आचार्य बाळशास्त्री जांभेकर / प्रश्नमंजुषा (१५५)
- 19 May 2021
- Posted By : study circl
- 1426 Views
- 7 Shares
प्रश्नमंजुषा (१५५)
१) खालीलपैकी कोणत्या कारणामुळे ६ जानेवारी हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो ?
१) बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस.
२) दर्पण वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
३) दिग्दर्शन वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
४) वरील सर्व
२) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र सरकारतर्फे दर्पण दिन अथवा वृत्तपत्र दिन म्हणून साजरा होतो.
ब) ६ जानेवारी हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ आणि ब दोन्ही
४) कोणतेही नाही
३) ”बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लिलया संचार करणारे पंडित होते.” हे उदगार कोणी काढले होते ?
१) न्यायमूर्ती ना. ग. चंदावरकर
२) न्यायमूर्ती म. गो. रानडे
३) दादाभाई नौरोजी
४) आचार्य अत्रे
४) बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) बाळशास्त्रींनी नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली.
२) गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून त्यांनी विधवा विवाहाच्या शास्त्रीय आधार विषयीचा ग्रंथ लिहून घेतला.
३) धर्मांतरितास पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची शुद्धी चळवळ पहिली त्यांनी सुरु केली.
४) त्यांनी स्ट्युडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ची स्थापना केली.
५) ”द बॉम्बे नेटिव्ह स्कूल सोसायटी”शी सम्बंधित व्यक्ती ओळखा.
अ) रामशास्त्री जानवेकर
ब) रॉबर्ट कॉटन मनी
क) सदाशिव काशीनाथ ऊर्फ बापू छत्रे
ड) बापूशास्त्री शुक्ल
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब आणि क बरोबर
२) ब, क आणि ड बरोबर
३) अ आणि ब बरोबर
४) अ, क आणि ड बरोबर
६) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
१) दादाभाई नौरोजी हे आचार्य बाळशास्त्रींचे विद्यार्थी होते.
२) आत्माराम पांडुरंग हे आचार्य बाळशास्त्रींचे विद्यार्थी होते.
३) नाना शकंरशेठ हे आचार्य बाळशास्त्रींचे विद्यार्थी होते.
४) भोगीलाल प्राणवल्लभदास हे आचार्य बाळशास्त्रींचे विद्यार्थी होते.
७) द बॉम्बे दर्पण संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) हे पश्चिम भारतात पहिले अँग्लो-मराठी नियतकालिक होते.
ब) बाळशास्त्री जांभेकरांनी याद्वारे मराठी वृत्तपत्रसृष्टीची सुरुवात मुंबईच्या काळबादेवी भागातून केली.
क) यातील मराठी मजकुराची बाजू भाऊ महाजन, तर इंग्रजी मजकुराची बाजू बाळशास्त्री जांभेकर सांभाळत.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त अ आणि ब
३) फक्त अ आणि क
४) अ, ब आणि क
८) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) सुरुवातीचा काही काळ दर्पण हे एक पाक्षिक म्हणून प्रकाशित होत असे.
२) ४ मे १८३२ पासून दर्पण साप्ताहिक म्हणून प्रकाशित होऊ लागले.
३) मुंबई सरकारने दर्पण नियतकालिकाच्या प्रकाशनास करामध्ये ५० रुपये सवलत दिली होती.
४) दर्पणचे परकशन जवळपास साडे दहा वर्षे सुरु होते.
९) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ स्तंभ ब
अ) अक्कलकोटचे ब्रिटिश पोलिटिकल एजंट I. कॅप्टन जेम्सन
ब) सातारा दरबारचे ब्रिटिश रेसिडेंट II. कर्नल लॉडविक
क) बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी III. कॅप्टन जर्व्हिस
ड) मुंबई प्रांताचे गव्हर्नर IV. माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
(1) II III I IV
(2) II I III IV
(3) III II IV I
(4) I II III IV
१०) मुंबईत ख्रिश्चन धर्मप्रसार करण्यासाठी ओरिएंटल ख्रिश्चन स्पेक्टेटर हे नियतकालिक सुरू केले होते ?
१) ए. बी. ऑर्लेबर
२) जॉन विल्सन
३) जॉन हॉर्कनेस
४) रॉबर्ट कॉटन मनी
११) बाळशास्त्री जांभेकर यांनी ........ शिक्षक म्हणून काम केले होते.
