आंतरराष्ट्रीय चहा दिन / प्रश्‍नमंजुषा (१६२)

  • आंतरराष्ट्रीय चहा दिन / प्रश्‍नमंजुषा (१६२)

    आंतरराष्ट्रीय चहा दिन / प्रश्‍नमंजुषा (१६२)

    • 22 May 2021
    • Posted By : study circle
    • 411 Views
    • 0 Shares
     

     प्रश्‍नमंजुषा (१६२)

     
    १)  यूएनच्या कोणत्या संघटनेमार्फत आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो ?
        १) जागतिक आरोग्य संघटना
        २) जागतिक व्यापार संघटना
        ३) अन्न व कृषी संघटना (एफएओ)
        ४) वरीलपैकी एकही नाही

    २)  खालील जोड्या विचारात घ्या :
        अ) जगात दरडोई प्रतिवर्ष सर्वाधिक चहाचे सेवन करणारा देश  - आयर्लंड
        ब) जगात सर्वाधिक चहाची निर्यात करणारा  देश - केनिया
        क) जगात सर्वाधिक चहाचा वापर करणारा देश - चीन
        ड) जगात सर्वाधिक चहाचे उत्पादन करणारा देश - भारत
        पर्यायी उत्तरे :
        १) अ,   बरोबर आणि क, ड चूक
        २) ब, क आणि आणि अ, ड चूक
        ३) अ, ब चूक आणि क, ड बरोबर               
        ४)  , , क आणि ड  सर्व चूक

    ३)  २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करण्याचा यूएनचा उद्देश काय आहे?
        १) चहा हा जगातील भूक आणि दारिद्र्य निर्मूलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी युएनची आशा आहे.
        २) चहाच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आणि त्याच्या नैतिक आणि टिकाऊ उत्पादनावर लक्ष केंद्रीत करणे.
        ३) चहा उत्पादनाचा हंगाम मे मध्ये बहुतेक चहा उत्पादक देशांमध्ये सुरू होतो.
        ४) वरील सर्व

    ४)  आंतरराष्ट्रीय चहा दिवसासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
        अ) २१ मे २०२१ हा पहिला आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा झाला.
        ब) २००५ साली १५ डिसेंबरला पहिला आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करण्यात आला होता.
        क) २०१५ साली भारताने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एफएओला आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची व्याप्ती वाढवायचा प्रस्ताव दिला.        
        ड)  चहाचा वाढता वापर करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
        पर्यायी उत्तरे :
        १) अ आणि ड बरोबर           
        २)  , क आणि ड बरोबर
        ३) अ, ब आणि ड बरोबर        
        ४)  , क आणि ड बरोबर

    ५)  २०२० पूर्वी कोणत्या कारणासाठी १५ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा केला जात असे ?
        अ) चहा उत्पादनाचा हंगाम डिसेंबरध्ये बहुतेक चहा उत्पादक देशांमध्ये सुरू होतो.
        ब)  जागतिक चहा व्यापार्‍यांचे कामगारांवर आणि उत्पादकांकडे लक्ष केंद्रित व्हावे.
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ
        २) फक्त ब    
        ३) अ आणि ब दोन्ही
        ४) कोणतेही नाही

    ६)  खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
        १) चहामधील फायटोकेमिकल्स मानवी शरीरात शक्तिशाली अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट्स म्हणून कार्य करतात.
        २) बलॅक टीमध्ये कॅटेचिन नावाच्या अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण मोठे असते.
        ३) ग्रीन चहामध्ये असलेले विशिष्ट गुणधर्म शरीरातील कोलेस्टरॉलच्या वाढीस प्रतिबंध करतात.
        ४) चहा  मेंदूपेक्षाही स्नायूंना हे पेय जास्त उत्साहवर्धक आहे.

    ७)  खालील जोड्या अचूक जुळवा :
            स्तंभ अ                                  स्तंभ ब
        अ. आसाम टी                                           I. चहाचे पीक समतल जमिनीवर घेतले जाते.
        ब. दार्जिलिंग टी                                        II. हिरव्या व काळ्या रंगाच्या चहाचे उत्पादन घेतले जाते.
        क. निलगिरी टी                                     III. १८४१ पासून चिनी चहाची रोपे उगवली जातात.
        ड. कांगडा टी                                           IV.  जीआय मानांकन आहे.
        पर्यायी उत्तरे :
                             
              (1)     II          III         I             IV
              (2)     II          I            III          IV
              (3)     III         IV         II           I
              (4)     I            III         IV          II

    ८)  ईस्ट इंडिया कंपनी संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
        अ) १८५८ पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीकडे चीनमधून चहा खरेदी करण्याची मक्तेदारी होती.
        ब) कंपनीची चहा व चीनशी व्यापार याबाबतची मक्तेदारी १८३३ च्या सनदी कायद्याने संपुष्टात आली.
        क) १८१३ च्या सनदी कायद्याने कंपनीची चहा व चीनशी व्यापारची मक्तेदारी पुढील २० वर्षे अबाधीत राहिली.
        वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ
        २) फक्त अ आणि ब           
        ३) फक्त ब आणि क
        ४) अ, ब आणि क

    ९)  भारतात कोणत्या ठिकाणी  सर्वप्रथम इंग्लिश टी गार्डन तयार करण्यात आले ?
        १) आसाममध्ये जोरहाट येथे १८४१ मध्ये
        २) दार्जिलिंग येथे १८४१ मध्ये
        ३) वरील दोन्ही
        ४) आसाममध्ये झाबुआ येथे १८३७ मध्ये

