महाराष्ट्राचा कृषी भूगोल / प्रश्नमंजुषा (१७७)
- 01 Jun 2021
- Posted By : Study Circle
- 14525 Views
- 14 Shares
महाराष्ट्राचा कृषी भूगोल / प्रश्नमंजुषा (१७७)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”महाराष्ट्राचा कृषी भूगोल” यावर अनेक प्रश्न विचारले जातात. सदर लेखात महाराष्ट्र राज्यातील मृदा, पीके, जमीन वापर, जलसिंचन, मृदा व जलसंधारण, फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय आणि त्यावर विचारले गेलेले प्रश्न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
३.१ कृषि परिसंस्था :
* परिसंस्थेची संकल्पना, रचना आणि कार्ये
* परिसंस्थेतील उर्जा प्रवाह
* परिसंस्थेचे प्रकार आणि गुणधर्म
* संवर्धित शेती, सेंद्रीय शेती, अतिसूक्ष्म तंत्रज्ञान (नॅनो टेक्नॉलॉजी) आणि अचूक/काटेकोर शेती
* नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी मानवाची भूमिका
* पिक उत्पादनासंबंधीत पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी
३.२ मृदा :
* मृदा : एक नैसर्गिक घटक, मृदाविषयी अध्यापनशास्त्रीय व भूमीशास्त्रीय संकल्पना.
* मृदानिर्मिती : मृदा निर्मिती करणारे खडक आणि खनिजे
* मृदा तयार होण्याची प्रक्रिया व कारके
* जमीनीचे गुणधर्म - भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म
* जमीनीचा उभा छेद आणि मृदा घटक
* जमीन (मृदा) वनस्पती पोषक अन्नद्रव्यांचा स्रोत : आवश्यक आणि लाभदायक वनस्पती पोषक अन्नद्रव्ये आणि त्यांची कार्ये, जमीनीतील पोषक वनस्पती अन्नद्रव्यांची स्वरूप
* जमीनीतील सेंद्रीय पदार्थ : स्रोत, स्वरूपे, गुणधर्म, जमीनीतील सेंद्रीय पदार्थांवरील परिणामकारक घटक, सेंद्रीय पदार्थांचे महत्त्व आणि जमीनीच्या गुणधर्मावर होणारे परिणाम.
* जमीनीतील सजीव सृष्टी : स्थूल आणि सूक्ष्म वनस्पती आणि प्राणी, त्यांचे जमिन आणि वनस्पतीवरील लाभदायक व हानीकारक परिणाम
* खराब/समस्याग्रस्त जमिनी आणि त्या लागवडी योग्य करण्यासाठी उपाययोजना
* रिमोट सेन्सींग आणि जीआयएस यांचा खराब/समस्याग्रस्त जमीनीचे निदान आणि व्यवस्थापनाकरीता वापर
* जमिनीची धूप, धुपीचे प्रकार आणि धूप प्रतिबंधक उपाय
३.३ जलव्यवस्थापन :
* जल विज्ञान चक्र
* पावसावलंबी आणि कोरडवाहू शेती
* जलसंधारणाच्या पद्धती
* पाण्याचा ताण/दुष्काळ आणि पीक निवाररण
* पावसाचे पाणी अडवणे आणि साठवणे
* पाणलोट क्षेत्राची संकल्पना, उद्दिष्टट्ये, तत्त्व, घटक आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनावर परिणाम करणारी कारके
* सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता, प्रदूषण आणि औद्योगिक दुषित पाण्याचा परिणाम
* पाणथळ जमिनीचे जलनिस्सारण
* सिंचनाचे वेळापत्रक ठरविणारे निकष, पाणी वापराची आणि सिंचन कार्यक्षमता
* नद्यांची आंतरजोडणी (नद्या जोड प्रकल्प)
* सिंचन आणि पिकांना लागणारे पाणी
* सिंचन पद्धती आणि सिंचनाबरोबर/सिंचनाद्वारे खते देणे
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
(४) कृषी भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
१) कृषी परिसंस्था
२) मृदा
३) जलव्यवस्थापन
४) महाराष्ट्रातील मासेमारी/मत्स्य व्यवसाय
५) फलोद्यान
६) पशुसंवर्धन
(१) कृषी परिसंस्था
१) कृषी परिस्थितिकी
१) पीकवाढीवर परिणाम करणारे घटक
२) महाराष्ट्रातील शेती
१) शेतीचे प्रकार, सेंद्रिय, शाश्वत व संवर्धित शेती
२) जमिनीची मशागत व तण व्यवस्थापन
३) महाराष्ट्रातील पीके
१) पिकांचे प्रकार, जाती व संशोधन
२) लागवडीखालील क्षेत्र व पीकवितरण
३) पिकांचे उत्पादन व उत्पादकता
४) पिक उत्पादनासंबंधीत पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी
(२) मृदा
१) मृदा - तिचे प्रकार आणि वितरण
२) मृदा निर्मिती व तिचे घटक
३) जमिनीचे गुणधर्म आणि वापर
४) जमिनीतील वनस्पती पोषक अन्नद्रव्यांचा स्रोत
५) जमिनीतील सेंद्रीय पदार्थ, सजीव सृष्टी व खते
६) खराब/समस्याग्रस्त जमिनी
७) जमिनीची धूप, प्रकार आणि धूप प्रतिबंधक उपाय
८) मृदासंवर्धन
(३) जलव्यवस्थापन
१) जल विज्ञानचक्र व जलव्यवस्थापन
२) जलसंधारणाच्या पद्धती
३) जलस्रोत, पाणलोट क्षेत्र व धरणे
४) सिंचन पद्धती - प्रकार, फायदे तोटे
५) सिंचनाचे वेळापत्रक व पिकांना लागणारे पाणी
६) दुष्काळ आणि आणि कोरडवाहू शेती
७) सिंचन योजना व उपक्रम
(४) महाराष्ट्रातील मासेमारी/मत्स्य व्यवसाय
१) भूप्रदेशाअंतर्गत मासेमारी
२) अरबी सागरातील मासेमारी
३) कोळी लोकांच्या समस्या
४) मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण
(५) फलोद्यान
(६) पशुसंवर्धन
(१) कृषी परिसंस्था
(१) कृषी परिस्थितिकी
१) कृषि परिस्थितिकीय पद्धतीबाबत खालीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ?
a) मशागतीची कमी तीव्रता
b) पिकांची जास्त विभिन्नता
c) जास्त पेट्रोलवर अवलंबन
d) मजुरांची कमी गरज
१) फक्त (a)
२) (a) आणि (b)
३) (b) आणि (d)
४) (c) आणि (d)
२) परिस्थितिकीय शेती ही ........ प्रकारातील पीक उत्पादन पद्धती आहे.
a) बहु-स्तरीय
b) बहु-घडीय
c) बहु-उपयोगी
d) सर्वसमावेशक
खालीलपैकी अचूक पर्याय कोणते ?
१) फक्त (a)
२) फक्त (d)
३) (a),(b) आणि (c)
४) (a),(b),(c), (d)
३) खालीलपैकी कोणते मायक्रोफॉना आहे?
१) बॅक्टेरिया
२) निमॅटोडस्
३) अॅक्टिनोमायसेटस
४) फंगी
४) काही वनस्पतींमध्ये पानांच्या कडा किंवा टोक यामधून काही प्रमाणात थेंबांच्या स्वरुपात पाण्याचा हृास होतो. या प्रक्रियेला .......... म्हणतात.
१) अॅबसॉर्पशन (शोषण)
२) अॅडसॉर्पशन
३) ऑसमॉसीस (परासरण)
४) गटेशन
५) जमिनीच्या वरच्या थरात झाडे/पिके घेतली जातात त्यास ........... असे संबोधतात.
१) जिनेटीझम
२) जीओक्रॉपींग
३) जेस्ट्रोपीझम
४) जिओपोनिक्स
पीकवाढीवर परिणाम करणारे घटक
१) झाडांच्या वाढीवर परिणाम करणार्या अॅन्थ्रोपीक (Anthropic) घटकामध्ये समावेश होतो?
१) मानवाचा
२) जमिनीचा
३) वातावरणाचा
४) अनुवंशिकतेचा
२) हवामानामध्ये कोणते घटक पीक उत्पादन वा विविध पीक लागवड पद्धती प्रभावित करतात?
१) तापमान, ओलावा, वारा, प्रकाश
२) वारा, प्रकाश, भौगोलिक रचना, माती
३) जमिनीतील पाणी, जमिनीचे तापमान, पाऊस, माती
४) भौगोलिक रचना, समुद्रसपाटीपासूनची उंची, वारा, पाऊस
३) खालीलपैकी कोणत्या घटकाचा वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण, वाढ व उत्पन्न यासाठी उपयोगी ठरणार्या वितंचक (एनझाइम) निर्मितीवर होतो?
१) वार्याच वेग
२) पालाश
३) सूर्यप्रकाश
४) पाण्याचे रेणू
४) खालीलपैकी कोणत्या हवामान घटकानुसार लाँग-डे, शॉर्ट-डे आणि डे-न्यूट्रल वनस्पती ठरवल्या जातात?
१) हवेचा दाब
२) आर्द्रता
३) तापमान
४) सर्वांत महत्त्वाचा घटक वर नमूद नाही
५) खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व पीके ही दिवस तटस्थ पीके (डे न्यूट्रल क्रॉप) आहेत?
a) मका, भात, वाटाणा
b) गहू, रताळी, भात
c) वाटाणा, कपाशी, गहू
d) टोमॅटो, वाटाणा, कपाशी
पर्यायी उत्तरे :
१) (a) व (d)
२) (b) व (c)
३) (c) व (a)
४) (d) फक्त
६) दररोज लागणार्या प्रकाशाच्या एकूण कालावधीनुसार, ......... हे तटस्थ वनस्पतीचे उदाहरण आहे.
१) निकोटियाना टॅबॅकम
२) ब्रासीका रॅपा
३) सोरगम व्हलगेर
४) कॅनाबीस सटायव्हा
७) जास्त प्रकाश संश्लेषण व जास्त पाणी वापर क्षमता योग्य तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असताना कोणत्या वनस्पतीमध्ये आढळते?
१) सी३ वनस्पती
२) सी४ वनस्पती
३) कॅम वनस्पती
४) वरील (१), (२) व (३)
८) कोणत्या प्रकारच्या वनस्पतींना अवर्षण प्रतिकारक्षम संबोधले जाते ?
१) सी १
२) सी २
३) सी ३
४) सी ४
९) भात पीकाच्या सर्वोत्तम वाढीसाठी किती तापमान लागते?
१) १२ ते १८०C
२) २० ते ३७.५०C
३) २६ ते ४००C
४) १५ ते ४१.५०C
१०) तंबाखू बियाण्याच्या उगवणीकरिता सर्वात अनुकूल तापमान ........... होय.
१) २००C
२) २८०C
३) ३२०C
४) २५०C
११) कोणते झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही ?
१) गुलमोहर
२) बाभूळ
३) काळा सिरस
४) सुरू
(२) महाराष्ट्रातील शेती
(१) शेतीचे प्रकार, सेंद्रिय, शाश्वत व संवर्धित शेती
१) आधुनिक शेतीचे शाश्वत शेतीमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला साधारण किती कालावधी लागतो ?
१) ३ ते ६ वर्ष
२) १ ते २ वर्ष
३) ९ ते १० वर्ष
४) ६ ते ९ वर्ष
२) सखोल शेती या शेतीप्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या ?
अ) शेतीचा लहान आकार
ब) मर्यादित यांत्रिकीकरण
क) मनुष्य बळाचा किमान वापर
१) फक्त अ आणि ब
२) फक्त ब आणि क
३) फक्त अ आणि क
४) तिन्ही अ, ब आणि क
३) खालील (अ) आणि (ब) ही विधाने वाचून योग्य पर्याय निवडा -
अ) मुंबईमध्ये सखोल शेती केली जाते.
ब) जमिनीचे मोठे भाडेतत्त्व शेतकर्याला कमी काळात उत्पादन देणारी पिके घ्यायला लावतो.
१) (अ) आणि (ब) ही दोन्ही विधाने सत्य असून (ब) हे (अ) ची कारणमीमांसा देते.
२) (अ) आणि (ब) ही दोन्ही विधाने सत्य असली तरी (ब) हे (अ) ची योग्य कारणमीमांसा देत नाही.
३) (अ) सत्य असून (ब) चूक आहे.
४) (अ) चूक असून (ब) सत्य आहे.
४) कोणत्या कृषी वानिकी पद्धतीमध्ये पिके, फळझाडे आणि बहुउद्देशीय झाडे एकत्रितरीत्या घेतली जातात ?
१) कृषी उद्यान वनरोपण
२) कृषी उद्यान कुरण
३) कृषी वनरोपण
४) कृषी वनीय कुरण
स्थलांतरीत शेती
१) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत ?
अ) झुम लागवड कृषिवन लागवडीची पद्धत आहे.
ब) टाऊंग्या (Taungya) कृषिवन लागवडीची पद्धत आहे.
क) नारळाच्या झाडाखालील केळीचे अंतरपीक ही कृषिवन लागवडीची पद्धत आहे.
१) फक्त (अ)
२) फक्त (ब)
३) (ब) आणि (क)
४) (अ) आणि (ब)
२) जोड्या जुळवा :
(प्रदेश/राज्य) (स्थलांतरित शेतीचे नाव)
a) पश्चिम घाट i) पेंडा
b) मेघालय ii) कुमरी
c) मध्य प्रदेश iii) पोडू
d) ओरिसा iv) झूम
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (iii) (iv) (i)
२) (ii) (iv) (i) (iii)
३) (iii) (ii) (iv) (i)
४) (ii) (i) (iv) (iii)
३) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित शेती केली जाते?
a) चंद्रपूर
b) बीड
c) भंडारा
d) जालना
e) ठाणे
f) सोलापूर
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b), (c)
२) (b), (c), (e)
३) (a), (d), (e) (f)
४) (a), (c), (e)
४) खालीलपैकी कोणत्या जिल्हा गटामध्ये स्थलांतरीत शेती केली जाते?
१) गडचिरोली, सोलापूर, नाशिक, चंद्रपूर
२) चंद्रपूर, ठाणे, नाशिक, गडचिरोली
३) औरंगाबाद, सोलापूर, ठाणे, नाशिक
४) ठाणे, नाशिक, परभणी, धुळे
सेंद्रिय शेती
१) भारतातील कोणते राज्य सन २०१५ मध्ये सेंद्रिय राज्य (organic state) म्हणून घोषित केले गेले ?
१) अरुणाचल प्रदेश
२) ओरिसा
३) तामिळनाडू
४) सिक्कीम
२) सेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या योजनेच्या अंमलबजावणीतील पहिल्या टप्प्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे?
१) नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा
२) ठाणे, पालघर, रत्नागिरी, गडचिरोली, नंदुरबार
३) अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा
४) सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक
शाश्वत शेती
१) शाश्वत शेतीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणत्या शेती पद्धतीचा सहभाग महत्त्वाचा असतो?
१) सेंद्रिय शेती
२) कोरडवाहू शेती
३) पावसावर आधारित शेती
४) चारा-गवत शेती
२) शाश्वत शेतीची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
a) पर्यावरण संतुलन राखणे
b) सामाजिक-आर्थिक समता साध्य करणे
c) आर्थिक लाभ मिळवणे
पर्यायी उत्तरे -
१) (a) व (c) बरोबर
२) (b) व (c) बरोबर
३) (a) व (b) बरोबर
४) सर्व बरोबर
३) वर्धनक्षम (sustainable) शेतीमध्ये खालीलपैकी कशाकशाचा समावेश होतो?
a) मिश्र शेती
b) मिश्र पिके
c) आलटून पालटून पिके
d) रासायनिक किटक नाशकांचा वापर
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (d)
२) (c) आणि (d)
३) (a),(b) आणि (c)
४) वरील सर्व
पीकपद्धती
१) कोणत्या पट्टा पीकपद्धतीमध्ये कडधान्य अथवा गवत यांचे पट्टे शेतामध्ये कायमस्वरूपी ठेवले जातात?
१) समतल पट्टा
२) वारा प्रतिबंधक पट्टा
३) वरील दोन्ही
४) वरीलपैकी एकही नाही
२) ठरावीक पिके एकामागून एक एकाच शेतात काही ठरावीक कालावधीसाठी घेतली जातात त्यास ........ असे संबोधतात.
१) पिकांची फेरपालट
२) मिश्र पीक पद्धत
३) आंतर पीक पद्धत
४) पट्टा पीक पद्धत
३) खालीलपैकी कोणता निर्देशांक सर्वात कार्यक्षम आंतरपीक पद्धती ठरविण्याकरिता उपयुक्त आहे ?
१) एल.ई.आर. (लँड इक्विव्हॅलंट रेषा)
२) एल.ए.आर. (लीफ एरिया रेशो)
३) पी.ए.आर. (फोटोसिंथेटिकली अॅक्टिव्ह रेडिएशन)
४) आर.जी.आर. (रिलेटिव्ह ग्रोथ रेट)
४) एका वर्षात एखाद्या जमिनीवर एका पाठोपाठ घेतल्या जाणार्या पिकांच्या संख्येला १०० ने गुणिले तर त्यास .......... असे म्हणतात.
