जागतिक दहशतवादविरोधी दिन / प्रश्‍नमंजुषा (१६५)

  • जागतिक दहशतवादविरोधी दिन / प्रश्‍नमंजुषा (१६५)

    जागतिक दहशतवादविरोधी दिन / प्रश्‍नमंजुषा (१६५)

    • 24 May 2021
    • Posted By : study circle
    • 1015 Views
    • 0 Shares
     प्रश्‍नमंजुषा (१६५)
     
    १)  २१ मे या दिवशी ........ यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.
        १) भारताचे माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम
        २) भारताचे माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंहराव
        ३) भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी
        ४) भारताचे माजी राष्ट्रपती स्व. ग्यानी झैल सिंग

    २)  खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
        अ) २१ मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो.
        ब) तामीळ दहशतवाद्यांनी केलेल्या राजीव गांधी यांच्या केलेल्या हत्येचा निषेध म्हणून हा दिवस दहशतवादविरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ
        २) फक्त ब    
        ३) अ आणि ब दोन्ही
        ४) कोणतेही नाही

    ३)  राजीव गांधीनी देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून कधी काम पाहिले होते ?
        १)  सन १९८० ते सन १९८४ पर्यंत
        २)  सन १९८५ ते सन १९८९ पर्यंत
        ३)  सन १९८१ ते सन १९८ ४ पर्यंत
        ४)  सन १९८४ ते सन १९८९ पर्यंत

    ४)  २१ मे १९९१ रोजी घडलेल्या घटनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
        अ) त्या दिवशी राजीव गांधीनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान श्रीपेरंबुदुर येथे प्रचारसभेला संबोधित केले.
        ब) या सभेत तामीळ दहशतवाद्यांनी मानवी बॉम्बद्वारे राजीव गांधींची हत्या केली.
        क) श्रीपेरंबुदुर हे स्थळ केरळ राज्यात आहे.        
        ड) त्याकाळात केरळमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता होती.
        पर्यायी उत्तरे :
        १) अ, ब आणि क बरोबर
        २) , क आणि ड बरोबर
        ३) अ, ब आणि ड बरोबर
        ४) अ आणि ब बरोबर

    ५)  काश्मीरचे संस्थानिक राजा हरीसिंग डोग्रा यांनी काश्मीरचे सामिलीकरण भारतात होण्यास संमती देणार्‍या सामीलनाम्यावर कधी स्वाक्षरी केली होती?
        १) १४ ऑगस्ट १९४७ रोजी
        २) १५ ऑगस्ट १९४७ रोजी
        ३) २६ जानेवारी १९४८ रोजी
        ४) २६ ऑक्टोबर १९४७ रोजी

    ६)  खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
        अ) १९७७ मध्ये अलिगड मुस्लीम विद्यापीठात प्रा. मोहम्मद अहमदुल्ला सिद्दीकीने इंडियन मुजाहिद्दीनची स्थापना केली.
        ब) इंडियन मुजाहिद्दीनने इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीपासून प्रेरणा घेतली होती.
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ
        २) फक्त ब    
        ३) अ आणि ब दोन्ही
        ४) कोणतेही नाही

    ७)  पाकिस्तानचे तत्कालीन लष्करी हुकूमशहा जनरल झिया-उल्-हक यांनी जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी १९८० च्या दशकात कोणती योजना आखली होती ?
        १)  कराची योजना
        २)  सिमला योजना
        ३)  लाहोर योजना
        ४)  रावळपिंडी योजना

    ८)  भारतातील दहशतवाद हा मुसलमानांवर अत्याचार झाल्याने वाढीला लागलेला आहे हे दर्शविण्यासाठी आयएसआयने कोणत्या दहश्तवादी संघटनेला पाठबळ दिले ?
        अ) हिजबुल मुजाहिद्दीन
        ब)  सिमी
        क) इंडियन मुजाहिद्दीन
        ड)  डेक्कन मुजाहिद्दीन          
        पर्यायी उत्तरे :
        १) अ, ब आणि क बरोबर
        २) , क आणि ड बरोबर
        ३) अ, ब आणि ड बरोबर
        ४) , क आणि ड बरोबर

    ९)  इस्लामी मूलतत्त्ववाद्यांची कोणती दहशतवादी महिला संघटना भारतात सक्रिय आहे ?
        १) डेक्कन मुजाहिद्दीन
        २) दुख्तरन-इ-मिल्लत
        ३) हिजबुल मुजाहिद्दीन
        ४) सिमी

    १०) खालील जोड्या अचूक जुळवा :
            स्तंभ अ                                  स्तंभ ब
        अ. बोडोलॅण्ड टायगर फोर्स                              I. मणिपूर
        ब. पालांग युनायटेड लिबरेशन फ्रंट            II. अरुणाचल प्रदेश
        क. पीपल्स रिव्हॉल्युशनरी पार्टी ऑफ कांगलीपाल     III. आसाम
        ड. युनायटेड पीपल्स व्हॉलिंटीअर्स कौन्सिल                  IV. नागालँड
        पर्यायी उत्तरे :
                              
