हवामान व मान्सून / प्रश्नमंजुषा (१७२)
- 29 May 2021
- Posted By : study circle
- 11616 Views
- 14 Shares
हवामान व मान्सून
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”हवामान व मान्सून” यावर अनेक प्रश्न विचारले जातात. सदर लेखात महाराष्ट्र राज्याचे हवामान, पर्जन्यमान, पर्जन्यवृष्टीचे वितरण व त्यातील बदल, मान्सून, अवर्षण , महापूर आणि त्यावर विचारले गेलेले प्रश्न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
२.२ हवामानशास्त्र : वातावरण - संरचना, घटना व विस्तार, हवा व हवामानाची अंगे. सौरऊर्जा - पृथ्वीपृष्ठावरील उष्णतेचे संतुलन, तापमान - पृथ्वीपृष्ठावरील तापमानाचे उर्ध्व व क्षितीज समांतर वितरण.
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
महाराष्ट्राचे हवामान व महाराष्ट्रातील मान्सून
१) महाराष्ट्राचे हवामान - हवामानाचे वर्गीकरण, घटक, तापमान, वारे, चक्रीवादळ
२) महाराष्ट्रातील मान्सून - पर्जन्यवृष्टीचे वितरण - पर्जन्यातील विभागावर बदल
३) महाराष्ट्रातील अवर्षण
४) महाराष्ट्रातील महापूर आणि त्याच्या समस्या
(१) महाराष्ट्राचे हवामान
* महाराष्ट्राचे हवामान - तापमान, वारे, चक्रीवादळ
१) हवामानाचे वर्गीकरण
२) हवामानाचे घटक - तापमान, आर्द्रता
३) वारे आणि चक्रीवादळ
१) हवामानाचे वर्गीकरण
१) कोकणचे हवामान ...... असते.
१) कोरडे
२) विषम
३) सम
४) थंड
२) रत्नागिरी या शहराचे हवामान अमरावतीच्या तुलनेने वर्षभर सम असते कारण
१) समुद्रसपाटीपासूनची उंची
२) समुद्रसानिध्यता
३) समुद्रप्रवाहाची उपलब्धता
४) समुद्रलाटांचा प्रभाव
३) खालील विधानांची सत्यता तपासा :
विधान अ : कोकणचे हवामान हे थंड, विषम आणि कोरडे आहे.
विधान ब : महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण, सम आणि दमट आहे.
१) विधान अ आणि ब दोन्ही सत्य आहेत.
२) विधान अ आणि ब दोन्ही असत्य आहेत.
३) विधान अ सत्य असून विधान ब असत्य आहे.
४) विधान अ असत्य असून विधान ब सत्य आहे.
४) पठारी प्रदेशातील हवामान हे ........... असते.
१) आर्द्र
२) विषम
३) सम
४) थंड
५) तापी खोर्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे ?
१) किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण
२) पठारी अंतर्भागातील आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण
३) किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण
४) फक्त पठारी अंतर्भागातील हवामान
६) खालील विधाने पहा :
a) महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे.
b) सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात चिनुक वार्यापासून पाऊस पडतो.
c) महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस आंबोली येथे पडतो.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त विधान (a) बरोबर आहे
२) फक्त विधान (c) बरोबर आहे
३) विधान (a) आणि (c) बरोबर आहेत.
४) विधान (a) आणि (b) बरोबर आहेत.
७) खालील विधाने पहा :
अ) महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे.
ब) १९०१ मध्ये मालेगाव येथे १.६ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
क) अंबोली पेक्षा जव्हार येथे पाऊस जास्त पडतो.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त विधान (अ) बरोबर आहे.
२) फक्त विधान (क) बरोबर आहे.
३) विधान (अ) आणि (ब) बरोबर आहेत.
४) विधान (अ) आणि (क) बरोबर आहेत.
८) उच्च सर्वसाधारण तापमान, उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्य प्रमाण ही सर्व वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणाची आहेत ?
१) मुंबई विभाग
२) मराठवाडा विभाग
३) नागपूर विभाग
४) नाशिक विभाग
९) वार्षिक व दैनिक तापमान कक्षा अधिक, वार्षिक पर्जन्यमान ५० सेमी पेक्षा कमी, पावसाळ्यात सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण ५० टक्केपेक्षा कमी, तर उन्हाळ्यात १० टक्केपेक्षा कमी, ही वैशिष्ट्ये ..... हवामान कटिबंध दर्शवितात.
१) उष्ण आर्द्र पावसाळी
२) उष्ण शुष्क पावसाळी
३) अर्ध्य-आर्द्र पावसाळी
४) उष्ण वर्धा-वन पावसाळी
१०) येथील हवामान उष्ण आणि शुष्क आहे. अकोले तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे साधारणत: ६५ सेंमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. या तालुक्यात जिल्ह्यातील महत्त्वाचे गिरिस्थान सुद्धा आहे.
वरील वर्णन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लागू पडते ?
१) ठाणे जिल्हा
२) अकोला जिल्हा
३) अहमदनगर जिल्हा
४) परभणी जिल्हा
कृषी हवामान विभाग
१) महाराष्ट्र राज्य हे एकूण ९ (नऊ) कृषी हवामान विभागांमध्ये ........ च्या आधारावर विभागलेले आहे.
