छत्रपती शिवाजीराजे भोसले / क्विझ (91)

  • छत्रपती शिवाजीराजे भोसले / क्विझ (91)

    छत्रपती शिवाजीराजे भोसले / क्विझ (91)

    • 20 Feb 2021
    • Posted By : õ-{{Ka wÀ3;zi
    • 645 Views
    • 1 Shares

     छत्रपती शिवाजीराजे भोसले (19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680) 

    प्रश्‍नमंजुषा (91)
     
    1) मराठेशाहीतील कोणत्या काळास इतिहासकार ‘शिवकाल’ असे म्हणतात ?
    1) शिवाजी महाराजांचा जन्म (1630) ते संभाजी महाराजांचा मृत्यू (1689) ह्या 59 वर्षांच्या काळास
    2) शिवाजी महाराजांचा जन्म (1627) ते बाळाजी विश्‍वनाथ यांचे पेशवेपदी नेमणूक (1720) ह्या 93 वर्षांच्या काळास
    3)  शिवाजी महाराजांचा जन्म (1630) ते औरंगजेबाचा मृत्यू (1707) ह्या 77 वर्षांच्या काळास
    4) शिवाजी महाराजांचा जन्म (1627) ते औरंगजेबाचा मृत्यू (1707) ह्या 80 वर्षांच्या काळास
     
    2) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वत:ची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली.  
    ब) छत्रपती शिवाजीराजे यांची राजमुद्रा मूळ मराठी भाषेत व मोडी लिपीत होती. 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    3) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
    1) छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख ’शिवशंभू’ असा होतो.
    2) पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात, छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणार्‍या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते, असे नमूद केलेले आहे.
    3) शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो.
    4) मराठी बखरीतील नोंदीनुसार शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये झाला.
     
    4) शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता ........ या मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. 
    अ) विजापूर
    ब) गोवळकोंडा 
    क) अहमदनगर
    ड) अहमदाबाद 
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    5) 1648 साली पुरंदरच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत केलेल्या पराक्रमाची शर्थ म्हणून शिवाजी महाराजांनी कोणत्या सरदाराला ‘सर्जेराव’ ही पदवी दिली ?
    1) बाजी पासलकर 
    2) नेताजी पालकर
    3) तानाजी मालुसरे
    4) बाजी कान्होजी जेधे
     
    6) 1647 साली शिवाजीराजांनी जे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले, त्यांचा योग्य क्रम लावा.
    अ) कोंढाणा (सिंहगड) 
    ब) पुरंदर 
    क) तोरणगड (प्रचंडगड)  
    पर्यायी उत्तरे :
    1) क - अ - ब
    2) अ - ब - क
    3) ब - अ - क
    4) ब - क - अ
     
    7) अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने क़ोणास मराठी राज्यावर सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला ?
    1) सेनापती  सिद्दी हिलाल 
    2) मिर्झा राजा जयसिंह 
    3) सेनापती सिद्दी जौहर
    4) बहलोलखान
     
    8) 1649 साली शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणल्याने आणि ..... किल्ला परत देण्याच्या अटीवर शहाजीराजांची कैदेतून सुटका झाली ?
    1) कोंढाणा किल्ला
    2) कंदर्पीचा किल्ला 
    3) बंगळूर शहर 
    4) वरील सर्व 
     
    9) खालील जोड्या अचूक जुळवा :
         स्तंभ अ (घटना)        स्तंभ ब (वर्ष)
    अ)  सिद्दी जौहरचे आक्रमण     I.   1660
    ब)  उंबरखिंडीचे युद्ध    II.   1661
    क)  सुरतेची लूट           III.  1664
    ड)   पुरंदरचा तह  IV.   1665
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III IV I
    (2) II IV I III
    (3) III II IV I
    (4) I II III IV
     
    10) शिवशाहीबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
    1) शिवशाहीतील तत्कालीन राजकीय परिभाषा फार्सी होती 
    2) राज्याभिषेकानिमित्त होन आणि शिवराई ही दोन नवी नाणी पाडण्यात आली.
    3) शिवशाहीत राज्यकारभार ठीक चालवण्यासाठी मुलकी सत्ता ही लष्करी सत्तेहून श्रेष्ठ होती.
    4) राज्याभिषेकानंतर शिवाजी राजांनी राज्यकारभारासाठी अष्टप्रधानमंडळ स्थापन केले. 
     
