अंतराळातील स्पर्धा / प्रश्नमंजुषा (153)
- 18 May 2021
- Posted By : study circle
- 189 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा (153)
1) चीनचा जुराँग हा सहा चाकी रोव्हर मंगळ ग्रहाच्या कोणत्या भागावर यशस्वीरीत्या उतरला ?
1) दक्षिण गोलार्धातल्या युटोपिया प्लॅनेशिया पठारावर
2) उत्तर गोलार्धातल्या युटोपिया प्लॅनेशिया पठारावर
3) पूर्व गोलार्धातल्या युटोपिया प्लॅनेशिया पठारावर
4) पश्चिम गोलार्धातल्या युटोपिया प्लॅनेशिया पठारावर
2) डिस्कव्हरी, एंडेव्हर व अॅटलांटिससारखी अंतराळयाने कोणत्या संस्थेची होती?
1) ग्लोव्हकॉसमॉस, रशिया
2) युरोपिअयन स्पेस एजन्सी
3) ‘नासा’ अमेरिका
4) ’जॅक्सा’ जपान
3) अंतराळ कंपन्या बाबत खालील जोड्या अचूक जुळवा :
गट-अ (कंपनी) गट-ब (संस्थापक)
a) ब्लू ओरिजिन (i) एलन मस्क
b) सिएरा नेवाडा कॉर्पोरेशन (ii) व्हर्जिन गॅलेक्टिक
c) टेस्ला (iii) जेफ बेजोस
d) सर रिचर्ड ब्रान्सन (iv) जॉन सिशोल्म
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (i) (ii) (iii) (iv)
2) (iv) (i) (ii) (iii)
3) (iii) (iv) (i) (ii)
4) (iii) (iv) (i) (ii)
4) ‘अपोलो’ मोहिमांनंतर ‘नासा’ने 2024 च्या चांद्रमोहिमेत आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याचे कंत्राट कोणत्या कंपनीला दिले ?
1) ब्लू ओरिजिन
2) डायनेटिक्स
3) स्पेस एक्स
4) नॉर्थरॉप ग्रुमन इनोव्हेशन सिस्टीम्स
5) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे खासगी क्षेत्रातील पहिले अवकाश यान कोणते ?
1) ’व्हर्जिन गॅलेक्टिक ’ चे ‘सोयूझ’
2) ‘स्पेस एक्स’चे ‘फाल्कन 9’
3) ‘स्पेस एक्स’चे ‘ड्रॅगन’
4) ‘ब्लू ओरिजिन’ चे‘ड्रोन शिप्स’
6) 2021 च्या फेब्रुवारी महिन्यात चीनचा जुराँग रोव्हर मंगळाच्या कक्षेत कोणत्या अवकाशयानाच्या सहाय्याने पोहोचला होता ?
1) स्पेस एक्स
2) सोयुझ
3) तियानवेन-1 ऑर्बिटर
4) यापैकी नाही
7) जगाला अधिक वेगवान आणि स्वस्त इंटरनेट देण्यासाठी ‘स्टारलिंक’ ही योजना सुरू केलेली आहे ?
1) ब्लू ओरिजिन
2) डायनेटिक्स
3) स्पेस एक्स
4) व्हर्जिन गॅलेक्टिक
8) अधिक वेगवान इंटरनेट सुविधेसाठी क्युपर सॅटेलाईटसची योजना कोणी आखलेली आहे ?
1) ब्लू ओरिजिन
2) डायनेटिक्स
3) स्पेस एक्स
4) व्हर्जिन गॅलेक्टिक
9) पुनर्वापर करता येणारे किंवा उभ्या स्थितीत जमिनीवर उतरणारे रॉकेट कोणी विकसित केलेले आहे ?
1) नासा
2) व्हर्जिन गॅलेक्टिक
3) स्पेस एक्स
4) 1 आणि 3
10) मंगळावर यशस्वीपणे रोव्हर उतरवणारा अमेरिकेनंतरचा जगातील दुसरा देश कोणता ?
1) जपान
2) रशिया
3) भारत
4) चीन
उत्तरे : प्रश्नमंजुषा (153)
1-2
2-3
3-4
4-3
5-3
6-3
7-3
8-1
9-3
10-4