मराठी पुस्तके व ग्रंथ / प्रश्नमंजुषा (१५८)
- 20 May 2021
- Posted By : study circle
- 9276 Views
- 29 Shares
मराठी पुस्तके व ग्रंथ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”मराठी पुस्तके व ग्रंथ यावर अनेक प्रश्न विचारले जातात. विविध ग्रंथांचे लेखक व त्यांचे विषय, काही वादग्रस्त पुस्तके, त्यावरील प्रश्न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
१.१३ महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा (प्राचीन व आधुनिक) - महाराष्ट्राच्या सामाजिक व मानसिक विकासात वाङमय व संत वाङमयाचा प्रभाव : भक्ती, दलित, नागरी व ग्रामीण वाङ्मय.
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
मराठी पुस्तके व ग्रंथ
१) ऐतिहासिक व सामाजिक ग्रंथ
२) आर्थिक विषयावरील ग्रंथ
३) भाषंतरित व अनुवादित पुस्तके
४) वादग्रस्त पुस्तके
५) नाटके
६) चरित्र व आत्मचरित्र
७) कादंबर्या
८) काव्य
९) इतर पुस्तके
१) ऐतिहासिक व सामाजिक ग्रंथ
१) मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ ......... यांनी लिहिला.
१) र. धों. कर्वे
२) न्यायमूर्ती रानडे
३) डॉ. भाऊ दाजी लाड
४) डॉ. आंबेडकर
२) लोकमान्य टिळकांनी ........... सांगण्यासाठी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
१) कर्मयोग
२) ज्ञानयोग
३) हठयोग
४) भक्तियोग
३) खालीलपैकी कोणते ग्रंथ लो. टिळकांनी लिहिले?
a) द आर्क्टिक होम इन द वेदाज्
b) वेदिक क्रोनॉलॉजी अँड अदर एसेज
c) सिक्रेटस ऑफ द वेदाज्
d) द ओरायन
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b), (c), (d)
२) (a), (b)
३) (a), (b), (c)
४) (a), (b), (d)
४) टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ .......... या तुरुंगात लिहिला.
१) अंदमान
२) येरवडा
३) मंडाले
४) अहमदनगर
५) १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाचे लेखक कोण होते?
१) सर सय्यद अहमद खान
२) वि. दा. सावरकर
३) एस. आर. शर्मा
४) आर. सी. मुजुमदार
६) १८५७ चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ ...... यांनी लिहिला.
१) मोतीलाल नेहरू
२) महात्मा गांधी
३) वि. दा. सावरकर
४) विनोबा भावे
७) द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण?
१) अशोक कोठारी
२) अशोक मेहता
३) डॉ. एस. एन. सेन
४) वी. डी. सावरकर
८) ”थॉट्स ऑन पाकिस्तान” हा ग्रंथ कोणी लिहिला?
१) सर सय्यद अहमद खान
२) बॅ. महमद अली जीना
३) मौलाना अब्दुल करीम आझाद
४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
९) विनोबा भावे यांनी १९३०-३१ दरम्यान त्यांच्या तुरुंगवासात ...... या ग्रंथाची रचना केली.
१) गीता रहस्य
२) गीताई
३) गीतासार
४) गीताबोध
१०) पुढीलपैकी कोणी वुई हे पुस्तक लिहिले ?
१) शामाप्रसाद मुखर्जी
२) वि. दा. सावरकर
३) माधव सदाशिव गोळवलकर
४) मदन मोहन मालवीय
११) पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.
a) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री
b) द डिस्कव्हरी ऑफ इंडिया
c) अॅन ऑटोबायोग्राफी
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b), (c)
२) (b), (c), (a)
३) (c), (a), (b)
४) (a), (c), (b)
१२) १९ व्या शतकात प्रकाशित झालेली पुस्तके व त्यांचे लेखक/संपादक यांच्या जोड्या जुळवा.
अ) भारत वर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश i. शंकर पांडुरंग पंडित
ब) वेदार्थ यत्न ii. जे. एम्. गुर्जल
क) षड्दर्शन चिंतनिका iii. रघुनाथ भास्कर गोडबोले
ड) मनुस्मृतीचे मराठीत भाषांतर iv. डॉ. महादेव मोरेश्वर कुंटे
अ ब क ड
१) I II III IV
२) III I IV II
३) I III II IV
४) IV I II III
१३) खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही ?
