संयुक्त महाराष्ट्र चळवळ / प्रश्‍नमंजुषा (१६९)

  • संयुक्त महाराष्ट्र चळवळ / प्रश्‍नमंजुषा (१६९)

    संयुक्त महाराष्ट्र चळवळ / प्रश्‍नमंजुषा (१६९)

    • 25 May 2021
    • Posted By : study circle
    • 9795 Views
    • 19 Shares
     संयुक्त महाराष्ट्र चळवळ
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर अनेक प्रश्‍न विचारले गेलेले आहेत. याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास विभाग

    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
     
    १.११ स्वातंत्र्योत्तर भारत - राज्यांची भाषावार पुनर्रचना, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महत्त्वांच्या राजकीय पक्षांचा सहभाग आणि त्यातील महत्त्वाच्या व्यक्ती,
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व  चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    संयुक्त महाराष्ट्र चळवळ
     
    १)  मुंबईचे द्विभाषिक राज्य ज्या दिवशी अस्तित्वात आले तो दिवस :
        १) १ मे १९६०
        २) १ नोव्हेंबर १९५६
        ३) २६ जानेवारी १९६०
        ४) १ मे १९५६

    २)  मुंबई शहराचा समावेश नव्याने निर्माण करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सन ...... मध्ये करण्यात आला.
        १) १९५०
        २) १९६६
        ३) १९४७
        ४) १९६०

    ३)  द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना अनुक्रमे या दिवशी झाली :
        १) १ ऑक्टोबर १९५७/१ जानेवारी १९६०
        २) १ नोव्हेंबर १९५६/१ मे १९६०
        ३) १ मे १९६०/१ नोव्हेंबर १९५६
        ४) १ जानेवारी १९६०/३० नोव्हेंबर १९६७

    ४)  १ मे १९६० पासून अंमलात आलेल्या ...... या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली.
        १) गुजरात रिऑर्गनायझेशन अ‍ॅक्ट, १९६०
        २) बॉम्बे - गुजरात रिऑर्गनायझेशन अ‍ॅक्ट, १९६०
        ३) रिऑर्गनायझेशन अ‍ॅक्ट, १९६१
        ४) बॉम्बे रिऑर्गनायझेशन अ‍ॅक्ट, १९६०

    ५)  संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्य कालाक्रमाने लावा.
        (अ) अकोला करार
        (ब) फाजल अली कमिशन        
        (क) दार कमिशन
        (ड) नागपूर करार
        १) (क), (अ), (ड), (ब)
        २) (अ), (ब), (क), (ड)
        ३) (क), (ड), (अ), (ब)           
        ४) (ब), (ड), (क), (अ)

    ६)  महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराची स्थापना या गोण्डराजाने केली -
        १) राजा कोकशहा
        २) राजा चांदसुलतान
        ३) राजा बख्तबुलंद शहा
        ४) राजे रघुजी भोसले

    ७)  सन १९४० मध्ये ...... यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली.
        १) श्री. एस. एम. जोशी
        २) श्री. रामराव देशमुख
        ३) श्री. ज. स. करंदीकर
        ४) श्री. गं. त्र्य. माडखोलकर

    ८)  संयुक्त महाराष्ट्र सभा कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली?
        १) रामराव देशमुख
        २) रामराव आदिक
        ३) मुकुंदराव जयकर
        ४) शंकरराव देव

    ९)  संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ग्रामीण भागात पोहचविण्याचे महत्त्वाचे कार्य कोणत्या कार्यकर्त्यांनी केले होते?
        a) डॉ. केशवराव धोंडगे
        b) गुरुनाथ कुरुडे
        c) रामचंद्र पवार
        d) मगनलाल बेळसर
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b) फक्त
        २) (b) आणि (c) फक्त
        ३) (a) आणि (c) फक्त
        ४) (b) आणि (d) फक्त

    १०) संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला
        १) यशवंतराव चव्हाण
        २) बाळासाहेब खेर
        ३) सी. डी. देशमुख
        ४) के. एम. पण्णीकर

