अंकज्ञान, बुद्धिमापन व तर्कक्षमता / प्रश्नमंजुषा (115)
- 02 Apr 2021
- Posted By : study circle
- 1130 Views
- 0 Shares
राज्यसेवा पूर्वपरीक्षा, 21 मार्च 2021 सीसॅट पेपर
अंकज्ञान, बुद्धिमापन व तर्कक्षमता घटकावरील प्रश्न
(1) मूलभूत अंकज्ञान व गणित
1) संजय, अशोक आणि केतन यांनी 1 : 3 : 5 या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी पुन्हा गुंतवणूक केली. अशोक तसेच केतन यांनी त्यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मे केली. वर्षअखेर त्यांच्या नफ्याचे प्रमाण किती?
1) 4 : 3 : 5
2) 6 : 5 : 10
3) 5 : 6 : 10
4) 10 : 5 : 6
2) P या नैसर्गिक संख्येला 11 ने गुणून त्यात 33 ही संख्या मिळवली. या बेरजेला 9 ने भागले आणि बाकी शून्य मिळाली. दिलेल्या अटींचे समाधान करणारी P ची सर्वात लहान किंमत निवडा.
1) 1
2) 3
3) 6
4) 15
3) 15 पुरुष व 7 महिला यांच्यामधून 10 सदस्यीय समिती गठित करावयाची आहे. समितीत कमीत कमी 6 महिलांचा समावेश असेल अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल?
1) 10011
2) 10010
3) 11010
4) 12740
4) विनी मोनोरेलने कामाला जाते. प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी तिला एस्केलेटर वापरावा लागतो. जर ती 8 पायर्या चढली तर वर पोहोचायला तिला 21.0 सेकंद लागतात. जर ती 13 पायर्या चढली तर तिला फक्त 13.5 सेकंद लागतात. जर तिने एकही पायरी चढायची नाही असे ठरवले तर तिला वर पोहोचायला लागणारे सेकंद दर्शवणारा पर्याय निवडा.
1) 22
2) 33
3) 27
4) 22.2
5) ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 से.मी. व 35 से.मी. आहे. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील तेव्हा लहान चाकाने किती फेरे पूर्ण होतील?
1) 25
2) 45
3) 30
4) 32
6) एका वर्तुळात समभुज त्रिकोण अंतर्लिखित केला आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती पट आहे हे निर्देशित करणारा पर्याय निवडा.
1) 3 / Öp
2) 3p / 4
3) 4p / 3Ö3
3) 3
7) S जवळ काही रंगीबेरंगी शिंपले आहेत. यातील एक तृतीयांश शिवाय 14 जादा शिंपले तिने P ला दिले. P ने यातील एक तृतीयांश शिवाय 11 जादा शिंपले Q ला दिले. Q ने यातील एक तृतीयांश शिवाय एक जादा शिंपला तिच्या R या मित्राला दिला. जर R ला Q कडून 14 शिंपले मिळाले तर S कडे मुळात असलेल्या शिंपल्यांची संख्या निवडा.
1) 195
2) 210
3) 126
4) 378
8) झिनाने एका स्तंभात चार नैसर्गिक संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळी यातल्या तीन सर्वांना बेरजेच्या समान संधी मिळतील अशाप्रकारे निवडून तिने त्या त्रिकुटांची बेरीज केली आणि तिला 186, 206, 215 आणि 194 या बेरजा मिळाल्या. झिनाने लिहिलेली सर्वात मोठी संख्या निवडा.
1) 93
2) 103
3) 81
4) 73
9) सोबतचा आलेख A (चौरसांनी दाखवलेला) आणि B (त्रिकोणांनी दाखवलेला) अशा दोन कंपन्यांचे वर्षभरातील निर्यातीचे आयातीशी असलेल्या गुणोत्तरांचे प्रतिरूपण करतो. जर 2014 साली A कंपनीची निर्यात B या कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट होती. जर 2014 साली A कंपनीची आयात रु. 400 कोटी होती तर त्या वर्षात B कंपनीच्या निर्यातीच्या सर्वात जवळपासची अंदाजी किंमत दाखवणारा पर्याय निवडा.
