महत्त्वाच्या व्यक्तींचे योगदान / प्रश्नमंजुषा (१६६)
- 24 May 2021
- Posted By : study circle
- 1170 Views
- 2 Shares
महत्त्वाच्या व्यक्तींचे योगदान
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील” महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका यावर अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत. याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास विभाग
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
१.५ महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका -
सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी, ए. ओ. ह्यूम, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, अॅनी बेझंट, अरविंदो घोष, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व इतर.
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या व्यक्तींचे योगदान
(१) महाराष्ट्राशी संबंधित राजकीय नेते व कार्यकर्ते -
१) दादाभाई नौरोजी
२) फिरोजशाह मेहता
३) न्यायमूर्ती चंदावरकर
४) विठ्ठलभाई पटेल
५) शंकरराव देव
६) अॅनी बेझंट
७) श्रीपाद डांगे
८) हंसा जीवराज मेहता
९) उषा मेहता
१०) नारायण मल्हार जोशी
११) बद्रुद्दीन तय्यबजी
१२) वल्लभभाई पटेल
१३) मोरारजी देसाई
१४) अच्युतराव पटवर्धन
१५) वाय. बी. चव्हाण
१६) अरुणा असफ अली
१७) जमनालाल बजाज
१८) दिनकरराव जवळकर
(२) भारतीय नेते -
१) सर अॅलन ह्यूम
२) जवाहरलाल नेहरू
३) सुभाषचंद्र बोस
४) लाला लजपतराय
५) चित्तरंजन दास
६) मदनमोहन मालवीय
७) सी. राजगोपालाचारी
८) रविंद्रनाथ टागोर
९) मौलाना अबुल कलाम आझाद
१०) मीरा बेन
११) पुरुषोत्तमदास टंडन
१२) जमाल अल दिन अल अफगाणी
(३) महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते -
१) डॉ. रामकृष्ण भांडारकर
२) माधवराव बागल
३) राजाराम शास्त्री भागवत
४) मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर
५) दलित नेते
१) महाराष्ट्राशी संबंधित राजकीय नेते व कार्यकर्ते
१) प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठीचे पहिले विधेयक १९११ मध्ये इंपिरियल काउन्सिल मध्ये ...... यांनी मांडले.
१) फिरोजशाह मेहता
२) के. टी. तेलंग
३) गोपाळ कृष्ण गोखले
४) बद्रुद्दीन तय्यबजी
२) पुढे दिलेल्या पुढार्यांच्या त्यांच्या सांकेतिक नावाबरोबर जोड्या जुळवा.
a) सुचेता कृपलानी i) कदम
b) अरुणा असफ अली ii) दादी
c) अच्युतराव पटवर्धन iii) दीदी
d) बाबा राघवदास iv) कुसुम
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (i) (iv) (iii)
२) (iii) (iv) (i) (ii)
३) (iv) (iii) (ii) (i)
४) (ii) (iii) (i) (iv)
३) म. गांधीपूर्वी स्वदेशीचा पुरस्कार ४०-५० वर्षा अगोदर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केला होता?
a) गणेश वासुदेव जोशी
b) वासुदेव बळवंत फडके
c) दादोबा पांडुरंग तर्खडकर
d) आत्माराम पांडुरंग तर्खडकर
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) फक्त
२) (b) आणि (c) फक्त
३) (c) आणि (d) फक्त
४) (a) आणि (d) फक्त
४) जोड्या जुळवा :
a) समाजवादी i) डॉ. झाकीर हुसेन
b) साम्यवादी ii) डॉ. राधाकृष्णन
c) तत्त्वज्ञ iii) पी. सी. जोशी
d) शिक्षणतज्ञ iv) आचार्य नरेंद्र देव
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
३) (iv) (iii) (ii) (i)
२) (ii) (iv) (i) (iii)
४) (iii) (i) (iv) (ii)
५) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ........ यांचे अनुयायी झाले.