    ११) मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना ’जशी गरुडाला पंखं आणि वाघाला नखं’ असे वर्णन कोणत्या कवीने केले?
        १) अमर शेख
        २) अण्णाभाऊ साठे
        ३) प्र. के. अत्रे
        ४) द. ना. गव्हाणकर

    १२) इ.स. २८ जुलै १९४६ रोजी महाराष्ट्र एकीकरण परिषदेची सभा मुंबईमध्ये भरली होती तेव्हा तिचे अध्यक्ष कोण होते?
        १) श्री. श. नवरे
        २) श्री. अ. डांगे
        ३) दा. वि. गोखले
        ४) शकंरराव देव

    १३) संयुक्त महाराष्ट्र कार्यकारिणी समितीचे पहिले अध्यक्ष ......
        १) एस. एम. जोशी
        २) भाऊसाहेब हिरे
        ३) शंकर देव
        ४) साने गुरूजी

    १४) संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष कोण होते?
        १) श्री. विनोबा भावे
        २) श्री. यशवंतराव चव्हाण
        ३) श्री. मोरारजी देसाई
        ४) श्री. शंकरराव देव

    १५) दार कमिशनवर काँग्रेसने विसंगतीचा ठपका ठेवल्यानंतर त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली, तिचे सदस्य होते....
        १) जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व राजाजी.
        २) मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू व वल्लभभाई पटेल.
        ३) जवाहरलाल नेहरू, राजाजी, डॉ. आंबेडकर
        ४) जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व पट्टभी सीतारामय्या.
    १६) जोड्या लावा - (संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील वृत्तपत्रे)
          ‘अ‘ - (वृत्तपत्र)                ‘ब‘ (संपादक/मालक)
        अ. प्रबोधन                                                        i)  दिनु रणदिवे
        ब. नवयुग                                                         ii)  केशव ठाकरे
        क. प्रभात                                                          iii)  वालचंद कोठारी
        ड. संयुक्त महाराष्ट्र पत्रिका         iv)  प्रल्हाद अत्रे
        पर्यायी उत्तरे :
                       अ    ब    क     ड
              १)     III          IV         I              II
              २)     II           III         IV           I
              ३)     II           IV         III           I
              ४)     IV          II          I              III

    १७) २८ नोव्हेंबर १९४९ रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीविषयीचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेत कोणी मांडला?
        १) आचार्य अत्रे आणि आर. डी. भंडारे
        २) आचार्य अत्रे आणि स. का. पाटील
        ३) आर. डी. भंडारे आणि शिरीष पै
        ४) आर. डी. भंडारे आणि केशवराव जेधे

    १८) १५ नोव्हेंबर, १९५५ रोजी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींवर संसदेत चर्चा झाली. यावेळी एका संसद सदस्याने इशारा दिला होता की, ”मुंबई या राजधानीसह संयुक्त महाराष्ट्र याशिवाय काहीही मान्य होणार नाही.हे सदस्य कोण?
        १) स. का. पाटील
        २) सी. डी. देशमुख
        ३) न. वि. गाडगीळ
        ४) शंकरराव देव

    १९) मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती होईस्तोवर कोणी काय म्हटले होते?
        उदगार -
        a)मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्यास माझा शेवटच्या श्‍वासापर्यंत विरोध राहील.
              b) महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही जोपर्यंत सूर्य व चंद्र आकाशात चमकत राहतील.
              c)मुंबईचे नागरिक महाराष्ट्रात सहभागी होणार नाहीत जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे.
        व्यक्ती -
              p) शंकरराव देव  
              q) स. का. पाटील 
              r) मोरारजी देसाई
        पर्यायी उत्तरे :
        १) (a),  (p), (b) , (r), (c), (q)
              २) (a),  (q), (b) , (p), (c), (r)
              ३) (a),  (p), (b) , (q), (c), (r)
              ४) (a),  (q), (b) , (r), (c), (p)

    २०) जोड्या जुळवा :
        अ) संयुक्त महाराष्ट्र परिषद अध्यक्ष I. स. का. पाटील
        ब) बॉम्बे सिटीझन कमिटी मुख्य    II.  एन. व्ही. गाडगीळ
        क) खासदार मुंबई                                         III. शंकरराव देव
        ड) खासदार पुणे                                           IV. पुरुषोत्तम दास ठाकुरदास
            अ    ब    क     ड
        १)  I             II           II             IV       
        २)    II            I            III            IV
        ३)    III          IV         I              II       
        ४)     IV          III           II             I

