महाराष्ट्राचा पर्यावरण भूगोल / प्रश्नमंजुषा (१७३)
- 31 May 2021
- Posted By : study circle
- 7513 Views
- 6 Shares
महाराष्ट्राचा पर्यावरण भूगोल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”महाराष्ट्राचा पर्यावरण भूगोल” यावर अनेक प्रश्न विचारले जातात. सदर लेखात महाराष्ट्र राज्यातील वनसंपत्ती,वनोत्पादने, वनसंवर्धन, संरक्षित वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने व व्याघ्र प्रकल्प, जैव विविधता, प्रदूषण आणि त्यावर विचारले गेलेले प्रश्न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
२.६ पर्यावरण भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ) -
परिसंस्था - घटक : जैविक आणि अजैविक घटक, ऊर्जा प्रवाह, ऊर्जा मनोरा, पोषण/रासायनिक घटकद्रव्यांचे चक्रीकरण, अन्न साखळी/श्रृंखला, अन्न जाळे, पर्यावरणीय र्हास व संधारण, जागतिक परिस्थितीकीय असंतुलन, जैव विविधतेमधील र्हास, जैव विविधतेच्या र्हासाची धोके, मानव-वन्य जीव संघर्ष, निर्वनीकरण, जागतिक तापमान वाढ, हरित गृह परिणाम, CO, CO2, CH4, CFC2, NO यांची वातावरणातील पातळी, आम्ल पर्जन्य, महाराष्ट्रातील उष्मावृध्दी केंद्र (हीट आयलँड), पर्यावरण विषयक कायदे, पर्यावरणावरील आघाताचे मूल्यमापन (EIA), क्योटो संहिता व वातावरणातील कार्बन क्रेडिटस.
३.१ कृषि परिसंस्था :
* जैवविविधता, तिचे शाश्वत व्यवस्थापन आणि संवर्धन
* कार्बन क्रेडीट : संकल्पना, कार्बन क्रेडीटची देवाण घेवाण, कार्बन जप्ती, महत्त्व, अर्थ आणि उपाय/मार्ग.
* पर्यावरणीय नितीतत्त्वे : हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, आम्ल वर्षा, ओझोन थर कमी होणे, आण्विक अपघात, सर्वनाश (होलोकॉस्ट) आणि त्यांचा कृषि, पशुसंवर्धन आणि मत्स्यसंवर्धन यावरील परिणाम, आकस्मिक पीक नियोजन.
३.२ मृदा :
* जमिनीचे प्रदूषण : प्रदूषणाचे स्रोत, किटकनाशके, बुरशीनाशके, इत्यादींचे दूषित करणारे अजैविक घटक यांचा जमीनीवर होणारा परिणाम, जमीन प्रदूषणाचे प्रतिबंध आणि शमन.
३.३ जलव्यवस्थापन :
* प्रदूषण आणि औद्योगिक दुषित पाण्याचा परिणाम
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
पर्यावरण भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
(१) महाराष्ट्रातील नैसर्गिक संपत्ती - वनांचे प्रकार व विस्तार, महाराष्ट्रातील निर्वनीकरण
१) वनांचे प्रकार
२) वनक्षेत्र आणि विस्तार
३) वनसंपती व वनोत्पादने
४) महाराष्ट्रातील वनसंवर्धन
(२) महाराष्ट्रातील जैव विविधता व पारिस्थितिक व्यवस्था
(३) महाराष्ट्रातील जैव विविधतेचे संवर्धन - संरक्षित वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने व व्याघ्र प्रकल्प
१) संरक्षित वने
२) अभयारण्ये
३) राष्ट्रीय उद्याने
४) व्याघ्र प्रकल्प
(४) महाराष्ट्रातील उष्मावृद्धी केंद्र (हिट आयलँड)
१) जागतिक तापमान वाढ
२) हरितगृह वायू
३) उपाययोजना व आपत्ती निवारण
(५) महाराष्ट्रातील प्रदूषण
१) ध्वनी प्रदूषण
२) वायू प्रदूषण
३) जल प्रदूषण
४) मृदा व विस्थापन
५) प्रदूषणविरोधी कायदे व धोरण
(१) महाराष्ट्रातील वनसंपत्ती
* वनांचे प्रकार व विस्तार, महाराष्ट्रातील निर्वनीकरण
१) वनांचे प्रकार
२) वनक्षेत्र आणि विस्तार
३) वनसंपती व वनोत्पादने
४) महाराष्ट्रातील वनसंवर्धन
१) वनांचे प्रकार
१) सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात ?
१) ३००० मिमी पेक्षा जास्त पर्जन्याचे प्रदेश
२) १००० मिमी इतक्या पर्जन्याचे प्रदेश
३) ६०० मिमी इतक्या पर्जन्याचे प्रदेश
४) ६०० मिमी पेक्षा कमी पर्जन्याचे प्रदेश
२) खारफुटीच्या वनांचे वर्गीकरण तट फायदा CRZ ....... मध्ये केली जाते.
१) I
२) II
३) III
४) IV
३) महाराष्ट्राच्या किनार्यालगतच्या भागात भरती-ओहटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान तसेच खाड्यांच्या मुखाशी दलदलयुक्त भूमीवर असलेल्या वनांना .......... वने म्हणतात.
१) पानझडीची
२) खारफुटीची
३) सुरूची
४) काटेरी
४) भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ?
१) सुंदरबन अरण्य
२) मॅन्ग्रोव्ह अरण्ये
३) अल्लापल्ली अरण्ये
४) तैगा अरण्ये
५) सोबतच्या नकाशातील छायांकित केलेला व A अक्षराने दर्शविलेला प्रदेश काय सुचवितो ?
१) तंबाखू लागवड
२) खनिज तेल उत्पादन
३) झुडपी जंगले
४) घनदाट अरण्ये
६) महाराष्ट्रात खालील चार वनांच्या प्रकारातील.
i) उष्ण कटिबंधीय निम्न-सदाहरित वने
ii) उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने
iii) उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने
iv) उष्ण कटिबंधीय काटेरी वने
a) उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने सर्वाधिक आढळतात.
b) उष्ण कटिबंधीय काटेरी वने सर्वात कमी आढळतात.
१) (a) बरोबर (b)
२) (b) बरोबर (a) चूक
३) न (a) बरोबर न (b) बरोबर
४) दोन्ही (a) आणि (b) चूक
७) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या वनांना उष्ण कटिबंधीय मोसमी वने असेही म्हणतात ?
१) उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने
२) उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने
३) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
४) आर्द्र पानझडी वने
८) आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते ?
१) उष्ण कटिबंधीय निमहरित अरण्य
२) उष्ण कटिबंधीय सदाहरित आर्द्र अरण्य
३) उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य
४) उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्य
९) अ स्तंभातील घटकांच्या ब स्तंभातील घटकांशी योग्य जोड्या लावा :
अ महाराष्ट्रातील वने ब तापमान व पर्जन्य
a) उष्ण प्रदेशीय निमसदाहरीत वने i) तापमान २०० ते ३०० से. पर्जन्य २००० मिमी पेक्षा जास्त
b) उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने ii) तापमान ३५० ते ४०० से. पर्जन्य ५०० मिमी पेक्षा जास्त
c) उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी वने iii) तापमान २०० ते ३००से.पर्जन्य १००० ते २००० मिमी
d) उष्ण प्रदेशीय काटेरी वने iv) तापमान ३५० ते ४०० से. पर्जन्य ५०० ते १००० मिमी
(a) (b) (c) (d)
१) (i) (iv) (iii) (ii)
२) (i) (iii) (iv) (ii)
३) (iii) (i) (ii) (iv)
४) (iii) (iv) (i) (ii)
१०) खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर नाही/नाहीत ?
अ) पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात रुक्ष काटेरी वने आढळतात.
