जागतिक पर्यावरण दिन / प्रश्नमंजुषा (१८१)
- 07 Jun 2021
- Posted By : study circle
- 1400 Views
- 1 Shares
प्रश्नमंजुषा (१८१)
१) २०२१ हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघानी काय म्हणून जाहीर केले आहे ?
१) आंतरराष्ट्रीय स्थानिक फळे आणि भाज्या संवर्धन वर्ष
२) नैसर्गिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन वर्ष
३) जागतिक जैवविविधता वर्ष
४) १ आणि २
२) ५ जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून कधीपासून साजरा केला जातो ?
१) १९४५
२) १९७२
३) १९७४
४) १९९२
३) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) २०२१ वर्षाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम म्हणजे इकोसिस्टीम रिस्टोरेशन.
ब) २०२१ वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद बांगला देशाकडे आहे.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ आणि ब दोन्ही
४) कोणतेही नाही
४) खालीलपैकी कोणाची स्थानिक बियाणे जतन करण्याची पद्धत आधुनिक संकल्पनेलाही लाजवेल अशी आहे ?
१) अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार येथील पोपटराव पवार यांची पद्धत
२) कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठाची सेंद्रिय बियाणे संवर्धन पद्धत
३) अहमदनगर जिल्ह्यातील अकोले भागातील राहीबाई पोपरे यांची पद्धत
४) नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री अॅग्रोने विकसित केलेला सीड व्हॉल्ट
५) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) २०२१-३० हे दशक युनायटेड नेशन्सने परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचे दशक म्हणून जाहीर केले आहे.
२) ५ जून हा दिवस जागतिक अन्न व कृषी संघटनेमार्फत पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.
३) सध्याजगभरातल्या एकूण प्रवाळापैकी ५० टक्के प्रवाळ नष्ट झाली आहेत.
४) सध्या जगभरामध्ये दर ३ सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदानाएवढे जंगल नष्ट होत आहे.
६) खालील विधाने विचारात घ्या :
अ) अमेझॉनच्या जंगलांमधली जी मूळची स्थानिक माती आहे, त्यात ह्यूमसची कमतरता आहे.
ब) दरवर्षी वार्याबरोबर सहारा वाळवंटातील वाळू उडून दक्षिण अमेरिकेत येते.
क) हे वाळूचे कण अमेझॉनच्या जंगलातील मातीतील ह्यूमसची कमतरता भरून काढतात.
ड) अमेझॉनचे जंगल हे पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाते.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि क बरोबर
२) ब, क आणि ड बरोबर
३) अ, ब आणि ड बरोबर
४) ब आणि ड बरोबर
७) भारतीय उपखंडातील वनांचा सर्वाधिक र्हास कोणी केला ?
१) स्वातंत्र्योत्तर काळातील वन खात्याने
२) ब्रिटिश काळातील वन खात्याने
३) ब्रिटिश काळातील खाण उद्योगाने
४) स्वातंत्र्योत्तर काळातील जलसंधारण खात्याने
८) जागतिक तापमानवाढीमुळे ध्रुवीय प्रदेशातील हिमाची जागा हरित आच्छादन घेऊ लागले आहे, कारण ..
अ) ध्रुवीय प्रदेशात सूर्यकिरणे परावर्तित होण्याऐवजी पूर्वीपेक्षा जास्त शोषली जातात.
ब) पूर्वीप्रमाणे ध्रुवीयप्रदेश सूर्यप्रकाश परावर्तित करत नाही.
