धर्माच्या बाबतीत ‘यूएन’कडून दुजाभाव / प्रश्नमंजुषा (41)

  • धर्माच्या बाबतीत ‘यूएन’कडून दुजाभाव / प्रश्नमंजुषा (41)

    धर्माच्या बाबतीत ‘यूएन’कडून दुजाभाव / प्रश्नमंजुषा (41)

    • 05 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 164 Views
    • 0 Shares
    धर्माच्या बाबतीत ‘यूएन’कडून दुजाभाव
     
              3 डिसेंबर 2020 : धर्मांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करताना संयुक्त राष्ट्रांनी कायमच दूजाभाव केल्याचा थेट आरोप भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (यूएनजीए) केला. जगभरात बौद्ध, हिंदू आणि शिखांवर होणार्‍या हल्ल्यांची नोंद घेण्यात महासभेला अपयश आल्याची टीका भारताचे प्रतिनिधी आशिष शर्मा यांनी केली. सध्या न्यूयॉर्क येथील यूएन कार्यालयात भारताचे प्रमुख टी. एस. तिरुमूर्ती हे आहेत.
     
    1)   ज्यूविरोध, इस्लामविरोध आणि ख्रिस्तीधर्माला विरोध दर्शविणार्‍या घटनांचा निषेध केला पाहिजे. मात्र, संयुक्त राष्ट्रांच्या ठरावामध्ये केवळ याच तीन अब्राहमिक धर्माच्या मुद्द्यांचा उल्लेख असल्याने बौद्ध, हिंदू आणि शिखांवर होत असलेल्या अत्याचारांकडे संयुक्त राष्ट्रांचे दुर्लक्ष झाले आहे. 
     
    2)   अफगाणिस्तानमधील बामियान येथील ऐतिहासिक बौद्ध मूर्ती दहशतवाद्यांनी तोडल्या. त्या देशातील गुरुद्वारावर हल्ले झाले, हिंदू मंदिरांवरही हल्ले झाले. इस्लाम, ज्यू आणि ख्रिस्ती धर्मावर झालेल्या हल्ल्यांवेळी जितक्या ठामपणे निषेध केला जातो, तसा निषेध या घटनांच्या बाबतीत केला जात नाही.
     
    3)    जगभर बौद्ध, हिंदू आणि शिख या तिन्ही धर्मियांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे असा ठराव करताना इस्लाम, ज्यू आणि ख्रिस्ती धर्माबरोबरच या तीन धर्मांचाही त्यात समावेश करावा. शांततेची संस्कृती निवडक धर्मांसाठी असू शकत नाही. 


    इस्रायलमधील नेतान्याहू सरकार 
     
     
              3 डिसेंबर 2020 : इस्रायलची संसद म्हणजेच नेसेट बरखास्त करण्याचा प्राथमिक प्रस्ताव बहुमताने संमत झाला. संसद बरखास्त करण्याच्या बाजूने 61 जर विरोधात 54 मतं पडली. मात्र संसदेतील या प्रस्तावाला नेसेट समितीची मंजुरी मिळालेली नाही. ही मंजुरी मिळाल्यानंतर दोनवेळा मतदान घेतलं जाईल. अशा प्रस्तावावरील अंतिम मतदानानंतरच संसद बरखास्त होऊ शकते. हा निर्णय म्हणजे भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या राजकीय अस्ताची सुरुवात असल्याचे मानले जाते. अंतिम मतदानापर्यंत हे प्रकरण जाऊ नये म्हणून सत्तेत असणार्‍या दोन्ही पक्षांचे नेते व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. परिणामी तेथे 2 वर्षात चौथ्यांदा सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे.  
     
    1) मे 2020 मध्ये लिकुड आणि ब्लू अ‍ॅण्ड व्हाइट या दोन्ही पक्षांनी एकत्र येत सरकार बनवले. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये एक ठराव झाला होता. त्यानुसार पहिल्या 18 महिन्यांसाठी नेत्यान्याहू पंतप्रधान राहणार होते, तर पुढील 18 महिने गेंट्स पंतप्रधान पदी विराजमान होणार होते. मात्र सत्तेत आल्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये बरेच मतभेद झाले.
     