ब) पाचगणी आणि माथेरान येथे उप-उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात.
क) अंजन वृक्ष कोकण विभागात मोठ्या प्रमाणात आढळतात.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त विधान अ
२) फक्त विधान क
३) फक्त विधान क आणि ब
४) फक्त विधान ब आणि अ
११) खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
a) ठाणे जिल्ह्यात खारफुटीची वने आढळतात.
b) रोशा गवतापासून तेल बनवले जाते.
c) तिवर हा गडचिरोली जंगलातील महत्त्वाचा वृक्ष आहे.
पर्यायी उत्तरे :
१) a
२) a, b
३) b, c
४) a, b, c
१२) कधीच न तोडलेल्या जंगलांना ......... असे म्हणतात.
१) जुने विस्तारीत जंगले
२) नवीन विस्तारीत जंगले
३) दुसरी विस्तारीत जंगले
४) पहिली विस्तारीत जंगले
१३) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
a) महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत.
b) वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या एक तृतीयांशही क्षेत्रात नाहीत.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
१४) महाराष्ट्र पठारावर ...... प्रकारची जंगले आढळतात.
१) पानझडी
२) सूचीपर्णी
३) सदाहरित
४) खाजण
२) वनक्षेत्र आणि विस्तार
१) महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी ......... % क्षेत्र राखीव, .........% क्षेत्र संरक्षित व ........% क्षेत्र अवर्गीकृत जंगलाखाली आहे.
१) ५,११,८४
२) ११,५,८४
३) ८४,११,५
४) ८५,५,१०
२) महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ...... आहे.
१) २१%
२) २५%
३) २७%
४) १०%
३) देशाच्या १९५२ च्या वन धोरणानुसार भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र हे वनाखाली असणे गरजेचे आहे ?
१) सतरा टक्के
२) तेहतीस टक्के
३) चाळीस टक्के
४) त्रेचाळीस टक्के
४) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत?
१) विदर्भ
२) मराठवाडा
३) कोकण
४) वरील सर्व
५) खाली नमूद जिल्ह्यांची अनुक्रमाने पुनर्रचना तेथील वनक्षेत्रांप्रमाणे (चौ. किमी) उतरत्या क्रमाने लावा.
अ) चंद्रपूर
ब) गडचिरोली
क) गोंदिया
ड) अमरावती
इ) वर्धा
पर्यायी उत्तरे :
१) ड, इ, ब, क, अ
२) अ, ब, क, ड, इ
३) ब, अ, ड, क, इ
४) क, ड, इ, ब, अ
६) महाराष्ट्र राज्यात ....... या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे ?
१) सिंधुदुर्ग
२) गडचिरोली
३) औरंगाबाद
४) सोलापूर
७) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?
१) लातूर
२) मुंबई उपनगर
३) उस्मानाबाद
४) जालना
८) जोड्या लावा.
स्तंभ । स्तंभ ॥
अरण्ये प्रकार प्रदेश/जिल्हे
अ) उष्णकटिबंधीय सदाहरित (i) मध्य महाराष्ट्र पठारी प्रदेश
ब) आर्द्र पानझडी (ii) सातपुडा आणि अजिंठा डोंगर रांगा
क) रूक्ष पानझडी (iii) दक्षिण कोकण
ड) उष्णकटिबंधीय काटेरी (iv) पूर्व विदर्भ
पर्यायी उत्तर :
(अ) (ब) (क) (ड)
१) III IV II I
२) III IV I II
३) II I III IV
४) IV I II III
९) महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र ...... या विभागात आहे.
१) विदर्भ
२) कोकण
३) मराठवाडा
४) नाशिक
१०) कोणत्या जिल्ह्याचा सर्वात कमी भूभाग वनाखाली आहे?
१) ठाणे
२) पुणे
३) लातूर
४) जालना
११) सन २००९ मधील वन सर्वेक्षणानुसार जास्त ते कमी वनक्षेत्र अशी राज्यांची मांडणी करा :
a) अरुणाचल प्रदेश
b) महाराष्ट्र
c) मध्य प्रदेश
d) छत्तीसगड
पर्यायी उत्तरे :
१) (c),(d),(a),(b)
२) (a),(c),(d),(b)
३) (d),(c),(b),(a)
४) (c),(a),(d),(b)
१२) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात काटेरी वने आढळतात ?
अ) सोलापूर
ब) रत्नागिरी
क) जळगाव
ड) अहमदनगर
१) फक्त (अ)
२) फक्त (क)
३) (अ) आणि (क)
४) (अ) आणि (ड)
१३) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
a) महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत.
b) वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या एक तृतीयांशही क्षेत्रात नाहीत.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
१४) महाराष्ट्राचे भूस्वरूप लक्षात घेता तेथे प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या वनांचे क्षेत्र वाढायला भरपूर वाव आहे?
१) सदाहरित
२) पानझडी
३) कांदळवने
४) झुडपी
३) वनसंपती व वनोत्पादने
१) जोड्या लावा :
यादी - I (वन उत्पादने) यादी - II (विभाग)
a) तेंदूची पाने (i) चंद्रपूर
b) खैर कात (ii) नागपूर, गोंदिया
c) रोशा गवत (iii) डहाणू
d) बांबू गवत (iv) गडचिरोली, अमरावती
सांकेतिक -
(a) (b) (c) (d)
१) (ii) (iii) (iv) (i)
२) (i) (ii) (iii) (iv)
३) (iii) (iv) (i) (ii)
४) (iv) (iii) (ii) (i)
२) कोणती प्रजाती कागदनिर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते?
१) निलगिरी
२) सागवान
३) देवदार
४) साल
३) भारतीय वनांमध्ये आढळणारे प्रमुख वृक्ष व त्यांचे राज्यनिहाय वितरण व त्यापासून तयार केलेल्या वस्तू किंवा लाकडाची उपयुक्तता यांच्या योग्य जोड्या जुळवा :
वृक्षांचे प्रकार राज्य उपयुक्तता
अ) सागवान i) महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, १) होड्या बांधणे, कागद निर्मिती,
बिहार, झारखंड बांधकाम साहित्य
ब) देवदार ii) कर्नाटक २) इमारत, फर्निचर,जहाज बांधणी
क) चंदन iii) तामिळनाडू, महाराष्ट्र, ३) सुगंधी तेल, साबण, अगरबत्ती
मध्य प्रदेश, छत्तीसगड कलाकुसरीच्या वस्तू,
ड) खैर iv) प. बंगाल ४) कात तयार करणे, कातडी कमावणे
इ) सुंद्री v) अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश ५) फर्निचर, कलाकुसरीच्या वस्तू, काडीपेट्या
पर्यायी उत्तरे -
१) (अ)-(iii)-(२) (ब)-(v)-(५) (क)-(ii)-(३) (ड)-(i)-(४) (इ)-(iv)-(१)
२) (अ)-(iii)-(५) (ब)-(v)-(४) (क)-(iv)-(३) (ड)-(ii)-(२) (इ)-(i)-(१)
३) (अ)-(i)-(२) (ब)-(iv)-(४) (क)-(ii)-(३) (ड)-(iii)-(५) (इ)-(v)-(१)
४) (अ)-(i)-(५) (ब)-(iii)-(२) (क)-(v)-(३) (ड)-(iv)-(१) (इ)-(ii)-(४)
४) महाराष्ट्रात नागचंपा, पांढरासिडार, फणस, कावसी इ. वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात?
१) उष्णकटिबंधीय सदाहरित
२) उष्णकटिबंधीय निम सदाहरित
३) उप उष्णकटिबंधीय सदाहरित
४) उष्णकटिबंधीय आर्द्र-पानझडी
५) जोड्या लावा :
(a) आपटा (i) पेपर
(b) पळस (ii) काथ
(c) खैर (iii) रंग
(d) बांबू (iv) बिडी
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (ii) (iii) (i) (iv)
३) (iii) (iv) (ii) (i)
४) (iv) (i) (iv) (iii)
६) खालीलपैकी कोणती वने उष्ण प्रदेशातील काटेरी वने नाहीत ?