१) क्रॉप रेशो (सी. आर.) - पीक गुणोत्तर
२) क्राँपिंग इंडेक्स (सी. आय.) - पीक निर्देशांक
३) लॅन्ड इक्वीव्हॅलन्ट रेशो (एल. इ. आर) - जमीन समप्रमाण गुणोत्तर
४) रोटेशनल इन्डेक्स (आर. आय.) - फेरपालट निर्देशांक
५) पुनर्रोपण पद्धती ...... पिकाच्या लागवडीकरिता वापरली जाते.
१) गहू
२) कॉफी
३) रबर
४) भात
कोरडवाहू शेती
१) कोरडवाहू शेतीमधील प्रश्न :
a) मान्सूनचे उशिरा आगमन आणि लवकर गमन /परतावा.
b) पीक कालावधीमध्ये खंडित पर्जन्यवृष्टी / कोरडा कालावधी.
c) मातीची कमी जलधारण शक्ती.
d) जमिनीची हलकी / निकृष्ट सुपीकता.
e) प्रगत तंत्रज्ञान आणि विकासाभिमुख दृष्टीकोन याची कमतरता.
पर्यायी उत्तरे :
१) (a), (c) आणि (d) बरोबर
२) (b), (d), (e) आणि (a) बरोबर
३) (a), (b), (c), (d) आणि (e) बरोबर
४) (a), (d) आणि (e) बरोबर
२) ...... हा कोरडवाहू शेतीपुढील एक मुख्य प्रश्न आहे.
१) पावसाची (मान्सूनची) लवकर सुरुवात आणि लवकर शेवट
२) पावसाची (मान्सूनची) लवकर सुरुवात आणि उशिरा शेवट
३) पावसाची (मान्सूनची) उशिरा सुरुवात आणि लवकर शेवट
४) पावसाची (मान्सूनची) उशिरा सुरुवात आणि उशिरा शेवट
३) कोरडवाहू शेतीमध्ये पीक उत्पादन वाढीसाठी खतांची कार्यक्षमता यामुळे वाढविता येईल :
a) माती परीक्षण व मातीची प्रतिक्रिया (रिअॅक्शन) नुसार खतांचा वापर.
b) जमिनीमध्ये बियाण्याच्या ५ से. मी. बाजूला किंवा खाली खत देणे.
c) पेरणीच्यावेळी स्फुरद आणि पालाश खत वापरणे आणि नत्र खताचा दोन हप्त्यात विभागून वापर करणे.
१) (a), (b)
२) (b), (c)
३) (a), (c)
४) (a), (b), (c)
संतुलित कृषि व्यवसाय
१) संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषि संघटनेच्या मते, संतुलित कृषि व्यवसायामध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो.
अ) साधनसामुग्रीचे नियोजन आणि संरक्षण
ब) तांत्रिक आणि संस्थात्मक बदलाची परिचितता
क) मानवी गरजांची पूर्तता संघपरिस्थितीत आणि भविष्यात भागविणे.
१) (अ) व (ब)
२) (ब) व (क)
३) (अ) व (ड)
४) वरील सर्व
(२) जमिनीची मशागत व तण व्यवस्थापन
१) मशागत योग्य पडीक जमिनीचे महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्राशी ........ % एवढे प्रमाण आहे.
१) २.९८
२) २४.०५
३) १४.४५
४) १०.४८
२) मशागत करण्याचे मुख्य प्रकार कोणते आहेत ?
अ) नांगरणे
ब) बखरणे
क) आंतरमशागत
ड) पीक काढणे
१) फक्त (अ)
२) (अ) आणि (ब)
३) (अ), (ब) आणि (क)
४) वरील सर्व
३) खालील (अ) आणि (ब) ही विधाने वाचून योग्य पर्याय निवडा-
अ) महाराष्ट्रामध्ये लागवडीखालील क्षेत्र व नक्त मशागत क्षेत्र यांचे गुणोत्तर अत्यंत कमी आहे.
ब) बेसॉल्ट या खडकामध्ये पाणी मुरत नसल्याने भूगर्भातील पाण्याचे साठे कमी आहेत.
१) (अ) आणि (ब) ही दोन्ही विधाने सत्य असून (ब) हे (अ) ची कारणमीमांसा देते.
२) (अ) आणि (ब) ही दोन्ही विधाने सत्य असली तर (ब) हे (अ) ची योग्य कारणमीमांसा देत नाही.
३) (अ) सत्य असून (ब) चूक आहे.
४) (अ) चूक असून (ब) सत्य आहे.
४) कीड-रोग नाशकांचा अधिक वापर केल्यास होणारे परिणाम-
१) युट्रॉफिकेशन
२) जैवसंचय (बायो अॅक्युमिलेशन), जैव विस्तृतीकरण (बायोमॅग्निफिकेशन)
३) आंधळेपणा
४) वरील सर्व
५) वातावरण बदलाचा परिणाम विचारात घेता खालीलपैकी कोणती तण व्यवस्थापनाची पद्धत प्रभावी आहे.
१) जैविक
२) रासायनिक
३) पूर्वमशागत आणि पीक फेरपालट
४) एकात्मिक तण व्यवस्थापन
६) कृषी क्षेत्रात खालीलपैकी कोणते घटक आरोग्य आणि वातावरणावर प्रतिकूल परिणाम करतात?
१) गांडूळखत आणि शेणखत
२) तणनाशके व कीडनाशके
३) सायकोसील आणि एन.ए.ए. (नेफथॅलीक अॅसिटीक अॅसिड)
४) निळे, हिरवे शेवाळ
७) २, ४-डी तणनाशक जमिनीत ...... दिवस अवशेष स्वरूपात राहते.
१) १४ ते ३०
२) ३५ ते ४५
३) ४६ ते ६०
४) ६१ त ७५
८) वार्याची गती या साधनाने मोजतात :
१) सायक्रोमीटर
२) विंड व्हेन (वातकुक्कुट)
३) अॅनेमोमीटर
४) बॅरोमीटर
९) महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी ...... आहे.
१) जानेवारी-मार्च
२) ऑक्टोबर-मार्च
३) जून-ऑक्टोबर
४) मार्च-जून
(३) महाराष्ट्रातील पीके
१) पिकांचे प्रकार, जाती व संशोधन
पिकांचे प्रकार
१) महाराष्ट्रात सामान्यत: कोणती व्यापारी/नगदी पिके खरीप हंगामात घेतली जातात ?
१) कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा
२) कापूस, सोयाबीन, भुईमूग, ऊस
३) कापूस, सोयाबीन, जवस, हरभरा
४) कापूस, सोयाबीन, कडधान्ये, ज्वारी
२) खालीलपैकी लक्षात घ्या -
१) कापूस
२) भुईमूग
३) तांदूळ
४) गहू
वरीलपैकी कोणती खरीप पिके आहेत ?
a) १ आणि ४
b) फक्त २ आणि ३
c) १, २ आणि ३
d) २, ३ आणि ४
३) शेंगवर्गीय पिकांबाबत काय बरोबर आहे?
अ) शेंगवर्गीय पीके अन्न व चारा म्हणून उपयुक्त आहेत.
ब) ते हवेतील नत्र (नायट्रोजन) स्थिरीकरण करतात.
क) तनांची वाढ थोपवून धरतात.
ड) स्फुरदायी मात्रा कमी लागते.
१) फक्त अ
२) फक्त ब आणि क
३) फक्त अ, ब, आणि क
४) फक्त ड
४) ...... हा वजनात घट होणारा कच्चा माल आहे.
१) ऊस
२) रेशीम
३) लोकर
४) कापूस
५) ...... हे महाराष्ट्रातील मुख्य अन्न-धान्य पीक आहे.
१) ज्वारी
२) गहू
३) तांदूळ
४) नाचणी
पिकांच्या संकरित जाती
१) हरित क्रांती भाताच्या आणि गव्हाच्या ........... जातींमुळे शक्य झाली.
१) गरव्या
२) हळव्या
३) उंच
४) बुटक्या
२) तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी खालीलपैकी कोणती भुईमुगाची जात महाराष्ट्रात वापरण्यात येऊ लागली?
१) जे. एल. २४
२) रोहिणी
३) चाफा
४) फुले जी - १२
३) खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही ?
१) इंद्रायणी
२) जया
३) हंसा
४) हिरामोती
४) जोड्या लावा :
पिक पिकाची जात
a) तांदूळ i) निळवा
b) गहू ii) श्रद्धा
c) ज्वारी iii) सोनालिका
d) बाजरी iv) कस्तुरी
(a) (b) (c) (d)
१) (iii) (i) (ii) (iv)
२) (iv) (iii) (i) (ii)
३) (i) (ii) (iv) (iii)
४) (ii) (i) (iii) (iv)
५) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) लक्ष्मी, सावित्री, वाराणशी या महाराष्ट्रात घेतल्या जाणार्या भाताच्या प्रजाती आहेत.
ब) रत्न, रायभोग, काळीमूछ या महाराष्ट्रात घेतल्या जाणार्या कापसाच्या प्रजाती आहेत.
१) केवळ अ योग्य आहे
२) केवळ ब योग्य आहे
३) अ व ब दोन्ही योग्य आहेत
४) अ व ब दोन्ही योग्य नाहीत
६) जोड्या लावा.
(I) पिके (II) आधुनिक संकरित जाती
a) तांदूळ i) ज्योती
b) गहू ii) जया
c) ज्वारी iii) सोनालिका
d) कापूस iv) सुवर्णा
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (i) (iv) (iii)
२) (i) (ii) (iii) (iv)
३) (ii) (iii) (iv) (i)
४) (iv) (i) (ii) (iii)
७) हरभरा पिकाची बीडीएनजी-७९७ ही जात ............ ला दाद न देणारी किंवा प्रतिकारक आहे.
१) घाटे अळी
२) पाने खाणारी अळी
३) करपा
४) मर आणि मुळ कुज
८) खालीलपैकी कोणती तांदळाची जात उच्च उत्पादन देणारी जात (HYV) आहे?
१) IR-८
२) PV-१८
३) डेक्कन-७०५
४) शंकर-४
९) जोड्या लावा.
यादी - I (पिके) यादी - II (प्रमुख सुधारित जाती)
a) गहू i) सुवर्णा
b) ज्वारी ii) बन्सी
c) तांदूळ iii) लक्ष्मी
d) कापूस iv) चिनोर
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (ii) (iv) (iii) (i)
३) (ii) (i) (iv) (iii)
४) (iii) (ii) (i) (iv)
कृषी संशोधन
१) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे ?
१) लोणंद
२) पाडेगाव
३) शेखमिरेवाडी
४) कागल
२) योग्य जोड्या लावा :
यादी I (विद्यापीठ) यादी II (ठिकाण)
A) महात्मा फुले कृषी विद्यापीठ II) दापोली
B) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ II) राहुरी
C) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ III) परभणी
D) मराठवाडा कृषी विद्यापीठ IV) अकोला
योग्य पर्याय निवडा :
A B C D
१) I II III IV
२) IV II III I
३) II IV I III
४) III IV II I
३) आय.सी.ए.आर. भारतीय मृदा विज्ञान संस्था ....... येथे आहे.
१) कानपूर
२) लखनऊ
३) जयपूर
४) भोपाळ
४) इक्रीसॅट ही संस्था कोणत्या राज्यात आहे ?
१) कर्नाटक
२) तामिळनाडू
३) आंध्र प्रदेश
४) तेलंगाणा
५) भारतामध्ये प्रथम कृषीविद्यापीठाची स्थापना ...... यांचे नावे झाली.
१) डॉ. पंजाबराव देशमुख
२) गोविंद वल्लभ पंत
३) चौधरी चरण सिंग
४) चंद्रशेखर आझाद
६) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
a) भात संशोधन संस्था कर्जत, खोपोली, रत्नागिरी येथे स्थापन केल्या गेल्या आहेत, परंतु सावंतवाडीत नाही.
b) पश्चिम बंगालमध्ये वर्षात भाताची तीन पिके घेण्यात येतात.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
७) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
a) भात संशोधन संस्था कर्जत, खोपोली, रत्नागिरी येथे स्थापन केल्या गेल्या आहेत, परंतु सावंतवाडीत नाही.
b) पश्चिम बंगालमध्ये वर्षात भाताची तीन पिके घेण्यात येतात.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
८) कोकण कृषी विद्यापीठ हे प्रामुख्याने ...... च्यावर विशेष संशोधन कार्य करते.
१) ऊस आणि गहू
२) कापूस आणि तेलबिया
३) ज्वारी आणि डाळी
४) तांदूळ, नाचणी फळपिके
९) आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे ?
१) हिस्सार
२) पुणे
३) राहुरी
४) दापोली
२) लागवडीखालील क्षेत्र व पीकवितरण
१) महाराष्ट्रातील शेती संदर्भातील विधानांचा अभ्यास करा.
a) महाराष्ट्रात सर्वांत जास्त पिकाखालील एकूण क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यात तर सर्वांत कमी क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.
b) महाराष्ट्रात रब्बी पिकांचे सर्वांत जास्त क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे तर सर्वांत कमी क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
पर्यायी उत्तरे :
१) विधान (a) बरोबर आणि विधान (b) चूक आहे.
२) विधान (a) चूक आणि विधान (b) बरोबर आहे.
३) विधान (b) आणि विधान (a) चूक आहे.
४) विधान (a) आणि विधान (b) बरोबर आहे.
२) जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यांत खालीलपैकी कोणते पीक सर्वात महत्त्वाचे पीक आहे?
१) कापूस
२) ज्वारी
३) भुईमूग
४) केळी
३) कृष्णा नदीच्या खोर्यात ........ हे पीक महत्त्वाचे नगदी पीक आहे.
१) तंबाखू
२) कापूस
३) ज्वारी
४) ऊस
४) महाराष्ट्रातील .......... प्रदेश हा खरीप हंगामातील तांदूळ या पिकाखालील कमाल क्षेत्र असणारा आहे.
१) रत्नागिरी
२) कोल्हापूर
३) सोलापूर
४) भंडारा-गोंदिया
५) यादी क्र. I व यादी क्र. II ची योग्य जुळणी करून खाली दिलेल्या अंकप्रणालीतून बरोबर उत्तर शोधून काढा.
यादी क्र. I यादी क्र. II
a) कोकणचे किनारी मैदान i) ज्वारी, गहू, ऊस
b) कृष्णा खोरे ii) भात, नारळ, आंबे
c) कृष्णा खोरे iii) ज्वारी, बाजरी, दूध
d) गोदावरी खोर्याचा वरचा प्रदेश iv) कापूस व तेलबिया
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (iii) (i) (iv)
२) (ii) (i) (iii) (iv)
३) (ii) (iv) (i) (iii)
४) (ii) (iii) (iv) (i)
६) खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोर्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झालेले आहे?
a) गोदावरी
b) भीमा
c) कृष्णा
d) पंचगंगा
पर्यायी उत्तरे :
१) फक्त (a) विधान बरोबर आहे.
२) (a) आणि (b) विधाने बरोबर आहेत.
३) फक्त (c) विधान बरोबर आहे.
४) (a) आणि (c) विधाने बरोबर आहेत.
७) जोड्या लावा :
स्तंभ-I (कृषी विभाग) स्तंभ-II (प्रमुख पिके)
a) किनारवर्ती कोंकण i) कापूस व तेलबिया
b) भिमा खोरे-उस्मानाबादचे पठार ii) उस व दुधव्यवसाय
c) कृष्णा खोरे iii) भात व नारळ
d) तापीचे खोरे iv) बाजरी व तेलबिया
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iii) (iv) (ii) (i)
२) (iii) (iv) (i) (ii)
३) (i) (ii) (iii) (iv)
४) (iv) (i) (ii) (iii)
३) पिकांचे उत्पादन व उत्पादकता
१) सन २०११-१२ मध्ये भारतातील गव्हाचे उत्पादन ...... होते.
१) ८७.९ दशलक्ष टन
२) ९०.९ दशलक्ष टन
३) ९३.९ दशलक्ष टन
४) ९६.९ दशलक्ष टन
२) भारतात सन २०११-१२ मध्ये गव्हाचे भात उत्पादनाशी प्रमाण ...... टक्के होते.
१) ७५
२) ८०
३) ८५
४) ९०
३) सन २०११-१२ साली, भारताची भात पिकाची उत्पादनक्षमता ...... किलो प्रति हेक्टरी होती.
१) २२७२
२) २३७२
३) २४७२
४) २५७२
४) योग्य जोड्या लावा
स्तंभ I स्तंभ II
a) कापसाची गाठ (बेल) i) २०० किलो
b) ज्यूटची गाठ (बेल) ii) १७० किलो
iii) १९० किलो
iv) १८० किलो
१) (a) - (i), (b) - (ii)
२) (a) - (ii), (b) - (iv)
३) (a) - (iv) (b) - (i)
४) (a) - (ii), (b) - (iii)
५) ऊसापासून साखर करताना उसाच्या एकूण वजनाच्या किती टक्के रूपांतर होऊ शकते ?