१) बा. गं. टिळक
२) गो. कृ. गोखले
३) मो. क. गांधी
४) गो. ह. देशमुख
६) जोड्या जुळवा :
अ) सी. राजगोपालाचारी i) मध्यवर्ती विधी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
ब) मदन मोहन मालवीय व लाला लजपतराय राय ii) त्यांनी विधायक कार्यात जसे हरिजनांचा उद्धार करण्यात स्वत:ला गुंतवून ठेवले.
क) विठ्ठलभाई पटेल iii) कलकत्त्याचे महापौर म्हणून निवडून आले.
ड) चि. रं. दास iv) स्वराजींवर टीका केली.
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
१) II IV I III
२) I II III IV
३) IV III II I
४) III I IV II
दादाभाई नौरोजी
१) भारतीय स्वातंत्र्य चळवळीत दादाभाई नौरोजी यांनी दिलेले सर्वात महत्त्वाचे योगदान कोणते ?
१) ब्रिटिशांनी भारताचे केलेले आर्थिक शोषण त्यांनी उघडे केले.
२) भारतीय प्राचीन ग्रंथांचे भाषांतर करून त्यांनी भारतीयांत स्वाभिमान जागविला.
३) इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा भारतीय समाजातील अनिष्ट, सामाजिक प्रथांचे निर्मूलन करण्यावर त्यांनी जास्त भर दिला.
योग्य पर्याय निवडा :
(a) फक्त १
(b) फक्त १ आणि २
(c) १ व ३
(d) १, २ आणि ३
फिरोजशाह मेहता
१) पुढील वाक्ये कोणाबद्दल लिहिली आहेत ?
ते विसाव्या वर्षी एम. ए. झाले.
ते बॅरीस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले.
ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्झन त्यांचा सहकारी होता.
१) दादाभाई नवरोजी
२) जमशेदजी टाटा
३) फिरोजशहा मेहता
४) पिरोजशा गोदरेज
न्यायमूर्ती चंदावरकर
१) पुढीलपैकी कोणती गोष्ट न्यायमूर्ती चंदावरकरांशी संबंधित नाही ?
१) ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.
२) त्यांनी प्रार्थना समाजाला आधुनिक केले.
३) न्यायमूर्ती म. गो. रानड्यांच्या मृत्यूनंतर नॅशनल सोशल कॉन्फरन्सचे नेतृत्व त्यांच्याकडे गेले.
४) वरील एकही नाही
विठ्ठलभाई पटेल
१) इ.स. १९२५ च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?
१) वाय. बी. चव्हाण
२) मोरारजी देसाई
३) विठ्ठलभाई पटेल
४) वल्लभभाई पटेल
२) १९२४ मध्ये बॉम्बे म्युनिसीपल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष कोण होते ?
१) मास्टर तारा सिंग
२) नारायण मल्हार जोशी
३) विठ्ठलभाई पटेल
४) आचार्य नरेंद्र देव
शंकरराव देव
१) ...... यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती.
१) शंकरराव देव
२) जमनालाल बजाज
३) के. एफ. नरिमन
४) किशोरलाल मश्रूवाला
२) ......... यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे स्थापन झालेल्या महाराष्ट्र सविनय कायदेभंगाच्या समितीला विले-पार्ले हून सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाला पाठींबा मिळाला.
१) वा. वि. दास्ताने
२) शंकरराव देव
३) किशोरलाल मत्रूवाला
४) अनंत वासुदेव सहस्त्रबुध्दे
३) पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा :
१) शंकरराव देव
२) गंगाधरराव देशपांडे
३) पुंडलीकजी कातगडे
४) भास्कर विष्णू काळे
श्रीपाद डांगे
१) महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीशी संबंधित कोणाचे नाव सांगता येईल?
१) सेनापती बापट
२) श्रीपाद डांगे
३) लालजी पेंडसे
४) अच्युत पटवर्धन
हंसा जीवराज मेहता
१) मानवी हक्काच्या सार्वभौम घोषणापत्रावरील महत्त्वपूर्ण कागदपत्रे तयार करण्यात भारतीय सुधारकाने भूमिका बजावल्याबद्दल संयुक्त राष्ट्राचे मुख्य अँटोनियो ग्यूटेरेस यांनी खालील कोणत्या मानवाधिकार कार्यकर्त्याचे कौतुक केले ?
