मराठी वृत्तपत्रे व नियतकालिके / प्रश्नमंजुषा (१५७)
- 20 May 2021
- Posted By : study circle
- 26681 Views
- 64 Shares
मराठी वृत्तपत्रे व नियतकालिके
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”मराठी वृत्तपत्रे व नियतकालिके” यावर अनेक प्रश्न विचारले जातात. विविध वृत्तपत्रांचे संपादक, विचारसरणी, माध्यम, मुद्रणालये, स्वातंत्र्य चळवळ व राष्ट्रवादाच्या वाढीतील त्यांचे योगदान, सामाजिक जागृतीसाठी वृत्तपत्रांची भूमिका, कायदे, निर्बंध, त्यावरील प्रश्न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
१.३.१ सामाजिक-सांस्कृतिक बदल - इंग्रजी मुद्रणालयाची भूमिका
१.५ भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास - स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीसाठी वृत्तपत्रांची भूमिका
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
मराठी वृत्तपत्रे व नियतकालिके
१) वृत्तपत्र कायदे
२) मुद्रणालये
३) मराठी वृत्तपत्रे
४) देशी वृत्तपत्रे
५) इंग्रजी वृत्तपत्रे
१) वृत्तपत्र कायदे
१) देशी वर्तमानपत्रासंबंधीचा कायदा मंजूर झाला, त्यावेळी भारतात कोण गव्हर्नर जनरल होते ?
१) लॉर्ड कॅनिंग
२) लॉर्ड लिटन
३) लॉर्ड रिपन
४) लॉर्ड कर्झन
२) वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भाषा वृत्तपत्र कायदा (१८७८) कोणी मंजूर केला ?
१) लॉर्ड रिपन
२) लॉर्ड लिटन
३) लॉर्ड कर्झन
४) लॉर्ड डफरीन
३) देशी भाषिक वृत्तपत्र कायदा १८७८ च्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
a) देशी भाषिक वृत्तपत्राचे मुद्रक व प्रकाशक यांचेकडून सरकारी धोरणावर टीका न करण्याची लेखी हमी घेतली जात असे.
b) सरकारच्या कार्यवाहीविरुद्ध न्यायलयात दाद मागण्याचा अधिकार वृत्तपत्र व्यवसायिकांना देण्यात आला नव्हता.
c) हा कायदा फक्त देशी भाषिक वृत्तपत्रांनाच लागू होता.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (c) फक्त
२) (a) आणि (b) फक्त
३) (a), (b) आणि (c) फक्त
४) (b) आणि (c) फक्त
२) मुद्रणालये
१) १८३१ साली मुंबईत स्थापन झालेला .......... हा छापखाना महाराष्ट्रीय व्यक्तींनी स्थापन केलेल्या आद्य छापखान्यांत गणला जातो.
१) भास्कर पांडुरंग यांचा छापखाना
२) गणपत कृष्णाजीचा छापखाना
३) निर्णयसागर प्रेस
४) ज्ञानोदय छापखाना
२) जावजी दादाजी चौधरी यांनी १८६९ मध्ये मुंबईत ...... छापखाना सुरू केला.
१) बुद्धिसागर
२) ज्ञानसागर
३) कालनिर्णय
४) निर्णयसागर
३) पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे?
त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. ते जवळजवळ निरक्षरच होते, तरीही ते एक जगप्रसिद्ध प्रिंटर झाले. शास्त्रानुसार ते वेद ऐकूही शकत नव्हते तरीही ते छापून प्रसिद्ध करू शकले. त्यांना संस्कृतचा एकही शब्द येत नव्हता परंतु त्यांनी जगभरातील संस्कृतच्या विद्वानांसाठी पुस्तके छापली.
१) जावजी दादाजी चौधरी
२) के. रघुनाथजी
३) दादाजी धाकजी
४) राणूजी
४) ....... आणि ..... हे दोघे मुंबईतील बांधकाम कंत्राटदार होते. त्यांना विचारांचा प्रसार करण्यासाठी छपाई माध्यमाचे महत्त्व कळले असल्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाला वृत्तपत्र व नियतकालिके छापण्यासाठी एक छापखाना भेट दिला.
