सामाजिक व सांस्कृतिक / प्रश्नमंजुषा (72)
- 28 Dec 2020
- Posted By : Study Circle
- 986 Views
- 0 Shares
विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणारे मराठी ख्रिश्चन
15 व्या शतकापासून पोर्तुगीजांच्या प्रभावामुळे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्याा समुदायाला ईस्ट इंडियन ख्रिश्चन समुदाय असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात साधारणतः किनारपट्टी भागात रोमन कॅथलिक ख्रिश्चन दिसून येतात. हे ख्रिश्चन मुंबई, वसई आणि रायगडमध्ये आढळतात. वसई आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये राहाणार्या समुदायाला कुपारी समुदाय असं म्हटलं जातं.
• पोर्तुगीज व ब्रिटिश व्यापारी भारतात येऊ लागल्यापासून भारतातील किनारी प्रांतावरील सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, खाद्यसंस्कृती आणि धार्मिक रचनेवरही प्रभाव पडू लागला. हिंदू धर्मातील अनेक लोकांनी धर्मांतर करण्यास सुरुवात केली.
• अमेरिकन मराठी मिशनद्वारे महाराष्ट्रात ख्रिस्तधर्म प्रसाराचे काम सुरू झाल्यानंतर मराठी ख्रिश्चन समुदाय उदयाला आला. या समुदायातील लोक मुख्यत्वे प्रोटेस्टंट पंथाचे पाईक आहेत. अहमदनगर हे त्याचे मुख्य केंद्र झाले.
• महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती समुदायातील अनेक लोकांनी, समाजसुधारकांनी, साहित्यिकांनी, खेळाडूंनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विविध क्षेत्रात योगदान दिले आहे.
बाबा पद्मनजी
1) 1831 साली बाबा पद्मनजी मुळे यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण बेळगाव आणि मुंबई येथे झाले.
2) 1854 साली त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
3) 1857 साली त्यांनी यमुना पर्यटन ही मराठीमधील पहिली कादंबरी लिहिली. स्त्रीविद्याभ्यास निबंध, व्यभिचारनिषेधक बोध, यमुनापर्यटन, सर्वसंग्रही ऊर्फ निबंधमाला हे त्यांचे काही ग्रंथ प्रसिद्ध होते.
4) त्यांनी अरुणोदय या नावाने आत्मचरित्रही लिहिले होते.
5) मराठी साहित्यात आणि मराठी ख्रिस्ती साहित्यामध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.
पंडिता रमाबाई
1) 23 एप्रिल 1858 रोजी पंडिता रमाबाई यांचा जन्म झाला.
2) त्यांचं मूळ नाव रमाबाई डोंगरे असं होतं.
3) बिपिनबिहारी दास मेधावी यांच्याशी त्यांनी विवाह केला होता.
4) रमाबाई यांनी इंग्लंडमध्ये ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता.
5) 11 मार्च 1889 रोजी रमाबाईंनी शारदासदन या संस्थेची स्थापना मुंबईत विल्सन कॉलेजजवळ एका घरात केली.
6) 1890 च्या नोव्हेंबरात रमाबाईंनी शारदासदन पुण्यात नेलं.
7) 1898 साली पुण्यामध्ये प्लेग आल्यानंतर शारदासदन केडगाव येथे नेण्यात आलं.
8) शारदासदनचं आणि गुलबर्गा येथे स्थापन करण्यात आलेल्या मुलींच्या शाळेचं कामकाज रमाबाईंसह त्यांची मुलगी मनोरमा मेधावी या पाहात असत.
9) त्यांना कैसर ए हिंद पदकाने गौरवण्यात आलं होतं.
10) ऑगस्ट 1921 मध्ये मनोरमा मेधावी यांचा मृत्यू झाला.
11) 5 एप्रिल 1922 रोजी पंडिता रमाबाईंचा मृत्यू झाला.
ना. वा. टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक
1) 6 डिसेंबर 1861 रोजी नारायण वामन टिळक यांचा जन्म वामनराव आणि जानकीबाई यांच्यापोटी रत्नागिरी जिल्ह्यात करंजगाव इथं झाला.
2) 10 फेब्रुवारी 1895 रोजी मुंबईतील भेंडीबाजारातल्या चर्चमध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला.
3) सुरुवातीपासून टिळकांचं काव्यलेखन सुरू होतं. ख्रिस्ती झाल्यावर त्यांच्या काव्यहोत्राला आणखी गती आली.
