ब्रिटिश काळातील कायदे / प्रश्‍नमंजुषा (१६०)

  • ब्रिटिश काळातील कायदे / प्रश्‍नमंजुषा (१६०)

    ब्रिटिश काळातील कायदे / प्रश्‍नमंजुषा (१६०)

    • 21 May 2021
    • Posted By : study circle
    • 11692 Views
    • 23 Shares
     ब्रिटिश काळातील कायदे
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षातब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास ’यावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. ब्रिटिशांनी केलेले कायदे, भारतातील घटनात्मक उत्क्रांती, नेमलेल्या समित्या व आयोग, विविध  परिषदा, करार आणि त्यावर विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) :  इतिहास विभाग
     
    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
     
    १.८ ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास  -
     
        भारतीय परिषद कायदा-१८६१, भारतीय परिषद कायदा-१८९२, भारतीय परिषद कायदा-१९०९ (मोर्ले-मिंटो सुधारणा), भारत सरकारचा कायदा-१९१९ (माँट-फोर्ड सुधारणा), भारत सरकारचा कायदा-१९३५.
     
    १.१० सत्तेच्या हस्तांतरणाकडे -
     
        ऑगस्ट घोषणा - १९४०, क्रिप्स योजना - १९४२, वेव्हेल योजना - १९४५, कॅबिनेट मिशन योजना - १९४६, माऊंटबॅटन योजना १९४७, भारतीय स्वातंत्र्य कायदा - १९४७.
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व  चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    ब्रिटिश काळातील कायदे, करार, आयोग व परिषदा
     
    १)  ब्रिटिशांनी केलेले कायदे
    २)  घटनात्मक उत्क्रांती
        १) १७७३ चा रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट      
        २) १७८४ चा पिट्स इंडिया अ‍ॅक्ट
        ३) १७९३ चा सनदी कायदा         
        ४) १८१३ चा सनदी कायदा
        ५) १८५३ चा सनदी कायदा
        ६) १८५८ चा भारताच्या सुशासनाचा कायदा 
        ७) १८६१ चा इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट
        ८) १८९२ चा इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट
        ९) १९०९ चा इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट
        १०)१९१९ चा भारतीय प्रशासकीय कायदा
        ११)१९३५ चा भारत सरकारचा कायदा
    ३)  करार
        १) लखनौ करार
        २) गांधी-आयर्विन करार
        ३) जातीय निवाडा
        ४) पुणे करार
    ४)  आयोग व समित्या
        १) १९२४ ची मुडीमन समिती
        २) १९२७ चे सायमन कमिशन
        ३) १९४२ चे क्रिप्स मिशन
        ४) १९४५ ची वेव्हेल योजना  व१९४६ चे कॅबिनेट मिशन
    ५)  परिषदा
        १) ऑल पार्टी कॉन्फरन्स
        २) गोलमेज परिषदा
    (१) कायदे
     
    १)  ब्रिटिशांनी केलेल्या कायदेशीर सुधारणा :            
        a) सिव्हिल प्रोसिजर कोड                   i) १८६१
        b) इंडियन पिनल कोड                                ii) १८५८
        c) राणीचा जाहीरनामा.                                iii) १८५९
        d) व्हर्नाक्युलर प्रेस अ‍ॅक्ट                   iv) १८८०
        पर्यायी उत्तरे :
                       (a)      (b)           (c)        (d)
              १)     (i)       (iii)         (ii)       (iv)
              २)     (iii)     (i)            (ii)       (iv)
              ३)     (ii)      (i)            (iii)      (iv)
              ४)     (iv)     (ii)           (i)         (iii)

    २)  खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
        १) लॉर्ड कॅनिंग - राज उपाधी कायदा
        २) लॉर्ड लिटन - भारतीय शस्त्र कायदा
       ३) लॉर्ड रिपन - प्रथम फॅक्टरी कायदा
        ४) लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा

    ३)  खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे
        १) इ.स. १८५७-परवाना कायदा
        २) इ.स. १८५१-विधवा पुनर्विवाह कायदा             
        ३) इ.स. १८९०-संमती वयाचा कायदा
       ४) इ.स. १८५८-भारताचा उच्च न्यायालयासंबंधी कायदा

    ४)  लॉर्ड कर्झनने कोणत्या साली शेतकर्‍यांना कमी व्याजाने कर्ज मिळविण्यासाठी सहकारी पतपेढी कायदाकेला?
        १) १९०४
        २) १९०५
        ३) १९०६
        ४) १९०७

    ५)  अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था ...... मध्ये स्थापन करण्यात आली.
        १) १९५१
        २) १९२६
        ३) १९१७
        ४) १९७१

    ६)  १९३० मध्ये सरकारने शारदा कायदा मंजूर केला ह्याप्रमाणे मुलाचे व मुलीचे लग्नासाठी किमान वय किती असावे असे सांगण्यात आले.
        १) १८ व १४ वर्षे
        २) १८ व १६ वर्षे
        ३) १६ व १४ वर्षे
        ४) १६ व १२ वर्षे

    ७)  भारतीयांच्यातील राष्ट्रीयत्वाच्या भावनेला दाबून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुढीलपैकी कोणते प्रतिगामी उपाय योजले होते?
              a) व्हर्न्याक्यूलर प्रेस अ‍ॅक्ट
        b) आर्म्स अ‍ॅक्ट
        c) लायसन्स अ‍ॅक्ट
              d) लँडस अ‍ॅक्ट
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (c) फक्त
        २) (b), (c) आणि (d) फक्त
        ३) (a), (c) आणि (d) फक्त
        ४) (a), (b) आणि (c) फक्त

    ८)  इल्बर्ट बिलाचा वाद याच्याशी संबंधित होता ?
        १) भारतीयांनी शस्त्रे बाळगण्यावर काही निर्बंध घालण्याबाबत
        २) भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणार्‍या वृत्तपत्र आणि मासिकावर प्रतिबंध घालण्याबाबत
        ३) युरोपियन लोकांवर खटला चालवण्याबाबत भारतीय दंडाधिकार्‍यांना असलेले निर्बंध काढून टाकण्याबाबत
        ४) सुती कापडाच्या आयातीवर असलेले शुल्क काढून टाकण्याबाबत.