१) पर्जन्य, तापमान, मृदा प्रकार व वनस्पती
२) पर्जन्य, तापमान व वनस्पती
३) पर्जन्य, मृदा प्रकार व वनस्पती
४) पर्जन्य, तापमान व मृदा प्रकार
२) महाराष्ट्रातील हवामान विभाग व त्यांची स्थानिक प्रादेशिक नावे यांच्या जोड्या लावा :
हवामान विभाग स्थानिक प्रादेशिक नाव
a) अतिवृष्टीचा पर्वतीय प्रदेश i) देश
b) तापी खोर्यातील संक्रमण विभाग ii) झाडी
c) पूर्व विदर्भाचा मध्यम व जास्त पावसाचा विभाग iii) सह्याद्री
d) कोरड्या हवामानाचा विभाग iv) खानदेश
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (ii) (i)
२) (ii) (i) (iv) (iii)
३) (iii) (iv) (ii) (i)
४) (i) (ii) (iii) (iv)
३) खालील महाराष्ट्राच्या नकाशात टिंबांनी दर्शविलेल्या प्रदेश कोणता कृषी हवामान विभाग दर्शवितो ?
१) निश्चित पर्जन्याचा विभाग
२) जास्त पर्जन्याचा तांबड्या तपकिरी मृदेचा विभाग
३) अति पर्जन्याचा जांभी मृदेचा विभाग
४) पर्जन्यछायेचा काळ्या व करड्या मृदेचा विभाग
डॉ. जी. टी. त्रिवार्था व कोपेनचे
१) महाराष्ट्राच्या खालील हवामान विभागांचा काळजीपूर्वक अभ्यास करा :
I) उष्णकटिबंधीय वर्षा अरण्यांचा हवामान विभाग - AM
II) उष्णकटिबंधीय निम्नशुष्क हवामानाचा व किंवा स्टेपी हवामानाचा प्रदेश - BS
III) उष्णकटिबंधीय दमट, कोरडे किंवा मान्सून सॅव्हाना हवामानाचा विभाग - AW
वरील हवामान विभाग खालीलपैकी कोणत्या हवामान शास्त्रज्ञाशी/शास्त्रज्ञांच्याशी संबंधित आहे/आहेत?
a) डॉ. त्रिवार्था
b) कुमारी सेंपल
c) कोप्पेन
d) थॉर्नवेट
१) (a), (c) आणि (d)
२) (c) आणि (d)
३) फक्त (a)
४) फक्त (b)
२) त्रिवार्थी ने केलेल्या हवामानाच्या वर्गीकरणानुसार विदर्भ व पूर्व मराठवाड्यातील हवामान खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?
१) Af
२) Am
३) Aw
४) As
३) डॉ. त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार कोकण किनारपट्टीचा प्रदेश कोणत्या हवामान प्रकारात मोडतो?
१) AM
२) BS
३) AW
४) AS
४) डॉ. त्रिवार्था यांनी महाराष्ट्राची विभागणी तीन हवामान विभागात केली आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशाचा समावेश मान्सून सॅव्हाना हवामान विभागात केलेला आहे?
१) विदर्भ
२) खानदेश
३) कोंकण
४) मराठवाडा
५) त्रिवार्थाच्या नुसार ‘Aw’ प्रकारचे हवामान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या विभागात आढळते ?
१) कोकण विभाग
२) नाशिक आणि पुणे विभाग
३) मराठवाडा आणि विदर्भ विभाग
४) वरील सर्व विभाग
६) कोपेनच्या वर्गीकरणानुसार ‘Aw’ हवामान प्रदेश काय निर्देशित करतो ?
१) लघु शुष्क ऋतुजा मोसमी प्रकार
२) उष्णकटिबंधीय सॅव्हाना
३) उष्ण वाळवंटी प्रकार
४) ध्रुवीय कारणे
७) भारतीय हवामान वर्गीकरणामध्ये कोपेन या शास्त्रज्ञाने "Amw" हे अद्यक्षर कशासाठी वापरले आहे ?
१) निमशुष्क स्टेपी हवामान
२) मोसमी हवामान अल्पकालीन शुष्क हिवाळी
३) मान्सून शुष्क हिवाळी
४) ध्रुवीय शुष्क हिवाळी
८) कोपेनच्या हवामान प्रदेश वर्गीकरण DFC म्हणजे.....
१) शित हवामान प्रदेश
२) उष्ण वाळवंटी हवामान प्रदेश
३) उष्ण व शुष्क हवामान प्रदेश
४) वरीलपैकी नाही
२) हवामानाचे घटक
१) तापमान
२) आर्द्रता
१) महाराष्ट्रातील भूदृश्यांच्या विकासात खालीलपैकी ...... या हवामान घटकाची भूमिका महत्त्वाची आहे.
१) आभ्राच्छादन
२) आर्द्रता
३) पर्जन्य
४) तापमान
२) महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम होतो ?
a) भौगोलिक स्थान व अक्षवृत्तीय विस्तार
b) मोसमी वारे
c) प्राकृतिक रचना
d) उन्हाळ्यातील हवेची स्थिती
पर्यायी उत्तरे :
१) (a) व (b)
२) (b) व (c)
३) (a), (b) व (c)
४) वरील सर्व
१) तापमान
१) महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डिसेंबर व जानेवारी महिन्यात सरासरी किमान तापमान-
१) १२०C ते १६०C
२) १६०C ते २००C
३) २००C ते २२०C
४) ८०C ते १२०C
२) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आढळते ?
१) सातारा
२) आंबोली
३) अलिबाग
४) नागपूर
३) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे?
१) अलिबाग
२) पुणे
३) कोल्हापूर
४) नागपूर
४) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उन्हाळ्यात तापमान कक्षा सर्वात जास्त असते ?