4) 1895 पासून त्यांनी धर्मप्रसाराचं कार्य सुरू केलं. मराठी ख्रिस्ती मंडळींसाठी त्यांनी अनेक अभंग, ओव्या रचल्या. त्यांच्या अनेक अभंगांना चाल लावली गेली आणि भजनांमध्ये त्यांचा समावेश झाला.
5) त्यांचे ख्रिस्तायन हे महाकाव्यही प्रसिद्ध आहे. ख्रिस्तायनाच्या 11 व्या अध्यायानंतरचे सर्व लेखन लक्ष्मीबाई टिळकांनी केले आणि ख्रिस्तायन पूर्ण झाले.
6) टिळकांबरोबर लक्ष्मीबाई टिळकांनीही कीर्तनाला सुरुवात केली.
7) 1842 पासून अहमदनगरमध्ये ख्रिस्ती मिशनर्यांनी ज्ञानोदय हे नियतकालिक सुरू केले होते.
8) 1900-19 या कालावधीमध्ये ना. वा. टिळकांनी या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांचे पुत्र देवदत्त यांनी अनेक वर्षे संपादनाचं कार्य पुढे नेलं.
9) निपाणी येथे झालेल्या ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी देवदत्त टिळक होते.
10) लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे मराठीमधलं एक महत्त्वाचं पुस्तक म्हणून ओळखलं जात.
11) 1915 साली झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ना. वा. टिळक अध्यक्ष होते.
12) 9 मे 1919 रोजी ना. वा. टिळक यांनी मुंबईत जे. जे. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
13) ना. वा. टिळक यांची ग्रंथसंपदा- ख्रिस्तायन, वनवासी फुल, सुशीला, माझी भार्या, बापाचे अश्रू, पर्वतारोहण, सृष्टीची भाऊबीज, पुरे जाणतो मीच माझे बळ, रणशिंग, माझ्या जन्मभूमीचे नाव, प्रियकर हिंदीस्तान, लेकराची जिज्ञासा, कवीची विनवणी, केवढे हे क्रौर्य
हरि गोविंद केळकर
1) 1861 साली हरि गोविंद केळकर यांचा जन्म झाला. ते मूळचे अलिबागचे होते.
2) 1881 साली त्यांनी पेण येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यांनी कोकणामध्ये ख्रिस्तीधर्मोपदेशकाचे काम केले त्याचप्रमाणे पुष्कळ गद्य आणि पद्य लेखनही केले.
3) 1895 साली त्यांनी पोलादपूर येथे कुष्ठरोग्यांसाठी आश्रम सुरू केला.
4) 11 जुलै 1904 रोजी त्यांचे अलिबाग येथे निधन झाले.
5) 1959 साली हरि गोविंद केळकर यांचे पुत्र रत्नाकर केळकर यांनी त्यांचे चरित्र लिहिलं.
6) रत्नाकर केळकर यांनीबी ज्ञानोदयचे संपादक म्हणून कार्य केले.
7) रत्नाकर केळकर यांचे पुत्र डॉ. रंजन केळकर भारतीय हवामान विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले.
भास्करराव उजगरे
1) ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाची संकल्पना भास्करराव उजगरे यांनी मांडली होती.
2) बालकवी आणि ना. वा. टिळक यांच्याशी त्यांचा खूप स्नेह होता.
3) भास्करराव उजगरे यांनी ना. वा. टिळकांच्या कवितांचे संपादन केले होते.
4) दातेसूचीमध्ये ख्रिस्ती धर्मातल्या उपासना संज्ञांची मराठी रुपे त्यांनी दिली होती. त्यामुळे त्यांना भाषाभास्कर, भाषाप्रभू म्हटलं जाई.
5) भास्करराव उजगरे मसाप पुणेचे अध्यक्ष होते.
6) 1978 ते 1994 या कालावधीत भास्करराव उजगरे यांचे पुत्र हरिश्चंद्र उजगरे ज्ञानोदय नियतकालिकाचे संपादक होते.
7) हरिश्चंद्र उजगरे यांचे पुत्र निरंजन उजगरे मराठीतील एक प्रसिद्ध कवी होते. निरंजन उजगरे यांच्या पत्नी अनुपमा उजगरे यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे.
8) निरंजन आणि अनुपमा उजगरे यांनी ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.
भास्कर पांडुरंग हिवाळे
1) अहमदनगरच्या गरीब मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणसंस्था आणि कॉलेज काढणारे भास्कर पांडुरंग हिवाळे यांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या कॉलेजला हिवाळे कॉलेजही म्हटलं जातं.
