जागतिक आरोग्य संघटना / प्रश्नमंजुषा (122)
- 10 Apr 2021
- Posted By : Study Circle
- 3368 Views
- 2 Shares
प्रश्नमंजुषा (122)
1) जागतिक आरोग्य संघटनेचे आजपर्यंत साध्य केलेले सर्वात मोठे विकास काम म्हणजे -
a) जागतिक भागीदारीसाठी व्यासपीठ पुरविणे.
b) सुधारीत आरोग्य सुविधांची उपलब्धी आणि लाभ.
c) प्रासंगिक विषय आणि तंबाखू नियंत्रणासाठी ठराव.
d) सर्वांसाठी आरोग्य
वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/त?
1) (a) आणि (d) फक्त
2) (c) फक्त
3) (b) आणि (a) फक्त
4) (d) फक्त
2) जागतिक आरोग्य संघटनेचे कामकाज खालीलपैकी कोणत्या भाषेत चालत नाही?
1) अरबी, चिनी,
2) जपानी, हिंदी
3) इंग्लिश, फ्रेंच
4) रशियन, स्पॅनिश
3) जागतिक आरोग्य संघटनेच्या अल्माआटा येथील घोषणेने आरोग्याकडे पाहण्याचा कोणता नवीन दृष्टिकोन दिला?
a) नवीन सार्वत्रिकवाद
b) जागतिक सार्वत्रिकवाद
c) वैश्विक सार्वत्रिकवाद
d) भावी सार्वत्रिकवाद
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहेत?
1) (a),(c) आणि (d) फक्त
2) (b) आणि (c)
3) (a) फक्त
4) (b) फक्त
4) जागतिक आरोग्य संघटनेचे ध्येय वाक्य -
1) सर्व लोकांनी आरोग्याची सर्वोच्च पातळी प्राप्त करणे
2) आरोग्य हीच संपत्ती
3) आरोग्य सर्वात महत्त्वाची बाब
4) लोकांचे आरोग्य लोकांच्या हातात
5) जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयाबाबत खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (प्रदेश ) स्तंभ ब (मुख्य कार्यालय )
अ. आग्नेय आशिया I. कोपनहेगन, डेन्मार्क
ब. पश्चिम पॅसिफिक सागरीय II. मनिला, फिलिपीन्स
क. भूमध्य समुद्र-पूर्वभाग III. नवी दिल्ली
ड. यूरोप IV. अॅपलेक्झांड्रिया, इजिप्त
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III IV I
2) II I III IV
3) III II IV I
4) IV III I II
6) खालील विधानांपैकी कोणते विधान टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांच्या संदर्भात बरोबर नाही ?
1) डब्ल्यूएचओचे संचालकपद भूषवणारे पहिले आफ्रिकन आहेत.
2) ते इथियोपियाचे आरोग्यमंत्री आणि परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत होते.
3) त्यांचा कार्यकाळ 2017 पासून 2022 पर्यंत 5 वर्षांसाठी आहे.
4) ते जागतिक 5 वर्षासाठी आरोग्य सभेचे प्रमुख आहेत.
7) जागतिक आरोग्य संघटनेच्या आदेशानुसार भारतात इ. स.1978 साली कोणता आरोग्यविषयक कार्यक्रम सुरू झाला?
a) एड्स निर्मूलन कार्यक्रम
b) क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम
c) कंठग्रंथी सूज नियंत्रण कार्यक्रम
d) प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a)
2) फक्त (d)
3) (a),(c)
4) (c), (d)
8) .जागतिक आरोग्य संघटनेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
1) स्थापना : 7 एप्रिल 1948
2) मुख्यालय : जिनिव्हा, स्वित्झर्लंड
3) सदस्य राष्ट्रे : 194
4) आशियान गटासाठी विभागीय कार्यालय : सिंगापूर
9) जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) 1951 मध्ये कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट केवळ जन्मनियंत्रण नव्हे तर :
a) नको असलेले जन्म टाळणे आणि हवे असलेले जन्म होऊ देणे.
b) दोन गरोदरपणातील अंतरावर नियंत्रण ठेवणे.
c) आई वडिलांचे वय, मुलांचे जन्म यात योग्य संबंध राखणे.
d) कुटुंबातील मुलांची संख्या निश्चित करणे हे होते.
e) लैंगिक शिक्षण प्रदान करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
1) फक्त (a) आणि (b)
2) फक्त (a) आणि (c)
3) (a), (b), (c) आणि (d)
4) वरील सर्व बरोबर आहेत
10) जगभरात 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो. या दिवसासाठी एक खास थीम निवडली जाते. 2021 मध्ये कोणती थीम डब्ल्यूएचओने निवडली ?