१) तुकाराम पडवळ आणि कृष्णराव भालेकर
२) व्यंकू बाळोजी कालेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यावारू
३) गणपतराव पाटील आणि कृष्णराव भालेकर
४) ज्याया कराडी लिंगू आणि जयसिंगराव सायबू वडनाला
३) मराठी वृत्तपत्रे
१) शं. ग. दाते, दि. वि. काळे व शं. ना. बर्वे यांनी संपादित केलेली मराठी नियतकालिकांची सूची कोणत्या कालावधीतील लेखांची सूची आहे ?
१) १९०० ते १९५०
२) १८०० ते १९५०
३) १८५० ते १९५०
४) १८०० ते १९००
२) डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संपादित केलेल्या ज्ञानकोशाचे नाव काय ?
१) महाराष्ट्र परिचय
२) महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश
३) महाराष्ट्रीय ज्ञानकोश
४) महाराष्ट्रीय व्यावहारिक ज्ञानकोश
३) मराठीतील पहिले वृत्तपत्र काढण्याचा मान कोणाला जातो ?
१) भाऊ महाजन
२) विष्णुशास्त्री पंडित
३) बाळशास्त्री जांभेकर
४) लोकमान्य टिळक
४) ज्ञानसिंधू आणि मित्रोदय या दैनिक वर्तमानपत्रांची सुरुवात कोणी केली?
१) कृष्णाजी त्र्यंबक रानडे
३) काकासाहेब लिमये
३) नामदार गोखले
४) विरेश्वर छत्रे
५) बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर .......... यांनी लेख लिहिले.
१) बैरामजी मलबारी
२) बाळशास्त्री जांभेकर
३) पंडिता रमाबाई
४) रमाबाई रानडे
६) जोड्या जुळवा.
१) बाळासाहेब जांभेकर अ. सत्सार
२) भाऊ महाजन ब. इंदू प्रकाश
३) महात्मा फुले क. दिग्दर्शन
४) न्या. रानडे ड. प्रभाकर
योग्य पर्याय निवडा :
१) १-अ, २-ब, ३-क, ४-ड
२) १-क, २-अ, ३-ड, ४-ब
३) १-क, २-ड, ३-अ, ४-ब
४) १-ड, २-क, ३-ब, ४-अ
७) वर्तमान दीपीका या वर्तमान पत्राद्वारे वेदिक धर्मावरील टीकेला कोणत्या समाजसुधारकाने चोख उत्तर दिले.
१) विष्णुशास्त्री पंडित
२) भाऊ महाजन
३) विष्णू बुवा ब्रह्मचारी
४) रा. गो. भांडारकर
८) जोड्या जुळवा :
अ) रास्त गोफ्तार I) तात्या छत्रे
ब) ज्ञान सिंधू II) कृष्णाजी त्र्यंबक रानडे
क) ज्ञान प्रकाश III) विश्वनाथ नारायण मंडलिक
ड) नेटिव्ह ओपिनियन IV) दादाभाई नौरोजी
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
१) II IV III I
२) IV I II III
३) II III I IV
४) III I IV II
९) पुढील वर्तमानपत्रे व त्यांच्या संपादकांच्या जोड्या लावा
a) वसुमती i) अ. ब. कोल्हटकर
b) प्रबासी ii) बालमुकूंद गुप्ता आणि अंबिका प्रसाद बाजपेयी
c) भारत मित्र iii) रामचंद्र चटर्जी
d) संदेश iv) हेमचंद्र प्रसाद घोष
(a) (b) (c) (d)
१) (ii) (i) (iv) (iii)
२) (iv) (iii) (ii) (i)
३) (i) (ii) (iii) (iv)
४) (iii) (iv) (i) (ii)
१०) स्त्रियांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन या मुद्यांवर भर देणारे समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी चालविले ?