2) हिवाळे यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पी.एचडी पदवी संपादन केली होती.
विजय हजारे
1) 1915 साली विजय हजारे यांचा जन्म सांगली येथे झाला.
2) भारतीय संघाला पहिला कसोटी विजय त्यांच्या नेतृत्वाखाली मिळाला.
3) सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकवणारे पहिले फलंदाज म्हणूनही त्यांची ओळख आहे.
4) कसोटी खेळात 1000 धावा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय खेळाडू आहेत.
5) फर्स्ट क्लास् क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवणारे, दोन त्रिशतकं झळकवणारे, दोन्ही डावांमध्ये शतक झळकवणारे पहिले भारतीय म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं.
6) 2004 साली त्यांचे बडोदा येथे निधन झाले.
आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी
1) 1916 साली सत्यवान नामदेव सूर्यवंशी यांचा जन्म अहमदनगर येथे झाला.
2) कीर्तनकार, धर्मोपदेशक, लेखक, पत्रकार, नाटककार अशा अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या.
3) त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले. त्यांना आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी असे आदराने संबोधले जाई.
4) ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
5) अगा जे कल्पिले नाही, गोल देऊळ, चटकचांदणी ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.
शाहू मोडक
1) 25 एप्रिल 1918 रोजी शाहू मोडक यांचा जन्म अहमदनगर येथे झाला.
2) मराठी आणि हिंदीमधील अनेक उत्तमोत्तम पौराणिक-धार्मिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले.
3) 1931 साली त्यांनी सर्वात पहिली कृष्णाची भूमिका श्यामसुंदर या सिनेमात साकारली.
4) भारतीय बोलपटांमध्ये पहिली दुहेरी भूमिका (डबल रोल) करणारे आणि 29 वेळा कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते म्हणून शाहू मोडक प्रसिद्ध आहेत.
5) 1993 साली शाहू मोडक यांचे निधन झाले.
6) त्यांच्या जीवनावर प्रतिभा मोडक यांनी लिहिलेले, शाहू मोडक प्रवास एका देवमाणसाचा पुस्तक प्रसिद्ध आहे.
एन. के. पी. साळवे
1) 18 मार्च 1921 रोजी एन.के.पी. साळवे यांचा जन्म छिंदवाडा येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्रकुमार साळवे असे होते.
2) शिक्षणाने चार्टर्ड अकौंटंट मग राजकीय नेता आणि क्रिकेट संघटनांचे प्रशासक म्हणून त्यांची ख्याती होती.
3) इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली.
4) ते स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते होते.
5) शेषराव वानखेडे यांच्यानंतर त्यांनी बीसीसीआयची जबाबदारी पार पाडली.
6) 1 एप्रिल 2012 रोजी त्यांचे दिल्लीमध्ये निधन झाले.
7) त्यांच्या भगिनी निर्मला श्रीवास्तव यांनी सहजयोग चळवळीची स्थापना केली होती.
8) एनकेपी साळवे यांचे पुत्र हरिश साळवे भारतातील सुप्रसिद्ध वकील म्हणून ओळखले जातात.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
1) 4 डिसेंबर 1943 रोजी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म नंदाखाल येथे झाला.
2) लेखनाबरोबरच पर्यावरण रक्षणाच्या चळवळीतही त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
3) सुवार्ता या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले आहे.
4) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
5) हरित वसई चळवळीच्या माध्यमातून पर्यावरण चळवळीत त्यांचे नाव प्रसिद्ध झाले.
चंदू बोर्डे
1) चंदू बोर्डे हे विजय हजारे यांच्याप्रमाणे भारतीय संघात महत्त्वाची कामगिरी बजावणारे खेळाडू आहेत.
2) 1934 साली चंदू बोर्डे यांचा पुणे येथे जन्म झाला.
3) 1954 पासून त्यांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली.
4) पद्मश्री, पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार व सी. के नायडू जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रश्नमंजुषा (72)
1) बाबा पद्मनजी यांच्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) त्यांनी अरुणोदय या नावाने आत्मचरित्र लिहिले होते.
ब) त्यांनी यमुना पर्यटन ही मराठीमधील पहिली कादंबरी लिहिली.
क) 1857 साली त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
2) पोलादपूर येथे कुष्ठ रोग्यांसाठी आश्रम सुरू केला ?
