महाराष्ट्रातील समाजसुधारक (५) / प्रश्नमंजुषा (१४७)
- 18 May 2021
- Posted By : study circle
- 998 Views
- 1 Shares
महाराष्ट्रातील समाजसुधारक (५)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”महाराष्ट्रातील समाजसुधारक” या विषयावर अनेक प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील काही समाजसुधारकाशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, त्यांचे विचार आणि कार्य, परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
* राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
१.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्य - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा.
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६)
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केव्हा केली ?
१) १९२४
२) १९३६
३) १९४२
४) १९४६
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या खालील संघटनांची कालानुक्रमे रचना करा.
a) अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन
b) बहिष्कृत हितकारिणी सभा
c) द बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया
d) पिपल्स एज्युकेशन सोसायटी
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b), (c), (d)
२) (c), (b), (a), (d)
३) (b), (a), (d), (c)
४) (c), (d), (b), (a)
३) पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखाः
अ) त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणार्या कबीराच्या शिकवणुकीवर विश्वास होता.
ब) त्यांचे वडिल सैन्यात होते आणि ते सुभेदार-मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते.
क) त्यांच्या शाळेतील शिपाई बाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे.
ड) ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाहीत.
१) महात्मा ज्योतिबा फुले
२) श्री जवळकर
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४) श्री घोलप
४) श्री. धनंजय कीर या सुप्रसिद्ध चरित्रकाराने आपल्या एका चरित्रनायकाचे वर्णन खालील शब्दात केले आहे. हा चरित्रनायक कोण ते ओळखा?
”त्यांनी वृत्तपत्राचे संपादन केले. त्यांनी अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र, इतिहास आणि राज्यशास्त्र यावर ग्रंथ लिहिले... ते एका विधी महाविद्यालयाचे प्राचार्य होते... या लोकनेत्याने सामाजिक, राजकीय व कामगार चळवळींचे नेतृत्व केले...”
१) वीर सावरकर
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) लोकमान्य टिळक
४) महात्मा गांधी
५) ......... यांना डॉ. आंबेडकर त्यांच्या तीन गुरूंपैकी एक मानत, पहिले गौतम बुद्ध व दुसरे महात्मा फुले यांना ते गुरू मानीत.
१) तुकाराम
२) कबीर
३) नामदेव
४) एकनाथ
६) डॉ. आंबेडकरांचे वादग्रस्त व्यंगचित्र कोणी रेखाटलेले आहे?
१) रामन पिल्लेई
२) शंकर पिल्लेई
३) आर. बालकृष्णन पिल्लेई
४) रावन पिल्लेई
७) महात्मा जोतिबा फुले हे माझे तिसरे गुरु असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशामुळे म्हणतात?
१) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली म्हणून.
२) क्रांती घडवून आणण्यासाठी मदत केली म्हणून.
३) अस्पृश्य समाजावर अन्याय होत होता त्या विरुद्ध आवाज उठविला म्हणून
४) महात्मा जोतिबा फुलेंनी मुलींची शाळा काढली म्हणून.
८) भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर कोणास प्रदान करण्यात आला ?
१) धो. के. कर्वे
२) शाहू महाराज
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४) वरील कोणासही नाही
९) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत पुढील ३ विधानांचा विचार करा.
a) दलितांच्या राजकीय हक्कांसाठी त्यांनी सन १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.
b) त्यांनी म्हटले होते “जरी मी जन्माने हिंदू असली तरी मरताना हिंदू राहणार नाही“.
c) ते त्याच वर्षी निवर्तले ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला.
वरील कोणती विधाने बरोबर आहेत ?
१) (a) आणि (b)
२) (a) आणि (b)
३) (a) आणि (c)
४) (a), (b) आणि (c)
१०) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील घटनाक्रम लावा ः
१) बहिष्कृत हितकारणी सभा, महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, पुणे करार
२) महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, बहिष्कृत हितकारणी सभा, पुणे करार
३) बहिष्कृत हितकारणी सभा, काळाराम मंदिर सत्याग्रह, महाड सत्याग्रह, पुणे करार
४) पुणे करार, महाड सत्याग्रह, बहिष्कृत हितकारणी सभा, काळाराम मंदिर सत्याग्रह
११) १९२७ साली डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये दलित व दलितेतरांमध्ये सहभोजनाचा समावेश होता.
१) अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद
२) समाज समता संघ
३) अस्पृश्योद्धारक मंडळी
४) बहिष्कृत हितकारिणी सभा
१२) समाज समता संघाची स्थापना .......... यांनी केली.
१) क्रांतिवीर वि. दा. सावरकर
२) डॉ. बी. आर. आंबेडकर
३) राजर्षी शाहू महाराज
४) न्यायमूर्ती म. गो. रानडे
१३) शिका, संघर्ष करा व संघटित व्हा हे कोणाचे ब्रीदवाक्य होते?
१) दीनबंधू
२) सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी
३) समता संघ
४) बहिष्कृत हितकारिणी सभा
१४) ”बहिष्कृत हितकारिणी सभा” या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
१) वि. रा. शिंदे
२) राजर्षी शाहू महाराज
३) डॉ. बी. आर. आंबेडकर
४) महात्मा फुले
१५) बहिष्कृत हितकारिणी सभेतील उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे मांडण्यात आली आहेत. यामधील अयोग्य असे उद्दिष्ट कोणते?
१) स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांना त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार बजाविण्याच्या कामात मदत करावी.
२) स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांना आपल्या नोकरीत ठेवावे आणि अस्पृश्य विद्यार्थ्यांना वार लावून जेवण द्यावे.
३) समाजामध्ये उच्च संस्कृतीची वाढ करण्यासाठी वाचनालये, शैक्षणिक वर्ग व स्वाध्याय संघ स्थापन करावे.