१) केशव सूत- नवा शिपाई
२) लोकहितवादी - शतपत्रे
३) बाबासाहेब आंबेडकर - प्रबुद्ध भारत
४) बाळ गंगाधर टिळक - मूर्तिभंजन
१४) खालीलपैकी कोणती जोडी विसंगत आहे ?
१) महात्मा फुले - शेतकर्यांचा असूड
२) बाबासाहेब आंबेडकर - हू वेअर द शुद्राज.
३) मौलाना मुहम्मद अली - कॉमरेड
४) स्वामी विवेकानंद - सत्यार्थ प्रकाश
१५) प्रसिद्ध ग्रंथ “दि स्टोरी ऑफ दि इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स” ....... यांनी लिहिला.
१) सरदार पटेल
२) व्ही. पी. मेनन
३) कृष्ण मेनन
४) आर. सी. मुजुमदार
१६) गावचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला?
१) संत तुकाराम
२) संत एकनाथ
३) राष्ट्र संत तुकडोजी महाराज
४) संत नामदेव
१७) ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
१) संत तुकाराम
२) संत गाडगेबाबा
३) संत तुकडोजी महाराज
४) महर्षी कर्वे
१८) खालीलपैकी गुलामगिरी आणि अस्पृश्यांची कैफियत याचे लेखक कोण ज्यांना थॉमस पेन याच्या राइट्स ऑफ मॅन या पुस्तकातील विचारांनी प्रभावित केला होते?
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) छत्रपती शाहू महाराज
३) महात्मा जोतिबा फुले
४) विठ्ठल रामजी शिंदे
१९) शेतकर्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
१) म. जोतिबा फुले
२) राजर्षी शाहू महाराज
३) गणेश वासुदेव जोशी
४) न्यायमूर्ती रानडे
२०) शेतकर्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला?
१) महात्मा फुले
२) गणेश वासुदेव जोशी
३) विष्णुशास्त्री चिपळूणकर
४) डॉ. भाऊ दाजी लाड
२१) गुलामगिरी हे पुस्तक ........ यांनी लिहिले.
१) महात्मा गांधी
२) महात्मा ज्योतीबा फुले
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४) नारायण गुरू
२२) गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) जोतिबा फुले
३) दादाभाई नौरोजी
४) डॉ. सविता आंबेडकर
२३) ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ ...... यांना समर्पित केला.
१) सामाजिक न्यायासाठी लढा देणारे भारतीय
२) गुलामांना स्वातंत्र्य करण्यासाठी लढा देणारे अमेरिकन
३) राज्यक्रांतीसाठी लढा देणारे फ्रेंच
४) भारतात सामाजिक न्यायासाठी लढा देणारे ब्रिटिश
२४) गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला ?
१) न्यायमूर्ती रानडे
२) भाऊ दाजी लाड
३) महात्मा ज्योतिबा फुले
४) र. धो. कर्वे
२५) “सार्वजनिक सत्यधर्म” हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
१) कर्मवीर भाऊराव पाटील
२) महर्षी धोंडो केशव कर्वे
३) दादोबा पांडुरंग तर्खडकर
४) महात्मा जोतिबा फुले
२६) सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले?
१) लोकहितवादी
२) आगरकर
३) विठ्ठल रामजी शिंदे
४) महात्मा फुले
२७) सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक ............. यांनी लिहिले.
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) नारायण मेघाजी लोखंडे
३) म. जोतिबा फुले
४) गो. ग. आगरकर
२८) महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?
१) शेतकर्यांचा आसूड
२) सार्वजनिक सत्यधर्म
३) ब्राह्मणांचे कसब
४) इशारा
२९) ”विश्व कुटुंबाचा जाहीरनामा” म्हणून महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा उल्लेख केला जातो?
१) सार्वजनिक सत्यधर्म
२) शेतकर्यांचा आसूड
३) ब्राह्मणांचे कसब
४) तृतीय रत्न
३०) महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही ?
१) गुलामगिरी
२) जातींचा उच्छेद
३) शेतकर्यांचा आसूड
४) ब्राह्मणांचे कसब
३१) काव्यफुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर हे दोन काव्यसंग्रह ...... यांनी लिहून प्रकाशित केले.
