अण्वस्त्रबंदी करार (टीपीएनडब्ल्यू)
24 ऑक्टोबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाचा (युनो) पंचाहत्तरावा वर्धापनदिन साजरा झाला. त्या दिवशी होंडूरास या राष्ट्राने अण्वस्त्रबंदी कराराच्या ट्रिटी फॉर प्रोहिबिशन ऑफ न्युक्लिअर वेपन्स (टीपीएनडब्ल्यू) अनुमतीची कागदपत्रे (रेटिफिकेशन) राष्ट्रसंघाला सादर केली.
अण्वस्त्रबंदी करार अंमलात आल्यानंतर पुढील गोष्टी बेकायदा ठरणार आहेत-
1. अण्वस्त्रे बनवणे व वापरणे
2. अण्वस्त्रे वापरण्याच्या धमक्या देणे
3. अण्वस्त्रे तयार करण्यास मदत करणे
4. अण्वस्त्रे दुसर्या राष्ट्राच्या भूमीवर तैनात करणे
अण्वस्त्रबंदी करारासाठी परिषद -
1. 23 डिसेंबर 2016 रोजी झालेल्या राष्ट्रसंघाच्या आमसभेत अण्वस्त्रबंदी करारासाठी 2017 मध्ये वाटाघाटी करण्याचे ठरले.
2. मार्च 2017 आणि जून-जुलै 2017 दरम्यान, येतील तेवढ्या देशांचे प्रतिनिधी आणि नागरी संघटना यांच्या सहभागानिशी युनोच्या न्यूयॉर्क कार्यालयात अशा दो फेर्यांमध्ये अण्वस्त्रबंदी करारासाठी परिषद झाली.
3. या परिषदेत इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्युक्लिअर वेपन्सआणि वुमेन्स इंटरनॅशनल लीग फॉर पीस अँड फ्रीडमया दोन नागरी शिखर संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा होता.
4. 7 जुलै 2017 रोजी परिषदेतील कराराचा अंतिम मसुदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या 84 सभासद देशांनी मान्य केला. ते अण्वस्त्ररहित जगाच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल होते. यातील तरतुदीनुसार उत्तर अमेरिका खंडाच्या दक्षिण टोकाच्या 7 गरीब राष्ट्रांपैकी 95 लाख लोकसंख्येच्या होंडूरासने 2020 मध्ये अनुमतीपत्रे सादर केली.
घातक अण्वस्त्रे -
सध्या जगात 9 अण्वस्त्रधारी राष्ट्रे असून त्यांच्याकडे किमान किमान 13-14 हजार अण्वस्त्रे आहेत -
1. अमेरिका आणि रशिया यांच्याकडे एकत्रितरित्या 12-13 हजार अण्वस्त्रे
2. ब्रिटन, फ्रान्स आणि चीन यांच्याकडे एकत्रितरित्या 800 ते 900 अण्वस्त्रे
3. भारत आणि पाकिस्तानकडे एकंदर 300 अण्वस्त्रे
4. इस्रायल - 90 अण्वस्त्रे
5. उत्तर कोरिया 30-40 अण्वस्त्रे
6. असा आंतरराष्ट्रीय करार 1945 मध्ये अस्तित्वात नसल्याने जर्मनी अणुबॉम्ब बनवत असल्याच्या बातमीवर विश्वास ठेऊन बनविण्याची सर्वंकष तयारी दोस्त राष्ट्रांच्या मॅनहटन प्रकल्पाने केली. त्यानंतर अमेरिकेने दोन अणुबॉम्बचा प्रायोगिक वापर दोन जपानी शहरांवर केला होता. जगात सध्या हिरोशिमा अनुभवाच्या आधारानं केलेलं गणित सांगतं की, ही अण्वस्त्रं किमान 130 कोटी माणसे ठार करू शकतात.
प्रश्नमंजुषा (5)
1. ट्रिटी फॉर प्रोहिबिशन ऑफ न्युक्लिअर वेपन्स (टीपीएनडब्ल्यू) कधीपासून अंमलात येणार आहे ?
1) 24 ऑक्टोबर 2021
2) 23 डिसेंबर 2021
3) 22 जानेवारी 2021
4) 1 जानेवारी 2021
2. खालील जोड्या जुळवा :
स्तंभ अ (देश) स्तंभ ब (अण्वस्त्रे)
अ. ब्रिटन, फ्रान्स आणि चीन I. 300
ब. इस्रायल व उत्तर कोरिया II. 800 ते 900
क. भारत आणि पाकिस्तान III. 12 ते 13 ह्जार
ड. अमेरिका आणि रशिया IV. 120 ते 140
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III I IV
2) II IV I III
3) III II IV I
4) II III IV I
3. युनोच्या न्यूयॉर्क कार्यालयात 2017 साली दोन फेर्यांमध्ये अण्वस्त्रबंदी करारासाठी जी परिषद झाली, त्यात कोणत्या नागरी शिखर संस्थेच्या प्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा होता ?
अ. इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्युक्लिअर वेपन्स
ब. वुमेन्स इंटरनॅशनल लीग फॉर पीस अँड फ्रीडम
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
4. ट्रिटी फॉर प्रोहिबिशन ऑफ न्युक्लिअर वेपन्स (टीपीएनडब्ल्यू) अंमलात आल्यानंतर या गोष्टी बेकायदा ठरणार आहेत -
अ. अण्वस्त्रे बनवणे व वापरणे
ब. अण्वस्त्रे आपल्या राष्ट्राच्या भूमीवर तैनात करणे
क. अण्वस्त्रे तयार करण्यास मदत करणे
ड. अण्वस्त्रे वापरण्याच्या धमक्या देणे
पर्यायी उत्तरे :
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने ब, क आणि ड बरोबर
2) विधाने अ, ब आणि ड बरोबर
4) विधाने अ, क आणि ड बरोबर
5. उत्तर अमेरिका खंडाच्या दक्षिण टोकाच्या 7 गरीब राष्ट्रांपैकी एक असलेल्या होंडूरासची लोकसंख्या किती आहे?
1) 85 लाख
2) 95 लाख
3) 75 लाख
4) 125 लाख
उत्तरे : प्रश्नमंजुषा - 5
2-2
3-3
4-4
5-2