1) शिवाजीराव देशमुख
2) हरि गोविंद केळकर
3) नारायण वामन टिळक
4) विनोबा भावे
3) अहमदनगरमध्ये ख्रिस्ती मिशनर्यांनी ज्ञानोदय हे नियतकालिक कधी सुरू केले होते ?
1) 1828
2) 1837
3) 1842
4) 1848
4) खालील विधाने विचारात घ्या :
a) देवदत्त टिळक हे निपाणी येथे झालेल्या ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होते.
b) बाबा पद्मनजी यांनी ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाची संकल्पना मांडली होती.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
5) खालीलपैकी कोणी ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले नाही ?
1) अनुपमा उजगरे
2) निरंजन उजगरे
3) आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी
4) हरि गोविंद केळकर
6) खालीलपैकी कोणी ज्ञानोदय नियतकालिकाचे संपादक म्हणून काम केले होते?
अ) रत्नाकर केळकर
ब) हरिश्चंद्र उजगरे
क) ना. वा. टिळक
ड) देवदत्त ना. टिळक
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब, क आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
7) पंडिता रमाबाई यांच्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
1) बिपिनबिहारी दास मेधावी यांच्याशी त्यांनी विवाह केला होता.
2) त्यांना कैसर ए हिंद पदकाने गौरवण्यात आलं होतं.
3) त्यांचं मूळ नाव रमाबाई रानडे असं होतं.
4) 5 एप्रिल 1922 रोजी पंडिता रमाबाईंचा मृत्यू झाला.
8) पंडित रमाबाईंनी स्थापन केलेल्या शारदासदन या संस्थेच्या कार्येक्षेत्रासंदर्भात योग्य क्रम लावा.
अ) केडगाव येथे स्थलांतर
ब) पुणे येथे स्थलांतर
क) मुंबईत विल्सन कॉलेजजवळील घरातून कार्य
पर्यायी उत्तरे :
1) अ - ब - क
2) क - अ - ब
3) ब - अ - क
4) क - ब - अ
9) स्मृतिचित्रे हे मराठीमधलं महत्त्वाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे ?
1) ना. वा. टिळक
2) लक्ष्मीबाई टिळक
3) देवदत्त टिळक
4) यापैकी नाही
10) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (व्यक्ती) स्तंभ ब (योगदान)
अ. भास्कर पांडुरंग हिवाळे I. स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते
ब. भास्करराव उजगरे II. हार्वर्ड विद्यापीठातून पी.एचडी
क. एनकेपी साळवे III. कैसर ए हिंद पदकाने गौरव
ड. पंडिता रमाबाई IV. मसाप पुणेचे अध्यक्ष
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II IV I III
2) II I III IV
3) III II IV I
4) IV III I II
11) महाराष्ट्रात कोणत्या भागात रोमन कॅथलिक ख्रिश्चन दिसून येतात ?
1) पुणेे व अहमदनगर
2) नाशिक, अहमदनगर व सोलापूर
3) मुंबई, वसई आणि रायगड
4) रत्नागिरी व सिंधुदुर्ग
12) मराठी ख्रिश्चन समुदायाशी संबंधित खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) या समुदायातील लोक मुख्यत्वे प्रोटेस्टंट पंथाचे पाईक आहेत.
ब) अहमदनगर हे त्याचे मुख्य केंद्र होते.
क) अमेरिकन मराठी मिशनद्वारे ख्रिस्तधर्म प्रसार सुरू झाल्यानंतर हा समुदाय उदयाला आला.
ड) या समुदायाला कुपारी समुदाय असंही म्हटलं जातं.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
13) स्त्रीविद्याभ्यास निबंध, व्यभिचारनिषेधक बोध, सर्वसंग्रही ऊर्फ निबंधमाला या ग्रंथांचे लेखक कोण ?
1) गोपाळ गणेश आगरकर
2) रा. गो. भांडारकर
3) बाबा पद्मनजी
4) विष्णुबुवा ब्रम्हचारी
14) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (व्यक्ती) स्तंभ ब (ख्रिस्त धर्म स्वीकारला ते स्थळ)
अ. पंडिता रमाबाई I. इंग्लंड
ब. नारायण वामन टिळक II. मुंबई
क. हरि गोविंद केळकर III. पेण
ड. सत्यवान नामदेव सूर्यवंशी IV. अहमदनगर
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III I IV
2) II I III IV
3) III II IV I
4) I II III IV
15) खालीलपैकी कोणी भारतीय हवामान विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केलेले आहे ?