अ) सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे
ब) एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये
क) दादाभाई नवरोजी यांचे
ड) अक्कलकोटच्या युवराजांचे
पर्यायी उत्तरे :
१) विधाने अ, ब आणि क बरोबर
२) विधाने ब, क आणि ड बरोबर
३) विधाने अ, ब आणि ड बरोबर
४) विधाने अ, क आणि ड बरोबर
१२) बाळशास्त्री जांभेकर यांचा जस्टीस ऑफ पीस असा किताब देऊन गौरव केला होता ?
१) मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी (१८३०)
२) मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट यांनी (१८३५)
३) मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन यांनी (१८४८)
४) मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर जेम्स कार्नाक यांनी (१८४०)
१३) बाळशास्त्री जांभेकर जांभेकर कोणत्या संस्थेचे सदस्य होते ?
अ) रॉयल एशियाटिक सोसायटी
ब) बॉम्बे जिऑग्राफिकल सोसायटी
क) बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी
ड) कुलाबा वेधशाळा
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब आणि क बरोबर
२) ब, क आणि ड बरोबर
३) अ, ब आणि ड बरोबर
४) ब आणि क बरोबर
१४) खालील विधाने विचारात घ्या :
a) १८४० साली दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक दिग्दर्शन जांभेकरांनी सुरू केले.
b) १८३८ साली बॉम्बे टाइम्स हे वृत्तपत्र रॉबर्ट ग्रँट यांनी सुरु केले.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
१) फक्त (a)
२) फक्त (b)
३) (a) व (b) दोन्ही
४) दोन्हीही नाहीत
१५) बाळशास्त्री जांभेकर यांनी भाऊ महाजनांच्या मदतीने दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले, भाऊ महाजन यांचे मूळ नाव काय होते ?
१) गोपाळ हरी देशमुख
२) गोविंद विठ्ठल कुंटे
३) गोपाळ विठ्ठल देशमुख
४) गोविंद हरी कुंटे
१६) बॉम्बे जिऑग्राफिकल सोसायटी चे सदस्य म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांची नेमणूक कधी झाली ?
१) १८३०
२) १८३५
३) १८४०
४) १८४५
१७) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : बाळशास्त्री जांभेकरभारतीय ऐतिहासिक संशोधनाचे जनक संबोधणे उचित आहे.
कारण (र) : एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमधून भारतीय कोरीव लेखांविषयी मौलिक लेखन करणारे ते अखिल भारतातील एकटे एतद्देशीय पंडित होते.
पर्यायी उत्तरे :
(१) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
(२) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
(३) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
(४) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
१८) बंगालमध्ये समाजप्रबोधनाची सुरुवात करण्याचा मान राजा राममोहन रॉय यांना दिला जातो, तोच मान महाराष्ट्राच्या बाबतीत कोणास दिला जातो?
१) महात्मा फुले
२) नाना शंकरशेठ
३) बाळशास्त्री जांभेकर
४) न्या. म. गो. रानडे
१९) खालील नियतकालिकांचा प्रकाशनाच्या सुरुवातीनुसारचा योग्य कालक्रम लावा.
अ) बॉम्बे टाइम्स
ब) द बॉम्बे दर्पण
क) दिग्दर्शन
ड) ओरिएंटल ख्रिश्चन स्पेक्टेटर
पर्यायी उत्तरे :
१) अ - ब - क - ड
२) क - अ - ड - ब
३) ब - ड - अ - क
४) ब - अ- ड - क
२०) बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला ?
१) शून्यलब्धी आणि मूलपरिणती गणित
२) इंग्लंड देशाची बखर
३) हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास
४) भूगोलविद्या
२१) राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या कोणत्या सुधारणांचा आदर्श जांभेकरांनी आपल्या पत्रकारिता व अन्य कार्यातून जोपासला होता ?
अ) विधवांसहित सर्वच स्त्रियांना वेदाभ्यास व अन्य शिक्षण देणे.
ब) हिंदू विधवांचे केशकर्तन बंद करणे.
क) हिंदू विधवांचे पुनर्विवाह करणे
ड) महाराष्ट्रामध्ये सतीची चाल बंद करणे.
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब आणि क बरोबर
२) ब, क आणि ड बरोबर
३) अ, ब आणि ड बरोबर
४) अ, ब, क आणि ड बरोबर
२२) कोणत्या वृत्तपत्रात बाळशास्त्री यांच्या चिरकालीन स्मारकासंबंधी सर्वप्रथम मागणी केली गेली होती ?
१) लोकसत्ता
२) मराठा
३) मुंबईचा चाबूक
४) प्रभाकर
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१५५)
१-२
२-३
३-१
४-४
५-१
६-३
७-४
८-४
९-४
१०-२
११-२
१२-४
१३-४
१४-१
१५-२
१६-३
१७-१
१८-३
१९-३
२०-३
२१-४
२२-३