१) हिरडा
२) खैर
३) तेंदू
४) बोर
७) योग्या जोड्या लावा :
स्तंभ I (वनांचे प्रकार) स्तंभ II (वृक्ष)
A) सदाहरित I) बाभूळ
B) पानझडी II) रबर
C) काटेरी III) खारफुटी
D) समुद्रकाठची IV) साग
A B C D
१) I IV III II
२) II III I IV
३) II IV I III
४) I II III IV
८) महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण :
१) उन्हाळ्यात पाऊस पडत नाही.
२) उन्हाळ्यात तापमान जास्त असते.
३) उन्हाळ्यात हवामान विषम असते.
४) बाष्पीभवन कमी करण्यास्तव.
९) महाराष्ट्रातील उष्ण कटिबंधीय सदाहरित पर्वतीय जंगलांची उंची व घनता खूपच मर्यादित आहे. कारण ......
a) जमिनीचा तीव्र उतार व जांभी मृदा
b) दीर्घकाळ असणारा कोरडा ऋतू
c) समुद्रसपाटीपासून असणारे उंच स्थान
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (a) आणि (b)
३) (b) आणि (c)
४) (a), (b) आणि (c)
१०) खालील विधाने पहा :
अ) उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात.
ब) उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात.
क) पळस, शिसम, खैर इ. वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात.
१) फक्त विधान अ बरोबर आहे.
२) फक्त विधान ब बरोबर आहे.
३) फक्त विधान क बरोबर नाही
४) विधान अ, ब आणि क बरोबर नाहीत.
११) पुढील कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
a) मोहगनी उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात
b) सुंद्री किनारवर्ती जंगलात आढळतात
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a) योग्य
२) केवळ (b) योग्य
३) (a) व (b) दोन्ही योग्य
४) (a) व (b) दोन्ही अयोग्य
१२) आजकाल दसर्याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या ऐवजी कांचनची पाने अधिक दिली जातात. आपट्याच्या पानांपेक्षा कांचनची पाने
अ) आकाराने लहान असतात
ब) स्पर्शास रूक्ष असतात
वरील कोणते/कोणती विधान योग्य आहे?
१) फक्त अ
२) फक्त ब
३) दोन्ही अ आणि ब
४) दोन्ही नाहीत
१३) बहुस्तरीय वाढ हे ...... वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे.
१) निमसदाहरित
२) शुष्क सदाहरित
३) आर्द्र सदाहरित
४) पानझडी
१४) उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांचे खालीलपैकी कोणते/कोणती वैशिष्ट्य/वैशिष्ट्ये बरोबर आहे/आहेत ?
a) अत्यंत घनदाट जंगले
b) वार्षिक पानगळ होते.
c) लाकूड टणक व टिकाऊ असते.
d) एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते.
पर्यायी उत्तरे -
१) (a) फक्त
२) (a),(c) आणि (d)
३) (c) फक्त
४) (b) आणि (c)
१५) ऑलीव्ह वृक्षांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
अ) ऑलीव्ह वृक्ष भू-मध्यसागरी हवामानाच्या प्रदेशात चांगले वाढतात.
ब) त्यांच्या पानांवर लहान लहान केसांचे आवरण असते.
क) ऑलीव्ह वृक्षाची बहुतेक फळांची निर्यात केली जाते.
ड) ऑलीव्हची फळे ज्यात तेलाचा बराच अंश असतो ज्याचे व्यापारी दृष्ट्या महत्त्व आहे.
१) फक्त अ
२) फक्त अ आणि ब
३) फक्त क आणि ड
४) अ, ब, क आणि ड
१६) .......... लाकडापासून आगपेट्या तयार करतात.
१) सागवान
२) बाभूळ
३) सेमल
४) आंबा
१७) खालीलपैकी कोणते विधान तागाच्या (सनहेम्प) तंतूबाबत खरे नाही ?
१) टिश्यू कागद तयार करणे.
२) नोटांचा कागद तयार करणे.
३) जाळी बनविणे
४) कापड तयार करणे.
१८) कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते?
१) सागवान
२) साल
३) पॉपलर
४) निलगिरी
४) महाराष्ट्रातील वनसंवर्धन
१) महाराष्ट्रामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रम केव्हापासून सुरू करण्यात आला?
१) १९८८
२) १९९०
३) १९९२
४) १९९८
२) पहिले वनधोरण भारतामध्ये केव्हा अमलात आले?
१) १९९४
२) १८८४
३) १९८४
४) १८९४
३) भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे?
१) नागपूर
२) पुणे
३) डेहराडून
४) नवी दिल्ली
४) साधन संपत्तीच्या संवर्धन खालीलपैकी कोणत्या एकाचा समावेश होत नाही ?
१) काळजीपूर्वक वापर
२) प्रमाणशीर वापर
३) वापर न करणे
४) वाया जाण्यापासून त्यांना वाचविणे
५) खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) हे विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
विधान (अ) : निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बनडाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढते.
कारण (र) : वने जेव्हा प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बनडाय-ऑक्साईडचा वापर होतो.
पर्यायी उत्तरे :
१) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
२) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
३) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
४) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
(२) महाराष्ट्रातील जैव विविधता व पारिस्थितिक व्यवस्था
१) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?
१) पश्चिम घाट
२) सातपुडारांगा
३) मेळघाट प्रदेश
४) चिखलदरा टेकड्या
२) फ्लेमिंगो (रोहीत) पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतात ?
१) थळघाट
२) बोरघाट
३) माळशेज घाट
४) खंबाटकी घाट
३) वन्यजीवन कशाने धोक्यात आलेले नाही ?
१) जंगलावरील अतिक्रमण
२) वाढती लोकसंख्या
३) अवैध जंगलतोड
४) वन्यप्राण्यांमधील आपापसातील वैर
पारिस्थितिक व्यवस्था
१) इकोलॉजी ही संज्ञा प्रथम कोणी मांडली?
१) अर्नेस्ट हेकेल
२) इलटॉन
३) ओडम्
४) क्रेबस
२) पर्यावरणातील विविध थरांच्या विश्लेषणासाठी पर्यावरण मनोरा ही संकल्पना सर्वप्रथम ............. या ब्रिटिश पर्यावरणतज्ञाने मांडली.
१) चार्ल्स एल्टन (१९२७)
२) लिंडमन् (१९४२)
३) ई. पी. ओडूम (१९७१)
४) वरीलपैकी नाही
३) विशिष्ट जातीचे तिच्या पर्यावरणाशी संबंध या अभ्यासाला काय म्हणतात?
१) मेटेरिऑलॉजी
२) ऑटइकॉलॉजी
३) सिनेकॉलॉजी
४) टर्मिनॉलॉजी
४) प्राकृतिक पर्यावरणात स्वयंनियमन करणार्या अंतररचित (inbuilt) व्यवस्थेला म्हणतात.
१) होमियोस्टॅटिक मेक्यानिजम
२) प्रकाशसंश्लेषण
३) जैवरासायनिक प्रक्रिया
४) नैसर्गिक प्रक्रिया
५) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) आधुनिक मनुष्य इओसीन कालखंडात जन्मास आला.
ब) डानोसोअर क्रिटेशियस कालावधीत नाहीसे झाले.
१) फक्त अ
२) फक्त ब
३) दोन्ही अ आणि ब
४) दोन्ही नाहीत
६) विशिष्ट विभागातील प्राणी आणि वनस्पतींचे जीवन हे त्या जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख समजली जाते त्याला ....... म्हणतात.
१) बायोटा
२) बायोमा
३) बायोमास
४) ब्लॉच
७) तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांमध्ये
अ) दांत अणकुचीदार असतात.