१) पुष्पा जीवराज भावे
२) चारुशीला अमृतभाई सदावर्ते
३) हंसा जीवराज मेहता
४) पुष्पा विनोद देशपांडे
उषा मेहता
१) भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उषा मेहता कशासाठी प्रसिद्ध आहे ?
१) चले जाव चळवळी दरम्यान भूमिगत रेडिओ केंद्र चालविणे.
२) दुसर्या गोलमेज परिषदेत सहभाग
३) आझाद हिंद फौजेच्या एका तुकडीचे नेतृत्व
४) पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली हंगामी सरकारची स्थापना
२) भारत छोडो आंदोलनात काँग्रेस रेडिओ चालविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कोणी पार पाडली?
१) सरोजिनी नायडू
२) उषा मेहता
३) कमला नेहरू
४) इंदिरा गांधी
३) उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले ?
१) पुणे
२) नागपूर
३) मीरत
४) मुंबई
अॅनी बेझंट
१) पुढील वाक्ये सत्य आहेत का?
a) डॉ. अॅनी बेझंट भारतीय राष्ट्रीय सभेच्या सदस्य होत्या.
b) होमरूल चळवळीचा प्रचार करण्यासाठी अॅनी बेझंटना थिऑसॉफिकल सोसायटीचा उपयोग झाला.
पर्यायी उत्तरे :
१) (a) सत्य (b) सत्य नाही
२) (a) आणि (b) असत्य आहेत
३) (a) आणि (b) सत्य आहेत
४) (a) असत्य (b) सत्य आहे
२) अॅनी बेझंट या -
१) होमरूल चळवळ सुरू करण्यास जबाबदार होत्या.
२) थिओसॉफिकल सोसायटीच्या संस्थापक होत्या.
३) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एकवेळेस अध्यक्षा होत्या.
खाली नमूद केलेल्या संकेताचा वापर करून योग्य विधान/विधाने शोधा.
a) फक्त १
b) फक्त २ आणि ३
c) फक्त १ आणि ३
d) १, २ आणि ३
(२) भारतीय नेते
१) खालील जोड्या जुळवा :
(अ) (ब)
अ) साम्राज्यवादी विचारसरणी I) व्हॅलेंटाइन चिरोल
ब) केंब्रिज विचारसरणी II) अनिल सिअल
क) राष्ट्रवादी विचारसरणी III) आर. सी. मजुमदार
ड) साम्यवादी विचारसरणी IV) आर. पी. दत्त
अ ब क ड
१) II I IV III
२) IV III II I
३) I II III IV
४) III IV I II
सर अॅलन ह्यूम
१) सर अॅलन ह्यूम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्न का केले ?
अ) ते विचाराने उदारमतवादी होते.
ब) त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ होती.
क) त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवावे, असे वाटत होते.
ड) त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा, असे वाटत होते.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
१) अ आणि ब फक्त
२) अ आणि क फक्त
३) अ, ब आणि क फक्त
४) वरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत.
जवाहरलाल नेहरू
१) जवाहरलाल नेहरूंबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
a) ते स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतर नियोजन आयोगाचे प्रमुख होते.
b) त्यांनी अनेकदा भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषवले.
c) नेहरू रिपोर्ट लिहून त्यांनी भारतासाठी आदर्श राज्यपद्धतीचा आराखडा मांडला.
d) ”मला पाश्चात्य जगात उपर्यासारखे वाटते, पण मायदेशातही कधी कधी परक्यासारखे वाटते“ असे त्यांचे मत होते.
१) (a), (b), (d)
२) (a), (b), (c)
३) (a), (c), (d)
४) (b), (c), (d)
२) जवाहरलाल नेहरूंबाबत पुढीलपैकी कोणते विधान खरे नाही?
१) १९४६-४७ मध्ये ते अखिल भारतीय संस्थानी प्रजा परिषदेचे अध्यक्ष होते.
