पिनपॉईंट स्ट्राईक / प्रश्नमंजुषा (26)
- 24 Nov 2020
- Posted By : Study Circle
- 120 Views
- 1 Shares
पिनपॉईंट स्ट्राईक
दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागताच पाकिस्तानकडून मोठ्या संख्येने भारतीय हद्दीमध्ये नोव्हेंबर महिन्यात दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू होते. घुसखोरीपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये हे दहशतवादी घुसखोरीच्या संधीच्या शोधात विशिष्ट ठिकाणांवर तळ ठोकून असतात. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत (एलओसी) भारतीय हद्दीतील रहिवासी भागांवर तोफगोळ्यांचा वर्षाव करुन उडालेल्या हलकल्लोळात दहशतवाद्यांना पाक हद्दीतून भारतीय हद्दीत घुसविले जाते. त्यामुळे अशी ठिकाणे हेरून घुसखोरीपूर्वीच दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी केलेल्या हल्ल्यास पिनपॉईंट स्ट्राईक म्हंटले जाते.
► पिनपॉईंट हल्ला -
1) दहशतवाद्यांच्या तळांवर सरसकट हल्ला न करता जेथे दहशतवादी घुसखोरी करण्यासाठी एकत्र येतात ते नेमके ठिकाण लक्ष्य करून हल्ला केला जातो.
2) सरसकट हल्ला केल्यास त्या गोंधळात दहशतवाद्यांना सीमापार पाठवणे सोपे जाते. म्हणून पिनपॉईंट हल्ला करून त्यांना टिपले जाते. त्यामुळे हलकल्लोळ माजत नाही.
3) पिनपॉईंट हल्ल्यावेळी लक्ष्यभेदी क्षेपणास्त्रे डागली जातात. जेणेकरून एकत्र जमलेल्या दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करता यावे.
4) रणगाडे भेदणार्या क्षेपणास्त्राांचाही वापर पिनपॉईंट हल्ल्यावेळी केला जातो.
► 26 फेब्रुवारी 2019 : एअर स्ट्राईक
14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला होता. त्यात 12 मिराज-2000 लढाऊ विमानांनी बालाकोट, चकोटी आणि मुझफ्फराबादेत बॉम्ब वर्षाव केला होता. त्या हल्ल्यात 300 हून जास्त दहशतवादी मारले गेले होते. वायुसेनेने त्याला ऑपरेशन बंदर हे नाव दिले होते.
► 29 सप्टेंबर 2016 : सर्जिकल स्ट्राईक
18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्य शिबिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. प्रत्युत्तरादाखल 29 सप्टेंबर रोजी रात्री भारतीय सैन्याने पीओकेमध्ये 3 कि.मी. आत जाऊन दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले होते. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये 40 ते 50 दहशतवादी मारले गेले होते. पीओकेत घुसून दहशतवाद्यांना ठार केल्याची भारताकडून ही पहिलीच कारवाई होती.
प्रश्नमंजुषा (26)
1) भारताने पीओकेत घुसून दहशतवाद्यांना ठार केल्याची पहिली कारवाई कोणती ?
1) एअर स्ट्राईक
2) सर्जिकल स्ट्राईक
3) पिनपॉईंट स्ट्राईक
4) क्लिनिकल स्ट्राईक
2) ऑपरेशन बंदर संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला एअर स्ट्राईक.
ब) बाालाकोट, चकोटी आणि मुझफ्फराबादेत बॉम्ब वर्षाव
क) 12 मिराज-2000 लढाऊ विमानांचा सहभाग
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
3) भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरात एअर स्ट्राईक कधी केला होता ?
a) पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर
b) उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्य शिबिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
4) पिनपॉईंट स्ट्राईक बाबत चुकीचे विधान शोधा.
1) पिनपॉईंट हल्ल्यावेळी लक्ष्यभेदी क्षेपणास्त्रे डागली जातात.
2) दहशतवादी घुसखोरी करण्यासाठी एकत्र येतात ते नेमके ठिकाण लक्ष्य करून हल्ला केला जातो.
3) पिनपॉईंट हल्ल्यात ड्रोनचा वापर करून घुसखोरांना टिपले जाते.
4) रणगाडे भेदणार्या क्षेपणास्त्राांचा वापर पिनपॉईंट हल्ल्यावेळी केला जातो.
5) भारताने पाकव्याप्त काश्मीरात सर्जिकल स्ट्राईक कधी केला होता ?
1) पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल
2) उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्य शिबिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर
3) वरील दोन्ही
4) यापैकी नाही.
उत्तरे : प्रश्नमंजुषा (26)
1-2
2-4
3-1
4-4
5-2