    ९)  पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?            
        a) इल्बर्ट बिल चा हेतू भारतीय न्यायाधीशांना भारतातील ब्रिटिश न्यायाधीशांच्या पातळीवर आणण्याचा होता.
              b) इल्बर्ट बिल मागे घेण्यात आले कारण त्याच्या मसुद्यात चूक होती.
        पर्यायी उत्तरे :
              १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही (a) (b)
        ४) न (a)  (b)

    १०) सन १९१९ च्या ‘रौलेट‘ कायद्या‘ नुसार :
        a) कोणालाही विना चौकशी फाशी देता येणार होती.
              b) इंग्रज कोणत्याही ठिकाणाची झडती घेऊ शकत होते.
              c) कोणत्याही व्यक्तीला संशयावरून अटक करता येणार होती. d) गुन्हेगाराला अपील करता येणार नव्हते.
        वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
        १) (b),(c) आणि (d)
        २) (b) आणि (d)
        ३) (a),(b) आणि (c)
        ४) (a),(b),(c) आणि (d)

    ११) रौलेट कायद्याचा काय उद्देश होता ?
        १) पहिल्या महायुद्धाच्या काळात आर्थिक पाठिंबा देण्याची सक्ती.
        २) कोणत्याही प्रकारची ट्रायल न करता कैद करण्याची तरतूद
        ३) खिलाफत चळवळीचा बिमोड    
        ४) वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधन

    १२) १९२६ साली मुंबई कायदेमंडळात ...... यांनी असे विधेयक मांडले की ’ग्रामजोशांना’ संस्कार करायला बोलावले नसेल, तर त्यांना दक्षिणा मागण्याचा हक्क राहणार नाही.
        १) बॅरिस्टर जयकर
        २) राव बहादूर सी. के. बोले       
        ३) भास्करराव जाधव
        ४) दामोदर सखाराम यंदे

    १३) खालील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
        a) सन १९२९ मध्ये मान्यता दिल्या गेलेल्या शारदा कायद्याप्रमाणे १४ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी व १८ पेक्षा कमी वयाचा मुलगा लग्न करू शकत नव्हता. 
              b) सन १८९१ मध्ये मान्यता दिलेल्या कायद्याने अांतरजातीय व आंतरसमाजीय विवाहास मंजुरी दिली.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a) योग्य आहे
        २) केवळ (b) योग्य आहे
        ३) न (a) योग्य न (b)
        ४) (a) (b) दोन्ही योग्य

    १४) कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली?
        १) १९३५ चा कायदा
        २) १९४७ चा कायदा
        ३) १९५१ चा कायदा
        ४) १९५५ चा कायदा

     
    (२) घटनात्मक उत्क्रांती
     
    १)  योग्य जोड्या जुळवा.
               कायदा                    वर्ष
        a) मोर्ले मिंटो सुधारणा             i )  १९१९
        b) माँटेग्यू चेल्म्सफोर्ड सुधारणा      ii)  १९४७
        c) भारतीय प्रशासन कायदा         iii) १९०९
        d) भारतीय स्वातंत्र्याचा कायदा             iv) १९३५
                  (a)  (b)    (c)   (d)
        1)  (i)       (ii)           (iv)   (iii)       
        2)  (iii)  (iv)    (ii)   (i)
        3)  (iii)  (i)     (iv)   (ii)
        4)  (ii)  (i)     (iv)   (iii)

    २)  खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
        १) मोर्ले मिंटो सुधारणा कायदा : १९०९
        २) पहिल्या महायुद्धाची समाप्ती  : १९१८
        ३) बंगालची फाळणी : १९१५
        ४) मॉन्टेग्यु चेम्सफोर्ड सुधारणा : १९१९

    ३)  खालील घटना योग्य कालानुक्रमे लावा :
        (i) मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा
        (ii) मुस्लिम लीगची स्थापना
        (iii) माँटेग्यू - चेम्सफर्ड कायदा
        (iv) लखनौ करार
        १) i, ii, iii, iv
              २) ii, i, iv, iii
        ३) iii, ii, i, iv
              ४) iv, iii, ii, i

     
    १) १७७३ चा रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट
     
    १)  कलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली ?
        १) १७७३ चा रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट
        २) १७८४ चा पिट्स इंडिया अ‍ॅक्ट
        ३) १७९३ चा सनदी कायदा
        ४) १८१३ चा सनदी कायदा 

    २)  १७७३ मध्ये ब्रिटिश सरकारने ’रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट’ भारतात लागू केला त्यानुसार :
        अ) सर्वच जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला.
        ब) गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलची सदस्य संख्या ०४ झाली.
        क) मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरांना युद्ध करण्याचा अधिकार राहिला नाही.
        ड) दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले.
        वरीलपैकी कोणते विधान/कोणती विधाने बरोबर आहे/आहेत?
        १) (अ) फक्त
        २) (अ) आणि (ब) फक्त
        ३) (ब) आणि (क) फक्त
        ४) (ब), (क) आणि (ड)

    ३)  ब्रिटिश कंपनीने ‘नियामक कायदा‘ इ. स. १७७४ साली पास केला त्याचे मुख्य कारण :              
              a) भारतातील कंपनी प्रशासन मजबूत करावयाचे होते.
              b) कर्मचार्‍यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालायचा होता.
              c) संचालक मंडळाचे अधिकार वाढवायचे होते.
              d) कंपनीच्या व्यवहारावर व राज्यकारभारावर अंकुश ठेवायचा होता.
        वरील पर्यायातून बरोबर पर्याय असलेली जोडी खाली दिलेली आहे ती ओळखा.
        १) (a) आणि (c)
        २) (b) आणि (d)
        ३) (c) आणि (b)
        ४) (d) आणि (a)

     
    २) १७८४ चा पिट्स इंडिया अ‍ॅक्ट
    ३) १७९३ चा सनदी कायदा
    ४) १८१३ चा सनदी कायदा
     
    १)  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?
        १) १७९३ चा सनदी कायदा
        २) १८१३ चा सनदी कायदा
        ३) १७७३ चा नियमनाचा कायदा
        ४) १८५८ चा भारताच्या सुशासनाचा कायदा

     
    १८५३ चा सनदी कायदा
     
    १)  भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले ?           
        १) रेग्यूलेटींग अ‍ॅक्ट १७७३         
        २) चार्टर अ‍ॅक्ट १८३३            
        ३) चार्टर अ‍ॅक्ट १८५३
        ४) इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट १८६१

     
    ५) १८५८ चा भारताच्या सुशासनाचा कायदा 
     
    १)  इ.स. १८५७ च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली ?
        १) १ डिसेंबर १८५९
        २) १ डिसेंबर १८५८
        ३) १ नोव्हेंबर १८५७
        ४) १ नोव्हेंबर १८५८

    २)  भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले ?
        १) इ.स.१८५५
        २) इ.स.१८५६
        ३) इ.स.१८५७
        ४) इ.स.१८५८

    ३)  ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया हिने १ नोव्हेंबर १८५८ मध्ये जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश नव्हता ?
        अ) भारतीयांना जात, वर्ण व धर्माचा विचार न करता सरकारी नोकरी देणे.
        ब) भारतीयांना आर्थिक स्वतंत्र व समानता याची हमी देण्यात आली.
        क) कायद्याच्या अंमलबजावणीत जनतेच्या भावनांचा विचार करण्यात येईल.
        ड) कायदे मंडळात भारतीय प्रतिनिधींचा ७५% वाटा असेल.
          योग्य पर्याय निवडा.
        १) अ, ब आणि ड
        २) अ, क आणि ड
        ३) ब आणि क
        ४) फक्त ड

