अहिल्यादेवी होळकर / प्रश्‍नमंजुषा (१७९)

  •  अहिल्यादेवी होळकर / प्रश्‍नमंजुषा (१७९)

    अहिल्यादेवी होळकर / प्रश्‍नमंजुषा (१७९)

    • 03 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 703 Views
    • 1 Shares
    प्रश्‍नमंजुषा (१७९)
     
    अहिल्यादेवी होळकर (१७२५-९५)
     
    १)  इंदूरचे राजे खंडेराव होळकर आणि अहिल्यादेवींचा विवाह ... येथे झाला होता.
        १) अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे
        २) मध्यप्रदेशातील इंदूर येथे
        ३) पुण्यातील शिंद्यांची छत्री येथे
        ४)  पुण्यातील शनिवारवाडा येथे

    २)  खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
        अ) अहिल्यादेवी यांनी दरोडेखोरांचा बंदोबस्त करणार्या भिल्ल यशवंतराव फणसे यांच्याशी आपली मुलगी मुक्ताचा विवाह केला होता.
        ब) अहिल्यादेवींनी दरोडेखोरांचा जो कोणी बंदोबस्त करील त्याच्याशी माझी मुलगी मुक्ताचा विवाह लावला जाईल अशी दवंडी दिली होती.
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ
        २) फक्त ब
        ३) अ आणि ब दोन्ही
        ४) कोणतेही नाही

    ३)  कोणत्या राज्यकर्त्याने वृक्षतोड करणार्‍यास शिक्षेची तरतूद केली व प्रत्येक शेतकर्याने २० झाडे लावलीच पाहिजेत, असा वटहुकूम काढला होता ?
        १) छत्रपती शाहू महाराज
        २) सयाजीराव गायकवाड
        ३) अहिल्यादेवी होळकर
        ४) सातारचे पंतप्रतिनिधी

    ४)  खालील जोड्या अचूक जुळवा :
        गट -अ (अहिल्यादेवीशी नाते)       गट-ब (नाव)
        a) अहिल्यादेवींचे सासरे             (i) खंडेराव
        b) अहिल्यादेवींचे जावई            (ii) मालेराव
        c) अहिल्यादेवींचे पुत्र               (iii) मल्हारराव
        d) अहिल्यादेवींचे पती              (iv) यशवंतराव
        पर्यायी उत्तरे :
                       (a)          (b)          (c)          (d)                                                        
        १)  (i)           (ii)          (iii)         (iv)                                
        २)  (iv)         (i)           (ii)          (iii)
        ३)  (iii)         (iv)         (i)           (ii)                                 
        ४)  (iii)         (iv)         (ii)          (iv)

    ५)  खालीलपैकी कोणत्या संस्थानात, शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात जलसंवर्धन व जलवितरण विभाग स्थापन केला गेला होता ?
        १)  कोल्हापूर संस्थान
        २)  बडोदा संस्थान
        ३)  ग्वाल्हेरचे  संस्थान
        ४)  इंदूरचे संस्थान

    ६)  ‘’याद राखा! ही अहिल्या अबला नाही, प्रेमाने आलात तर हत्तीवरून मिरवणूक काढेल आणि वेगळे काही केलात तर त्याच हत्तीच्या पायाखाली चिरडेन,” असे अहिल्यादेवी होळकरांनी कोणत्या राज्यकर्त्यांना बजावले होते ?
        अ) ब्रिटिश अधिकारी
        ब) राघोबादादा पेशवे
        क) महादजी शिंदे
        वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त क
        २) फक्त अ आणि ब
        ३) फक्त अ आणि क
        ४) अ, ब आणि क

    ७)  अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
        १) त्यांनी पती खंडेरावांना २५ मोहरा दंड ठोठावून तो त्यांच्या खासगीतून वसूल केला.
        २) इंदोरचे सुभेदार तुकोजी होळकरांच्या मुलास त्यांनी तुरुंगात डांबले होते.
        ३) राज्यातील पक्ष्यांसाठी त्या शेतकर्यांकडून शेतपिके विकत घेत.
        ४) वरीलपैकी नाही.

    ८)  ३१ मे १७२५ साली अहिल्यादेवींचा जन्म चौंडी येथे झाला, हे स्थळ सध्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?
        १) बुलढाणा जिल्ह्यात
        २) जळगाव जिल्ह्यात
        ३) जालना जिल्ह्यात
        ४) अहमदनगर जिल्ह्यात

    ९)  अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या समाजसुधारणासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
        अ) त्यांनी सती प्रथा, बालविवाहाला विरोध केला.
        ब) शुभकार्याची सुरुवात बळी देऊन करण्याऐवजी नारळ फोडून करण्यास सुरुवात केली.
        क) त्यांनी विधवा विवाहाला मान्यता दिली.          
        ड) राज्यात धर्मातराला बंदी घातली.
        पर्यायी उत्तरे :
        १) विधाने अ, ब आणि क बरोबर
        २) विधाने ब, क आणि ड बरोबर
        ३) विधाने अ, ब आणि ड बरोबर
        ४) विधाने अ, क आणि ड बरोबर

    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१७९)
    १-४
    २-३
    ३-३
    ४-४
    ५-४
    ६-१
    ७-४
    ८-४
    ९-१

Share this story

Total Shares : 1 Total Views : 703