या जुळवा :

         स्तंभ अ (राज्य)       स्तंभ ब (एकूण उत्पादनात शेतीक्षेत्राचा वाटा)

         गुजरात         I.  25 टक्के

         पंजाब          II.  19 टक्के   

         .   महाराष्ट्र        III. 17 टक्के   

         .   अखिल भारतीय स्तर   IV. 13 टक्के   

         पर्यायी उत्तरे :

                       

         (1)  IV        III        II         I

         (2)  II         I           III        IV

         (3)  I           I           IV        III

         (4)  IV        III        I           II

    उत्तरे ः प्रश्नमंजुषा (15)

    1-3

    2-1

    3-3

    4-3

    5-3

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 246