पर्यावरण व भौगोलिक घटना / प्रश्नमंजुषा (34)
- 28 Nov 2020
- Posted By : Study Circle
- 313 Views
- 0 Shares
आगींमुळे 4,400 प्रजातीना धोका
ऑस्ट्रेलियातील संशोधनानुसार जगभरच्या वनाना लागणार्या आगीमुळे वनस्पती व प्राण्यांच्या अनेक प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. त्यातील नोंदी -
1) जगभरात आगीच्या घटनांमुळे 4,400 प्रजाती धोक्यात आल्या असून इंडोनेशियातील ओरांगउटानसह पशुपक्ष्यांच्या अनेक प्रजातींचा यात समावेश आहे.
2) जगात काही भागात अतिशय मोठ्या आगी लागत आसून 2019-20 मध्ये आग्नेय आशिया, दक्षिण अमेरिका, क्वीन्सलँडपासून आर्क्टिक सर्कलपर्यंत लागलेल्या आगींनी मोठ्या प्रमाणात परिसंस्था नष्ट केली.
3) ऑस्ट्रेलिया, दक्षिण युरोप व पश्चिम अमेरिकेतील जंगले आणि झुडुपांमध्ये आग अधिक काळ धुमसत असतो.
4) या आगीमागे मानवी हस्तक्षेपाबरोबरच जागतिक तापमानवाढ, जैविक आक्रमण आदी कारणांचा समावेश होतो.
5) मोठ्या प्रमाणावर अधिवासांची पुननिर्मिती, कमी ज्वलनशील मोकळ्या हिरव्या जागांची निर्मिती आदी उपाय केल्यास आगींचे प्रमाण कमी होते.
► जंगल वणव्यांचे महत्त्व - आफ्रिकेतील सॅव्हान्नासारख्या परिसंस्थेसाठी सततच्या आगी महत्त्वाच्या आहेत. या भागात आगीच्या घटना कमी झाल्यास झुडुपांचे अतिक्रमण होऊ शकते. त्यातून, मोकळा परिसर पसंत करणारे काळविटासारखे शाकाहारी प्राणी विस्थापित होऊ शकतात.
शिवालिक हत्ती अभयारण्य
डेहराडूनस्थित जॉली ग्रँट विमानतळाच्या विस्तारीकरणाचा भाग म्हणून शिवालिक हत्ती अभयारण्याची काही जमीन देण्याचा निर्णय उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी घेतला. त्याला अनेक पर्यावरण संस्थांनी विरोध केला.
1) 2020 वर्षाच्या सुरुवातीला उत्तराखंड राज्य वनखात्याने विमानतळाच्या विस्तारासाठी 87 हेक्टर वन जमीन अनारक्षित केली होती.
2) विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार्या जमिनीपासून 3 किमी अंतरावर कान्सॅरो-बारकोट हा हत्तींच्या येण्याजाण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे.
3) शिवालिक हत्ती राखीव जंगलात डेहराडून, हरिद्वार, लान्सडोन, हल्द्वानी, तनकपुर व रामनगर हे वन विभाग समाविष्ट होतात. यात वाघांसाठी संरक्षित असलेले कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान व राजाजी राष्ट्रीय उद्यानही येते.
4) 2002 मध्ये हत्तींसाठी राखीव जंगल असावे यातून शिवालिक उद्यान अस्तित्वात आले होते.
जागतिक सिंह दिन
सिंहांचे संवर्धन व्हावे, त्यांची तस्करी थांबावी या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी ‘बिग कॅट इनिशिएटिव्ह- नॅशनल जिओग्राफिक’चे सहसंस्थापक डेरेक आणि बेव्हर्ली ज्योबेर यांच्या पुढाकाराने 2013 पासून 10 ऑगस्ट रोजी‘जागतिक सिंह दिन’ साजरा केला जातो.
1) सिंहाचे शास्त्रीय ’पँथेरा लिओ’ हे आहे.
