सामाजिक व सांस्कृतिक / प्रश्नमंजुषा (71)

  •  सामाजिक व सांस्कृतिक / प्रश्नमंजुषा (71)

    सामाजिक व सांस्कृतिक / प्रश्नमंजुषा (71)

    • 28 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 948 Views
    • 2 Shares

    सावित्रीबाई फुले

           
     
            डिसेंबर 2020 मध्ये  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला. यापुढे हा दिवस सावित्री उत्सव तसेच पूर्वीप्रमाणे बालिका दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.

    वैयक्तिक माहिती -
    • सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या.
    • 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला.
    • 1840 साली वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह जोतिबा फुले यांच्यासोबत झाला.
    • जोतिबा फुले यांनी त्यांना अक्षर ओळख व प्राथमिक शिक्षण दिले. त्यानंतरचे शिक्षण सखाराम परांजपे आणि केशव भावलकर यांनी त्यांना दिले.
    • अपत्य नसल्यामुळे बालहत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई या विधवेचा यशवंत हा मुलगा त्यांनी दत्तक घेतला.
    • 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
    • 1998 मध्ये त्यांच्या 101 व्या पुण्यतिथी निमित्ताने भारतीय पोस्टाने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट चालू केले.
    • 2014 साली सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले.

    शैक्षणिक कार्य -
    • 1848 मध्ये सावित्रीबाई, जोतिबा फुले आणि सगुणाबाई या तिघांनी मिळून  पुण्यातील तात्याराव भिडे यांच्या वाड़यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंनी कार्य सुरू केले.
    • त्यांच्या या शैक्षणिक कार्यास विरोध म्हणून त्यांना घराबाहेर काढल्यावर सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांना उस्मान शेख या महात्मा फुले यांच्या मित्राने आसरा दिला.
    • 1849 मध्ये पुण्यातील मुस्लीम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने त्यांनी उस्मान शेख यांच्या घरी शाळा सुरू केली. उस्मान शेख यांच्या पत्नी फातिमा शेख या पहिल्या मुस्लीम महिला शिक्षिका बनल्या.

    सामाजिक कार्य व लेखन -
    • 1863 मध्ये गर्भवती विधवा आणि बलात्कार पीडित गर्भवतींना आसरा देण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. या संस्थेच्या कार्यामध्ये सावित्रीबाईंनी सक्रिय सहभाग घेतला.
    • 1897 साली पुण्यात आलेल्या महाभयंकर ‘प्लेगच्या’ साथीत सावित्रीबाईंनी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता रुग्णांची सेवाशुश्रूषा केली. अशातच त्यांनादेखील या आजाराने ग्रासले.
    • भ्रूणहत्या विशेषत: स्त्रीभ्रूण हत्या थांबण्यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या माध्यमातून कार्य केले.
    • सावित्रीबाई कवयित्री म्हणून परिचीत आहेत. 
    • ‘काव्यफुले’ आणि ‘बावनकशी सुबोधरत्नाकर’ या त्यांच्या काव्यरचना प्रकाशित झाल्या आहेत.

    सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची ठळक वैशिष्ट्ये-
    1) मुलींच्या गळतीचे प्रमाण शाळांमधून कमी व्हावे या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू झाली 
    2) इयत्ता 5 वी  ते 10 वीमध्ये शिकणार्‍या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील मुलींना राज्य शासनातर्फे सदरची शिष्यवृत्ती देण्यात येते.
    3) 1996 पासून  5 वी ते 7 वीमधील लाभार्थी विद्यार्थिनीस दरमाह रुपये 60 याप्रमाणे 10 महिन्यांकरिता रु.600 शिष्यवृत्तीची रक्कम अदा केली जाते.
    4) 2003 पासून 8 वी ते 10 वीमधील लाभार्थी विद्यार्थिनीस दरमाह रुपये 100 याप्रमाणे 10 महिन्यांकरिता रु.1000 शिष्यवृत्तीची रक्कम अदा केली जाते.
    5) 2019 मध्ये इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी सदर योजना लागू करण्यात आली.
     
