स्वातंत्र्य चळवळ / प्रश्नमंजुषा (१६७)
- 24 May 2021
- Posted By : study circle
- 11993 Views
- 11 Shares
स्वातंत्र्य चळवळ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”गांधी युगातील भारतीय स्वातंत्र्य चळवळी” वर अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत. याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास विभाग
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
१.७ गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ -
गांधीजींचे नेतृत्त्व आणि प्रतिकाराचे तत्त्व, गांधीजींच्या लोकचळवळी, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, फैजपूर येथील राष्ट्रीय सभेचे अधिवेशन १९३६, वैयक्तिक सत्याग्रह, चलेजाव चळवळ.
संयुक्त पक्ष (युनियनिस्ट पार्टी) व कृषक प्रजा पार्टी, राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग, संस्थानातील जनतेच्या चळवळी.
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
भारतीय स्वातंत्र्य चळवळ व सत्याग्रह
१) महात्मा गांधीजींची प्रारंभीची आंदोलने
२) खिलाफत चळवळ
३) असहकार चळवळ (१९२०-२२)
४) सविनय कायदेभंग चळवळ (१९३०-३४)
५) वैयक्तिक सत्याग्रह (१९४०)
६) चलेजाव चळवळ (१९४२-४५)
७) राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग
८) संस्थानातील जनतेच्या चळवळी (१९२७-)
९) स्वातंत्र्याकडे वाटचाल
१) घटनांचा कालानुक्रमाने क्रम लावा.
a) स्वदेशी चळवळ
b) खिलाफत चळवळ
c) सविनय कायदेभंग चळवळ
d) चलेजाव चळवळ
१) (b), (a), (d), (c)
२) (b), (c), (d), (a)
३) (d), (b), (a), (c)
४) (a), (b), (c), (d)
२) १९१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेहून परत आल्यावर गांधी म्हणजे स्थानिक प्रश्न हाती घेऊन त्याबद्दल ठोस पाऊले उचलणारा अशी त्यांची ख्याती पसरली होती. पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले?
a) फक्त चंपारण निळीच्या शेतकर्यांचे प्रश्न
b) फक्त अहमदाबाद मधील कापड गिरण्यांच्या कामगारांचे प्रश्न.
c) फक्त बार्डोली शेतकर्यांचे प्रश्न
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b)
२) (b) आणि (c)
३) (a) आणि (c)
४) सर्व (a),(b),(c)
३) उगवती पिढी केवळ निवेदने इत्यादींनी समाधानी होणार नाही..... दहशतवाद संपविण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे व तो म्हणजे सत्याग्रह असे २५ फेब्रुवारी १९१९ रोजी गांधीजींनी पत्राद्वारे कोणाला कळविले?
१) जवाहरलाल नेहरूंना
२) मोतीलाल नेहरूंना
३) दिनशा वाच्छांना
४) स्वाती श्रद्धानंदांना
४) साबरमती आश्रम पूर्वी अहमदाबाद जवळील ...... येथे होता. तो पूर्वीच्या जागेवरून प्लेगची साथ आल्यामुळे हालविण्यात आला.
१) कोचार्ब
२) आनंदपुरा
३) जालीसाना
४) दलोद
५) इंग्रजी सत्तेविरुद्ध महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील अहिंसक आंदोलनापैकी जनमानसाला गतिशील करणारी सगळ्यात प्रभावी चळवळ तुमच्या मते कोणती ?
१) चलेजाव चळवळ
२) स्वदेशीचा वापर व परदेशी मालावर बहिष्कार चळवळ
३) सविनय कायदेभंग चळवळ
४) उपोषण
६) महात्मा गांधी म्हणाले की त्यांच्या जीवनातील बर्याच गोष्टींचे श्रेय हे अन टू दिस लास्ट या पुस्तकातील विचारांना आहे आणि या पुस्तकाने त्यांचे जीवन बदलून टाकले. महात्मा गांधींचे जीवन बदलून टाकणारा खालीलपैकी कोणता संदेश या पुस्तकातील आहे?
१) दीन दुबळे आणि गरिबांचा उद्धार करणे हे शिक्षित माणसाची जबाबदारी आहे.
२) एखाद्या व्यक्तीचे भलेपण हे सर्वांच्या भलेपणातच असते.
३) प्रतिष्ठित जीवनासाठी ब्रह्मचर्य आणि अध्यात्म्याची आवड या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे.
४) वरील सर्व
७) गांधीजींनी मद्रासमध्ये सहा सभा घेतल्या होत्या. त्यांत ........ ना उद्देशून बोलताना गांधीनी त्यांना हातात झाडू व बादली घेऊन मद्रासमधील हरिजन वस्त्या स्वच्छ करण्यास सांगितले.
१) विद्यार्थी
२) स्त्रिया
३) पुरुष
४) हरिजन
८) पुढील वाक्यांमध्ये कोणत्या संघटनेचा आणि व्यक्तीचा उल्लेख केला आहे?
त्यांनी ती संघटना लोकशाही व जनसामान्यांची संघटना म्हणून उभी केली. त्यांच्यामुळे शेतकरी व नंतर औद्योगिक कामगारही या संघटनेत आले. कामगार वैयक्तिक तत्त्वावर आले आणि ते वेगळ्या अशा संघटित स्वरूपात आले नाहीत.
१) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, गांधीजी
२) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, लोकमान्य टिळक
३) भारतीय साम्यवादी पक्ष, मा. ना. रॉय
४) समाजवादी आणि गो. कृ. गोखले
९) गांधीजींची सत्याग्रह ही संकल्पना ......... व ........... वर आधारित आहे.
१) सत्य व अहिंसा
२) सत्य व उत्सुकता
३) अहिंसा व प्रामाणिकपणा
४) सत्यपणा व पारदर्शकता
१०) म. गांधीजींच्या मते ...... हा निधर्मी व समानतेचा संदेश देणारा आहे.
१) सर्वोदय
२) ग्राम स्वराज्य
३) अहिंसा
४) वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही
११) भारताला बलवान बनविण्याचा कार्यक्रम समजावून सांगताना गांधी हाताची पाच बोटे दाखवीत असत. त्यांच्या मते प्रत्येक बोट कोणते गोष्ट दर्शवीत असे?
१) सूतकताई, अस्पृश्यता निवारण, मितपान (दारू किंवा अफू यांचे सेवन न करणे), हिंदू-मुस्लीम स्नेहभाव आणि स्त्रियांकरिता समानता.
२) स्वच्छता, अस्पृश्यता निवारण, मितपान, हिंदू-मुस्लीम स्नेहभाव आणि स्त्रियांकरिता समानता.
३) सूतकताई, सर्वांकरिता शिक्षण, अस्पृश्यता निवारण, मितपान आणि हिंदू-मुस्लीम स्नेहभाव.
४) मूलभूत शिक्षण, शेती, अस्पृश्यता निवारण, मितपान आणि स्त्रियांकरिता समानता.