१) ४०%
२) ३०%
३) २०%
४) १०%
६) सन २०११-१२ मध्ये महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन अंदाजे किती झाले?
१) ८० लाख गाठी
२) ८५ लाख गाठी
३) ९० लाख गाठी
४) ९५ लाख गाठी
७) महाराष्ट्रातील हळद आणि आले यांचे उत्पादन करणारे जिल्हे कोणते ?
१) सातारा आणि सांगली
२) कोल्हापूर आणि पुणे
३) परभणी आणि नांदेड
४) कोल्हापूर आणि सोलापूर
८) भारतात चहा उत्पादनात ....... राज्याचा प्रथम क्रमांक आहे.
१) आसाम
२) बिहार
३) महाराष्ट्र
४) ओरिसा
९) तिळाच्या लागवडीसाठी ...... हा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे.
१) सोलापूर
२) कोल्हापूर
३) जळगाव
४) औरंगाबाद
१०) महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे ?
१) पश्चिम महाराष्ट्र
२) विदर्भ आणि मराठवाडा
३) कोकण
४) उत्तर महाराष्ट्र
११) जिल्हे व पिके याबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) नाशिक जिल्हा बाजरी उत्पादनात अग्रेसर आहे.
ब) भंडारा जिल्हा भात उत्पादनात अग्रेसर आहे.
क) कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीन उत्पादन होत नाही.
ड) ठाणे जिल्ह्यात उसाचे उत्पादन घेतले जाते.
१) अ, क, ड
२) अ, ब
३) अ, ब, ड
४) क, ड
१२) कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता ?
१) यवतमाळ
२) अमरावती
३) पुणे
४) जळगाव
१३) महाराष्ट्रातील कोणता विभाग सोयाबीन पिकाच्या उत्पादनात अग्रेसर आहे ?
१) कोकण
२) विदर्भ
३) प. महाराष्ट्र
४) मराठवाडा
१४) ......... उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक लागतो.
१) गव्हाच्या
२) साखरेच्या
३) भाता (तांदूळ) च्या
४) माशांच्या
१५) महाराष्ट्रातील मागील ५० वर्षांचा कालावधी लक्षात घेता असे आढळते की प्रत्येक दशकात भुईमूग या पिकाचे उत्पादन घटलेले आहे. त्यासाठी खालीलपैकी सर्वात प्रमुख कारण कोणते?
१) प्रत्येक दशकात जमिनीची सुपीकता कमी झाली आहे.
२) प्रत्येक दशकात महाराष्ट्रातील पर्जन्यमान अतिशय अपुरे आहे.
३) प्रत्येक दशकात लागवडीचे क्षेत्र घटत गेलेले आहे.
४) प्रत्येक दशकात उच्च प्रतीच्या बियाणांची कमतरता आहे.
१६) महाराष्ट्रात दर हेक्टरी पिकांचे उत्पादन कमी का आहे ?
१) महाराष्ट्रातील मृदा नापीक आहे
२) पिकांना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होत नाही.
३) शेतकर्यांना शेतीसाठी पुरेसे शेतमजूर उपलब्ध होत नाहीत.
४) कीटकनाशके व जंतुनाशके यांच्या वापरामुळे पिकांची हानी होते.
१७) महाराष्ट्रात कोणत्या तृणधान्य पिकाची सर्वाधिक उत्पादन क्षमता आहे ?
१) ज्वारी
२) बाजरी
३) मका
४) गहू
१८) a) ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचा सर्वप्रथम क्रमांक लागतो.
b) बागायती क्षेत्रात वाढ झाल्यामुळे पूर्वी ज्वारी घेत असलेल्या क्षेत्रांमध्ये आता व्यावसायिक पिके घेण्यावर जास्त भर दिला जातो.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहेत?
१) फक्त (a)
२) फक्त (b)
३) (a) आणि (b)
४) वरीलपैकी एकही नाही
१९) खालील विधानापैकी चुकीच विधान कोणते?
a) महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन रायगड जिल्ह्यात होते.
b) कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे गहू पिकविला जात नाही.
c) भारतात सर्वात जास्त केळी उत्पादन महाराष्ट्रात होते.
d) महाराष्ट्रात खरीप पिकांचे सर्वात कमी क्षेत्र अकोला-वाशिम जिल्ह्यात आहे.
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (d) फक्त
३) (a), (b) आणि (c)
४) (b), (c) आणि (d)
४) पिक उत्पादनासंबंधीत पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी
१) भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळवण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ हा केव्हापासून राज्यात अंमलात आला आहे?
१) दि. १ जानेवारी २०१४
२) दि. २ ऑक्टोबर २०१३
३) दि. २६ जानेवारी २०१४
४) दि. १ एप्रिल २०१४
२) महाराष्ट्रातील पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या.
a) सदर योजना ही एकूण तीन वर्षांसाठी आहे.
b) नव्या निकषानुसार ग्रामंपचायतीवर दर पाच वर्षांनी त्यांच्या करांची फेर आकारणी करण्याचे बंधन आहे.
c) नव्या निकषानुसार योजनेत सहभागी होऊ इच्छिणार्या गावाने गावातील एकूण लोकसंख्येइतकी झाडे पहिल्या वर्षी लावणे बंधनकारक.
d) पहिल्या वर्षी किमान ६०% कर वसुली करणे आणि ६०% कुटुंबाकडे शौचालय असणे अनिवार्य.
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
१) (a), (b)
२) (a), (c), (d)
३) (b), (c), (d)
४) (a), (d)
३) खालील बियाणांचा विचार करुन त्यापैकी खाली दिलेली कोणती प्रणाली बरोबर आहे, ते सांगा :
महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाची स्थापना-महाराष्ट्रात करण्यात आली
अ) औद्योगिक विकासाची गती वाढवणे.
ब) औद्योगिक क्षेत्रात आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करुन देणे.
क) विकसीत प्रदेशात कारखानदारीचा विकास करणे.
ड) प्रादेशिक समतोल साधण्यासाठी
१) फक्त अ आणि ब बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) फक्त क आणि ड बरोबर
४) फक्त अ, ब आणि ड बरोबर
४) खालील दोन विधाने पाहावीत :
a) भारतात प्रती माणशी कृषी क्षेत्राची उपलब्धता सन १९५१ च्या ०.४८ हेक्टर पासून १९९१ पर्यंत ०.१६ हेक्टर एवढी कमी झाली व ती २०३५ पर्यंत ०.०८ पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.
b) कृषी क्षेत्राची उपलब्धता कमी होण्याचे प्रमुख कारण वाढती लोकसंख्या व कृषी क्षेत्राचे अकृषी क्षेत्राकडे वळतीकरण आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
१) (b) विधान योग्य (a) नाही.
२) (a) विधान योग्य (b) नाही
३) दोन्ही विधाने बरोबर व (b), (a) ची कारणमीमांसा देते.
४) दोन्ही विधाने बरोबर परंतु (b), (a) ची कारणमीमांसा देत नाही.
५) कोणती पद्धत जमिनीचे हक्क आणि त्यांच्या नियंत्रणाच्या पद्धतींशी निगडित आहे ?
१) जमीनदारी
२) जमिनीच्या उपभोगाचा काल
३) महालवारी
४) रयतवारी
६) खालील विधाने विचारात घ्या :
a) महाराष्ट्र राज्याने सेंद्रीय शेती धोरण जानेवारी २०१३ मध्ये जाहीर केले.
b) महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना २०११ मध्ये जाहीर केली.
c) महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
१) (a) आणि (b)
२) (b) आणि (c)
३) (a) आणि (c)
४) वरील सर्व
७) उन्नत शेती-समृद्ध शेतकरी या मोहिमे संदर्भात (उद्दिष्टे) खालीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत?
अ) प्रमुख पिकांची उत्पादकता व उत्पादन क्षमतेतील तफावत दूर करणे.
ब) पीक विमा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकर्यांना सहभागी करून घेणे.
क) शेतमालांना उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळवून देणे.
पर्यायी उत्तरे :
१) सर्व
२) एकही नाही
३) (अ) व (ब)
४) (ब) व (क)
८) खारभूमी विकास योजनेच्या उद्दिष्टामध्ये कशाचा समावेश आहे?
१) समुद्राच्या खार्या पाण्यापासून शेतजमिनीचे संरक्षण करणे.
२) शेतजमिनीत क्षारांच्या प्रवेशास अटकाव करणे.
३) चक्रीवादळ, त्सुनामी वेळेस पिकाखालील क्षेत्र व मालमत्ताचे संरक्षण करणे.
४) वरील सर्व
९) महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे (तुकडीकरण) काय झाले?
a) शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते धान्य उत्पादन करू शकत नाही.
b) शेतजमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
c) आधुनिक शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग परवडत नाही.
d) शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त विधान (a) बरोबर आहे.
२) विधान (a) आणि (b) बरोबर आहेत.
३) विधान (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.
४) विधान (a), (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.
(२) मृदा
* महाराष्ट्रातील माती - प्रकार, निर्मिती करणारे खडक, जमिनीचे गुणधर्म, जमीन वापर
* महाराष्ट्रातील मृदा समस्या - जमिनीचे प्रदूषण, समस्याग्रस्त जमिनी, त्या लागवडी योग्य करण्यासाठी उपाययोजना, जमिनीची धूप, धुपीचे प्रकार आणि धूप प्रतिबंधक उपाय
१) मृदा - तिचे प्रकार आणि वितरण
२) मृदा निर्मिती व तिचे घटक
३) जमिनीचे गुणधर्म आणि वापर
४) जमिनीतील वनस्पती पोषक अन्नद्रव्यांचा स्रोत
५) जमिनीतील सेंद्रीय पदार्थ, सजीव सृष्टी व खते
६) खराब/समस्याग्रस्त जमिनी
७) जमिनीची धूप, प्रकार आणि धूप प्रतिबंधक उपाय
८) मृदासंवर्धन
१) मृदा - तिचे प्रकार व वितरण
मृदेचे प्रकार
१) ६.५ पेक्षा कमी सामू असलेल्या मृदेला ......... म्हणतात.
१) आम्लधर्मी
२) अल्कधर्मी
३) उदासीन
४) वरील सर्व
२) पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते?
१) सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड
२) कोल्हापूर-सांगली-सोलापूर
३) नागपूर-भंडारा-चंद्रपूर
४) अमरावती-भुसावळ-जळगाव
मृदेचे वितरण
१) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
a) वनस्पती वितरण हे प्रामुख्याने मृदाशास्त्रीय परिस्थितीच्या वितरणावर मर्यादित आहे.
b) इकॉलॉजी हा शब्द ऑइकॉसवरून आला ज्याचा अर्थ राहण्याचे ठिकाण. हा शब्द लॅटिन आहे.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
२) महाराष्ट्रात जांभा मृदा प्रामुख्याने ....... व ....... जिल्ह्यात आढळते.
१) औरंगाबाद व जालना
२) रत्नागिरी व सिंधुदुर्ग
३) पुणे व नाशिक
४) चंद्रपूर व गडचिरोली
३) जांभा मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
१) बीड
२) अहमदनगर
३) रत्नागिरी
४) धुळे
४) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा काही भाग पर्जन्य छायेच्या काळ्या व करड्या मृदेच्या कृषी हवामान विभागात येतो?
a) सातारा, कोल्हापूर, सोलापूर
b) सातारा, कोल्हापूर, पुणे
c) कोल्हापूर, धुळे, जळगाव
d) बीड, धुळे, बुलढाणा
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b)
२) (b) आणि (c)
३) फक्त (b)
४) (a), (b) आणि (d)
५) खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोर्यात काळी मृदा (रेगूर) जमिनीची खोली सर्वात जास्त आहे?
१) तापी
२) गोदावरी
३) कृष्णा
४) भीमा
६) रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते ?
१) दख्खनचा पठारी प्रदेश
२) कोकणातील डोंगराळ प्रदेश
३) कोकण किनार पट्टीची चिंचोळी मैदाने
४) भामरागडचा डोंगरी प्रदेश
७) महाराष्ट्रातील मृदा-संपत्तीबाबत पुढील विधाने पहा.
A) जांभा मृदा मोठ्या प्रमाणात पूर्व कोकणात आढळते.
B) गाळाची मृदा मोठ्या प्रमाणात अकोला आणि अमरावती येथे आढळते.
C) जांभा मृदा मोठ्या प्रमाणात पूर्व गडचिरोलीत आढळते.
D) काळी मृदा मोठ्या प्रमाणात गोंदिया आणि भंडारा येथे आढळते.
१) (A) आणि (B)
२) (B) आणि (D)
३) (A) आणि (C)
४) (D) आणि (A)
८) महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांपैकी कोणत्या एका जिल्ह्यात पडीक जमिनीखालचे क्षेत्र सर्वात अधिक आहे?
१) सांगली
२) पुणे
३) सोलापूर
४) अहमदनगर
९) दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात .......... प्रकारची मृदा आढळते.
१) क्षारयुक्त व अल्कली
२) रेगूर
३) जांभी
४) दलदलयुक्त
१०) महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन-चतुर्थांश भागात ......... मृदा आढळते.
१) गाळाची मृदा
२) रेगूर मृदा
३) वन मृदा
४) जांभी मृदा
११) ....... मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.
१) काळी कापसाची मृदा
२) तांबडी मृदा
३) गाळाची मृदा
४) जांभी मृदा
१२) महाराष्ट्राच्या पठारावर ...... मृदा आढळते.
१) क्षारयुक्त
२) वालुकामय
३) काळी
४) जांभी
१३) खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही ?
१) खादर
२) भांगर
३) भाबर
४) रेगूर
१४) महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये ...... मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते.
१) काळी
२) तांबडी
३) गाळाची
४) जांभी
१५) खालील महाराष्ट्राच्या नकाशात टिंबांनी दर्शविलेल्या प्रदेश कोणता कृषी हवामान विभाग दर्शवितो ?
१) निश्चित पर्जन्याचा विभाग
२) जास्त पर्जन्याचा तांबड्या तपकिरी मृदेचा विभाग
३) अति पर्जन्याचा जांभी मृदेचा विभाग
४) पर्जन्यछायेचा काळ्या व करड्या मृदेचा विभाग
१६) महाराष्ट्र राज्य हे एकूण ९ (नऊ) कृषी हवामान विभागांमध्ये ........ च्या आधारावर विभागलेले आहे.
१) पर्जन्य, तापमान, मृदा प्रकार व वनस्पती
२) पर्जन्य, तापमान व वनस्पती
३) पर्जन्य, मृदा प्रकार व वनस्पती
४) पर्जन्य, तापमान व मृदा प्रकार
१७) सर्वसाधारणपणे नियोजीत जमीन वापराचा नकाशा तयार करताना निळा रंग हा ........ वापर दर्शविण्यासाठी वापरला जातो.
१) सार्वजनिक व निमसार्वजनिक
२) वाणिज्य
३) औद्योगिक
४) रहिवास
२) मृदा निर्मिती व तिचे घटक
१) .......... हा मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेतील अतिशय क्रियाशील घटक आहे.
१) मृदेचा मूळ घटक (Parent material)
२) जमिनीचा उंचसखलपणा
३) हवामान
४) वेळ (कालावधी)
२) मूळ खडक, वातावरण, उंचखोलपणा, प्राणी-वृक्ष व काळ, हे सर्वजण माती तयार करण्यास हात भार लावतात. पुढीलपैकी कोणते कार्य ते करतात ते सांगा. (योग्य जोड्या लावून)
a) मूळ खडक i) मातीची जाडी वा खोली
b) वृक्ष-प्राणी ii) रंग, पोत व पारगम्यता
c) वातावरण iii) पालापाचोळा खत (ह्यूमस) तयार होण्याचा वेग
d) काळ iv) रूप पालटण्याचा (वेदरिंगचा) वेग
(a) (b) (c) (d)
१) (iii) (ii) (i) (iv)
२) (ii) (iii) (iv) (i)
३) (iv) (i) (ii) (iii)
४) (iv) (iii) (i) (ii)
३) बेसॉल्ट या खडकाचे विदारण होऊन काळी माती ........ येथे तयार झाली आहे.
१) कोंकण
२) पूर्व विदर्भ
३) सह्याद्री पर्वत
४) महाराष्ट्र पठार
४) खालील विधाने पहा :
अ) कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जांभा खडकाची पठारे आहेत.
ब) जांभा दगड हा बेसॉल्टच्या कायिक विदारणामुळे तयार होतो.
१) फक्त विधान अ बरोबर आहे.
२) फक्त विधान ब बरोबर नाही.
३) विधान अ आणि ब बरोबर आहेत.
४) विधान अ आणि क बरोबर नाहीत.
५) काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य/गुणधर्म नसणारे विधान खालील पर्यायापैकी कोणते ?
१) ग्रॅनाईट व नीस प्रकारच्या खडकांचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते.
२) टिटॅनिफेरस आणि मॅग्नेटाईट या घटकद्रव्याुंळे काळा रंग प्राप्त होतो.