1) सुंदर, निरोगी जगाची निर्मिती
2) करोनामुक्त जगासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य
3) तंदुरुस्त व निरोगी जगाची निर्मिती
4) टूव्रर्डस फिटनेस व्हाया वेलनेस
11) जगातील सर्व लोकांच्या आरोग्याचे सर्वोच्च पातळीवर रक्षण करण्यासाठी इ.स. 1948 ला कोणती संघटना स्थापन झाली?
a) स्वीडन आंतरराष्ट्रीय विकास संस्था
b) अमेरिकन आंतरराष्ट्रीय बालक संकट निधी
c) जागतिक आरोग्य संघटना
d) जागतिक आरोग्य जपवणूक संघटना
वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे/आहेत?
1) फक्त (a)
2) (a) आणि (c)
3) (b), (b) आणि (d)
4) वरीलपैकी नाही
12) जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी झाली ?
1) 7 एप्रिल 1946
2) 7 जुलै 1946
3) 24 जुलै 1948
4) 7 एप्रिल 1948
13) इ.स. 1978 मध्ये रशियातील आल्मा आटा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक पातळीवर ’सर्वांसाठी आरोग्य’ या संकल्पनेला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान मांडले?
a) लोकांचे आरोग्य लोकांच्या हातात
b) सर्वांसाठी आरोग्य
c) आरोग्य एक मूलभूत अधिकार
d) आरोग्य हा वैयक्तिक अधिकार
वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत?
1) फक्त (a)
2) (a) आणि (b)
3) (a), (b) आणि (c)
4) फक्त (d)
14) 23 जून 1851 रोजी आरोग्यविषयक पहिले जागतिक आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलन ( इंटरनॅशनल सॅनिटरी कॉन्फरन्स) कोठे आयोजित करण्यात आले होते ?
1) जिनिव्हा
2) लंडन
3) पॅरिस
4) न्यूयॉर्क
15) जागतिक आरोग्य संघटनेबाबत खालील विधाने लक्षात घ्या.
अ) जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 1949 मध्ये झाली.
ब) जागतिक आरोग्य संघटनेची सभा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात पार पडते.
क) जागतिक आरोग्य संघटनेला अर्थपुतवठा अंतरराष्ट्रीय नाणेनिधी करते
पर्यायी उत्तरे :
1) विधान अ बरोबर आहे व विधान ब व क चूक आहे.
2) विधान ब बरोबर आहे व विधान अ व क चूक आहे.
3) विधान अ व क बरोबर आहे व विधान ब चूक आहे.
4) सर्व विधाने चूक आहेत.
16) जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘आरोग्या’च्या व्याख्येमागे खालीलपैकी कशाचा अंतर्भाव नाही ?
अ) शारीरिक सुस्थिती
ब) गरिबी
क) रोगाचा अभाव
ड) निरक्षरता
इ) सामाजिक सुस्थिती
फ) मागासलेपणा
योग्य पर्याय निवडा :
1) अ, ब आणि क
2) अ, क आणि इ
3) ब, ड आणि फ
4) ब, ड आणि इ
17) 19 व्या शतकाच्या शेवटी 20 व्या शतकाच्या सुरुवातीस जगापुढील महत्त्वाची आरोग्यसमस्या या रोगराईसंबंधी होती?
1) प्लेग, मलेरिया, क्षयरोग
2) कॉलरा, प्लेग आणि यलो फिव्हर
3) क्षयरोअ, कुष्ठरोग, देवी
4) मलेरिया, यलो फिव्हर, प्लेग
18) युनिसेफ, अन्न व शेती संघटना (FAO) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या मदतीने ग्रामीण भागासाठी ....... कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
अ) पौष्टिक आहार
ब) कुटुंब कल्याण
क) बालसंगोपन केंद्राची स्थापना
ड) आरोग्य व स्वच्छता जागृती
1) अ फक्त
2) ब फक्त
3) अ, ब आणि क
4) अ, ब, क आणि ड
19) एच.आय.व्ही./एडस् वरील युनायटेड नेशन्सच्या कार्यक्रमात एका बच्चनची आंतरराष्ट्रीय सद्भावना प्रतिनिधी (इंटरनॅशनल गुडविल अम्बॅसॅडर) म्हणून निवड केली होती. हे/या बच्चन कोण?