महात्मा गांधीजींची प्रारंभीची आंदोलने
१) महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनांचा कालक्रम लावा.
१) अहमदाबाद, चंपारण, खेडा
२) खेडा, अहमदाबाद, चंपारण
३) चंपारण, अहमदाबाद, खेडा
४) चंपारण, खेडा, अहमदाबाद
२) घटनांचा कालानुक्रमाने क्रम लावा.
a) स्वदेशी चळवळ
b) खिलाफत चळवळ
c) सविनय कायदेभंग चळवळ
d) चलेजाव चळवळ
१) (b), (a), (d), (c)
२) (b), (c), (d), (a)
३) (d), (b), (a), (c)
४) (a), (b), (c), (d)
३) महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला ......
१) असहकार चळवळीच्या वेळी
२) जालियनवाला बाग क्रूरतापूर्ण घडलेल्या घटनेविरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी
३) खिलाफत चळवळीच्या वेळी
४) रौलेट अॅक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी
४) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) चंपारण्य नीळ सत्याग्रह - १९१७
ब) खेडा साराबंदी चळवळ - १९१८
क) जालियनवाला बाग हत्याकांड - १९१९
ड) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२२
वरील पयार्यांपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत?
१) फक्त (अ) आणि (ब)
२) फक्त (ब) आणि (क)
३) फक्त (अ) आणि (क)
४) वरील सर्व
खिलाफत चळवळ
१) अमृतसर येथे झालेल्या अखिल भारतीय खिलाफत परिषदेत व्हाईसरायकडे एक प्रतिनिधीमंडळ पाठविण्याचे ठरले. त्यांनी १९ जानेवारी १९२० रोजी व्हॉईसरॉयना देण्याच्या पत्रावर सुप्रसिद्ध हिंदू राजकारणी पुढार्यांनी सह्या केल्या होत्या. पुढीलपैकी ते पुढारी कोण होते?
a) गांधीजी
b) स्वामी श्रद्धानंद
c) पंडित मोतीलाल नेहरू
d) पंडित मदनमोहन मालवीय
e) पंडित जवाहरलाल नेहरू
पर्यायी उत्तरे :
१) (a), (c), (d), (e) फक्त
२) (b), (c), (d), (e) फक्त
३) (a), (b), (c), (d) आणि (e)
४) (a), (b), (c) आणि (d) फक्त
२) १९२१ साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कोठे भरले होते ?
१) कराची
२) दिल्ली
३) लाहोर
४) सिंध
३) महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीस पाठिंबा दिला, कारण ..........
a) त्यांना या चळवळीतून हिंदू-मुस्लीम ऐक्य साधायचे होते म्हणून
b) त्यांना या चळवळीचा उपयोग देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून घेता येईल असे वाटले म्हणून
c) त्यांना इस्लाम धर्माचा प्रचार करायचा होता म्हणून
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b) फक्त
२) (a), (b), (c)
३) (a), (c) फक्त
४) (b), (c) फक्त
४) खिलाफत आंदोलन संबंधी खालीलपैकी कोणते वक्तव्य चूक आहे ?
१) भारतीय मुस्लीम ब्रिटिश शासनामुळे त्रासात होते कारण प्रथम विश्व युद्धानंतर, ब्रिटन आणि फ्रान्स याने ऑट्टोमन, तुर्की (ज्यात अनेक मुस्लीम पवित्र स्थळे शामिल होती) वर आपला अधिकार केला आणि खिलाफत आंदोलनाला दाबून टाकले.
२) महात्मा गांधीना ऑल इंडिया खिलाफत कॉन्फरन्स १९५९ येथील अध्यक्ष निवडले गेले.
३) केंद्रीय खिलाफत कमिटीने गांधीजी यांचा अहिंसा आणि असहयोग हा विचार निवडला.
४) खिलाफत आंदोलन वर्ष १९२२ मध्ये संपवले गेले.
५) कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली ?
१) इंग्लंड
२) जर्मनी
३) ब्रह्मदेश
४) तुर्कस्थान
६) मध्यवर्ती खिलाफत समितींच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना ...... यांचा पाठिंबा होता.
१) टिळक
२) गांधीजी
३) अली बंधू
४) मोतीलाल नेहरू
असहकार चळवळ (१९२०-२२)
१) डिसेंबर १९२०, च्या नागपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात असहकार चळवळीबाबत अंतिम निर्णय कोणता झाला होता?
१) ठराव मांडला गेला नाही.
२) ठरावावर चर्चाच झाली नाही.
३) ठराव मंजूर झाला नाही.
४) ठराव बहुमताने मंजूर झाला.
२) राष्ट्रीय सभेच्या सन १९२० मधील कलकत्ता येथील अधिवेशनात असहकाराचा जाहीरनामा मंजूर केला. या अधिवेशनाचे अध्यक्ष ........ हे होते.
१) डॉ. अॅनी बेझंट
२) पं. मदनमोहन मालवीय
३) लाला लजपतराय
४) बद्रुद्दीन तय्यबजी
३) असहकार चळवळीच्या काळात सरकारने दडपशाहीचे धोरण अंगीकारले होते.
पुढे दिलेल्या व्यक्ती व त्यांच्याविरुद्ध दडपशाहीने केलेली कारवाई यांच्या जोड्या जुळवा.
a) सी. आर. दास i) यांना कठोर तुरुंगवासाची शिक्षा दिली.
b) लाला लजपत राय ii) यांना १८ महिन्याच्या कठोर तुरुंगवासाची शिक्षा दिली.
c) पंडित जवाहरलाल नेहरू iii) यांना राजद्रोहकारक भाषण कायद्याखाली दोषी ठरवून तुरुंगात पाठविले.
d) जे. एम. सेनगुप्ता iv) यांना दोषी ठरवून सहा महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षा दिली.
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (ii) (i) (iv) (iii)
३) (iv) (iii) (ii) (i)
४) (iii) (iv) (i) (ii)
४) गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?
१) गांधीजींना अटक
२) काँग्रेसचा विरोध
३) चौरी-चौरा घटना
४) पहिले महायुद्ध
५) चौरी-चौरा घटनेने ...... हे आंदोलन संपुष्टात आले.
१) रौलेट विरोधी सत्याग्रह
२) छोडो भारत
३) असहकार
४) सविनय कायदेभंग
६) चौरीचौरा घटनेनंतर ...... ही चळवळ संपुष्टात आली.
१) सायमन विरोधी सत्याग्रह
२) सविनय कायदेभंग चळवळ
३) असहकार चळवळ
४) भारत छोडो चळवळ
७) कोणत्या चळवळीच्या अपयशानंतर स्वराज पार्टीची स्थापना झाली ?
१) असहकार चळवळ
२) छोडो भारत चळवळ
३) सविनय कायदेभंग चळवळ
४) स्वदेशी चळवळ
८) खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता?