क) ध्रुवीय प्रदेश हिरव्या वृक्षराजीने आच्छादला जात आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त अ आणि ब
३) फक्त अ आणि क
४) अ, ब आणि क
९) पश्रि्चम घाट जैवविविधते संदर्भात खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (प्रजाती) स्तंभ ब (प्रजातींची संख्या)
अ. सपुष्प वनस्पती I. ५०००
ब. फूलझाडे II. १४००
क. देवगांडूळ III. ८०
ड. बेडूक IV. २०
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II I IV III
2) II I III IV
3) III II IV I
4) IV III I II
१०) परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उपायासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) अन्नजाळ्याच्या शिखराच्या मदतीने
ब) परिसंस्थेतील अन्नजाळ्याचा पाया मजबूत करणे
क) मानवी हस्तक्षेप कमी करणे
ड) आवश्यकतेनुसार वनस्पतींची लागवड
पर्यायी उत्तरे :
१) विधाने अ, ब आणि क बरोबर
२) विधाने अ, ब, क आणि ड बरोबर
३) विधाने अ, ब आणि ड बरोबर
४) विधाने अ, क आणि ड बरोबर
११) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : सहारा वाळवंट हिरव्या वृक्षराजीने आच्छादले गेल्यास जागतिक तापमानवाढीच्या प्रक्रियेला त्याचा हातभार लागेल.
कारण (र) : सहारा वाळवंटाच्या वालुकामय प्रदेशातून सूर्यकिरणे परावर्तित होण्याऐवजी ती शोषली जातील.
पर्यायी उत्तरे :
१) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
२) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
३) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
४) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
१२) पश्रि्चम घाटाच्या संरक्षणासाठी संरक्षित वनांच्या १० कि.मी. परिसरातील प्रदेश इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून त्याची पूर्णपणे अंमलबजावणी कोणत्या राज्यांकडून झालेली आहे ?
१) महाराष्ट्र
२) कर्नाटक
३) केरळ
४) यापैकी नाही
१३) पश्रि्चम घाटाच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या इको-सेन्सिटिव्ह झोनबाबतखालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) डॉ. माधव गाडगीळ समितीने ६० टक्के भाग संवेदनशील म्हणून घोषित करण्याची सूचना केली.
ब) डॉ. कस्तुरीरंगन समितीने ३० टक्के भाग संवेदनशील म्हणून घोषित करण्याची सूचना केली.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ आणि ब दोन्ही
४) कोणतेही नाही
१४) पश्रि्चम घाटाच्या संवर्धनासाठी केलेल्या कोणाच्या अहवालास अनेक राज्य सरकारांनी मान्यता दिलेली आहे ?
१) पर्यावरणतज्ज्ञ
२) केंद्रीय पर्यावरण सचिव
३) अवकाशतज्ज्ञ
४) आयपीसीसी समिती
१५) ........ संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) जगातील महाजैवविविधतेने संपन्न १७ देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
ब) भारतात ३५ जैवविविधता संवेदनशील केंद्रे आहेत.
क) सह्याद्री पर्वतरांगा ७ राज्यातून जातात.
ड) सह्याद्री पर्वतरांगात ७ जैवविविधता संवेदनशील केंद्रे आहेत.
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब आणि क बरोबर
२) ब, क आणि ड बरोबर
३) अ आणि ब बरोबर
४) अ, क आणि ड बरोबर
१६) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) पर्यावरण संतुलनासाठी ३३ टक्के भूक्षेत्रावर वनांचे आच्छादन असणे आवश्यक आहे.
२) मानवी हस्तक्षेपांमुळे भारतात फक्त २० टक्के वनव्याप्त क्षेत्र शिल्लक आहे.
३) वन्यजीव व जैवविविधता संरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक असणार्या दाट वनांचे भारतातील क्षेत्रफळ ८ टक्के आहे.
४) मानवी हस्तक्षेपामुळे भारतातील नैसर्गिक परिसंस्थांची २० टक्के हानी झाली आहे.
१७) अन्नजाळ्याच्या शिखराच्या मदतीने परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करता येते, याचे खालीलपैकी कोणते उदाहरण जगप्रसिद्ध आहे?