    २१) खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.
        अ) ते पक्के महाविदर्भवादी होते.
        ब) महाविदर्भास उपप्रांताचा दर्जा द्यावा ही - धनंजयरावांची कल्पनाही त्यांना मान्य नव्हती.
        क)त्यांना महाविदर्भ हे स्वतंत्र राज्य असावे असे सतत वाटे.
        १) बॅरिस्टर रामराव देशमुख
        २) ग. त्र्यं. माडखोलकर
        ३) डॉ. मुकुंदराव जयकर          
        ४) बापूजी अणे

    २२) पुढीलपैकी कोणती व्यक्ती संयुक्त महाराष्ट्र परिषदेशी संबंधित नव्हती ?
        १) शंकरराव देव
        २) केशवराव जेधे
        ३) दा. वि. गोखले
        ४) स. का. पाटील

    २३) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले होते ?
        १) मोरारजी देसाई
        २) यशवंतराव चव्हाण
        ३) वसंतराव नाईक
        ४) शंकरराव चव्हाण

    २४) जोड्या जुळवा :
              a)  महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन                               i)  श्रीधर वामन नाईक
              b) महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन ii)  काशिनाथ वैद्य
              c) महाराष्ट्र परिषदेचे तिसरे अधिवेशन             iii)  बॅरिस्टर श्रीनिवास शर्मा
              d) महाराष्ट्र परिषदेचे चौथे अधिवेशन              iv)  गोविंदराव नानल
            (a)   (b)   (c)    (d)
        १)  (ii)   (i)   (iv)   (iii)
        २)  (iv)   (iii)  (ii)    (i)
        ३)  (iii)   (iv)   (i)    (ii)
        ४)  (i)    (ii)   (iii)   (iv)

    २५) हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणार्‍या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव ..... होते.
        १) श्री देवीसिंह चौहान
        २) श्री व्यंकटेश भवानराव खेडगीकर
        ३) श्री बाबासाहेब परांजपे          
        ४) श्री रामराव श्रीधर देशपांडे 

    २६) ४ डिसेंबर १९४७ रोजी हैद्राबाद राज्य मुक्ती संग्रामात पुढीलपैकी कोणी निझामावर बाँब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला?
        १) देवीसिंह चौहान
        २) दिगंबर कुलकर्णी
        ३) विनायक विद्यालंकार
        ४) नारायण पवार

    २७) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती ?
        १) मुंबई
        २) ठाणे
        ३) बेळगाव
        ४) कोल्हापूर

    २८) ‘संयुक्त महाराष्ट्र सभा’ ची स्थापना कोठे झाली?
              a) मुंबई व पुणे
        b) मुंबई
              c) मराठवाडा
        d) बेळगाव
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) फक्त
              २) (b) फक्त
              ३) (b) आणि (c)
              ४) (d) फक्त

    २९) कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले?
        १) महाराष्ट्र
        २) आंध्र प्रदेश
        ३) कर्नाटक
        ४) गुजरात

    ३०) संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते?
        १) नवा काळ
        २) मौज
        ३) दै. मराठा
        ४) प्रभात

    ३१) नागपूर कराराच्या कोणत्या तरतुदी आहेत?
              a) विकास व प्रशासनासाठी महाराष्ट्राचे तीन विभाग -
                   i)   महाविदर्भ मराठवाडा राज्याचा उर्वरित भाग,
          ii)   मराठवाडा,
                  iii)  राज्याचा उर्वरित भाग.                                                              
              b) मराठवाड्याच्या विकासाकडे विशेष लक्ष.
              c) उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ मुंबई येथे तर दुसरे पीठ नागपूर येथे
              d) नागपूर येथे विधिमंडळाचे एक अधिवेशन राहील.
        पर्यायी उत्तरे -
        १) फक्त (a), (b), (c)
        २) फक्त (a), (c), (d)
        ३) फक्त (c), (d), (b)
        ४) वरीलपैकी सर्व