१) शाळांवरील बहिष्कार
२) कर न भरणे
३) न्यायालयांवरील बहिष्कार
४) परदेशी कापडांवरील बहिष्कार
९) १९२० च्या असहकार चळवळीला काय प्रेरक होते?
a) पहिल्या महायुद्धाने वाढलेली महागाई
b) सरकारच्या कायद्याने व्यक्ती व व्यक्तिस्वातंत्र्यावर घातलेल्या मर्यादा
c) ब्रिटिशांच्या विरोधातील असंतोष
d) खिलाफत प्रश्नामुळे ब्रिटिश विरोधी मुस्लीम समाज
१) (a), (b)
२) (b), (c)
३) (a), (b), (c)
४) (a), (b), (c), (d)
१०) भारताच्या झेंड्यात हळू हळू विकास होत गेला. ऑगस्ट ७, १९०६ रोजी कलकत्ता मधील ग्रीन पार्क येथे पारसी बागान चौकात सर्वप्रथम झेंडा फडकवला गेला. सन १९२१ मध्ये काँग्रेस समितीच्या बैठकीत महात्मा गांधी पुढे झेंडा आणला गेला. गांधीजींनी त्यात कोणत्या रंगाचा पट्टा समाविष्ट करण्यास सुचविले?
१) लाल
२) केशरी
३) पांढरा
४) हिरवा
११) जानकीदेवी बजाज यांनी ३ एप्रिल १९२१ मध्ये देवळी येथे ...... वर भाषण दिले.
१) सतीप्रथा व भ्रूणहत्या
२) असहकार व स्वदेशी
३) स्त्री शिक्षण व विकास
४) हुंडापद्धती व स्त्रीदमन
१२) गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?
१) गांधीजींना अटक
२) काँग्रेसचा विरोध
३) चौरी-चौरा घटना
४) पहिले महायुद्ध
१३) गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा घटनेत २२ पोलीस मरण पावल्यावर काय झाले नाही?
१) गांधीजींना धक्का बसला. त्यांनी चळवळ थांबविली.
२) आम जनता व काँग्रेस पुढार्यांना गांधीजींच्या निर्णयाचा राग आला.
३) इंग्रजांनी गांधीजींना शासन विरोधी कारवायांस्तव अटक केली.
४) वरीलपैकी एकही नाही.
१४) असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस दोन भागात विभागली गेली.
a) एक गट ज्यात वल्लभभाई पटेल, सी राजगोपालाचारी आणि राजेंद्र प्रसाद अग्रगणी होते असे समजत होता की काँग्रेसने निवडणुकीत भाग घ्यावा व विधिमंडळात आतून हल्ला चढवावा.
b) ज्या गटाचे पुढारी सी. आर. दास. मोतीलाल नेहरू व विठ्ठलभाई पटेल होते तो गट निवडणुकीच्या विरोधात होता.
c) काँग्रेसच्या १९२२ च्या पटना येथील सभेत, ज्या सभेचे अध्यक्षपद सी. आर. दास यांच्याकडे होते, निवडणुकीचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला.
वरील तीन पैकी कोणते विधान बरोबर आहे ?
पर्यायी उत्तरे :
१) (a)
२) (b)
३) (c)
४) एकही नाही
१५) असहकार चळवळीच्या तीन उद्देशांवर खिलाफत कमिटी व काँग्रेस यांचे एकमत झाले. हे तीन उद्देश कोणते?
१) खिलाफत चळवळीवर समाधानकारक तोडगा मिळविणे, पंजाबमध्ये केलेल्या चुका सुधारणे व स्वराज्य मिळविणे.
२) बंगाल प्रश्नावर समाधानकारक तोडगा मिळविणे, पंजाबमध्ये केलेल्या चुका सुधारणे व स्वराज्य मिळविणे.
३) अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर तोडगा मिळविणे, जालियनवाला बागेत झालेल्या चुका सुधारणे व स्वराज्य मिळविणे.
४) खिलाफत चळवळीवर तोडगा मिळविणे, बंगालमधील चूक सुधारणे व स्वराज्य मिळविणे.
१६) फेब्रुवारी १९२२ च्या चौरीचौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ तहकूब केली. या घटनेचे वर्णन नॅशनल कॅलॅमिटी असे कोणी केले?
१) पंडित मोतीलाल नेहरू
२) लाला लजपत राय
३) सुभाषचंद्र बोस
४) पंडित जवाहरलाल नेहरू
१७) म. गांधींनी १९२० मध्ये असहकार आंदोलनाचा कार्यक्रम खालील प्रमाणे जाहीर केला. त्या संबंधात पुढीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
a) सरकारी समारंभावर बहिष्कार
b) परकीय मालावर बहिष्कार
c) न्यायालयावर बहिष्कार
d) मेसापोटेमियात नोकरीसाठी जाण्यास नकार
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (a) आणि (b) फक्त
३) (a), (b) आणि (c) फक्त
४) (a), (b), (c) आणि (d)
१८) असहकार चळवळी चा ठराव पास झालेल्या १९२० च्या राष्ट्रीय सभे च्या (काँग्रेस) नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
१) लाला लजपत राय
२) सी. विजयाराघव चारियार
३) सी. आर. दास
४) मोतीलाल नेहरू
१९) पुढील दोनपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
a) आंतरदेशीय स्थलांतर अधिनियम १८५९ प्रमाणे आसाममधील चहा मळ्यातील कामगारांना मळे सोडून बिना परवानगी जाता यावयाचे नाही व अशी परवानगी क्वचितच मिळे.
b) गांधीजींच्या असहकार चळवळीवरून त्यांनी सरकारला झुगारले. मळे सोडले व विनासायास घरी पोहोचले.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
सविनय कायदेभंग चळवळ (१९३०-३४)
१) परदेशी कापडावर बहिष्कार चालू असताना, परदेशी कापडाने भरलेल्या मोटारीपुढे तिरंग्यासह ...... यांनी बलिदान केले.
१) श्रीकृष्ण सारडा
२) जगन्नाथ शिंदे
३) कुर्बान हुसेन
४) बाबू गेनू
२) अयोग्य जोडी ओळखा -
१) बापुजी अणे - धारासना सत्याग्रह
२) डॉ. बापुसाहेब आंबेडकर - महाड सत्याग्रह
३) सेनापती बापट - मुळशी सत्याग्रह
४) साने गुरुजी - पंढरपूरचा सत्याग्रह
३) पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा.
१) मल्लप्पा धनशेटी
२) जगन्नाथ शिंदे
३) अब्दुल रसूल
४) सिद्धाप्पा कांबळी
४) रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी २५ सप्टेंबर १९३० ला प्रसिद्ध जंगल सत्याग्रह झाला ?
१) अलिबाग
२) चिरनेर
३) महाड
४) रोहा
५) प्रसिद्ध दांडी यात्रा कुठून सुरू झाली ?
१) राजकोट
२) अहमदाबाद (साबरमती)
३) सुरत
४) वर्धा
६) ६ एप्रिल १९३० रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याचवेळी ६ एप्रिल १९३० ला महाराष्ट्रात ...... या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला.
