जागतिक परिचारिका दिन / प्रश्‍नमंजुषा (128)

  • जागतिक परिचारिका दिन / प्रश्‍नमंजुषा (128)

    जागतिक परिचारिका दिन / प्रश्‍नमंजुषा (128)

    • 13 May 2021
    • Posted By : study circle
    • 496 Views
    • 2 Shares

    प्रश्‍नमंजुषा (128)

    1) 1885 मध्ये ब्रिटिश काळात भारतात स्थापन झालेल्या कोणत्या उपक्रमाच्या मदतीने अनेक नर्सिंग रुग्णालये उघडली गेली होती ?
    1) लेडी डफरिन फंडाद्वारे
    2) क्वीन एलिझाबेथ फंडाद्वारे 
    3) लेडी वेडरबर्न फंडाद्वारे
    4) क्वीन व्हिक्टोरिया फंडाद्वारे 
     
    2) ‘जागतिक परिचारिका दिन’ कधी साजरा केला जातो ?
    1) 7 एप्रिल 
    2) 8 मे
    3) 12 मे
    4) 6 मे
     
    3) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) फ्लॉरेन्स नाइटिंगेल या अग्रगण्य परिचारिका, लेखक आणि संख्याशास्त्रज्ञ होत्या. 
    ब) त्यांच्या सन्मानप्रीत्यर्थ 12 मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    4) 2021 च्या नर्सेस डे ची थीम कोणती आहे ?
    1)  नर्सेस : व्हॉईस टू लीड - ए व्हिजन फॉर फ्युचर हेल्थकेअर.
    2)  नर्सेस : व्हॉईस टू लीड - हेल्थ इज ह्यूमन राइट
    3)  नर्सेस : व्हॉईस टू लीड -  अचिव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स
    4)   नर्सेस : व्हॉईस टू लीड - ए व्हिजन फॉर फ्युचर हेल्थकेअर.
     
    5) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना मिळालेल्या बहुमाना संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) ऑर्डर ऑफ मेरीट (1907) 
    ब)  लेडी विथ द लॅम्प (1854)
    क) ऑर्डर ऑफ ब्रिटिश क्राऊन (1899)
    ड) रॉयल रेड क्रॉस (1883)
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ आणि ड बरोबर
    4) अ, क आणि ड बरोबर
     
    6) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
    1) जागतिक आरोग्य संघटनेनुसार, एक हजार व्यक्तींमध्ये तीन परिचारिका असणे अपेक्षित आहे.
    2) भारतामध्ये एक हजार व्यक्तींमागे परिचारिका प्रमाण 1.7 इतके आहे. 
    3) महाराष्ट्रात सुमारे 2.50 लाखांहून अधिक परिचारिका कार्यरत आहेत. 
    4) 1944 मध्ये भारतातील पहिले नर्सिंग स्कूल मुंबई येथे सुरु झाले. 
     
    7) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी कोणत्या ग्रंथांचे लेखन केले ?
    अ) एफिशियन्सी अँड हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ द ब्रिटिश आर्मी 
    ब)  नोट्स ऑन पब्लिक हेल्थ 
    क) नोट्स ऑन नर्सिंग
    ड) नोट्स ऑन मॅटर्स फेक्टिंग द हेल्थ
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    8) जगभर नर्सिंग आठवडा कधी साजरा केला जातो ?
    1) 1 ते 7 एप्रिल  दरम्यान
    2) 31 जानेवारी  ते 6 फेब्रुवारी दरम्यान
    3) 6  ते 12 मे  दरम्यान
    4) 6 ते 12 जून दरम्यान
     
    9) लष्करी रुग्णालयातील दरमहा मृत्यूंची संख्या आणि कारणे यांचे सादरीकरण करण्यासाठी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी कोणत्या आकृतींचा वापर केला होता ?
    अ) नाइटिंगेल रोझ प्लॉट 
    ब) ध्रुवीय क्षेत्र आकृती
    क) विल्यम फेफेअर यांनी विकसित केलेली पाय आकृती 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ 
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    10) जागतिक आरोग्य संघटनेने पारिचारिका व मिडवाईफ इयर म्हणून साजरे केले ?
    1) 2011
    2) 2021 
    3) 2015
    4) 2020
     
    11) खालील जोड्या अचूक जुळवा :
                स्तंभ अ (नर्सिंग स्कूल)                                             स्तंभ ब (स्थळ)
    अ.    भारतातील पहिले नर्सिंग स्कूल                                         I)    मुंबई
    ब.    1960 मध्ये स्थापन झालेले नर्सिंग स्कूल                           II)    मद्रास 
    क.    नाइटिंगेल स्कूल फॉर नर्सेस                                            III)   कैसर्सव्हर्ट 
    ड.     फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी शिक्षन घेतलेले नर्सिंग स्कूल        IV)  लंडन
    पर्यायी उत्तरे :
    1) II I IV III
    2) II I III IV
    3) III II IV I
    4) IV III I II
     
    12) ”जागतिक विद्यार्थी परिचारिका दिवस ” साजरा केला जातो ?
    1) 7 एप्रिल 
    2) 8 मे
    3) 12 मे
    4) 6 मे
     
    13) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) 1910 च्या सुमारास त्यांना अंधत्व आले. 
    ब) 1863 मध्ये भारतातील लष्कराच्या आरोग्यव्यवस्थेची चौकशी करणार्‍या समितीचा अहवाल त्यांना सादर करण्यात आला.
    क) रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी ‘लेडी विथ द लॅम्प’ ही उपाधी दिली.
    ड) त्यांना आधुनिक शुश्रूषाशास्त्राची मुहूर्तमेढ रचण्याचे श्रेय दिले जाते. 
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    14) वैद्यकीय शुश्रूषा व सार्वजनिक आरोग्यसेवा यांतील सुधारणेसाठी संख्याशास्त्रीय विश्लेषण करताना फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी संख्याशास्त्रज्ञ आणि सामाजिक संख्याशास्त्राचे संस्थापक अ‍ॅडॉल्फ क्विलेट यांच्या कल्पना स्वीकारल्या, ते क्विलेट कोणत्या देशाचे होते ?
    1) जर्मनी
    2) इटली
    3) बेल्जियम
    4) भारत
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (128)
    1-1
     
    2-3
     
    3-3
     
    4-4
     
    5-3
     
    6-4
     
    7-4
     
    8-3
     
    9-2
     
    10-4
     
    11-1
     
    12-2
     
    13-2
     
    14-3
     

     

Share this story

Total Shares : 2 Total Views : 496