४) मृत जनावरे ज्याची त्यांनी ओढावी.
१६) डॉ. आंबेडकर गोलमेज परिषदेत ....... मागणी केली.
१) स्वतंत्र मतदारसंघ
२) आरक्षण
३) स्त्री शिक्षण
४) मंदिर प्रवेश
१७) “मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.”ही घोषणा कोणी व कोठे केली?
१) नाशिक
२) नागपूर
३) महाड
४) येवला
१८) सन १९३० साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला?
१) सावित्रीबाई फुले
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) महात्मा फुले
४) महात्मा गांधी
१९) डॉ. आंबेडकरांनी नेतृत्त्व केलेल्या चळवळींची त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा.
अ) काळाराम मंदिर सत्याग्रह
ब) चवदार तळे सत्याग्रह
क) मनुस्मृती दहन
ड) धर्मांतर चळवळ
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब, क, ड
२) ब, क, अ, ड
३) अ, क, ब, ड
४) ब, क, ड, अ
२०) चवदार तळ्याचे आंदोलन जेथे झाले ते ठिकाण कोणते ?
१) अलिबाग
२) चिरनेर
३) शिरढोण
४) महाड
२१) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली ?
१) नागपूर
२) औरंगाबाद
३) नाशिक
४) महाड
२२) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले ?
१) नाशिक
२) रत्नागिरी
३) महाड
४) मुंबई
२३) बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या कोणी केली?
१) महात्मा गांधी
२) महात्मा फुले
३) सावरकर
४) आंबेडकर
२४) जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणत्या विचारवंताने म्हटले आहे ?
१) कार्ल मार्क्स
२) स्वामी विवेकानंद
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४) डॉ. जी. एस.घुर्ये
२५) देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी परिषद घेतली होती ?
१) नागपूर
२) माणगाव
३) महाड
४) निपाणी
२६) इ.स. १९२७ या वर्षी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह कोणी सुरू केला ?
१) महात्मा गांधी
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) वि. दा. सावरकर
४) विठ्ठल रामजी शिंदे
२) डॉ. पंजाबराव देशमुख (१८९८-१९६५)
१) १९२६-२७ मध्ये अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठीच्या चळवळीचे यशस्वी नेते कोण होते?
१) विसोजी डोणे
२) विश्राम रामजी घोले
३) पंजाबराव देशमुख
४) बापूजी अणे
३) क्रांतिवीर नाना पाटील (१९००-७६)
१) क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील सातारा प्रति सरकार चा कालखंड कोणता ?
१) १ जून १९४३ ते १३ जून १९४६
२) १० जून, १९४३ ते २६ जुलै १९४५
३) १ जून १९४४ ते १५ ऑगस्ट १९४६
४) वरीलपैकी नाही
२) क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या सांगली गटाचे नेतृत्व कोणाकडे होते?
१) वसंतदादा पाटील
२) यशवंतराव चव्हाण
३) पांडुरंग बोराटे
४) बापू कचरे
३) क्रांतिसिंह नाना पाटील :
a) यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेश देण्यास पाठिंबा दिला.
b) यांच्यावर १९४६ मध्ये मध्य प्रांताच्या सरकारने भाषण बंदी लादली.
c) यांना आचार्य प्र. के. अत्रे यांनी क्रांतिसिंह हे नानाभिधान दिले.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) बरोबर आहेत, (c) चूक आहे.
२) (b) आणि (c) बरोबर आहेत, (a) चूक आहे.
३) (a), (b), (c) तीनही विधाने बरोबर आहेत.
४) (a), (b), (c) तीनही विधाने चूक आहेत.
४) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९०९-६८)
१) संत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय होते ?
१) माणिक बंडोजी ठाकूर
२) माणिक बंडोजी ठाकरे
३) माणिक बंडोजी ठोंबरे
४) वरीलपैकी एकही नाही
२) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोझरी येथे कोणत्या आश्रमांची स्थापना केली ?
१) अनाथ बालिकाश्रम
२) शारदा सदन
३) गुरु कुंज
४) यांपैकी नाही
३) यावली, चिमूर, आष्टी येथे ............ यांच्या प्रेरणेने जनतेने प्रचंड आंदोलने केले.
१) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
२) व्ही. डी. सावरकर
३) नारायण मेघाजी लोखंडे
४) केशवचंद्र सेन
५) अण्णाभाऊ साठे (१९२०-६९)
१) अण्णाभाऊ साठे यांची ..... ही कादंबरी सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे.
१) माकडाची माळ
२) फकिरा
३) अग्निदिव्य
४) वैजयंता
२) अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात काय खरे आहे?
a) त्यांनी लाल बावटा कलापथक स्थापन केले.
b) त्यांनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.
c) फकिरा कादंबरीत त्यांनी वास्तव, आदर्श व स्वप्नरंजन यांचे मिश्रण केले.
d) माझा अमेरिका प्रवास हे त्यांचे प्रवासवर्णन आहे.
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b), (c) फक्त
२) (b), (c), (d) फक्त
३) (a), (b), (d) फक्त
४) (a), (b), (c) आणि (d)
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१४७)
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६)
१-१
२-३
३-३
४-२
५-२
६-२
७-३
८-३
९-४
१०-१
११-२
१२-२
१३-४
१४-३
१५-३
१६-१
१७-४
१८-२
१९-२
२०-४
२१-१
२२-३
२३-४
२४-३
२५-४
२६-२
२) डॉ. पंजाबराव देशमुख (१८९८-१९६५)
१-३
३) क्रांतिवीर नाना पाटील (१९००-७६)
१-१
२-१
३-३
४) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९०९-६८)
१-१
२-३
३-१
५) अण्णाभाऊ साठे (१९२०-६९)
१-३
२-१