    ४)  १८५८ च्या राणीच्या जाहीरनाम्यात पुढीलपैकी कोणत्या तरतुदी नव्हत्या?
        a) भारतीयांच्या धार्मिक जीवनात सरकार हस्तक्षेप करणार नाही.
        b) भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी केलेले करार पाळले जातील.
              c) अराजक असलेली संस्थानेच खालसा केली जातील.
              d) उच्च जातीच्या लोकांना नोकर्‍या दिल्या जातील.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (c)
        २) (a) आणि (d)
        ३) (b) आणि (c)
        ४) (c) आणि (d)

    ५)  खालीलपैकी कोणते बदल १८५८ च्या कायद्याने घडवून आणले?
        a) बोर्ड ऑफ कंट्रोल व कोर्ट ऑफ डायरेक्टर्स या दुहेरी सत्तेचा शेवट
        b) संसदीय मंत्रिपदाची निर्मिती
        c) भारतमंडळाची स्थापना
        d) विधीविषयक कार्यासाठी गव्हर्नर - जनरलच्या कौन्सिलचा विस्तार
        पर्यायी उत्तरे
        १) (a), (b), (c)
              २) (a), (c)
              ३) (a), (c), (d)
              ४) (a), (b), (c), (d)

     
    ६) १८६१ चा इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट
     
    १)  २६ जुलै, १८६२ ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरू झाले नाही ?
        १) मुंबई
        २) अलाहाबाद
        ३) कोलकाता
        ४) मद्रास

     
    ७) १८९२ चा इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट
    ८) १९०९ चा इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट
     
    १)  कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ?
        १) १८१३
        २) १९०९
        ३) १९१९
        ४) १९३५

    २)  कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती केली ?
        १) १८१३ च्या सनदी कायद्याने
        २) १९०९ च्या मोर्ले मिंटो सुधारणा  
        ३) १९१९ च्या मॉन्टेग्यू चेल्म्सफोर्ड सुधारणा
        ४) १९३५ च्या भारत सुधारणा कायद्याने

    ३)  १९०९ च्या सुधारणा कायद्याचे नाव काय ?
        १) माँटेग्यू-चेल्म्सफर्ड कायदा
        २) मोर्ले मिंटो
        ३) रौलेट अ‍ॅक्ट
        ४) यांपैकी नाही

    ४)  भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे ‘चांदोबाची मागणी‘ असा उल्लेख कोणी केला ?                  
        १) भारतमंत्री - मोर्ले
        २) व्हाईसरॉय-मिंटो
        ३) भारतमंत्री - माँटेग्यू
        ४) व्हाईसरॉय - चेम्सफोर्ड 

    ५)  मोर्ले मिंटो सुधारणांचे श्रेय मोर्ले यांना नसून मिंटोनाच आहे, असे लेडी मिंटो यांचे म्हणणे होते. परंतु  मोर्ले व्यापक सुधारणा करू इच्छित होते म्हणून त्यांचेही महत्त्व होते. मोर्ले यांच्या पत्र व्यवहारातील पुढीलपैकी कोणत्या सूचनांवरून हे स्पष्ट होते ?
        a) लोकांसाठी सुधारणा करण्याच्या दिशेने आपण पावले उचलावीत.
              b) आपण सुधारणा केल्या नाहीत तर मागण्या वाढतील व त्यांना राष्ट्रीय स्वरुप प्राप्त होईल.
              c) सुधारणांची सुरुवात तळापासून करावी.
              d) जिल्हा लोकल बोर्ड आणि नगरपालिकात अधिक प्रमाणात भारतीय प्रतिनिधी नेमावेत व त्यांना जास्त अधिकार मिळतील असे करावे.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि  (b)
        २) (c) आणि (d)
        ३)  (b) आणि (c)
        ४) (d) आणि (a)

    ६)  पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
        a) गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झालेले सत्येंद्र प्रसन्न सिन्हा प्रथम भारतीय होते.
              b) सत्येंद्र प्रसन्न सिन्हा त्यानंतर एका प्रांताचे गव्हर्नर बनविले गेले व तसे नेमणूक झालेले ते इंग्रजांच्या काळातील दुसरे भारतीय होते.
        पर्यायी उत्तरे -
        १) केवळ (a)
              २) केवळ (b)
              ३) दोन्ही (a)  (b)
        ४) न (a)  (b)

     
    ९) १९१९ चा भारतीय प्रशासकीय कायदा
     
    १)  कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली?
        १) १८९२
        २) १९०९
        ३) १९१९
        ४) १९३५

    २)  भारतमंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली ?
        १) १९९२ चा कायदा
        २) १९०९ चा कायदा
        ३) १९१९ चा कायदा
        ४) १९३५ चा कायदा

    ३)  १९१९ च्या माँटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती?
        १) १३५ व ५०
        २) १३५ व ६०
        ३) १४५ व ५०
        ४) १४५ व ६०

    ४)  १९१९ च्या कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे दोन प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली, तेव्हा आणि ....... या दोघांची नियुक्ती केली गेली.
        १) वलंगकर आणि शिवराम जानबा कांबळे
        २) किसन फागोजी बंदसोडे व विठ्ठल रामजी शिंदे
        ३) गवई व कालीचरण नंदा गवळी
        ४) बाबासाहेब आंबेडकर व श्रीपाद महादेव माटे

    ५)  १९१९ चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात  लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली ?
        १) दादाभाई नौरोजी
        २) नेताजी सुभाष बोस
        ३) चित्तरंजन दास
        ४) भूपेन्द्रनाथ बसू 

    ६)  ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईलअसे १९१७ साली ...... यांनी घोषित केले.
        १) मोर्ले
        २) मिन्टो
        ३) मॉन्टेग्यू
        ४) चेम्सफोर्ड

    ७)  १९१९ च्या ’माँट-फोर्ड कायद्यावर’ हे ’स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे’ अशी टीका कोणी केली?
        १) लाला लजपतराय
        २) लोकमान्य टिळक
        ३) महात्मा गांधी
        ४) पंडित नेहरू

    ८)  माँटेग्यू-चेल्म्सफर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत कोणता लेख लिहिला ?
        १) सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?
        २) जनाब दिल्ली तो बहुत दूर है ।
        ३) चलो दिल्ली
        ४) वरीलपैकी कोणताच नाही 

    ९)  खालीलपैकी कोणते कलम १९१९ च्या माँटफर्ड सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आले होते?
        १) या कायद्याने ‘हाय कमिशनर फॉर इंडिया’ या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली.
        २) स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला.
        ३) भारत मंत्र्यांचा पगार हिंदुस्थानाच्या तिजोरीतून देण्याची तरतूद केली.
        ४) इंडिया कौन्सिलच्या सभासदांची तिजोरीतून संख्या ८ वरून ४ करण्यात आली.