२) १९४८ मध्ये सांप्रदायिक एकतेची शाश्वती देणार्या केंद्रीय शांतता समितीचे ते अध्यक्ष होते.
३) त्यांचे शिक्षण हॅरो व केंब्रिजमध्ये झाले.
४) भारतीय राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात त्यांची अध्यक्षपदी निवड झाली.
मीरा बेन
१) पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे?
अ) ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती.
ब) ती ब्रिटिश आरमार प्रमुखाची मुलगी होती.
क) ती मीरा बेन या लोकप्रिय नावाने ओळखली जात असे.
१) सिस्टर निवेदिता
२) मिस कार्पेंटर
३) मिस स्लाद
४) मिस नाइटिंगेल
चित्तरंजन दास
१) देशबंधू असे कोणास म्हणतात?
१) आचार्य नरेन्द्र देव
२) राजेन्द्र प्रसाद
३) चित्तरंजन दास
४) जी. एस. खापर्डे
२) .... हे देशबंधू म्हणून ओळखले जातात.
१) एम. ए. जिना
२) अण्णादुराई
३) सी. आर. दास
४) जे. एम. नेहरू
मौलाना अबुल कलाम आझाद
१) मौलाना अबुल कलाम आझाद यांचे मूळ नाव काय ?
१) मोहिउद्दीन खैरुद्दीन अहमद
२) मोहिउद्दीन जैनुद्दीन अहमद
३) मोहमंद खैरुद्दीन अहमद
४) यापैकी नाही
२) पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे?
a) त्यांनी त्यांचे शिक्षण कैरो येथील अल्-अझर विद्यापीठातून पूर्ण केले होते.
b) वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी अल्-हिलाल हे वृत्तपत्र सुरू केले होते.
पर्यायी उत्तरे :
१) महमद इक्बाल
२) बॅरिस्टर जिन्ना
३) अबुल कलाम आझाद
४) शौकत अली
पुरुषोत्तमदास टंडन
१) पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ?
a) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी वल्लभभाई पटेलांनी त्यांचे नाव सुचविले होते.
b) ते युनायटेड प्रॉव्हिंसमधील राष्ट्रीय सभेेचे कार्यकर्ते होते.
c) जवाहरलाल नेहरु व ते वैयक्तिक पातळीवर मित्र होते.
पर्यायी उत्तरे :
१) पुरुषोत्तमदास टंडन
२) पुरुषोत्तमदाास ठाकूरदास
३) पुरुषोत्तदास भगवानदास
४) पुरुषोत्तमदास त्रिकमदास
जमाल अल दिन अल अफगाणी
१) पॅन इस्लामवादी विचारांचा आधुनिक काळातील उद्गाता जमाल अल दिन अल अफगाणी याच्याबद्दल पुढे दिलेली कोणती विधाने सत्य आहेत?
a) १८७९-१८८२ मध्ये भारतात होतात.
b) त्याने हैदराबाद व कलकत्त्यात भाषणे केली.
c) त्याने कलकत्त्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याची पाठराखण केली.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a) आणि (b) सत्य आहेत.
२) केवळ (b) आणि (c) सत्य आहेत.
१) (a), (b) आणि (c) सत्य आहेत.
२) यापैकी नाही
रविंद्रनाथ टागोर
१) ...... ला विरोध दर्शवण्यासाठी रविंद्रनाथ टागोरांनी नाइटहुड किताब परत केला.
१) कम्युनल अवॉर्ड
२) जालियनवाला बाग दुर्घटना
३) सविनय कायदेभंग आंदोलन
४) चौरीचौरा घटना
२) कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा देहांत ...
१) २१ जुलै २०१२ रोजी कानपूर येथे झाला
२) २३ जुलै २०१२ रोजी झांसी येथे झाला
३) २३ जुलै २०१२ रोजी कानपूर येथे झाला
४) २५ जुलै २०१२ रोजी झांसी येथे झाला
(३) महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते
डॉ. रामकृष्ण भांडारकर
१) व्यक्ती ओळखा :
a) ते १८७४ साली लंडन येथे झालेल्या प्राच्य अभ्यास विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले होते.
b) ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.