    2) बेंजामिन नेत्यान्याहू हे लिकुड पक्षाचे अध्यक्ष आहेत, तर गेंट्ज ब्लू अ‍ॅण्ड व्हाइट पक्षाचे नेते आहेत. गेंट्स हे इस्रायलचे संरक्षण मंत्री आहेत. सरकार पडले पाहिजे अशी आपली इच्छा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं असलं तरी त्यांच्या ब्लू अ‍ॅण्ड व्हाइट पक्षाने संसद भंग करण्याच्या बाजूने मतदान केलं आहे.  
     
    3) नेत्यान्याहू यांच्यासोबत युती करुन सत्तेत असणारे सहयोगी बेनी गेंट्ज यांनी, नेतान्याहू यांनी दिलेलं वचन पाळलं नाही असा आरोप केला. नेतान्याहू यांच्याविरोधात अनेक महिन्यांपासून इस्राईलची राजधानी तेल अवीवच्या रस्त्यांवर आंदोलनं केली जात आहे. 
     
    4) नोव्हेंबर 2020 मध्ये देशाचे अ‍ॅटर्नी जनरल अविचाइ मांदेलब्लिट यांनी नेत्यान्याहू यांच्यावर 3 वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये फसवणूक, विश्वासघात आणि लाच स्वीकारणे असे आरोप ठेवले होते. इस्रायलच्या एखाद्या विद्यमान पंतप्रधानांवर गुन्ह्याचे आरोप ठेवले जाण्याची ही पहिलीच वेळ होती. नेत्यान्याहू यांनी एका वृत्तपत्राच्या प्रकाशकाचा फायदा करून देण्यासाठी त्यांच्या अब्जाधीश मित्रांकडून हजारो डॉलर किमतीच्या शँपेन आणि सिगार स्वीकारल्याचा, तसेच लोकप्रिय वृत्त संकेतस्थळावर अनुकूल प्रसिद्धी मिळण्याच्या मोबदल्यात टेलिकॉम क्षेत्रातील एका बड़या व्यावसायिकाला मदत करण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.


    प्रश्नमंजुषा (41)
    1) खालीलपैकी कोणते धर्म अब्राहमिक धर्म म्हणून ओळखले जातात ?
    अ) बौद्ध आणि जैन
    ब) ज्यू
    क) हिंदू आणि शिख
    ड) इस्लाम आणि ख्रिश्चन
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) अ आणि ब
    3) क आणि ड
    4) फक्त क
     
    2) भारताचे न्यूयॉर्क येथील यूएन प्रतिनिधी कोण आहेत ? 
    1) टी. एस. तिरुमूर्ती
    2) सय्यद अकबरुद्दीन
    3) जयदीप मजुमदार
    4) ज्ञानेश्वर मुळे
     
    3) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) बेंजामिन नेत्यान्याहू हे ब्लू अ‍ॅण्ड व्हाइट पक्षाचे नेते आहेत. 
    ब) बेनी गेंट्ज हे लिकुड पक्षाचे अध्यक्ष आहेत.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    4) इस्राईलच्या राजधानीचे शहर कोणते ?
    1) जेरुसलेम
    2) रिशान लित्सोयोन
    3) हैफा
    4) तेल अवीव
     
    5) खालील विधाने विचारात घ्या :
    अ) इस्राईलची संसद  नेसेट या नावाने ओळखली जाते.
    ब) सध्याचे इस्राईलचे अ‍ॅटर्नी जनरल अविचाइ मांदेलब्लिट 
    क) बेनी गेंट्ज हे इस्राईलचे संरक्षण मंत्री आहेत.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (41)
    1-3
     
    2-1
     
    3-4
     
    4-4
     
    5-4

Share this story

Total Shares : 0 Total Views : 164