१) मुंबइ
२) सोलापूर
३) पुणे
४) नागपूर
५) मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावर असूनसुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी आहे कारण-
१) मुंबई हे बंदर आहे
२) मुंबई हे सागरकिनार्याजवळ आहे.
३) वरीलपैकी कोणतेही नाही
४) वरील दोन्ही (१ व २)
६) महाराष्ट्रात हिवाळ्यात तापमानात घट होत जाते, कारण...............
१) हिमालयावर बर्फ पडू लागतो
२) उत्तरेकडील शीत वारे महाराष्ट्रात येतात
३) पर्जन्यकाळात खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो
४) सूर्याच्या भासमान भ्रमण मार्गामुळे या काळात सूर्याची किरणे तिरकस पडतात
७) खालीलपैकी (अ) आणि (ब) ही विधाने वाचून योग्य पर्याय निवडा -
अ) जरी एकाच अक्षवृत्तावर असले तरी डोंगरी स्थानांचे तापमान कमी असल्याने गिरिस्थान म्हणून विकसित होण्यास योग्य परिस्थिती असते.
ब) वाढत्या उंचीनुसार तापमान ९.५० सें/कि. मी. या दराने कमी होते.
१) (अ) आणि (ब) ही दोन्ही विधाने सत्य असून (ब) हे (अ) ची कारणमीमांसा देते.
२) (अ) आणि (ब) ही दोन्ही विधाने सत्य असली तरी (ब) हे (अ) ची योग्य कारणमीमांसा देत नाही.
३) (अ) सत्य असून (ब) चूक आहे.
४) (अ) चूक असून (ब) सत्य आहे.
८) हवा अधिक उंचीवर जाते, हवेचा दाब कमी होऊन ती वातावरणात प्रसरण पावते आणि तापमानात घट होते यालाच ........ असे म्हणतात.
१) तापमानाची विपरितता
२) आयसोथर्मल र्हास प्रमाण
३) अॅडियाबाटीक र्हास प्रमाण
४) तापमानाचे सर्वसाधारण र्हास प्रमाण
९) सागरी क्षेत्रापेक्षा खंडाअंतर्गत प्रदेशात वार्षिक तापमान कक्षा ही जास्त असते. खालीलपैकी कोणते/कोणती कारण/कारणे यास कारणीभूत आहेत ?
१) जमीन आणि पाण्याच्या दरम्यान असलेला तापमानातील फरक
२) सागरी आणि खंडाअंतर्गत प्रदेशांच्या उंचीत असलेले अंतर.
३) खंडाअंतर्गत प्रदेशात आढळणारे जोरदार वारे
४) सागरी क्षेत्राच्या तुलनेत खंडाअंतर्गत भागात आढळणारी जोरदार वृष्टी
खाली नमूद केलेल्या संकेताचा वापर करून योग्य विधान/विधाने शोधा.
१) फक्त १
२) फक्त १ आणि २
३) फक्त २ आणि ३
४) १, २, ३ आणि ४
१०) साधारणपणे वातावरणात जसजसे समुद्र सपाटीपासून उंचावर जाऊ तसतसे तापमान कमी होते. कारण-
१) वातावरण हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच वर तापत जाते.
२) वातावरणाच्या वरच्या टप्प्यात जास्त आर्द्रता असते.
३) वातावरणाच्या वरच्या टप्प्यात हवेची घनता कमी आहे.
योग्य पर्याय निवडा.
१) फक्त १
२) फक्त २ व ३
३) फक्त १ व ३
४) २ व ३
११) खाली नमूद शहरांची मे महिन्यातील तापमान कक्षा उतरत्या क्रमाने लावा :
a) नागपूर
b) सोलापूर
c) रत्नागिरी
d) मुंबई
पर्यायी उत्तरे :
१) (b),(a),(d),(c)
२) (d),(c),(b),(a)
३) (c),(a),(d),(b)
४) (c),(d),(a),(b)
१२) खालील महाराष्ट्राच्या नकाशातील दोन समताप रेषा कोणत्या महिन्यातील तापमानाचे वितरण दर्शवितात?
१) जानेवारी
२) एप्रिल
३) जुलै
४) ऑक्टोबर
१३) खालच्या तक्त्यात महाराष्ट्रातील एका ठिकाणाचे मासिक सरासरी तापमान व पर्जन्यमान दिले आहे.
१) अकोला
२) अहमदनगर
३) डहाणू
४) लोणावळा
२) आर्द्रता
१) महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेशात जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता ............ असते.
१) ६० ते ७५ टक्केच्या दरम्यान
२) ६५ ते ७५ टक्केच्या दरम्यान
३) ७० ते ८० टक्केच्या दरम्यान
४) ८० टक्के पेक्षा जास्त
२) कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते?
१) जास्त पर्जन्य
२) सागर किनारा
३) उष्णकटिबंधीय सदाहरित वर्षावने
४) पश्चिम घाट
३) सापेक्ष आर्द्रता जेव्हा कमी असते तेव्हा ........
१) शुष्क व द्रव तापमानमापक समान तापमान दर्शवतात.
२) शुष्क आणि द्रव तापमानमापकातील तापमानात जास्त फरक असतो.
३) जास्त तापमान असेल
४) कमी तापमान असेल.
४) महाराष्ट्रामध्ये, वातावरणाचा दाब हा जानेवारी महिन्यात किनारपट्टीवर सम-समान असतो, तर उर्वरित राज्यात दाब प्रवणता ही ......