१) आफ्रिकेतील क्रूगर नॅशनल पार्क
२) भारतातील गीर अभयारण्य
३) सिरीयातील मक्याची लागवड
४) अमेरिकेतील यलोस्टोन नॅशनल पार्क
१८) स्थानिक देशी फळांचे आणि भाज्यांचे जुने वाण नष्ट झाले आहेत आणि वेगाने नष्ट होताहेत. त्याची मुख्य कारणे ही आहेत -
अ) भारतीय बाजारात विदेशी फळांचे आणि विदेशी भाज्यांचे अतिक्रमण झाले आहे
ब) भारतीय बाजारपेठेत संकरित व सुधारित वाणांची किमत कमी आहे.
क) भारतीय बाजारपेठेत संकरित व सुधारित वाणांची जास्त मागणी असल्याने त्यांची चलती आहे.
ड) देशी फळे आणि देशी भाज्यांचा दर्जा व पोषणमूल्य कमी आहे.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि क बरोबर
२) ब, क आणि ड बरोबर
३) अ, ब आणि ड बरोबर
४) अ, क आणि ड बरोबर
१९) खालील आयोगांचा त्यांच्या स्थपनेनुसारचा योग्य कालानुक्रम लावा.
अ) डॉ. माधव गाडगीळ समिती
ब) ब्रंटलॅड कमिशन
क) डॉ. कस्तुरीरंगन
ड) नॅशनल बायोडायव्ह्रर्सिटी ऑथोरिटी
पर्यायी उत्तरे :
१) अ - ब - क - ड
२) क - अ - ड - ब
३) ब - ड - अ - क
४) ड - ब - अ - क
२०) पश्रि्चम घाट जैवविविधते संदर्भात खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (प्रजाती) स्तंभ ब (प्रजातींची संख्या)
अ. सस्तन प्राणी I. ५०८
ब. पक्षी II. १७९
क. सरिसृप प्राणी III. १३९
ड. उभयचर प्राणी IV. ९५
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III I IV
2) II I IV III
3) III I IV II
4) IV III I II
२१) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
१) अलीकडील काळात वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण पूर्वीपेक्षा ३५ टक्क्यांनी वाढले आहे.
२) १ किलो कार्बन डायऑक्साईड हा मिथेन गॅसच्या तुलनेत २५ पटींनी अधिक ग्लोबल वॉर्मिंग निर्माण करतो.
३) १ किलो मिथेन गॅस हा कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत २५ पटींनी अधिक ग्लोबल वॉर्मिंग निर्माण करतो.
४) कार्बनडाय ऑक्साईड वायू जागतिक तापमान वाढविण्यास ७५ टक्के जबाबदार आहे.
२२) सुमारे १,६०० किमी लांब सह्याद्री पर्वतरांगापैकी महाराष्ट्रात किती लांबीची डोंगररांग आहे ?
१) ५४० कि.मी.
२) ४५० कि.मी.
३) ४४० कि.मी.
४) ६४० कि.मी.
२३) सह्याद्री पर्वताबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सह्याद्रीतील जंगल ६७ टक्के होते.
ब) गेल्या ७० वर्षात सह्याद्रीतील जंगलात ३७ टक्क्यांनी घट झाली आहे.
क) सध्या सह्याद्रीत केवळ ३० टक्के जंगल शिल्लक आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त अ आणि ब
३) फक्त अ आणि क
४) अ, ब आणि क
२४) परिसंस्था ही संज्ञा सर्वप्रथम १९३५ मध्ये कोणी वापरली?
१) ए. टान्सले
२) जी. डार्विन
३) आय. न्यूटन
४) रूदरफोर्ड
२५) परिस्थितिकी शास्त्र ही संज्ञा :
a) पर्यावरण जीवशास्त्र अशीही ओळखली जाते.
b) सर्वप्रथम अर्नेस्ट हॅकेल ने प्रस्तुत केली.
c) oikos (घर) व logos (अभ्यास/शास्त्र) या दोन ग्रीक शब्दांपासून आली आहे.
d) oikos (घर) व logos (अभ्यास/शास्त्र) या दोन लॅटिन शब्दांपासून आली आहे.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
१) फक्त (a) व (b)
२) (a), (b) व (c)
३) (a),(b) व (d)
४) वरीलपैकी एकही नाही
२६) परिसंस्थेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
a) हा संपूर्णपणे जीवशास्त्रीय भाग आहे.
b) हा एक एकत्र/एक संघ भाग आहे.
c) हा प्राकृतिक पर्यावरण आणि जैविक घटकांमधील आंतरक्रियेचा अभ्यास होय.
d) हा रचनात्मक आणि कार्यात्मक पैलूंचा अभ्यास होय.