    11) अफझाल खान व शिवाजी महाराजांच्या भेटीदरम्यान अफझलखानाच्या शरीररक्षकांत सय्यद बंडा, शंकराजी मोहिते, पिलाजी मोहिते इ. मंडळी होती, तर  शिवाजी महाराजांच्या शरीरक्षकांत कोणाचा समावेश होता ?
    अ) पंताजी गोपीनाथ 
    ब) कृष्णाजी भास्कर कुलकर्णी
    क) सिद्दी इब्राहीम
    ड)  जिवाजी महाले (सकपाळ)
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने क आणि ड बरोबर
     
    12) 1670 सालातील योग्य घटनाक्रम लावा. 
    अ) कोंडाणा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात
    ब) पुरंदरचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात 
    क) महुलीचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात 
    ड) सुरतेवर दुसर्‍यांदा हल्ला 
    पर्यायी उत्तरे :
    1) अ - ब - क - ड
    2) क - अ - ड - ब
    3) ब -  ड - अ - क
    4) ड - ब - अ - क
     
    13) खालील जोड्या अचूक जुळवा :
         स्तंभ अ (शिवचरित्र)            स्तंभ ब (लेखक)
    अ) उद्योजक शिवाजी महाराज  I.    नामदेवराव जाधव
    ब) शिवाजी - दी ग्रेट गोरिला         II.   आर. डी. पाल्सोकर
    क) शिवाजीचे उर्दू भाषेतील संक्षिप्त चरित्र III.  लाला लजपत राय
    ड) शिवाजी द ग्रँड रिबेल         IV.   डेनिस किंकेड
    पर्यायी उत्तरे :
    1) II III I IV
    2) II I III IV
    3) III II IV I
    4) IV III I II
     
    14) कोणत्या वर्षी ज्योतिबा फुले यांना रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लागला आणि त्यांनी महाराजांच्या आयुष्यावर एक मोठा पोवाडा लिहिला ?
    1) 1869 
    2) 1870
    3) 1892
    4) 1873
     
    15) ’बर्थडेट ऑफ शिवाजी’ या पुस्तकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) सदर पुस्तक डी व्ही आपटे आणि एम आर परांजपे यांनी लिहिले आहे.
    ब) हे पुस्तक 1916 मध्ये प्रसिद्ध झाले होते.
    क) त्यात शिवाजी महाराजांचा जन्म 6 एप्रिल 1627 ला झाला असा उल्लेख आहे.
    ड) त्यात शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630ला झाल्याचा उल्लेख आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  फक्त अ बरोबर
     
    16) आग्रा येथून सुटका करुन घेताना कोणत्या व्यक्तीने शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक केल्याने  शिवाजी महाराज निसटून 24 तास झाले होते ?
    1)  फिरंगोजी नरसाळे 
    2) मोरोपंत पिंगळे 
    3)  पंताजी गोपीनाथ बोकील
    4) हिरोजी फर्जंद 
     
    17) शिवाजी महाराजांची जन्मवर्ष 1630 हे असल्याची नोंद कोठे आढळते?
    अ) कवी परमानंद यांचे’शिवभारत’ 
    ब) फोर्ब्स दस्तऐवज
    क) राज्याभिषेक शकावली
    ड) जेधे शकावली
    इ) सभासद बखर व मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या बखरी
    फ) तंजावरचा शिलालेख
    ग)  ओर्नेसच्या नोंदी
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) ड आणि इ वगळता सर्व  
    3) इ वगळता सर्व
    4) इ, ग वगळता सर्व
     
    18) ....... साली सापडलेल्या जेधे शकावली दस्तऐवजानंतर शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551 (1630) मध्ये झाल्याचे स्पष्ट झाले.
    1) 1926
    2) 1916
    3) 2006
    4) 1906
     
