मराठी भाषा गौरव दिन : 27 फेब्रुवारी / प्रश्नमंजुषा (102)
- 01 Mar 2021
- Posted By : study circle
- 896 Views
- 0 Shares
मराठी भाषा गौरव दिन : 27 फेब्रुवारी - प्रश्नमंजुषा : (102)
1) खालीलपैकी कोणते विधान कुसुमाग्रज यांच्याबाबत चुकीचे आहे?
1) त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी नाशिक येथे झाला.
2) वि. स. खांडेकरांनंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.
3) त्यांचे मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर
4) ते मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते.
2) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) 27 फेब्रुवारी ’मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने 21 जानेवारी 2013 रोजी घेतला.
ब) 1 मे हा दिवस ’राजभाषा मराठी दिन’म्हणून साजरा करण्यात यावा असा निर्णय शासनाने 10 एप्रिल 1997 रोजी घेतला.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
3) खालीलपैकी कोणते विधान मराठी भाषेबाबत असत्य आहे?
1) दमण-दीव व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही मराठीला सह राजभाषेचा दर्जा आहे.
2) 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची लोकसंख्या सुमारे 12 कोटी आहे.
3) मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे.
4) महाराष्ट्राची राजभाषा असलेली मराठी गोव्याची सह राजभाषा आहे.
4) महाराष्ट्राबाहेरील एकूण 15 विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते. त्यासंदर्भातील विद्यापीठे ओळखा :
अ) जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली)
ब) देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)
क) महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे)
ड) गुलबर्गा विद्यापीठ (कर्नाटक)
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, ब, क आणि ड बरोबर
5) 11 मे 1878 रोजी मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन कोठे भरले होते ?
1) दादरच्या छबीलदास शाळेत
2) कोल्हापूरच्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये
3) पुण्याच्या हिराबागेत
4) पुण्याच्या सदाशिव पेठेत
6) खालील जोड्या अचूक जुळवा ः
स्तंभ अ (बहुमान) स्तंभ ब (साहित्यिक)
अ. मूर्तिदेवी पुरस्कार I. महेश एलकुंच़वार
ब. सरस्वती सन्मान II. भालचंद्र नेमाडे यांना हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी
क. ज्ञानपीठ पुरस्कार III. नारायण सुर्वे
ड. सरस्वती सन्मान IV. शिवाजी सावंत यांना मृत्युंजय या कादंबरीसाठी
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
(1) II III II IV
(2) IV I II III
(3) III II IV I
(4) IV III I II
7) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
1) मराठीमध्ये ’ङ’ आणि ’ञ’ चा उच्चार हा, ’ण’ किंवा ’न’ प्रमाणेच नासिक्य होतो.
2) मराठीमध्ये 17 स्वर आणि 39 व्यंजने आहेत.
3) मराठी लेखन करण्यासाठी देवनागरी इनस्क्रिप्ट हा पर्याय अँड्रॉईड, विंडोज़ आणि लिनक्स या परिचालन प्रणालींवर मिळतो.
4) इंडिक टूल हे गुगल कंपनीने विकसित केले आहे.
8) मराठी भाषेतील मजकूर कोणत्या परिचालन प्रणालीत उपलब्ध अहे ?
अ) अॅपल मॅकओएस
ब) मायक्रोसॉफ्ट विंडोज
क) लिनक्स
ड) अँड्रॉईड
पर्यायी उत्तरे :
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने ब, क आणि ड बरोबर
3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
4) विधाने अ, क आणि ड बरोबर
9) खालीलपैकी कोणी गोंडी भाषेचा अभ्यास केला ?
1) मानववंशशास्त्रज्ञ व्हेरिअर एल्वीन
2) जर्मन भाषातज्ञ जूल ब्लॉच
3) ब्रिटिश भाषातज्ञ कॉल्डवेल
4) मानववंशशास्त्रज्ञ रॅडक्लीफ ब्राऊन
10) झाडीबोली संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) मराठीतील ’ण, छ, श, ष आणि ळ’ ही 5 व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत.
ब) मराठीतील मुकुंदराजकृत ’विवेकसिंधू’मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
11) कशाच्या प्रभावामुळे मराठीत निबंध, कादंबरी, लघुकथा, शोकात्मिका असे नवे साहित्यप्रकार मराठीतून लिहिले जाऊ लागले ?
1) फार्शी साहित्य
2) संस्कृत साहित्य
3) इंग्रजी साहित्य
4) वरील सर्व
12) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ स्तंभ ब
अ. मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ I. मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु
ब. मराठीतील पहिली कादंबरी II. श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळाचरित्र
क. मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी III. लक्ष्मणशास्त्री हळबे ह्यांची मुक्तामाला
ड. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ IV. रामचंद्र गुंजीकर ह्यांची मोचनगडस्
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
(1) II III I IV
(2) II I III IV
(3) III II IV I
(4) IV III I II
13) भीमराव गस्ती व नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे.
1) अहिराणी
2) बेळगावी
3) नागपुरी
4) मराठवाडी
14) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचा ’झाडीपट्टी’ भूप्रदेशात समावेश होतो ?
