छत्रपती संभाजी महाराज / प्रश्नमंजुषा (132)
- 16 May 2021
- Posted By : study circle
- 730 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा (132)
1) 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
1) किल्ले पुरंदर
2) किल्ले राजगड
3) किल्ले पुरंदर
4) किल्ले सज्ज्नगड
2) संभाजीराजांचे धैर्य, निर्भीडपणा, बाणेदारणा, स्वाभिमान, हजर जबाबीपणा, चातुर्य, सौजन्यशीलता, समयसूचकता याचे वर्णन कोणत्या समकालीन समकालीन इतिहासकाराने केलेेले आहे :
1) फ्रेंच लेखक अॅबे कॅरे
2) सर थॉमस रो
3) निकोलाओ मनुची
4) मोगलांचा इतिहासकार खाफीखान
3) संभाजीराजांनी कोणते ग्रंथ लिहिले ?
अ) सातसतक
ब) नायिकाभ दे
क) बुधभूषण
ड) नखशि
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) वरील सर्व
4) 1672 मध्ये पेशवा मोरोपंत पिंगळे यांच्यासोबत छत्रपती संभाजी यांनी कोणत्या युद्धात पहिल्यांदाच मराठा सेनेचे नेतृत्व केले होते ?
1) बुहाणपूर
2) संगमेश्वर
3) कोलवान
4) शृंगारपूर
5) संभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ संदर्भात खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (प्रधान) स्तंभ ब (सरदार)
अ. सरसेनापती I. निळो मोरेश्र्वर पिंगळे
ब. मुख्य न्यायाधीश II. प्रल्हाद निराजी
क. डबीर (सुमंत) III. हंबीरराव मोहिते
ड. पेशवे IV. जनार्दन पंत
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III I IV
2) II I III IV
3) III II IV I
4) IV III I II
6) संभाजी महाराजांचा मराठ्यांच्या संभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळातील कोणाच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता ?
अ) हिरोजी फर्जंद
ब) अमात्य अण्णाजी दत्तो
क) शामजी नाईक
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त ब
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
7) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (लेखक ) स्तंभ ब (ग्रंथ)
अ) गागाभट्ट I. समयनय
ब) केशव पंडित II. धर्म कल्पलता
क) छत्रपती संभाजीराजे III. सातसतक
ड) दासबोध IV. संत रामदास
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III I IV
2) II I III IV
3) I II III IV
4) II II I IV
8) कोणत्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज व हेन्री ग्यारी यांच्यात झालेल्या तहातील एक कलम आहे, 'That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians' ?
1) 1681
2) 1684
3) 1686
4) 1688
9) संभाजी राजांचा रायगड येथे कधी विधिवत राज्याभिषेक झाला ?
1) 18 जून 1680
2) 21 एप्रिल 1680
3) 13 नोव्हेंबर 1681
4) 16 जानेवारी 1681
10) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : मोगलांचा दरबारी इतिहासकार खाफीखान यांने लिहिले आहे की संभाजी राजे हे मोगलांसाठी वडिलांपेक्षा (शिवरायांपेक्षा) दहा पटीने तापदायक होते.
कारण (र) : छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या सुमारे 9 वर्षाच्या अल्प राजवटीत मोगलांना सळो की पळो करून सोडले होते
पर्यायी उत्तरे :
1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
11) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) केशवभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजेंना उत्तम शिक्षण दिले.
ब) 1664 च्या पुरंदर तहात शिवरायांनी संभाजीराजांच्या नावाने मोगलांची मनसब स्वीकारली.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
उत्तरे : प्रश्नमंजुषा (132)
1-3
2-3
3-4
4-3
5-3
6-1
7-3
8-2
9-4
10-1
11-3