    १०) कुरिंजी फूल संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
        अ)  या फुलाच्या सुगंधामुळे तेथील उत्पादित चहामध्ये विशिष्ट सुगंध आणि चव असते.
        ब)  हे फूल १२ वर्षांतून एकदा उमलते.
        क) हे फूल  हिमाचल प्रदेशातील कांगडा भागाते आढळते.  
        ड) सदर फुलामुळे कांगडा टी ला जी आय निर्देश मिळाले.
        पर्यायी उत्तरे :
        १) विधाने अ आणि ब बरोबर
        २) विधाने ब, क आणि ड बरोबर
        ३) विधाने अ, ब आणि ड बरोबर
        ४) विधाने अ, क आणि ड बरोबर

    ११) एकोणीसाव्या शतकात ब्रिटनचा चहापुरवठादार चीन चिनी चहाची किंमत केवळ  ...... स्वरूपात घेण्यावर आग्रही होता.
        १) अफूच्या
        २) पौंडाच्या
        ३) चांदीच्या
        ४) सोन्याच्या

    १२) अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात दीर्घकाळ उकळलेल्या चहाचे सेवन केल्याने कोणता असाध्य विकार निर्माण होण्याची शक्यता असते ?
        १) अल्झायमर्स (स्मृतीनाश)
        २) मेटॅबॉलिक सिंड्रोम
        ३) जठराचा अल्सर
        ४) यापैकी नाही

    १३) खालील जोड्या अचूक जुळवा :
           स्तंभ अ (चहा)                स्तंभ ब (एका कपातील कॅफिन)
        अ. व्हाईट टी                                             I. १५ मिलीग्रॅम
        ब. ग्रीन टी                                                II. २५ मिलीग्रॅम
        क. ब्लॅक टी                                            III. ३० मिलीग्रॅम
        ड. ओलोंग टी                                           IV. ४० मिलीग्रॅम
        पर्यायी उत्तरे :
                             
              (1)     II          IV         III          I
              (2)     I            II          IV          III
              (3)     III         IV         I             II
              (4)     IV         III         I             II

    १४) ब्लॅक टी पिण्याचे फायदे कोणते ?
        १) हृदयाशी निगडीत अडचणी दूर करण्यास उपयुक्त
        २) वजनवाढीवर नियंत्रण
        ३) पचनक्रिया सुधारते
        ४) वरील सर्व

    १५) चहाच्या उत्पादनात असलेल्या वाट्यानुसार देशांचा योग्य चढता  क्रम लावा.
        अ) श्रीलंका     
        ब) केनिया
        क) भारत
        ड) चीन
        पर्यायी उत्तरे :
        १) अ - ब - क - ड
        २) क - अ - ड - ब
        ३) ब -  ड - अ - क           
        ४) ड - ब - अ - क

    १६) गेली १५० वर्षे अर्ल ग्रे टी ने फक्त ब्रिटिश नाही तर युरोपियन लोकांचं आयुष्य व्यापलं आहे. अर्ल ग्रे चहाला हे नाव  कोणापासून मिळाले ?
        १) ब्रिटनचे पंतप्रधान चार्ल्स ग्रे पहिला यांच्या नावावरून
        २) ब्रिटिश अभिनेता चार्ल्स ग्रे यांच्या नावावरून
        ३) ब्रिटनचे राजे चार्ल्स ग्रे दुसरा यांच्या नावावरून
        ४) ब्रिटनचे पंतप्रधान चार्ल्स ग्रे दुसरा  यांच्या नावावरून

    १७) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
        विधान (अ) : व्हाईट टी या चहाचा स्वाद कडक नसतो.
        कारण (र) : चहाच्या झाडाची पाने खूपच कोवळी असताना खोडली जातात आणि त्यापासून हा चहा बनवला जातो.
        पर्यायी उत्तरे :
        (१)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही
        (२)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
        (३)  (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
        (४)  (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.

    १८) खालीलपैकी कोणता देश भारतातून मोठ्या प्रमाणावर चहाची आयात करत नाही ?
        १) इराण
        २) यूके
        ३) संयुक्त अरब अमिरात
        ४) ऑस्ट्रेलिया

    १९) चहाच्या निर्यात व्यापारात असलेल्या वाट्यानुसार देशांचा योग्य उतरता क्रम लावा.
        अ) भारत      
        ब) केनिया
        क) चीन
        ड) श्रीलंका
        पर्यायी उत्तरे :
        १) अ - ब - क - ड
        २) क - अ - ड - ब
        ३) ब -  ड - अ - क           
        ४) ड - ब - अ - क

    २०) खालीलपैकी कोणत्या  चहाला जीआय (जीओग्राफिकल इंडिकेशन) मानांकन प्राप्त झाले आहे ?
        १) आसाम टी
        २) दार्जिलिंग टी
        ३) निलगिरी टी
        ४) २ आणि ३

    २१) आसामी चहाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे ?
        १) कॅमेलिया असामिका
        २) कॅमेलिया कॅनेफोरा
        ३) कॅमेलिया सिनेसिस
        ४) कॅमेलिया थिकेसिया

    २२) खालील विधाने विचारात घ्या:
              a) दार्जिलिंग चहाची सुरुवातीची लागवड आर्चिबाल्ड कॅम्पबेल याने केली होती.
              b)  आसाममध्ये चिनी चहाचे उत्पादन होऊ शकतं, याचा शोध सर्वप्रथम रॉबर्ट ब्रूस याला १८२३ मध्ये लागला.
              वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
        १) फक्त (a)
        २) फक्त (b)                   
        ३) (a) (b) दोन्ही              
        ४) दोन्हीही नाहीत

    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१६२)
    १-३
    २-४
    ३-४
    ४-२
    ५-२
    ६-२
    ७-४
    ८-३
    ९-४
    १०-१
    ११-३
    १२-१
    १३-२
    १४-४
    १५-१
    १६-४
    १७-२
    १८-४
    १९-२
    २०-४
    २१-३
    २२-३
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 411