महर्षी वि. रा. शिंदे / प्रश्‍नमंजुषा (१४५)

  • महर्षी वि. रा. शिंदे / प्रश्‍नमंजुषा (१४५)

    महर्षी वि. रा. शिंदे / प्रश्‍नमंजुषा (१४५)

    • 18 May 2021
    • Posted By : study circle
    • 4482 Views
    • 5 Shares
     महर्षी वि. रा. शिंदे

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात महर्षी वि. रा. शिंदेयांच्यावर  अनेक प्रश्‍न विचारले जातात. महर्षी वि. रा. शिंदे यांचे विचार आणि कार्य,  त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, त्यांच्यावर परीक्षेत विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
     
    *   राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :  
     
    १.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्य - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा.
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    महर्षी विठ्ठल शिंदे (१८७३-१९४४)
     
    १)  पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे ?
              a) यांचा जन्म कर्नाटकातील जमखिंडी येथे झाला.
        b) पुढे ते प्रार्थना समाजाचे एकनिष्ठ सेवक बनले.
        c) ’माझ्या आठवणी व अनुभव’ या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे त्यांनी लेखन केले.
        d) यांनी ’भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्‍नफ हा प्रबंध लिहिला.
        पर्यायी उत्तरे :
        १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
        २) यशवंतराव फुले
        ३) विठ्ठल रामजी शिंदे
        ४) नारायण लोखंडे
     
    २)  जुन्या चालीरीतींचे पुनरुज्जीवन करावे अशा विचारांच्या व्यक्तींची नावे पुढे दिली आहेत. त्यात एक व्यक्ती वेगळ्या विचाराची आहे. ती व्यक्ती कोणती ती ओळखा.
        १) स्वामी दयानंद सरस्वती
        २) अ‍ॅनी बेझंट
        ३) वि. रा. शिंदे
        ४) स्वामी विवेकानंद
     
    ३)  देवाने माणसाला निर्माण केले नसून माणसानेच देवाला निर्माण केले आहे.असे ...... यांनी म्हटले.
        १) महात्मा गांधी
        २) आंबेडकर
        ३) विठ्ठल शिंदे
        ४) गोपाळ आगरकर
     
    ४)  १९०५ मध्ये ‘यंग थिईस्ट युनियन‘ ची स्थापना पुढीलपैकी कोणी केली ?
              १) रा. गो. भांडारकर
        २) म. गो. रानडे
        ३) वि. रा. शिंद
        ४) गं. भा. म्हस्के
     
    ५)  पुढील वाक्यात कोणत्या समाजसुधारकाचे वर्णन केले आहे?
        अ) त्यांना अमेरिकन युनिटेरीयन अ‍ॅसोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती.
        ब) अनेक धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते दोन वर्षांकरिता इंग्लंडला गेले होते.
        क) अ‍ॅमस्टरडॅम येथील धर्मपरिषदेला ते उपस्थित होते.
        ड) सुबोध पत्रिकेसाठी ते लेखन करीत.
        १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
        २) विठ्ठल रामजी शिंदे
        ३) भाऊराव पाटील
        ४) बाबूराव जेधे
     
    ६)  ........ यांनी ‘अमेरिकन युनिटेरियन असोसिएशन’ ची शिष्यवृत्ती मिळाली होती.
        १)  विवेकानंद
        २) पंडिता रमाबाई
        ३) विठ्ठल रामजी शिंदे
        ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
     
    ७)  महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजापासून दूर गेले कारण त्यातील मंडळींना शिंदे यांनी केलेली ........ ही गोष्ट खटकली.
        १) डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही स्वतंत्र संस्था सुरू केली.
        २) लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजात प्रार्थना सादर केली.
        ३) ब्राह्मो समाजाकडे कल दाखवला.   
        ४) अस्पृश्यता निवारणासाठी राष्ट्रीय सभेची मदत मागितली.
     
    ८)  अ‍ॅमस्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेमध्ये ...... यांनी ‘हिंदुस्थानातील उदारधर्म’ हा प्रबंध वाचला.
        १) कर्मवीर वि. रा. शिंदे
        २) स्वामी विवेकानंद
        ३) महर्षी धों. के. कर्वे
        ४) भास्करराव जाधव
     
    ९)  १९२४ मध्ये पुणे येथे ‘कौटुंबिक उपासना मंडळाची‘ स्थापना कोणी केली ?
        १) महात्मा फुले
        २) महर्षी कर्वे
        ३) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
        ४) पंडिता रमाबाई
     
    १०) वि. रा. शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीकडे कार्य करण्याचा निर्णय ........ या .......... मधील ठिकाणी अस्पृश्यांच्या सभेला हजर राहिल्यानंतर घेतला.
        १) भिंगार, अहमदनगर
        २) वडाळा, मुंबई
        ३) पन्हाळा, कोल्हापूर
        ४) चेंबूर, मुंबई
     
    ११) देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबरोबर .......... यांनी कार्य केले.      
              १) शिवराम जानबा कांबळे
        २) बी. आर. आंबेडकर
        ३) एम्. जी. रानडे
        ४) शाहू महाराज
     
    १२) महाराष्ट्रातील ‘मुरळी आणि देवदासी’ प्रथा नष्ट व्हावी यासाठी खालीलपैकी कोणी सतत प्रयत्न केले?
        १) गोपाळ हरी देशमुख
        २) विठ्ठल रामजी शिंदे
        ३) धोंडो केशव कर्वे
        ४) गोपाळ गणेश आगरकर
     
    १३) ...... यांनी १९१२ पर्यंत अस्पृश्यासाठी २३ शाळा उघडल्या आणि त्यापैकी काही महाराष्ट्राबाहेर होत्या.
        १) डॉ. भी. रा. आंबेडकर
        २) शाहू महाराज
        ३) विठ्ठल रा. शिंदे
        ४) ज्योतिबा फुले
     
    १४) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता ?
        a)  पर्वती सत्याग्रह
        b) वाई गणपती मंदिर सत्याग्रह
        c) वायकोम मंदिर सत्याग्रह       
        d) लक्ष्मी नारायण मंदिर सत्याग्रह
        १) (a) आणि (c) फक्त
        २) (b) आणि (c) फक्त
        ३) (a), (b) आणि (c)
        ४) (a), (b), (c) आणि (d)
     
    १५) १९०६ मध्ये दलित संघाची स्थापना करून त्याद्वारे दलितोद्वाराचे कार्य कुणी केले?
        १) महात्मा जोतिबा फुले
        २) शाहू महाराज
        ३) विठ्ठल रामजी शिंदे
        ४) सयाजीराव गायकवाड
     
    १६) पुणे येथे ‘अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक संघाची‘ स्थापना कोणी केली?
        १) महात्मा जोतिबा फुले
        २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
        ३) राजर्षी शाहू महाराज
        ४) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१४५)
    १-३
    २-३
    ३-३
    ४-३
    ५-२
    ६-३
    ७-२
    ८-१
    ९-३
    १०-१
    ११-१
    १२-२
    १३-३
    १४-३
    १५-३
    १६-४

Share this story

Total Shares : 5 Total Views : 4482