स्वातंत्र्यवीर सावरकर / प्रश्‍नमंजुषा (१८०)

  •  स्वातंत्र्यवीर सावरकर / प्रश्‍नमंजुषा (१८०)

    स्वातंत्र्यवीर सावरकर / प्रश्‍नमंजुषा (१८०)

    • 03 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 1766 Views
    • 1 Shares
     प्रश्‍नमंजुषा (१८०)
     
     विनायक दा. सावरकर (१८८३-१९६६)
     
    १)  पुढीलपैकी कोणत्या गोष्टी वि. दा. सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केल्या?
        अ) विविध जातीतील स्त्रियांचे हळदी-कुंकू कार्यक्रम योजले.
        ब) स्पृश्य-अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम योजले.
        क) आंतर-जातीय विवाहांना प्रोत्साहन दिले.
        ड) धर्मांतर केलेल्या हिंदुना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबवली.
        पर्यायी उत्तरे :
        १) अ,
        २) ब फक्त
        ३) ब, क आणि ड
        ४) वरील सर्व

    २)  स्वा. वि. दा. सावरकर आपल्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर‘ या ग्रंथात १८५७ च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध असे का संबोधतात. ?               
        १) त्यांच्या मते या घटनेची स्वधर्म व स्वराज्य ही दोन महत्त्वाची कारणे आहेत.
        २) या उठावात भारतीय लष्कराचा सहभाग होता.     
        ३) या उठावास सर्व भारतीयांचा पाठिंबा होता.
        ४) हा उठाव देशव्यापी होता.

    ३)  खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
        अ) १९३७ ते १९४२ या काळात वि. दा. सावरकर हिंदू महासभेचं अध्यक्ष होते.
        ब)  १९२६ ते १९३१ या काळात केशव बळीराम हेडगेवार हिंदू महासभेचे सचिव होते.
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ
        २) फक्त ब
        ३) अ आणि ब दोन्ही
        ४) कोणतेही नाही

    ४)  सावरकरांना अस्पृश्यता नष्ट करायची होती. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी ह्या सर्व भारतीयांना राजकीय, सामाजिक, नागरी आणि धार्मिक क्षेत्रात समान अधिकार, हे त्यांचे राजकीय उद्दिष्ट होते- याबाबतचा उल्लेख कोठे आढळतो ?
        १) सावरकरांच्या ‘ऐक भविष्याला’ या कवितेत
        २) ‘हिंदूंची सद्यस्थिती व कर्तव्ये’ ह्या विषयावर त्यांनी दिलेल्या भाषणात
        ३)  ’द आरएसएस-आयकॉन्स ऑफ द इंडियन राइट’ या पुस्तकात
        ४) ’हिंदू नॅशनॅलिझम : हिंदुत्व, हू इज अ हिंदू’ या पुस्तकात

    ५)  सावरकर बंधू ज्यांनी अभिनव भारताची स्थापना केली त्यांच्याबाबत खालीलपैकी कोणते चुकीचे आहे?
        a) विनायक सावरकरांवर इटालियन देशभक्त मॅझिनीचा खूप प्रभाव होता, ज्यांचे आत्मचरित्र त्यांनी भाषांतरित       केले.
        b) बाबाराव सावरकरांनाही त्यांच्या प्रक्षोभक कारवायांकरिता अंदमानात डांबले गेले होते, ज्यामुळे (ज्याविरुद्ध) कान्हेरेंनी जॅकसनला गोळ्या घालून ठार केले.
        १) केवल (b)
        २) केवल (a)
        ३) (a) (b) पैकी एकही नाही
              ४) (a) (b)  दोन्ही

    ६)  जोसेफ मॅझिनीचे चरित्रकोणी लिहिले?
        १) लोकमान्य टिळक
        २) गो. कृ. गोखले
        ३) वि. दा. सावरकर
        ४) ग. ह. खरे