१) वडाळा
२) वाडीबंदर
३) विलेपार्ले
४) अंधेरी
७) ..... येथील सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात “कामगार व शेतकरी हे राष्ट्रीय सभेचे हात व पाय आहेत” अशा घोषणा दिल्या जात असत.
१) चेन्नई
२) मुंबई
३) कोलकाता
४) दिल्ली
८) महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह ...... येथे झाला.
१) संगमनेर, रत्नागिरी, मालवण
२) वडाळा, मालवण, शिरोडा
३) शिरोडा, संगमनेर, ठाणे
४) कल्याण, मालवण, शिरोडा
९) मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते?
१) मीठ कायदा खारीज करणे
२) सर्वसामान्यांना आर्थिक विवंचनेतून सोडविणे
३) पूर्ण स्वराज्य
४) वरीलपैकी काहीही नाही
१०) पुणे, ठाणे, धारवाड व मुंबई येथे पसरलेला दारूबंदी कार्यक्रम का आवरता घेण्यात आला ?
१) कारण त्या कार्यक्रमात गांधीजी आणि काँग्रेसचा सहभाग नव्हता.
२) कारण त्यात भारतीय मुसलमान सहभागी झाले नाहीत.
३) कारण गांधीजींना तुरुंगात टाकण्यात आले.
४) कारण आकारलेला दंड अधिक होता.
११) भारतीय राष्ट्रवाद्यांचा मिठावरील कराला विरोध का होता?
a) मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लावणे अयोग्य होते.
b) गरिबात गरीब लोकांनाही हा कर भरावा लागे.
c) यामुळे लोकांनी मिठाचे सेवन कमी केले असते व त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला असावा.
d) कायदेमंडळातील भारतीय सदस्यांनी त्याविरुद्ध मते मांडली होती.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (a) व (b)
३) केवळ (a), (b) व (c)
४) (a), (b), (c), (d) सर्व
१२) कालानुक्रमे रचना करा.
a) मुस्लीम लीगने नेहरू रिपोर्टपेक्षा जिनांच्या चौदा कलमी कार्यक्रमास पसंती दिली.
b) काँग्रेसने सरकारला एका वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याची मुदत दिली.
c) लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली.
d) गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरु केला.
१) (a), (c), (d)
२) (d), (b), (a), (c)
३) (b), (a), (c), (d)
४) (a), (b), (c), (d)
१३) बापूजी अणे यांनी पुसदमध्ये १० जुलै १९३० रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शविण्यास काय केले?
१) त्यांनी मीठ तयार केले व सविनय कायदेभंग चळवळीत सहभागी झाले.
२) त्यांनी मिठाची पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या.
३) त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला.
४) त्यांनी पाश्चात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली.
१४) महाराष्ट्र सविनय कायदेभंग समितीने ...... जुलमी कायद्याच्या विरोधात सत्याग्रह करण्याचे ठरविले.
१) शेतीच्या
२) शस्त्रास्त्रांच्या
३) जंगलांच्या
४) मिठाच्या
१५) मन्नू गोंड आणि चैतू कोइकू यांच्या नेतृत्वाखाली ....... येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला.
१) बेतुल
२) सिद्दापूर
३) अंकोला
४) कासारगोड
१६) सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते ?
१) कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे.
२) सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे.
३) गोलमेज परिषदेत काँग्रेससाठी स्थान मिळवणे.
४) वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे.
१७) खालील दोन विधानांपैकी कोणती अयोग्य आहेत ?
a) अंबाबाई जिने उडुपी येथे परदेशी कपड्यांवर व मद्याच्या दुकानांवर हल्ला केला वास्तविक महाराष्ट्रातील होत्या.
b) महात्मा गांधी प्रथमपासूनच मीठ सत्याग्रहात स्त्रियांच्या सहभागास पूर्णपणे राजी होते.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) न (a) न (b)
४) (a) व (b) दोन्ही
१८) सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते ?
१) जमीनदार
२) राष्ट्रीय नेते
३) गिरणी कामगार
४) व्यापारी
१९) मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते?
१) मीठ कायदा खारीज करणे
२) सर्वसामान्यांना आर्थिक विवंचनेतून सोडविणे
३) पूर्ण स्वराज्य
४) वरीलपैकी काहीही नाही
२०) सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
अ) खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग.
ब) महात्मा गांधीजींनी कैसर-इ-हिंद पदवी सरकारला परत केली.
क) धारासणा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले.
ड) स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि क विधाने बरोबर आहेत.
२) ब, क आणि ड विधाने बरोबर आहेत.
३) अ, क आणि ड विधाने बरोबर आहेत.
४) ब आणि ड विधाने बरोबर आहेत.
२१) सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते ?
१) कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे.
२) सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे.
३) गोलमेज परिषदेत काँग्रेससाठी स्थान मिळवणे.
४) वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे.
२२) ..... येथील सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात “कामगार व शेतकरी हे राष्ट्रीय सभेचे हात व पाय आहेत” अशा घोषणा दिल्या जात असत.
१) चेन्नई
२) मुंबई
३) कोलकाता
४) दिल्ली
२३) खालील विधान पुढीलपैकी कोणत्या चळवळीशी निगडीत असावे ?
“युवकांचे हे पहिलेच क्रांतिकारी आंदोलन होते. जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस ह्यानंतर नेते म्हणून पुढे आले. कारण त्यांनीच ठीक ठिकाणी फिरून युवकांना जागृत केले होते.”
१) धरासना आंदोलन
२) सायमन विरोधी आंदोलन
३) सविनय कायदेभंग
४) चले जाव आंदोलन/भारत छोडो
२४) सविनय कायदेभंग चळवळी बद्दल पुढील विधानात कोणते/कोणती विधान/विधाने खरे/खरी नाहीत ?
१) खान अब्दुल गफार खान ने लाल शर्ट वाल्या स्वयंसेवकांचे संघटन करुन सरकार विरुद्ध एक तीव्र चळवळ अहिंसक मार्गाने सुरु केली, त्यात कर न देणे ही अंतर्भूत होते.
२) नागालँडची राणी गेडीन्ल्यूने वयाच्या १३ व्या वर्षी बंड पुकारले आणि १५ वर्षाची कारावासाची शिक्षा भोगली.
३) सविनय कायदेभंग चळवळीमुळे काँग्रेस संघटना १९२१-२२ पेक्षा ही ग्रामीण विभागात बलवान बनली होती.
४) व्यापारी समूहाने सरकारला मदत केली.
२५) १० जुलै १९३० रोजी पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व .......... यांनी केले.
१) राजुताई कदम
२) लालजी पेंडसे
३) बापूजी अणे
४) श्रीनिवास देसाई
२६) महात्मा गांधींनी १९३२ साली मरेपर्यंत उपोषणाला सुरुवात केली कारण -
१) गोलमेज परिषदा भारतीय राजकीय आकांक्षा पूर्ण करू शकल्या नाहीत.
२) काँग्रेस आणि मुस्लीम लीगमध्ये टोकाचे मतभेद होते.