१) सावित्रीबाई फुले
२) पंडिता रमाबाई
३) न्यायमूर्ती रानडे
४) महात्मा जोतिबा फुले
३२) म. फुल्यांचे काव्यमय चरित्र सावित्रीबाई फुले यांनी लिहिले, त्याचे नाव काय ?
१) बावनकशी सुबोध रत्नाकर
२) फुलेचरित्र
३) फुलेसहवास
४) फुलराणी
३३) “मॅरेज ऑफ हिंदू विंडोज” हा ग्रंथ ............. यांनी लिहिला.
१) ईश्वरचंद्र विद्यासागर
२) केशवचंद्र सेन
३) देवेंद्रनाथ टागोर
४) स्वामी दयानंद
३४) खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला?
१) स्त्री धर्म नीती
२) सन्मार्ग
३) भारतीय स्त्रीजीवन
४) लक्ष्मीज्ञान
३५) स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला ...... यांनी वाचा फोडली.
१) ताराबाई शिंदे
२) पंडिता रमाबाई
३) रखमाबाई
४) आनंदीबाई जोशी
३६) महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत ज्यांनी स्त्री-पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला त्यांचे नाव काय?
१) रमाबाई रानडे
२) ताराबाई शिंदे
३) सावित्रीबाई फुले
४) पंडिता रमाबाई
३७) खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉ. भाऊ दाजी लाड यांनी लिहिला?
१) रसायनशास्त्र
२) जातिभेदविवेकसार
३) शिष्यजनविलाप
४) स्त्री बाळहत्या
३८) महात्मा फुलेंच्या शाळेतील चौदा वर्षाच्या मुक्त्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेल्या निबंध कशावर आधारित आहे ?
१) सामाजिक स्थितीवर
२) धार्मिक स्थितीवर
३) स्त्रियांच्या स्थितीवर
४) शैक्षणिक स्थितीवर
३९) द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक ......... यांनी लिहिले.
१) लेडी फॉकलंड
२) पंडिता रमाबाई
३) रमाबाई आंबेडकर
४) लेडी वेलिंग्टन
४०) कोणती जोडी चुकीची आहे ?
१) सावित्रीबाई फुले - सुबोध रत्नाकर
२) पंडिता रमाबाई - दि हाय कास्ट हिंदू वुमेन
३) विठ्ठल रामजी शिंदे - आठवणी व अनुभव
४) शाहू महाराज - हिंदू कोड बिल
४१) स्वामी दयानंद सरस्वतींनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव काय होते ?
१) सार्वजनिक सत्यधर्म
२) सत्यार्थ प्रकाश
३) ग्रामगीता
४) जोसेफ मॅझिनीचे चरित्र
४२) सुखदायक राज्यप्रकरणी निबंध ही पुस्तिका कोणी लिहिली होती ?
१) महादेव गोविंद रानडे
२) विष्णूबुवा ब्रह्मचारी
३) गोपाळ हरी देशमुख
४) विष्णुशास्त्री चिपळूणकर
४३) ”भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न” हा ग्रंथ कोणी लिहिला?
१) डॉ. बी. आर. आंबेडकर
२) वि. रा. शिंदे
३) महात्मा जोतिबा फुले
४) भास्करराव जाधव
४४) एक हिंदू हे टोपण नाव घेऊन जातिभेद विवेकसार हा ग्रंथ कोणी लिहिला ?
१) महात्मा फुले
२) बाबा पद्मनजी
३) तुकाराम तात्या पडवळ
४) ज्ञानगिरी बाबा
४५) योग्य जोड्या जुळवा :
a) जात्युच्छेदक निबंध i) करसनदास मुळजी
b) सोमवंशीय मित्र ii) वि. दा. सावरकर
c) सत्य प्रकाश iii) बेहरामजी मलबारी
d) सक्तीचे वैधव्य iv) शिवराम कांबळे
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iii) (i) (iv) (ii)
२) (i) (ii) (iii) (iv)
३) (iv) (iii) (ii) (i)
४) (ii) (iv) (i) (iii)
४६) जोड्या लावा :
(अ) (ब)
अ) बेहरामजी मलबारी I) सक्तीचे वैधव्य
ब) करनदास मुळजी II) सत्य प्रकाश
क) शिवराम कांबळे III) सोमवंशीय मित्र
ड) वि. दा. सावरकर IV) जात्युच्छेदक निबंध
(अ) (ब) (क) (ड)
१) IV III II I
२) I II III IV
३) II IV I III
४) III I IV II
४७) विटाळ विध्वंसन ........ यांनी लिहिले.