अ) अमरावती आणि वर्धा
ब) चंद्रपूर आणि गडचिरोली
क) भंडारा आणि गोंदिया
ड) अकोला आणि यवतमाळ
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) ब आणि क बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
15) चक्रधर स्वामी/ म्हाइंभट यांचा ’लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ ..... बोलीत लिहिला गेला होता ?
1) मराठवाडी
2) नागपुरी
3) वर्हाडी
4) तंजावरी
16) खालील विधाने विचारात घ्या आणि ती बोलीभाषा ओळखा :
अ) महाराष्ट्राच्या मध्यभागातील अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांत ही भाषा बोलली जाते.
ब) ही भाषा मराठी, गुजराती, राजस्थानी आणि कानडी भाषेचं मिश्र स्वरूप आहे.
क) ही भाषा बोलणार्या लोकांचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे.
ड) पूर्वीच्या पिढीतील लोकांशी येथील युवक, मराठी किंवा हिंदीत व्यवहार करतात.
पर्यायी उत्तरे :
1) वडारी भाषा
2) तावडी भाषा
3) पारधी भाषा
4) मराठवाडी भाषा
17) व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी क़ोणती सांकेतिक भाषा वापरत होते ?
1) सामवेदी
2) नंदभाषा
3) बाणकोटी
4) चंदगडी
18) मराठी साहित्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कँडी यांनी मराठी भाषेत विरामचिन्हांचा वापर सुरु केला.
ब) ’केशवसुत’ हे या आधुनिक कवितेचे प्रवर्तक होते.
क) श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडव प्रताप ही महाकाव्ये मॉदी लिपीत लिहिली होती.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
19) तुलनात्मक भाषा विज्ञान कोश निर्मितीत कोणाचा समावेश होता ?
1) पांडुरंग दामोदर गुणे
2) उदय नारायण तिवारी
3) श्री. व्यं. केतकर
4) भोलानाथ तिवारी
20) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (बोलीभाषा) स्तंभ ब (वर्णन )
अ. तावडी I. मच्छिंद्र कांबळी यांच्या नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्धीस आली.
ब. नंदभाष़ा II. चामुलाल राठवा यांनी या बोलीभाषेत मौखिक साहित्य शब्दबद्ध केले.
क. मालवणी III. विसोबा खेचर यांनी या भाषेत शंकराची स्तुती करणार्या काव्यरचना केल्या.
ड. देहवाली IV. बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून या बोलीभाषेचा आविष्कार.
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
(1) II III I IV
(2) II I III IV
(3) III II IV I
(4) IV III I II
21) विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे ?
1) भिल्ली बोलीभाषा
2) डांगी बोलीभाषा
3) खानदेशी बोलीभाषा
4) देहवाली बोलीभाषा
22) मराठीतील शिलालेखांचा योग्य कलानुक्रम लावा.
अ) राजा केसिदेवरायाचा अक्षी शिलालेख
ब) कुडलचा शिलालेख
क) श्रवणबेळगोळ येथील शिलालेख
ड) दिवे आगार ताम्रपट
पर्यायी उत्तरे :
1) अ - ब - क - ड
2) क - अ - ड - ब
3) ब - ड - अ - क
4) अ - क - ब - ड
23) खालीलपैकी कोणी प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा वापर सर्वप्रथम केला ?
1) देवगिरीच्या यादवांच्या काळात
2) छत्रपती शिवाजी महाराजांच़ा काळ
3) पेशवे काळ
4) पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने
24) खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतातील सर्वाधिक खपाच़े मासिक ’लोकराज्य’ आहे.
ब) ’लीळाचरित्र’ हा महान ग्रंथ म्हाइंभटांनी लिहून मराठी भाषेचा पाया रोवला.
क) देशातले सर्वाधिक खपाचे तिसर्या क्रमांकाच़े वर्तमानपत्र ’लोकमत’ हे आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
25) भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, के. नारखेडे या लेखकांनी आपल्या साहित्यात बोलीच़ा वापर केला आहे.
1) खानदेशी
2) देहवाली
3) तावडी
4)अहिराणी
26) मुसलमान मराठी संतकवी मुंतोजी ब्रह्मणी यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) तो मृतुंजय या नावानेही तो प्रसिद्ध आहे.
ब) दोन हज़ार ओव्या असलेल्या त्याच्या ग्रंथातील दुसर्या प्रकरणाला ’राम-जानकी’ असे नाव आहे.
क) अखिल मराठी संत मंडळात त्याला मानाचे स्थान आहे.
ड) त्यांना महमंद बाबा म्हणून ओळखले जाते.
इ) ’सिद्धसंकेत प्रबंध’ हा त्याच़ा सर्वात मोठा ग्रंथ.
फ) नारायणपूर येथे त्याची समाधी आहे.
ग) ते नृसिंह सरस्वती, भानुदास, जनार्दन स्वामी यांचे समकालीन होते.
पर्यायी उत्तरे :
1) वरील सर्व
2) ड आणि ग वगळता सर्व
3) ब वगळता सर्व
4) ड, फ, ग वगळता सर्व
उत्तरे - प्रश्नमंजुषा : (102)
1-1
2-3
3-2
4-4
5-3
6-2
7-1
8-1
9-2
10-3
11-3
12-*
13-2
14-3
15-3
16-3
17-2
18-2
19-3
20-4
21-4
22-4
23-4
24-2
25-4
26-2