जागतिक घडामोडी : प्रश्न मंजुषा (103)
- 12 Mar 2021
- Posted By : Study Circle
- 399 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा (103)
1) अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत (2021)?
1) लॉइड जे. ऑस्टिन
2) मायकल फ्रीडलिंग
3) अँटनी ब्लिंकेन
4) अॅडमिरल फिलिप एस डेविडसन
2) संयुक्त राष्ट्रांच्या आधिपत्याखाली अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ज्या देशांच्या प्रतिनिधीद्वारे संयुक्त धोरण ठरवले जाणार आहे त्यात सहभाागी देश कोणते ?
अ) ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी
ब) अमेरिका, रशिया आणि भारत
क) सौदी अरेबिया, टर्की आणि इटली
ड) चीन, इराण आणि पाकिस्तान
पर्यायी उत्तरे :
1) ब आणि क बरोबर
2) ब आणि ड बरोबर
3) अ आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
3) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) संपूर्ण अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी जाण्याचे नियोजन 1 मे 2021 पर्यंतचे आहे.
ब) अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल घनी हे भारतमित्र म्हणून ओळखले जातात.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
4) सातव्या शतकात स्वाहिली लोकांनी कोणत्या देशात उभारलेल्या लहान-मोठ्या बंदरांमधून भारताशी व पूर्वेकडचा हिंदी महासागरातला व्यापार चालत असे ?
1) सोमालिया
2) मोझाम्बिक
3) दक्षिण आफ्रिका
4) वरील सर्व
5) 12 मार्च 2021 रोजी क्वाड राष्ट्रांच्या प्रमुखांची पहिली व्हर्च्युअल बैठक पार पडली. या व्हर्च्युअल बैठकीत सहभागी नेत्यांसंदर्भात खालील जोड्या अचूक जुळवा ः
स्तंभ अ (नेते) स्तंभ ब (देश)
अ. स्कॉट मॉरिसन 1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
ब. योशिहिदे सुगा 2. जपानचे पंतप्रधान
क. जो बायडन 3. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान
ड. नरेंद्र मोदी 4. भारताचे पंतप्रधान
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
(1) 1 2 3 4
(2) 3 2 1 4
(3) 3 1 2 4
(4) 2 3 1 4
6) दि क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग (क्वॉड) संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) क्वॉडची सुरुवात वर्ष 2010 मध्ये करण्यात आली होती.
ब) मार्च 2020 मध्ये करोना संसर्गाच्या मुद्यावर क्वॉड देशांची बैठक पार पडली होती.
क) क्वॉडमध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारताचा समावेश आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त ब आणि क
4) अ, ब आणि क
7) ”दी इंडियन वे : स्ट्रॅटेजीज फॉर अॅन अनसर्टन वर्ल्ड हे पुस्तक कोनी लिहिलं आहे ?
1) शशी थरुर
2) एन. नटराजन
3) नटवर सिंग
4) एस. जयशंकर
8) ब्रिक्स आणि क्वाड या दोन्ही संघटनांमध्ये सहभागी असलेला देश कोणता ?
1) अमेरिका
2) रशिया
3) भारत
4) जपान
9) जगातील तिसरी अंतराळ महाशक्ती म्हणून विकसित होण्याचा प्रयत्न करणार्या फ्रान्सने मार्च 2021 च्या पहिल्या आठवड्यात कोणाच्या सहकार्याने अंतराळात आपला युद्ध सराव केला ?
अ) जर्मन अंतराळ संस्था
ब) रशियाची ग्लोव्हकॉसमॉस अंतराळ संस्था
क) अमेरिकेचा स्पेस फोर्स
ड) भारताची इस्रो अंतराळ संस्था
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि क
3) फक्त ब आणि क
4) अ, ब आणि क
10) कोणत्या वर्षी अमेरिकेने भारताला प्रबळ संरक्षण भागीदार असा दर्जा दिला होता ?
