सांस्कृतिक वारसा / प्रश्नमंजुषा (१७०)
- 25 May 2021
- Posted By : study circle
- 1803 Views
- 1 Shares
सांस्कृतिक वारसा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”सांस्कृतिक वारसा” या वर अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत. याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास विभाग
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
१.१३ महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा (प्राचीन व आधुनिक) -
वारसा - कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ येथील लेणी, लोणार सरोवर, महाराष्ट्रातील किल्ले इत्यादी.
प्रायोगिक कला - नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत,
लोककला - लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड व इतर लोकनृत्ये,
दृश्य कला - वास्तू रचना, चित्रकला व वास्तुशिल्प, उत्सव.
महाराष्ट्राच्या सामाजिक व मानसिक विकासात वाङमय व संत वाङमयाचा प्रभाव - भक्ती, दलित, नागरी व ग्रामीण वाङ्मय.
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा (प्राचीन व आधुनिक )
वारसा - कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ, लोणार, किल्ले
१) एलोरा (वेरूळ) येथील एकूण लेण्यांपैकी किती लेणी हिंदू धर्माची आहेत?
१) १६
२) १७
३) १८
४) १९
२) खालीलपैकी बरोबर विधाने कोणती?
a) राष्ट्रकूट काळातील सर्वात श्रेष्ठ लेणे म्हणजे कैलास लेणे होय.
b) वेरूळ येथील जैनांची लेणी दिगंबर पंथीयांची आहेत.
c) चालुक्याच्या राजवटीत पट्टकदल, बदामी व तेर या ठिकाणी अनेक सुंदर मंदिरे बांधली गेली.
d) घारापुरी येथील लेण्यातील त्रिमुखी मूर्ती शिल्प प्रसिद्ध ाहे.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) फक्त
२) (a) आणि (c) फक्त
३) (b) आणि (c) फक्त
४) वरील सर्व बरोबर
प्रायोगिक कला - नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत
१) महाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला ?
१) राम जोशी
२) विष्णुदास भावे
३) परशराम देव
४) गोपाल देव
२) ........... हे आधुनिक काळातील पहिले मराठी नाटक होते.
१) गोपीचंद
२) माधवराय पेशवा
३) रामराज्यवियोग
४) सीता स्वयंवर
३) मराठी बालरंगभूमीची चळवळ .......... ने सुरु केली.
१) सुलभा देशपांडे
२) अरविंद देशपांडे
३) ज्योत्स्ना मोहीले
४) सुधा करमरकर
४) ब्रिटीश सरकारने किचकवध या मराठी नाटकावर प्रतिबंध घातला होता. या नाटकात किचक कोणाचे प्रतिनिधित्व करत होता ?
१) सर व्हॅलेंटाईन चिरॉल
२) लॉर्ड डलहौसी
३) ब्रिगेडीयर जनरल डायर
४) लॉर्ड कर्झन
५) मराठी नाटकाचे उद्गाते कोण होते?
१) विष्णूदास भावे
२) बि. पी. किर्लोस्कर
३) के. पी. खाडीलकर
४) जी. बी. देवल
६) महाराष्ट्रातील नाटकाविषयीच्या जोड्या लावा.
a) रत्नाकर मतकरी i) महानिर्वाण
b) जयवंत दळवी ii) एक अंडे फुटले
c) सतीश आळेकर iii) सूर्यास्त
d) दिलीप जगताप iv) घर तिघांच हवा
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (i) (iii
२) (ii) (iv) (i) (iii)
३) (iii) (ii) (iv) (i)
४) (iv) (i) (ii) (iii)
७) जोड्या लावा.
अ) बाबा पदमजी I) जयपूर घराणे
ब) अल्ला दिया खाँ II) प्रभात फिल्म कंपनी
क) बाबूराव पेंटर III) संगीत शांकुतल
ड) आण्णासाहेब किर्लोस्कर IV) यमुना पर्यटन
अ ब क ड
१) IV I II III
२) I III IV II
३) II IV III I
४) III II I IV
८) गोफ हे लोकनृत्य महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशातील लोकनृत्य आहे?
a) कोकण
b) खानदेश
c) विदर्भ
d) मराठवाडा
पर्याय -
१) (a) फक्त
२) (a) आणि (b)
३) (b) आणि (c)
४) (c) आणि (d)
९) कोकणात शिमग्याच्यावेळी नृत्याचा कोणता प्रकार सादर केला जातो ?
a) गजा नृत्य
b) काळ खेळ
c) तारपी नृत्य
d) नकटा नाच
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) फक्त
२) (a) आणि (c) फक्त
३) (c) फक्त
४) (d) फक्त
१०) दादासाहेब फाळके हे केवळ चित्रपट निर्मातेच होते असे नाही, तर त्या व्यतिरिक्त ते पुढीलपैकी कोण होते?
a) रंगभूषाकार, नेपथ्यकार होत
b) छाया चित्रकार होते
c) कथाकार, नृत्यतज्ज्ञ होते
d) अभिनेते होते
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) फक्त
२) (b) आणि (c) फक्त
३) (c) आणि (d) फक्त
४) (a) आणि (d) फक्त
११) चुकीची जोडी ओळखा.