पर्यायी उत्तरे :
१) डॉ. रामकृष्ण भांडारकर
२) डॉ. काशिनाथ तेलंग
३) फिरोजशहा मेहता
४) वामन मोडक
२) पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे?
अ) त्यांचा जन्म ६ जुलै १८३७ ला मालवण येथे झाला.
ब) ते मुंबई विद्यापीठातून पदवीधर होणार्या पहिल्या बॅचमध्ये होते.
क) त्यांना इंग्रजी भाषा, वाङ्मय, इतिहास आणि संस्कृत विषयांची विशेष आवड होती.
ड) १८८२ मध्ये त्यांची नियुक्ती पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून झाली होती. या पदावरील ते पहिलेच भारतीय होते.
१) गो. ग. आगरकर
२) भा. ह. भागवत
३) रा. गो. भांडारकर
४) का. त्र्यं. तेलंग
३) a) ते धों. के. कर्व्यांचे रॉबर्ट मनी हायस्कूल मध्ये शिक्षक होते.
b) ते मुंबईच्या सेंट झेव्हीयर्स महाविद्यालयात संस्कृत शिकवीत.
c) ते समाज सुधारक होते.
d) १९०५ च्या सुमारास त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला होता.
e) जातिव्मवस्था व अस्पृश्यता यांना त्यांनी कडाडून विरोध केला होता.
ते कोण होते ?
१) नरहर मल्हार जोशी
२) राजाराम शास्त्री भागवत
३) र. पु. परांजपे
४) गो. ग. आगरकर
४) पुढील वाक्यात वर्णन केलेल्या व्यक्तीचे नाव सांगा.
a) ते मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधरांपैकी एक होते.
b) मुंबईत वकील (अॅडव्होकेट) म्हणून सेवा देणारे ते पहिले भारतीय होते.
c) प्रार्थना समाजाचे ते संस्थापक सचिव होते.
पर्यायी उत्तरे :
१) बाळ मंगेश वागळे
२) आत्माराम पांडुरंग
३) म. गो. रानडे
४) रा. गो. भांडारकर
५) पुढील पैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
१) काशिनाथराव वैद्य
२) दिनकरराव जवळकर
३) माधवराव बागल
४) दादासाहेब सुर्वे
६) कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लिहावयाच्या.
१) ताराबाई शिंदे
२) डॉ. रमाबाई
३) डॉ. आनंदीबाई जोशी
४) रमाबाई रानडे
७) मराठवाड्यातील पाथ्री गावचे देवीदास कांबळे हे ...... चे पुढारी होते.
१) महार समाज
२) मातंग समाज
३) माथडी समाज
४) माळकरी समाज
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१६६)
१) महाराष्ट्राशी संबंधित राजकीय नेते व कार्यकर्ते
१-३
२-१
३-१
४-३
५-३
६-१
दादाभाई नौरोजी
१-१
फिरोजशाह मेहता
१-३
न्यायमूर्ती चंदावरकर
१-४
विठ्ठलभाई पटेल
१-३
२-३
शंकरराव देव
१-१
२-२
३-१
श्रीपाद डांगे
१-२
हंसा जीवराज मेहता
१-३
उषा मेहता
१-१
२-२
३-४
अॅनी बेझंट
१-३
२-३
(२) भारतीय नेते
१-३
सर अॅलन ह्यूम
१-४
जवाहरलाल नेहरू
१-१
२-२
मीरा बेन
१-३
चित्तरंजन दास
१-३
२-३
मौलाना अबुल कलाम आझाद
१-१
२-३
पुरुषोत्तमदास टंडन
१-१
जमाल अल दिन अल अफगाणी
१-२
रविंद्रनाथ टागोर
१-२
२-३
(३) महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते
डॉ. रामकृष्ण भांडारकर
१-१
२-३
३-२
४-१
५-१
६-२
७-२