३) पाणी घेऊन ठेवण्याची क्षमता जास्त असते.
४) या मृदेला रेगूर मृदा असेही म्हणतात.
६) खालीलपैकी कोणत्या मृदेची खालील वैशिष्ट्ये आढळतात?
(a) निर्मिती प्रामुख्याने जास्त तापमान व जास्त पर्जन्याच्या प्रदेशात होते.
(b) या मृदेत नायट्रोजन, पोटॅश व चुन्याचे प्रमाण कमी.
(c) प्रामुख्याने रत्नागिरी व पश्चिम कोल्हापूर येथे आढळते.
१) तांबडी मृदा
२) काळी मृदा
३) जांभी मृदा
४) पर्वतीय मृदा
मृदेचे घटक
१) सर्वसाधारणपणे मृदेत ......% पाणी, ......% हवा, ......% खनिज द्रव्ये आणि ......% सेंद्रिय द्रव्ये असतात.
१) ०५, २५, २५ आणि ४५
२) २५, २५, ३० आणि २०
३) २०, ३०, ४५ आणि ०५
४) २५, २५, ४५ आणि ०५
२) पोयट्याच्या (Silty soil) मृदेतील कणांचा व्यास ........... असतो.
१) ०.०२ ते ०.१२ मी. मी.
२) ०.००२ ते ०.०२ मी. मी.
३) ०.००२ ते ०.२२ मी. मी.
४) ०.०२ ते २.०० मी. मी.
३) जमिनीच्या पोयटा कणाचा व्यास किती असतो ?
१) ०.२ - ०.०२ मी.मी.
२) ०.०२ - ०.००२ मी.मी.
३) २ मि.मी.
४) > २ मि.मी.
४) जमिनीमध्ये वाळू, गाळ आणि चिकणमातीची तुलनात्मक दृष्ट्या असलेल्या प्रमाणास ......... म्हणतात.
१) जमिनीची कण रचना
२) जमिनीचा पोत
३) जमिनीचे वर्गीकरण
४) जमिनीचे (मातीचे) कण
५) जमिनीचा पोत म्हणजे -
१) मातीच्या खनिजांची रचना
२) मातीच्या कणांची रचना
३) सेंद्रीय पदार्थांची रचना
४) यांपैकी काहीही नाही
३) जमिनीचे गुणधर्म आणि भूमी उपयोजन
१) खालील गुणधर्म कोणत्या मृदेचे आहेत -
अ) आर्द्र हवामान असलेल्या प्रदेशात आढळते.
ब) पर्जन्य जास्त असलेल्या प्रदेशात आढळते.
क) सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.
ड) अॅल्यूमिनियम आणि मँगनीज यांची संयुगे आढळतात.
१) रेग्यूर मृदा
२) तांबडी मृदा
३) जांभी मृदा
४) वाळू मिश्रित मृदा
२) जमिनीमध्ये पाणी कोणत्या ऊर्जेद्वारे शोषण करून साठविले जाते?
१) गुरुत्वाकर्षणीय
२) केशाकर्षण
३) ऑस्मॉटिक
४) वातावरण दाब
३) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
a) विम्लधर्मीय आणि क्षारयुक्त विम्लधर्मीय जमिनी पुनःप्रापण करण्यासाठी (सुधारण्यासाठी) सल्फर वापरतात.
b) क्षारयुक्त जमिनीमध्ये विनिमयात्मक सोडियमची टक्केवारी १५ पेक्षा अधिक असते.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
४) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
a) धनऑयन-विनिमय क्षमता मोन्टमोरेलोनाइट क्ले खनिजामध्ये जास्त असते.
b) पिकातील पानांपासून होणारे बाष्पोपर्णात्सर्जन बासालीन रोखते.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
५) खालीलपैकी कोणती प्राथमिक खनिजे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात?
१) कॅलसाईट व डोलोमाईट
२) पायराईटस व मरकासाईट
३) क्वार्टज् व फेल्डस्पार्स
४) जिप्सम व सिडेराईट
६) ...... हे आम्लधर्मीय जमिनीत चल, तर अल्कधर्मीय जमिनीत अचल असते.
१) जस्त
२) शिसे
३) कॅडमिअम
४) आर्सेनिक
७) आम्लधर्मीय जमिनी ........ यांच्या निचर्यामुळे तयार होतात.
१) पालाश, सोडियम, तांबे, चुना
२) मॉलिबडेनम, चुना, मॅग्नेशियम, सोडियम
३) चुना, मॅग्नेशियम, पालाश, हायड्रोजन
४) चुना, सोडियम, मॅग्नेशियम, पालाश
८) खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व अल्युमिनियम समृद्ध असते ?
१) काळी मृदा
२) लॅटराईट मृदा
३) दलदलीची मृदा
४) वाळवंटी मृदा
९) लोह व अॅल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ?
१) काळी मृदा
२) गाळाची मृदा
३) जांभी मृदा
४) पिवळसर मृदा
१०) खालीलपैकी कोणती मृदा फॉस्फरिक अॅसीड, चुना आणि सेंद्रीय पदार्थांनी समृद्ध असते परंतु पोटॅश, नायट्रोजन आणि फॉस्फरस घटकांची कमतरता असते?
a) चेस्टनट मृदा किंवा राखाडी तपकिरी मृदा
b) दलदलीची मृदा
c) गाळाची मृदा
d) तराई मृदा
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b)
२) फक्त (b)
३) (c) आणि (d)
४) फक्त (c)
११) गोदावरी, भीमा, कृष्णा आणि तापी नदी खोर्यात सर्वात उत्तम प्रकारची कापसाची काळी मृदा आढळते :
a) या मृदेला टिटॅनिफेरस मॅग्नेटाइंट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त झाला आहे.
b) बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते.
c) या मृदेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याने ही अत्यंत सुपीक आहे.
d) या मृदेत लोह, चुनखडी, पोटॅश, अॅल्युमिनियम, कॅल्शियम आढळते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
१) (a) आणि (d) फक्त
२) (b) आणि (c) फक्त
३) (a), (b) आणि (d) फक्त
४) (a), (b), (c) आणि (d)
१२) महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भातील विधाने पाहा.
a) रेगुर मृदेत अॅल्युमिनियम व लोहाचे प्रमाण भरपूर असते.
b) जांभी मृदा आर्द्र हवामान विभागात आढळते.
c) तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात सापडते.
d) तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त विधान (a) बरोबर आहे.
२) विधान (a), (b) आणि (c) बरोबर आहेत.
३) विधान (a), (c), (d) बरोबर नाहीत.
४) विधान (a), (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.
१३) रेगुर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन ...... या पिकासाठी उत्कृष्ट आहे.
१) रबर
२) कॉफी
३) ताग
४) कापूस
१४) खोल जमिनीमध्ये उभ्या आच्छादनाचा वापर ...... वाढण्यासाठी करतात.
१) अपधाव
२) जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण
३) धूप
४) जमिनीची खराबी
१५) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
a) लॅटरीटिक मृदा मोसमी हवामानाच्या प्रदेशात आढळते.
b) लॅटरीटिक मृदा लोह, अॅल्युमिनिअम, पोटॅश व चुनखडीयुक्त आहे.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
भूमी उपयोजन
१) महाराष्ट्रामध्ये निव्वळ पीक क्षेत्रानंतर कोणते भूमी उपयोजन जास्त आहे?
१) वनक्षेत्र
२) ओसाड जमीन
३) मशागत योग्य पडीक जमीन
४) कायम कुरणे
४) जमिनीतील वनस्पती पोषक अन्नद्रव्यांचा स्रोत
१) जमीन कार्यक्षमता वर्गीकरणामध्ये वर्ग VIII हा ...... करिता योग्य आहे.
१) पिके लागवडीसाठी
२) कुरण आणि चरण्यासाठी
३) वन्यजीव आणि पाणलोट व्यवस्थापन
४) वरील सर्व
२) वनस्पती प्रामुख्याने नत्र ...... या स्वरूपात शोषतात.
१) नायट्रेट
२) नायट्राईट
३) अमाईड
४) यापैकी एकही नाही
३) कोणत्या वनस्पती पोषणद्रव्यामुळे मुळांची वाढ चांगली होते, दुष्काळ सहन करण्याची क्षमता सुधारते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते?
१) नत्र
२) स्फुरद
३) पालाश
४) कॅल्शिअम
४) वनस्पतीच्या तळाच्या पानापासून वरपर्यंत हरितद्रव्य (हिरवा रंग) नाहीसे होणे हे ...... या मूलद्रव्याच्या कमतरतेचे लक्षण आहे.
१) तांबे
२) मँगनीज
३) मॅग्नेशिअम
४) गंधक
५) ...... अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे खोडांच्या आणि मुळांच्या टोकांवर दिसून येतात.
१) नत्र आणि गंधक
२) बोरॉन आणि चुना
३) मॅग्नेशिअम आणि लोह
४) पालाश आणि स्फुरद
६) झाडांना मॅग्नेशियमचा पुरवठा केल्यास .......... पुरविणार्या खतांची कार्यक्षमता वाढते.
१) नत्र
२) स्फुरद
३) पालाश
४) वरीलपैकी सर्व
७) मृदेतील नत्राचे प्रमाण कमी झाल्यास -
१) पीक पक्वता उशिरा होते.
२) पीक जमिनीवर लोळते
३) उत्पादन व मालाची प्रत खालावते
४) वरीलपैकी सर्व
८) ........ या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलकोबीचे खोड पोकळ होते.
१) मॉलीब्डेनम
२) जस्त
३) मँगनीज
४) बोरॉन
९) पीक वर्गासाठी पोषक खनिज द्रव्याची आवश्यकता दर्शविणारा पुढीलपैकी योग्य निकष निवडा :
a) एखाद्या घटकाच्या कमतरतेमुळे पिकाचे जीवनचक्र पूर्ण करण्यास अपयश येते.
b) एखाद्या घटकाची कमतरता फक्त तोच घटक पूरवून भरून काढता येते.
c) घटकाचा परिणाम हा वाढीवर किंवा चयापचयावर व्हायलाच पाहिजे.
d) सदर घटक अल्प प्रमाणातच आवश्यक असतो.
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (a) व (b) फक्त
३) (a), (b) व (c) फक्त
४) (a), (b), (c) व (d)
१०) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे ?
१) जांभी
२) रेगूर
३) गाळाची
४) वरीलपैकी कोणताही नाही
११) काळी मृदा सुपीक असते, कारण -
अ) ओलावा टिकवून धरण्याची क्षमता जास्त
ब) चुन्याचे प्रमाण अधिक
क) चिकण मातीचे प्रमाण जास्त
ड) पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम कार्बोनेट
१) फक्त अ आणि ब
२) फक्त ब आणि क
३) फक्त अ, ब आणि क
४) अ, ब, क आणि ड
मृदा आणि पीके
१) क्षारयुक्त जमिनीत वाढणार्या वनस्पतीला काय म्हणतात ?
१) ऑक्झिलोफाईटस्
२) हॅलोफाईटस
३) सायक्रोफाईटस
४) लिथोफाईटस
२) खालीलपैकी कोणते पीक, मृदा व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे?
१) मका
२) ज्वारी
३) बाजरी
४) चवळी
३) स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या योग्य जोड्या जुळवा:
स्तंभ अ (मृदेचे प्रकार) स्तंभ ब (पिके)
अ) पर्वतीय मृदा i) भरडधान्ये
ब) काळी मृदा ii) काजू
क) वाळवंटी मृदा iii) सफरचंद
ड) जांभी मृदा iv) कापूस
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
१) I II IV III
२) IV III II I
३) II I III IV
४) III IV I II
४) खालीलपैकी कोणती पीके अत्यंत आम्लधर्मीय मृदेस सहनशील आहेत ?
१) एरंड, भात, ओट
२) गहू, भात, वांगी
३) मका, भात, टोमॅटो
४) वरीलपैकी कोणतेही नाही
५) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
a) ऊस हे क्षार सहनशील पीक आहे.
b) हरभरा (चना) हे क्षार संवेदनशील पीक आहे.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
६) खालीलपैकी कोणते पीक क्षारास कमी सहनशील आहे?
१) भात
२) ऊस
३) तीळ
४) कापूस
७) वाळू मिश्रित लोम प्रकाराची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते ?
१) ज्वारी
२) नाचणी
३) तांदूळ
४) चहा
८) कोणते झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही ?
१) गुलमोहर
२) बाभूळ
३) काळा सिरस
४) सुरू
५) जमिनीतील सेंद्रीय पदार्थ, सजीव सृष्टी व खते
१) तांबड्या मृदेसंदर्भातील विधाने पहा :
अ) ह्यूमसचे प्रमाण जास्त असते.
ब) सेंद्रीय द्रव्याचे प्रमाण कमी असते.
क) अॅल्युमिनियम ऑक्साइडमुळे तांबडा रंग प्राप्त होतो.
१) विधान अ आणि ब बरोबर आहेत.
२) विधान ब आणि क बरोबर आहेत.
३) विधान अ आणि ब बरोबर नाहीत.
४) विधान अ आणि क बरोबर नाहीत.
२) खालीलपैकी काय प्रति पर्णक्षेत्र प्रति काल शुष्क पदार्थ साठवणुकीचा दर दर्शविते ?
१) PAR (फोटोसिंथेटिकली अॅक्टिव्ह रेडिएशन)
२) NAR (नेट अॅसिमिलेशन रेट)
३) CGR (क्रॉप ग्रोथ रेट)
४) RGR (रिलेटिव्ह ग्रोथ रेट)
३) खालीलपैकी कोणते जिवाणू खत ऊस पिकामध्ये सर्वाधिक नत्र स्थिरीकरण करते?
१) अझॅटोबॅक्टर
२) अॅझोस्पिरिलियम
३) रायझोबियम
४) अॅसिटोबॅक्टर
४) पेंढ्यामध्ये .......... चे प्रमाण अधिक असते.
१) सिलिका
२) स्फुरद
३) उपलब्ध चुना
४) प्रथिन
५) कृषी क्षेत्रात खालीलपैकी कोणते घटक आरोग्य आणि वातावरणावर प्रतिकूल परिणाम करतात?
१) गांडूळखत आणि शेणखत
२) तणनाशके आणि कीडनाशके
३) सायकोसील आणि एन.ए.ए. (नेफथॅलीक अॅसिटीक अॅसिड)
४) निळे, हिरवे शेवाळ
६) जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या जमिनीच्या (मातीच्या) अ थरामध्ये का असते?
१) मातीच्या अ थरामध्ये जास्त अन्नद्रव्ये असतात.
२) मातीच्या अ थरामध्ये सुपिकता अधिक असते.
३) मातीच्या अ थर जलसंपृक्त असतो.
४) मातीच्या अ थरामध्ये भरपूर सेंद्रीय पदार्थ असतात.
७) ज्यावेळी ३० पेक्षा जास्त कर्ब/नत्र गुणोत्तर (प्रमाण) असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत घालतात त्यावेळी प्रारंभीच्या कुजण्याच्या टप्प्या दरम्यान नत्राचे ......... होते.
१) इममोबिलायझेशन
२) मिनरलायझेशन
३) अमोनिफिकेशन
४) नायट्रीफिकेशन
८) बेसिक स्लॅगमध्ये उपलब्ध असणारी झाडांसाठीची अन्नद्रव्ये........
१) चुना व स्फुरद फक्त
२) लोखंड व चुना फक्त
३) चुना व सिलिका फक्त
४) वरील सर्व
९) ........... याचे मुख्य कार्य म्हणजे जमिनीचा पोत सुधारणे व कायम ठेवणे हे असून ते रासायनिक, अरासायनिक जैविक खते यांच्या वापरात सुसूत्रता आणते.
१) आय. पी. एन. एम. एस
२) आय. पी. एम.
३) आय. आर. डि. पी.
४) एच. वाय. व्ही. पी.
१०) मातीचा जिवंत भाग म्हणजे ..........
१) सेंद्रिय पदार्थ
२) सूक्ष्म जिवाणू
३) पाणी
४) अन्नद्रव्ये
११) कोणत्या सेंद्रिय घटकाच्या विघटना करिता जास्त कालावधी लागेल ?
१) साखर
२) पिष्टमय पदार्थ
३) स्निग्ध पदार्थ
४) प्रथिने
१२) डायअमोनियम फॉस्फेट या खतामध्ये P2O5 चे प्रमाण ...... टक्के आहे.
१) ३०
२) ४१
३) ४६
४) ५१
१३) कृषिमध्ये, पोषण द्रव्यांचे एकात्मिक व्यवस्थापन ही संकल्पना येण्याचे कारण म्हणजे
अ) किटकनाशकांचा अति वापर
ब) सिंचनाचा अति वापर
क) रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात असंतुलित वापर
ड) बुरशी नाशकांचा अति वापर
योग्य वाक्ये निवडा :
१) (अ) आणि (ड)
२) फक्त (ब)
३) फक्त (क)
४) फक्त (क) आणि (ड)
६) खराब/समस्याग्रस्त जमिनी
१) दख्खनच्या पठारावर आढळणार्या सुपीक, अपुरा निचरा आणि चोपण व खारवटपणास प्रवृत्त होणारी जमीन कोणती?