१) फक्त (a)
२) (b) आणि (c)
३) (b), (c) व (d)
४) वरील सर्व
२७) परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह :
a) एकमार्गी आहे.
b) ऊर्जा विनिमय स्तरानुसार कमी होत जातो.
c) ऊर्जा विनिमय स्तरानुसार वाढत जातो.
d) ऊर्जा विनिमय स्तरानुसार स्थिर राहतो.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
१) फक्त (a)
२) फक्त (a) आणि (b)
३) (a), (b) आणि (c)
४) (a), (b) आणि (d)
२८) अन्नसाखळीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
a) एखाद्या क्षेत्रातील ८०% वाघ कमी केल्यास तेथील वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
b) मांसभक्षक प्राणी कमी केल्यास हरणांच्या संख्येत वाढ होईल.
c) ऊर्जेच्या र्हासामुळे सर्वसाधारणपणे अन्न साखळीची लांबी ३ ते ४ अन्नपातळ्यापर्यंत मर्यादित राहते.
d) अन्न साखळ्यांची लांबी २-८ अन्नपातळ्यांपर्यत बदलते.
वरीलपैकी कोणती दोन विधाने सत्य आहेत?
१) (a), (b)
२) (b), (c)
३) (c), (d)
४) (a), (d)
२९) सजीव जे स्वत:चे अन्न स्वत: तयार करू शकत नाहीत त्यांना ........म्हणतात.
१) द्वितीय भक्षक
२) प्राथमिक भक्षक
३) विघटक
४) मांस भक्षक
३०) खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही ?
१) मेंढी
२) ससा
३) साप
४) हरिण
३१) खालीलपैकी कोणते घटक परिसंस्थेच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात?
a) अन्नजाळी
b) ऊर्जा विनिमय स्तर
c) ऊर्जा विनिमय स्तर
d) परिस्थितिकीय सुस्थाने
१) (a) फक्त (b)
२) (a), (b) आणि (c)
३) (a), (b) आणि (d)
४) वरील सर्व
३२) अन्नसाखळीतील ऊर्जा विनिमयाची प्रक्रिया गुंतागुंतीची असून ती अनेक स्रोतातून होते, तेव्हा त्याला ...... म्हणतात.
१) अन्न जाळे
२) जैव आकार
३) अन्न स्तूप
४) वरीलपैकी कोणतेही नाही
३३) पर्यावरणात राखेचे (Fly-ash) प्रदूषण कशामुळे होते?
१) ऑईल रिफायनरी
२) थर्मल पॉवर प्लँट
३) सीड प्रोसेसिंग प्लँट
४) स्ट्रिप मायनिंग
३४) २०१४ च्या पर्यावरण विकास निर्देशांकानुसार भारताला १०० पैकी ...... गुण मिळाले असून १७८ देशांमध्ये भारताचा ...... क्रमांक आहे.
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :
१) २८.०३ आणि १५३ वा
२) २९.३० आणि १५४ वा
३) ३३.३८ आणि १५६ वा
४) ३१.३३ आणि १५५ वा
३५) खालीलपैकी कोणत्या विधानांचा पर्यावरण आघात मूल्यनिर्धारण (EIA) साठी समावेश करावा ?
a) नियोजित प्रकल्पाची अंमलबजावणी होण्याआधी पर्यावरण परिस्थितींचा आढावा घेणे.
b) पर्यायी प्रकल्पांचा विचार करणे.
c) अपरिहार्य प्रतिकूल परिणामांबाबत प्रतिपादन
d) समाजासाठी नफा-नूकसानीचे मूल्यमापन करणे.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त (a), (c), (d)
२) फक्त (b), (c), (d)
३) फक्त (a), (b), (c)
४) वरील सर्व
३६) भारतात पर्यावरण व वन मंत्रालय आणि आय.आय.टी. दिल्ली यांनी एकत्रितपणे देशातील प्रदूषित शहरांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील उतरत्या क्रमात प्रदूषित शहरे कोणती?