१) धोंडो केशव कर्वे
२) रघुनाथ धोंडो कर्वे
३) दिनकर कर्वे
४) इरावती कर्वे
११) पुढील वर्तमानपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या जुळवा:
a) जागृती i) व्यंकटराव गोडी
b) राष्ट्रवीर ii) खंडाराव बागल
c) हंटर iii) शामराव देसाई
d) ब्राह्मणेतर iv) भगवंतराव पाळेकर
पर्यायी उत्तरे -
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (i) (iii) (ii) (i)
३) (ii) (i) (iv) (iii)
४) (iii) (iv) (i) (ii)
१२) श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज व सोमवंशीय मित्र हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
अ) शिवराम जानबा कांबळे
ब) गोपाळबुवा वलंगकर
क) किसन फागू बनसोडे
ड) गणेश आकाजी गवई
१) अ) फक्त
२) अ) आणि ब)
३) ब) आणि ड)
४) ड) फक्त
१३) जोड्या जुळवा :
अ ब
अ) निबंधमाला १) आगरकर
ब) सुधारक २) सूर्याजी कृष्णाजी
क) दर्पण ३) विष्णुशास्त्री चिपळूणकर
ड) मुंबई अखबार ४) बाळशास्त्री जांभेकर
अ ब क ड
१) १ २ ३ ४
२) ३ १ ४ २
३) ३ ४ १ २
४) ४ ३ २ १
१४) पुढील वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या लावा.
a) किरण i) वि. ना. मंडलिक
b) नेटिव्ह ओपिनियन ii) ना. ग. चंदावरकर
c) इंदु प्रकाश iii) म. ब. नामजोशी
d) इंडियन स्पेक्टेटर iv) बेहरामजी मलबारी
पर्यायी उत्तरे -
(a) (b) (c) (d)
१) (iii) (i) (ii) (iv)
३) (ii) (i) (iii) (iv)
२) (i) (iv) (ii) (iii)
४) (iv) (ii) (i) (iii)
१५) जोड्या लावा.
a) आत्मोद्धार i) काकासाहेब बर्वे
b) भारत ii) धनाजी बिर्हाडे
c) सेवक iii) एस. एन. चौधरी
d) दलित भारत ii) एस. एन. मेढे
पर्यायी उत्तरे -
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (ii) (iv) (iii) (i)
३) (iii) (i) (iv) (ii)
४) (iv) (iii) (i) (ii)
१६) केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरु केली ?
१) टिळक आणि आगरकर
२) टिळक आणि चिपळूणकर
३) चिपळूणकर आणि आगरकर
४) वरीलपैकी कोणीही नाही
१७) जोड्या लावा.
a) गो. ग. आगरकर i ) महाराष्ट्र केसरी
b) डॉ. बी. आर. आंबेडकर ii) दीनबंधू
c) कृष्णराव भालेकर iii) मूकनायक
d) डॉ. पंजाबराव देशमुख iv) सुधारक
(a) (b) (c) (d)
1) (iv) (iii) (ii) (i)
2) (i) (iii) (ii) (iv)
3) (ii) (i) (iv) (iii)
4) (iv) (ii) (i) (iii)
१८) ”इंडियन जर्नल ऑफ सोशल वर्क” हे मासिक कोणत्या संस्थेने सुरू केले?
१) निर्मला निकेतन, मुंबई
२) कर्वे सामाजिक संस्था, पुणे
३) समाज कार्य विभाग, लखनौ विद्यापीठ, लखनौ
४) टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई
१९) सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात ...... येथून प्रकाशित होणार्या दिनमित्र वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती.
१) सातारा
२) महाड
३) तरवडी
४) वाई
२०) जोड्या जुळवा :
a) गुराखी i) मुंबई
b) प्रतोद ii) ठाणे
c) अरुणोदय iii) सातारा
d) विश्ववृत्त iv) कोल्हापूर
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (iv) (iii) (ii) (i)
३) (i) (iii) (ii) (iv)
४) (ii) (i) (iv) (iii)
२१) जोड्या लावा
अ) धूमकेतू I. कोलकाता
ब) नवयुग II. गुंंटूर
क) सोशॅलिस्ट III. मुंबई
ड) व्हॅनगार्ड ऑफ इंडियन इंडिपेंडन्स IV. बर्लिन
अ ब क ड
१) I II III IV
२) IV III II I
३) II I III IV
४) III II I IV
२२) खालील जोड्या जुळवा :
अ) फ्री प्रेस बुलेटिन I) बॉम्बे
ब) फ्री इंडिया II) मद्रास
क) दिनमणी III) कलकत्ता
ड) सकाळ IV) पुणे
अ ब क ड
१) I III II IV
२) IV I III II
३) III II I IV
४) I II III IV
२३) पुढील वृत्तपत्रे व ती जेथून प्रकाशित होतात ती स्थळे यांच्या जोड्या जुळवा.