१) गोपाळबाबा वलंगकर
२) शिवराज जानबा कांबळे
३) किसन फागुजी बनसोडे
४) गणेश अक्काजी गवई
४८) गोपाळबाबा वलंगकर यांनी ...... या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले.
१) विटाळ विध्वंसन
२) स्त्री-पुरुष तुलना
३) शेतकर्याचा आसूड
४) स्त्री-धर्म नीती
४९) हू वेअर द शूद्राज् हे पुस्तक डॉ. आंबेडकरांनी कोणाला अर्पण केले आहे?
१) रमाबाई आंबेडकर
२) रामजी आंबेडकर
३) डॉ. सविता आंबेडकर
४) महात्मा जोतिबा फुले
५०) पुढीलपैकी कोणत्या ग्रंथांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचे बारकाईने परीक्षण केले आहे ?
a) फिलॉसॉफी ऑफ हिंदूइझम
b) रिडल्स इन हिंदूइझम
c) रिलिजन इन इंडिया
d) बुद्ध अॅन्ड हिज धम्म
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (a),(b) आणि (d) फक्त
३) (c) फक्त
४) (d) फक्त
५१) डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही?
१) दि प्रॉब्लेम ऑफ रूपी
२) रिडल्स् इन हिंदूइझम
३) गांधी अँड दि फायनान्शियल थॉटस् ऑन लिंग्युइस्टिक स्टेट
४) वरील एकही पर्याय बरोबर नाही
५२) २५ डिसेंबर १९२७ रोजी ...... यांनी मनुस्मृतीचे दहन केले.
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) गंगाधर नीळकंठ सहस्रबुद्धे
३) पंडिता रमाबाई
४) विठ्ठल रामजी शिंदे
५३) डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला?
१) भारतातील जाती
२) जातिभेद-निर्मूलन
३) शुद्र पूर्वी कोण होते?
४) बुद्ध व त्याचा धम्म
२) आर्थिक विषयावरील ग्रंथ
१) प्रॉस्परस ब्रिटीश इंडिया या पुस्तकाचे लेखक ............ .
१) विल्यम डीगबाय
२) एन. मनी
३) आर. रामचंद्रन
४) पॉल एल. नॉक्स आणि लिंडा
२) एम. ए. साठी ......... यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता.
१) गोपाळ आगरकर
२) बाळ टिळक
३) वि. दा. सावरकर
४) बी. आर. आंबेडकर
३) “पॉव्हर्टी अँड अन्-ब्रिटिश रुल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला ?
१) दादाभाई नौरोजी
२) लाला लजपतराय
३) व्ही. डी. सावरकर
४) लोकमान्य टिळक
३) व्याकरणावरील तसेच अनुवादित पुस्तके
१) मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हणतात ?
१) विष्णुशास्त्री पंडित
२) आत्माराम पांडुरंग तर्खडकर
३) दादोबा पांडुरंग तर्खडकर
४) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
२) सन १८३६ साली दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
१) महाराष्ट्र भाषेचे व्याकरण
२) युमुनेचे पर्यटन
३) मराठी भाषेचे व्याकरण
४) महाराष्ट्र भाषेची पाणिनी
३) मराठी भाषेचे पहिले व्याकरणकार खालीलपैकी कोण होते?
१) दुर्गादास मंचाराम
२) दादोबा पांडुरंग तर्खडकर
३) न्यायमूर्ती रानडे
४) बाळशास्त्री जांभेकर
४) विष्णूशास्त्री पंडित यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले ?
a) इंग्रजी मराठी कोश
b) मराठी लघू व्याकरण
c) संस्कृत आणि महाराष्ट्र धातू कोश
d) स्मृतिशास्त्र
१) (a) आणि (b) फक्त
२) (b) आणि (c) फक्त
३) (a), (c) आणि (d) फक्त
४) (a),(b) आणि (d) फक्त
५) आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीमध्ये खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले
(a) इतिहास
(b) शून्यलब्धी
(c) व्याकरण
(d) छंदशास्त्र
पर्यायी उत्तर :
१) फक्त (a)
२) फक्त (b)
३) (a) आणि (b)
४) (c) आणि (d)
६) अलंकार मीमांसा नावाचा लेख कोणी लिहिला?