    ३२) संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी दरम्यान झालेल्या कोणत्या अहवालाचा संयुक्त महाराष्ट्रवादी नेत्यांनी निषेध केला?
        १) अकोला करार
        २) दार आयोग
        ३) जे. व्ही. पी. समिती
        ४) नागपूर करार

    ३३) खालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग घेतला?
        १) संयुक्त महाराष्ट्र सभा
        २) संयुक्त महाराष्ट्र परिषद
        ३) संयुक्त महाराष्ट्र समिती
        ४) महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

    ३४) ‘बेळगांव साहित्य संमेलनांत‘ कोणत्या समितीची स्थापना झाली होती
        १) संयुक्त महाराष्ट्र समिती
        २) स्वतंत्र महाराष्ट्र परिषद
        ३) महाराष्ट्र एकीकरण परिषद
        ४) मराठी साहित्य संमेलन समिती

    ३५) योग्य कथन ओळखा.
        ) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना एस. एम. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे ६ फेब्रुवारी, १९५६ रोजी झाली.
        ब.) भारतीय जनसंध, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि हिंदू महासभा हे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सामील झाले होते.
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ
        २) फक्त ब
        ३) अ आणि ब दोन्ही
        ४) अ आणि ब दोन्ही नाही

    ३६) खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?
        १) हिंदू महासभा
        २) शेड्यूल्ड कास्टस फेडरेशन
        ३) महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष
        ४) जनसंघ

    ३७) सर्व मराठी क्षेत्रे एका राज्यात जोडावयास हवे या तत्त्वांच्या बाजूने खालीलपैकी कोण होते व कोण विरोधात?
        a) मराठी साहित्य संमेलन
              b) संयुक्त महाराष्ट्र परिषद
        c) संयुक्त महाराष्ट्र समिती       
              d) डर (कमिशन) आयोग
        e) जे. व्ही. पी. समिती
        f) नागपूर करार  
              g) राज्यांच्या पुनर्निधारणासाठीचा फैजल अली आयोग.
              १) (a),(b), (c)  तत्त्वांच्या बाजूने आणि  (d),  (e),  (f) , (g) विरोधात.
        २) (a),(b), (d)  तत्त्वांच्या बाजूने आणि  (c),  (e),  (f) , (g) विरोधात.
        ३) (a),(b), (c),  (e)  तत्त्वांच्या बाजूने आणि  (d),  (f), (g) विरोधात.
        ४) (a),(b), (c), (f)  तत्त्वांच्या बाजूने आणि  (d),  (e),  (g) विरोधात.

    ३८) पुढील दोन विधानांवर विचार करा.
        अ)आनंद वाघमारे यांनी निजामाविरुद्ध मराठवाड्यात जनजागृती औरंगाबाद येथून ’मराठवाडा’ साप्ताहिक प्रसिद्ध करून केली.
        ब) हैद्राबाद स्वातंत्र्य आंदोलनाची सुरुवात हैद्राबाद शहरातील वंदे मातरम् सत्याग्रहाने/चळवळीने झाली.
        आता सांगा की,
        १) विधान (अ) बरोबर आहे परंतु (ब) चूक आहे.
        २) विधान (ब) बरोबर आहे परंतु (अ) चूक आहे.
        ३) (अ) व (ब) दोन्ही विधाने चूक आहेत.
        ४) (अ) व (ब) दोन्ही विधाने बरोबर आहेत.

    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१६९)
    संयुक्त महाराष्ट्र चळवळ
     
    १-२
    २-४
    ३-२
    ४-४
    ५-१
    ६-३
    ७-२
    ८-१
    ९-१
    १०-३
    ११-२
    १२-४
    १३-३
    १४-४
    १५-४
    १६-३
    १७-१
    १८-३
    १९-३
    २०-३
    २१-४
    २२-४
    २३-२
    २४-२
    २५-२
    २६-४
    २७-३
    २८-२
    २९-२
    ३०-३
    ३१-४
    ३२-२
    ३३-३
    ३४-१
    ३५-२
    ३६-३
    ३७-४
    ३८-३

Share this story

Total Shares : 19 Total Views : 9795