१) पश्चिम-पूर्व आणि अत्यंत दुर्बल असते
२) दक्षिण-उत्तर आणि मध्यम ते उच्च असते
३) दक्षिण-उत्तर आणि अत्यंत उच्च असते
४) उत्तर-दक्षिण आणि अत्यंत दुर्बल असते
५) समुद्राच्या पाण्याची सरासरी क्षमता ३५% असते. समुद्र पाण्यात सर्वात अधिक भाग सोडिअम क्लोरेटचा म्हणजे ७७.५% इतका असतो.
पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
a) मृत समुद्राची क्षारता सुमारे २४०% इतकी असते.
b) समुद्र पाण्यात सोडिअम क्लोरेट नंतर सर्वात अधिक मॅग्नेशिअम सल्फेट असते.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a) योग्य आहे.
२) केवळ (b) योग्य आहे.
३) दोन्ही
४) एकही नाही.
३) वारे आणि चक्रीवादळ
१) महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे ही मान्सूनपूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीला काळात ...........या महिन्यांत जास्त येतात.
१) एप्रिल आणि जुलै
२) एप्रिल आणि मे
३) मे आणि जून
४) जून आणि जुलै
२) महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे धुळीची वादळे ही दुर्मीळ आहेत किंवा एक-दोन वादळे एप्रिल आणि मे मध्ये किंवा जूनच्या सुरुवातीस विशेषत: राज्याच्या अंतर्गत ...........या भागात तयार होतात.
१) विदर्भ
२) मराठवाडा
३) धुळे आणि जळगाव जिल्हे
४) दक्षिण मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र
३) खालीलपैकी कोणत्या वार्यास डॉक्टर असे म्हणतात ?
१) मोसमी वारे
२) मतलई व खारे वारे
३) पर्वतीय वारे
४) दरीतील वारे
४) खालीलपैकी कोणत्या स्थानिक वार्यांना डॉक्टर वारे या नावांनीही संबोधिले जाते?
१) खारे व मतलई वारे
२) मान्सूनपूर्वी वारे
३) पर्वतीय/डोंगरी वारे
४) दरी वारे
५) स्कवेल/चंडवात (पाऊस व हिम वर्षाबरोबर येणारी वावटळ) ही महाराष्ट्रामध्ये दुर्मीळ आहे, परंतु कधी-कधी .......... प्रसंगी येते.
१) किनारपट्टीवर मान्सून पूर्व काळात आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.
२) मान्सून काळात किनारपट्टीवर आणि मान्सून पूर्व काळात अंतर्गत प्रदेशात
३) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात
४) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि अंतर्गत प्रदेशात
६) तामिळनाडूच्या किनारपट्टीवर ३० डिसेंबर २०११ रोजी थडकलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?
१) थेन
२) झेन
३) कॅटरिना
४) मॅटिझ
७) महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कोणते आहे ?
१) महाबळेश्वर
२) भिमा -शंकर
३) कळसूबाईचे शिखर
४) त्र्यंबकेश्वर
८) १ एप्रिल १९६० मध्ये खालीलपैकी कोणत्या जगातील पहिल्या हवामान उपग्रहाचे उड्डाण झाले ?
१) स्पूटनिक - 1
२) एक्सप्लोरर - 1
३) एस्. ई. एस्. - 8
४) टी.आय.आर.ओ.एस्. 1
(२) महाराष्ट्रातील मान्सून
* पर्जन्यवृष्टीचे वितरण - पर्जन्यातील विभागावर बदल
१) पर्जन्यमानाची आकडेवारी
२) पर्जन्यमानाचे वितरण
३) मान्सून वारे
१) पर्जन्यमानाची आकडेवारी
१) भारतातील एकूण पर्जन्यमानांपैकी दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचे योगदान किती आहे?
१) ४० ते ५० टक्के
२) ५० ते ६० टक्के
३) ८० ते ९० टक्के
४) वरीलपैकी एकही नाही
२) जोड्या लावा :
ठिकाण सरासरी पर्जन्य (से.मी.)
(a) मुंबई (i) ४००
(b) रत्नागिरी (ii) २००
(c) सावंतवाडी (iii) २६०
(d) अलिबाग (iv) १८०
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (i) (ii)
२) (i) (iii) (ii) (iv)
३) (iv) (iii) (ii) (i)
४) (i) (iv) (ii) (iii)
३) महाराष्ट्र राज्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती आहे ?
१) १४० से. मी.
२) १३५ से. मी.
३) १५५ से. मी.
४) १३० से. मी.
४) मोसमी पावसाचे प्रमाण व जिल्ह्यांच्या योग्य जोड्या लावा.
a) ४० ते ५० से.मी. i) लातूर
b) ५० ते ७५ से.मी ii) नागपूर
c) ७५ ते १०० से.मी iii) सांगली
d) १०० ते १५० से.मी. iv) बुलढाणा
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (i) (iv) (iii)
२) (i) (iii) (ii) (iv)
३) (iii) (iv) (i) (ii)
४) (iv) (ii) (iii) (i)
५) महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वार्यापासून पडणार्या पावसाचे प्रमाण किती आहे?