१) विष्णुशास्त्री चिपळूणकर
२) न्या. रानडे
३) महर्षी धोंडो केशव कर्वे
४) गोपाळ गणेश आगरकर
७) जोड्या जुळवा :
a) काशिनाथशास्त्री चिपळूणकर i) अरेबियन नाईटसचा मराठीत अनुवाद केला
b) सखाराम प. पंडित ii) रॉबिनस्सन क्रुसोचा मराठीत अनुवाद केला.
c) रावजीशास्त्री गोडबोले iii) लँबच्या टेल्स फ्रॉस शेक्सपियरचा मराठीत अनुवाद केला.
d) बापू छत्रे iv) इसप्स टेल्सचा मराठीत अनुवाद केला.
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
३) (i) (iii) (ii) (iv)
२) (iv) (iii) (ii) (i)
४) (iii) (i) (iv) (ii)
८) गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले ?
१) हॅम्लेट
२) मॅकबेथ
३) द मर्चंट ऑफ व्हेनिस
४) ज्युलियस सिझर
९) हॅम्लेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठी भाषांतर कोणी केले?
१) वि. दा. सावरकर
२) गोपाळ गणेश आगरकर
३) महर्षी धोंडो केशव कर्वे
४) विष्णुशास्त्री पंडीत
१०) गोपाळ गणेश आगरकरांनी केलेल्या शेक्सपिअरच्या हॅमलेटच्या मराठी रूपांतराचे नाव काय?
१) विकासविलसित
२) ज्ञानप्रकाश
३) हॅम्लेट
४) हाय कास्ट वुमेन
११) गोपाळ गणेश आगरकृत शेक्सपिअरच्या हॅमलेट च्या मराठी रूपांतराचे नाव काय आहे ?
१) हॅमलेट
२) विकारविलसित
३) विचारवर्धिनी
४) यांपैकी कोणतेही नाही
४) वादग्रस्त पुस्तके
१) १८९८-९९ मध्ये आलेल्या बंध विमोचन आणि लोकमतविजय या नाटकांवर सरकारने बंदी घातली कारण त्यात आडवळणाने ............ यांचा उल्लेख होता.
१) न्यायमूर्ती रानडे
२) लॉर्ड कर्झन
३) लोकमान्य टिळक
४) लॉर्ड सँडहर्स्ट
२) .......... यांना राजद्रोहात्मक पुस्तक छापल्याबद्दल दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. काही अटी मान्य केल्यास त्यांची मुक्तता करण्याचा प्रस्ताव इंग्रज सरकारने १९२४ मध्ये ठेवला. परंतु त्यांनी सशर्त सुटका करून घेण्यास नकार दिला.
१) हसरत मोहानी
२) रंगराव दिवाकर
३) रामभाऊ प्रधान
४) बी. जी. हर्निमन
३) जेम्स लेन प्रकाशित शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या वादग्रस्त पुस्तकांद्वारे प्रकाशनावर बंदीसाठी महाराष्ट्र शासनावर दबाव आणण्यासाठी आंदोलन करणारी संघटना.
a) संभाजी ब्रिगेड
b) बजरंग दल
c) महाराष्ट्र नवनिर्माण सेना
d) विश्व हिंदू परिषद
पर्यायी उत्तरे :
१) वरील सर्व
२) फक्त (a) आणि (c)
३) फक्त (b) आणि (d)
४) फक्त (a)
५) नाटके
१) तृतीय रत्न नाटकाचे लेखक कोण होते ?
१) महात्मा फुले
२) बाबासाहेब आंबेडकर
३) विठ्ठल रामजी शिंदे
४) सावित्रीबाई फुले
२) पुढीलपैकी कोणत्या नाटकावर इंग्रज सरकारने बंदी घातली नव्हती ?