    प्रश्नमंजुषा (71)
    1) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) 3 जानेवारी हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जतो.
    ब)  3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जतो.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    2) सावित्रीबाई फुले यांनी 1849 मध्ये पुण्यातील मुस्लीम महिलांना आणि लहान मुलांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने कोणाच्या घरी शाळा सुरू केली ?
    1) केशव भावलकर
    2) हामीद दलवाई
    3) उस्मान शेख
    4) शाहीर अमर शेख
     
    3) सावित्रीबाई फुले यांच्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) त्यांचा मृत्यू प्लेगच्या साथीमुळे झाला.
    ब) त्यांचा मृत्यू कॉलर्‍याच्या साथीमुळे झाला.
    क) ‘काव्यफुले’ आणि ‘बावनकशी सुबोधरत्नाकर’ या त्यांच्या काव्यरचना आहेत.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    4) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत ?
    अ) 2019 मध्ये ही योजना इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी लागू झाली.
    ब) 1996 पासून  ही योजना सुरु आहे.
    क) 2020 मध्ये ही योजना इएसबीसी प्रवर्गातील मुलींसाठी लागू झाली.
    ड) ही योजना महिला बालविकास खात्यामार्फत अअमलाता आणली जाते.
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ आणि ब बरोबर
     
    5) सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे कधी करण्यात आले ?
    1) 2012
    2) 2014 
    3) 2011
    4) 2004
     
    6) खालील जोड्या अचूक जुळवा ः
    स्तंभ अ (घटना) स्तंभ ब (वर्ष)
    अ. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना I. 1848
    ब. तात्याराव भिडे यांच्या वाड़यात मुलींची पहिली शाळा II. 1849
    क. उस्मान शेख यांच्या घरी शाळा III. 1863
    ड. सावित्रीबाईंना‘प्लेगची’ लागण IV. 1897
    पर्यायी उत्तरे :
    1) II III IV I
    2) II I III IV
    3) III I II IV
    4) IV III I II
     
    7) कोणत्या वर्षी भारतीय पोस्टाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट चालू केले ?
    1) 2011 मध्ये त्यांच्या 180 व्या जयंती निमित्ताने 
    2)  1998 मध्ये त्यांच्या 101 व्या पुण्यतिथी निमित्ताने 
    3) 2018 मध्ये त्यांच्या 121 व्या पुण्यतिथी निमित्ताने 
    4) 2001 मध्ये त्यांच्या 170 व्या जयंती निमित्ताने 
     
    8) सावित्रीबाई फुले यांना खालीलपैकी कोणी शिक्षण दिले?
    अ) केशव भावलकर
    ब) जोतिबा फुले 
    क) सखाराम परांजपे 
    ड) उस्मान शेख
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    9) 1848 मध्ये पुण्यातील तात्याराव भिडे यांच्या वाड़यात मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात कोणाचे योगदान नव्हते ?
    1) सगुणाबाई
    2) सावित्रीबाई फुले
    3) जोतिबा फुले 
    4)  तात्याराव भिडे 
     
    10) ...... यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली.
    1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    2) महर्षी शिंदे
    3) म. ज्योतिबा फुले
    4) गोपाळ हरी देशमुख
     
    11) खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाज सुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली ?
    1) डॉ. बी.आर.आंबेडकर 
    2) महात्मा फुले
    3) गोदुताई कर्वे
    4) विठ्ठलदास ठाकरसी 
     
    12) सामाजिक अत्याचारास बळी ठरलेल्या बालविधवासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह चालविणार्‍या महाराष्ट्रातील आधुनिक स्त्री सुधारक कोण ?
    1) रमाबाई रानडे
    2) पंडिता रमाबाई
    3) डॉ. आनंदीबाई जोशी
    4) सावित्रीबाई फुले  
     
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (71)
    1-3
     
    2-3
     
    3-3
     
    4-4
     
    5-2
     
    6-3
     
    7-2
     
    8-1
     
    9-4
     
    10-3
     
    11-2
     
    12-4

Share this story

Total Shares : 2 Total Views : 948