हाफकिन इन्स्टिट्यूट / प्रश्नमंजुषा (150)
- 18 May 2021
- Posted By : study circle
- 184 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा (150)
1) कोणत्या संशोधकाने 1893 मध्ये कोलकात्यात डॉ. लुई पाश्चर यांच्या सहकार्याने कॉलराची लस तयार केली होती?
1) रोनाल्ड रॉस
2) लुई पाश्चर
3) डॉ. वाल्देमार हाफकिन
4) कार्ल लँडस्टीनर
2) डॉ. वाल्देमार हाफकिन यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) त्यांनी प्लेगविरोधी लस तयार केली.
ब) त्यांच्या प्रयत्नामुळे लोकांच्या मनात लसीविषयी विश्वास वाढावा म्हणून दादभाई नौरोजी यांनी सार्वजनीकरीत्या प्लेगची लस टोचून घेतली होती.
क) इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाने त्यांना ‘कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर’ हा पुरस्कार दिला होता.
ड) ते मूळचे ब्रिटिश ज्यू नागरिक होते.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
3) सध्या हाफकीन संस्था कोणाच्या अखत्यारित कार्यरत आहे ?
1) अन्न व औषध प्रशासन, दिल्ली
2) भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद
3) महाराष्ट्र राज्य सरकार
4) आयसीएमआर
4) खालील विधाने विचारात घ्या :
a) 2016 साली डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आयसीटी मुंबई संस्थेला ऊर्जितावस्था यावी यासाठी पथदर्शी प्रस्ताव सादर केला होता.
b) हाफकीन संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ ’ हा शासकीय उपक्रम
सुरु झाला.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
5) डॉ. हाफकिन यांनी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमधील फ्रेमजी दिनशॉ पेटिट प्रयोगशाळेत संशोधन सुरु केले त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर कोण होते ?
1) लॉर्ड एलफिन्स्टन
2) लॉर्ड विलिंग्डन
3) लॉर्ड सँडहर्स्ट
4) जेम्स फर्ग्युसन
6) हाफकीन संस्थेने केलेल्या संशोधनाबाबत खालील जोड्या अचूक जुळवा ः
स्तंभ अ (संशोधन) स्तंभ ब (वर्ष)
अ) सर्पदंश व विंचूदंशावरील उपाय I) 1920
ब) स्थानिक औषधी वनस्पतींवर संशोधन II) 1924
क) ‘बर्ड फ्लू’ व ‘स्वाईन फ्लू’ वर संशोधन III) 1998
ड) देशातील पहिले सर्पालय IV) 1938
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) I III IV II
2) I II III IV
3) I II IV III
4) IV III I II
7) हाफकीन संस्थेने निर्माण केलेल्या लशींचा योग्य कालक्रम लावा.
अ) एन्फ्ल्युएन्झाविरोधी लस
ब) प्लेगविरोधी लस
क) तोंडावाटे देण्यात येणारी पोलिओ लस
ड) विषमज्वरविरोधी लस
पर्यायी उत्तरे :
1) अ - ब - क - ड
2) क - अ - ड - ब
3) ब - ड - अ - क
4) ब - अ - ड - क
8) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : कोरोना लस उत्पादन आणि हाफकिन संस्थेचा थेट संबंध नाही.
कारण (र) : हाफकिनमध्ये बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशनद्वारे कोरोना लस उत्पादन केले जाते.
पर्यायी उत्तरे :
1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
9) ‘हाफकिन’ संस्थेत खालीलपैकी कोणत्या रोगावर संशोधन झालेले आहे?
a) रेबीज
b) हिवताप
c) घटसर्प
d) कॉलरा
e) प्लेग
f) विषमज्वर
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c), (d)
2) (b), (c), (e)
3) (a), (b), (c), (e) (f)
4) (a), (c), (d), (e)
10) हाफकिन संस्थेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) अन्नधान्य, दूध तूप आदींचे पोषणमूल्य व शुद्धता तपासण्याचे काम संस्थेने केले आहे.
ब) संस्थेने लष्करासाठी ग्लुकोज सलाईन, मॉर्फिन, पेनिसिलीन, आदींचे उत्पादन केले.
क) संस्थेने प्लेग, कॉलरा, रेबीज, गॅस-गँगरीन, घटसर्प यावर प्रतिबंधक लसींची निर्मिती केली.
ड) संस्थेने जंतुनाशक मलमपट्टी, भूल देणारे औषध, डास मारण्याचा फवारा यांचे उत्पादन केले.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) अ, ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
उत्तरे : प्रश्नमंजुषा 150
1-3
2-4
3-3
4-2
5-3
6-2
7-3
8-1
9-3
10-2