    ७)  स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या विज्ञाननिष्ठेबाबत खालील विधाने विचारात घ्या :
        सावरकर यांच्या मते विज्ञाननिष्ठा म्हणजे .....
        अ) सदसद्विवेकबुध्दीचा उपयोग करून एखाद्या गोष्टीची निष्कर्ष काढायची पध्दत किंवा प्रक्रिया 
        ब) शोधक, जिज्ञासू व चिकित्सक वृत्तीने एखादी गोष्ट बुद्धी व तर्काच्या कसोटीवर पडताळून मिळणार्‍या निष्कर्षांचा मोकळ्या मनाने स्वीकार
        क) वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानाचा विकास, यांत्रिकीकरण यांचा समाजासाठी वापर
        ड) भारतीय राज्यघटनेचे कलम ५१अ (ह) मध्ये नमूद केल्याप्रमाणे मानवतावाद, चिकित्सक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास
        पर्यायी उत्तरे :
        १) अ, ब आणि क बरोबर         
        २)  ब, क आणि ड बरोबर
        ३) अ आणि ब बरोबर
        ४)  अ, क आणि ड बरोबर

    ८)  होऊनिया मुक्त स्वतः, करील मुक्त ती जगता, ममतेच्या समतेच्या सृजनरक्षणाला, कोटी कोटी हिंदु जाती चालली रणालाही कविता कोणाची आहे ?
        १) रविंद्रनाथ टागोर
        २) अरविंद घोष
        ३) वि. दा. सावरकर
        ४) वि. वा. शिरवाडकर

    ९)  ’अभिनव भारत’चे उद्देश काय होते?
        A) परदेशातून तस्करी करून हत्यारे मिळविणे.
        B) इंग्रज विरोधी विचारांचा सैनिकात प्रचार करणे.
        C) स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या संकल्पना लोकमानसात रुजविणे.
        D) जेव्हा शक्य आहे तेव्हा गुरिल्ला डावपेच अवलंबिणे.
        १) (A) व (C)
        २) (A), (B) व (C)
        ३) (B), (C) व (D)              
        ४) (A), (B), (C) व (D)

    १०) १८५७ चे ‘स्वातंत्र्य समर’ हा ग्रंथ ...... यांनी लिहिला.
        १) मोतीलाल नेहरू
        २) महात्मा गांधी
        ३) वि. दा. सावरकर
        ४) विनोबा भावे

    ११) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
        a) विनायक दा. सावरकर यांनी पंढरपूरच्या प्रसिद्ध मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवून देण्यास आमरण उपोषण केले.
        b) पांडुरंग सदाशिव साने यांनी अस्पृश्यतेसारख्या दुष्ट प्रवृत्तींच्या विरोधात सामाजिक चळवळ केली.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही

    १२) ’‘सुधारक जुन्याच बांधकामाची पुनर्बांधणी करतो, तर क्रांतिकारक जुनी इमारत उद्ध्वस्त करतो व नव्याची उभारणी करतो. सावरकर हे नुसते समाजसुधारक नव्हते, तर ते एक कृतिशील समाजक्रांतिकारक होते.असे उदगार कोणी काढले होते ?
        १) मलकान राजपूत              
        २) विनायक सिताराम सरवटे
        ३) गोळवलकर गुरूजी
        ४) धनंजय कीर

    १३) सावरकरांची भाषणे प्रामुख्याने यावर आधारित असत-
        अ) हिंदू-मुस्लीम संबंध
        ब) आंतरराष्ट्रीय स्थिती
        क) हिंदु धर्मातील सुधारणा
        वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ
        २) फक्त अ आणि ब
        ३) फक्त अ आणि क
        ४) अ, ब आणि क

    १४) १८५७ च्या उठावास ‘स्वातंत्र्ययुद्ध’ असे कोणी संबोधिले ?
        १) प्रा. न. र. फाटक
        २) पी. ई. रॉबर्टस
        ३) डॉ. आर. सी. मुजुमदार        
        ४) वि. दा. सावरकर

    १५) खालीलपैकी कोणत्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला होता ?
        १) १८५७ चे स्वातंत्र्य समर
        २) जात्युच्छेदक निबंध
        ३) भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
        ४) विज्ञाननिष्ठ निबंध