              1)      II          III           IV         I
              2)      I            II            III        IV
              3)      III        IV            I          II
              4)      IV         III           I           II

    (१) दहशतवाद,नक्षलवाद व माओवाद
    पंजाबमधील असंतोष व तणाव
     
    १)  राज्यांना स्वायत्तता देण्याची मागणी करणारा आनंदपुरसाहेब ठराव १९७३ मध्ये ....... ने पारित केला.
        १)  पंजाब विधानसभा
        २) दमसमी टाकसाळ 
        ३) अकाली दलाची कार्यकारी समिती
        ४) निरंकारी अधिवेशन

    २)  १९८० नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण ः
        a) खलिस्तानची मागणी
        b) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थानशी तंटा
        c) चंदीगडची पंजाबसाठी मागणी
        d) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b) आणि (d) फक्त
        २) (b), (c) आणि (d) फक्त
        ३) (a), (b) आणि (c) फक्त
        ४) वरील सर्व

    आसाममधील असंतोष
     
    १)  आसाममधील असंतोषाबाबत पुढीलपैकी काय खरे होते?
        a)  आसाममध्ये ऑल आसाम स्टुडंट्स युनियन व आसाम गण परिषदेने आसामातील बांगलादेशी शरणार्थींना परत पाठवावे याकरिता मोठे आंदोलन केले.
        b) ऑल आसाम ट्रायबल युथ लीगने आसामातील इतर आंदोलनाला विरोध करून शेतजमिनीची फेरवाटणी आदिवासीत केली जावी यासाठी आंदोलन केले.
        c) आसामी आंदोलन व आदिवासी यांच्यातील तणावाने गंभीर आणि तीव्र रूप धारण केले.
        d) आसामीनी तेथे कायदेभंगाची चळवळ सुरू केली.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (c) फक्त                                
        २) (a), (b) आणि (d) फक्त
        ३) (a) आणि (d) फक्त
        ४) वरील सर्व

    नक्षलवाद आणि माओवाद
     
    १)  पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे?
        a) त्यांनी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले.
        b) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली.
        c) गनिमी पथकांना ’दालमा’ असे ही म्हणत.
        पर्यायी उत्तरे :
        १) चारु मुजुमदार
        २) कोंडापल्ली सीतारामय्या
        ३) कानू संन्याल
        ४) कन्हई चॅटर्जी

    २)  नक्षलवादी चळवळीच्या उभारणीच्या काळात बहुसंख्य सभासद कोण होते ?
        १) वाढत्या महागाईने त्रासलेले बेकार.  
        २) उद्योगांना उत्तेजन न मिळाल्यामुळे निराश झालेले कामगार.
        ३) नैसर्गिक आपत्तीच्या विळख्यात सापडलेले शेतकरी
        ४) तत्कालीन राजकारणामुळे भडकलेले विद्यार्थी.

    ३)  नक्षलबाडी चळवळीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
        १) दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबाडी येथे जमिनीवरून झालेल्या संघर्षातून तिची सुरुवात झाली.
        २) जमिनदारांच्या विरोधात गरीब गावकर्‍यांना जागृत करण्याचे काम किसान परिषदेने केले.
        ३) नक्षलबाडीमधील शेतकरी संघर्षाचे नेते कनू सन्याल हे होते.
        ४) जून १९६७ मध्ये पेकिंग रेडिओने या संघर्षाची प्रशंसा केली.

    (२) दहशतवाद, हिंसा व अत्याचार
    जागतिक स्थिती
     
    १)  युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर पुढील वांशिक गटांमध्ये हिंसाचार झाला :
        १) क्रोएट, सर्ब आणि स्लाव्ह लोक
        २) क्रोएट, सर्ब आणि ख्रिस्ती लोक
        ३) क्रोएट, सर्ब आणि मुस्लीम लोक
        ४) स्लाव्ह, सर्ब आणि मुस्लीम लोक

    २)  पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही?
      a) इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉसची स्थापना स्वित्झर्लंडमध्ये १८६४ मध्ये झाली. रेडक्रॉस युद्धातील घायाळांना तसेच नैसर्गिक आपत्तीपिडितांच्या मदतीला येते.
       b) रेडक्रॉस एचआयव्ही/एड्स कार्यक्रमही राबविते.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही

    दहशतवादविरोधी कायदे व संघटना
     
    १)  खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
        १) दहशतवाद प्रतिबंधक कायदा (POTA) २००२ मध्ये मंजूर झाला होता.
        २) भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देखील दहशतवाद प्रतिबंधक कायद्याची टीकात्मक समीक्षा केली होती.
        ३) दहशतवाद प्रतिबंधक कायद्याची (POTA) जागा दहशतवादी आणि विघातक कारवाया (प्रतिबंधक) कायद्याने (TADA) घेतली होती.
        ४) वरीलपैकी एकही नाही