1) रु. 500
2) रु. 260
3) रु. 470
4) विदा पुरेशी नाही
(2) बुद्धिमापन चाचणी
1) ठिपक्यांच्या परस्परांना छेदणार्या कर्णरेषांवरून व त्यापासून तयार झालेल्या समभुज चौकोनाकारावरून घडी घालून लहान त्रिकोणाकार मिळवला आहे असे डावीकडे दिलेले पारदर्शक कागदाचे पान अभ्यासा आणि पर्यायांतून उचित घडी निवडा.
पर्यायी उत्तरे :
1) 2) 3) 4)
2) सोबतची एकमेकांवर आलेले समभुज त्रिकोण दाखवणारी आकृती अभ्यासा आणि कोन a ची अंशांत किंमत निवडा.
1) 49
2) 50
3) 55
4) 51
3) विसंगत वस्तू निवडा :
1) 2) 3) 4)
(3) तर्कक्षमता व विश्लेषण
1) पुढील विधाने अभ्यासा व दिलेल्या पर्यायांतून त्यांच्यावर आधारित यथार्थ निष्कर्ष निवडा.
a) फक्त शेतकरी कुटुंबांचे सदस्य शेतकी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांना बसू शकतात.
b) काही मुली प्रवेश परीक्षांना बसत आहेत.
c) सर्व स्त्री-उमेदवारांना एका अशासकीय संस्थेमार्फत निःशुल्क शिकवणी दिली जाते.
पर्यायी उत्तरे :
1) प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्य प्रवेश परीक्षेला बसत आहेत.
2) अशासकीय संस्थेच्या शिकवणी वर्गांना जाणार्या सर्व व्यक्ती मुली आहेत.
3) स्पर्धा परीक्षेला बसणार्या सर्व विद्यार्थ्यांना अशासकीय संस्थेकडून चालवल्या जाणार्या शिकवणी वर्गात विनाशुल्क शिकवणी मिळते.
4) वर दिलेल्यांपैकी एकही निष्कर्ष माहितीशी सुसंगत नाही.
2) पुढील माहिती अभ्यासा आणि दोषी व्यक्ती लिहा.
ज्या ठिकाणचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर म्हणून दोन वाक्ये बोलतात ज्यातील एक नेहमीच सत्य असते आणि अन्य नेहमीच असत्य असते. अशा ठिकाणी राम गेला होता. या ठिकाणी असताना त्याला स्वतःची पिशवी चोरीला गेलेली आढळली आणि अथितीगृहाच्या खोलीत आलेल्या तीन व्यक्तींवर त्याचा संशय आहे. यातील फक्त एक व्यक्ती दोषी आहे अशी त्याची खात्री आहे. जेव्हा त्यांना त्याने प्रश्न विचारले तेव्हा त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे होती.
R : हे S ने केलं नाही. मी हे केलं नाही.
S : हे मी केलं नाही. P ने हे केलं नाही.
T : हे मी केलं नाही. हे कोणी केलं ते मला माहीत नाही.
पर्यायी उत्तरे :
1) R
2) S
3) T
4) दिलेल्या अटींनुसार त्यांच्या उत्तरांत निर्णय घेण्यासाठी लागणारी तार्किक सुसंगती नाही.
3) एका पुस्तकाच्या कपाटात सहा पुस्तके ठेवलेली आहेत आणि त्या सहाही पुस्तकांना L, M, N, O, P व Q याप्रमाणे खुणा चिटकवल्या आहेत. M, P, N व Q या खुणा असलेल्या पुस्तकांची वेष्टणे निळी असून उर्वरित पुस्तकांची वेष्टणे लाल आहेत. L, M व Q या खुणा असलेली पुस्तके नवीन असून उर्वरित पुस्तके जुनी आहेत. L, M व N खुणा असलेली पुस्तके कायद्याची तर उर्वरित पुस्तके अभियांत्रिकीची आहेत. तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेष्टण निळे आहे?