१) कीचकवध
२) दंडधारी
३) विजय तोरण
४) तृतीय रत्न
३) तृतीय रत्न हे मराठी नाटक ........... यांनी लिहिले.
१) महर्षी कर्वे
२) महात्मा फुले
३) दादोबा पांडुरंग
४) विष्णुशास्त्री पंडित
४) महात्मा फुलेंनी १८५५ साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारीत आहे?
१) शेतकर्यांवर
२) अस्पृश्यांवर
३) ब्राह्मणी मूर्तिपूजेवर
४) स्त्री दास्यावर
५) मराठी नाटकासाठी कोणी योगदान दिले ?
१) गणपतराव बोडस
२) व्ही. शांताराम
३) वि. सं. खांडेकर
४) पं. भीमसेन जोशी
६) खालील नाटके व त्यांचे लेखक यांच्या जोड्या लावा:
अ) मूक नायक I. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
ब) कीचकवध II. जोतिबा फुले
क) संगीत शारदा III. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
ड) तृतीय रत्न IV. गोविंद बल्लाळ देवल
अ ब क ड
१) II I III IV
२) III I IV II
३) II III IV I
४) IV III I II
७) मराठी नाटकाचे उद्गाते कोण होते?
१) विष्णूदास भावे
२) बि. पी. किर्लोस्कर
३) के. पी. खाडीलकर
४) जी. बी. देवल
८) जोड्या जुळवा :
a) कीचकवध i) गणेश बल्लाळ फणसळकर
b) स्वदेशी ii) वासुदेव पुरुषोत्तम साठे
c) वंगभंग iii) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
d) भीमराव iv) लक्ष्मण नारायण जोशी
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iii) (i) (ii) (iv)
२) (iii) (iv) (i) (ii)
३) (iii) (ii) (i) (iv)
४) (iii) (i) (iv) (ii)
९) नटसम्राट हे मराठी नाटक कोणी लिहिले आहे ?
१) वसंत कानेटकर
२) वि. वा. शिरवाडकर
३) जयवंत दळवी
४) भालचंद्र नेमाडे
१०) बंगाली साहित्यातील नील दर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते?
१) कथा
२) कादंबरी
३) काव्य
४) नाटक
६) चरित्र व आत्मचरित्र
१) ............. यांच्या प्रोत्साहनाने कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी मराठीत शिवचरित्र लिहिले.
१) सयाजीराव गायकवाड
२) यशवंतराव भोसले
३) शाहू महाराज
४) ताराबाई
२) “जोसेफ मॅझिनीचे चरित्र” कोणी लिहिले?
१) लोकमान्य टिळक
२) गो. कृ. गोखले
३) वि. दा. सावरकर
४) ग. ह. खरे
३) लुकींग बॅक हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
१) अप्पासाहेब परांजपे
२) तात्यासाहेब केळकर
३) भास्करराव जाधव
४) धोंडो केशव कर्वे
४) १९२७ साली म. फुल्यांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र कोणी लिहिले?
१) भास्करराव जाधव
२) खंडेराव बागल
३) पंढरीनाथ पाटील
४) नारायणराव अमृतकर
५) डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस हे पुस्तक कोणी लिहिले?
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) महात्मा जोतिबा फुले
३) लोकमान्य टिळक
४) गोपाळ गणेश आगरकर
६) “डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस” हे पुस्तक कोणी लिहिले ?
१) लोकमान्य टिळक
२) चिपळूणकर
३) आगरकर
४) डॉ. आंबेडकर
७) कादंबर्या
१) यमुनापर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक ..... आहेत.
१) हरीभाऊ आपटे
२) वामन मल्हार जोशी
३) वि. स. खांडेकर
४) बाबा पद्मनजी
२) अण्णाभाऊ साठे यांची ..... ही कादंबरी सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे.
१) माकडाची माळ
२) फकिरा
३) अग्निदिव्य
४) वैजयंता
३) भारतीय अधिकार्यांचा भ्रष्टाचार आणि जनतेची दयनीय स्थिती यांचे चित्रण वि. को. ओक यांच्या .......... या १८७२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत दिसून येते.
१) म्युनिसिपालिटीज
२) शिरस्तेदार
३) मधली स्थिती
४) गुलामगिरी
४) पुढीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ?
