उत्तर प्रदेश विधानपरिषद / प्रश्नमंजुषा (47)
- 10 Dec 2020
- Posted By : Study circle
- 181 Views
- 0 Shares
उत्तर प्रदेश विधानपरिषद
डिसेंबर 2020 मध्ये उत्तर प्रदेशात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान झाले. या 11 पैकी 6 जागांवर भाजपने, समाजवादी पक्षाने 3, तर 2 जागेवर अपक्ष उमेदवराने विजय मिळवला. यात 5 पदवीधर आणि 6 शिक्षक मतदार संघांचा समावेश होता. या निवडणुकीत भाजपशी संबंधित असलेली शिक्षक असोसिएशन, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी भाग घेतला होता. जवळपास 199 उमेदवारांनी ही निवडणूक लढवली होती.
• वाराणशी मतदारसंघ -
1) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून दोनवेळा लोकसभा निवडणूक लढवली आहे. 2014 ला त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता, तर 2019 च्या लोकसभा निडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध 45 टक्क्यांचे मार्जिन राखत दणदणीत विजय मिळवला होता.
2) यापूर्वी वाराणसी लोकसभेची जागा भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी लढवत होते.
3) उत्तरप्रदेश विधानपरिषदेच्या वाराणसी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. समाजवादी पक्षाचे आशुतोष सिन्हा यांनी पदवीधर मतदारसंघाची, तर लाल बिहारी यादव यांनी वाराणसी शिक्षक मतदार संघाची निवडणुक जिंकली.
• उत्तर प्रदेशात विधान परिषदेतील आमदार (100) -
1) 38 विधानसभा मतदारसंघ (1/3)
2) 36 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ (1/3)
3) 8 पदवीधर मतदारसंघ (1/12)
4) 8 शिक्षक मतदारसंघ (1/12)
5) 10 राज्यपालाकडून मनोनित सदस्य (1/6)
प्रश्नमंजुषा (47)
1) खालीलपैकी कोणत्या राज्यात पूर्वी विधान परिषद अस्तित्त्वात होती ?
अ) आसाम
ब) प. बंगाल
क) मध्य प्रदेश
ड) तामिळनाडू
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ आणि ड
2) अ आणि ब
3) अ, क आणि ड
4) वरील सर्व
2) खालील राज्यातील विधानपरिषदेतील आमदार संख्येनुसारचा योग्य चढता क्रम शोधा.
अ) महाराष्ट्र
ब) तेलंगणा
क) कर्नाटक
ड) उत्तरप्रदेश
पर्यायी उत्तरे :
1) अ - ब - क - ड
2) क - अ - ड - ब
3) ब - क - अ - ड
4) ड - क - ब - अ
3) खालील विधाने विचारात घ्या:
a) वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी निवडून आले होते.
b) वाराणसी पदवीधर मतदारसंघातून उत्तरप्रदेश विधानपरिषदेत (2020) लाल बिहारी यादव निवडून आले.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने चूक आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
4) खालीलपैकी कोणत्या राज्यातील विधान परिषदेतील नियुक्त आमदारांची संख्या सारखी असली तरी निर्वाचित आमदारांची संख्या भिन्न आहे ?
अ) महाराष्ट्र
ब) तेलंगणा
क) कर्नाटक
ड) उत्तरप्रदेश
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ आणि ड
2) अ आणि ब
3) अ, क आणि ड
4) वरील सर्व
उत्तरे : प्रश्नमंजुषा (47)
1-4
2-3
3-2
4-1