1) P
2) N
3) L
4) M
4) मजर्नल ऑफ क्लिनिकल एन्डोक्रायनॉलॉजीफ अॅण्ड मेटाबॉलिझम मध्ये प्रसिद्ध झालेले, ट्रायक्लोसन हे रसायन आणि त्याच्या संपर्काचा हाडांची खनिज घनता तसेच हाडांच्या ढिसूळपणाचा यांच्यातील सहसंबंधाचा शोध घेणारे त्या प्रकारचे पहिलेच संशोधक आहे. साबण, टूथपेस्ट, हातसफाई साबण इत्यादी प्रकारच्या ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या माध्यमातून व्यक्ती ट्रायक्लोसनच्या संपर्कात येऊ शकते. तथापि ट्रायक्लोसन व मानवी हाडांचे आरोग्य यांच्या संबंधाविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. मप्राण्यांतील हाडांच्या घनतेवर विपरीत परिणाम करण्याची क्षमता ट्रायक्लोसनमध्ये असण्याच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक प्रयोगशाळेतील अभ्यासांतून झालेले आहेफ असे ट्रायक्लोसनच्या परिणामांचा अभ्यास करणार्या वैज्ञानिकाने म्हटले आहे.
वरील माहितीवर आधारलेला सर्वात उचित निष्कर्ष निवडा.
1) प्राण्यांच्या हाडांवर होणार्या ट्रायक्लोसनच्या परिणामांबाबत फार थोडी माहिती उपलब्ध असली तरीही वरील यादीत असलेल्या उत्पादनांत त्याचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे.
2) मानवी हाडांवर नेमका कोणता परिणाम होतो हे माहीत नसल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनांत ट्रायक्लोसनचा वापर करण्याबाबत कोणताही प्रतिबंधक उपाय करण्याची आवश्यकता नाही.
3) ट्रायक्लोसन आणि हाडांच्या खनिजांची घनता यांच्यातील सहसंबंध यांचा शोध पूर्वीच घेतला असल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनांतील त्याच्या वापरावर बंदी घालणे आवश्यक आहे.
4) ट्रायक्लोसनमध्ये प्राण्यांच्या हाडांच्या घनतेवर परिणाम करण्याच्या क्षमतेच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक काही अभ्यासातून दाखविले गेल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनांत त्याचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे.
5) माहिती अभ्यासा आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडा.
A चे घर B आणि C यांच्या घरांच्या पूर्वेला आहे. D आणि E यांची घरे B च्या घराच्या उत्तरेला आहेत. सकाळी सूर्य वर यायच्या आधी E च्या दोन मजली घराची छाया D च्या घरावर पडते. E चे घर C च्या घराच्या पश्चिमेला आहे.
1) A चे घर E च्या घराच्या पूर्वेला आहे.
2) E चे घर A च्या घराच्या उत्तरेला आहे.
3) D चे घर C च्या घराच्या उत्तरेला आहे.
4) C चे घर A च्या घराच्या दक्षिणेला आहे.
6) जिवंत व्यक्तीचे मूत्रपिंड सुरक्षितपणे काढून घेता येते आणि ते मृत्यूच्या दारातील रुग्णाचा जीव वाचवू शकते. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची मागणी ही मूत्रपिंडाच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असते हे लक्षात घेऊन लोकांना स्वतःचे एक मूत्रपिंड विकण्याला प्रतिबंध करणारा भारतातील कायदा रद्द केला पाहिजे कारण याच्या परिणामी अधिक प्रमाणात यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपणे होऊ शकतील. यामुळे श्रीमंत रुग्णांकडून संभाव्य गरीब दात्यांची पिळवणूक होईल याची लोकांना चिंता वाटते. परंतु स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी धोकादायक व्यवसायात काम करणे हे स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड विकण्याहून फारसे वेगळे नाही. काही रुग्णांनी मूत्रपिंडे विकत घेऊन दुसर्या देशांत प्रत्यारोपणे करून घेतली आहेत. अशा शस्त्रक्रियांचा त्यांच्या जिवाला असणारा धोका मोठा असू शकतो.
वरील युक्तिवादाचा आधार ठरेल असे गृहीतक पुढील पर्यायातून निवडा.
1) गरीब लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घेणे शक्य होत नाही.
2) भारतातील काही गरीब लोक मूत्रपिंड विक्रीसाठी इच्छुक असतात.
3) अनेक देशांत तुरळक मूत्रपिंड प्रत्यारोपणे यशस्वी होतात.
4) कायद्यातील बदल प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडांच्या पुरेशा पुरवठ्याची हमी देईल.
7) पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग करून खजिना शोधक आणि पुरातत्त्वज्ञ यांच्यातील असहमतीचे निर्देशन करू शकणारे अनुमान पर्यायातून निवडा.
खजिना शोधक : सर्वसाधारणपणे पाहता सार्वजनिक मालमत्तेच्या जागी सापडलेल्या पुरातत्त्वीय वस्तूंवर खाजगी मालकी असणे बेकायदेशीर आहे. ज्या व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून बुडालेल्या जहाजांवरून जे काही सामान सोडवून आणतात ते शतकांच्या जुन्या सागरी कायद्यांनुसार त्यांना स्वतःकडे बाळगण्याची परवानगी आहे. या कायद्याने बुडालेल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सागरी खार्या पाण्यामुळे नामशेष होऊ घातलेल्या पुरातन जहाजांतील सामानाला वाचवणार्या खजिना शोधकांना ते स्वतःला ठेवण्याची मुभा स्पष्टपणे दिली आहे.
पुरातत्त्वज्ञ : असं नाही. ही अपघातग्रस्त जहाजे शतकानुशतके पाण्यात पडून असल्याने ती तेथे स्थिरावली आहेत. त्यांना धोका आहे तो फक्त लोभी खजिना शोधकांचा. प्रचंड नफा कमावण्यासाठी ते वस्तू लुटण्याच्या घाईत बहुमोलाच्या पुरातत्त्वीय पुराव्यांचा नाश करतात.
1) केव्हाही बुडालेल्या जहाजासाठी सागरी कायदा लागू करता येईल वा नाही.
2) सार्वजनिक पाण्यातील प्राचीन अपघातग्रस्त जहाजाला खाजगी मालमत्ता म्हणणे उचित आहे वा नाही.
3) जेव्हा अपघातग्रस्त जहाजाची सुटका करतात तेव्हा खजिना शोधक स्वतःचा जीव धोक्यात घालतात वा नाही.
4) कोणत्या दृष्टिकोनातून एखाद्या प्राचीन जहाजाला ते नामशेष होऊ घातले आहे वा नाही असे म्हणण्याबाबत.
8) दिलेली माहिती वापरून अनुक्रमे मामा व भाची यांची जोडी निवडा. 'B' हे 'C' चे वडील आहेत परंतु 'C' त्यांचा मुलगा नाही. 'P' हा 'C' चा भाऊ आहे. 'A' आणि 'B' हे जोडपे आहे. 'Q' ही 'C' ची मुलगी आहे. 'R' हा 'P' चा मुलगा आहे. 'S' आणि 'P' हे जोडपे आहे. 'T' हे 'S' चे वडील आहेत.
1) S - R
2) P - Q
3) B - Q
4) T - R
9) खाली दिलेल्या चार विधानांतील दोन विधाने एकाच वेळी सत्य असणार नाहीत परंतु ती एकाच वेळी असत्य असू शकतात. दिलेल्या अटी पूर्ण करणार्या जोडी निर्देशित करणारा पर्याय निवडा.
विधाने :
र) X या चलाख शहरातील एकही नागरिक पाण्याचा एकही थेंब वाया घालवत नाही.
ल) X या चलाख शहरातील काही नागरिक पाणी काळजीपूर्वक वापरतात.
ल) X या चलाख शहरातील प्रत्येक नागरिक दुर्भिक्ष्याचा विचार न करता पाणी वापरतो.
व) X या चलाख शहरातील काही नागरिक बेपर्वाईने पाणी वापरतात.
पर्यायी उत्तरे :
1) (b) व (d)
2) (a) व (c)
3) (a) व (b)
4) (a) व (d)
10) विशिष्ट कालावधीत पूर्ण करायच्या दोन भिन्न प्रकल्पांसाठी A, B, C, D, E, F, G आणि H या विद्यार्थ्यांतून दोन संघ तयार करायचे आहेत. जर G व H यांची संघ-1 साठी निवड केली, तर पुढील अटीनुसार संघ-2 चे सदस्य निवडा.