ब) आतडे आखूड असते.
वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
१) फक्त अ
२) फक्त ब
३) दोन्ही अ आणि ब
४) दोन्ही नाहीत
(३) महाराष्ट्रातील जैव विविधतेचे संवर्धन
१) महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला ?
१) १९७०
२) १९९०
३) १९८५
४) १९७२
२) पशू, प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला?
१) १९७०
२) १९७४
३) १९७२
४) १९८०
३) वन्यजीव सप्ताह केव्हा साजरा केला जातो ?
१) २१ - २८ मार्च
२) २२ - २९ मे
३) ५ - १२ जून
४) १ - ७ ऑक्टोबर
४) योग्य जोड्या लावा.
'A' 'B'
a) विश्व जलदिन i) १० ऑक्टोबर
b) पृथ्वी दिवस ii) ५ जून
c) विश्व पर्यावरण दिन iii) २२ एप्रिल
d) राष्ट्रीय डाक दिन iv) २२ मार्च
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (iii) (iv) (ii) (i)
३) (iv) (iii) (i) (ii)
४) (iv) (iii) (ii) (i)
५) महाराष्ट्राच्या मानचिन्हा बाबत योग्य जोड्या लावा :
सूची I सूची II
अ) राज्य प्राणी I) हरियाल/हरोळी
ब) राज्य पक्षी II) जारुळ/तामन
क) राज्य फुलपाखरू III) ब्ल्यू मॉरमॉन
ड) राज्य फुल IV) शेकरु
अ ब क ड
१) IV I III II
२) III I II IV
३) IV III II I
४) I II III IV
६) खालीलपैकी कोणती पाऊले जैवविविधतेच्या संरक्षणासाठी उचलली गेली, ती चुकीची आहेत ?
a) उपयुक्त वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण
b) हिंस्त्र प्राणी व वनस्पतींचा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे
c) सर्व प्राण्यांच्या शिकारी नियंत्रित करणे
d) प्राण्यांच्या विश्रांती व भक्षण करण्याच्या ठिकाणांचे रक्षण करणे.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b)
२) (c) आणि (d)
३) फक्त (b)
४) (b) आणि (c)
७) पुढील प्रकल्प ज्या क्रमाने सुरू करण्यात आले तो क्रम सांगा :
अ) सिंह प्रकल्प
ब) व्याघ्र प्रकल्प
क) मगरमच्छ पैदास प्रकल्प
ड) गेंडा संवर्धन प्रकल्प
१) ब, अ, क, ड
२) अ, ब, क, ड
३) ब, अ, ड, क
४) अ, ब, ड, क
८) खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
१) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान - नायोन आणि गोलाघाट
२) किओलोदेव राष्ट्रीय उद्यान - भरतपूर
३) सुंदरबन जीवमंडळ संरक्षित क्षेत्र - पश्चिम बंगाल
४) नंदादेवी जीवमंडळ संरक्षित क्षेत्र - सिक्किम
९) खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही?
१) केरळ
२) तामिळनाडू
३) कर्नाटक
४) झारखंड
१०) गुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे ...... साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
१) वाघ
२) हत्ती
३) सिंह
४) गेंडा
११) जागतिक वन्यजीव दिवस (WWD) जगभरात ३ मार्च २०१६ रोजी साजरा करण्यात आला. वर्ष २०१६ च्या (WWD) चा विषय ....... होता.
१) वन्यजिवांचे भविष्य आपल्या हातात आहे.
२) वन्यजीव हे निसर्गातील सौंदर्य आहे.
३) भविष्य जतन करण्यासाठी वन्यजिवांचे जतन करा.
४) वरीलपैकी काहीही नाही
१२) खालील विधाने विचारात घ्या :
a) २ सप्टेंबर २०१५ रोजी भारताने युनेस्को बरोबर देहरादून येथे नैसर्गिक वारसा संवर्धन केंद्र स्थापन करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली.
b) युनेस्कोने २०१४ पर्यंत भारतातील ३२ जागतिक वारसा स्थळांना मान्यता दिली आहे.
c) भारतातील एकूण वारसा स्थळांपैकी ७ ही नैसर्गिक वारसा स्थळे आहेत.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/
१) (a)
२) (b)
३) (a) आणि (c)
४) वरील सर्व
१) संरक्षित वने
१) महाराष्ट्र राज्यातील किती टक्के जंगल हे राजस्व विभागाच्या अखत्यारीत येते?
१) ९०
२) ३०
३) १०
४) ०७
२) जोड्या लावा :
स्तंभ-I (हिंस्र प्राणी/पक्षी योजना) स्तंभ-II (जंगल प्रदेश)
अ) वाघ i) दाजीपूर
ब) बायसन ii) कर्नाळा
क) शेखरू iii) पेंच
ड) पक्षी iv) भिमाशंकर
(अ) (ब) (क) (ड)
१) (iii) (i) (ii) (iv)
२) (i) (iii) (ii) (iv)
३) (iv) (i) (iii) (ii)
४) (iii) (i) (iv) (ii)
३) कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ?
१) वाघ
२) गवा
३) सिंह
४) हत्ती
४) जोड्या लावा :
स्तंभ - I (जैव आरक्षित) स्तंभ - II (राज्य)
a) निलगिरी i) उत्तरांचल
b) नंदादेवी ii) अरुणाचल प्रदेश
c) नोक्रेक iii) तामिळनाडू
d) नामधापाह iv) मेघालय
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iii) (i) (ii) (iv)
२) (iii) (i) (iv) (ii)
३) (i) (iii) (iv) (ii)
४) (ii) (iv) (i) (iii)
२) अभयारण्ये
१) योग्य जोड्या लावा :
अभयारण्य जिल्हा
अ) टिपेश्वर (i) अहमदनगर
ब) रेहेकुरी (ii) कोल्हापूर
क) दाजीपूर (iii) रायगड
ड) फणसाड (iv) यवतमाळ
पर्यायी उत्तर :
(अ) (ब) (क) (ड)
१) IV I II III
२) I IV II III
३) III IV II I
४) IV III II I
२) टिपेश्वर वन्यजीवन अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
१) गडचिरोली
२) नागपूर
३) यवतमाळ
४) अमरावती
३) योग्य जोड्या जुळवा (अभयारण्ये आणि जिल्हा) :
अभयारण्ये जिल्हा
अ) बोर i) धुळे
ब) नर्नाळा ii) रायगड
क) अनेर iii) अकोला
ड) कर्नाळा iv) वर्धा
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
१) ii iv i iii
२) iii i iv ii
३) iv ii iii i
४) iv iii i ii
४) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
a) माळढोक अभयारण्य महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठे अभयारण्य आहे.
b) इतक्यात या अभयारण्याचे क्षेत्र वाढवले गेले आहे. माळढोक पक्ष्यांच्या संख्येतील वाढीमुळे नव्हे तर सर्वव्याप्ती काळवीटांमुळे.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
५) योग्य जोड्या जुळवा :
अ गट ब गट
a) ताडोबा राष्ट्रीय उद्यान i) रायगड
b) नागझिरा अभयारण्य ii) सांगली
c) सागरेश्वर अभयारण्य iii) भंडारा
d) कर्नाळा अभयारण्य iv) चंद्रपूर
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (i) (ii)
२) (iv) (i) (iii) (ii)
३) (iii) (iv) (i) (ii)
४) (iv) (iii) (ii) (i)
६) राधानगरी नान्नज व कर्नाळा हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे ?
१) जैवविविधता उद्याने
२) राष्ट्रीय उद्याने
३) अभयारण्ये
४) शरणवने
७) जोड्या लावा :
जिल्हा अभयारण्य
अ) उस्मानाबाद I. अंधारी
ब) अकोला II. अंबावरवा
क) बुलढाणा III. नरनाळा
ड) चंद्रपूर IV. येडशी रामलिंग घाट
अ ब क ड
१) I III IV II
२) II I III IV
३) IV III II I
४) III II IV I
८) अनेर धरण, अंबा-बारवा आणि मयुरेश्वर-सुपे ही वन्यजीव अभयारण्य अनुक्रमे .......... या जिल्ह्यांमध्ये आहेत.
