महाराष्ट्राचे विधीमंडळ / प्रश्नमंजुषा (48)
- 10 Dec 2020
- Posted By : Study Circle
- 728 Views
- 2 Shares
महाराष्ट्राचे विधीमंडळ
प्रश्नमंजुषा (48)
1) खालील विधाने विचारात घ्या:
a) महाराष्ट्राच्या विधानसभेच्या दोन अध्यक्षांनी भारताच्या लोकसभेचे अध्यक्षपद भूषविले आहे.
b) गणेश मावळणकर व मनोहर जोशी यांनी भारताच्या लोकसभेचे अध्यक्षपद भूषविले आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने चूक आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
2) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या खालीलपैकी कोणत्या उपसभापतीनी विधानपरिषदेचे सभापती म्हणूनही काम केलेले आहे ?
अ) रा. सु. गवई
ब) वसंतराव डावखरे
क) ना. स. फरांदे
ड) वि. स. पागे
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ आणि ड
2) अ, ब आणि क
3) अ, क आणि ड
4) वरील सर्व
3) महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलानुसारचा योग्य उतरता क्रम शोधा.
अ) कॉग्रेस
ब) राष्ट्रवादी काँग्रेस
क) शिवसेना
ड) भाजप
पर्यायी उत्तरे :
1) अ - ब - क - ड
2) क - अ - ड - ब
3) ब - ड - अ - क
4) ड - क - ब - अ
4) महाराष्ट्र विधानसभेच्या खालीलपैकी कोणत्या उपाध्यक्षांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेले आहे ?
अ) शंकरराव जगताप
ब) शेषराव वानखेडे
क) शिवराज पाटील
ड) गणपतराव देशमुख
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ आणि ड
2) अ, ब आणि क
3) अ, क आणि ड
4) वरील सर्व
5) महाराष्ट्र विधानपरिषदेतील पक्षीय बलानुसारचा योग्य चढता क्रम शोधा.
अ) कॉग्रेस
ब) राष्ट्रवादी काँग्रेस
क) शिवसेना
ड) भाजप
पर्यायी उत्तरे :
1) अ - ब - क - ड
2) क - अ - ड - ब
3) ब - ड - अ - क
4) ड - क - ब - अ
6) खालील विधाने विचारात घ्या:
a) जयंत श्रीधर टिळक हे सर्वात जास्त काळ महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे सभापती होते.
b) त्र्यं. शि. भारदे हे सर्वात जास्त काळ महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने चूक आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
7) महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे कोणत्या पक्षाचे नेते आहेत ?
1) भाजप
2) शिवसेना
3) राष्ट्रवादी काँग्रेस
4) कॉग्रेस
8) महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांचा त्यांच्या कारकीर्दीनुसारचा योग्य क्रम लावा.
अ) अरुणलाल गुजराथी
ब) शेषराव वानखेडे
क) दिलीप वळसे पाटील
ड) बाळासाहेब देसाई
पर्यायी उत्तरे :
1) अ - ब - क - ड
2) क - अ - ड - ब
3) ब - ड - अ - क
4) ड - क - ब - अ
9) महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे कोणत्या पक्षाचे नेते आहेत ?
1) भाजप
2) शिवसेना
3) राष्ट्रवादी काँग्रेस
4) कॉग्रेस
10) खालील विधाने विचारात घ्या:
a) नाना पटोले हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे 19 वे अध्यक्ष आहेत.
b) रामराजे निंबाळकर हे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे 13 वे सभापती आहेत.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने चूक आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
11) महाराष्ट्राच्या विधान परिषद सभापतींचा त्यांच्या कारकीर्दीनुसारचा योग्य क्रम लावा.
अ) जयंतराव टिळक
ब) शिवाजीराव देशमुख
क) वि. स. पागे
ड) ना. स. फरांदे
पर्यायी उत्तरे :
1) अ - ब - क - ड
2) क - अ - ड - ब
3) ब - ड - अ - क
4) ड - क - ब - अ
12) खालील विधाने विचारात घ्या:
a) महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष हे भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष होते.
b) महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष सयाजी लक्ष्मण सिलम हे होते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने चूक आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
उत्तरे : प्रश्नमंजुषा (48)
1-2
2-2
3-4
4-2
5-1
6-2
7-3
8-3
9-4
10-4
11-2
12-2