१) बाबूराव पेंढारकर - मनोरंजन फिल्म कंपनी
२) दादासाहेब फाळके - हिंदुस्थान फिल्म कंपनी
३) बाबूराव पेंटर - महाराष्ट्र फिल्म कंपनी
४) व्ही. शांताराम - प्रभात फिल्म कंपनी
१२) शांकुतल या संस्कृत नाटकाचा मराठीत अनुवाद पुढीलपैकी कोणी केला आहे?
१) महादेवशास्त्री कोल्हटकर
२) परशुराम बल्लाळ गोडबोले
३) शिवरामशास्त्री खरे
४) कृष्णशास्त्री राजवाडे
१३) जयमाला शिलेदार यांच्या बाबतच्या खालील विधानांचा विचार करा.
a) इंदूर येथे जन्म व संगीत अलंकार पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण.
b) पद्म भूषण ने सन्मानित आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त.
वरील विधानांपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
१) फक्त (a)
२) फक्त (b)
३) (a) व (b) दोन्ही बरोबर
४) (a) व (b) दोन्ही चूक
लोककला - लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड व इतर लोकनृत्ये
१) बया दार उघड या भारुडाची रचना कोणी केली?
१) संत तुकाराम
२) एकनाथ
३) चोखामेळा
४) ज्ञानेश्वर
२) खालील वर्णनावरून योग्य पर्याय निवडा.
a) त्यांचा जन्म पैठणमध्ये झाला.
b) श्री जनार्दन स्वामींचे ते शिष्य होय.
c) त्यांची काळजी त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी घेतली.
d) यांच्या भारूड रचना आणि गौळणी प्रसिद्ध आहेत.
पर्यायी उत्तरे :
१) संत तुकाराम महाराज
२) संत एकनाथ महाराज
३) संत नामदेव महाराज
४) संत नरहरी सोनार
३) पैठण : संत एकनाथ : : नरसी : ?
१) संत निळोबा
२) संत नरहरी
३) संत नामदेव
४) संत निर्मळबाई
४) .......... यांनी १९०४ मध्ये जयतु शिवाजी हे काव्य रचले.
१) वीर सावरकर
२) लोकमान्य टिळक
३) रविंद्रनाथ टागोर
४) बिपीनचंद्र पाल
५) योग्य जोड्या लावा :
a) राम जोशी i) लटपट-लटपट तुझं चालणं ग मोठ्या नखर्याचं
b) परशराम ii) सुंदरा मनामध्ये भरली
c) सगन भाऊ iii) निर्मल मुखडा चंद्राकार सरळ नाकाची शोभते धार
d) होनाजी बाळा iv) लेकराला माय विसरली कसा ईश्वरतारी
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (iii) (iv) (i)
२) (i) (ii) (iv) (iii)
३) (ii) (iv) (i) (iii)
४) (iii) (iv) (ii) (i)
६) वेदान्तसूर्य हा २४४३ ओव्यांच्या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
१) श्रीधर
२) रामदास
३) चक्रधर
४) तुकाराम
७) जोड्या जुळवा :
a) शाहीर अनंत फंदी i) सोलापूर
b) शाहीर परशुराम ii) जेजुरी
c) शाहीर राम जोशी iii) नगर जिल्ह्यातील संगमनेर
d) शाहीर सगनभाऊ iv) नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iii) (iv) (i) (ii)
२) (ii) (i) (iv) (iii)
३) (i) (ii) (iii) (iv)
४) (iii) (iv) (ii) (i)
८) तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो ?
१) लक्ष्मी
२) सरस्वती
३) पार्वती
४) दुर्गा
दृश्य कला - वास्तू रचना, चित्रकला व वास्तुशिल्प
१) शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्य शिल्प कोणी साकारले आहे?
१) श. बा. कापुसकर
२) वि. पां. करमरकर
३) बी. आर. खेडकर
४) म. ग. गर्गे
२) वारली पेंटिंगला कोणी सुरुवात केली?
१) जीवा सोमा म्हसे
२) व्यंकटेश अन्नम
३) चामुलाल रथ्वा
४) गोविंद गारे
३) जोड्या जुळवा :
a) राजा रवी वर्मा i) निसर्ग चित्रे, व्यक्तिचित्रे
b) गणपती शंकर माजगांवकर ii) वारली चित्रकला
c) मशे, जिव्या, सोम्या iii) व्यंग चित्रकार
d) तेंडुलकर मंगेश धोंडोपंत iv) १८७३ मध्ये नायर लेडी चित्रास गव्हर्नरचे सुवर्ण पदक
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (iii) (ii) (iv)
२) (iii) (ii) (i) (iv)
३) (ii) (iii) (iv) (i)
४) (iv) (i) (ii) (iii)
४) भारताच्या फाळणीनंतर एफ. एन्. सूझा, एस्. एच्. रझा, के. एच्. आरा, एच्. ए. गाडे, एस्. के. बाक्रे आणि एका व्यक्तीने मिळून बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स् ग्रुप स्थापन केला. सहावी व्यक्ती कोण होती?