अ) महाराष्ट्र i. अमरावती
ब) लोकमत ii. यवतमाळ
क) मातृभूमी iii. अकोला
ड) स्वतंत्र हिंदुस्थान iv. नागपूर
अ ब क ड
१) I II III IV
२) II I IV III
३) IV II III I
४) III IV II I
२४) महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात १७८९ मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली ?
१) बेंगाल गैझेट
२) बॉम्बे हेराल्ड
३) टेलीग्राफ
४) बॉम्बे टाईम्स्
२५) १७८९ मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?
१) बॉम्बे गॅझेट
२) बॉम्बे कुरियर
३) दर्पण
४) बॉम्बे हेरॉल्ड
२६) .............. हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे.
१) केसरी
२) सुधारक
३) मराठा
४) दर्पण
२७) दर्पण या मुद्रित प्रसारण माध्यमाचा खालील बाबींशी संबंध नाही.
a) भारतीय भाषांमधून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र
b) हे वृत्तपत्र राजा राम मोहन रॉय यांनी सुरु केले.
c) हे वृत्तपत्र बाळ शास्त्री जांभेकर यांनी सुरु केले
d) भारतातील पहिले मराठी वृत्तपत्र
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) पर्याय योग्य आहेत
२) (c) आणि (d) पर्याय योग्य आहेत
३) (b) आणि (d) पर्याय योग्य आहेत
४) (a),(b) आणि (d) पर्याय योग्य आहेत
२८) गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते?
१) दर्पण
२) प्रभाकर
३) सुधारक
४) मुंबई समाचार
२९) दादाभाई नौरोजी हे ...... वर्तमानपत्राचे संपादक होते.
१) बॉम्बे समाचार
२) जाम-ए-जमशेद
३) अखबार-ए-सौदागार
४) रास्त गोफ्तार
३०) १८४२ साली ...... या वृत्तपत्रातील लेखामधून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज अधोरेखित केली होती.
१) दर्पण
२) ज्ञानोदय
३) मराठा
४) दीनबंधू
३१) मराठी नियतकालिकांचा काळानुसार क्रम लावा :
a) प्रभाकर
b) दर्पण
c) विविध ज्ञानविस्तार
d) निबंधमाला
पर्यायी उत्तरे :
१) (b), (a), (c), (d)
२) (a), (b), (c), (d)
३) (b), (c), (d), (a)
४) (b), (a), (d), (c)
३२) पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांच्या संपादकांना ब्रिटिश सरकारविरोधी लेखनाबद्दल तुरुंगवास घडला नाही ?
१) प्रतोद
२) विश्ववृत्त
३) ज्ञानप्रकाश
४) देश सेवक
३३) विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनर्यांच्या अपप्रचारास उत्तर देण्यासाठी .......... हे वृत्तपत्र सुरु केले.
१) दर्पण
२) मराठा
३) केसरी
४) वर्तमानदीपिका
३४) ज्ञानोदय मधील लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणती नियतकालिके सुरू झाली?
अ) विचारलहरी
ब) चंद्रिका
क) सद्धर्मदीपिका
ड) इंदूप्रकाश
१) फक्त अ
२) ब आणि क
३) फक्त ड
४) अ, ब आणि क
३५) पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचा गोविंद विठ्ठल कुंटे यांच्याशी संबंध नाही?
१) प्रभाकर
२) ज्ञानोदय
३) धूमकेतू
४) ज्ञानदर्शन
३६) लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती?
१) प्रभाकर
२) समता
३) सुलभ समाचार
४) बहिष्कृत भारत
३७) पुढील वृत्तपत्रांची स्थापनेच्या कालक्रमानुसार मांडणी करा.
(a) दीनबंधू
(b) दर्पण
(c) प्रभाकर
(d) दीनमित्र
पर्यायी उत्तर :
१) (b), (a), (c), (d)
२) (b), (d), (c), (a)
३) (b), (d), (a), (c)
४) (b), (c), (a), (d)
३८) विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या कोणत्या वृत्तपत्राने महाराष्ट्रात सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजाविली आहे?