    १६) जर्मनीतला नाझीवाद आणि इटलीतला फॅसिझमला विरोध केला म्हणून सावरकरांनी कोणावर टीका केली होती ?
        १) सुभाषचंद्र बोस
        २) महात्मा गांधीजी
        ३)  पंडित नेहरू
        ४) गौतम राजपूत

    १७) नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांच्या खुनात खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली?
        अ) अनंत कान्हेरे
        ब) विनायक देशपांडे
        क) कृष्णाजी कर्वे
        ड) विनायक आपटे
        पर्याय -
        १) फक्त अ
        २) फक्त अ आणि ब
        ३) फक्त अ, , आणि क
        ४) फक्त अ, , क आणि ड

    १८) स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वा. सावरकरांनी सोलापूरला केव्हा भेट दिली होती?
        १) १० सप्टेंबर, १९३८
        २) १५ डिसेंबर, १९३९
        ३) २१ जानेवारी, १९४०
        ४) ८ ऑगस्ट, १९३७

    १९) अलाहाबाद येथे अखिल भारतीय हिंदू महासभा स्थापन करण्यात आली कारण -
              a) ब्रिटिशांना विरोध करण         
              b) हिंदूचे धर्मांतर थांबविणे 
              c) अस्पृश्यता निवारण करणे 
              d) काँग्रेसला मदत करणे
        पर्यायी उत्तरे -
        १) (a) आणि (c)
              २) (b) आणि (d)
        ३) (a) आणि (b)
        ४) (c) आणि (d)

    २०) सन १९०० मध्ये नाशिक मध्ये स्थापन झालेल्या मित्र मेळासंघटनेबाबत काय खरे नाही ?
        १) वि. दा. सावरकर तिचे क्रियाशील सभासद होते.
        २) ती एक गुप्त संघटना होती.
        ३) ती मवाळांची संघटना होती  
        ४) तिचे नंतर रूपांतर अभिनव भारत या संस्थेत झाले.

    २१) भारताच्या फाळणीला खालीलपैकी कोणत्या संघटनांनी विरोध केला?
        a) हिंदू महासभा
        b) समाजवादी पक्ष
        c) शीख समाज
        d) समतावादी पक्ष
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b) फक्त            
        २) (b), (c) आणि (d) फक्त
        ३) (a), (b) आणि (c) फक्त
        ४) (a), (c) आणि (d) फक्त

    २२) पुढीलपैकी कोणत्या कारणांसाठी १८९९ मध्ये नाशिक येथे ‘मित्रमेळा’ ची स्थापना केली गेली?
        १) गणपती उत्सव साजरा करण्यासाठी
        २) शिवाजी जयंती साजरी करण्यासाठी
        ३) त्र्यंबक उत्सव साजरा करण्यासाठी
        ४) सप्तश्रृंगी उत्सव साजरा करण्यासाठी

    २३) देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ’आत्मनिष्ठ युवती’ समाजाची स्थापना नाशिकमध्ये कोणी केली?
              a) श्रीमती दुर्गादेवी बोहरा
        b) कल्पना दत्त
              c) सौ. येसू बाबाराव सावरकर
              d) सौ. लक्ष्मीबाई दातार
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त (c) बरोबर आहे.         
        २) (a) (b) दोन्ही बरोबर आहेत.
        ३) वरील सर्व बरोबर आहेत.
        ४) वरील सर्व चुकीचे आहेत.

