हिमंता बिस्वा सरमा / प्रश्नमंजुषा (149)
- 18 May 2021
- Posted By : study circle
- 112 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा (149)
1) ईशान्य भारतातील 8 राज्ये भाजप किंवा भाजप आघाडीच्या ताब्यात (2021) येण्याच्या रणनीतीचे सूत्रधार कोणास मानले जाते ?
1) आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल
2) केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू
3) आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा
4) आसामी अस्मितेचे राजकारण करणारे भृगूकुमार फुकन
2) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (राज्य) स्तंभ ब (मुख्यमंत्री)
अ) आसाम I) पी. विजयन
ब) तामीळनाडू II) एन. रंगास्वामी
क) केरळ III) एम. के. स्टॅलीन
ड) पुड्डुचेरी IV) हिमंता बिस्वा सरमा
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III I IV
2) II I III IV
3) III II IV I
4) IV III I II
3) आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) 2000 पासून ते ‘आसाम क्रिकेट मंडळा’चे ते अध्यक्ष आहेत.
ब) ते आसाम विधानसभेत जालूकबारी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
क) 2019 मध्ये भाजपमध्ये त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.
ड) ते ‘आसू’ या विद्यार्थी संघटनेचे सदस्य होते.
इ) 2012 पासून ते आसाम बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
फ) ते ‘ईशान्य लोकशाही आघाडी’ (नेडा) या भाजप व मित्रपक्षांच्या आघाडीचे संयोजक आहेत.
ग) त्यांच्या रणनीतीमुळे मणिपूरमध्ये सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या असतानाही त्यांना सरकार स्थापन करता आले नाही.
पर्यायी उत्तरे :
1) वरील सर्व
2) ड आणि फ वगळता सर्व
3) अ, क आणि इ वगळता सर्व
4) ड, फ, ग वगळता सर्व
4) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (राज्य) स्तंभ ब (मुख्यमंत्री)
अ) हरियाणा I) मनोहरलाल खट्टर
ब) गुजरात II) ममता बॅनर्जी
क) प. बंगाल III) विजय रूपानी
ड) छत्तीसगड IV) भूपेश बाघेल
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) I III II IV
2) II I III IV
3) III II IV I
4) IV III I II
5) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
1) आसामी अस्मितेचे राजकारण हे हिंदी भाषिक हिंदू तसेच बंगाली भाषिक मुस्लिमविरोधी आहे.
2) आसामी अस्मितेचे राजकारण हे बंगाली भाषिक हिंदू तसेच मुस्लिमविरोधी आहे.
3) आसामी अस्मितेचे राजकारण हे नागा आदिवासी तसेच बांगला देशी मुस्लिमविरोधी आहे.
4) आसामी अस्मितेचे राजकारण हे चकमा हिंदू तसेच बांगला देशी मुस्लिमविरोधी आहे.
6) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (राज्य) स्तंभ ब (राज्यपाल)
अ) आसाम I) जगदीश मुखी
ब) तामीळनाडू II) बनवरीलाल पुरोहित
क) केरळ III) आरिफ मोहंमद खान
ड) पुड्डुचेरी IV) तामीळसाई सौंदराराजन
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) I II IV III
2) I II III IV
3) III II IV I
4) IV III I II
उत्तरे : प्रश्नमंजुषा 149
1-3
2-4
3-3
4-1
5-2
6-2