महात्मा बसवेश्वर / प्रश्नमंजुषा (148)
- 18 May 2021
- Posted By : study circle
- 393 Views
- 1 Shares
प्रश्नमंजुषा (148)
1) ”महात्मा बसवेश्वर हे आजच्या आधुनिक विचारवंतांपेक्षाही अधिक आधुनिक होते.” असे उदगार कोणी काढला होता ?
1) भारतीय ज्ञानपीठ सन्मानित डॉ. द. रा. बेंद्रे
2) कर्नाटकरत्न पाटील पुट्टट्टापा
3) भारतीय ज्ञानपीठ सन्मानित डॉ. व्ही. के गोकाक
4) कर्नाटकसिंह गंगाधर देशपांडे
2) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) महात्मा बसवेश्वर यांनी वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन केले.
ब) यांनी निर्गुण व निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
3) दरवर्षी बसवजयंती कधी साजरी केली जाते ?
1) वैशाखातील अक्षय्य तृतीयेला
2) 14 मे
3) श्रावण शुद्ध पंचमी
4) वरील सर्व
4) संत महात्मा बसवेश्वर यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) त्यांचे मामा बलदेव हे बसवकल्याणचे कोषाधिकारी होते.
ब) त्यांचे वडील मादीराज ऊर्फ मादरस हे बागेवाडी अग्रहराचे प्रमुख होते.
क) त्यांची बहिण अक्कनागम्मा त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात सक्रिय होत्या.
ड) त्यांची आई मादंबा बागेवाडीच्या नंदीश्वर या ग्रामदेवतेची परमभक्त होती.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
5) ”कूडलसंगम” या विद्याक्षेत्र कोणत्या नद्यांच्या संगमावर आहे ?
1) कृष्णा व घटप्रभा
2) कृष्णा व तुंगभद्रा
3) कृष्णा व मलप्रभा
4) कृष्णा व पंचगंगा
6) महात्मा बसवेश्वरांनी कन्नडमध्ये कोणते ग्रंथ लिहिले ?
अ) मंत्रगौप्य
ब) शिखारत्नवचन
क) पट्स्थलवचन
ड) कालज्ञान
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब, क आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
7) अनुभव मंटपात परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, ती कन्नड साहित्यामध्ये कोणत्या रूपाने प्रसिद्ध झाली?
1) बसवपुराण
2) वचनसाहित्य
3) शिखारत्नवचन
4) वचनपुराण
8) योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा :
स्तंभ-I (स्थळ) स्तंभ-II (महत्त्व)
a) बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण (i) बसवेश्वरांची ’कर्मभूमी’
b) बागलकोट जिल्ह्यातील कुडलसंगम (ii) बसवेश्वरांची ’जन्मभूमी’
c) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा (iii) बसवेश्वरांची ’ऐक्यभूमी’
d) विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (i) (ii) (iii) (i)
2) (iv) (i) (ii) (iii)
3) (i) (iii) (i) (ii)
4) (ii) (i) (ii) (iii)
9) महात्मा बसवेश्वरांच्या ”कायकवे कैलास ” सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
1) श्रमप्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी.
2) शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे.
3) मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिव उपासना
4) 1 आणि 2 बरोबर
10) लिंगायत धर्म चळवळी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातून लिंगायत धर्माची स्थापना केली.
ब) बसवेश्वरांनी लिंगायत धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळ व बसवकल्याणचा दौरा केला होता.
क) 2020 साली कर्नाटक विधानसभेने लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा ठराव पारित केलेला आहे.
ड) शरण चळवळीतून लिंगायत धर्म विकसित झाला.
पर्यायी उत्तरे :
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने ब, क आणि ड बरोबर
3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
4) विधाने अ, क आणि ड बरोबर
11) ”आपण कमावलेले धन केवळ स्वतःपुरते न वापरता त्याचा समाजासाठी उपयोग करण्याची संकल्पना” बसवेश्वरांनी त्यांच्या कोणत्या सिद्धांताद्वारे मांडली?
1) कायकवे कैलास सिद्धांत
2) लिंगायत धर्माचा सिद्धांत
3) शरण व्रत सिद्धांत
4) दासोह सिद्धांत
12) खालील विधाने विचारात घ्या :
अ) बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक, समतेचे प्रणेते म्हणून महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते.
ब) बसवेश्वरांनी मंगळवेढ्याच्या बिज्जल राजाकडे कारकूनाच्या नोकरीपासून सुरूवात केली होती.
क) ”वर्क इज वर्शिप” ही बसवेश्वरांची शिकवणूक ते प्रशासक असताना विकसित झाली.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
13) बसवेश्वरांनी लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची’ स्थापना कोठे केली. ?
1) मंगळवेढा
2) बसवकल्याण
3) इंगळेश्वर बागेवाडी
4) कुडलसंगम
14) लिंगायत धर्माबाबत खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ स्तंभ ब
अ) धर्मसंस्कार I) इष्टलिंग दीक्षा
ब) धर्मतत्व II) अष्टावरण, पंचाचार, षटस्थल.
क) धर्मचिन्ह III) समतेचे प्रतिक असणारे इष्टलिंग
ड) धर्माचा ध्वज IV) इष्टलिंग असणारे षटस्थल
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) I II III IV
2) II IV III I
3) III II IV I
4) I III II IV
15) संस्कृतमध्ये बसवपुराण नवाचा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
1) पुरंदर दास
2) कांचीचे शंकराराध्य
3) माध्वाचार्य
4) संत चांगदेव
उत्तरे : प्रश्नमंजुषा (148)
1-3
2-3
3-1
4-2
5-3
6-1
7-2
8-3
9-3
10-4
11-4
12-2
13-2
14-1
15-2