१) खोल काळी जमीन
२) लाल जमीन
३) तपकिरी जमीन
४) पोयट्याची जमीन
२) आदिवासींकडून शेती करण्यासाठी वापरल्या जाणार्या या पद्धतीमुळे नैसर्गिक जंगले व मृदा यांचा र्हास होत आहे.
१) पायर्या पायर्यांची शेती
२) तोडा व जाळा
३) वनशेती
४) उदरनिर्वाहाची शेती
३) पुढील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
a) माँटमोरलोनाइट वर्चस्वयुक्त जमिनी चांगला निचरा होणार्या असतात.
b) उच्च केशन (कॅटामन) विनिमम क्षमता (CEC) असलेली जमीन अधिक प्रमाणात केशन (कॅटायनिक) अन्नद्रव्ये साठवते.
c) केओलिनाइट वर्चस्वयुक्त जमिनी चांगली निचरा होणार्या असतात.
d) उच्च केशन (कॅटामन) विनिमय क्षमता (CEC) असलेली जमीन अधिक प्रमाणात अनायनिक अन्नद्रव्ये साठवते.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) फक्त
२) (b) आणि (c) फक्त
३) (c) आणि (d) फक्त
४) (a) आणि (d) फक्त
७) जमिनीची धूप, प्रकार आणि धूप प्रतिबंधक उपाय
१) डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी बेंच टेरेन्सिंग सर्वसाधारणपणे या उतारापर्यंत करण्यात येते.......
१) १६ ते ३३%
२) ३ ते ५%
३) > १०%
४) ४० ते ४५%
२) जमिनीची धूप म्हणजे ..........
अ) जमिनीचे निकृष्टीकरण
ब) जमिनीचा कस कमी होणे
क) जमिनीची उत्पादकता घटणे
ड) वारा व पाण्यामुळे जमिनीचा थर वाहून जाणे.
१) फक्त (ब)
२) फक्त (अ)
३) फक्त (ड)
४) (अ),(ब) आणि (क)
३) जमिनीच्या धूप मापनामध्ये USLE ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?
१) युनिक सॉईल लॉस इरोजन
२) युनिव्हर्सल सॉईल लॉस इरोजन
३) युनिक सॉईल लॉस इक्वेशन
४) युनिव्हर्सल सॉईल लॉस इक्वेशन
४) जमिनीची घनता ...... या एककात मोजतात.
१) मिलिग्रॅम प्रति मीटर
२) ग्रॅम प्रति घन सेंटिमीटर
३) घन सेंटिमीटर प्रति ग्रॅम
४) घन मिलिमीटर प्रति ग्रॅम
५) माती नुकसानीचे सूत्र A = RKSLCP मध्ये 'K' काय दर्शवितो?
१) पिक घटक
२) अपधाव घटक
३) जमीन धूप घटक
४) पाऊस घटक
६) पावसाच्या पडणार्या थेंबामुळे होणार्या माती धुपीस ...... असे म्हणतात.
१) ओघळपाडी धूप
२) घळपाडी धूप
३) सालकाढी/चादर धूप
४) शिंतोडी धूप
७) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
a) जमिनीची वार्यामुळे होणारी धूप जमिनीची पारगम्यता बदलून गंभीर स्वरूपाची हानी घडवून आणते.
b) हिस्टोसोल्स यांना नैसर्गिक / जैविक मृदा म्हणतात.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
८) कोणत्या प्रकारच्या मशागतीचा हेतू जमिनींची धूप थांबविण्यासाठी व पिकांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पादनासाठी आहे?
१) धान्यांच्या ताटांचे बुडवे, आच्छादन व मशागत
२) शून्य मशागत
३) कमीत कमी मशागत
४) प्राथमिक मशागत
९) पावसाच्या थेंबामुळे जमिनीचे धुपीवर कोणता मुख्य परिणाम होतो?
१) जमिनीच्या कणांची अलिप्तता होऊन त्यामुळे जमिनीची घडण बिघडते.
२) पाणी साठ्यास सुरुवात होणे.
३) जमिनीतील ओलावा कमी होणे.
४) जोरात वाहणार्या पाण्यामुळे जमिनीच्या कणांची वाहतूक होते.
१०) जमिनीची धूप थांबविण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे ........ थांबविणे.
१) पाण्याचा प्रवाह
२) वार्याचा वेग
३) मातीचे विभक्तीकरण
४) झाडांची वाढ
११) भारतातील सर्वच राज्यात मृदेची झीज होताना दिसते, परंतु ...... राज्याच्या समुद्र किनार्यावर ती अतिसंवेदनशील दिसते.
१) केरळ
२) तामिळनाडू
३) ओरिसा
४) कर्नाटक
१२) खालीलपैकी कोणता पर्याय पायर्या पायर्यांच्या शेतीसाठी योग्य आहे.
१) खानदेश - सुपीक जमिनीचे क्षेत्र वाढते.
२) मराठवाडा - पिकांना भरपूर पाणी मिळते.
३) विदर्भ - जमिनीची उत्पादकता वाढते.
४) कोकण - जमिनीची झीज कमी होते.
८) मृदासंवर्धन
१) भारतीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोगिता सर्वेक्षण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
१) १९६३
२) १९६८
३) १९५६
४) १९३२
२) भारतात मृदा संधारण संशोधनाची सुरुवात १९२३ साली ....... येथे कोरडवाहू शेती योजनेची स्थापना होऊन झाली.
१) मांजरी, पुणे (महाराष्ट्र)
२) धारवाड (कर्नाटक)
३) गुंटूर (आंध्र प्रदेश)
४) पंतनगर (उत्तराखंड)
३) मृदा आणि पाणी संवर्धनाचे हे कृषिविद्या विषयक उपाय आहेत :
a) पट्टामेर पद्धत
b) समपातळीत लागवड
c) आच्छादनांचा वापर
d) समपातळीतील बांध
पर्यायी उत्तरे :
१) (c), (b) आणि (a) फक्त
२) (c), (b) आणि (d) फक्त
३) (d), (c) आणि (a) फक्त
४) (a), (b), (c) आणि (d) फक्त
४) मृदा संवर्धनासाठी खालील कोणते उपाय योजणे आवश्यक आहे?
a) वनस्पती आवरण आणि संरक्षित वृक्षारोपण
b) पायर्या-पायर्याची शेती
c) स्थलांतरित शेतीवर प्रतिबंध
d) पिकांची चक्रीय पद्धत
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) बरोबर आहेत.
२) (a), (b) आणि (c) बरोबर आहेत.
३) (c) आणि (d) बरोबर आहेत.
४) (a) आणि (d) बरोबर आहेत.
५) मृदा संवर्धनासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे?
अ) वृक्षारोपण
ब) पायर्या पायर्याची शेती
क) पूरनियंत्रण
ड) वाळवंटीकरण
१) अ आणि ब पर्याय बरोबर
२) अ, ब आणि क पर्याय बरोबर
३) ब आणि ड पर्याय बरोबर
४) सर्व पर्याय बरोबर
६) कोणत्या प्रकारच्या मृदा संवर्धनासाठी पायर्या पायर्याची शेती करतात ?
१) प्रबळ पवन क्रियेला (वार्याच्या प्रभावाला) बळी पडणार्या वाळवंटाच्या सीमा रेषा
२) नदी प्रवाहाच्या जवळ असलेला आणि पूरग्रस्त होऊ शकणारे सपाट मैदान
३) तणांची वाढ होऊ शकणारे झुडूप प्रदेश
४) वरीलपैकी एकही नाही
(३) जलव्यवस्थापन
* महाराष्ट्रातील जलसंधारण - पद्धती, पाणलोट क्षेत्र, नद्यांची आंतरजोडणी (नद्या जोड प्रकल्प)
* महाराष्ट्रातील जलसिंचन - पद्धती , पाणी वापराची कार्यक्षमता, पिकांना लागणारे पाणी
१) जल विज्ञानचक्र व जलव्यवस्थापन
२) जलसंधारणाच्या पद्धती
३) जलस्रोत, पाणलोट क्षेत्र व धरणे
४) सिंचन पद्धती - प्रकार, फायदे तोटे
५) सिंचनाचे वेळापत्रक व पिकांना लागणारे पाणी
६) दुष्काळ आणि आणि कोरडवाहू शेती
७) सिंचन योजना व उपक्रम
१) जल विज्ञानचक्र व जलव्यवस्थापन
१) पाणी मोजण्याच्या प्रमाणानुसार, १ टीएमसी = ......
१) १०४ घन मीटर
२) १०९ घन फूट
३) १०९ घन मीटर
४) १०१० घन फूट
२) भारतात जल-मनुष्य (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते ?
१) माधवराव चितळे
२) मेधा पाटकर
३) सुंदरलाल बहुगुणा
४) राजेंद्र सिंह
३) राष्ट्रीय जलसंपत्तीचा प्रमुख उपभोक्ता कोण आहे ?
१) उद्योगधंदे
२) पिण्याचे पाणी
३) सिंचन (जलसिंचन)
४) मत्स्यशेती
४) जमिनीच्या पृष्ठभागावरून जमिनीमध्ये खालच्या दिशेने जाणार्या पाणी प्रवाहास ........... असे म्हणतात.
१) गळणे
२) झिरपणे
३) जिरणे/मुरणे
४) यापैकी एकही नाही
५) रेन वॉटर हार्वेस्टींग कशाशी संबंधित आहे ?
१) प्रत्येक भूखंडात पावसाचे पाणी जमिनीत अथवा टाकीत साठवून पाण्याची उपलब्धता वाढविणे.
२) शहरातील तलावातील पाण्याचा साठा वाढविणे.
३) पावसाच्या पाण्याचे शुद्धीकरण करणे.
४) पावसाचे पाणी शेतीसाठी वापरणेबाबात.
६) वाहत्या पाण्याचे प्रमाण कमी करणे, रस्ते जलमय होण्यापासून वाचविणे, पाण्याची वाढती गरज भागविणे, भूमिगत पाण्याची पातळी शहरात वाढविणे यासाठी, खालीलपैकी कोणता पर्याय अधिक योग्य आहे ?
१) विहिरींची निर्मिती करणे
२) तलावांची निर्मिती करणे
३) सरोवरांची निर्मिती करणे
४) पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे
७) जर सिंचनाचे पाणी जमिनीत जास्त काळ टिकून राहिले तर त्याचे बाष्पीभवन होऊन जमिनीतील क्षार आणि खनिजे यांचे प्रमाण वाढून क्षारीकरण होते. अशा सिंचित जमिनीवर क्षारीकरणाचा काय परिणाम होतो?
१) त्यामुळे मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन वाढते.
२) त्यामुळे मृदेच्या कणात पाणी घुसू शकत नाही.
३) त्यामुळे भूजल पातळी वाढते.
४) मृदेच्या कणातील रिक्त जागा पाण्यामुळे भरली जाते.
८) जर जमिनीवरून वाहून जाणार्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास, प्रवाहाची जमिनीची धूप करण्याची शक्ती मूळ वेगाच्या कितीपटीने वाढेल?
१) एकपट
२) दुप्पट
३) चारपट
४) आठपट
२) जलसंधारणाच्या पद्धती
१) पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे, पाणी साठवण क्षमता पुनःस्थापित करणे, निकामी जलस्रोतांमधील गाळ काढणे, पाणी अडविणे पाणी जिरविणे बाबत लोकांना प्रोत्साहित करणे या करिता राज्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय शासनाने कधी घेतला?
१) नोव्हेंबर २०१४
२) डिसेंबर २०१४
३) जानेवारी २०१५
४) ऑक्टोबर २०१४
२) जमिनीचा उतार ...... टक्के पेक्षा जास्त असतो तेव्हा कंटूर चर तांत्रिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाहीत.
१) १०
२) १५
३) २०
४) २५
३) समपातळी (कंटुर) बांधाची शिफारस ....... असणार्या भागासाठी आणि ज्या जमिनीमध्ये पाणी झिरपते व ६ टक्के पर्यंत उतार असतो अशा शेत जमिनीत करतात.
१) ६०० मि. मी. पेक्षा कमी पर्जन्यमान
२) ६०० मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान
३) १००० मि. मी. पेक्षा अधिक पर्जन्यमान
४) ७०० मि. मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान
४) जलसंवर्धनाबाबत विविध राज्ये आणि तिथे चालू असलेली योजना ः
अ) तेलंगना - काकतीया अभियान
ब) आंध्र प्रदेश - मुख्यमंत्री जल स्वावबंबन अभियान
क) महाराष्ट्र - जलयुक्त शिवार अभियान
ड) राजस्थान - डेल्मा अभियान
वरीलपैकी कोणती/कोणत्या जोड्या जोडी बरोबर नाहीत?
१) फक्त (अ)
२) फक्त (ब)
३) (अ) आणि (क)
४) (ब) आणि (ड)
५) ढाळीचे बांध कोणत्या ठिकाणी घेतले जातात ?
a) जमीन पाण्याच्या धुपेला कमी ग्रहणशील आहे तेथे
b) मातीची पारगम्यता कमी आहे तेथे
c) दलदलीच्या जमिनीत
d) जास्त उताराच्या जमिनीत
पर्यायी उत्तरे :
१) (a)
२) (a) आणि (b)
३) (b) आणि (c)
४) (c) आणि (d)
६) a) समतल बांध पद्धत मुख्यत्वे कमी पावसाच्या प्रदेशात जलसंधारणासाठी वापरली जाते.
b) ढाळीचे बांध पद्धत जास्त पावसाच्या प्रदेशात झालेले पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी वापरली जाते.
वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
१) (a) बरोबर आणि (b) चूक
२) दोन्ही (a) आणि (b) बरोबर आहेत
३) (a) चूक आणि (b) बरोबर आहे
४) दोन्ही (a) आणि (b) चूक आहे
७) कमी ते मध्यम पावसाच्या भागामध्ये समपातळीत बांध असलेल्या काळ्या जमिनीवर कोणत्या प्रकारच्या टेरेसिंगचा वापर करतात ?
१) झिंग टेरेसिंग
२) बेंच टेरेसिंग
३) ग्रेडेड टेरेसिंग
४) वरील सर्व
८) गॅबीयनच्या संदर्भात कोणत्या बाबी सत्य आहेत ?
a) ते हाताळण्यासाठी लवचीक आहेत.
b) त्यांचे बांधकाम कमी खर्चाचे असते.
c) अपधावासाठी ते अपार्य असतात.
d) ते सहज फुटू शकतात.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b)
२) (b) आणि (c)
३) (a) आणि (c)
४) (a) आणि (d)
९) जलयुक्त शिवार अभियानाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
१) स्वातंत्र्यानंतर लोकसहभागातून साकारलेली ही सर्वात मोठी चळवळ आहे.
२) पाच वर्षात २५,००० गावांना दुष्काळमुक्त करण्याचा या योजनेचा संकल्प आहे.
३) या योजनेसाठी गावाची निवड ही फक्त जिल्हा पातळीवरील समितीमार्फत केली जाते.
४) गावाच्या कृति आराखड्याला ग्रामसभेची मान्यता आवश्यक आहे.
३) जलस्रोत, पाणलोट क्षेत्र व धरणे
१) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन व पाणी संवर्धन योजना मुख्यतः कशावर आधारित असते?
१) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान
२) जमीन आणि माती संवर्धन
३) पिकांचे नियोजन
४) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे
२) खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाच्या प्रस्थापनाला/विकासाला भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने हातभार लावला?
१) अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम (डी.पी.ए.पी.)
२) वाळवंट विकास कार्यक्रम (डी.डी.पी.)
३) कोरडवाहू प्रदेशासाठी राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (एन.डब्ल्यू.डी.पी.आर.ए.)
४) बहुव्याप्ती असलेला पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (काऊडेप)
३) महाराष्ट्रात राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमाला कोणत्या उद्देशपूर्तीसाठी एका चळवळीचे स्वरूप देण्यात आले आहे?
१) कोरडवाहू शेतीचे शाश्वत शेतीत रूपांतर
२) मृद व जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी
३) गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी
४) वरील सर्व
४) पाणलोट क्षेत्राच्या अति उतार असणार्या भागावर पाणी अडविण्यासाठी आणि त्याच्या विल्हेवाटीसाठी याची शिफारस करण्यात आली आहे .........
१) जमिनीचे सपाटीकरण
२) समपातळी आणि ग्रेडेड बांध
३) समपातळी मशागत
४) वनीकरण
५) खालील विधाने पहा :
a) महाराष्ट्रामध्ये लघू पाटबंधारे योजनांतर्गत पूर्ण प्रकल्प झालेल्यांपैकी सर्वांत जास्त जलसिंचनाचे क्षेत्र धुळे-नंदुरबार जिल्ह्यात असून, त्या खालोखाल चंद्रपूर, सोलापूर, सांगली व पुणे जिल्ह्याचा क्रमांक आहे.
b) महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांमधील जलाशयांची संख्या ही पुणे विभागामध्ये सर्वांत जास्त असून त्या खालोखाल औरंगाबाद विभागाचा क्रमांक लागतो. तसेच, कोकण विभागामध्ये जलाशयांची संख्या सर्वांत कमी आहे.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) बरोबर
२) (a) बरोबर (b) चूक
३) (a) चूक (b) बरोबर
४) (b) आणि (a) चूक
६) सिंचनक्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी ...... जिल्ह्यात पेंच हा प्रकल्प उभारला आहे.