१) ज्ञानप्रकाश
२) ज्ञानोदय
३) प्रभाकर
४) इंदुप्रकाश
३९) बडोदा वत्सल, राघव भूषण आणि अंबा लहरी ही ...... चालवलेली वृत्तपत्रे होती.
१) लोकहितवादींनी
२) आर्य समाजांनी
३) सत्यशोधकांनी
४) विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी
४०) सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ?
१) सुधारक
२) केसरी
३) दीनबंधू
४) प्रभाकर
४१) ...... हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
१) दीनबंधू
२) दीन मित्र
३) दलित मित्र
४) दलित बंधू
४२) केसरीचे पहिले संपादक ...... होते.
१) लोकमान्य टिळक
२) बाळशास्त्री जांभेकर
३) भाऊ महाजन
४) गोपाळ गणेश आगरकर
४३) लोकमान्य टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात ...... या दोघांनी टिळकांची वृत्तपक्षे सांभाळली.
१) न. चि. केळकर व कृष्णाजी खाडिलकर
२) ज. स. करंदीकर व न. चि. केळकर
३) जयंतराव टिळक व दा. वि. गोखले
४) ग. वि. केतकर व जयंतराव टिळक
४४) वृत्तपत्रातील लेखाबद्दल आगरकरांना ...... यांच्या बरोबर १०१ दिवसाची कारावासाची शिक्षा झाली होती.
१) लोकहितवादी
२) टिळक
३) फुले
४) गोखले
४५) सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरु केले ?
१) महात्मा ज्योतीबा फुले
२) संत तुकडोजी महाराज
३) गोपाळ गणेश आगरकर
४) छत्रपती शाहू
४६) ........ यांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केले.
१) गोपाळ गणेश आगरकर
२) गोपाळ हरी देशमुख
३) बाळ गंगाधर टिळक
४) डॉ. पंजाबराव देशमुख
४७) “स्त्री शिक्षणाची दिशा“ हा स्त्री शिक्षणावरील लेख ...... या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता.
१) केसरी
२) दर्पण
३) धूमकेतू
४) राष्ट्रवीर
४८) गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?
१) मराठा
२) केसरी
३) ज्ञानप्रकाश
४) दर्पण
४९) आगरकर ....... चे संपादक होते.
१) शतपत्रे
२) हरिजन
३) सुधारक
४) मराठा
५०) गोपाळ गणेश आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्यामागचा उद्देश काय होता ?
१) पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार
२) स्त्री-पुरुष समानतेचा स्वीकार
३) नवीन वैचारिक दृष्टिकोनाचा स्वीकार
४) व्यक्ती-स्वातंत्र्याचा स्वीकार
५१) गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरीत अग्रलेख लिहून बाजू मांडली की ........
१) समाजाने ही प्रथा बंद करावी
२) कायद्याने ही प्रथा बंद करावी
३) स्त्री-शिक्षणाचा प्रसार करून प्रथा बंद करावी
४) हिंदू धर्माने पुढाकार घेऊन प्रथा बंद करावी
५२) जहाल काळात केसरी व मराठा जनजागृतीत आघाडीवर होते. टिळक व आगरकर त्यांच्याशी कसे संबंधित होते?
१) त्यांनी केसरी इंग्रजीत व मराठा मराठीत १८८१ मध्ये सुरू केले.
२) आगरकरांनी मराठाचे तर टिळकांनी केसरीचे संपादन केले.
३) वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत.
४) वरील एकही विधान बरोबर नाही.
५३) मानवी समता हे मासिक कोणी चालू केले?
१) बाळशास्त्री जांभेकर
२) धोंडो केशव कर्वे
३) महात्मा फुले
४) डॉ. आंबेडकर
५४) एप्रिल १८८८ मध्ये गणपत सखाराम पाटील यांनी ......... वृत्तपत्र सुरू केले.
१) राष्ट्रमत
२) विचारवैभव
३) दीनबंधू
४) दिनमित्र
५५) दीनमित्रची सुरुवात ...... यांनी केली.