१) चंद्रपूर - डोंबिवली - औरंगाबाद - तारापूर
२) चंद्रपूर - औरंगाबाद - डोंबिवली - तारापूर
३) तारापूर - औरंगाबाद - चंद्रपूर - डोंबिवली
४) तारापूर - चंद्रपूर - औरंगाबाद - डोंबिवली
३७) खालीलपैकी कोणती भारतीय नदी जगातील १० नष्ट होण्याच्या मार्गावरील नद्यांपैकी एक आहे?
१) यमुना
२) गंगा
३) गोदावरी
४) कृष्णा
३८) पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?
a) हुसेन सागर गोड्या पाण्याचा तलाव भोपाळ शहरात असून तो अतिशय प्रदूषित तलावांपैकी एक आहे.
b) लोकटक तलाव लडाखमध्ये असून चांग ला खिंडीच्या पलीकडे आहे.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
३९) खाली भारतातील नदी जल-प्रदूषणाबाबत काही विधाने दिली आहेत. त्यांपैकी कोणते विधान चूक आहे?
१) भारतातील निर्माण होणार्या ताज्य/टाकाऊ पाण्यापैकी फक्त २६% पाण्यावर प्रक्रिया केली जाते.
२) त्याज्य/टाकाऊ पाण्यावरील प्रक्रिया जास्तीत जास्त ८९% पर्यंतच असते.
३) महानदीच्या तीरावर सर्वांत जास्त त्याज्य/टाकाऊ पाणी सोडणारी शहरे वसली आहेत.
४) त्याज्य/टाकाऊ पाणी प्रक्रिया सर्वांत जास्त कृष्णानदी खोरे विभागात होते.
४०) पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद केव्हा स्टॉकहोम (स्वीडन) येथे आयोजित करण्यात आली होती ?
१) ५ जून १९७२
२) ५ जुलै १९७२
३) ५ जून १९७३
४) ५ ऑगस्ट १९७३
४१) जोड्या लावा :
स्तंभ - I (आंतरराष्ट्रीय पर्यावरण करार) स्तंभ - II (वर्ष)
a) ब्रंटलॅन्ड अहवाल i) १९९२
b) स्टॉकहोम ii) १९८७
c) रिओ परिषद iii) १९९७
d) क्योटो प्रोटोकॉल iv) १९७२
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iv) (ii) (i) (iii)
२) (ii) (iv) (i) (iii)
३) (ii) (iv) (iii) (i)
४) (i) (iii) (ii) (iv)
४२) खालीलपैकी कोणत्या शहरात २००७ साली वसुंधरा तास (Earth Hour) या संकल्पने अंतर्गत एक तास दिवे मालवण्याची कृती, कार्बन प्रदूषणाबद्दल जाणीव करून देण्यासाठी, अमलात आली?
१) मुंबई
२) सिडनी
३) पर्थ
४) लंडन
४३) खालीलपैकी कोणती पर्यावरणाची समस्या नैरोबी येथे १९७७ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या कॉन्फरन्समध्ये चर्चिली गेली?
१) ओझोन वायूची रिक्तता
२) कांगो नदीतील महापूर
३) वाळवंटीकरण
४) जागतिक तापमान वृद्धीमुळे वितळणारा बर्फ
४४) जोड्या लावा :
स्तंभ - I (चळवळ) स्तंभ - II (च्या संबंधी)
a) पाणी वाचवा जीवन वाचवा i) अणुशक्ती केंद्र
b) डून खाणकाम ii) युरिया प्रकल्प
c) कैगा मोहीम iii) कोळी
d) थळ-वायशेत मोहीम iv) जंगल
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iii) (iv) (ii) (i)
२) (iii) (iv) (i) (ii)
३) (iv) (iii) (i) (ii)
४) (i) (ii) (iv) (iii)
४५) खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीवन संरक्षण कायदा संमत करण्यात आला ?
