चालू घडामोडी / प्रश्‍नमंजुषा (106)

  • चालू घडामोडी  / प्रश्‍नमंजुषा (106)

    चालू घडामोडी / प्रश्‍नमंजुषा (106)

    • 22 Mar 2021
    • Posted By : study circle
    • 280 Views
    • 1 Shares

     चालू घडामोडी : प्रश्‍नमंजुषा (106)

    1) महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2020-21 नुसार राज्यावरील कर्जासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
    अ) चालू वर्षांत महाराष्ट्राचे सार्वजनिक कर्ज रु. 5.20 लाख कोटी इतके आहे.
    ब) त्याचे प्रमाण राज्य उत्पन्नाच्या तुलनेत सुमारे 26 टक्के आहे.
    क) या कर्जावरील वार्षिक व्याजभार सुमारे 36,000 कोटी रुपयांचा आहे.
    ड) ते राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्प व्यवस्थापन (एफआरबीएम) कायद्याच्या मर्यादेत आहे. 
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  अ, ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    2) 2020-21 मध्ये स्थिर किमतीनुसार भारताचे एकूण राष्ट्रीय देशांतर्गत उत्पन्न किती होते ?
    1) 146 लाख कोटी रुपये
    2) 140 लाख कोटी रुपये
    3) 134 लाख कोटी रुपये
    4) 150 लाख कोटी रुपये
     
    3) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) 2020-21 मध्ये मानवी स्वातंत्र्य निर्देशांकात 162 देशात 111 वा आहे.
    ब) 2020-21 मध्ये जागतिक वृत्तपत्र माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात भारत 180 देशात 142 व्या स्थानावर आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    4) देशभरात धनादेश न वठण्याच्या प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांच्या लवकर निराकरणासाठी उपाय सुचविणार्‍या समितीची स्थापना सर्वोच्च न्यायालयाने केली, त्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
    1) शशीकांत दास
    2) अजय भूषण प्रसाद
    3) न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण 
    4) दिनेश कुमार खरा
     
    5) 5 फेब्रुवारी 2021 पासून केंद्र शासनाच्या आदेशानुसार देशातील सर्व टोलनाक्यांवर फास्टॅग सक्ती करण्यात आली असून अशा फास्टॅगवर कशाची नोंद असते ?
    अ) फास्टॅग क्लास  कोड   
    ब) कलर कोड 
    क) फास्टॅग ट्रेडमार्क
    ड) अँटेना अटॅच साईन
    इ)  व्हेईकल बार कोड
    फ) क्यूआर कोड साईन
    ग) टीआयओ नंबर 
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) ड आणि फ वगळता सर्व  
    3) इ वगळता सर्व
    4) ड, फ, ग वगळता सर्व
     
    6) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल हा छायाचित्र महोत्सव आयोजित केला  जातो?
    1) आर्ल्स, फ्रान्स
    2) फ्लोरेन्स, इटली
    3) पणजी, गोवा
    4) अजिंठा, महराष्ट्र
     
    7) मिथुन चक्रवर्ती यांच्या संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) 2014 साली ते तृणमूल काँग्रसच्या तिकीटावर राज्यसभेचे खासदार झाले. 
    ब) ‘फिल्म स्टुडिओज सेटिंग अ‍ॅड अलाइड मजदूर युनियन’ चे ते काही काळ अध्यक्ष होते.
    क)  त्यांनी 1995 ते 1999 या काळात सलग 5 वर्षॅ देशात सर्वाधिक प्राप्ती कर भरला  होता.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    8) ‘एक्झोप्लॅनेट’ म्हणजेच बाह्यग्रहाचा शोध दोनप्रकारे घेतला जातो.  त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) डॉपलर फोटोमेट्रीमध्ये ग्रहाच्या समोरून गेल्यावर तार्याच्या प्रकाशात येणारा बदल पाहिला जातो. 
    ब) ट्रान्झिट फोटोमेट्रीमध्ये भ्रमण करीत असलेल्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा तार्यावर होणारा परिणाम पाहिला जातो. 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    9) खालीलपैकी कोणते विधान कैलास पर्वतासंदर्भात असत्य आहे?
    1) या पर्वताला पृथ्वीचा केंद्रबिंदू म्हणजेच ‘अ‍ॅक्सिस मुंडी’ मानतात. 
    2) आकाशीय ध्रुव आणि भौगोलिक ध्रुव यांचा हा केंद्र असल्याचे म्हटले जाते.
    3) याठिकाणी दहाही दिशांचे मिलन होते असे म्हटले जाते. 
    4) चुंबकीय ध्रुव आणि भौगोलिक ध्रुव यांचा हा केंद्र असल्याचे म्हटले जाते.
     