    १०) इ. स. १९१९ च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?
        १) उदारमतवादी पक्ष
        २) स्वराज्य पक्ष
        ३) काँग्रेस पक्ष
        ४) मुस्लीम लीग

    ११) १९१९ चा इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट म्हणजे ......
        a) माँट-फोर्ड सुधारणा कायदा
        b) १९०९ च्या कायद्यातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी पारित केलेला कायदा.
        c) या कायद्याने भारतात जबाबदार राज्य पद्धतीची पाया भरणी केली.
        d) मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b) आणि (d) फक्त
        २) (a), (b) आणि (c) फक्त
        ३) (a), (c), आणि (d) फक्त
        ४) (b), (c) आणि (d) फक्त

    १२) ............ हा १९१९ च्या कायद्याचा प्रमुख उद्देश होता.
        १) शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे.
        २) जबाबदार शासनपद्धती अस्तित्वात आणणे.
        ३) गव्हर्नर जनरलचे अधिकार व्यापक करणे.
        ४) स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरुवात करणे.

    १३) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९१९ मधील तरतुदी ओळखा.
        १) प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती (कार्यकारी सरकारचे काम करताना)
        २) मुस्लिमांसाठी वेगळे मतदार संघ
        ३) केंद्राकडून राज्यांना वैधानिक सत्तेचे विकेंद्रीकरण
          योग्य पर्याय निवडा :
        १) फक्त १
        २) फक्त २ आणि ३
        ३) फक्त १ व ३
        ४) १, २ आणि ३

    १४) १९१९ च्या माँटेग्यू चेल्म्सफर्ड कायद्यात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या?
        a) भारतीय मंत्र्याचा पगार इंग्लडच्या तिजोरीतून दिला जावा.
        b) भारतीय उच्च आयुक्त हा भारताच्या व्हॉइसरॉयचा इंग्लंडमधील प्रतिनिधी म्हणून काम पाहिल.
              c) प्रांतांमध्ये द्विदल राज्यपद्धती निर्माण करावी.
              d) भारतीय मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जावा.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b) आणि (c) फक्त        
        २) (a), (c) आणि (d) फक्त
        ३) (b), (c) आणि (d) फक्त
        ४) (c) आणि (d) फक्त

    १५) पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे?
        a) १९१९ च्या कायद्यान्वये मुसलमानांसाठी खास मतदार संघ सुचविले गेले.
        b) १८६१ च्या कायद्यान्वये व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये बिगर शासकीय सदस्यांचा समावेश सुचविला गेला.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही

     
    १०) १९३५ चा भारत सरकारचा कायदा
     
    १)  खालीलपैकी कोणत्या काळात ‘प्रांतिक स्वायत्तता‘ कार्यरत होती
        १) १९३५ ते १९३९
        २) १९३५ ते १९३७
        ३) १९३७ ते १९३९
        ४) १९३९ ते १९४५

    २)  संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता काय भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला?
        १) १८५८ चा कायदा
        २) १९१९ चा कायदा
        ३) १९३५ चा कायदा
        ४) १९४७ चा कायदा

    ३)  कोणता कायदा भारताचा ’प्रांतीय स्वायत्तता कायदा’ म्हणून ओळखला जातो?
        १) १८६१ इंडियन हायकोर्ट अ‍ॅक्ट
        २) १९०९ मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा
        ३) १९१९ माँटेग्यू - चेल्म्सफर्ड कायदा
        ४) १९३५ चा कायदा

    ४)  १९३५ चा भारत सरकारचा कायदा हा संपूर्णता कुजलेला, मूळत: वाईट आणि पूर्णत: अस्वीकार्य आहे”, असे उद्गार कुणी काढले?
        १) पं. नेहरू
        २) म. गांधी
        ३) एम. ए. जिना
        ४) मोतीलाल नेहरू

    ५)  १९३५ च्या कायद्यानुसार संघराज्य सरकार व प्रांतिक सरकार यांच्या अधिकार कक्षाखाली प्रशासनात कोणती खाती होती ?
        अ) कायदेविषयक सरकारची खाती
        ब) मध्यवर्ती सरकारची खाती 
        क) आर्थिक सरकारची खाती
        ड) संयुक्त अधिकार सरकारची
        १) अ आणि क चूक
        २) ब आणि ड बरोबर
        ३) वरील सर्व चूक
        ४) वरील सर्व बरोबर

    ६) हिंदुस्तान सरकारच्या १९३५ च्या कायद्याची पार्श्‍वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ?
        अ) मुडिमन समिती आणि तिचा अहवाल
        ब) सायमन कमिशन
        क) नेहरु रिपोर्ट
        ड) बॅरीस्टर जिन्नांचे १४ मुद्दे
        वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
        १) अ, ब आणि क
        २) ब, क आणि ड
        ३) अ, ब आणि ड
        ४) अ, , क आणि ड

    ७)  १९३५ च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत ?
              a)  अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्‍चन, शिख हे मतदारसंघ तयार केले.
        b) संघ न्यायालयाची स्थापना
        c)  भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती
        d) दुहेरी शासनव्यवस्थेपेक्षा वाईट कायदा‘ असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b), (c) विधाने बरोबर आहेत.
        २) (b), (c) विधाने बरोबर आहेत.
        ३) (a), (c) विधाने बरोबर आहेत.
        ४) (a), (b), (d) विधाने बरोबर आहेत.

    ८)  १९३५ च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अमलात आणल्या नाहीत?
        a) भारतमंडळ रद्द
              b) भारतीय संघराज्य
              c) केंद्रातील द्विदल राज्यपद्धती
              d) प्रांतीय स्वायत्तता
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) फक्त
        २) (b) आणि (c) फक्त
        ३) (a), (b) आणि (c) फक्त
        ४) (d) फक्त

    ९)  गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट-१९३५ मधील खालील तरतूदी विचारात घ्या :
        a) या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्‍चन आणि अँग्लो-इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले.
              b) शेषाधिकार हे केन्द्र शासनाकडे सोपविले होते.
              c) या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली.                               
        पर्यायी उत्तरे :
        १) विधाने (a),(b)  बरोबर आहेत
        २) विधाने (b),(c) बरोबर आहेत
        ३) विधाने (a),(c) बरोबर आहेत
        ४) विधाने (a),(b),(c) बरोबर आहेत

    १०) भारत सरकार अधिनियम-१९३५ ची कोणती वैशिष्ट्ये आहेत?
        अ) संघराज्य व प्रांतिक स्वायत्तता
        ब) केंद्रातील द्विशासन
        क) द्विगृही केंद्रीय कायदेमंडळ
        ड)  केंद्र आणि प्रांत यांच्यात वैधानिक अधिकारांची विभागणी
        १) अ आणि ड
        २) अ, ब आणि ड
        ३) अ, क आणि ड
        ४) अ, , क आणि ड