    19) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
    1)  शिवरायांच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेनेच मराठ्यांनी 27 वर्षे औरंगजेबाला झुंज दिली.
    2) आसामचाा लचित बडफुकन हा शिवरायांच्या असामान्य पराक्रमाने भारावून गेला होता, त्याने शिवरायांना पत्र पाठवले होते,
    3) बुंदेलखंडात छत्रसाल याने शिवरायांपासून घेतलेल्या प्रेरणेतून स्वतंत्र राज्य निर्माण केले.
    4) छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले 300 पेक्षा अधिक किल्ले महाराष्ट्र  राज्यात आहेत. 
     
    20) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
    विधान (अ) :  छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी करण्यासाठी आदिलशाहीने अफझलखानास पाठवले होते.
    कारण (र) : शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांचा कनकगिरीच्या वेढ्यात याच अफझलखानाने कपटाने मृत्यू घडविला होता.
    पर्यायी उत्तरे :
    1)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    2)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    3)  (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    4)  (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    21) शालीवाहन शक आणि इसवी सन यांच्यामध्ये किती वर्षांचा फरक आहे ?
    1) 68
    2) 56
    3) 78
    4) 76
     
    22) खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
    1) शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला  : लेखक राजकुमार तांगडे
    2) आग्र्‍याहून सुटका :  लेखक विष्णू हरी औंधकर
    3) बेबंदशाही : लेखक वि. वा. शिरवाडकर
    4) रायगडाला जेव्हा जाग येते  : लेखक वसंत कानेटकर 
     
    23) खालील विधाने विचारात घ्या:
    र) इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर 1752 साली स्वीकारले.
    ल)  1900 सालापर्यंत ब्रिटिश साम्राज्यात ज्युलियन दिनदर्शिका अधिकृत होती. 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (र)
    2) फक्त (ल)
    3) (र) व (ल) दोन्ही
    4) दोन्हीही नाहीत 
     
    24) शिवजयंती कधी साजरी करायची आणि महाराजांची जन्मतारीख कोणती होती हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती 1966 साली स्थापन केली. या समितीमध्ये कोणाचा समवेश होता ? 
    अ) जयसिंंगराव पवार 
    ब) महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार
    क) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
    ड) आ. ग. पवार
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    25) 1870 मध्ये पुण्यात कोणी पहिला शिवजयंती उत्सव साजरा केला ? 
    1) सार्वजनिक सभा
    2) लोकमान्य टिळक
    3) ज्योतिबा फुले 
    4) सत्यशोधक समाज
     
    26) खालील जोड्या अचूक जुळवा :
         स्तंभ अ         स्तंभ ब 
    अ) गोवळकोंडा    I.  आदिलशाही
    ब) अचलपूर   II.  कुतुबशाही
    क) अहमदनगर  III.  निजामशाही
    ड) विजापूर          IV.  इमादशाही
    पर्यायी उत्तरे :
    1) II III I IV
    2) II IV III I
    3) III II IV I
    4) IV III I II
     
    27) शिवरायांच्या प्रेरणेने बुंदेलखंडचे स्वतंत्र राज्य निर्माण करणारा छत्रसाल बुंदेला यांची शिवाजी महाराज़ाशी कधी भेट झाली होती ?
    1) विजापूरवरील स्वारीत
    2) देवगडच्या (छिंदवाडा) लढाईत 
    3) पुरंदर स्वारीच्या वेळी 
    4) बुंदेलखंडच्या लढाईत 
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (91)
    1-3
     
    2-1
     
    3-4
     
    4-1
     
    5-4
     
    6-1
     
    7-3
     
    8-4
     
    9-4
     
    10-4
     
    11-4
     
    12-1
     
    13-3
     
    14-1
     
    15-4
     
    16-4
     
    17-3
     
    18-2
     
    19-4
     
    20-2
     
    21-3
     
    22-3
     
    23-1
     
    24-3
     
    25-3
     
    26-2
     
    27-3
     

     

Share this story

Total Shares : 1 Total Views : 645