    10) सायकल संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) 1839 साली स्कॉटलंडच्या किर्कपेट्रिक मॅकमिलन यांनी पॅडलची सायकल तयार  केली.
    ब) अमेरिकेतील सेंट लुई सायकलिंग क्लब हा जगातील सर्वात जुना सायकल क्लब आहे.
    क) जगातला सर्वात मोठा सीसीटीव्हीयुक्त सायकल ट्रॅक  स्पेनमधील सॅन सॅबस्टियन या शहरात आहे.
    ड) 1951 मध्ये राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांनी विदर्भात सायकल दौरा आयोजित केला होता.
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने अ, ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    11) खालीलपैकी कोणत्या देशाने आपल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी हेल्थ सर्टिफिकेट प्रोग्राम, ज्याला जगातील पहिला व्हायरस पासपोर्ट म्हटले जाते, तो सुरु केला ?
    1) अमेरिका
    2) चीन
    3) इटली
    4) ब्रिटन
     
    12) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी तामीळनाडू विधानसभेची निवडणूक लढविली.
    ब) मलाला युसूफझई हिने लहान मुलांसाठी ड्रामा, डॉक्युमेंट्री, कॉमेडी आणि अ‍ॅक्शन सीरिज बनविण्यासाठी अ‍ॅपल कंपनीसोबत करार केला.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    13) ट्रक आणि बस निर्माण करणारी कंपनी ’स्कॅनिया’ ही कोणत्या देशाची आहे ?
    1) स्वित्झर्लंड
    2) स्वीडन 
    3) जर्मनी
    4) ददक्षिन कोरिया
     
    14) खालील जोड्या अचूक जुळवा ;
        स्तंभ अ ( जन्मदिवस)   स्तंभ ब (महत्त्व)
    अ. अल्बर्ट आइन्स्टाइन I) राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस
    ब. श्रीनिवास रामानुजन II) राष्ट्रीय डॉक्टर दिवस
    क. बी. सी. रॉय        III) जागतिक पाय दिवस
    ड. पी. सी. महालनोबीस        IV) राष्ट्रीय गणित दिवस
    पर्यायी उत्तरे :
    1) III II IV I
    2) II IV I IV
    3) III IV II I
    4) IV III I II
     
    15) कलवरी वर्गातील तिसरी स्टेल्थ स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुडी ‘आयएनएस करंज’ ची बांधणी मेक इन इंडियाअंतर्गत येथे करण्यात आली -
    1) हिंदुस्थान शिपयार्ड, विशाखापटणम
    2) गार्डन रीच शिपबिल्डर्स, कोलकाता
    3) माझगाव डॉकयार्ड, मुंबई
    4) नेव्हल डॉकयार्ड, मुंबई
     
    16) चिनी उद्योगपती ”झोंग शान्शान ” यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) ब्लूमबर्गच्या अहवालानुसार ते मार्च 2021 मध्ये आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.
    ब) ते जगातील 10 वे श्रीमंत व्यक्ती आहेत.
    क) 2020 मध्ये त्यांच्या बीजिंग वेन्टाई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्राईज कंपनीने सयानोव्हॅक ही लस विकसित केली होती.
    ड) त्यांचा मूळ व्यवसाय बाटलीबंद पाण्याचा आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    17) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
    1) मुरुडेश्वर शिव मंदिर  कर्नाटकातील अरबी समुद्राच्या किनार्‍यावर वसले आहे
    2) केदारनाथ मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये मंदाकिनी नदीच्या किनारी आहे.
    3) लिंगराज मंदिर ओडीसामध्ये आहे.
    4) मल्लिकार्जुन  मंदिर तेलंगणामध्ये आहे.
     
    18) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
    विधान (अ) : दरडोई उत्पन्नाच्या निकषांवर महाराष्ट्राचा क्रमांक (2020-21 आर्थिक सर्वेक्षणाप्रमाणे) 10 वा लागतो. 
    कारण (र) : 2019-20 च्या तुलनेत 2020-21 चा राज्य महसूल रु. 3.10 लाख कोटींवरून रु. 2.73  लाख कोटींपर्यंत घसरला.
    पर्यायी उत्तरे :
    1)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    2)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    3)  (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    4)  (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    19) 2021 मध्ये कोणत्या राज्याने 75 टक्के नोकर्‍या स्थानिकांसाठी आरक्षित करण्याचा कायदा सर्वप्रथम केला ? 
    1) फक्त हरियाणा 
    2) फक्त झारखंड 
    3) वरील दोन्ही 
    4) यापैकी नाही
     
    20) खालीलपैकी कोणी कैलास पर्वतावर आरोहण केले होते ?
    1) अर्नेस्ट मुल्दाशिफ या रशियन डॉक्टरने 
    2) ह्यु रटलेज व कर्नल विल्सन यांनी
    3) तिबेटी धर्मगुरू मिलारेपा यांनी
    4) हर्बर्ट टिची हा गिर्यारोहकाने

    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (106)
    1-2
     
    2-3
     
    3-3
     
    4-3
     
    5-3
     
    6-3
     
    7-4
     
    8-4
     
    9-4
     
    10-2
     
    11-2
     
    12-2
     
    13-2
     
    14-3
     
    15-3
     
    16-3
     
    17-4
     
    18-2
     
    19-1
     
    20-3

     

Share this story

Total Shares : 1 Total Views : 280