१) नंदूरबार, वाशिम आणि पुणे
२) जळगाव, हिंगोली आणि पुणे
३) धुळे, बुलढाणा आणि पुणे
४) धुळे, नांदेड आणि लातूर
९) जोड्या लावा :
जिल्हा अभयारण्य/जंगल
अ) औरंगाबाद i) दरकसा
ब) कोल्हापूर ii) ढाकणा-कोलकाझ
क) अमरावती iii) गुगामाळ
ड) भंडारा iv) हिमायतबाग
(अ) (ब) (क) (ड)
१) (iv) (iii) (ii) (i)
२) (i) (ii) (iii) (iv)
३) (iii) (iv) (i) (ii)
४) (ii) (i) (iv) (iii)
१०) ढाकणा-कोलकाझ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
१) अमरावती
२) बुलढाणा
३) जळगाव
४) भंडारा
११) जोड्या लावा
स्तंभ - I स्तंभ - II
(वन्य प्राणी अभयारण्य) (प्रशासकीय विभाग)
a) फणसाड i) अमरावती
b) नांदूर-मधमेश्वर ii) कोकण
c) किनवट iii) औरंगाबाद
d) मेळघाट iv) नाशिक
(a) (b) (c) (d)
१) (ii) (iv) (iii) (i)
३) (iv) (ii) (iii) (i)
२) (ii) (iv) (i) (iii)
४) (i) (iii) (ii) (iv)
१२) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य ....... आहे.
१) हिमाचल प्रदेश
२) महाराष्ट्र
३) गुजरात
४) राजस्थान
१३) योग्य जोडी कोणती ते सांगा.
अभयारण्य स्थान
अ. किनवट i कोल्हापूर
ब. कर्नाळा ii अहमदनगर
क. रेहेकुरी iii रायगड
ड. दाजीपूर iv यवतमाळ व नांदेड
१) अ-i, ब-ii, क-iii, ड-iv
२) अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
३) अ-ii, ब-iv, क-iii, ड-i
४) अ-i, ब-ii, क-iv, ड-iii
१४) जोड्या जुळवा :
(अभयारण्य) (जिल्हा)
a) नरनाळा i) यवतमाळ
b) टिपेश्वर ii) उस्मानाबाद
c) अनेर iii) अकोला
d) येडशी रामलींग घाट iv) नंदूरबार
(a) (b) (c) (d)
१) (iii) (i) (iv) (ii)
३) (ii) (i) (iii) (iv)
२) (i) (iv) (ii) (iii)
४) (iv) (ii) (i) (iii)
१५) खालील जोड्या जुळवून त्याखाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा व उत्तर द्या.
(अभयारण्ये) (जिल्हे)
a) टिपेश्वर i) कोल्हापूर
b) कर्नाळा ii) अहमदनगर
c) रेहेकुरी iii) रायगड
d) राधानगरी-दाजीपूर iv) यवतमाळ
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (iv) (iii) (ii) (iv)
३) (ii) (iv) (iii) (i)
४) (i) (ii) (iv) (iii)
१६) जोड्या लावा :
स्तंभ-I (जिल्हे) स्तंभ-II (अभयारण्य)
a) गडचिरोली i) फणसाड
b) चंद्रपूर ii) सागरेश्वर
c) रायगड iii) चपराळा
d) सांगली iv) अंधारी
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (ii) (i)
२) (iii) (iv) (i) (ii)
३) (iv) (i) (iii) (ii)
४) (ii) (iii) (iv) (i)
१७) महाराष्ट्रातील नवीन वन्यजीव अभयारण्ये कोणती आहेत?
a) नागझिरा नवीन
b) ताम्हणी
c) कोला मार्क
d) काटेपूर्णा
१) (a), (b), (c)
२) (b), (c), (d)
३) (c), (d), (a)
४) (d), (a), (b)
१८) योग्य जोड्या जुळवा :
अ गट ब गट
a) ताडोबा राष्ट्रीय उद्यान i) रायगड
b) नागझिरा अभयारण्य ii) सांगली
c) सागरेश्वर अभयारण्य iii) भंडारा
d) कर्नाळा अभयारण्य iv) चंद्रपूर
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (i) (ii)
२) (iv) (i) (iii) (ii)
३) (iii) (iv) (i) (ii)
४) (iv) (iii) (ii) (i)
१९) खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे ?
१) सागरेश्वर-सांगली
२) मेळघाट-अमरावती
३) राधानगरी-कोल्हापूर
४) तानसा-ठाणे
३) राष्ट्रीय उद्याने
१) ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे?
१) गडचिरोली
२) गोंदिया
३) भंडारा
४) चंद्रपूर
२) खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यात आहे?
१) ताडोबा
२) पेंच
३) नवेगाव
४) संजय गांधी
३) खालीलपैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही.
१) नवेगाव
२) गुगामल
३) पेंच
४) वरीलपैकी कोणतेही नाही
४) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली
२) सातारा
३) रायगड
४) रत्नागिरी
५) खालील जोड्या लावा :
वन उद्याने जिल्हा
अ) हिमायतबाग I) जळगाव
ब) पाल II) बुलढाणा
क) प्रताप सिंग III) औरंगाबाद
ड) राणी बाग IV) सातारा
अ ब क ड
१) III I IV II
२) III IV I II
३) III I II IV
४) III II I IV
६) खालीलपैकी कोणते भारतातील एकमेव मिश्र (नैसर्गिक व सांस्कृतिक) युनेस्को जागतिक वारसा ठिकाण आहे?
१) राजस्थानमधील पर्वतीय किल्ले
२) भीमबेटका येथील पाषाण निवारे
३) केओलाडिओ राष्ट्रीय उद्यान
४) कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान
७) खालील विधाने वाचून योग्य ते उत्तर निवडा :
अ) चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार हा रत्नागिरी कोल्हापूर, सांगली व सातारा ह्या जिल्ह्यांमध्ये असून सर्वात जास्त क्षेत्र हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे.
ब) चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्याच दक्षिणेला विशालगड हे डोंगरी वन पक्षी निरीक्षण स्थळ आहे.
१) अ आणि ब बरोबर
२) अ बरोबर, ब चूक
३) अ चूक, ब बरोबर
४) अ आणि ब चूक
८) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान बसलेले आहे ?
१) नागपूर
२) अमरावती
३) गोंदिया
४) चंद्रपूर
९) योग्य जोड्या जुळवा :
स्तंभ (अ) राष्ट्रीय उद्याने स्तंभ (ब) संबंधित जिल्हे
a) ताडोबा i) नागपूर
b) पेंच ii) अमरावती
c) नवेगाव iii) चंद्रपूर
d) गुगामाळ iv) गोंदिया
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (ii) (i)
२) (iii) (ii) (i) (iv)
३) (ii) (iv) (i) (iii)
४) (iii) (i) (iv) (ii)
१०) राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता?
१) नागपूर - ठाणे - रायगड
२) गोंदिया - गडचिरोली - रायगड
३) चंद्रपूर - नागपूर - गोंदिया
४) गडचिरोली - ठाणे - चंद्रपूर
११) चांदोली राष्ट्रीय उद्यान ...... म्हणून प्रसिद्ध आहे.