1) अमिताभ बच्चन
2) जया बच्चन
3) अभिषेक बच्चन
4) ऐश्वर्या बच्चन
20) पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणत्या संघटनेचे वर्णन केलेले आहे ?
a) ही संघटना भूतपूर्व राष्ट्रसंघाच्या आरोग्य यंत्रणेचे कार्य पुढे चालवीत आहे.
b) पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालयाचे कार्य ती पुढे चालवीत आहे.
c) तिचे पहिले महासंचालक जी. ब्रॉक चिशोलम
d) तिच्या निर्मितीस चीनच्या प्रतिनिधी स्झमिंग स्झे यांचा पुढाकार कारणीभूत ठरला.
पर्यायी उत्तरे :
1) डब्ल्यूएचओ
2) युनिसेफ
3) युनेस्को
4) एफएओ
21) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) 1973 मध्ये उ. कोरियाला जागतिक आरोग्य संघटनेचे सभासदत्व देण्यात आले.
ब) तैवानला जागतिक आरोग्य संघटनेचे सभासदत्व देण्यात आलेले नाही
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
22) खालीलपैकी कोणता मुद्दा जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या सार्वत्रिक आरोग्य व्यापक कार्यक्रमात (Universal Health Coverage) समाविष्ट केलेला नाही.
1) सेवांचे प्रकार
2) ज्यांना सेवा उपलब्ध करून द्यायच्या आहेत ते
3) अशा सेवांसाठी आवश्यक असणारा निधी
4) सेवा कोण पुरविणार
23) जागतिक आरोग्य संघटनेकडून खालीलपैकी कोणत्या उपक्रमांना संबंधित देशाची कुवत वाढरिण्यासाठी साहाय्य मिळते?
a) साथीचे आणि संसर्गजन्य आजारावरील संशोधन
b) जैव-वैद्यकीय कार्य आणि आरोग्य व्यवस्थेवरील संशोधन आणि त्याची अंमलबजावणी संबंधीची रणनीती
c) विकसित देशांना त्यांचे सार्वजनिक आरोग्य संशोधन आणि संबंधित प्रशिक्षण संस्थांना आकार व दिशा देण्याच्या हेतूने सहकार्य करणे.
d) देशी आरोग्य व्यवस्थेवर व्यापक संशोधन करण्यासाठी
पर्यायी उत्तरे :
1) (a) फक्त
2) (a), (b) आणि (c)
3) (b) फक्त
4) (b), (c) आणि (d)
24) जागतिक आरोग्य दिवस 2013 चे घोषवाक्य काय होते :
1) उच्च रक्तदाब
2) नागरीकरण आणि आरोग्य
3) हवामान बदलापासून आरोग्याचे संरक्षण
4) आंतरराष्ट्रीय आरोग्य सुरक्षा
25) संयुक्त राष्ट्रसंघाने 1995 मध्ये कोपनहेगन येथे भरविलेल्या सामाजिक विकास शिखर परिषदेत ........ सर्व विकासाच्या केंद्रस्थानी असावे असा ठराव सर्वानुमते संमत केला ?
1) शिक्षण
2) दारिद्य्र
3) आरोग्य
4) लोकसंख्या
26) सन 1978 मध्ये "WHO' ने सन 2000 पर्यंत ........ हा जाहीरनामा घोषित केला. भारताने या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली आहे.
1) आशिया खंडातील सर्वांसाठी आरोग्य
2) आफ्रिका खंडातील सर्वांसाठी आरोग्य
3) जगातील सर्वांसाठी आरोग्य
4) भारतातील सर्वांसाठी आरोग्य
27) डब्ल्यू.एच.ओ. च्या 2010 च्या आकडेवारीनुसार दक्षिण आशियामध्ये प्रसूती आणि बालजन्म समस्येमुळे किती महिला मृत्युमुखी पडल्या ?
1) 2010 मध्ये 230 महिला प्रत्येक दिवशी गरोदर व प्रसूतीच्या काळात मरण पावल्या.
2) 2010 मध्ये 580 महिला गरोदर व प्रसूतीच्या काळात मृत्युमुखी पडल्या.
3) 2010 मध्ये गरोदर व प्रसूतीच्या काळात जास्त महिला मरण पावल्या नाहीत.
4) 2010 मध्ये गरोदर व प्रसूतीच्या काळात कमाल महिलांचा मृत्यू झाल्या.
28) जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) ‘आरोग्य‘ या शब्दाची व्याख्या :
1) शारीरिक आणि मानसिक समस्यांवर पूर्णपणे मात करणे.
2) माणसाचे वजन त्याच्या उंचीनुसार योग्य असणे.