१) ६५%
२) ५०%
३) ८५%
४) १००%
६) खालील जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय निवडा :
नदी खोरे सरासरी वार्षिक पर्जन्य
अ) प्रवरा (i) ९३२ मिमी
ब) पूर्णा (ii) ८४६ मिमी
क) मांजरा (iii) ७९७ मिमी
ड) मानेर (iv) ६०६ मिमी
पर्यायी उत्तर :
(अ) (ब) (क) (ड)
१) III IV II I
२) III I II IV
३) IV II I III
४) IV III II I
७) ज्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा ...... टक्के अधिक असतो ते वर्ष पर्जन्यधिक्याचे समजण्यात येते.
१) १२०
२) १००
३) १५०
४) १२५
८) महाराष्ट्रातील प्रादेशिक वार्षिक पर्जन्यमान.....
a) कोकण i) ९२ सें.मी.
b) मध्य महाराष्ट्र ii) ११० सें.मी.
c) मराठवाडा iii) ७७ सें.मी.
d) विदर्भ iv) २८७ सें.मी.
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (iii) (i) (iv)
२) (iv) (i) (iii) (ii)
३) (iv) (i) (ii) (iii)
४) (i) (ii) (iv) (iii)
९) भारतातील एकूण पर्जन्यमानांपैकी दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचे योगदान किती आहे?
१) ४० ते ५० टक्के
२) ५० ते ६० टक्के
३) ८० ते ९० टक्के
४) वरीलपैकी एकही नाही
१०) महाराष्ट्राच्या पर्जन्याचा नकाशाचा (२०१३-१४) चा अभ्यास करा आणि योग्य उत्तरे द्या.
अ) २०१४ नुसार महाराष्ट्राच्या मध्यवर्तीय भागात सरासरी पर्जन्यमान ० ते ८० एवढे आहे.
ब) २०१३ नुसार महाराष्ट्राच्या उत्तरेस १२० व त्यापेक्षा जास्त सरासरी पर्जन्यमान आढळले.
क) धुळे, जळगाव व अमरावती येथे २०१४ नुसार १२० व त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो.
ड) महाराष्ट्रात २०१३ पेक्षा २०१४ मध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे.
पर्यायी उत्तरे :
१) अ बरोबर
२) ब बरोबर
३) अ व ब बरोबर
४) क व ड बरोबर
११) जोड्या लावा :
महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण
स्तंभ -I स्तंभ -II
a) अतिशय जास्त पावसाचा प्रदेश (३००-७५०सेंमी) i) कोकण किनारपट्टीचा चिंचोळा भाग व मावळ
b) जास्त पावसाचा प्रदेश (२००-३०० सेंमी.) ii) अंबोली, महाबळेश्वर, गगनबावडा, माथेरान
c) मध्यम पावसाचा प्रदेश (१००-२०० सेंमी.) iii) मावळाच्या पूर्वेस उत्तर-दक्षिण पट्टा व विदर्भ
d) कमी पावसाचा प्रदेश (५०-१०० सेंमी.) iv) अहमदनगर, नाशिक, सातारा जिल्ह्यातील काही भाग
v) मराठवाडा, खानदेश व पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d) (e)
१) (i) (ii) (iii) (iv) (v)
२) (ii) (i) (iii) (iv) (v)
३) (ii) (i) (iii) (v) (iv)
४) (i) (ii) (v) (iv) (iii)
२) पर्जन्यमानाचे वितरण
१) खालील स्थाने वार्षिक पर्जन्याच्या उतरत्या क्रमानुसार लावा.
a) सिरोंचा
b) बीड
c) वर्धा
d) बारामती
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b), (c), (d)
२) (a), (d), (b), (c)
३) (a), (c), (b), (d)
४) (a), (b), (d), (c)
२) महाराष्ट्रातील ....... येथे सर्वात जास्त पाऊस पडतो.
१) चिखलदरा
२) तोरणमाळ
३) आंबोली
४) गडचिरोली
३) खालील ठिकाणे पर्जन्याच्या दृष्टीने उतरत्या क्रमाने लावा.
अ) अमरावती
ब) नागपूर
क) अलिबाग
ड) सोलापूर
पर्यायी उत्तरे :
१) अ,ब,क,ड
२) अ,क,ब,ड
३) क,ब,अ,ड
४) ब,अ,ड,क
४) खालील पैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद होते ?
१) हर्णे
२) वेंगुर्ला
३) ठाणे
४) रत्नागिरी
५) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी (मार्च ते मे) पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते ?
१) कोल्हापूर
२) सातारा
३) पुणे
४) ठाणे
६) महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो?
१) मराठवाडा
२) पश्चिम महाराष्ट्र
३) खानदेश
४) कोकण
७) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पावसाळी दिवसांची नोंद होते ?
१) अंबोली
२) महाबळेश्वर
३) गगनबावडा
४) सावंतवाडी
८) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो ?
१) महाबळेश्वर
२) माथेरान
३) लोणावळा
४) आंबोली
९) खालील ठिकाणे पर्जन्य प्रमाणाच्या उतरत्याक्रमाने लावा -
अ) माथेरान
ब) अंबोली
क) महाबळेश्वर
ड) पाचगणी
१) अ, ब, क, ड
२) ब, क, ड, अ
३) ब, क, अ, ड
४) क, ब, अ, ड
१०) कोठे २५०० मिमी पावसाची नोंद झालेली नाही ?
अ) रायगड जिल्ह्यातील माथेरान व कर्जत
ब) रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड व लांजा
क) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली व कणकवली
ड) पुणे जिल्ह्यातील खंडाळा व लोणावळा
इ) कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा व राधानगरी
१) अ, ब
२) ब, इ
३) अ, इ
४) वरील कोणताही पर्याय योग्य नाही
११) औरंगाबाद विभागातील पर्जन्यमानासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
१) नांदेडमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त पाऊस पडतो.