१) सप्टेंबर १९७२
२) सप्टेंबर १९२७
३) सप्टेंबर १९७८
४) सप्टेंबर १९८७
४६) जोड्या लावा -
स्तंभ -I (पर्यावरण संबंधित कायदे) स्तंभ-II (वर्ष)
a) पर्यावरण (संरक्षण) कायदा i) १९७४
b) हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा ii) १९७२
c) पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा iii) १९८६
d) वन्यजीव संरक्षण कायदा iv) १९८०
e) वन संरक्षण कायदा v) १९८१
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d) (e)
१) (ii) (iv) (iii) (v) (i)
२) (ii) (iii) (iv) (v) (i)
३) (iii) (v) (i) (ii) (iv)
४) (iii) (v) (iv) (ii) (i)
४७) जोड्या लावा :
स्तंभ-I (पर्यावरण विधि स्थापना) स्तंभ-II (वर्ष)
a) पर्यावरण संरक्षण कायदा i) १९९८
b) पर्यावरण स्नेही उत्पादनावर खूण पट्टी ii) १९८६
c) जैविक कचरा निजोजन iii) १९९९
d) पुन्हा वापरण्यासाठी प्लॅस्टीकचे उत्पादन व वापर नियम iv) १९९१
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (iii) (iv) (ii)
२) (iv) (ii) (i) (iii)
३) (ii) (iv) (i) (iii)
४) (ii) (iv) (iii) (i)
४८) जोड्या लावा :
स्तंभ-I (पर्यावरण विधि स्थापना) स्तंभ-II (वर्षे)
a) महापालिका घन कचरा व्यवस्थापन नियम i) १९८८
b) राष्ट्रीय वन धोरण ii) २००२
c) जैविविविधता कायदा iii) २०००
d) पर्यावरण (संरक्षण) कायदा iv) १९८६
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (i) (ii)
२) (iii) (i) (ii) (iv)
३) (iii) (ii) (i) (iv)
४) (ii) (iv) (iii) (i)
४९) पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ हा त्या दिवशी अस्तित्वात आला की ज्या दिवशी पुढील भूतपूर्व पंतप्रधान यांचा जन्म दिवस आहे :
१) लाल बहादूर शास्त्री
२) इंदिरा गांधी
३) राजीव गांधी
४) पी. व्ही. नरसिंह राव
५०) १ एप्रिल २०१८ रोजी BS-VI इंधन वापरणारे भारतातील पहिले शहर कोणते ?
१) पटना
२) रायपूर
३) दिल्ली
४) आग्रा
५१) खालीलपैकी हवा प्रदूषणाचे प्रतिबंधात्मक उपाय कोणते?
a) ऊर्जेचा कमी वापर
b) ऊर्जेचा अधिक सक्षम वापर
c) सौर व पवन ऊर्जा वापर
d) प्रदूषण सहनशील वनस्पतींची लागवड करणे
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b) फक्त
२) (c) फक्त
३) (d) फक्त
४) वरीलपैकी सर्व
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१८१)
१-१
२-३
३-१
४-३
५-२
६-४
७-२
८-४
९-१
१०-२
११-१
१२-४
१३-४
१४-३
१५-३
१६-४
१७-४
१८-१
१९-३
२०-३
२१-३
२२-३
२३-१
२४-१
२५-२
२६-३
२७-२
२८-२
२९-२
३०-३
३१-४
३२-१
३३-२
३४-४
३५-४
३६-१
३७-२
३८-४
३९-३
४०-१
४१-२
४२-२
४३-३
४४-२
४५-१
४६-३
४७-३
४८-२
४९-२
५०-३
५१-४