१) नागपूर
२) जळगाव
३) बुलढाणा
४) उस्मानाबाद
७) खालीलपैकी कोणत्या धरणांचा समावेश कुकडी जल सिंचन प्रकल्पाअंतर्गत होतो?
१) भाटघर, भंडारदरा, पिंपळगावजोगे, वडज, डिंभे
२) पिंपळगावजोगे, माणिकडोह, वडज, भंडारदरा, डिंभे
३) येडगाव, माणिकडोह, पिंपळगावजोगे, वडज, डिंभे
४) येडगाव, येलदरी, हातणूर, वडज, डिंभे
८) डोंगराळ आणि चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या रचनेमध्ये अतिरिक्त पावसाच्या पाण्याचे संकलन करण्यासाठी कोणत्या प्रकारचा तलाव वापरतात?
१) बंधार्याने बांधलेला
२) खोदलेला
३) पृष्ठीय
४) वरील सर्व
४) सिंचन पद्धती - प्रकार, फायदे तोटे
१) जोड्या लावा :
जलसिंचन कालवा निर्मिती वर्ष
अ) कृष्णा कालवा I) १८७५
ब) खडकवासला कालवा II) १८७०
क) निरा डावा बँक कालवा III) १८८५
ड) गिरणा कालवा IV) १९१०
(a) (b) (c) (d)
१) II IV I III
२) IV I III II
३) III II IV I
४) II I III IV
२) सन २०१०-११ साली महाराष्ट्रात सिंचनाखालील क्षेत्राची (अस्थायी) कसलेल्या निव्वळ क्षेत्राशी टक्केवारी ............ % होती.
१) १६.८
२) १०.०
३) १९.१
४) २१.०
३) महाराष्ट्रातील लागवडी योग्य कृषिक्षेत्रांपैकी किती टक्के क्षेत्र जलसिंचित नाही (२००१-०२)?
१) ७५
२) ६४
३) ७४
४) ८४
४) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त सिंचन तीव्रता आहे?
१) भंडारा - गोंदिया
२) कोल्हापूर-सोलापूर
३) अहमदनगर-पुणे
४) अकोला-अमरावती
५) राज्यातील लागवडीखालील क्षेत्राच्या ६० टक्के पेक्षा जास्त सिंचित क्षेत्र ........ या राज्यात आहे.
१) मध्यप्रदेश आणि छत्तीसगड
२) कर्नाटक आणि महाराष्ट्र
३) पंजाब आणि हरियाणा
४) आंध्रप्रदेश आणि केरळ
६) खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ८० टक्केपेक्षा जास्त जलसिंचन उपसा (lift irrigation) प्रकारचे आहे ?
१) सोलापूर
२) कोल्हापूर
३) सातारा
४) सांगली
७) महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्रोत उतरत्या क्रमाने लावा.
a) सरकारी कालवे
b) खाजगी कालवे
c) विहिरी
d) तलाव
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b), (c), (d)
२) (c), (a), (d), (b)
३) (c), (a), (b), (d)
४) (c), (b), (a), (d)
८) बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे ?
१) पंजाब व हरियाणा
२) महाराष्ट्र व गोवा
३) आंध्रप्रदेश व तामिळनाडू
४) केरळ व कर्नाटक
९) सिंचन कालव्यामधील पाण्याचा प्रवाह मोजण्याच्या साधनांची नांवे सांगा.
१) बेअर व नॉचेस
२) नॉचेस व ऑरिफिसेस
३) पार्शल फ्ल्यूम व मिटरगेट
४) वरील सर्व
विहीर सिंचन
१) महाराष्ट्राच्या एकूण जलसिंचन क्षेत्रापैकी सुमारे .......... टक्के क्षेत्र विहिरीच्या पाण्याने भिजविले जाते.
१) ४८
२) ३८
३) ६७
४) ५६
२) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी आहेत?
१) अहमदनगर
२) पुणे
३) सातारा
४) नागपूर
३) २००१ मध्ये महाराष्ट्रातील कोणता विभाग विहीर सिंचनामध्ये अग्रेसर होता?
१) नागपूर
२) नांदेड
३) कोल्हापूर
४) पुणे
४) खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?
१) आंध्र प्रदेश
२) महाराष्ट्र
३) मध्य प्रदेश
४) गुजरात
५) पूर्व महाराष्ट्रातील विशेषत: चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात ?
१) जोहड
२) मालगुझारी
३) शेततळी
४) पाणलोट
६) खालीलपैकी कोणता जलसिंचनाचा स्रोत महाराष्ट्रात मुख्य आहे?
१) कालवे सिंचन
२) तळी सिंचन
३) विहिरी सिंचन
४) लिफ्ट सिंचन
७) खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकार महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रचलित आहे ?
१) कालवे जलसिंचन
२) विहिर जलसिंचन
३) तलाव जलसिंचन
४) उपसा जलसिंचन
८) महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांचा वापरानुरूप योग्य चढता क्रम दर्शविणारा पर्याय कोणता ?
१) उपसा-तलाव-विहिरी-कालवा
२) उपसा-तलाव-कालवा-विहीर
३) तलाव-उपसा-कालवा-विहीर
४) तलाव-उपसा-विहीर-कालवा
९) महाराष्ट्रात जलसिंचनासाठी खालीलपैकी कोणता स्रोत मुख्य आहे?
१) कालवे
२) तलाव
३) विहिरी
४) उपसा
१०) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
a) महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची घनता सांगली व सोलापूर जिल्ह्यात असून, सर्वात कमी घनता कोकण विभागात व नागपूर विभागात आहे.
b) महाराष्ट्रात तलाव जलसिंचनाचे प्रमाण १५% असून विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात तलावाच्या साहाय्याने ६० टक्के पाणी पुरवठा केला जातो.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त (a)
२) फक्त (b)
३) (a) आणि (b)
४) वरीलपैकी कोणतेही नाही
तुषार सिंचन
१) पाणी देण्याच्या तुषार सिंचन पद्धतीमुळे साधारणतः ............. पाणी बचत होते.
१) १० ते १५%
२) १५ ते २०%
३) ३० ते ४०%
४) ५०%
२) खालील विधाने वाचा व योग्य तो उत्तराचा पर्याय शोधा.
अ) तुषार सिंचन हे जवळपास सर्वच पिकांना उपयोगी आहे.
ब) तुषार सिंचन भारी काळ्या मृदासाठी योग्य नाही
१) (अ) बरोबर, परंतु (ब) नाही
२) (ब) बरोबर, परंतु (अ) नाही
३) दोन्हीही बरोबर आहेत
४) दोन्हीही बरोबर नाहीत.
३) वालुकामय माती व उथळ जमीन, जेथे जमिनीचे सपाटीकरण शक्य नसते तेथे सिंचनाची कोणती पद्धत उपयुक्त आहे?
१) आंतरपृष्ठ सिंचन
२) ठिबक सिंचन
३) तुषार सिंचन
४) पृष्ठभागीय सिंचन
४) ......... जमिनीसाठी तुषार सिंचन उपयुक्त आहे.
१) खार
२) उथळ (कमी खोलीची) व उताराच्या
३) आम्लधर्मी
४) अल्कधर्मी
५) तुषार सिंचनाच्या समानता गुणांकावर खालील घटक परिणाम करतात.
a) तुषार तोट्यामधील अंतर
b) पीक भूमिती
c) संच चालवण्याचा कालावधी
d) वार्याची स्थिती
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b)
२) (a) आणि (c)
३) (a) आणि (d)
४) (c) आणि (d)
६) खालील परिस्थितीत तुषार सिंचन पद्धत चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही ?
१) वार्याचा जास्त वेग
२) जास्त रोपांची घनता
३) कमी रोपांची घनता
४) उताराची जमीन
७) बहुतांश पिकांमध्ये जेथे जमिनीला बराच ऊंच सखलपणा आणि उतार असतो अशा वेळी ...... ही पाणी देण्याची पद्धत वापरता येते.
१) ठिबक सिंचन
२) तुषार सिंचन
३) सारा
४) आळे
८) पाणी देण्याची कोणती पद्धत वालुकामय आणि जास्त झिरपा होणार्या जमिनीसाठी वापरली जाते ?
१) ठिबक सिंचन
२) पृष्ठभागावरून पाणी देणे
३) आळे
४) तुषार सिंचन
ठिबक सिंचन
१) महाराष्ट्रातील लागवडीखालील जमिनीच्या किती टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे ?
१) ३५%
२) ८०%
३) ४०%
४) यापैकी नाही
२) खालील विधाने पहा :
a) भारताच्या एकूण ठिबक जलसिंचन क्षेत्रातील महाराष्ट्राचा वाटा ६०% असून महाराष्ट्रात द्राक्षे व केळीचे ५०% क्षेत्र ठिबक जलसिंचन क्षेत्राखाली आहे.
b) महाराष्ट्राचा भारतात सोयाबीन आणि ऊस उत्पादनात दुसरा क्रमांक आहे. सोयाबीनचा दर हेक्टरी उत्पादनात प्रथम, तर ऊसाचा क्रमांक दुसरा आहे.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) बरोबर
२) (a) बरोबर (b) चूक
३) (a) चूक (b) बरोबर
४) (a) आणि (b) चूक
३) ठिबक सिंचन प्रणालीमध्ये वाळूच्या गाळणीची गरज खालील घटक सिंचनाच्या पाण्यातून काढण्यासाठी होते.
a) शेवाळ
b) पाण्यात विरघळलेले क्षार
c) काडी-कचरा
d) अतिसूक्ष्म मृदा कण
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b)
२) (a) आणि (c)
३) (b) आणि (c)
४) (c) आणि (d)
४) .......... पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धत अतिशय उपयुक्त आहे.
१) अधिक पाण्यामध्ये होणार्या
२) क्षारांना बळी न पडणार्या
३) कमी उत्पन्न देणार्या
४) फळ
५) प्रवाही जलसिंचनात शेवाळ जे नत्र स्थिरीकरणामुळे स्वीकारले जाते, तेच ठिबक सिंचन प्रणालीत मुळीच पसंत केले जात नाही कारण -
१) ठिबक सिंचन प्रणाली वापरल्यामुळे शेवाळ नत्र स्थिरीकरण करू शकत नाही.
२) ठिबक सिंचनाच्या पाइपमध्ये शेवाळ वाढू शकत नाही.
३) ठिबक तोट्या बंद पडू शकतात.
४) यांपैकी काहीही नाही.
६) सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यास खालीलपैकी कशाचा अवलंब करावा?
१) जमीन एका हंगामात पडीक ठेवावी.
२) ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
३) एका आड एक सरी भिजवावी
४) वरीलपैकी एकही नाही.
७) महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे?
१) ऊस
२) कापूस
३) फलोत्पादन
४) तेलबिया
८) महाराष्ट्रातील ...... या जिल्ह्यात सर्वाधिक ठिबक सिंचन प्रगत आहे.
१) जळगाव
२) चंद्रपूर
३) औरंगाबाद
४) नांदेड
९) ठिबक सिंचन पद्धतीसाठी होणार्या खर्चाचा समावेश खालीलपैकी कोणत्या कृषी संबंधी खर्चात केला जातो?
१) दीर्घ मुदतीचा खर्च
२) मध्यम मुदतीचा खर्च
३) लहान मुदतीचा खर्च
४) हंगामी / तात्पुरता खर्च
५) सिंचनाचे वेळापत्रक व पिकांना लागणारे पाणी
१) ज्वारी पिकाची जल वापर क्षमता साधारणपणे ...... आहे.
१) ९.० किलो ग्रॅम प्रति हेक्टर मिलिमीटर
२) १३.४ किलो ग्रॅम प्रति हेक्टर मिलिमीटर
३) ३.७ किलो ग्रॅम प्रति हेक्टर मिलिमीटर
४) वरीलपैकी नाही
२) पाण्याचे वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव साळुंखेंच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू करण्यात आले?
१) बारामती
२) खेड
३) पुरंदर
४) मावळ
३) खालीलपैकी कोणती संज्ञा सिंचनाशी संबंधित आहे ?
अ) डेल्टा
ब) पीक काळ
क) ड्यूटी
ड) सिंचनाशी तीव्रता
१) (अ), (क), (ड)
२) (अ), (क)
३) (अ), (ब), (क)
४) वरील सर्व
४) सोयाबीन पिकामध्ये पाणी देण्यासाठी संवेदनशील अवस्था.....
१) सुरुवातीची रोप वाढीची, फुले येण्याची, शेंगा भरण्याची
२) फुले येण्याची, फांद्या फुटण्याची
३) शेंगा विकसित होणारी, गाठी तयार होण्याची
४) मुळे वाढीची, फुले येण्याची, शेंगा भरण्याची
५) जमिनीतील वापशाच्या वेळची जलमर्यादा (- १/३ बार) आणि वनस्पती सुकण्याच्या वेळची जलमर्यादा (-१५ बार) या दोनमधील पाण्याच्या भागास ...... म्हणतात.
१) केशाकर्षण पाणी
२) आर्द्रता शोषक पाणी (हायग्रोस्कोपिक पाणी)
३) उपलब्ध पाणी
४) गुरुत्वाकर्षणाचे पाणी
६) कडधान्य पिकातील सिंचनासाठी अति संवेदनशील अवस्था कोणत्या आहेत ?
१) शाखीय वाढ व शेंगा धरायला लागणे.
२) पेरणी व शाकीय वाढ
३) शाखीय वाढ व फुलोर्यात येणे
४) पेरणी व शेंगा धरायला लागणे
७) समान सूर्य किरणोत्सर्गामध्ये, सिंचनाखाली घेतलेल्या पिकाचे उत्पन्न हे समान पाणी पावसामार्फत मिळालेल्या त्याच पिकाच्या उत्पन्ना ...... असते.
१) पेक्षा अधिक
२) एवढे
३) पेक्षा कमी
४) पेक्षा अनिश्चित
८) पिकाची पाण्याची गरज काढताना सर्वाधिक पीक गुणांक कोणत्या वाढीच्या अवस्थेत असतो?
१) प्रजोत्पादन अवस्था
२) रोप अवस्था
३) जोमदार शाखीय अवस्था
४) पक्वता अवस्था
९) सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता साधारणपणे ....... वरून केली जाते.
१) एकूण क्षारांचे प्रमाण
२) सोडियम शोषण गुणोत्तर (SAR)
३) बायकार्बोनेट व बोरॉनचे प्रमाण
४) वरील सर्व
१०) पिकांची पाण्याची गरज कशाशी संबंधित असते?
१) इव्हॅपोट्रान्सपिरेशन
२) पोटेंशियल अॅब्सॉर्बशन कोईफिशीएन्ट
३) ड्राय मॅटर कन्टेट ऑफ द प्लँट
४) सॉईल मिनरॉलॉजी
११) गहू पिकास पाणी देण्याची सर्वात महत्त्वाची अवस्था ......... आहे.
१) फुले येण्याची
२) फुटवे फुटण्याची
३) दाण्यास चिक भरण्याची
४) मुकुट मुळे फुटण्याची
१२) खालीलपैकी एकूण पिक कालावधीमध्ये कमी पाणी लागणारे पिक कोणते ?
१) रब्बी ज्वारी
२) मिरची
३) गहू
४) उन्हाळी मूग
६) दुष्काळ आणि आणि कोरडवाहू शेती
१) महाराष्ट्रातील दुष्काळ प्रवण प्रदेशात ...... मि.मी. वार्षिक पाऊस पडतो.
१) १००० ते १५०० मि.मी.
२) ७५० ते ८५० मि.मी.
३) ६०० ते ७५० मि.मी.
४) ८५० ते ९५० मि.मी.
२) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे ?
१) ७५ सें.मी. पेक्षा कमी
२) १०० ते २०० सें.मी.
३) २०० सें.मी. पेक्षा जास्त
४) वरीलपैकी कोणतेही नाही
३) खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते जिल्हे अवर्षणग्रस्त पट्ट्यामध्ये येतात?
अ) परभणी व रत्नागिरी
ब) धुळे व सोलापूर
क) गडचिरोली व अमरावती
ड) अहमदनगर व पुणे
१) फक्त ब
२) अ आणि ब
३) ब आणि ड
४) अ, ब आणि क
४) जमिनीतील उपलब्ध ओलावा व बाष्पोत्सर्जन यांच्यातील समतोल बिघडल्यामुळे येणार्या दुष्काळास काय म्हणतात?
१) वातावरणीय दुष्काळ
२) ओला दुष्काळ
३) कृषी दुष्काळ
४) कायमचा दुष्काळ
५) खालील विधाने पहा आणि त्याप्रमाणे उत्तरे द्या ः
अ) वालुकामय मृदामध्ये, पाणी धारण क्षमता जास्त असते.