    ११) भारत सरकार अधिनियम, १९३५ मधील ‘सूचनापत्राचा’ समावेश १९५० च्या संविधानात कसा केला आहे ?
        १) मूलभूत हक्क
        २) राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे
        ३) मूलभूत कर्तव्य
        ४) केंद्र सूची 

    १२) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९३५ संबंधी खालील वक्तव्य वाचा.
        १) या अ‍ॅक्टमध्ये दोन मुख्य भाग आहे - प्रोव्हिन्सियल आणि फेडरल
        २) फ्रेंचाइज अजूनही प्रॉपर्टी संदर्भावर आधारित होते.
        ३) प्रोव्हिन्शियल स्तरावर सर्व सरकारी विभागांना भारतीय मंत्री यांच्या नियंत्रणात ठेवण्यात आले होते.
        ४) या प्रकारात एक भविष्यवादी प्रकार आहे की फेडरेशन ज्यात प्रमुख विभाग होते, ते केंद्रात ठेवण्यास आले होते यथा वित्त आणि रक्षा, यांचे नियंत्रण निवडलेले मंत्री आणि भारतीय राजेशाही मधून आलेल्या प्रतिनिधींकडे होते.
        वरीलपैकी कोणते वक्तव्य अचूक आहे ?
        १) १, २ व ३ फक्त
        २) २, ३ आणि ४ फक्त
        ३) १, २ आणि ४ फक्त
        ४) १ आणि २ फक्त

    १३) खालीलपैकी १९३५ च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती?
        अ) प्रांतीय स्वायत्तता
        ब) संघराज्याचे न्यायालय      
        क) केंद्रात द्विदल राज्यपद्धती
        ड) दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ
        १) अ आणि ड फक्त
        २) अ, , ड फक्त
        ३) अ, , क आणि ड
        ४) ब आणि क फक्त

     
    (३) करार
    १) लखनौ करार
     
    १)  आता आपले दैव Luck-now अशी शाब्दिक कोटी लखनौ कराराच्या नावावर कोणी केली होती ?
        १) बॅरिस्टर जिन्हा
        २) महात्मा गांधी
        ३) लोकमान्य टिळक
        ४) जवाहरलाल नेहरू

    २)  खालील घटना कालक्रमाने जुळविलेला सुयोग्य पर्याय निवडा:           
              a) लखनौ करार
              b) होमरूल लीग
              c) सुरत काँग्रेस
              d) काँग्रेस लोकशाही पक्ष
        पर्यायी उत्तरे :
        १) (a),(b)(c),(d)
        २) (b),(a),(d),(c)
        ३)  (c),(b),(a),(d)
              ४) (c),(d),(b),(a)

    ३)  खालीलपैकी कोणत्या लखनौ करारातील प्रमुख तरतुदी होत्या ?
        a) वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करणे.
              b) मुस्लिमासाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती करणे.
              c) जहाल मवाळ समेट घडवून आणणे.
              d) स्वदेशी चळवळ उभारणे.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (d)
        २) (a),(b),(c) फक्त
        ३) (b),(c),(d) फक्त
        ४) (a) आणि (b) फक्त

    ४)  १९१६ चा ‘लखनौ करार’ या दोन संघटनांत झाला -
        १) स्वराज्यपक्ष आणि मुस्लीम लीग
        २) हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग
        ३) हिंदू महासभा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
        ४) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लीम लीग 

    ५)  कोण्या अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेस व मुस्लीम लीगचे ऐक्य झाले?
        १) लखनौ
        २) सुरत
        ३) दिल्ली
        ४) मुंबई

     
    गांधी-आयर्विन करार
     
    १)  गांधी - आयर्विन करारामुळे काय साध्य झाले ?
        १) पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता मिळाली.
        २) मिठावरील कर रद्द झाला.      
        ३) गांधीजींनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
        ४) वरीलपैकी काहीही नाही. 

    २)  गांधी-आयर्विन कराराने ...... ला स्थगिती देण्यात आली.
        १) चले जाव चळवळ
        २) असहकार चळवळ
        ३) रौलेट विरोधी सत्याग्रह
        ४) सविनय कायदेभंग चळवळ

     
    जातीय निवाडा
     
    १)  ’जातीय निवाडा’ या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला?
        १) १६ ऑगस्ट, १९३२
        २) १७ ऑगस्ट, १९३२
        ३) १८ ऑगस्ट, १९३२
        ४) २० ऑगस्ट, १९३२

    २)  इंग्लंडचे पंतप्रधान ........ यांनी १६ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर केला.
        १) रॅम्से मॅकडोनाल्ड
        २) विन्स्टन चर्चील
        ३) नेव्हील चेंबरलेन
        ४) क्लेमेंट अ‍ॅटली

    ३)  खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ तयार करण्याची तरतूद होती ?
        ) माँटेग्यू-चेल्म्सफोर्ड कायदा
        २) रॅमसे-मॅक्डोनाल्ड निवाडा
        ३) वेव्हेल योजना
        ४) १९३५ चा सुधारणा कायदा

     
    २) पुणे करार
     
    १)  महात्मा गांधी व आंबेडकर यांच्यात पुणे करार होऊन
        १) दलितांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले            
        २) दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले.        
        ३) केंद्रीय कायदेमंडळात दलितांना राखीव जागा देण्यात आल्या नाही
        ४) प्रांतीय कायदेमंडळात दलितांना स्वतंत्र जागा देण्यात आल्या नाही

    २)  इ.स. १९३२ मध्ये डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला करार -
        १) जातीय निवाडा
        २) पुणे करार    
        ३) अस्पृश्योद्धार संबंधीची रूपरेषा
        ४) वरीलपैकी कोणतेही नाही

    ३)  १९३२ साली झालेल्या पुणे करारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजी यांच्यात कोणत्या गोष्टींवर एकमत झाले?
        a) दलितांना सरकारी नोकर्‍यांत आरक्षण
              b) दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ
              c) दलितांसाठी प्रादेशिक विधिमंडळात १४७ राखीव जागा
        d) केंद्रीय कायदेमंडळात दलितांसाठी २८% राखीव जागा
          पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b)
        २) फक्त (c)
        ३) (c) आणि (d)
        ४) (a) आणि (d)

    ४)  पुणे कराराबाबत कोणती विधाने बरोबर आहेत?
        a) बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तो झाला.
        b) आंबेडकरांची स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य झाली.
        c) अस्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात आल्या.
        १) (a), (b)
        २) (a), (c)
        ३) (b), (c)
              ४) वरील तिन्ही

    ५)  पुणे कराराबाबत कोणती विधाने बरोबर आहेत?
        a) बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तो झाला.
        b) आंबेडकरांची स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य झाली.
        c) अस्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात आल्या.
        १) (a), (b)
        २) (a), (c)
        ३) (b), (c)
              ४) वरील तिन्ही