2) सुमारे 300 ते 550 पौंड वजनाचा सिंह तपकिरी रंगाचा असतो.
3) सिंह जर भुकेला असेल तरच शिकार करतो. दिवसातल्या 24 तासांपैकी 22 तास हा प्राणी झोपलेला असतो.
4) सुमारे 3 लाख वर्षांपासून त्याचे अस्तित्व आशिया आणि आफ्रिकेमध्ये होते. दक्षिण आफ्रिका, आशिया खंड, युरोप आणि मध्यपूर्व भागात सिंह मुक्तपणे संचार करीत असत. सध्या ते दोनच भागात आढळून येतात. ते भाग म्हणजे आफ्रिका आणि आशिया खंड.
5) इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) नुसार सिंहांची प्रजाती धोक्यात आली आहे.
6) सध्या पृथ्वीवर 30,000 ते 1,00,000 सिंह आहेत. गेल्या काही दशकात सिंहांची संख्या निम्म्याने कमी होण्यामागे ट्रॉफी हंटिंग हा खेळ आणि सिंह रहात असलेल्या नैसर्गिक वनांचा, जंगलांचा र्हास ही दोन प्रमुख कारणं आहेत.
► द लायन क्वीन्स ऑफ इंडिया -
1) गुजरातमधील गीरच्या जंगलात आढळणारी ‘एशियाटिक लायन’ची एकमेव प्रजाती आहे. जंगलांना लागणार्या वणव्यांपासून या सिंहांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी स्थानिक आदिवासी चोखपणे आणि कर्तव्यदक्षतेने पार पाडत आहेत. त्यांना रसिला वधेर, मनीषा वाघेला, केयुरी खामला आणि त्यांचा 40 जणींचा वनरक्षक चमू सक्रिय साहाय्य करत आहे.
2) त्यांच्या कार्यामुळे 2010 साली गीरमध्ये केलेल्या गणनेत 411 असलेली सिंहाची संख्या 2015 च्या गणनेत 523 झाली.
3) देशभरात अभयारण्यात वनरक्षक म्हणून काम करणारा हा पहिला आणि एकमेव महिला अधिकार्यांचा चमू असून त्यांचा ‘द लायन क्वीन्स ऑफ इंडिया’ म्हणून गौरव केला गेलेला आहे.
4) 2007 साली गीरच्या जंगलात या महिला वनरक्षकांची नेमणूक करण्यात आली. दररोज सरासरी 25 किलोमीटर भागात दिवस-रात्र पहारा देण्याचे काम या महिला वनरक्षक करीत आहेत.
5) जंगलाच्या आजूबाजूच्या गावकर्यांकडून होणारी वृक्षतोड थांबविण्याची तसेच सिंहांची होणारी शिकार रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
6) पहारा देत असताना अनेकदा या महिला वनरक्षकांवर सिंहांनी हल्ला केला. तरीही सिंहांना जिवापाड जपण्याच्या या कार्यापासून त्या ढळल्या नाहीत.
प्रदीप सांगवान
हिमालयातील वाढत्या पर्यटक-गर्दीमुळे होणार्या प्लास्टिकच्या कचर्याची तीव्रता पाहून गिर्यारोहक प्रदीप सांगवान या हरियाणातील तरुणाने ‘कचरामुक्त हिमालय’मोहीम सुरु केली.
► 3 वर्षांत त्याने प्रदीप सांगवानने एकट्याने पर्यटकांनी टाकलेला 5 लाख किलो प्लास्टिक कचरा पहाडांवरून खाली आणला. पर्यटकांच्या मागोमाग तो हिमालयावर जातो आणि त्यांनी टाकलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, बिस्कीट-वेफर्सची आवरणे आणि अन्य प्लास्टिकचा कचरा तो संकलित करतो.