    २४) सावरकर बंधूंनी सन १९०४ मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली?
        १) क्रांतीसेना
        २) अभिनव भारत
        ३) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
        ४) अनुशीलन समिती

    २५) ‘अभिनव भारत‘ या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली ?
        १) बाळ गंगाधर टिळक
        २) चाफेकर बंधू
        ३) लहुजी साळवे
        ४) वि. दा. सावरकर

    २६) ‘अभिनव भारत’ ही संघटना ...... यांनी स्थापन केली.
        १) अरविंद घोष
        २) वि. दा. सावरकर
        ३) फिरोजशहा मेहता
        ४) राजा राम चिपळूणकर

    २७) ......... संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती.
        १) बॉम्बे असोसिएशन
        २) होमरूल लीग
        ३) अभिनव भारत
        ४) लँड होल्डर्स असोसिएशन

    २८) ‘आत्मनिष्ठ युवती समाजाची‘ स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती ?
        १) दुर्गादेवी बोहरा
        २) येसूबाई गणेश सावरकर
        ३) वीणा दास
        ४) सुहासिनी गांगुली

    २९) श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये शिक्षणाकरिता कोणत्या भारतीय विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळवून दिली?
        १) गणेश दामोदर सावरकर        
        २) विनायक दामोदर सावरकर     
        ३) सुभाषचंद्र बोस
        ४) सुरेंद्रनाथ बॅनर्जी

    ३०) ...... यांना इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठीत शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती.
        १) खुदीराम बोस  
        २) गोपाळ कृष्ण गोखले          
        ३) विनायक दामोदर सावरकर
        ४) श्यामजी कृष्ण वर्मा

    ३१) धार्मिक सलोखा रहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकांनी १९०६ मध्ये ........... जयंती साजरी केली.
        १) कबीर
        २) मॅझिनी
        ३) आदिलशहा
        ४) अकबर

    ३२) हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावेअसे कोणी सुचविले?
        १) गोळवलकर गुरूजी
        २) राजाराम शास्त्री भागवत
        ३) वि. का. राजवाड
        ४) वि. दा. सावरकर

    ३३) नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली?
        १) गणेश चाफेकर
        २) वि. दा. सावरकर
        ३) अनंत कान्हेरे
        ४) विष्णू गणेश पिंगळे

    ३४) जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली ?
        १) कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे
        २) ब्रह्मगिरी बुवा, गणेश वैद्य
        ३) दत्तात्रय पांडुरंग जोशी, सिद्धनाथ काणे
        ४) वामन फडके, निरंजन पाल

    ३५) जॅक्सनच्या खुनासाठी पुढीलपैकी कोणाला फाशी दिले नाही?
        १) अनंत लक्ष्मण कान्हेरे
        २) दत्तात्रय पांडुरंग जोशी         
        ३) कृष्णाजी गोपाळ कर्वे          
        ४) विनायक नारायण देशपांडे

    ३६) दि. २१ डिसेंबर १९०९ रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?
        १) विं. दा. सावरकर
        २) अनंत कान्हेरे
        ३) विनायक दामोदर चाफेकर
        ४) गणेश दामोदर चाफेकर

    ३७) नागपूर येथे हिंदू महासभेची स्थापना कधी झाली?
        १) ११ नोव्हेंबर १९२३
        २) ११ डिसेंबर १९२३
        ३) २३ जानेवारी १९२४
        ४) ०२ मार्च १९२४

    ३८) हिंदू महासभेचा अतिशय सनसनाटी कार्यक्रम म्हणजे साडेचार लाख ....... ज्यांनी इस्लामाचा स्विकार केला होता आणि ज्यांना पूर्वीच्या धर्मात येण्याची इच्छा होती त्यांनी पुन्हा धर्मात आणणे हा होता.
        १)  चौहान राजपूत
        २) राठोड राजपूत
        ३) मलकान राजपूत
        ४) गौतम राजपूत

    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१८०)
    १-४
    २-१
    ३-३
    ४-२
    ५-३
    ६-३
    ७-३
    ८-३
    ९-४
    १०-३
    ११-४
    १२-४
    १३-२
    १४-४
    १५-१
    १६-३
    १७-३
    १८-४
    १९-३
    २०-३
    २१-३
    २२-१
    २३-१
    २४-२
    २५-४
    २६-२
    २७-३
    २८-२
    २९-२
    ३०-३
    ३१-४
    ३२-४
    ३३-३
    ३४-१
    ३५-२
    ३६-२
    ३७-१
    ३८-३
     

Share this story

Total Shares : 1 Total Views : 1766