1) वसंत गोवारीकर
2) अनिल काकोडकर
3) डॉ. रंजन केळकर
4) डॉ. विजय भटक़र
16) शाहू मोडक यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय बोलपटांमध्ये पहिली दुहेरी भूमिका (डबल रोल) करणारे अभिनेते
ब) त्यांचा जन्म पुणे येथे झाला होता.
क) 50 वेळा कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते म्हणून प्रसिद्ध
ड) 2018 साली त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली.
पर्यायी उत्तरे :
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने ब, क आणि ड बरोबर
3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
4) विधाने अ आणि ड बरोबर
17) शेषराव वानखेडे यांच्यानंतर बीसीसीआयची जबाबदारी कोणी पार पाडली?
1) चंदू बोर्डे
2) एन. के. पी. साळवे
3) विजय हजारे
4) हरिश साळवे
18) नारायण वामन टिळक यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) 1915 च्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते.
ब) त्यांचे ख्रिस्तायन हे महाकाव्यही प्रसिद्ध आहे.
क) त्यांनी ज्ञानोदय हे नियतकालिक सुरू केले.
ड) अहमदनगर येथे त्यांचा बाप्तिस्मा झाला होता.
इ) त्यांना रँगलर टिळक म्हणूनही ओळखले जाते.
फ) डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पती त्यांचे मित्र होते.
ग) ते लोकमान्य टिळकांचे नातेवाईक होते.
पर्यायी उत्तरे :
1) वरील सर्व
2) अ आणि ब
3) अ, ब, क, इ
4) अ, ब, क, फ, ग
19) सहजयोग चळवळीची स्थापना करणार्या ..... या एन. के. पी. साळवे यांच्या भगिनी होत.
1) माता अमृतमयी
2) निर्मला श्रीवास्तव
3) माताजी शकुंतलादेवी
4) निर्मलादेवी साळवे
20) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (व्यक्ती) स्तंभ ब (जन्म स्थळ)
अ. विजय हजारे I. सांगली
ब. आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी II. अहमदनगर
क. एनकेपी साळवे III. छिंदवाडा
ड. फादर फ्रान्सिस दिब्रिटो IV. नंदाखाल
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III I IV
2) I II III IV
3) I II IV III
4) IV III I II
21) फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) सुवार्ता या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले आहे.
ब) हरित मुंबई चळवळीच्या माध्यमातून पर्यावरण चळवळीत त्यांचे नाव प्रसिद्ध झाले.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
22) भास्करराव उजगरे, हरिश्चंद्र उजगरे, निरंजन उजगरे, अनुपमा उजगरे ही नावे कशाशी संबंधित आहेत ?
1) मानवी हक्क चळवळ
2) पर्यावरण चळवळ
3) ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलन
4) ज्ञानोदय नियतकालिकाचे संपादन
23) भारतीय क्रिकेट संघात महत्त्वाची कामगिरी बजावणारे खेळाडू चंदू बोर्डे यांना कोणत्या बहुमानाने सन्मानित केले गेले होते ?
अ) सी. के नायडू जीवनगौरव
ब) द्रोणाचार्य पुरस्कार
क) अर्जुन पुरस्कार
ड) पद्मश्री व पद्मभूषण
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
24) खालीलपैकी कोणते विधान विजय हजारे यांच्याबाबत चुकीचे आहे ?
1) सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकवणारे पहिले फलंदाज
2) कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय खेळाडू
3) दोन्ही डावांमध्ये द्विशतक झळकवणारे पहिले भारतीय
4) भारतीय संघाला पहिला कसोटी विजय त्यांच्या नेतृत्वाखाली मिळाला.
25) खालीलपैकी कोणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे ?
1) आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी
2) फादर फ्रान्सिस दिब्रिटो
3) हरि गोविंद केळकर
4) नारायण वामन टिळक
26) द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक ......... यांनी लिहिले.
1) लेडी फॉकलंड
2) पंडिता रमाबाई
3) रमाबाई आंबेडकर
4) लेडी वेलिंग्टन
27) पंडिता रमाबाईंशी निगडीत चुकीचे विधान ओळखा :
1) शारदासदन आणि मुक्तिसदनाची स्थापना.
2) स्त्रीकोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले
3) निराश्रित विधवा स्त्रियांसाठी कृपासदन, प्रितीसदन
4) त्यांच्या कार्याबद्दल कैसर-र्ई-हिंद ही पदवी बहाल
28) भारतात स्त्रियांच्या उन्नतीसाठी केलेल्या, कार्यासाठी, ब्रिटिश सरकारने केसर-ए-हिंद सुवर्णपदक, 1919 मध्ये कोणाला दिले होते?