3) फक्त व्याधी किंवा व्यंगाचा अभाव नव्हे तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ असणे.
4) संपूर्ण शारीरिक, मानसिक स्वास्थ आणि व्याधींचा अभाव.
29) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
a) हेल्थ पॉलिसी 1983 ही अल्मा अटा जाहीरनाम्यातील कार्यप्रणालीनुसार सर्वसाधारणपणे होती.
b) हेल्थ पॉलिसी 2002 ही सर्वसाधारण कमी आणि कृषी व धोरण याबाबत अधिक तपशीलवार होती.
पर्यायी उत्तरे :
1) केवळ (a)
2) केवळ (b)
3) दोन्ही
4) एकही नाही
30) मानवी आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन 1987 मध्ये 139 देशांनी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर सह्या केल्या. या कराराद्वारे खालीलपैकी कोणती गोष्ट अंमलात आली ?
1) ओझोन-नाशक पदार्थाचा वापर कमी करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठीचा आराखडा.
2) धूम्रपान बंदी क्षेत्र बनविण्यासाठी प्रयत्न
3) खाण्याचे पदार्थ टिकविण्यासाठी करण्यात येणार्या द्रव्यावर बंदी
4) वरील सर्व
31) जागतिक आरोग्य संघटना कोणते कार्य करते?
a) जागतिक आरोग्याच्या विकासात वृद्धी करणे.
b) औषधनिर्मितीचे आंतरराष्ट्रीय मापदंड तयार करण्यास मदत करणे.
c) निदानात्मक पद्धती व त्यासाठी लागणारी उत्पादने विकसीत करणे.
d) सभासद राष्ट्रांना आर्थिक आणि औषधाच्या स्वरूपात मदत करणे.
पर्यायी उत्तरे :
1) केवळ (a)
2) (a) आणि (b)
3) (b), (c) आणि (d)
4) वरील सर्व
32) प्रामुख्याने अंधत्व निर्मूलनासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना मदत करते?
a) युनिसेफ (UNICEF) - संयुक्त राष्ट्रे आंतरराष्ट्रीय बालक संकट निधी
b) सिडा (SIDA) - स्वीडनची आंतरराष्ट्रीय विकास संस्था
c) डानिडा (DANIDA) - डॅनिश आंतरराष्ट्रीय विकास संस्था
d) नोराड (NORAD) - नॉर्वेजीयन विकास संस्था
पर्यायी उत्तरे :
1) केवळ (a)
2) (a) आणि (b)
3) (a), (b) आणि (d)
4) फक्त (c)
33) संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून घोषित केला आहे?
1) वसुंधरा दिवस
2) आंतरराष्ट्रीय योग दिन
3) जागतिक महिला दिन
4) अपंग दिन
34) संयुक्त राष्ट्रांच्या खालीलपैकी कोणत्या सचिवाच्या कालावधीत जागतिक आरोग्य संकट कार्यदलाची स्थापना झाली?
1) कोफी अन्नान
2) बान की मून
3) निको हॅली
4) फिलीपो ग्रँडी
35) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
1) जागतिक आरोग्य संघटना संयुक्त राष्ट्र संघाची प्रतिनिधी संस्था म्हणून कार्य करते.
2) जागतिक आरोग्य संघटनेस सदस्य राष्ट्राच्या वर्गणीतून व सहयोगी संस्थांच्या देणगीतून वित्त पुरवठा होतो.
3) जागतिक आरोग्य संघटनेचे मध्यपूर्व आशियातील मुख्यालय मुंबई येथे आहे.
4) 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जाते
36) 1 डिसेंबर 1992 पासून एडस् दिन साजरा करण्यात येतो कारण :
a) एडस्ग्रस्त रोग्यांना मानसिक आधार देण्यासाठी
b) औषधोपचारासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता
c) एडस् नियंत्रणासाठी मार्गदर्शन करण्याकरिता
d) आरोग्य व लैंगिक शिक्षण देण्याकरिता हा दिवस साजरा केला जातो.
वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) (a) आणि (c)
3) (b),(c) आणि (d)
4) वरीलपैकी नाही
उत्तरे : प्रश्नमंजुषा (122)
1-2
2-2
3-3
4-1
5-3
6-4
7-2
8-4
9-4
10-1
11-3
12-4
13-3
14-3
15-4
16-3
17-2
18-4
19-4
20-1
21-3
22-4
23-3
24-1
25-3
26-3
27-1
28-3
29-4
30-1
31-4
32-4
33-2
34-2
35-3
36-4