१) शाहू महाराज
२) डॉ. आंबेडकर
३) मुकुंदराव पाटील
४) विठ्ठल शिंदे
५६) छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती ?
a) विजयी मराठा
b) तरुण मराठा
c) कैवारी
d) तेज
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (a) आणि (b) फक्त
३) (a), (b) आणि (c) फक्त
४) (a), (b), (c), (d)
५७) कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉ. बी. आर. आंबेडकरांना ....... मदत केली होती.
१) हरिजन बंधू च्या प्रकाशनासाठी
२) स्वराज्यांच्या प्रकाशनासाठी
३) मूक नायकांच्या प्रकाशनासाठी
४) बहिष्कृत भारत च्या प्रकाशनासाठी
५८) दोन कोरड्या रोट्या, एक पेलाभर पाणी आणि प्रत्येक संपादकीयाबद्दल दहा वर्षे सक्तमजुरी या पगारावर कोणत्या वृत्तपत्राने संपादकपदाची जाहिरात दिली होती?
१) केसरी
२) स्वराज्य
३) वंदे मातरम्
४) काळ
५९) १९०८ च्या कायद्याच्या कडक तरतुदींमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले ?
a) युगांतर
b) दर्पण
c) संध्या
d) वंदेमातरम
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b), (c) फक्त
२) (a), (c), (d) फक्त
३) (a), (d) फक्त
४) (c), (d) फक्त
६०) पुढील वाक्यात कोणत्या वृत्तपत्राचे वर्णन केले आहे ?
a) ते १९०८ मध्ये सुरू झाले होते.
b) ते सुरू करण्याच्या प्रयत्नांशी टिळकांचा संबंध होता.
c) ते एका मर्यादित कंपनीच्या मालकीचे होते.
d) परंतु हे वृत्तपत्र एक वर्षापेक्षा जास्त टिकले नाही.
पर्यायी उत्तरे :
१) मुंबई वैभव
२) गुराखी
३) राष्ट्रमत
४) देशसेवक
६१) १९१० च्या प्रेस अॅक्ट नुसार मुंबईच्या अँग्लो-मराठी ...... पत्राकडून रु. ५.००० तारण म्हणून मागण्यात आले त्याचा परिणाम म्हणून त्याचे प्रकाशनच बंद करण्यात आले .
१) काळ
२) देशसेवक
३) राष्ट्रमत
४) वरीलपैकी एकही नाही
६२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली होती?
१) समता, गुलामी, जनता
२) बहिष्कृत भारत, जनता, गुलामी
३) बहिष्कृत भारत, जनता, समता
४) बहिष्कृत भारत, समता, गुलामी
६३) मूकनायक ची सुरुवात झाली तेव्हा खालीलपैकी कोणता गट त्याच्याशी संबंधित होता ?
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर, ज्ञानदेव घोलप
४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर, दिनकरराव जवळकर
६४) मूकनायक हे नियतकालिक ....... यांनी सुरू केले.
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) छत्रपती शाहू महाराज
३) गोपाळ बाबा वळंगकर
४) धोंडो केशव कर्वे
६५) कशामधील डॉ. आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय ?
१) मूकनायक
२) बहिष्कृत भारत
३) समता पत्र
४) प्रबुद्ध भारत
६६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी जनता पत्र व ........ ह्या वृत्तपत्रांचा वापर केला.
१) मूक नायक
२) सुधारक
३) वर्तमान दीपिका
४) विचारलक्ष्मी
६७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पाक्षिक सुरू केले?
१) बहिष्कृत भारत
२) दीनबंधू
३) हरिजन
४) यंग इंडिया
६८) सन १९२७ मध्ये डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते?
१) मासिक
२) दैनिक
३) साप्ताहिक
४) पाक्षिक
६९) कोणते डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते ?
१) हरिजन
२) मूकनायक
३) समता
४) प्रबुद्ध भारत
७०) खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?
१) मूकनायक
२) जनता
३) समता
४) संदेश
७१) सन १९२५ मध्ये खाडिलकरांनी नवाकाळ हे वृत्तपत्र सुरू केले. त्यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय होते?