     
    (४) आयोग व समित्या
     
    १)  पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा.
        अ) नेहरू रिपोर्ट
        ब) सायमन कमिशन
        क) मुडीमन कमिशन
        ड) प्रांतीय द्विदल शासन पद्धती
        १) अ, , ,
        २) ड, , ,
        ३) ड, , ,
        ४) ब, , ,

    २)  विविध विषयांचे तज्ज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील ठिकाणी आपली साक्ष नोंदवली.
        a) सायमन कमिशन             
              b) युनिर्व्हसिटी रिफॉर्म्स कमिटी
              c) रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स
              d) साउथ बरो कमिटी
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (b), (c) आणि (d)
        २) केवळ (a), (b) आणि (c)
        ३) केवळ (a) आणि (d)
        ४) सर्व (a), (b), (c) आणि (d)

    ३)  लॉर्ड साऊथबरो यांच्या अध्यक्षतेखाली ‘मतदान कमिटी‘ मध्ये सरकार ने कोणाची निवड केली ?
        १) वि. रा. शिंदे
        २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
        ३) वि. रा. शिंदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
        ४) गोपाळकृष्ण गोखले

    ४)  पुढीलपैकी कोणते भारतीय सदस्य १९१७ च्या सॅडलर आयोगात होते?
        a) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
        b) दादाभाई नौरोजी
        c) आशुतोष मुखर्जी              
              d) झियाउद्दीन अहमद
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b) फक्त
        २) (b) आणि (c) फक्त
        ३) (c) आणि (d) फक्त
        ४) (a) आणि (d) फक्त

    ५)  राष्ट्रीय सभा/काँग्रेस पक्षाने १९३८ मध्ये खालीलपैकी कोणती समिती स्थापन केली?
        १) राष्ट्रीय नियोजन समिती
        २) अस्पृश्य उद्धार समिती         
        ३) वृत्तपत्र स्वातंत्र्य समिती       
        ४) राष्ट्रीय महिला समिती

     
    १) १९२४ ची मुडीमन समिती
     
    १)  मुडीमन समिती का नेमण्यात आली होती ?
        १) इ.स. १९१९ च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी
        २) इ.स. १९०९ च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी
        ३) द्विदल राज्यपद्धतीच्या चौकशीसाठी
        ४) जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी

     
    २) १९२७ चे सायमन कमिशन
     
    १)  सायमन कमिशनमधील सभासद व त्यांना कमीशनवर का नेमले यांची कारणे यांच्या जोड्या जुळवा :
              a) सर जॉन सायमन          i) भारतातील मवाळांना मान्य होतील असे वाटत होते.
        b) बर्नहॅम                   ii) ब्रिटीश साम्राज्यभर प्रवास केलेले होते
              c) लेन फॉक्स               iii) लॉर्ड आयर्विनचे मेहुणे
        d) व्हेरनॉन हार्टस्हॉरन्         iv) मजूर पक्षाचे सभासद
        पर्यायी उत्तरे :
                  (a)      (b)           (c)        (d)
              १)     (iv)     (iii)         (ii)       (i)
              २)     (iii)     (iv)          (i)         (ii)
              ३)     (ii)      (i)            (iv)      (iii)
              ४)     (i)       (ii)           (iii)      (iv)

    २)  इ. स. १९२७ मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आले कारण :
        १) १९१९ सालचा माँटेग्यू चेल्म्सफोर्ड कायदा निष्प्रभ ठरला होता.
        २) मजूर पक्षाकडे सत्तापालट झाला तर तो भारताला अनुकूल धोरण आखण्याची धास्ती होती.
        ३) स्वराज पक्षाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे गरजेचे होते.
        ४) वरील सर्व 

    ३)  काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला?
        १) काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते        
        २) मुस्लीम लीगला प्रतिनिधित्व होते
        ३) संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले नव्हते           
        ४) ब्रिटिशांनी तोडा/फोडा व राज्य करानीती वापरली

    ४)  सायमन कमिशनची स्थापना कशाकरता करण्यात आली होती?
        १) माँटेग्यू-चेल्म्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी
        २) मिंटो मोर्ले कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी
        ३) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन करण्यासाठी
        ४) वरीलपैकी कशासाठीही नाही.

    ५)  सायमन कमिशनने कोणत्या शिफारशी केल्या होत्या?
        १) एकूण लोकसंख्येच्या १० ते १५ टक्के लोकांना मताधिकार मिळावा.
        २) केंद्रात द्विदल शासनपद्धतीचा स्वीकार करू नये.
        ३) प्रांतामधील द्विदल शासनपद्धती रद्द करण्यात यावी.
        ४) वरीलपैकी सर्व

    ६)  खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती?
        १) प्रांतिक स्वायत्तता
        २) केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा
        ३) कायदे मंडळात प्रतिनिधींची संख्या वाढवावी
        ४) मतदारांची संख्या वाढवावी

    ७)  भारतीय लोकांनी सायमन कमिशनच्या आगमनाच्या विरुद्ध आंदोलन केले, कारण -
        १) भारतीयांना १९१९ च्या कायद्याचे पुनर्विलोकन कधीही आवश्यक वाटले नव्हते.
        २) सायमन कमिशनने प्रांतातील द्विदल शासन रद्द करण्याची शिफारस केली.
        ३) सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता
        ४) सायमन कमिशनने भारताच्या फाळणीची शिफारस केली

    ८)  भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला, कारण
        १) त्यामुळे भारताची फाळणी होणार होती
        २) त्यामध्ये लेबर पार्टीचा प्रतिनिधी नव्हता
        ३) त्याचे नेतृत्व सायमनने केले होते
        ४) त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता

     
    ३) १९४२ चे क्रिप्स मिशन
     
    १)  खालीलपैकी कोणत्या व्हॉईसरायच्या कालखंडात क्रिप्स योजना मंडळ भारतात येऊन गेले ?
        १) लॉर्ड माउंटबॅटन
        २) लॉर्ड वेलिंग्टन
        ३) लॉर्ड वेव्हेल
        ४) लॉर्ड लिनलिथगो

    २)  क्रिप्स यांचे भारतीय मित्र ..... हे देखील त्यांच्यावर इतके नाराज झाले की त्यांनी कबूल केले, ”ही एक खेदाची गोष्ट आहे की क्रिप्ससारखी व्यक्तीही स्वतःला सैतानाचा वकील बनू देते.
        १) जवाहरलाल नेहरू
        २) सुभाष चंद्र बोस
        ३) महात्मा गांधी
        ४) जिन्ना

    ३)  १९३९ साली काँग्रेसच्या मंत्रीमंडळाने सात प्रांतात राजीनामे दिले कारण -
        १) इतर चार प्रांतात काँग्रेस मंत्रिमंडळ स्थापन करू शकले नाही.
        २) काँग्रेस अंतर्गत डावा गट तयार झाल्याने मंत्रीमंडळाचे काम अशक्य झाले.
        ३) या प्रांतात जातिवादी हिंसक दंगली झाल्या.        
        ४) वर दिलेल्यापैकी एकही नाही.