(a) युमना पर्यटन- बाबा पदमनजी
(b) ढढ्ढाशास्त्री परान्ने- मुकुंदराव पाटील
(c) पक्ष लक्षात कोण घेतो?- ह. ना. आपटे
(d) कळ्यांचे निःश्वास- काशीबाई कनिटकर
पर्यायी उत्तर :
१) (d)
२) (b)
३) (a)
४) (c)
८) अभंग, काव्य
१) भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण ?
१) संत ज्ञानेश्वर
२) संत नामदेव
३) रामदास
४) संत तुकाराम
२) एका बीजा केला नास । मग भोगिले कणीस ॥ १ ॥
कळे सकळा हा भाव । लहान थोरांवरी जीव ॥२॥
हा अभंग कोणी लिहिला ?
१) संत एकनाथ
२) संत तुकाराम
३) संत ज्ञानेश्वर
४) संत नामदेव
३) जय तु शिवाजी या काव्याची रचना कोणी केली?
१) विनायक दामोदर सावरकर
२) रविंद्रनाथ टागोर
३) गोपाळ कृष्ण गोखले
४) गोपाळ गणेश आगरकर
४) जोड्या जुळवा.
a) लोलींबराजा i) शशिसेना काव्य
b) जगन्नाथ ii) रत्नकला चरित्र
c) जीवन iii) अनुभवलहरी
d) अनामकवी iv) सावकार आख्यान
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (ii) (i) (iii) (iv)
३) (iv) (iii) (ii) (i)
४) (iii) (iv) (i) (ii)
५) जोड्या जुळवा.
a) श्रीराम करुणा i) नरहरी
b) श्री समर्थ करुणा ii) गिरिधर
c) गंगारत्नमाला iii) श्रीधर
d) नवरत्नमाला iv) दिनकरस्वामी
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iv) (ii) (i) (iii)
२) (i) (iii) (ii) (iv)
३) (ii) (iv) (iii) (i)
४) (i) (ii) (iii) (iv)
९) इतर पुस्तके
१) पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले नाही?
१) वक्तृत्त्व - कला आणि साधना
२) आमच्या आठवणी
३) दगलबाज शिवाजी
४) माझी जीवन गाथा
२) “माझा प्रवास“ हे पुस्तक कोणी लिहिले ?
१) गोविंद बल्लाळ देवल
२) बाबा पद्मानंदजी
३) गोडसे भटजी
४) विष्णूदास भावे
३) पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली?
a) काशिनाथ छत्रे
b) जगन्नाथशास्त्री क्रमवंत
c) हरी केशवजी
d) कॅप्टन जॉर्ज जर्व्हिस
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) फक्त
२) (b) आणि (d) फक्त
३) (a) आणि (c) फक्त
४) (a),(b),(c) आणि (d)
प्रश्नमंजुषा (१५८)
१) ऐतिहासिक व सामाजिक ग्रंथ
१-२
२-१
३-४
४-३
५-२
६-३
७-२
८-४
९-२
१०-३
११-४
१२-२
१३-४
१४-४
१५-२
१६-३
१७-३
१८-३
१९-१
२०-१
२१-२
२२-२
२३-२
२४-३
२५-४
२६-४
२७-३
२८-२
२९-१
३०-२
३१-१
३२-१
३३-१
३४-१
३५-१
३६-२
३७-४
३८-२
३९-२
४०-४
४१-२
४२-२
४३-२
४४-३
४५-४
४६-२
४७-१
४८-१
४९-४
५०-२
५१-४
५२-१
५३-४
२) आर्थिक विषयावरील ग्रंथ
१-१
२-४
३-१
३) व्याकरणावरील तसेच अनुवादित पुस्तके
१-३
२-१
३-२
४-३
५-२
६-४
७-३
८-१
९-२
१०-१
११-२
४) वादग्रस्त पुस्तके
१-३
२-२
३-४
५) नाटके
१-१
२-४
३-२
४-३
५-१
६-२
७-१
८-१
९-२
१०-४
६) चरित्र व आत्मचरित्र
१-३
२-३
३-४
४-३
५-४
६-३
७) कादंबर्या
१-४
२-३
३-२
४-१
८) अभंग, काव्य
१-१
२-२
३-२
४-२
५-१
९) इतर पुस्तके
१-२
२-३
३-४