१) वन्य प्राण्यांचा स्वर्ग
२) पक्ष्यांचा स्वर्ग
३) फुलपाखरांचा स्वर्ग
४) सरपटणार्या प्राण्यांचा स्वर्ग
१२) जोड्या लावा :
A B
a) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान i) अमरावती
b) गुगामल राष्ट्रीय उद्यान ii) चंद्रपूर
c) ताडोबा राष्ट्रीय उद्यान ii) मुंबई उपनगर
d) पेंच राष्ट्रीय उद्यान iv) नागपूर
(a) (b) (c) (d)
1) (i) (iii) (iv) (ii)
2) (iii) (i) (ii) (iv)
3) (iii) (ii) (iv) (i)
4) (iv) (iii) (ii) (i)
४) व्याघ्र प्रकल्प
१) व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राचे किती टक्के क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले?
१) १०%
२) २०%
३) ३०%
४) ४०%
२) राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन अधिकार (प्राधिकरण) ने मार्च २०११ मध्ये दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या ....... ते ....... दरम्यान आहे.
१) १३९ - १७०
२) १५९ - १७९
३) १६९ - १८०
४) १७९ - १९०
३) नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन अॅथॉरिटीच्या २०१४ च्या व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणार्या राज्यांचा उतरत्या क्रमाचा योग्य पर्याय निवडा :
१) कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र
२) उत्तराखंड, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू
३) मध्यप्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र
४) कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्यप्रदेश
४) ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प ........... आहे.
१) पश्चिम महाराष्ट्र
२) मध्य महाराष्ट्र
३) पश्चिम घाट
४) पूर्व महाराष्ट्र
५) २०१० साली सह्याद्री व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या अभयारण्यात जाहीर झाला ?
१) राधानगरी
२) कोयना
३) चांदोली
४) यापैकी एकही नाही
(४) महाराष्ट्रातील उष्मावृद्धी केंद्र (हिट आयलँड) व ग्लोबल वॉर्मिंग
१) जागतिक तापमान वाढ
२) हरितगृह वायू
३) उपाययोजना व आपत्ती निवारण
१) जागतिक तापमान वाढ
१) जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यामुळे कमी (Low) अक्षांश भागामध्ये पर्जन्यमानात.......वाढ होऊ शकेल.
१) ३ - ५ टक्के
२) ५ - १० टक्के
३) १० - १५ टक्के
४) १५ - २० टक्के
२) पृथ्वीवरील तापमान वाढीमुळे जर समुद्र जलपातळी एक मीटरने वाढली तर कोलकाताचा ........ टक्के भाग पाण्याखाली जाईल.
१) ३०
२) ४०
३) ५०
४) ६०
३) जागतिक तापमान वाढीचे पुढील परिणाम महत्त्वाचे आहेत:
a) जागतिक तापमान वाढल्यामुळे आम्ल पर्जन्यात वाढ होऊन वाळवंटीकरणाची शक्यता आहे.
b) जागतिक तापमान वाढल्यामुळे काही वनस्पतीत वाढ होईल तर कांही नष्ट होतील. वनस्पती प्रजातीचे संतुलन बिगडू शकते.
c) जागतिक तापमान वाढीमुळे वार्याची दिशा सागराकडून भूखंडाकडे राहील परिणामी भूखंडावर पाऊस पडेल.
d) जागतिक तापमान वाढीमुळे प्राण्याचे प्रजातीय संतुलन बिघडण्याची शक्यता वर्तविली जाते.
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (a),(b) आणि(d) फक्त
३) (a),(b) आणि (c) फक्त
४) (a) आणि (c) फक्त
४) जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे (२०११) खालीलपैकी कोणता देश सर्वात अधिक कार्बन उत्सर्जन करतो?
१) यू.एस. ए.
२) रशिया
३) भारत
४) चीन
५) कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प आणि हॉलोजेनेटेड (halogenated) वायूंच्या हरितगृह परिणामांमुळे भूपृष्ठावरील तापमान वाढते, कारण -
१) हे वायू सौर ऊर्जेला भूपृष्ठापर्यंत पोहोचू देतात.
२) हे वायू भूपृष्ठाद्वारे उत्सर्जित उष्णता ग्रहण करतात आणि तिला परत भूपृष्ठाकडे उत्सर्जित करतात.
३) या वायूंचा भूपृष्ठावरील तापमान वाढविण्यात कोणताही सहभाग नाही.
४) हे वायू हरितगृह परिणामाचे घटक नाहीत
२) हरितगृह वायू
१) जसे कार्बन डाय ऑक्साइडचे अवकाशातील प्रमाण वाढते, तशी उष्णता वाढते व त्यामुळे .......
a) वातावरणीय पट्टे विषुववृत्त (इक्वेटर) पासून ध्रुवाकडे सरकतील व वृक्षवल्लीही विषुववृत्तापासून दूर जातील.
b) कीड, किडे उष्ण वातावरणात अधिक वाढतील. तद्वतच रोगराईही वाढेल.
आता सांगा काय शक्य आहे ?
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) (a) आणि (b)
४) न (a) न (b)
२) पशुशेती ........ टक्के मिथेन वातावरणात सोडण्यास कारणीभूत ठरते.
१) १२
२) २१
३) ३२
४) ४५
३) जागतिक स्तरावर वातावरणामध्ये १०० वर्षापूर्वी कार्बनडायऑक्साइड चे प्रमाण ........ होते.
१) २७५ दशलक्ष प्रति भाग
२) ४५० दशलक्ष प्रति भाग
३) ३५० दशलक्ष प्रति भाग
४) १५० दशलक्ष प्रति भाग
४) यादी क्र. I व यादी क्र. II ची योग्य जुळणी करून खाली दिलेल्या अंकप्रणालीतून अचूक उत्तरे शोधून काढा.
यादी क्र. I यादी क्र. II
a) कार्बनडाय ऑक्साइड i) नायट्रोजन खतांचा वापर, पशूंचे टाकाऊ पदार्थ
b) मिथेन ii) शीतपेट्या, वातानुकूलन यंत्रणा
c) नायट्रस ऑक्साइड iii) निर्वनीकरण
d) सी. एफ. सी. iv) भातशेती, सखोल पशुपालन
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (ii) (i)
२) (iii) (iv) (i) (ii)
३) (iii) (i) (ii) (iv)
४) (i) (iv) (iii) (ii)
५) खाली दिलेल्या हरितगृह वायूपैकी ...... वायूचे प्रमाण औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या ७०० ppb पासून आता १७५० ppb पर्यंत वाढले आहे.
१) कार्बन डायऑक्साईड
२) नायट्रोजन डाय ऑक्साइड
३) ओझोन
४) मिथेन
६) खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?
१) कार्बन डाय ऑक्साइड
२) क्लोरोफ्ल्युरो कार्बन
३) हायड्रोजन
४) वरीलपैकी एकही नाही
७) क्लोरोफ्लोराकार्बन (CFCs) संयुगांना फ्र्रिऑन म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान त्यांच्याबाबत चूक आहेत.
फ्रिऑन हे .........
१) रासायनिक अक्रियाशील, बिनविषारी आणि गंधहीन असतात.
२) द्रावक म्हणून, सुक्ष्मतुषार प्रणोदनकारी आणि आकार्याच्या फेसासाठी स्पंजनकारक म्हणून वापर.
३) अवकाशाच्या वरील पट्ट्यात, सूर्यच्या जंबुलातील किरणांमुळे विघटन पावतात.
४) वरीलपैकी कोणतेही नाही.
८) IPCC च्या अहवालानुसार जागतिक पातळीवर हरित गृह वायू निर्मितीकरिता कारणीभूत असलेल्या मानवनिर्मित स्रोतांची सूची खाली दिली आहे.
या सूचीतील स्रोतांचा क्रम उत्सर्जन चढत्या क्रमाने लावा.
a) जीवाश्म इंधनाचा वापर (CO2)
b) पाणथळ जमिनीत, भात शेती (CH4)
c) सिमेंट निर्मिती (CO2)
d) जंगलतोड, जीववस्तुमान क्षय (CO2)
पर्यायी उत्तरे :
१) (c), (b), (d), (a)
२) (a), (c), (b), (d)
३) (d), (c), (a), (b)
४) (c), (a), (d), (b)
९) मोटार वाहनामधील धूर सोडणार्या नळीच्या शेवटी बसवलेल्या ......... मुळे बाहेर पडणार्या कार्बन मोनॉक्साईडचे रुपांतर शुद्ध ऑक्सीजन मध्ये होते.