► प्रदीप सांगवानने रोहतांग पास मार्गावरील कोठी गावात कॅफे सुरु केला असून त्याने 2016 मध्ये ‘द हीलिंग हिमालय फाऊंडेशन’ नावाची संस्था सुरू केली. पर्यावरण संवर्धनासाठी अनेक स्वयंसेवक या संस्थेत सहभागी झाले. त्यांच्या स्वच्छताकेंद्री गिर्यारोहण मोहिमांमधून जमा झालेला कचरा पुर्नप्रक्रियेसाठी पाठवला जातो. तिथे प्लास्टिकच्या कचर्यातून निर्माण होणारी वीज आसपासच्या खेड्यांना मिळू लागली.
► प्रदीपचे वडील सैन्यात होते. प्रदीपनेही सैन्यात जावे अशी वडिलांची इच्छा. मात्र प्रदीपने गिर्यारोहक होण्याचा निर्णय घेतला.
प्रश्नमंजुषा (34)
1) जगभरच्या वनाना लागणार्या आगीमुळे कोणत्या भागातील ओरांगउटानला धोका निर्माण झाला आहे ?
1) आग्नेय आशिया
2) ऑस्ट्रेलिया
3) दक्षिण अमेरिका
4) इंडोनेशिया
2) ‘’द लायन क्वीन्स ऑफ इंडिया ”संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
अ) अभयारण्यात वनरक्षक म्हणून काम करणारा हा पहिला आणि एकमेव महिला अधिकार्यांचा चमू आहे.
ब) 2007 सालापासून गीरच्या जंगलात या महिला वनरक्षक कार्यरत अहेत.
क) या महिला अधिकार्यांना सिंहांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्थानिक आदिवासींची मदत होते.
ड) या 40 जणींच्या वनरक्षक चमूच्या प्रमुख रसिला वधेर या आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) अ आणि ब
3) क आणि ड
4) फक्त अ, ब आणि क
3) शिवालिक हत्ती राखीव जंगलात खालीलपैकी कशाचा समावेश आहे?
a) राजाजी राष्ट्रीय उद्यान
b) लान्सडोन व डेहराडून वन विभाग
c) हल्द्वानी व हरिद्वार वन विभाग
d) जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
e) तनकपुर व रामनगर वन विभाग
f) जॉली ग्रँट विमानतळ
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c), (d), (e)
2) (b), (c), (e)
3) (a), (d), (e), (f)
4) (a), (c), (e)
4) गिर्यारोहक प्रदीप सांगवानसंबंधी खालील विधाने विचारात घ्या:
a) त्यांने 2016 मध्ये ‘द हीलिंग हिमालय फाऊंडेशन’ नावाची संस्था सुरू केली.
b) त्यांने 2011 मध्ये ‘कचरामुक्त हिमालय’ मोहीम सुरु केली.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
5) इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन) नुसार सिंहांची प्रजाती धोक्यात आली आहे. सिंहासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) सिंहाचे शास्त्रीय नाव - ’पँथेरा लिओ’
ब) सुमारे 5 लाख वर्षांपासून सिंहाचे अस्तित्व आशिया आणि आफ्रिकेमध्ये आहे.
क) 2013 पासून 10 ऑगस्ट रोजी‘जागतिक सिंह दिन’ साजरा केला जातो.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
6) गेल्या काही दशकात सिंहांची संख्या निम्म्याने कमी होण्यामागची प्रमुख कारणे ओळखा.
अ) जंगलांचा र्हास
ब) ट्रॉफी हंटिंग
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
7) कोणाच्या पुढाकाराने 2013 पासून 10 ऑगस्ट रोजी‘जागतिक सिंह दिन’ साजरा केला जातो ?
अ) डेरेक आणि बेव्हर्ली ज्योबेर
ब) इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन)
क) बिग कॅट इनिशिएटिव्ह- नॅशनल जिओग्राफिक
ड) द लायन क्वीन्स ऑफ इंडिया
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
8) उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) त्रिवेंद्र सिंग रावत
4) अ, ब आणि कफ
उत्तरे : प्रश्नमंजुषा (34)
1-4
2-4
3-4
4-3
5-3
6-3
7-3
8-3