ब) या (वालुकामय) मृदेमध्ये सिंचनासाठी अधिक पाणी लागते.
१) (अ) बरोबर, पण (ब) नाही
२) (ब) बरोबर, पण (अ) नाही
३) दोन्ही बरोबर आहेत
४) दोन्ही चूक आहेत
६) केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणार्या शेतीला ........... म्हणतात.
१) बागायती शेती
२) जिरायती शेती
३) सखोल शेती
४) व्यापारी शेती
७) कोरडवाहू शेतीमध्ये खोल काळ्या जमिनी व्यतिरिक्त पावसाच्या पाणी साठ्याच्या व्यवस्थापनेसाठी कोणती पद्धत योग्य आहे?
१) सरी आणि वरंबा पद्धत
२) रुंद सरी आणि वरंबा पद्धत
३) खोलवर आच्छादन
४) शेततळे
८) पिकांचे कोरड्या हवामानात अवर्षण प्रतिकारण कशाशी संबंधित आहे?
१) उणे पाणी वापर क्षमता
२) अधिक पाणी वापर क्षमता
३) जास्त पाणी वापर क्षमता
४) वरीलपैकी नाही
९) खालीलपैकी कोणता शासकीय विभाग दुष्काळ नियोजनाविषयी प्रमुख विभाग आहे?
१) केंद्रीय शेती विभाग
२) केंद्रीय पर्यावरण विभाग
३) केंद्रीय अर्थ विभाग
४) वरील सर्व
१०) कमी पावसाच्या प्रदेशातील बागायती जमिनी कशामुळे क्षारयुक्त व चोपण (अल्कली युक्त) होतात?
१) कमी प्रमाणात अन्नद्रव्याचा निचरा
२) पीक अवशेषांचा अति वापर
३) असंतुलित खतांचा वापर
४) पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पृष्ठभागातील थरांमध्ये क्षारांची वाढ
११) शुष्क प्रदेशाचे भूजल सामान्यतः ...... स्वरूपात असते.
१) विम्लयुक्त
२) आम्लयुक्त
३) उदासीन
४) खारे
१२) कोरडवाहू शेतीमध्ये खोल काळ्या जमिनी व्यतिरिक्त पावसाच्या पाणी साठ्याच्या व्यवस्थापनेसाठी कोणती पद्धत योग्य आहे?
१) सरी आणि वरंबा पद्धत
२) रुंद सरी आणि वरंबा पद्धत
३) खोलवर आच्छादन
४) शेततळे
१३) लघू जलसिंचनाबाबत खालील विधाने लक्षात घ्या.
१) खत किंवा पोषण द्रव्यांची हानी कमी करता येते.
२) कोरडवाहू शेतीसाठी तीच एक सिंचनाची पद्धत आहे.
३) खोल जाणारी भूजल पातळी रोखण्यास काही प्रदेशात या पद्धतीचा वापर होतो.
१) फक्त १ बरोबर
२) फक्त १ आणि २ बरोबर
३) २ आणि ३ बरोबर
४) १, २ आणि ३
१४) पिकांचे कोरड्या हवामानात अवर्षण प्रतिकारण कशाशी संबंधित आहे?
१) उणे पाणी वापर क्षमता
२) अधिक पाणी वापर क्षमता
३) जास्त पाणी वापर क्षमता
४) वरीलपैकी नाही
७) सिंचन योजना व उपक्रम
१) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकर्शित जलविभाजक विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला ?
१) १९५३
२) १९६३
३) १९७३
४) १९८३
२) महाराष्ट्र सरकारने जिल्हा आपत्ती नियोजन केंद्राची स्थापना ...... वर्षी केली.
१) ऑगस्ट १९९६
२) जानेवारी १९९६
३) मे १९९५
४) जानेवारी १९९५
३) महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
१) १९९६
२) १९९७
३) १९९८
४) १९९९
४) महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याच्या तपासासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली ...........साली विशेष तपास पथक (SIT) ची स्थापना केली.
१) २०१०-११
२) २०११-१२
३) २०१३-१४
४) २०१२-१३
५) खाली विधाने पहा.
a) महाराष्ट्र सरकारने जुलै २००३ मध्ये अधिकृत जलनिती जाहीर केली.
b) डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली १९९५ मध्ये दुसरा सिंचन आयोग नेमण्यात आला.
c) महाराष्ट्र शासन दरवर्षी जललेखा परीक्षण करते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत?
१) (a) आणि (b)
२) (a) आणि (c)
३) (b) आणि (c)
४) फक्त (c)
६) महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजनेच्या जिल्ह्याप्रमाणे योग्य जोड्या लावा :
a) देवघर i) नाशिक
b) पुणेगाव ii) बुलढाणा
c) मांजरा iii) पुणे
d) नळगंगा iv) उस्मानाबाद
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (iv) (iii) (i)
२) (iv) (iii) (i) (ii)
३) (iii) (i) (iv) (ii)
४) (i) (iv) (ii) (iii)
७) खालील विधाने पहा.
a) कण्हेर जलसिंचन योजना सातारा जिल्ह्यामध्ये आहे.
b) कोल्हापूर जिल्ह्यात ८०% जलसिंचन हे उपसा प्रकारचे आहे.
c) गोंदीया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात ८०% जलसिंचन तलावातून होते.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त विधान (a) बरोबर आहे.
२) फक्त विधान (c) बरोबर आहे.
३) विधान (a) आणि (b) बरोबर आहेत.
४) विधान (a), (b) आणि (c) बरोबर आहेत.
८) जोड्या लावा.
जिल्हा जलसिंचन योजना
a) यवतमाळ i) जयगाव
b) नागपूर ii) तुलतुली
c) गडचिरोली iii) वेण्णा
d) बुलढाणा iv) बेंबला
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (ii) (iv) (i) (iii)
३) (iv) (iii) (ii) (i)
४) (iii) (i) (ii) (iv)
९) खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे ?
१) हिराकूड
२) जायकवाडी
३) कोयना
४) भाक्रा-नानगल
१०) मराठवाड्यातील शेती विकास ...... प्रकल्पामुळे झालेला आहे.
१) उजनी
२) जायकवाडी
३) गंगापूर
४) मांजरा
११) २५ डिसेंबर २०१९ रोजी अटल भूजल योजना भारतात सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये कोणत्या राज्यांचा समावेश करण्यात आला?
१) हरियाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल.
२) उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, आसाम, मणिपूर, मध्यप्रदेश
३) राजस्थान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, नागालँड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश
४) हरियाणा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र
१२) पाणी व जमीन व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) केंद्र .......... येथे आहे.
१) नागपूर
२) पुणे
३) औरंगाबाद
४) मुंबई
१३) महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या दिनांक ९.११.१७ च्या आकडेवारीनुसार, खाली दिलेल्यांपैकी अशा कोणत्या दोन विभागांमध्ये जून २०१७ ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत त्या त्या विभागाच्या सर्वसाधारण पर्जन्यमानाच्या ९०% पेक्षा जास्त पर्जन्य झाल्याची नोंद झाली ?
१) पुणे व नागपूर
२) पुणे व अमरावती
३) कोकण व नाशिक
४) औरंगाबाद व नागपूर
१४) जर नॅशनल वॉटर मिशन ही योग्य पद्धतीने आणि पूर्णपणे अमलात आली तर तिचा देशात काय परिणाम होईल?
१) नागरी भागातील पाण्याची गरज भागविण्यासाठी सांडपाण्यावर पुनर्प्र प्रक्रिया केली जाईल.
२) किनारपट्टीवरील शहरांच्या पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा पेयजल म्हणून उपयोग करण्यासाठी योग्य ते तंत्रज्ञान स्वीकारण्यास मदत होईल.
३) हिमालयात उगम पावणार्या सर्व नद्या दक्षिण भारतातील नद्यांशी जोडल्या जातील.
४) बोअरवेल खनन आणि भूअंतर्गत जल खेचण्यासाठी मोटर व पंप सेेटचा वापर करण्यासाठी येणारा खर्च सरकारमार्फत अनुदान म्हणून दिला जाईल.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
१) फक्त 1
२) फक्त 1 व 2
३) फक्त 3 व 4
४) 1, 2, 3 व 4
१५) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) महाराष्ट्र शासनाने अटल सोलर कृषी पंप योजना लागू केली आहे.
२) अटल सोलर कृषी पंप योजनेनुसार पाच एकरापेक्षा कमी जमीन असणार्या शेतकर्यांना ३ अश्वशक्ती सोलर पंपासाठी किमतीच्या पाव टक्के रक्कम द्यावी लागणार आहे.
३) अटल सोलर कृषी पंप योजनेनुसार पाच एकरापेक्षा जास्त जमीन असणार्या शेतकर्यांना ५ अश्वशक्ती सोलर पंप रु. १०,००० मिळणार आहे.
४) वरीलपैकी एकही नाही.
(४) महाराष्ट्रातील मासेमारी/मत्स्य व्यवसाय
* भूप्रदेशाअंतर्गत मासेमारी, अरबी सागरातील मासेमारी, कोळी लोकांच्या समस्या, मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण
१) भूप्रदेशाअंतर्गत मासेमारी
२) अरबी सागरातील मासेमारी
३) कोळी लोकांच्या समस्या
४) मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण
१) महाराष्ट्राच्या सागरी किनार्यालगतचा मासेमारीसाठी योग्य क्षेत्र ...... लाख चौ. किमी. आहे.
१) ०.९०
२) १.१२
३) १.८६
४) २.०
२) एक किलो वजनाच्या परिपक्व कार्प माशाच्या मादीमध्ये साधारणत: किती अंडी असतात ?
१) ५०,००० - ७५,०००
२) ७५,००० - १,००,०००
३) १,००,००० - १,५०,०००
४) २,५०,००० - ३,००,०००
३) महाराष्ट्रातील ...... हा जिल्हा गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी महत्त्वाचा आहे.
१) रायगड
२) ठाणे
३) पुणे
४) भंडारा
४) खालील जोड्या लावा :
जिल्हा मासेमारी केंद्र
अ) मुंबई I. श्रीवर्धन
ब) ठाणे II. वेंगुर्ला
क) रायगड III. वर्सोवा
ड) रत्नागिरी IV. सातपाटी
अ ब क ड
१) I II III IV
२) IV I II III
३) III IV I II
४) II III IV I
५) सायप्रिनस मासा मूळचा ........... मधील आहे.
१) जपान
२) कोरिया
३) चीन
४) भारता
६) जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
१) परभणी
२) लातूर
३) भंडारा
४) औरंगाबाद
७) भात शेतीतील मत्स्य संवर्धनासाठी खालीलपैकी कोणते मासे वापरले जातात ?
१) फक्त कटला
२) फक्त रोहू
३) फक्त मृगळ आणि कटला
४) वरील सर्व
८) खालीलपैकी कोणत्या माशाचे तोंड वरच्या बाजूस वळलेले असते ?
१) कटला
२) मृगळ
३) रोहू
४) स्केल कार्प
९) खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीत महत्त्वाचा आहे?
१) बांगडा
२) झिंगा
३) बोंबील
४) कोळंबी
१०) महाराष्ट्राने मत्स्योत्पादनात इतर राज्यांच्या तुलनेने आघाडी घेतली आहे, कारण ......
१) गोड्या पाण्यात मत्स्यशेती करून मोठ्या प्रमाणात मासे उत्पादित करतात
२) मासेमारी करणारे लोक माशांच्या सर्व प्रजाती सुरक्षित राहतील, वाढतील ही काळजी घेतात
३) राज्याला मोठी किनारपट्टी उपलब्ध आहे
४) सागरी माशांचे संवर्धन व्हावे यासाठी विशेष योजना केली जाते.
११) तलावातील माशांना काय खाऊ घालावे?
१) ताजे शेण
२) शेंगदाणा पेंड
३) गहू, ज्वारी, तूर, हरभरा पीठ, भरडा
४) वरील सर्व
१२) मत्स्य व्यवसायात झालेल्या प्रगतीस ......... असे म्हणतात.
१) चंदेरी क्रांती
२) नील क्रांती
३) सागरी क्रांती
४) काळी क्रांती
१३) महाराष्ट्रातील मासेमारीबद्दल काय खरे नाही ?
a) महाराष्ट्रात मासेमारीसाठी ७५००० पेक्षा अधिक चौ.कि.मी. क्षेत्र उपयुक्त आहे.
b) महाराष्ट्रात मासेमारी खार्या, निमखार्या व गोड्या पाण्यावर चालते.
c) अधिक मासेमारी गोड्या पाण्यावर चालते.
d) सुमारे अर्धे पकडलेले मासे सुकविले जातात.
e) तीव्र उन्हाळ्यात मासेमारी बंद असते.
१) (a), (b)
२) (c), (d)
३) (c), (e)
४) (a), (d)
१४) आदिवासी सुधार योजनेंतर्गंत खालीलपैकी कोणत्या व्यवसायास प्रोत्साहन दिले जाते ?
१) मत्स्यशेती
२) लाकूडतोड
३) फळबागा
४) खाणकाम
(५) फलोद्यान
१) महाराष्ट्रात रोहयो अंतर्गत फळबाग लागवड वाढीची योजना कोणत्या वर्षी सुरू झाली?
१) १९८५
२) १९९०
३) १९९५
४) २०००
२) केंद्र शासनाने महाराष्ट्रातील आंब्याच्या निर्यातीसाठी किती निर्यात क्षेत्रांना मंजुरी दिली आहे ?
१) १
२) २
३) ३
४) ४
३) आंब्यामध्ये ए ग्रेड म्हणजे प्रति किलो ........... फळे.
१) २
२) ३
३) ४
४) ५
४) नारळाची लागवड झाल्यावर किती वर्षात फळे यावयास लागतात आणि साधारणपणे किती वर्षापर्यंत फळधारणा होत राहते?
१) ५ ते १० वर्षांत व ५० वर्षांपर्यंत
२) २ ते ३ वर्षांत व ३० वर्षांपर्यंत
३) १२ ते १५ वर्षांत व ७५ वर्षांपर्यंत
४) ५ ते १० वर्षांत व १०० वर्षांपर्यंत
५) जोड्या लावा :
स्तंभ-१ (फळे) स्तंभ-२ (संशोधन केंद्रे)
अ) काजू I) रत्नागिरी
ब) नारळ II) श्रीरामपूर
क) सुपारी III) वेंगुर्ला
ड) मोसंबी IV) श्रीवर्धन
अ ब क ड
१) IV III II I
२) I III IV II
३) III I IV II
४) III I II IV
६) १९९१ आकडेवारी नुसार महाराष्ट्रात एकूण फळफळावळांचे सर्वात जास्त क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून त्यानंतर अनुक्रमे या जिल्ह्याचे क्रम लागतात.
१) जळगाव, रत्नागिरी, सोलापूर व अमरावती
२) रत्नागिरी, सोलापूर, अमरावती व जळगाव
३) सोलापूर, अमरावती, जळगाव व रत्नागिरी
४) अमरावती, सोलापूर, रत्नागिरी व जळगाव
७) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
१) सिंधुदुर्ग
२) कणकवली
३) राजेवाडी
४) वसई
८) हापूस आंब्याची झाडे ...... जिल्ह्यात आढळतात.
१) सिंधुदुर्ग
२) रत्नागिरी
३) रायगड
४) वरील सर्व जिल्ह्यात
९) नारळाच्या शेतीखाली असलेल्या क्षेत्राच्या संदर्भात खालील जिल्हे उतरत्या क्रमात लावा.
१) ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी
२) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे
३) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड
४) रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग
१०) योग्य जोड्या लावा :
यादी I (फळे) यादी II (उत्पादक प्रदेश)
A) केळी II) मालवण
B) काजू II) श्रीरामपूर
C) मोसंबी III) वसई
D) कलिंगड IV) अलिबाग
योग्य पर्याय निवडा :
A B C D
१) III I II IV
२) I II IV III
३) II I III IV
४) IV III II I
११) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे ?
१) रत्नागिरी
२) रायगड
३) सिंधुदुर्ग
४) ठाणे
१२) महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे ?
१) महाबळेश्वर
२) रत्नागिरी
३) नाशिक
४) नागपूर
१३) महाराष्ट्रातील ...... जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत.
१) धुळे व नाशिक
२) पुणे व नाशिक
३) सातारा व नाशिक
४) सांगली व नाशिक
१४) अयोग्य जोडी ओळखा :
फळ संशोधन केंद्र
a) आंबा- वेंगुर्ला-सिंधुदुर्ग
b) नारळ- रत्नागिरी-रत्नागिरी
c) केळी- यावल-जळगाव
d) संत्री- श्रीरामपूर-अहमदनगर
१) (A)
२) (B)
३) (C)
४) (D)
१५) महाराष्ट्राची मृदा व हवामान फळांच्या वाढीसाठी पोषक असल्याने अनेक प्रकारच्या फळांचे उत्पादन केले जाते.
a) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांत जास्त जागेत फळांचे उत्पादन घेतले जाते.
b) महाराष्ट्रात भारताच्या एकूण केळी उत्पादनाच्या २०% उत्पादन होते.
c) लातूर जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन होत नाही.