३) रॅमसे मॅकडोनाल्डने जातीय निवाडा जाहीर केला.
४) यापैकी नाही
२७) खान अब्दुल गफार खान ज्यांना बादशहा खान असेही म्हटले जाई, बाबत काय खरे नाही ?
a) ते नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्सचे पशूतून लीडर होते.
b) ते खुदाई खिदमतगार चे संस्थापक होते.
c) त्यांनी भारताच्या फाळणीबाबत काँग्रेसला दोष दिला.
पर्यायी उत्तरे :
१) (a)
२) (b)
३) (c)
४) वरील एकही नाही
२८) मीठ कायद्याबाबतच्या पुढील दोन विधानापैकी कोणते चुकीचे आहे ?
a) या कायद्याप्रमाणे राज्याला एकाधिकार होता, जरी केवळ मीठ तयार करण्यावर मीठ विकण्यावर नव्हे.
b) महात्मा गांधी व इतरांना वाटायचे की मिठावर कर लावणे अनैतिक आहे कारण मीठ आपल्या जेवणाचा अविभाज्य घटक आहे.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) न (a) आणि न (b)
४) दोन्ही (a) व (b)
२९) पुढीलपैकी कोणी दांडी संचलनाची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचलनाशी केली होती?
१) जवाहरलाल नेहरू
२) सुभाषचंद्र बोस
३) इंग्लिश पत्रकार
४) फ्रेंच पत्रकार
३०) स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला?
१) २६ जानेवारी, १९४९
२) २६ जानेवारी, १९३०
३) २६ जानेवारी, १९३१
४) २४ जानेवारी, १९३०
३१) कोणत्या शहरात जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वातंत्र्य ही घोषणा केली ?
१) चेन्नई
२) सुरत
३) हैदराबाद
४) लाहौर
३२) अफगाणिस्तान आणि तुर्की मधून सहायता मिळवून भारतातील ब्रिटिश शासनाला नेस्तनाबूद करण्यासाठी कोणते आंदोलन केले गेले ?
१) खेडा अप राईजिंग
२) रेशमी रुमाल आंदोलन
३) पोळी (रोटी) आणि कमल आंदोलन
४) गद्दर आंदोलन
३३) दांडी यात्रेनंतर महात्मा गांधीना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात ......... येथे जंगल सत्याग्रह केला गेला.
१) सातारा जिल्ह्यात बिळाशी
२) पुणे जिल्ह्यात मुळशी
३) रत्नागिरी जिल्ह्यात केळशी
४) वरीलपैकी एकही नाही
३४) पुढील दोनपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
a) गांधीजींनी आपल्या मीठाच्या सत्याग्रहासाठी साबरमतीतील आपल्या आश्रमापासून गुजरात समुद्रकिनार्यावरील दांडीपर्यंत यात्रा काढली - ते अंतर २४० कि.मी. होते.
b) गांधीजींच्या अनुयायांनी हे अंतर २४ दिवसात पूर्ण केले.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
३५) पुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लिहा :
अ) समाजवादी पक्षाची स्थापना
ब) काँग्रेसचे पाटणा अधिवेशन
क) श्वेतपत्रिका
ड) तिसरी गोलमेज परिषद
१) क, ब, अ, ड
२) ड, क, ब, अ
३) अ, ड, क, ब
ड) ब, अ, ड, क
वैयक्तिक सत्याग्रह (१९४०)
१) महात्मा गांधीनी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून खालीलपैकी कोणाची निवड केली ?
१) काका कालेलकर
२) कर्मवीर आणे
३) गोपाळकृष्ण गोखले
४) विनोबा भावे
२) वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता?
१) दुसर्या महायुद्धात सामील होण्याचा
२) दुसर्या महायुद्धात सामील न होण्याचा
३) परदेशी वस्तूंचा बहिष्कार
४) उपरोक्त कशाचाही नाही
३) गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मागे का घेतला?
१) कारण शासनाने भारताला ऑगस्ट ऑफर दिली.
२) कारण शासनाने पूर्ण स्वराज्याची मागणी पूर्ण केली.
३) कारण युद्ध चालू होते व जपान भारताच्या सीमेवर येऊन ठेवला होता.
४) वरील कोणतेही कारण योग्य नाही.
चलेजाव चळवळ (१९४२-४५)
१) चलेजाव चळवळीत विदर्भातून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी महत्त्वाची भूमिका बजावली?
a) मदनलाल बागडी
b) विनायक दांडेकर
c) भास्करराव दूर्वे
d) डॉ. उत्तमराव पाटील
पर्यायी उत्तरे -
१) (a) आणि (b)
२) (c) आणि (d)
३) (c) फक्त
४) (d) फक्त
२) शिकागो रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक..... यांनी काँग्रेस रेडिओ करिता उपकरणे आणि तंत्रज्ञ पुरविले.
१) चंद्रकांत बाबूभाई झवेरी
२) विठ्ठलदास के. झवेरी
३) डॉ. राम मनोहर लोहीया
४) नानक मोटवानी
३) पुढीलपैकी कोणत्या स्त्रियांनी चिमुर येथे बळी पडलेल्यांना भेट दिली (१९४२) ?
a) डॉ. (सौ.) वालझकर
b) विमला अभ्यंकर
c) रमाबाई तांबे
d) देवस्कर
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (d) फक्त
२) (b) आणि (c) फक्त
३) (b) आणि (d) फक्त
४) (a), (b), (c) आणि (d)
४) १९४२ च्या ”चलेजाव आंदोलनाचे” महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते?
१) नागपूर
२) पुणे
३) मुंबई
४) रत्नागिरी
५) खालील दोन विधानांचा विचार करा.
a) सेवाग्राम आश्रमाचे प्रोफेसर भनसाली दि. १ नोव्हेंबर १९४२ रोजी दिल्लीला गेले व बापूजी अणेंना भेटले.
b) त्यांना चिमूर येथे अत्याचार झालेल्या स्त्रियांकरता न्याय हवा होता.
आता सांगा की -
१) दोन्ही विधाने खरी आहेत व (b) हे (a) चे कारण आहे.
२) दोन्ही विधाने खरी आहेत परंतु (b) हे (a) चे कारण नाही.
३) विधान (a) बरोबर आहे परंतु (b) नाही.
४) दोन्हीतील कोणतेच विधान बरोबर नाही
६) विद्यार्थ्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबला. त्यांनी सरकारी इमारतींवर हल्ला केला. जी. आय. पी. व बी. बी. सी. आय. च्या रेल्वे रुळांवर परिणाम झाला. माटुंगा स्टेशनवर हल्ला केला व परळ येथे जन आंदोलन केले. या घटना खालीलपैकी कोणत्या आंदोलनाच्या होत्या?
१) असहकार आंदोलन
२) सविनय कायदेभंग
३) चले जाव आंदोलन
४) वरील तिन्ही
७) रावसाहेब पेशवे, भाऊसाहेब लिमये, गणेश केशव लिमये, भाऊराव लिमये, भाऊसाहेब काशिनाथ खाजगीवाले, राजेसाहेब, विठ्ठल छत्रे आणि बळवंत जगदंब ही नावे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने घेतली होती?