पहिल्या संघात कमाल पाच किंवा किमान चार विद्यार्थी असायला हवेत. प्रत्येक विद्यार्थी फक्त एकाच प्रकल्पासाठी निवडला जाईल. काम सुरळीत चालण्यासाठी C ची A सोबत निवड करणे उपयुक्त ठरेल कारण त्यांना एकमेकांबरोबर काम करायला आवडते परंतु A व H नेहमीच वाद घालण्यात वेळ वाया घालवतात. B व F हे C बरोबर स्वस्थपणे काम करू शकत नाहीत. E हा A व D यांच्याबरोबर आरामात काम करू शकतो परंतु G बरोबर त्याचे जमत नाही.
1) A, B, F व E
2) B, F, E व D
3) A, C, D व E
4) C, B, D व E
11) खाली चार विधाने आणि तीन अनुमाने दिली आहेत. तुम्हाला दिलेली विधाने सत्य मानायची आहेत, दिलेल्या विधानांनुसार तार्किकदृष्ट्या अचूक अनुमाने ठरवा.
विधान : सर्व रस्ते बसेस आहेत.
काही बसेस या कार आहेत.
काही कार दिवस आहेत.
सर्व दिवस रात्री आहेत.
अनुमाने : I) काही रात्री बसेस आहेत.
II) काही रात्री कार आहेत.
III) काही दिवस बसेस आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) एकही सत्य नाही
2) फक्त (I) सत्य
3) फक्त (II) सत्य
4) फक्त (III) सत्य
12) खाली दिलेली माहिती अभ्यासा आणि दिलेल्या विधानांतील यथार्थ निष्कर्ष निवडा.
एकत्र कुटुंबातील फक्त कॉफी पिणार्या सदस्यांची संख्या चहा पिणार्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे आणि फक्त चहा पिणार्या व्यक्तींची संख्या कॉफी पिणार्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे.
विधाने :
a) एकतर कॉफी किंवा एकतर चहा किंवा दोन्ही पिणार्या व्यक्तींची एकूण संख्या फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणार्यांच्या एकूण संख्येच्या तिप्पट आहे.
b) फक्त कॉफी पिणार्या आणि फक्त चहा पिणार्या व्यक्तींची एकूण संख्या कॉफी व चहा दोन्ही पिणार्यांच्या संख्येच्या दुप्पट आहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (b)
2) (a) व (b) एकही नाही
3) (a) व (b) दोन्ही
4) फक्त (a)
13) सनाला पूर्ण झालेल्या सत्रात तिच्या विद्यार्थ्यांच्या इतिहास आकलनाच्या कार्यमानाची तुलना करायची होती. त्यासाठी तिने त्यांच्या इतिहासाशी संबंधित कृती व स्वाध्याय यांच्या दस्ताऐवजांचे व त्यांच्या तिने केलेल्या वर्गकार्याच्या नोंदींचे विश्लेषण केले. तिला आढळले की या सत्रात आशूचे कार्यमान हे बीनाच्या कार्यमानाच्या तुलनेने वरच्या पातळीचे आहे. करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीचे आहे. बीनाचे कार्यमान करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीचे आहे आणि आशूचे कार्यमान माइकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीचे आहे.
या माहितीच्या आधारे केलेल्या पुढील विधानांपैकी कोणते विधान सत्य नाही?
1) माइकच्या कार्यमानाबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे या पाचांचा चढता क्रम लावता येणार नाही.
2) कार्यमानाच्या बाबतीत उतरता क्रम लावल्यास बीना खात्रीने चौथ्या क्रमावर आहे.
3) आशूचे कार्यमान इतरांच्या तुलनेत निश्चितपणे इतर चौघांच्या वरचढ आहे, असे खात्रीने म्हणता येणार नाही.
4) माईकचा विचार केला नाही तर धर्माचे कार्यमान करीम व बीना यांच्यापेक्षा निश्चितपणे वरचढ आहे.
उत्तरे : प्रश्नमंजुषा (115)
(1) मूलभूत अंकज्ञान व गणित
1-3
2-2
3-2
4-4
5-3
6-3
7-2
8-3
9-3
(2) बुद्धिमापन चाचणी
1-3
2-1
3-4
(3) तर्कक्षमता व विश्लेषण
1-4
2-2
3-2
4-4
5-1
6-2
7-4
8-2
9-2
10-3
12-3
13-2