अ) व्यापार
ब) शिक्षण
क) बाजारभाव
ड) चित्रपट
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि ब
२) ब आणि क
३) क आणि ड
४) अ आणि क
७२) पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती ?
a) विद्यार्थी
b) काँग्रेस
c) साधना
पर्यायी उत्तरे :
१) आचार्य अत्रे
२) रामानंद तिर्थ
३) हिरवे गुरुजी
४) साने गुरुजी
७३) हरिजन साप्ताहिकाबद्दल काय खरे आहे?
a) त्याच्या पहिल्या अंकासाठी रविंद्रनाथ टागोरांनी द क्लिन्सर ही कविता दिली होती.
b) डॉ. आंबेडकरांनी पहिल्या अंकासाठी संदेश देण्यास नकार दिला.
c) गांधीजींनी स्पष्ट केले की हरिजन हे काही त्यांचे साप्ताहिक नव्हते त्याच्या मालकी हक्काविषयी सांगायचे तर ते हरिजन सेवक समाजाचे होते.
d) गांधीजींनी डॉ. आंबेडकरांना सांगितले की साप्ताहिक जसे कुठल्याही हिंदूंचे आहे तितकेच आंबेडकरांचेही आहे.
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b), (c) फक्त
२) (a), (b), (d) फक्त
३) (b), (c), (d) फक्त
४) (a), (b), (c) आणि (d)
७४) श्रीपाद अमृत डांगे, जोगळेकर आणि मिरजकरानी मिळून सुरू केलेल्या कामगार चळवळीचे “मुखपत्र” खालीलपैकी कोणते होते ?
१) उजाला
२) क्रांती
३) कॉमरेड
४) ज्ञानोदय
७५) संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते?
१) नवा काळ
२) मौज
३) दै. मराठा
४) प्रभात
७६) स्वातंत्र्योत्तर काळात मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे मराठी दैनिक ...... होय.
१) महाराष्ट्र टाइम्स
२) नवशक्ती
३) लोकसत्ता
४) सकाळ
७७) बाळासाहेब ठाकरे मुंबईतून प्रसिद्ध होणार्या कोणत्या मराठी व्यंगचित्र साप्ताहिकांचे संपादक होते?
१) अवंती
२) वेदांती
३) तार्किक
४) मार्मिक
७८) कोणते नियतकालिक यशदा प्रकाशित करते ?
अ) यशमंथन
ब) अश्वथ्था
क) योजना
ड) लोक राज्य
योग्य पर्याय निवडा :
१) अ आणि ब फक्त
२) क आणि ड फक्त
३) अ, ब आणि ड फक्त
४) अ आणि ड फक्त
४) देशी वृत्तपत्रे
१) जोड्या जुळवा.
a) मिरात-उल्-अखबार i) राजा राममोहन रॉय
b) जाम-इ-जहन नुमा ii) कलकत्त्यातील इंग्रजी व्यापारी कंपनी
c) रास्त गोफ्तार iii) दादाभाई कावसजी
d) अखबार-ओ-सौदागर iv) गुजराथी पाक्षिक
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (i) (iii) (iv)
२) (i) (ii) (iv) (iii)
३) (iii) (iv) (ii) (i)
४) (iv) (iii) (i) (ii)
२) ”कॉमन विल” व ”न्यू इंडिया” ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती?
१) दादाभाई नौरोजी
२) बंकीम चंद्र चॅटर्जी
३) डॉ. अॅनी बेझंट
४) पंडित मालवीय
३) संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
१) राजा राममोहन रॉय
२) केशव चंद्र सेन
३) देवेंद्रनाथ टागोर
४) ईश्वरचंद्र विद्यासागर
४) आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण ?
१) डी. पी. तरखडकर
२) व्ही. डी. सावरकर
३) विनायक
४) एच. व्ही. डेरॉझियो
५) १८३९ च्या सुमारास भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळी वृत्तपत्रे/पत्रिका प्रकाशित होऊ लागल्या. पुढे दिलेली ठिकाणे आणि तेथून प्रकाशित होणार्या वृत्तपत्रांची/पत्रिकांच्या संख्या यांच्या जोड्या जुळवा.
a) दिल्ली i) एक वृत्तपत्र
b) मुंबई ii) नऊ युरोपियन पत्रिका
c) मद्रास iii) १० युरोपियन व चार भारतीय पत्रिका
d) कलकत्ता iv) २६ युरोपियन वृत्तपत्रे व नऊ भारतीय वृत्तपत्रे
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (i) (iv) (iii)
२) (i) (ii) (iii) (iv)
३) (i) (iii) (ii) (iv)
४) (iii) (iv) (i) (ii)
६) १८९३-९४ या काळात न्यु लॅम्प फॉर ओल्ड या शिर्षकाची लेख मालिका कोणी लिहीली ?