१) पुण्याचे सदाशिव नीळकंठ जोशी
२) अहमदनगरचे जयसिंग रामचंद्र पवार
३) नाशिकचे दामोदर भिडे
४) पुण्याचे केशवराव वकील
८) सन १९४२ मध्ये इंग्रज विरोधात सुरु झालेली चले जाव (छोडो भारत) चळवळ अपयशी ठरली कारण ........
a) इंग्रजांनी कूट नीतीने चळवळीत फूट पाडली.
b) या चळवळीस मुस्लीम लीगने पाठिंबा दिला नाही.
c) सशस्त्र इंग्रजापुढे नि:शस्त्र भारतीयांचा निभाव लागला नाही.
d) देशव्यापी चळवळीची आखणी करण्यात नेते कमी पडले.
पर्यायी उत्तरे :
१) (a),(b) आणि (c)
२) (c) आणि (d)
३) (b),(c) आणि (d)
४) (a), (b), (c) आणि (d)
९) सन १९४२ ची चळवळ अयशस्वी का झाली?
a) ब्रिटिश सरकारपुढे निःशस्त्र लोकांचा निभाव लागणे कठीण होते.
b) चळवळीपूर्वीच सरकारने गांधींना अटक केली.
c) सरकारी नोकरीत असलेल्यांनी चळवळीत भाग घेतला नाही.
d) मुस्लीम लीगने चळवळीस पाठिंबा दिला नाही.
१) (a), (b) व (c)
२) (b), (c) व (d)
३) (b) व (c)
४) (a), (b), (c) व (d)
१०) यावली, चिमूर आणि आष्टी येथे चलेजाव (भारत छोडो) चळवळ ...... यांच्या प्रेरणेने सुरू झाली.
१) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
२) स्वामी रामानंद तीर्थ
३) क्रांतिसिंह नाना पाटील
४) अच्युतराव पटवर्धन
११) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पती सरकार-समांतर सरकार सुरू केले.
२) यशवंतराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला.
३) प्रभात फेर्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या.
४) वरील एकही नाही.
१२) वर्ष १९४२ मधील भारत छोडो आंदोलन संबंधी वक्तव्य वाचा.
१) हा वर्ष १८५७ मधील क्रांती नंतर नागरिक आंदोलनाचा सर्वात मोठा स्वरुप होता.
२) समांतर सरकार काँग्रेसच्या नावाने स्थापित केली गेली.
३) प्रमुख उत्तर पश्चिमी मुस्लीम बाहुल्य प्रांत, याने भारत छोडो आंदोलनात सीमित प्रकारे भाग घेतला.
४) या आंदोलनात राष्ट्रीय स्वयं सेवक संघ याने महत्त्वाचा वाटा उचलला.
वरीलपैकी कोणते वक्तव्य अचूक आहे ?
१) १,२,३ आणि ४
२) १,२ आणि ३
३) २,३ आणि ४
४) १,३ आणि ४
१३) खालील पैकी कोणती व्यक्ती/कोणत्या व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती/नव्हत्या?
अ) एस. एम. जोशी
ब) एन. जी. गोरे
क) शिरुभाऊ लिमये
ड) एन. एम. लोखंडे
१) अ आणि क
२) ब आणि ड
३) फक्त क
४) फक्त ड
१४) चलेजाव चळवळीमध्ये जसे सातार्यात समांतर प्रति सरकार स्थापन झाले होते, तसेच बंगालमध्ये ....... येथे जातीय सरकार स्थापन झाले होते.
१) गुरपाल
२) तामलुक
३) तालचेर
४) जांबुसर
१५) चलेजाव चळवळ कोणत्या घटनेला प्रतिसाद म्हणून सुरू करण्यात आली?
१) कॅबिनेट मिशन प्लॅन
२) क्रिप्स प्रपोजल
३) सायमन कमिशन रिपोर्ट
४) वेव्हेल प्लॅन
१६) मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबर्यांचे लेखक म्हणून ना. सी. फडके प्रसिद्ध होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर आधारित ...... नावाचे कादंबरी लिहिली होती.
१) झंझावात
२) अखेरचे बंड
३) तुफान
४) अल्ला हो अकबर
१७) १९४२ च्या चलेजाव चळवळीबाबत काय खरे नाही ?
१) ही अहिंसा चळवळ होती.
२) तिचे नेतृत्व महात्मा गांधींनी केले.
३) ती नैसर्गिक चळवळ होती.
४) या चळवळीने कामगार वर्गाला फारसे आकर्षित केले नाही.
१८) सन १९४२ ची चळवळ अयशस्वी का झाली?
a) ब्रिटिश सरकारपुढे निःशस्त्र लोकांचा निभाव लागणे कठीण होते.
b) चळवळीपूर्वीच सरकारने गांधींना अटक केली.
c) सरकारी नोकरीत असलेल्यांनी चळवळीत भाग घेतला नाही.
d) मुस्लीम लीगने चळवळीस पाठिंबा दिला नाही.
१) (a), (b) व (c)
२) (b), (c) व (d)
३) (b) व (c)
४) (a), (b), (c) व (d)
१९) भारत छोडो चळवळीमध्ये गुप्त रेडिओ स्टेशन चालविण्याच्या आरोपाखाली खालीलपैकी कोणाला अटक करण्यात आली?
a) विठ्ठलभाई झवेरी
b) उषा मेहता
c) नानक मोटवेल
d) मणीबेन पटेल
१) फक्त (a)
२) (a) आणि (b)
३) (b) आणि (d)
४) (a), (b) आणि (c)
२०) चलेजाव चळवळीत विदर्भातून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी महत्त्वाची भूमिका बजावली?
a) मदनलाल बागडी
b) विनायक दांडेकर
c) भास्करराव दूर्वे
d) डॉ. उत्तमराव पाटील
पर्यायी उत्तरे -
१) (a) आणि (b)
२) (c) आणि (d)
३) (c) फक्त
४) (d) फक्त
२१) १९४२ च्या आंदोलनात सुरुंगे व तुरुंगे म्हणून अनुक्रमे कोण ओळखले जात ?
१) इंग्रज व म.गांधीजींच्या आदेशान्वये कैद पत्करणारे
२) म. गांधींच्या आदेशान्वये कैद पत्करणारे व क्रांतिकारी
३) भूमिगत क्रांतिकारी व इंग्रज
४) भूमिगत चळवळ आंदोलक व म. गांधींच्या आदेशान्वये कैद पत्करणारे
राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग
१) इ. स. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कुणी केले?
१) प्रेमा कंटक
२) कृष्णा घुटकर
३) अवंतिकाबाई गोखले
४) अरुणा आसफ अली
२) पुढीलपैकी कोणत्या स्त्रीने सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या काळात मुंबईतील एका सत्याग्रही गटाचे नेतृत्व केल्यामुळे कारावास भोगला होता?