पर्यायी उत्तरे :
१) विधान (a) आणि विधान (b) बरोबर आहेत.
२) विधान (a) आणि विधान (c) बरोबर आहेत.
३) विधान (b) आणि विधान (c) बरोबर आहेत.
४) विधाने (a), (b) आणि विधान (c) बरोबर आहेत.
१६) पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
a) रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हर्ने येथे आहे.
b) दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a) योग्य आहे
२) केवळ (b) योग्य आहे
३) (a), व (b) दोन्ही योग्य आहेत.
४) (a) व (b) दोन्ही योग्य नाहीत
१७) महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात ?
१) ईशान्य भागात
२) पश्चिम भागात
३) आग्नेय भागात
४) मध्य भागात
१८) जोड्या लावा :
स्तंभ-I (भाजीपाला पीक) स्तंभ-II (प्रमुख जात)
a) बटाटा i) फुले बसवंत
b) भेंडी ii) हिरकणी
c) कारले iii) कुफरी ज्योती
d) लसूण iv) अर्का अभय
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iii) (iv) (i) (ii)
२) (i) (ii) (iv) (iii)
३) (iv) (iii) (i) (ii)
४) (iii) (iv) (ii) (i)
१९) सफेद वेलची हा वाण कोणत्या पीकाशी संबंधित आहे ?
१) पपई
२) दालचिनी
३) लवंग
४) केळी
२०) खालीलपैकी कोणती मोसंबीची जात आहे ?
१) मृदुला
२) राजापुरी
३) सतगुडी
४) लखनौ - ४९
२१) आंब्याच्या सॅलडसाठी (कच्चा खाण्यासाठी) प्रसारित केलेली जात कोणती ?
१) कोकण राजा
२) सुवर्णरेखा
३) कोकण अमृता
४) सुवर्णा
२२) आंब्यामध्ये क्षार सहनशीलता आणण्यासाठी त्याचे कलम ज्या जातींच्या रोपावर (खुंटावर) बांधायला पाहिजे ती जात -
१) रत्ना
२) विलाईकोलंबन
३) एम १३ - १
४) सॉल्ट - १
२३) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण-सम्राट ही आंब्याची नवी जात हापूस आणि टॉमी अटकिन्स या दोन जातींच्या संकरातून निर्माण केली आहे. हापूसच्या तुलनेत हा :
a) दरवर्षी फळतो.
b) परंतु कमी रोग प्रतिबंधक आहे.
वरील दोनपैकी कोणते योग्य आहे?
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
२४) भरपूर प्रमाणात पाऊस, उच्च तापमान, वाळूमिश्रित जमीन, दमट हवामान हे प्रामुख्याने ....... च्या पिकासाठी अनुकूल असतात.
१) ऊस
२) कापूस
३) नारळ
४) केळी
२५) अंजिर फळे पक्व अवस्थेत तडकण्याचे कारण काय आहे ?
१) वारा
२) कमी पाणी देणे
३) अधिक आर्द्रता
४) अधिक तापमान
२६) ...... हा कोकणातील कल्पवृक्ष आहे.
१) लिंब
२) महूआ
३) नारळ
४) साल
२७) बियाणांमधील तेलाचे प्रमाण, फळांमधील व्हिटॅमिन सी चे प्रमाण आणि फळांचा रंग वृद्धिंगत करणारे पोषण द्रव्य ...........
१) लोह
२) चुना
३) पालाश
४) स्फुरद
२८) घायपातीच्या लागवडीसाठी ........... वापरतात.
१) पाने
२) मुळे
३) कोंब (सकर)
४) बिया
२९) कोणत्या वनशेती पद्धतीत कुरण आणि फळझाडांचा अंतर्भाव असतो ?
१) वनकुरण शेती
२) कृषी उद्यान शेती
३) उद्यानकुरण शेती
४) कृषी वन कुरण शेती
३०) सीताफळ हे पीक कोणत्या कृषिहवामान (अॅग्रोक्लायमेटीक) क्षेत्रात मोडते?
१) समशीतोष्ण
२) कोरडे
३) उप उष्णकटिबंधीय
४) उष्णकटिबंधीय
३१) कोणत्या उद्यान पिकांमध्ये जीवनसत्त्व आणि खनिज पदार्थांचे विपुल प्रमाण सून त्यांना संरक्षित अन्न असे म्हणतात?
१) फळे व भाजीपाला
२) मसाले व लागवडीची पीके
३) औषधी व सुगंधी वनस्पती
४) वरीलपैकी सर्व
(६) पशुसंवर्धन
१) शेळ्यांचा गाभण काल किती दिवसांचा असतो ?
१) १२० ते १३० दिवस
२) १४५ ते १५० दिवस
३) १६५ ते १८० दिवस
४) १८० ते २०० दिवस
२) म्हशीच्या दुधामध्ये सरासरी स्निग्धांश किती टक्के असतो ?
१) १०.२
२) ५.०
३) १७.६
४) ६.६
३) कोकणासाठी शिफारस करण्यात आलेली शेळीची जात -
१) पंढरपुरी
२) बोर
३) कोकण कन्याळ
४) कोकण शेळी
४) अति पावसाच्या क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या डांगी जातीचे निर्मिती स्थळ म्हणजे ......... जिल्हे.
१) ठाणे आणि रायगड
२) रायगड आणि रत्नागिरी
३) अहमदनगर आणि नाशिक
४) रत्नागिरी आणि कोल्हापूर
५) खालील यादीतील योग्य जोड्या जुळवा व खाली दिलेल्या यादीतील पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा.
म्हैस प्रकार राज्य
अ) मुर्हा I) उत्तर प्रदेश
ब) भादवरी II) पंजाब
क) महेसाना III) हरियाणा
ड) निली रावी IV) गुजरात
अ ब क ड
१) I II III IV
२) II III IV I
३) II IV I III
४) III I IV II
६) खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा-तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो?
१) जळगाव
२) कोल्हापूर
३) धुळे
४) सांगली
७) ....... भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे.
१) ओरिसा
२) हिमाचल प्रदेश
३) उत्तर प्रदेश
४) अरुणाचल प्रदेश
८) योग्य जोड्या लावा.
स्तंभ - I (पशुधन) स्तंभ - II (प्रथम क्रमांकांचा जिल्हा)
a) मेंढरे i) कोल्हापूर
b) शेळ्या ii) पुणे
c) कोंबड्या iii) सातारा
d) म्हशी/रेडे iv) अहमदनगर
(a) (b) (c) (d)
१) (ii) (iii) (iv) (i)
२) (iv) (i) (iii) (ii)
३) (iii) (iv) (ii) (i)
४) (ii) (iv) (i) (iii)
९) खालीलपैकी कोणता जिल्हा दुधा-तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो?
१) जळगाव
२) कोल्हापूर
३) धुळे
४) सांगली
१०) जोड्या लावा :
स्तंभ-I (प्राणी) स्तंभ-II (ब्रीड)
a) गाई i) मेहसाना
b) म्हशी ii) गिर
c) शेळी iii) गड्डी (Gaddi)
d) मेंढी iv) जमुनापुरी
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (iii) (iv) (i)
२) (i) (ii) (iv) (iii)
३) (ii) (i) (iv) (iii)
४) (ii) (i) (iii) (iv)
११) खालीलपैकी कोणत्या जनावराला लाळ खुरकूत (तोंड - खुरी) हा रोग होत नाही ?
१) म्हैस
२) बैल
३) शेळी
४) कुत्रा
१२) ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशासंबंधी आहे ?
१) पूरनियंत्रण
२) पूरव्यवस्थापन
३) वाढीव दूध उत्पादन व संकलन
४) वाढीव अन्न उत्पादन
१३) धवलक्रांती हा शब्दप्रयोग खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
१) पूर नियंत्रण
२) दुग्धोत्पादन
३) कागद निर्मिती
४) भ्रष्टाचार निर्मूलन
१४) गोठलेले वीर्य साठविण्यासाठी खालीलपैकी सध्या काय वापरात आणतात ?
१) द्रवरूप कार्बन डाय ऑक्साइड
२) घनरूप नत्र
३) घनरूप कार्बन डाय ऑक्साइड
४) द्रवरूप नत्र
१५) खालीलपैकी कोणता हारमोन, माद्यांमध्ये माजाची लक्षणे येण्यासाठी कारणीभूत ठरतो ?
१) गोनॅडोट्रोफिन्स
२) इस्ट्रोजन
३) (१) व (२)
४) वरीलपैकी कोणताही नाही.
१६) प्राण्यांमध्ये कशामुळे समानता वाढते व भिन्नता कमी होते ?
१) मिश्र जातीय संकरण
२) निवड
३) अंतर्संकरण
४) बाह्यसंकरण
१७) खालीलपैकी कोणता कृषी आधारित व्यवसाय कृषी वृद्धी दर अधिक वेगाने वाढवेल ?
१) पशुपालन व दुग्ध व्यवसाय
२) गांडूळ निर्मिती
३) मत्स्य व्यवसाय
४) मधुमक्षिका पालन
१८) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
a) भात पिकास फुटवे येण्याच्या अवस्थेवेळी तापमान सर्वसाधारणपणे ३१० सें.ग्रे. असावे लागते.
b) अंडी उत्पादनाकरता योग्य तापमान १०-१६० सें.ग्रे. असते.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
१९) “ऑपरेशन फ्लड योजना” ही .......... शी संबंधित आहे.
१) पूर
२) दूध
३) कुक्कुटपालन
४) यापैकी नाही
२०) जनावरांसाठी रब्बी हंगामातील शेंगवर्गीय नसलेले अति महत्त्वाचे चारा पीक/पीके कोणती ?
अ) Avena Sativa
ब) Hordeum vulgare
क) Sorghum sudanens
ड) Pennisetum purpureum
१) फक्त (अ)
२) फक्त (ड)
३) (अ) व (ब)
४) वरीलपैकी सर्व
२१) उस्मानाबादी शेळी संबंधित सत्य वाक्य लिह.
अ) लातूर, तुळजापूर, उदगीर तालुक्यात आढळते.
ब) मटण आणि दूधासाठी उपयोगी
क) बहुतेक तपकिरी रंगात आढळते.
ड) शरीराचे वजन २२-२४ किलो.
१) (अ) व (ड)
२) (अ), (ब) व (क)
३) (अ) व (ब)
४) वरील सर्व
२२) आरे दुग्ध वसाहती विषयी योग्य विधाने शोधा :
a) ही वसाहत १९४६ मध्ये तयार झाली.
b) आरे वसाहतीचे उद्घाटन पं. जवाहरलाल नेहरूंनी केले होते.
c) आरे जंगलातून १९७० नंतर फिल्म सिटी तयार करण्यात आली.
d) याची निर्मिती दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आली.
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b), (c), (d)
२) (b), (c), (d)
३) (b), (c)
४) (b), (d)
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१७७)
(१) कृषी परिस्थितिकी
१-२
२-४
३-२
४-४
५-४
पीकवाढीवर परिणाम करणारे घटक
१-१
२-१
३-३
४-४
५-४
६-१
७-२
८-४
९-२
१०-२
११-४
(२) महाराष्ट्रातील शेती
(१) शेतीचे प्रकार, सेंद्रिय, शाश्वत व संवर्धित शेती
१-१
२-१
३-१
४-१
स्थलांतरीत शेती
१-४
२-२
३-४
४-२
सेंद्रिय शेती
१-४
२-३
शाश्वत शेती
१-१
२-४
३-३
पीकपद्धती
१-४
२-१
३-१
४-२
५-४
कोरडवाहू शेती
१-३
२-३
३-४
संतुलित कृषि व्यवसाय
१-४
(२) जमिनीची मशागत व तण व्यवस्थापन
१-१
२-३
३-१
४-२
५-४
६-२
७-१
८-३
९-२
(३) महाराष्ट्रातील पीके
१) पिकांचे प्रकार, जाती व संशोधन
पिकांचे प्रकार
१-२
२-३
३-३
४-१
५-१
पिकांच्या संकरित जाती
१-४
२-१
३-४
४-२
५-४
६-३
७-४
८-१
९-३
़कृषी संशोधन
१-२
२-३
३-४
४-४
५-२
६-४
७-४
८-४
९-१
२) लागवडीखालील क्षेत्र व पीकवितरण
१-४
२-४
३-४
४-४
५-४
६-२
७-१
३) पिकांचे उत्पादन व उत्पादकता
१-३
२-४
३-२
४-२
५-४
६-२
७-१
८-१
९-३
१०-२
११-४
१२-३
१३-२
१४-४
१५-३
१६-२
१७-३
१८-३
१९-२
४) पिक उत्पादनासंबंधीत पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी
१-१
२-१
३-४
४-१
५-२
६-१
७-३
८-४
९-४
(२) मृदा
१) मृदा - तिचे प्रकार व वितरण
मृदेचे प्रकार
१-१
२-१
मृदेचे वितरण
१-३
२-२
३-३
४-३
५-१
६-१
७-३
८-३
९-३
१०-२
११-३
१२-३
१३-४
१४-१
१५-२
१६-३
१७-२
२) मृदा निर्मिती व तिचे घटक
१-३
२-२
३-४
४-२
५-१
६-३
मृदेचे घटक
१-४
२-२
३-२
४-२
५-४
३) जमिनीचे गुणधर्म आणि भूमी उपयोजन
१-३
२-२
३-१
४-१
५-३
६-३
७-४
८-२
९-३
१०-४
११-४
१२-४
१३-४
१४-२
१५-१
भूमी उपयोजन
१-१
४) जमिनीतील वनस्पती पोषक अन्नद्रव्यांचा स्रोत
१-३
२-१
३-३
४-३
५-२
६-२
७-४
८-४
९-३
१०-१
११-४
मृदा आणि पीके
१-२
२-४
३-४
४-१
५-३
६-३
७-३
८-४
५) जमिनीतील सेंद्रीय पदार्थ, सजीव सृष्टी व खते
१-४
२-२
३-४
४-१
५-२
६-४
७-१
८-४
९-१
१०-२
११-३
१२-३
१३-३
६) खराब/समस्याग्रस्त जमिनी
१-१
२-२
३-२
७) जमिनीची धूप, प्रकार आणि धूप प्रतिबंधक उपाय
१-१
२-३
३-४
४-२
५-३
६-४
७-२
८-१
९-१
१०-३
११-१
१२-४
८) मृदासंवर्धन
१-३
२-१
३-१
४-२
५-२
६-४
(३) जलव्यवस्थापन
१) जल विज्ञानचक्र व जलव्यवस्थापन
१-२
२-४
३-३
४-३
५-१
६-४
७-२
८-३
२) जलसंधारणाच्या पद्धती
१-२
२-४
३-१
४-४
५-३
६-२
७-१
८-१
९-३
३) जलस्रोत, पाणलोट क्षेत्र व धरणे
१-१
२-२
३-४
४-२
५-२
६-१
७-३
८-१
४) सिंचन पद्धती - प्रकार, फायदे तोटे
१-४
२-३
३-४
४-१
५-३
६-२
७-२
८-३
९-४
विहीर सिंचन
१-४
२-१
३-४
४-१
५-२
६-३
७-२
८-२
९-३
१०-३
तुषार सिंचन
१-३
२-३
३-३
४-२
५-३
६-१
७-२
८-४
ठिबक सिंचन
१-४
२-३
३-२
४-४
५-३
६-२
७-३
८-१
९-१
५) सिंचनाचे वेळापत्रक व पिकांना लागणारे पाणी
१-१
२-३
३-४
४-१
५-३
६-१
७-३
८-१
९-४
१०-१
११-४
१२-४
६) दुष्काळ आणि आणि कोरडवाहू शेती
१-३
२-१
३-३
४-३
५-२
६-२
७-४
८-१
९-१
१०-४
११-४
१२-४
१३-३
१४-१
७) सिंचन योजना व उपक्रम
१-४
२-१
३-३
४-२
५-१
६-३
७-४
८-३
९-२
१०-२
११-४
१२-३
१३-३
१४-१
१५-३
(४) महाराष्ट्रातील मासेमारी/मत्स्य व्यवसाय
१-२
२-३
३-४
४-३
५-३
६-४
७-४
८-१
९-४
१०-३
११-४
१२-२
१३-३
१४-१
(५) फलोद्यान
१-२
२-२
३-२
४-४
५-३
६-१
७-३
८-४
९-२
१०-२
११-३
१२-१
१३-४
१४-४
१५-१
१६-२
१७-२
१८-४
१९-४
२०-३
२१-१
२२-३
२३-१
२४-३
२५-३
२६-३
२७-३
२८-३
२९-३
३०-२
३१-१
(६) पशुसंवर्धन
१-२
२-४
३-३
४-३
५-४
६-३
७-३
८-३
९-३
१०-३
११-४
१२-३
१३-२
१४-४
१५-२
१६-३
१७-१
१८-४
१९-२
२०-३
२१-३
२२-२