२) बीडमध्ये सर्वात जास्त पाऊस सप्टेंबर महिन्यात पडतो.
३) बहुतांश जिल्ह्यांमध्ये, जून महिन्यातील पाऊस जवळजवळ शून्य असतो.
४) उस्मानाबाद जिल्ह्यात विभागातील सर्वात कमी पाऊस पडतो.
१२) उन्हाळ्याच्या शेवटी पडणारा आंबेसरी पर्जन्य महाराष्ट्राच्या ...... प्रदेशाशी निगडीत आहे.
१) खानदेश - उत्तर महाराष्ट्र
२) विदर्भ - पूर्व महाराष्ट्र
३) घाटमाथा - पश्चिम महाराष्ट्र
४) कोकण - दक्षिण महाराष्ट्र
१३) महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता ?
१) नाशिक जिल्हा
२) पुणे जिल्हा
३) चंद्रपूर जिल्हा
४) यांपैकी नाही
१४) खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने असत्य आहे/आहेत ?
a) महाराष्ट्रातील ८५% पाऊस नैऋत्य मान्सून वार्यामुळे पडतो.
b) महाराष्ट्रात जुलै महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडतो.
c) दक्षिण कोकणातून उत्तर कोकणाकडे गेल्यावर पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.
d) अंबोली येथे महाबळेश्वर पेक्षा कमी पाऊस पडतो.
पर्यायी उत्तरे :
१) (a)
२) (a) आणि (b)
३) (b) आणि (c)
४) (d)
१५) महाराष्ट्रातील खालील प्रदेशांची त्यांच्या वार्षिक सरासरी पर्जन्याच्या प्रमाणानुसार उतरत्या क्रमाने मांडणी असलेला योग्य पर्याय कोणता आहे?
१) कोकण - खान्देश - विदर्भ - मराठवाडा
२) कोकण - विदर्भ - खान्देश - मराठवाडा
३) विदर्भ - कोकण - खान्देश - मराठवाडा
४) मराठवाडा - खान्देश - विदर्भ - कोकण
१६) खालील विधानांवर विचार करा.
(A) पर्जन्याचे प्रमाण पश्चिमेकडून मध्य महाराष्ट्राकडे कमी होत जाते.
(B) पर्जन्याचे प्रमाण पूर्वेकडून मध्य महाराष्ट्राकडे कमी होत जाते.
कोणते/कोणती विधान/विधाने अचूक आहेत?
१) फक्त (A)
२) फक्त (B)
३) (A) व (B) दोन्ही
४) यापैकी नाही
१७) खालील विधाने पहा :
अ) कोकण विभागात ९४% पाऊस आग्नेय मोसमी वार्यापासून पडतो.
ब) उत्तर कोकण विभागापेक्षा दक्षिण कोकण विभागात जास्त पाऊस पडतो.
क) पश्चिम घाट विभागात किनारी विभागापेक्षा कमी पाऊस पडतो.
१) फक्त विधान अ बरोबर आहे.
२) फक्त विधान ब बरोबर आहे.
३) विधाने अ आणि ब बरोबर आहेत.
४) विधाने ब आणि क बरोबर आहेत.
१८) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर नाहीत:
अ) सह्याद्री पर्वताच्या वातसन्मुख उतारावर पर्जन्याचे प्रमाण कमी असते.
ब) अंबोली पेक्षा महाबळेश्वर येथे पाऊस कमी पडतो.
क) महाराष्ट्राच्या ईशान्य भागात ईशान्य मोसमी वार्यापासून पाऊस पडतो.
१) फक्त विधान अ
२) फक्त विधान ब
३) फक्त विधान क
४) फक्त अ आणि क
१९) कोकण विभागात पावसाचे प्रमाण घटत जाते.
१) उत्तरेकडून दक्षिणेकडे
२) दक्षिणेकडून उत्तरेकडे
३) पश्चिमेकडून पूर्वेकडे
४) वरीलपैकी एकही नाही
३) मान्सून वारे
१) नैर्ऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?
१) आवर्त
२) आरोह
३) प्रतिरोध
४) मान्सून पूर्व
२) योग्य जोड्या लावा :
यादी I (वृष्टीचे प्रकार) यादी II (आवश्यक स्थिती)
अ) अभिसरण पर्जन्य I) कमी दाबाशी संबंध असतो.
ब) प्रतिरोध पर्जन्य II) हवेचे तापमान वाढल्याने
क) आवर्त पर्जन्य III) समुद्रावरून येणारा उबदार हवेचा झोत हिवाळ्यात थंड जमिनीवरून जातो.
ड) सीमावर्ती पर्जन्य IV) बाष्पसंयुक्त हवेस डोंगर उतारावरून वर सरकावेच लागते.
(अ) (ब) (क) (ड)
१) III I IV II
२) II I III IV
३) IV II I III
४) II IV I III
३) भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?
१) आरोह
२) आवर्त
३) प्रतिरोध
४) यापैकी नाही
४) खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य, वारा येते असलेल्या पर्वत उतारावर आढळते ?
१) प्रतिरोध पर्जन्य
२) आवर्त पर्जन्य
३) आरोह पर्जन्य
४) यापैकी नाही
५) महाराष्ट्र राज्यात मान्सूनपूर्व पर्जन्यास ...... म्हणतात.
१) आम्रसरी
२) कॉफी बहार सरी
३) कालबैसाखी
४) आँधी
६) आम्रसरी म्हणजे काय?