१) एम्. एफ. हुसैन
२) पृथ्वीराज कपूर
३) ए. के. हंगल
४) अण्णाभाऊ साठे
५) मराठ्यांनी केवळ किल्लेच बांधले नाही तर देवळेही उभारली. मराठ्यांच्या कारकिर्दीत कोणती शैल अधिक लोकप्रिय होती?
१) राजस्थानी
२) मराठा
३) हेमाडपंत
४) राजस्थानी व मराठा
६) पेशवेकाळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जाई?
a) कापडी पट
b) काच
c) भुर्जपात्र
d) लाकडी पट
१) (a) आणि (b) फक्त
२) (b) आणि (c) फक्त
३) (a) आणि (d) फक्त
४) वरील सर्व
७) खालीलपैकी कोणते चित्रकार कोल्हापूर, औंध, हैदराबाद संस्थानात राजचित्रकार म्हणून काम करीत होते?
a) गणपतराव म्हात्रे
b) आबालाल रहिमान
c) श्रीपाद दामोदर सातवळेकर
d) रामचंद्र वामन देऊस्कर
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) फक्त
२) (b) आणि (c) फक्त
३) (b), (c) आणि (d) फक्त
४) (a), (c) आणि (d) फक्त
८) गणपत म्हात्रे, वि. पां. करमरकर, र. क. फडके, वा. व. तालीम ही नावे महाराष्ट्रात कोणत्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहेत?
१) चित्रकार
२) शिल्पकार
३) गायक
४) समाजसुधारक
९) चुकीची जोडी ओळखा :
१) शिवाचे मंदिर - भूमरा
२) पार्वतीचे मंदिर - नाच्छा
३) विष्णूचे मंदिर - टीग्वा
४) शिवाच्या कोरीव मूर्ती असलेले गुंफा मंदिर - उदयगिरी टेकड्या
१०) खालीलपैकी बरोबर विधाने कोणती?
a) राष्ट्रकूट काळातील सर्वात श्रेष्ठ लेणे म्हणजे कैलास लेणे होय.
b) वेरूळ येथील जैनांची लेणी दिगंबर पंथीयांची आहेत.
c) चालुक्याच्या राजवटीत पट्टकदल, बदामी व तेर या ठिकाणी अनेक सुंदर मंदिरे बांधली गेली.
d) घारापुरी येथील लेण्यातील त्रिमुखी मूर्ती शिल्प प्रसिद्ध ाहे.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) फक्त
२) (a) आणि (c) फक्त
३) (b) आणि (c) फक्त
४) वरील सर्व बरोबर
लोकसाहित्य
१) खालीलपैकी कोणता अभंग संत नामदेवाने लिहिलेला नाही?
अ) “योगयाग विधी येणे नोहे सिद्धी । वायांची उपाधी । दंभधर्म”
ब) “न लगे मज काही । ऋद्धिसिद्धी पाही । मुक्ती सुख तेही न लगे मज”
क) “मुक्तपण आम्हा नको देवराया । भेटी मज पाया पुरे बापा”
ड) “बहु पुरुषार्थी शिरी भक्ति जैसी ।”
वरील पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?
१) (अ) फक्त
२) (ब) आणि (क) फक्त
३) (ब) आणि (ड) फक्त
४) वरील सर्व
२) जोड्या जुळवा.
a) गोविंदाग्रज i) रामचंद्र वि. टिकेकर
b) बालकवी ii) द्वारकानाथ मा. पितळे
c) धनुर्धारी iii) राम गणेश गडकरी
d) नाथमाधव iv) त्र्यंबक बा. ठोंबरे
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iii) (iv) (i) (ii)
२) (iv) (iii) (ii) (i)
३) (i) (ii) (iii) (iv)
४) (ii) (i) (iv) (iii)
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१७०)
वारसा - कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ, लोणार, किल्ले
१-२
२-४
प्रायोगिक कला - नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत
१-२
२-४
३-४
४-४
५-१
६-१
७-१
८-१
९-४
१०-१
११-१
१२-२
१३-१
लोककला - लावणी, तमाशा, पोवाडा, भारूड व इतर लोकनृत्ये
१-२
२-२
३-३
४-३
५-१
६-१
७-१
८-३
दृश्य कला - वास्तू रचना, चित्रकला व वास्तुशिल्प
१-३
२-१
३-४
४-१
५-३
६-४
७-३
८-२
९-४
१०-४
लोकसाहित्य
१-१
२-१