1) महात्मा गांधी
2) पंडिता रमाबाई
3) रमाबाई रानडे
4) अवंतिकाबाई गोखले
29) पंडिता रमाबाई यांनी स्त्री मुक्तीकरणासाठी केलेले हे कार्य उल्लेखनीय आहे -
1) त्यांनी महिलांच्या स्थिती सुधार आणण्याकरता आर्य महिला समाज सुरू केला.
2) त्यांनी स्त्रियांना आरोग्य सुविधा पुरवण्याकरता लेडी डफरीन फंड सुरू केला.
3) त्यांनी विधवांकरता शारदा सदन स्थापित केले.
4) त्यांनी अनाथांकरता कृपा सदन सुरू केले.
30) पंडिता रमाबाई ज्या खूप शिकलेल्या, सुंदर आणि बुद्धिमान होत्या, त्यांच्याबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?
1) श्रीनिवास शास्त्री त्यांचा एकुलता एक भाऊ होता.
2) बरेच आय.सी.एस. अधिकारी त्यांच्याशी लग्न करायला तयार होते.
3) त्यांनी बिपिन बिहारी दासशी लग्न केले.
4) वरील एकही नाही.
31) पंडिता रमाबाई यांच्या संघटना व कार्य यांच्या जोड्या लावा.
(i) शारदा सदन (A) दुष्काळग्रस्तांना मदत
(ii) मुक्ती सदन (B) निराधार स्त्रियांना मदत
(iii) कृपा सदन (C) ख्रिश्चन धर्माचा प्रसार
(iv) रमाबाई असोसिएशन (D) विधवा स्त्रियांना मदत
पर्यायी उत्तरे :
1) (i) - (A), (ii) - (B), (iii) - (C), (iv) - (D)
2) (i) - (D), (ii) - (C), (iii) - (B), (iv) - (A)
3) (i) - (B), (ii) - (A), (iii) - (D), (iv) - (C)
4) (i) - (D), (ii) - (C), (iii) - (A), (iv) - (B)
32) पुण्यात बालविवाहावर बंदी आणि स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देणारी संस्था पुढीलपैकी कोणी सुरू केली ?
1) सरोजिनी नायडू
2) पंडिता रमाबाई
3) कमला नेहरू
4) अॅनी बेझंट
33) पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने आर्य महिला समाजाची स्थापना केली ?
1) आनंदीबाई जोशी
2) पंडिता रमाबाई
3) डॉ. अॅनि बेझंट
4) अवंतीकाबाई गोखले
34) “आर्य महिला समाज” स्त्री-सुधारणा करिता ........... ह्यांनी स्थापना केली.
1) ताराबाई शिंदे
2) आनंदीबाई जोशी
3) सावित्रीबाई फुले
4) पंडिता रमाबाई
35) मुंबईचे शारदा सदन कोणी स्थापन केले ?
1) पंडिता रमाबाई
2) अॅनी बेझंट
3) आनंदीबाई
4) सावित्रीबाई फुले
36) स्त्री-शिक्षणासाठी व स्त्री-जागृतीसाठी शारदा-सदन ही संस्था कोणी स्थापन केली?
1) रमाबाई रानडे
2) पंडिता रमाबाई
3) ताराबाई शिंदे
4) सावित्रीबाई फुले
37) पुणे येथे “आर्य महिला समाजाची” स्थापना कोणी केली?
1) सावित्रीबाई फुले
2) पंडिता रमाबाई
3) इरावती कर्वे
4) अनुताई वाघ
38) कैसर-इ-हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती?
1) विजयालक्ष्मी पंडित
2) पंडिता रमाबाई
3) सरोजिनी नायडू
4) इंदिरा गांधी
39) मुक्तीसदन, कृपासदन, सदानंदसदन या संस्था कोणी सुरू केल्या ?
1) पंडिता रमाबाई
2) आनंदीबाई जोशी
3) रमाबाई रानडे
4) ताराबाई शिंदे
उत्तरे : प्रश्नमंजुषा (72)
1-2
2-2
3-3
4-1
5-4
6-3
7-3
8-4
9-2
10-1
11-3
12-1
13-3
14-4
15-3
16-4
17-2
18-2
19-2
20-2
21-1
22-3
23-4
24-3
25-2
26-2
27-2
28-2
29-4
30-4
31-4
32-2
33-2
34-4
35-1
36-2
37-2
38-2
39-1