१) कर्नाटक व केरळ मध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य
२) जून ते सप्टेंबर मधील पर्जन्य
३) हिवाळ्यात पडणारा पाऊस
४) पश्चिमी अडथळ्यांमुळे पडणारा पाऊस
७) महाराष्ट्राला कोणत्या वार्यांपासून पाऊस मिळतो ?
१) मान्सून वारे
२) व्यापारी वारे
३) प्रतिव्यापारी वारे
४) स्थानिक वारे
८) महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो ?
१) ईशान्य मोसमी
२) नैर्ऋत्य मोसमी
३) वळीव
४) वादळी
९) महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वार्यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो ?
१) मराठवाडा
२) कोकण
३) खानदेश
४) विदर्भ
१०) हिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भात कोणत्या घटकांमुळे पाऊस पडतो?
१) अरबी समुद्रावरून येणारे मोसमी वारे
२) बंगालच्या उपसागरावरून येणारे मोसमी वारे
३) बंगालच्या उपसागरावरून येणारी चक्रीवादळे
४) अरबी समुद्रावरून येणारी चक्रीवादळे
११) परतीच्या पावसाची खालीलपैकी दिशा कोणती?
१) भारताच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे
२) वायव्य भारतापासून बंगालकडे
३) ईशान्य भारतापासून पश्चिम किनारपट्टीकडे
४) पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीकडे
१२) मोसमी वार्याच्या नेहमीच्या तारखांबाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही?
a) दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाच्या भारतातील परतीचा प्रवास उत्तर-पश्चिममध्ये जवळपास १ सप्टेंबरला सुरू होतो व दक्षिण-पूर्वेच्या भागातून सुमारे १ डिसेंबरला परततो.
b) मध्य महाराष्ट्रातून दक्षिण-पश्चिम मोसमी वारे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परततात.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
१३) खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे?
१) भूमीखंडाचा विस्तृत भाग
२) भारताच्या तिन्ही बाजूंनी असणारा समुद्र
३) ३०० ते ४०० अक्षांसाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व
४) वरील सर्व
१४) नैऋत्य मोसमी वारे भारतात दोन मार्गांनी प्रवेश करतात......
१) अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरील वारे
२) हिंदी महासागर व अरबी समुद्रावरील वारे
३) बंगालचा उपसागर व हिंदी महासागरावरील वारे
४) वरीलपैकी कोणतेही नाही
१५) दिलेल्या नकाशाचे अवलोकन करा आणि वाहणार्या वार्याचा योग्य पर्याय निवडा.
१) नैऋत्य मान्सून वारे
२) ईशान्य मान्सून वारे
३) नैऋत्य व्यापारी वारे
४) ध्रुवीय वारे
१६) नैऋत्य मोसमी वारे भारतात दोन मार्गांनी प्रवेश करतात......
१) अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरील वारे
२) हिंदी महासागर व अरबी समुद्रावरील वारे
३) बंगालचा उपसागर व हिंदी महासागरावरील वारे
४) वरीलपैकी कोणतेही नाही
१७) महाराष्ट्रातील कोकणच्या प्रदेशात पडणार्या पावसासंबंधी कोणते विधान बरोबर आहे ?
a) कोकणात प्रतिरोध व अभिसरण पाऊस पडतो
b) कोकणात प्रतिरोध पाऊस पडतो
c) कोकणात आवर्त व अभिसरण पाऊस पडतो.
d) कोकणात आवर्त पाऊस पडतो.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त (a) बरोबर
२) फक्त (b) बरोबर
३) फक्त (c) आणि (d) बरोबर
४) फक्त (a) आणि (d) बरोबर
(३) महाराष्ट्रातील अवर्षण
१) खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते ?
१) स्थलीय विविधता
२) कालीय विविधता
३) स्थल-कालीय विविधता
४) यापैकी नाही
२) खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या मुख्य भागाचा समावेश अवर्षणाचा खरीप व रब्बी कृषी हवामानाच्या विभागात होतो ?
a) अहमदनगर, सोलापूर, सांगली
b) अहमदनगर, भंडारा, गडचिरोली
c) सोलापूर, कोल्हापूर, सांगली
d) अमरावती, बीड, अकोला
पर्यायी उत्तरे :
१) (a) व (b)
२) (b) व (c)
३) फक्त (a)
४) फक्त (d)
३) पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये ...... चे स्थान आहे.
१) महाड
२) वाई
३) महाबळेश्वर
४) नाशिक
४) महाबळेश्वर पासून १५ किमी अंतरावर असलेल्या पाचगणीला महाबळेश्वरच्या निम्मासुद्धा पाऊस पडत नाही कारण-
a) सह्याद्रीपर्यंत आलेले बाष्पयुक्त वारे सह्याद्री ओलांडे पर्यंत बाष्प खजिना गमावतात.
b) पठारावर आल्यावर क्षीण बाष्पधारणशक्तामुळे पर्जन्य देण्याऐवजी अधिक बाष्प सामावून घेतात.
c) पश्चिम घाटातील वर्षाछायेचा परिणाम सौम्य झालेला असतो.
d) बंगालच्या उपसागरावरून येणार्या मौसमी वार्यांमुळे पूर्व विदर्भातील पर्जन्यात फारच वाढ होते.
१) (a) व (b) फक्त
२) (a),(c) व (d) फक्त
३) (a),(b) व (c) फक्त
४) वरीलपैकी सर्व बरोबर
५) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो?