१) अरविंद घोष
२) बी. जी. टिळक
३) लाला लजपत राय
४) बिपीनचंद्र पाल
७) जोड्या जुळवा.
a) एम. सिंगारवेलू i) लेबर किसान गॅझेट
b) गुलाम हुसेन ii) इन्किलाब
c) मुजफ्फर अहमद iii) नवयुग
d) श्रीपाद अमृत डांगे iv) दि सोशॅलिस्ट
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (ii) (i)
२) (ii) (i) (iv) (iii)
३) (iii) (ii) (i) (iv)
४) (i) (ii) (iii) (iv)
८) जोड्या जुळवा
a) वंदेमातरम i) होमरूल द्वारे सुरु झालेले वृत्तपत्र
b) लीडर ii) मद्रासहून निघणारे वृत्तपत्र
c) यंग इंडिया iii) अरविंद घोष
d) हिंदू iv) पंडित मदन मोहन मालवीय ?
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iii) (iv) (i) (ii)
२) (ii) (iii) (iv) (i)
३) (iii) (i) (ii) (iv)
४) (iv) (iii) (i) (ii)
९) “मिरत-उल्-अखबार” हे साप्ताहिक राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या भाषेतून प्रसिद्ध केले ?
१) तुर्की
२) फारशी
३) अरेबिक
४) बंगाली
५) इंग्रजी वृत्तपत्रे
१) द टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र इ.स. ...... मध्ये सुरु झाले.
१) १८२३
२) १८५७
३) १८६०
४) १८६१
२) नेटिव्ह ओपिनियन या इंग्रजी वृत्तपत्राचा कारभार ...... पहात होते.
१) वि. ना. मंडलीक
२) विष्णुबुवा ब्रह्मचारी
३) गोपाळ गणेश आगरकर
४) बाळशास्त्री जांभेकर
३) ...... हे 'J' या टोपण नावाने टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लेखन करीत.
१) गणेश व्यंकटेश जोशी
२) वामन मल्हार जोशी
३) गोपाळ कृष्ण जोशी
४) पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी
४) मुंबई शहराची वाढती प्रगती पाहून ...... चे संपादक रॉबर्ट नाईट याने आपल्या वर्तमान पत्राचे नाव बदलून टाइम्स ऑफ इंडिया ठेवले.
१) बॉम्बे गॅझेट
२) बॉम्बे कुरिअर
३) बॉम्बे टाइम्स
४) बॉम्बे स्टँडर्ड
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१५७)
१) वृत्तपत्र कायदे
१-२
२-२
३-३
२) मुद्रणालये
१-२
२-४
३-१
४-२
३) मराठी वृत्तपत्रे
१-२
२-३
३-३
४-४
५-१
६-३
७-३
८-२
९-२
१०-२
११-२
१२-१
१३-२
१४-१
१५-३
१६-१
१७-१
१८-४
१९-३
२०-३
२१-१
२२-२
२३-३
२४-२
२५-४
२६-४
२७-१
२८-४
२९-४
३०-२
३१-१
३२-३
३३-४
३४-४
३५-२
३६-१
३७-४
३८-४
३९-३
४०-३
४१-१
४२-४
४३-१
४४-२
४५-३
४६-१
४७-१
४८-२
४९-३
५०-१
५१-३
५२-४
५३-२
५४-४
५५-३
५६-४
५७-३
५८-२
५९-२
६०-३
६१-३
६२-३
६३-३
६४-१
६५-१
६६-१
६७-१
६८-४
६९-१
७०-४
७१-४
७२-४
७३-४
७४-२
७५-३
७६-३
७७-४
७८-१
४) देशी वृत्तपत्रे
१-२
२-३
३-१
४-४
५-३
६-१
७-४
८-१
९-२
५) इंग्रजी वृत्तपत्रे
१-४
२-१
३-१
४-३