    ४)  क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली?
        १) मुस्लीम लीगने क्रिप्स मिशनला पाठिंबा दिला होता.
        २) भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता.
        ३) क्रिप्स योजनेत पाकिस्तान निर्मितीचा समावेश होता.  
        ४) वरीलपैकी कोणताही पर्याय नाही.

    ५)  ‘स्वीकारा अन्यथा सोडून द्या‘ असे पुढीलपैकी कोणत्या प्रस्तावाबाबत म्हटले होते ?
        १) क्रिप्स
        २) वेव्हेल
        ३) माऊंट बॅटन
        ४) वरीलपैकी एकही नाही

    ६)  क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली?
        १) मुस्लीम लीगने क्रिप्स मिशनला पाठिंबा दिला होता.
        २) भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता.
        ३) क्रिप्स योजनेत पाकिस्तान निर्मितीचा समावेश होता.
        ४) वरीलपैकी कोणताही पर्याय नाही.

     
    ४) १९४५ ची वेव्हेल योजना व १९४६ चे कॅबिनेट मिशन
     
    १)  ‘कॅबिनेट मिशन योजने’ संदर्भात जुळणी करा.
        अ) निवडावयाची एकूण सदस्यसंख्या                I)  २९२
        ब) संस्थानिक-राज्यांचे प्रतिनिधी                   II)
        क) उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी                III) ९३
        ड) प्रांतांचे प्रतिनिधी                            IV) ३८९
                                                   
              १)     IV       III            II           I
              २)     I          II              III          IV
              ३)     II         I               IV          III
              ४)     III        IV            I             II

    २)  भारतात मार्च १९४६ मध्ये आलेल्या कॅबिनेट मिशनमध्ये पुढीलपैकी कोणते सदस्य होते ?
        १) लॉर्ड माऊंटबॅटन, ए.सी. अलेक्झांडर आणि लॉर्ड अ‍ॅट्ली
        २) सर् पेथिक लॉरेन्स, सर् स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए. सी. अलेक्झांडर
        ३) लॉर्ड अ‍ॅट्ली, सर् स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.सी. अलेक्झांडर
        ४) लॉर्ड माऊंटबॅटन, ए.सी. अलेक्झांडर आणि सर् पेथिक लॉरेन्स

    ३)  कॅबिनेट मिशनच्या सदस्याचे नाव काय?
        १) सर स्टफर्ड क्रिप्स
        २) डलहौसी
        ३) वॉरन हेस्टींग
        ४) कर्झन

    ४)  १९४५ मध्ये राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षांनी १५ सदस्यांचे कॅबिनेट असावे असे सुचविले होते. त्या संबंधातील पुढील दोन पैकी कोणते विधान योग्य आहे.
        a) एकूण पाच हिंदू सदस्य सुचविले होते.
        b) दोन काँग्रेस महिला सदस्य सुचविले होते.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही

    ५)  खालील विधाने विचारात घ्या :
        अ) १९४६ च्या कॅबिनेट मिशननुसार भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर, १९४६ रोजी संपन्न झाली.
        क) भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र १४ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, १९४९ या काळात पार पडले.
        वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
        १) फक्त अ आणि ब
        २) फक्त ब आणि क
        ३) अ, ब आणि क
        ४) फक्त अ आणि क

    ६)  इंग्लंडच्या कॅबिनेटमधील लॉर्ड लॉरेन्स, सर क्रिप्स आणि सर अलेक्झांडर यांचा समावेश असलेले कॅबिनेट मिशन भारतात आले त्यांनी मांडलेल्या योजनेला ....... असे म्हणतात.
        १) क्रिप्स योजना
        २) लॉरेन्स योजना
        ३) अलेक्झांडर योजना
        ४) त्रिमती योजना

    ७)  ............. या योजनेनुसार भारतात हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली.
        १) क्रिप्स योजना
        २) त्रिमंत्री योजना
        ३) लॉर्ड माऊंटबॅटन योजना
        ४) लॉर्ड वेव्हेल योजना

     
    (५) परिषदा
     
    १)  कालानुक्रमे रचना करा :
        a) दुसरी गोलमेज परिषद
        b) नेहरू अहवाल
        c) गांधी-आयर्विन करार
        d) जातीय निवाडा
        पर्यायी उत्तरे :  
        १) (a),(c),(d),(b)
        २) (b),(c),(d),(a)
        ३) (b),(c),(a),(d)
        ४) (b),(a),(c),(d)

    २)  खालील घटनांचा क्रम कालक्रमानुसार लावा :
        अ) जातीय निवाडा
        ब) नेहरू अहवाल
        क) गोलमेज परिषदा
        ड) सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात
        पर्यायी उत्तरे :  
        १) अ,,,
        २) ब,,,
        ३) क,,,
        ४) ड,,,

    ३)  कालानुक्रमे रचना करा.
        a) मुस्लीम लीगने नेहरू रिपोर्टपेक्षा जिनांच्या चौदा कलमी कार्यक्रमास पसंती दिली.
              b) काँग्रेसने सरकारला एका वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याची मुदत दिली.
              c) लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली.    
              d) गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरु केला.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (c), (d)
        २) (d), (b), (a), (c)
        ३) (b), (a), (c), (d)
        ४) (a), (b), (c), (d)

     
    १) ऑल पार्टी कॉन्फरन्स व नेहरू कमिटी अहवाल
     
    १)  ’हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हांला हिंदुस्थानावर जगावयाचे आहे’, असे वक्तव्य कोणाचे?
        १) भारतमंत्री लॉर्ड कर्झन         
        २) भारतमंत्री माँटेग्यू
        ३) भारतमंत्री बर्कनहेड
        ४) भारतमंत्री माउंटबॅटन
    २)  भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान नेहरू अहवालाने खालीलपैकी कोणत्या शिफारशी केल्या ?
        १) अल्पसंख्यांकासाठी राखीव जागा असलेल्या ठिकाणी संयुक्त मतदार संघ.
        २) मूलभूत हक्काची तरतूद        
        ३) भारतासाठी संपूर्ण स्वराज्य
        (a) फक्त १ बरोबर
        (b) फक्त १ आणि २ बरोबर
        (c) फक्त  २ व ३ बरोबर
        (d) , २ व ३

    ३)  नेहरू कमिटी अहवालाबाबात पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान खरे नाही?
        a) त्याने इंग्रजांच्या कॅनडा व ऑस्ट्रेलियातील वसाहतींमध्ये असल्याप्रमाणे स्वराज्य (Self Rule) ची मागणी केली.
        b) त्याने अशीही इच्छा प्रदर्शित केली की विविध भागांची त्यांच्या नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीनुसार पुनर्रचना व्हावी.
        पर्यायी उत्तरे ः
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही

    ४)  इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष का केले?
        १) कारण मुस्लीम लीगने त्या अहवालास विरोध केला                  
        २) गांधीजी त्या अहवालाशी सहमत नव्हते.
        ३) काही काँग्रेस पुढारी अहवालाच्या बाजूने नव्हते.             
        ४) इंग्रजांच्या मते तो अधिक पुरोगामी होता.