    २)  पुढील विधानांचा विचार करा.
              a) सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) हा भारतातील फुटीरवादी समस्येशी निगडीत आहे.
        b) हा कायदा सिक्कीम राज्यात लागू आहे.
        c) हा कायदा अशांत भागात लष्कर, नौदल, वायुदल याच्या तैनातीस मज्जाव करतो.
        वरीलपैकी कोणते सत्य आहे?
        १) (a) (b)
        २) फक्त (a)
        ३) (a)+(b) (c)
        ४) (a) (c)

    ३)  खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही?
        a) राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स) नवी दिल्लीत आहे.
        b) नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्यूरो नवी दिल्लीत आहे.
        पर्यायी उत्तरे -
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
              ३) दोन्ही नाही
        ) दोन्ही

     ४)  कैद्यांच्या हक्का संदर्भात पुढीलपैकी कोणते हक्क कैद्यांना देण्यात आलेले नाहीत?
        a) तुरुंगात काम करणार्‍या कैद्यांच्या वेतनात वाढ
        b) समानता व न्याय वागणुकीचा हक्क
        c) वैवाहिक जोडीदाराची वैवाहिक हक्कासह तुरुंगात भेट
        d) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
        पर्यायी उत्तरे -
        १) (a) आणि (b)
        २) (b) आणि (c)  
        ३) (a) आणि (c)                 
        ४) (c) आणि (d)  

     ५)  फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकणारा गुन्हा केल्याचा आरोप असण्याचा व्यक्तीला अटक करताना ....... मधील कलम क्र. ४६ पोलिसांना वाजवी बळाचा वापर करण्याचा अधिकार देते अशा बळाचा वापर त्या व्यक्तीचा मृत्यूस कारणीभूत ठरत असेल तरी.
        १) भारतीय दंड विधान
        २) फौजदारी प्रक्रिया संहिता
        ३) मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३
        ४) दहशतवाद प्रतिबंधक कायदा, २००२

    (३) दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया
     
    १)  खालील यादीतील योग्य जोड्या जुळवा व यादीतील पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा.
              दिनांक                                               बॉम्बस्फोट झालेले प्रदेश व मृत्यू.
            a) ८ सप्टेंबर २००६    i)  अहमदाबादमध्ये १७ बॉम्बस्फोट मालिकेत २९ लोकांचा मृत्यू व १०० जखमी
            b) २६ जुलै २००८     ii)  हैद्राबादमधील लुंबींनी पार्क व उपहारागृहातील बॉम्बस्फोटात सुमारे ४२ लोकांचा  मृत्यू.
            c) २९ ऑक्टोबर २००५             iii)  महाराष्ट्रातील मालेगावमध्ये मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत ३७ लोकांचा मृत्यू व १२५ जखमी.
             d) २५ ऑगस्ट २००७       iv) दिल्लीत झालेल्या तीन शक्तिशाली बॉम्बस्फोट मालिकेत ७० लोकांचा मृत्यू
                       (a)         (b)          (c)        (d)               
              १)     (i)          (ii)          (iii)       (iv)
              २)     (iii)       (i)           (iv)       (ii)
              ३)     (iv)        (i)           (iii)       (ii)
              ४)     (iii)       (iv)         (ii)        (i)

    २)  १४ फेब्रुवारी २०१९ रोजी काश्मीर मधील कोणत्या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला ?
        १) पठाणकोट
        २) पुलवामा
        ३) लेथपोरा
        ४) कुपवाडा

    ३)  जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा.
        जगातील दहशतवादी संघटना               देश
        a)  अल्-कायदा                     i)  पॅलेस्टाईन
        b) आर्म्ड इस्लामिक ग्रुप             ii)  क्युबा
        c) हमास                         iii)  अफगाणिस्तान
        d) नॅशनल लिबरेशन आर्मी           iv)  अल्जीरिया
        पर्याय :
                       (a)         (b)          (c)        (d)               
        १) (ii)         (iii)         (iv)       (i)
        २) (iii)       (ii)          (iv)       (i)
        ३)  (i)          (ii)          (iii)       (iv)
        ४)    (iii)       (iv)         (i)         (ii)

    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१६५)
    १-३
    २-३
    ३-४
    ४-४
    ५-४
    ६-४
    ७-३
    ८-२
    ९-२
    १०-३

    (१) दहशतवाद,नक्षलवाद व माओवाद
    पंजाबमधील असंतोष व तणाव
    १-३
    २-३

    आसाममधील असंतोष
    १-४

    नक्षलवाद आणि माओवाद
    १-२
    २-४
    ३-२

    (२) दहशतवाद, हिंसा व अत्याचार
    जागतिक स्थिती
    १-३
    २-१

    दहशतवादविरोधी कायदे व संघटना
    १-३
    २-२
    ३-३
    ४-३
    ५-२

    (३) दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया
    १-२
    २-३
    ३-४

     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 1015