१) सांगली
२) अहमदनगर
३) सोलापूर
४) वरील सर्व
६) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो ?
१) मराठवाडा
२) विदर्भ
३) पश्चिम महाराष्ट्र
४) कोकण
७) सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो ?
१) अति पर्जन्याचा प्रदेश
२) ओल्या दुष्काळाचा प्रदेश
३) पर्जन्य छायेचा प्रदेश
४) तराई
८) या भौगोलिक कारणामुळे कालवा जलसिंचनासाठी पश्चिम महाराष्ट्र क्षेत्र अनुकूल आहे :
a) सह्याद्रीच्या पूर्व उतारावर धरणे बांधण्यासाठी अनेक सुयोग्य ठिकाणे आहेत.
b) पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे.
c) पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर वाहणार्या नद्या पूर्व वाहिन्या आहेत.
d) पाणी शेतापर्यंत पोहचू शकत नाही.
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (b) फक्त
३) (c) आणि (d) फक्त
४) (a) आणि (c) फक्त
९) दख्खनमधील १८७६-७७ च्या दुष्काळात १४ नवीन जलसंधारण योजना कार्यान्वित झाल्या. त्यातील पहिली मोठी जलसंधारण योजना कोणती?
१) भाटघर धरण
२) दारणा धरण
३) खडकवासला धरण
४) प्रवरा नदी प्रकल्प
१०) जमिनी खालील भू-जल स्तर जो वेगाने खालावत आहे तो रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ........ फुटाच्या खाली कूपनलिका (Borewells) खोदण्यास संपूर्ण राज्यभर बंद केली आहे.
१) २००
२) २५०
३) ३००
४) ४००
११) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे ?
१) ७५ सें.मी. पेक्षा कमी
२) १०० ते २०० सें.मी.
३) २०० सें.मी. पेक्षा जास्त
४) वरीलपैकी कोणतेही नाही
४) महाराष्ट्रातील महापूर आणि त्याच्या समस्या
१) खालील विधाने पहा :
a) मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी ९०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला होता.
b) मावळ प्रदेशात पूर्वेकडे पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते.
c) दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त असते.
पर्यायी उत्तरे -
१) विधान (a) आणि (b) बरोबर आहेत.
२) विधान (a) आणि (c) बरोबर आहेत.
३) विधान (b) आणि (c) बरोबर आहेत.
४) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
२) जोड्या जुळवा :
अति पर्जन्याची ठिकाणे जिल्हे
अ) आंबोली i) रायगड
ब) माथेरान ii) कोल्हापूर
क) खंडाळा iii) सिंधुदुर्ग
ड) गगनबावडा iv) पुणे
(अ) (ब) (क) (ड)
१) (I) (II) (III) (IV)
२) (II) (III) (IV) (I)
३) (III) (I) (IV) (II)
४) (IV) (III) (II) (I)
३) खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते ?
१) माथेरान
२) आंबोली
३) रामटेक
४) लोणावळा
४) कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस पडतो, कारण ......
१) तेथील हवा थंड असते
२) तेथून अरबी समुद्र जवळ आहे
३) सह्याद्रीच्या उंच कड्यांमुळे बाष्पयुक्त वारे अडवले जातात
४) तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१७२)
(१) महाराष्ट्राचे हवामान
* महाराष्ट्राचे हवामान - तापमान, वारे, चक्रीवादळ
१) हवामानाचे वर्गीकरण
२) हवामानाचे घटक - तापमान, आर्द्रता
३) वारे आणि चक्रीवादळ
१) हवामानाचे वर्गीकरण
१-३
२-२
३-२
४-२
५-३
६-३
७-१
८-२
९-२
१०-३
कृषी हवामान विभाग
१-३
२-३
३-२
डॉ. जी. टी. त्रिवार्था व कोपेनचे
१-३
२-३
३-१
४-४
५-३
६-२
७-२
८-१
२) हवामानाचे घटक
१) तापमान
२) आर्द्रता
१-३
२-३
१) तापमान
१-२
२-४
३-४
४-४
५-४
६-४
७-३
८-४
९-१
१०-३
११-१
१२-२
१३-४
२) आर्द्रता
१-४
२-२
३-२
४-४
५-१
३) वारे आणि चक्रीवादळ
१-३
२-१
३-२
४-१
५-२
६-१
७-१
८-४
(२) महाराष्ट्रातील मान्सून
* पर्जन्यवृष्टीचे वितरण - पर्जन्यातील विभागावर बदल
१) पर्जन्यमानाची आकडेवारी
२) पर्जन्यमानाचे वितरण
३) मान्सून वारे
१) पर्जन्यमानाची आकडेवारी
१-३
२-१
३-२
४-३
५-३
६-४
७-४
८-२
९-३
१०-३
११-३
२) पर्जन्यमानाचे वितरण
१-३
२-३
३-३
४-२
५-१
६-४
७-३
८-४
९-३
१०-४
११-२
१२-४
१३-४
१४-४
१५-२
१६-३
१७-२
१८-१
१९-२
३) मान्सून वारे
१-३
२-४
३-३
४-१
५-१
६-१
७-१
८-२
९-४
१०-३
११-२
१२-१
१३-४
१४-१
१५-२
१६-१
१७-२
(३) महाराष्ट्रातील अवर्षण
१-३
२-३
३-२
४-४
५-४
६-३
७-३
८-४
९-३
१०-१
११-१
४) महाराष्ट्रातील महापूर आणि त्याच्या समस्या
१-४
२-३
३-२
४-३