1) 2014
2) 2016
3) 2018
4) 2020
11) फूड वेस्ट इंडेक्स अहवाल दरवर्षी कोणाद्वारे प्रसिद्ध केला जातो ?
1) अन्न आणि कृषी संघटना
2) जागतिक व्यापार संघटना
3) संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण कार्यक्रम
4) युनेस्को
12) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) 2020 च्या लॉकडाऊन काळात इटली मध्ये क्वारंटाईन किचन चा प्रयोग झाला होता.
ब) 2020 सालच्या लॉकडाऊनच्या काळात 2019 च्या तुलनेत अन्नाच्या नासाडीत 22 टक्क्यांनी घट झाली होती.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
13) 2021 मध्ये होणार्या जागतिक हवामान आणि जैवविविधता परिषदेच्या पार्श्वभूमीवर, जगातली अन्न नासाडी कोणत्या वर्षापर्यंत निम्म्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत ?
1) 2022 पर्यंत
2) 2025 पर्यंत
3) 2027 पर्यंत
4) 2030 पर्यंत
14) अन्नाची नासाडी थांबवली तर ....
अ) अन्नाची उपलब्धता वाढल्याने जगात कमी लोक उपाशी राहतील.
ब) जैवविविधतेची होणारी हानी कमी होईल.
क) प्रदुषणाला आळा बसल्याने ग्रीनहाऊस गॅसेसच उत्सर्जन कमी होईल.
ड) दारिदद्य रेषेखालील लोकांना पौष्टिक अन्न उपलब्ध होईल.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
15) जगातील पहिला व्हायरस पासपोर्ट कोणत्या देशाने जारी केला ?
1) अमेरिका
2) युरोपियन संघ
3) चीन
4) ब्रिटन
16) खालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा.
अ) ओसामा बिन लादेनचा अबोटाबाद येथे खात्मा
ब) दोहा येथे अमेरिकी प्रशासन आणि तालिबानी यांच्यात पाकिस्तान पुरस्कृत चर्चेची फेरी
क) भारताचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक
ड) भारताचा बालाकोटच्या जब्बा टॉपवर केलेला हवाई हल्ला
पर्यायी उत्तरे :
1) अ - ब - क - ड
2) क - अ - ड - ब
3) ब - ड - अ - क
4) ड - ब - अ - क
17) खालील विधाने विचारात घ्या :
अ) पाकिस्तानवरील 15 टक्के कर्ज (पाकिस्तानच्या जीडीपीच्या 6.15 टक्के) एवढे चीनमधून आलेले आहे.
ब) ग्वादर हे चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (सीपीइसी) एक भाग आहे.
क) हंबंटतोटा हे बंदर चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (सीपीइसी) एक भाग आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
18) भारत आणि पाकिस्तान यांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलीटरी ऑपरेशन्सच्या चर्चेअंती, दोन्ही देशात शस्त्रसंधी कधी जाहीर झाली ?
1) 5 फेब्रुवारी 2016
2) 1 मार्च 2020
3) 25 फेब्रुवारी 2021
4) 5 फेब्रुवारी 2016
19) खालील जोड्या अचूक जुळवा ः
स्तंभ अ (वर्ष) स्तंभ ब (पाकिस्तानशी संब्ंधित घटना)
अ. 1971 1. सीएटो (साऊथ ईस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन)
ब. 1963 2. सेन्टो (सेंट्रल ट्रिटी ऑर्गनायझेशन)
क. 1956 3. साक्शागम खोरे चीनला देऊ केले
ड. 1954 4. अमेरिकेचे मंत्री हेन्री किसींजर यांची चीन भेट घडवून आणली
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) 1 2 3 4
2) 4 3 2 1
3) 4 3 1 2
4) 2 3 1 4
उत्तरे : प्रश्नमंजुषा (103)
1-3
2-2
3-3
4-1
5-2
6-3
7-4
8-3
9-2
10-2
11-3
12-3
13-4
14-1
15-3
16-1
17-2
18-3
19-2