    ५)  श्री. एम. ए. जिना यांनी मांडलेल्या ‘१४ मुद्यातील‘ खालीलपैकी कोणता नव्हता ?
        १) भावी राज्यघटना संघराज्य स्वरूपाची असावी      
        २)  सर्व प्रांतांना समप्रमाणात स्वायत्तता
        ३) मुंबई प्रांतामधून सिंध वेगळा केला पाहिज
        ४) केंद्रीय व प्रांतिक मंत्रिमंडळात अर्धे मंत्री मुस्लीम असणे.

    ६)  बॅरिस्टर जिनांची मुख्य मागणी कोणती होती ?      
        १) हिंदुस्थानाचे स्वरूप संघराज्याचे असावे.
        २) सर्व प्रांतांना समान स्वातंत्र्य नसावे.
        ३) सर्व गटांना संपूर्ण धार्मिक स्वातंत्र्य देण्यात यावे.
        ४) सिंध प्रांतापासून मुंबई वेगळी करण्यात येईल.

     
    २) गोलमेज परिषदा
     
    १)  पहिल्या गोलमेज परिषदेविषयी काय खरे आहे?
        a) १२ नोव्हेंबर १९३० रोजी तिचे उद्घाटन झाले.
        b) ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड तिचे अध्यक्ष होते.
        c) काँग्रेस धरून ५७ ब्रिटिश अमलाखालील भारतीय सभासद तिला उपस्थित होते.
        d) परिषदेस एकूण ८९ सभासद होते.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b) फक्त
        २) (a), (b) आणि (d) फक्त
        ३) (b), (c) आणि (d) फक्त
        ४) (c) आणि (d) फक्त

    २)  पहिल्या गोलमेज परिषदेला भारतातून खालीलपैकी कोणते संघटना उपस्थित राहिली होती ?
        १) काँग्रेस
        २) स्वराज पक्ष
        ३) हिंदू महासभा
        ४) रामकृष्ण मिशन

    ३)  बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला ....... म्हणून गेले.
        १) हिंदू लिबरल
        २) हिंदू
        ३) स्वराज्य पक्षाचे प्रतिनिधी
        ४) राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी

    ४)  पहिल्या गोलमेज परिषदेत ब्रिटिश सरकारने कोणत्या तत्त्वांना मान्यता दिली?
        (A) हिंदुस्थानात संघराज्य अस्तित्वात येईल.
        (B) प्रस्थापित संघराज्यात सर्व प्रांत आणि संस्थाने सामील होणार नाहीत.
              (C) संघराज्याचे सरकार हे मध्यवर्ती कायदेमंडळाला जबाबदार राहील.
        (D) पुढे गोलमेज परिषद भरविली जाणार नाही.
        पर्यायी उत्तरे :
        १) (B) आणि (D) चूक
        २) (A) आणि (C) बरोबर
        ३) वरील सर्व चूक
        ४) वरील सर्व बरोबर

    ५)  लंडन येथे भरलेल्या ...... गोलमेज परिषदेच्या वेळी महात्मा गांधीजीनी भारतासाठी पूर्ण स्वराज्याची मागणी केली.
        १) पहिल्या
        २) दुसर्‍या
        ३) तिसर्‍या
        ४) चौथ्या

    ६)  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केले ?
        १) पहिल्या
        २) दुसर्‍या
        ३) तिसर्‍या
        ४) कोणत्याही नाही

     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१६०)
     
    (१) कायदे
    १-२
    २-१
    ३-१
    ४-१
    ५-२
    ६-१
    ७-४
    ८-३
    ९-१
    १०-१
    ११-२
    १२-२
    १३-१
    १४-४
    (२) घटनात्मक उत्क्रांती
    १-३
    २-३
    ३-२
    १) १७७३ चा रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट
    १-१
    २-३
    ३-२
    २) १७८४ चा पिट्स इंडिया अ‍ॅक्ट
    ३) १७९३ चा सनदी कायदा
    ४) १८१३ चा सनदी कायदा
    १-२
    १८५३ चा सनदी कायदा
    १-३
    ५) १८५८ चा भारताच्या सुशासनाचा कायदा 
    १-४
    २-४
    ३-४
    ४-४
    ५-१
    ६) १८६१ चा इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट
    १-२
    ७) १८९२ चा इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट
    ८) १९०९ चा इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट
    १-२
    २-२
    ३-२
    ४-१
    ५-१
    ६-१
    ९) १९१९ चा भारतीय प्रशासकीय कायदा
    १-३
    २-३
    ३-४
    ४-३
    ५-४
    ६-३
    ७-२
    ८-२
    ९-१
    १०-२
    ११-२
    १२-३
    १३-१
    १४-१
    १५-२
    १०) १९३५ चा भारत सरकारचा कायदा
    १-३
    २-३
    ३-४
    ४-३
    ५-२
    ६-४
    ७-४
    ८-२
    ९-३
    १०-४
    ११-२
    १२-१
    १३-३
    (३) करार
    १) लखनौ करार
    १-३
    २-३
    ३-४
    ४-४
    ५-१
    गांधी-आयर्विन करार
    १-४
    २-४
    जातीय निवाडा
    १-१
    २-१
    ३-२
    २) पुणे करार
    १-१
    २-२
    ३-२
    ४-२
    ५-२
    (४) आयोग व समित्या
    १-२
    २-४
    ३-३
    ४-३
    ५-१
    १) १९२४ ची मुडीमन समिती
    १-१
    २) १९२७ चे सायमन कमिशन
    १-४
    २-४
    ३-१
    ४-१
    ५-४
    ६-२
    ७-३
    ८-४
    ३) १९४२ चे क्रिप्स मिशन
    १-४
    २-१
    ३-४
    ४-२
    ५-१
    ६-२
    ४) १९४५ ची वेव्हेल योजना व १९४६ चे कॅबिनेट मिशन
    १-१
    २-२
    ३-१
    ४-४
    ५-३
    ६-४
    ७-२
    (५) परिषदा
    १-३
    २-२
    ३-३
    १) ऑल पार्टी कॉन्फरन्स व नेहरू कमिटी अहवाल
    १-३
    २-२
    ३-२
    ४-१
    ५-४
    ६-२
    २) गोलमेज परिषदा
    १-२
    २-३
    ३-१
    ४-२
    ५-२
    ६-२

     

Share this story

Total Shares : 23 Total Views : 11692