१) फील्टर्स
२) इएसपी
३) थर्मोरिअॅक्टर
४) पोल्यूशन रोज
१०) कार्बन मोनोक्साइड (CO) हा हवा प्रदूषण करणारा प्रमुख घटक आहे. मो मानवी आरोग्यासाठी कसा हानीकारक आहे ?
a) यामुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.
b) तो रक्ताची प्राणवायू (ऑक्सीजन) वाहून नेण्याची क्षमता कमी करतो.
c) तो मज्जासंस्थेची सर्वसाधारण कार्यप्रणाली प्रभावित करतो.
d) यामुळे यकृताची हानी होते.
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (b)आणि(d) फक्त
३) (a),(b) व (c) फक्त
४) वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहेत
३) उपाययोजना व आपत्ती निवारण
१) १९८७ साली प्रसिद्ध झालेल्या ब्रुन्डटलॅन्ड अहवालाचे शीर्षक खालीलपैकी काय होते?
१) आपले पर्यावरण
२) आपले समान भविष्य
३) शाश्वत विकास
४) आपला एक उपग्रह (पृथ्वी)
२) पुढील दोन विधानांचा विचार करा :
a) क्योटो येथील जागतिक तापमान वाढ परिषदेचा मुख्य उद्देश जागतिक तापमान वाढ यावर चर्चा करुन ते कमी करण्याचा करार संमत करणे असा होता.
b) कार्बनची खरेदी आणि विक्री व्यापार व्यवस्था सुरु.
पर्यायी उत्तरे :
१) (a) व (b) दोन्ही विधाने खरे आहेत.फ
२) (a) व (b) दोन्ही विधाने खोटे आहेत.
३) फक्त (a) विधान बरोबर आहे
४) फक्त (b) विधान बरोबर आहे
३) क्योटो प्रोटोकॉलचा प्रमुख उद्देश ........ होता.
a) ओझोन पातळीत घट
b) ग्रीनहाऊस गॅसेसच्या उत्सर्जनात घट
c) ऑक्सिजनमध्ये घट
d) क्लोरीनमध्ये घट
वरीलपैकी कोणती दोन विधाने सत्य आहेत?
१) फक्त (a)
२) फक्त (b)
३) (a) आणि (b)
४) (a), (b), (c) आणि (d)
४) जपानमधील क्योटो शहरात १९९७ मध्ये झालेल्या क्योटो थर्मल ट्रिटी (क्योटो प्रोटोकॉल) मध्ये खालील बाबींचा समावेश आहे.
१) २००८-१२ दरम्यान कार्बन डायऑक्साईड वायूत ३० प्रतिशत पर्यंत कपात
२) हरितगृह वायूच्या कपातीचा निर्धारित भागाचे हस्तांतरण
३) सिंथेटिक रासायनिक घटकाचे उत्पादन कमी करणे
४) हलोन वायूचे उत्पादन थांबविणे
५) कोप २१ (COP 21) बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
१) ही संयुक्त राष्ट्र संघटनेची पॅरीस येथे डिसेंबर २०१५ मध्ये हवामान बदलासंबंधीची परिषद होती.
२) ही जागतिक नेत्यांची व १९० पेक्षा जास्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींची शिखर परिषद होती.
३) किमान ५५ राष्ट्रांनी झालेल्या करारास मंजुरी दिल्यानंतर तो अंमलात येणार आहे.
४) कराराचे उद्दिष्ट जागतिक तापमान किमान ४ डिग्रीने सेल्सिअस थोपविण्याचे आहे.
(५) महाराष्ट्रातील प्रदूषण
१) ध्वनी प्रदूषण
२) वायू प्रदूषण
३) जल प्रदूषण
४) मृदा व विस्थापन
५) प्रदूषणविरोधी कायदे व धोरण
१) ध्वनी प्रदूषण
१) खालील विधानांवर विचार करा :
a) ज्या सर्वाधिक आवाजामुळे माणसाला त्रास होत नाही अशा आवाजाची तीव्रता ६० डेसिबल्स.
b) कुजबुज ही जवळपास ५ ते १० डेसिबल्सची असते.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) न (a) न (b)
४) दोन्ही (a) व (b)
२) खालीलपैकी कोणती शहरे सर्वांत जास्त ध्वनी प्रदूषित आहेत?
१) न्यूयॉर्क - वाशिंग्टन डी. सी.
२) कोलकाता -मुंबई
३) शांघाय-टोकियो
४) कराची - इस्लामाबाद
३) मुंबई शहर व उपनगरांत दहा जडवाहतूक क्षेत्रांत वाहनांच्या ध्वनी स्तरांचे मोजमाप केले गेले. त्यामध्ये सर्वांत जास्त परिणाम झालेले तीन विभाग म्हणजे :
१) गोरेगाव, सायन, मालाड
२) फोर्ट, दादर, मुलुंड
३) कुर्ला, माटुंगा, भांडुप
४) गिरगाव, बांद्रा बोरिवली
४) खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत?
अ) श्रवणक्षमता आंशिक कमी होते (बहिरेपणा येतो.)
ब) पुन:रुत्पादन यंत्रणेवर वाईट परिणाम होतो.
क) गर्भामध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते.
ड) उच्च रक्तदाब (B.P.) निर्माण होतो.
१) अ, ब, क आणि इ
२) अ, क, ड आणि इ
३) अ, ब, ड आणि इ
४) अ, ब, क, ड आणि इ
२) वायू प्रदूषण
१) पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण मंडळ यांच्या २००९ च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ?
१) मुंबई
२) ठाणे
३) चंद्रपूर
४) नागपूर
२) भारतात पर्यावरण व वन मंत्रालय आणि आय.आय.टी. दिल्ली यांनी एकत्रितपणे देशातील प्रदूषित शहरांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील उतरत्या क्रमात प्रदूषित शहरे कोणती?
१) चंद्रपूर - डोंबिवली - औरंगाबाद - तारापूर
२) चंद्रपूर - औरंगाबाद - डोंबिवली - तारापूर
३) तारापूर - औरंगाबाद - चंद्रपूर - डोंबिवली
४) तारापूर - चंद्रपूर - औरंगाबाद - डोंबिवली
३) पर्यावरणात राखेचे (Fly-ash) प्रदूषण कशामुळे होते?
१) ऑईल रिफायनरी
२) थर्मल पॉवर प्लँट
३) सीड प्रोसेसिंग प्लँट
४) स्ट्रिप मायनिंग
३) जल प्रदूषण
१) कोळशाच्या खाणीतील कोणता टाकाऊ घातक प्रदूषक पाण्याचा जडपणा वाढविण्यास कारणीभूत आहे?
१) कार्बनडाय ऑक्साइड
२) नायट्रिक ऑक्साइड
३) सल्फ्युरिक आम्ल
४) वरील सर्व
२) कोणत्या कारखान्याच्या सांडपाण्यामध्ये अँथ्रॅक्स बॅसिली हे रोगजंतू आढळतात?
१) मद्याचा कारखाना
२) कापड कारखाना
३) खत कारखाना
४) कातडी कमविण्याचा कारखाना
३) पाण्याचे उष्णता प्रदूषण ...... यामुळे होते.
१) मैला
२) कृषी रसायने
३) औद्योगिक सांडपाणी
४) कृत्रिम धुलाई पावडर
४) मैला मिश्रण हे ...... धातूचा मुख्य स्रोत आहे की जो अत्यंत विषारी आहे.