१) हंसाबेन मेहता
२) उर्मिला देवी
३) अवंतिकाबाई गोखले
४) सरोजिनी नायडू
३) १९४२ च्या भूमिगत क्रांतिकारकांचे नेतृत्व केल्याबद्दल दैनिक ट्रिब्यूनने १९४२ ची झांशीची राणी म्हणून कोणाचा सन्मान केला होता?
१) सुचेता कृपलानी
२) मृदूला साराभाई
३) अरुणा असफ अली
४) लीलाताई पाटील
४) १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिशांविरुद्ध भूमिगत चळवळ चालविणार्या क्रांतिकारी महिला कोण?
a) अरुणा असफ अली
b) सुचेता कृपलानी
c) उषा मेहता
d) विजयालक्ष्मी पंडित
१) (a), (c), व (d)
२) (a), (b), व (d)
३) (a), (b) व (c)
४) (a), (b), (c) व (d)
५) गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
१) कस्तुरबा गांधी
२) सरोजिनी नायडू
३) हंसाबेन मेहता
४) अवंतिकाबाई गोखले
६) महात्मा गांधींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
१) श्रीकृष्ण सारडा
२) मल्लाप्पा धनशेट्टी
३) कुर्बान हुसेन
४) सरोजिनी नायडू
७) भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले ?
१) महात्मा जोतिबा फुले
२) सरोजिनी नायडू
३) महात्मा गांधी
४) डॉ. अॅनी बेझंट
८) खालील दोन विधानांपैकी कोणती अयोग्य आहेत ?
a) अंबाबाई जिने उडुपी येथे परदेशी कपड्यांवर व मद्याच्या दुकानांवर हल्ला केला वास्तविक महाराष्ट्रातील होत्या.
b) महात्मा गांधी प्रथमपासूनच मीठ सत्याग्रहात स्त्रियांच्या सहभागास पूर्णपणे राजी होते.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) न (a) न (b)
४) (a) व (b) दोन्ही
९) योग्य जोड्या जुळवा.
अ) गीता सोने i. स्त्रीचे समाजातील स्थान व भूमिका
ब) दु. का. संत ii. सन्मार्ग
क) अनुसया लिमये iii. स्त्री जीवन अन्वय व अर्थ
ड) मा. म. देशमुख iv. भारतीय स्त्री जीवन
पर्यायी उत्तरे :
a b c d
१) i ii iii iv
२) iv iii i ii
३) iii iv ii i
४) ii i iv iii
१०) पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
१) आझाद हिंद सेनेची महिला तुकडीही स्थापण्यात आली.
२) ती कॅप्टन लक्ष्मी सुब्रमण्यम यांच्या हाताखाली होती.
३) तिला राणी झांसी तुकडी (रेजीमेंट) म्हणत.
४) वरील तीनपैकी कोणतेही अयोग्य नाही.
११) १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिशांविरुद्ध भूमिगत चळवळ चालविणार्या क्रांतिकारी महिला कोण?
a) अरुणा असफ अली
b) सुचेता कृपलानी
c) उषा मेहता
d) विजयालक्ष्मी पंडित
१) (a), (c), व (d)
२) (a), (b), व (d)
३) (a), (b) व (c)
४) (a), (b), (c) व (d)
१२) भारत छोडो आंदोलनात काँग्रेस रेडिओ चालविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कोणी पार पाडली?
१) सरोजिनी नायडू
२) उषा मेहता
३) कमला नेहरू
४) इंदिरा गांधी
१३) ....... यांनी वुमेन्स स्वदेशी लीग ची १९२८ मध्ये स्थापना केली.
१) श्रीमती जमनालाल
२) कृष्णाबाई राऊ
३) इंदिराबाई राऊ
४) एस्. अंबूजम्माल
१४) लीलाताई पाटील, विजयाताई लाड, लक्ष्मीबाई नायकवडी आणि राजूताई पाटील या स्त्रियांच्यात कोणती गोष्ट समान आहे?
१) त्यांचे विवाह सत्यशोधक पद्धतीने झाले.
२) त्या आझाद हिंद सेनेच्या सदस्या होत्या.
३) त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामात भाग घेतला.
४) त्यांनी सातार्याच्या प्रतिसरकारमध्ये सहभाग घेतला.
१५) जेव्हा ...... स्त्रियांनी इल्बर्ट बिलमधील भारतीय न्यायाधीशांना युरोपियनांसंबंधित खटले चालविण्यास परवानगी दिली या गोष्टीला पाठिंबा दर्शविणारे पत्र लिहिले, तेव्हा पुरुषांचा स्त्रियांच्या स्वतंत्रता आंदोलनातील सहभागाविषयी दृष्टिकोन बदलला.
१) महाराष्ट्रीयन
२) गुजराती
३) बंगाली
४) पंजाबी
१६) सरोजिनी नायडूच्या प्रसिद्धीचे कारण आहे ?
१) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रथम भारतीय महिला अध्यक्ष
२) संयुक्त राष्ट्राच्या प्रथम महिला सचिव
३) स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या स्त्री चिकित्सक
४) नर्सिंग महाविद्यालय सुरु करणारी पहिली महिला
१७) खालील विधानांचा विचार करा :
विधान (A) : मादाम भिकाजी कामा यांना भारतीय महिलांनी स्वातंत्र्य चळवळीत काम करावे असे वाटे.
कारण (R) : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्त्रियांना मतदानाचा अधिकार व इतरही अधिकार मिळतील.
आता सांगा कोणता पर्याय बरोबर आहे ?
१) A बरोबर आहे. R बरोबर आहे.
२) A चूक आहे. R ही चुकीचे आहे.
३) A चुकीचे आहे. R बरोबर आहे.
४) A बरोबर आहे. R चुकीचे आहे.
१८) लीलाताई पाटील, विजयाताई लाड, लक्ष्मीबाई नायकवडी आणि राजूताई पाटील या स्त्रियांच्यात कोणती गोष्ट समान आहे?
१) त्यांचे विवाह सत्यशोधक पद्धतीने झाले.
२) त्या आझाद हिंद सेनेच्या सदस्या होत्या.
३) त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामात भाग घेतला.
४) त्यांनी सातार्याच्या प्रतिसरकारमध्ये सहभाग घेतला.
१९) बेगम एझाझ रसूल, हंसा मेहता आणि रेणुका राय यांच्यात कोणती गोष्ट समान आहे?
१) त्यांनी राज्यघटना गांधीवादी नसल्याबद्दल टीका केली.
२) त्यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली.
३) त्या घटना समितीच्या सदस्य होत्या.
४) त्यांनी समतेच्या दिशेने हा स्त्री मुक्तीविषयक अहवाल लिहिला.
२०) चुकीची जोडी ओळखा.
१) प्रोग्रेसीव वुमन्स ऑर्गनायझेशन - हैद्राबाद
२) पुरोगामी स्त्री संघटना - पुणे
३) स्त्री मुक्ती संघटना - मुंबई
४) महिला दक्षता समिती - कोलकाता
संस्थानातील जनतेच्या चळवळी (१९२७-)
१) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा.