१) शिसे
२) कॅडमियम
३) तांबे
४) जस्त
५) पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?
a) हुसेन सागर गोड्या पाण्याचा तलाव भोपाळ शहरात असून तो अतिशय प्रदूषित तलावांपैकी एक आहे.
b) लोकटक तलाव लडाखमध्ये असून चांग ला खिंडीच्या पलीकडे आहे.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
६) खाली भारतातील नदी जल-प्रदूषणाबाबत काही विधाने दिली आहेत. त्यांपैकी कोणते विधान चूक आहे?
१) भारतातील निर्माण होणार्या ताज्य/टाकाऊ पाण्यापैकी फक्त २६% पाण्यावर प्रक्रिया केली जाते.
२) त्याज्य/टाकाऊ पाण्यावरील प्रक्रिया जास्तीत जास्त ८९% पर्यंतच असते.
३) महानदीच्या तीरावर सर्वांत जास्त त्याज्य/टाकाऊ पाणी सोडणारी शहरे वसली आहेत.
४) त्याज्य/टाकाऊ पाणी प्रक्रिया सर्वांत जास्त कृष्णानदी खोरे विभागात होते.
७) खालीलपैकी कोणती भारतीय नदी जगातील १० नष्ट होण्याच्या मार्गावरील नद्यांपैकी एक आहे?
१) यमुना
२) गंगा
३) गोदावरी
४) कृष्णा
८) मानवी आरोग्यावर फ्लूराइडयुक्त पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे ........
१) सर्दी
२) कावीळ
३) अकाली वृद्धत्व
४) अतिसार
९) साठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवाळांची वाढ थांबविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो?
१) कॉपर सल्फेट
२) शिसे
३) कोबाल्ट
४) कॅडमिअम
१०) सांडपाणी दिलेल्या (सांडपाण्याने सिंचित केलेल्या) जमिनीत खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये जडधातूचे (heavy metals) प्रमाण अधिक आढळते?
१) जंगलातील झाडे
२) शोभेच्या वनस्पती
३) पालेभाज्या
४) गवत
११) मानवी शरीरामध्ये पार्याच्या संचयनामुळे ..... हा आजार होतो.
१) ईटाई-ईटाई
२) मिथॅनोग्लोबिनिमिया
३) मिनामाटा
४) पोलिओ
१२) पुढील दोन विधानांतील कोणते योग्य आहे?
a) मर्क्युरीमुळे स्मरणशक्ती नष्ट होते.
b) शिसे फुप्फुसावर परिणाम करते.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
४) मृदाप्रदूषण व विस्थापन
१) खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने सत्य आहे/आहेत?
a) विकासामुळे होणार्या विस्थापनाचा दुष्परिणाम भारतातील ४०-५०% आदिवासी लोकांवर झाला आहे.
b) धरणे, खाण, उद्योग आणि वन संवर्धन सारख्या मोठ्या विकास प्रकल्पामुळे १९९० पर्यंत ८५ लाखापेक्षा अधिक आदिवासी विस्थापित झाले.
पर्यायी उत्तरे :
१) (a) सत्य तर (b) खोटे आहे
२) (b) सत्य तर (a) खोटे आहे
३) (a) आणि (b) दोन्ही सत्य आहेत
४) (a) आणि (b) दोन्ही खोटे आहेत
२) पुढीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
a) नर्मदा सागर मध्य प्रदेशात आहे.
b) भौतिक जीवन पुन्हा परत मिळणे, हीच विपत्तीग्रस्त विस्थापित लोकांना, इतर अन्य कोणत्याही कृतीपेक्षा तात्काळ गरजेची असणारी, उपचारक कृती असते.
c) धिमी आपत्ती हा आपत्तीचा एक प्रकार आहे.
पर्यायी उत्तरे :
१) (b) आणि (c)
२) (a) आणि (b)
३) (a) आणि (c)
४) (c) फक्त
५) प्रदूषणविरोधी कायदे व धोरण
१) जोड्या लावा
स्तंभ -I (पर्यावरण संबंधित कायदे) स्तंभ-II (वर्ष)
a) पर्यावरण (संरक्षण) कायदा i) १९७४
b) हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा ii) १९७२
c) पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा iii) १९८६
d) वन्यजीव संरक्षण कायदा iv) १९८०
e) वन संरक्षण कायदा v) १९८१
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d) (e)
१) (ii) (iv) (iii) (v) (i)
२) (ii) (iii) (iv) (v) (i)
३) (iii) (v) (i) (ii) (iv)
४) (iii) (v) (iv) (ii) (i)
२) खालील जोड्या जुळवा
अ (कायदे)
a) महाराष्ट्र (मुंबई) नगरपालिका कायदा
b) महाराष्ट्र जमीन सुधारणा कायदा
c) महाराष्ट्र मोटार वाहन कायदा
d) कारखाना कायदा
ब (तरतुदी)
i) कारखान्यातील प्रदूषण आणि अपघात नियंत्रण
ii) वाहन प्रदूषणाचे नियंत्रण
iii) सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरुस्ती
iv) शेतजमिनीच्या इतर वापरासाठीच्या हस्तांतरणासाठी प्रतिबंध
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (ii) (iii) (iv) (i)
३) (iii) (iv) (ii) (i)
४) (iv) (ii) (i) (iii)
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१७३)
(१) महाराष्ट्रातील वनसंपत्ती
१) वनांचे प्रकार
१-१
२-१
३-२
४-३
५-३
६-३
७-४
८-१
९-२
१०-२
११-२
१२-१
१३-१
१४-१
२) वनक्षेत्र आणि विस्तार
१-३
२-१
३-२
४-१
५-३
६-२
७-१
८-१
९-३
१०-३
११-४
१२-४
१३-१
१४-२
३) वनसंपती व वनोत्पादने
१-१
२-१
३-१
४-१
५-
६-३
७-३
८-४
९-२
१०-३
११-२
१२-४
१३-३
१४-२
१५-४
१६-३
१७-४
१८-३
४) महाराष्ट्रातील वनसंवर्धन
१-३
२-४
३-३
४-३
५-१
(२) महाराष्ट्रातील जैव विविधता व पारिस्थितिक व्यवस्था
१-१
२-३
३-४
पारिस्थितिक व्यवस्था
१-१
२-१
३-२
४-१
५-२
६-१
७-१
(३) महाराष्ट्रातील जैव विविधतेचे संवर्धन
१-४
२-३
३-४
४-४
५-१
६-३
७-२
८-४
९-२
१०-३
११-१
१२-४
१) संरक्षित वने
१-४
२-४
३-२
४-२
२) अभयारण्ये
१-१
२-३
३-४
४-१
५-४
६-३
७-३
८-३
९-१
१०-१
११-१
१२-२
१३-२
१४-१
१५-२
१६-२
१७-१
१८-४
१९-३
३) राष्ट्रीय उद्याने
१-४
२-३
३-४
४-३
५-१
६-४
७-३
८-३
९-४
१०-३
११-३
१२-२
४) व्याघ्र प्रकल्प
१-२
२-१
३-१
४-४
५-२
(४) महाराष्ट्रातील उष्मावृद्धी केंद्र (हिट आयलँड) व ग्लोबल वॉर्मिंग
१) जागतिक तापमान वाढ
१-२
२-३
३-२
४-४
५-२
२) हरितगृह वायू
१-३
२-२
३-१
४-२
५-४
६-३
७-४
८-१
९-३
१०-३
३) उपाययोजना व आपत्ती निवारण
१-२
२-१
३-२
४-२
५-४
(५) महाराष्ट्रातील प्रदूषण
१) ध्वनी प्रदूषण
१-३
२-२
३-१
४-४
२) वायू प्रदूषण
१-३
२-१
३-२
३) जल प्रदूषण
१-३
२-४
३-३
४-२
५-४
६-३
७-२
८-३
९-१
१०-३
११-३
१२-१
४) मृदाप्रदूषण व विस्थापन
१-३
२-३
५) प्रदूषणविरोधी कायदे व धोरण
१-३
२-३