१) ऑगस्ट १९४७ ते सप्टेंबर १९४८ या दरम्यान साम्यवादी पक्षांनी निजाम विरोधी चळवळीत भाग घेतला.
२) त्यांनी शेतकर्यांचे गनिमी काव्याने लढण्याचे पथक तयार केले व रझाकारांवर हल्ला केला.
३) त्यांनी भारतीय लष्कराला पूर्ण पाठिंबा दिला.
४) १९५१ मध्ये साम्यवादी पक्षाने ही चळवळ मागे घेतली.
स्वातंत्र्याकडे वाटचाल
१) भारतीय राष्ट्रीय चळवळीतील खालील घटना क्रमवार पद्धतीने खाली दिलेल्या संकेत (कोडस) प्रमाणे लावा.
१) गांधी-इरविन करार
२) कॅबिनेट मिशन
३) राजगोपालचारी फॉर्म्युला
४) पुणे करार
१) ३, ४, २, १
२) १, ४, ३, २
३) ४, २, १, ३
४) २, ४, ३, १
२) १९४५ मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यात आझाद हिंद फौजेवर चाललेल्या खटल्याचे वेळी वकील कोण होते?
a) पंडीत जवाहरलाल नेहरू
b) भुलाभाई देसाई
c) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d) तेजबहादूर सप्रू
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b) आणि (d) फक्त
२) (b), (c) आणि (d) फक्त
३) (a) आणि (b) फक्त
४) (a) आणि (d) फक्त
३) रॉयल इंडियन नेव्ही च्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी १८ फेब्रुवारी १९४६ रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला ?
१) हिंदुस्थान/कलकत्ता
२) तलवार/मुंबई
३) शिवनेरी/पुणे
४) सह्याद्री/पोरबंदर
४) पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?
१) इंग्रज इंडियन नॅशनल आर्मी व तिच्या पुढार्यांच्या अतिशय विरोधात होते.
२) इंग्रजांनी त्यांच्या प्रमुख ३ अधिकार्यांवर : गुरुबक्षसिंग धिल्लो, शाह नवाझ खान व पी. के. सेहगल यांच्यावर लाल किल्ला दिल्ली येथे इंग्रजांविरुद्ध लढा देण्यास्तव केस चालविली.
३) त्या सर्वांवर गुन्हा साबीत केला.
४) त्याप्रमाणे त्या तिघांना शिक्षा झाली.
५) पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?
१) दिनांक २४ मार्च १९४७ रोजी लॉर्ल वेवेल यांच्याऐवजी लॉर्ड माऊंटबॅटन आले व भारताचे व्हाइसरॉय झाले.
२) दि. ३ जून १९४७ रोजी त्यांनी भारताचे दोन स्वतंत्र व सार्वभौम भाग भारत व पाकिस्तान जाहीर केले.
३) काँग्रेसला भारताचे विभाजन जात जमातीच्या तत्त्वावर कधीच नको होते.
४) काँग्रेसला विभाजन मान्य करावे लागले कारण ब्रिटिश सरकारने त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ते भारतावर लादले.
६) भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले ?
१) ऑगस्ट १९४६
२) सप्टेंबर १९४५
३) ऑगस्ट १९४५
४) सप्टेंबर १९४६
७) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) पहिल्या अंतरिम राष्ट्रीय सरकारची घोषणा २४ ऑगस्ट, १९४६ रोजी झाली होती.
२) २ ऑक्टोबर, १९४६ रोजी नेहरूंच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारचा शपथविधी झाला.
३) २६ ऑक्टोबर, १९४६ रोजी वेव्हेल यांनी मुस्लीम लीगला अंतरिम सरकारमध्ये आणले.
४) संविधान सभेच्या ९ डिसेंबर, १९४६ रोजी भरलेल्या पहिल्या बैठकीला मुस्लीम लीग हजर नव्हती.
८) इ. स. १९४६ मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
१) डॉ. आंबेडकर
२) चक्रवर्ती राजगोपालाचारी
३) डॉ. राजेन्द्र प्रसाद
४) कन्हैयालाल मुन्शी
९) भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटिशांच्या धोरणात बदल झाला कारण
अ) ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर.
ब) भारतात राष्ट्रवादास आलेले उधाण.
क) द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम.
१) अ आणि ब फक्त
२) ब आणि क फक्त
३) अ आणि क फक्त
४) अ, ब आणि क
१०) वर्ष १९४० संबंधी खालीलपैकी घटनांना वाचा.
१) लॉर्ड लिनलिथगो ऑगस्ट ऑफर
२) लाहोर सत्रात मुस्लीम लीग कडून पाकिस्तानच्या वेगळ्या राज्याची मागणी.
३) काँग्रेस कडून स्वतंत्र सत्याग्रह आंदोलनाच्या सुरुवातीचे निर्णय.
या घटनांचा अचूक क्रम काय आहे ?
१) १-२-३
२) २-३-१
३) ३-१-२
४) ३-२-१
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१६७)
भारतीय स्वातंत्र्य चळवळ व सत्याग्रह
१-४
२-१
३-३
४-१
५-२
६-२
७-१
८-१
९-१
१०-१
११-१
महात्मा गांधीजींची प्रारंभीची आंदोलने
१-३
२-४
३-४
४-४
खिलाफत चळवळ
१-४
२-१
३-१
४-१
५-४
६-३
असहकार चळवळ (१९२०-२२)
१-४
२-३
३-३
४-३
५-३
६-३
७-१
८-२
९-४
१०-३
११-२
१२-३
१३-४
१४-४
१५-१
१६-३
१७-४
१८-२
१९-२
सविनय कायदेभंग चळवळ (१९३०-३४)
१-४
२-१
३-४
४-२
५-२
६-१
७-२
८-२
९-३
१०-४
११-२
१२-३
१३-३
१४-३
१५-१
१६-१
१७-४
१८-३
१९-३
२०-३
२१-१
२२-२
२३-२
२४-४
२५-३
२६-३
२७-४
२८-१
२९-२
३०-२
३१-४
३२-२
३३-१
३४-१
३५-२
वैयक्तिक सत्याग्रह (१९४०)
१-४
२-३
चलेजाव चळवळ (१९४२-४५)
१-२
२-४
३-४
४-३
५-१
६-३
७-४
८-३
९-४
१०-१
११-४
१२-२
१३-४
१४-२
१५-२
१६-१
१७-२
१८-४
१९-४
२०-२
२१-४
राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग
१-३
२-३
३-३
४-३
५-२
६-४
७-३
८-४
९-२
१०-२
११-३
१२-२
१३-४
१४-४
१५-३
१६-१
१७-१
१८-४
१९-३
२०-४
संस्थानातील जनतेच्या चळवळी (१९२७-)
१-३
स्वातंत्र्याकडे वाटचाल
१-२
२-१
३-२
४-४
५-४
६-४
७-२
८-३
९-४
१०-२