महर्षी धों. के. कर्वे / प्रश्‍नमंजुषा (१४३)

  • महर्षी धों. के. कर्वे / प्रश्‍नमंजुषा (१४३)

    महर्षी धों. के. कर्वे / प्रश्‍नमंजुषा (१४३)

    • 18 May 2021
    • Posted By : study circle
    • 4407 Views
    • 10 Shares
    महर्षी धों. के. कर्वे 
     
        महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात महर्षी कर्वे यांच्यावर  अनेक प्रश्‍न विचारले जातात. महर्षी कर्वे यांचे विचार आणि कार्यत्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, त्यांच्यावर परीक्षेत विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
     
    *   राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :  
     
    १.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्य - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा.
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व  चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    महर्षी धों. के. कर्वे (१८५८-१९६२)
     
    १)  महर्षी कर्वे यांचा जन्म ..... रोजी झाला.
        १) १८ एप्रिल १८५८
        २) १८ एप्रिल १७५८
        ३) १८ एप्रिल १८५९
        ४) १८ एप्रिल १७५९
     
    २)  पुढील घटनांची त्यांच्या कालानुक्रमे यादी करा.
              a) समता संघ
              b) निष्काम कर्ममठ
              c) महिला विद्यालय
              d) महिला विद्यापीठ
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) (b) (c) (d)
        २) (d) (c) (b) (a)
        ३) (c) (b) (d) (a)
        ४) (b) (c) (a) (d)
     
    ३)  महर्षी धोंडो केशव कर्वे स्थापित संस्थांची, स्थापना वर्षाच्या कालानुक्रमे रचना करुन योग्य पर्याय निवडा.
        अ) विधवा विवाहोत्तेजक मंडळी
        ब) महिला विद्यापीठ
        क) अनाथ बालिकाश्रम    
        ड) निष्काम कर्ममठ
        १) अ,,ब आणि ड
        २) अ,,क आणि ब
        ३) अ,,क आणि ड
        ४) अ,,ड आणि ब
     
    ४)  जोड्या जुळवा.        
              a) राजारामशास्त्री भागवत                                 i)  मराठा स्कूलचे संस्थापक
              b) नरहर बाळकृष्ण जोशी              ii) उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईला येण्यास कर्वेंनी ह्यांना मदत केली.
              c) रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे     iii) कर्वेचे वर्ग मित्र आणि खूप जवळचे मित्र
              d) गोपाळ कृष्ण गोखले                                iv) कर्वेंना फर्ग्युसन कॉलेज मध्ये गणित शिकविण्यासाठी  बोलविले
        पर्यायी उत्तरे :
                       (a)      (b)       (c)        (d)
        १)   (i)      (ii)       (iii)      (iv)
        २)   (iv)    (iii)      (ii)        (i)
        ३)   (i)      (iii)      (ii)       (iv)
        ४)    (ii)     (iv)        (i)        (iii)
     
    ५)  खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने गो. ग. आगरकरांच्या उपस्थितीत विधवेशी विवाह केला होता?
        १) महादेव गोविंद रानडे
        २) धोंडो केशव कर्वे
        ३) विठ्ठल रामजी शिंदे
        ४) गोपाळ हरी देशमुख
     
    ६)  महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापित केलेल्या खालील संस्थांची कालानुक्रमे रचना करा ः
              a) निष्काम कर्म मठ
              b) महिला विद्यापीठ
              c) अनाथ बालिकाश्रम
              d) विधवा विवाहोत्तेजन मंडळी
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (c), (d), (b)
              २) (d), (c), (a), (b)
        ३) (c), (a), (d), (b)
        ४) (d), (a), (c), (b)
     
    ७)  इ.स. १९१० मध्ये महर्षी कर्वेनी ...... या संस्थेची स्थापना केली.
        १) निष्काम कर्ममठ
        २) बालिकाश्रम
        ३) विवाहोत्तेजन मंडळ
        ४) समता मंच
     
    ८)  लोकसेवेसाठी कर्वे यांनी ........ संस्थेची स्थापना केली.
        १) ग्राम मंडळ
        २) महिला विद्यापीठ
        ३) ग्रामरक्षा
        ४) निष्काम कर्ममठ
     
    ९)  योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा :
        धोंडे केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ ही संस्थास्थापन केली, कारण त्यांना .....
        १) स्त्रियांचा उद्धार करावयाचा होता. 
        २) समाजाची प्रामाणिकपणे सेवा करावयाची होती.
        ३) समाजसेवक निर्माण करावयाचे होते.
        ४) स्वार्थी दृष्टिकोन न ठेवता समाजाची सेवा करावयाची होती.
     
    १०) निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते ?
        १) स्त्रियांची सेवा करणे
        २) दलितांची सेवा करणे
        ३) वरील दोन्ही
        ४) वरील एकही नाही.
     
    ११) धोंडो केशव कर्वे यांच्याबाबत कोणती विधाने सत्य आहेत?
        a) त्यांच्या प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी एका २३ वर्षीय विधवेशी विवाह केला.
        b) सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या व पैशाची अपेक्षा नसणार्‍या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी निष्काम कर्ममठ स्थापन केला.
        c) ते १९१५ सालच्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते.
        पर्यायी उत्तरे :
        १) (b) आणि (c) सत्य आहेत, (a) सत्य नाही
        २) (a) आणि (c) सत्य आहेत, (b) सत्य नाही
        ३) (a) आणि (b) सत्य आहेत, (c) सत्य नाही
        ४) सर्व विधाने सत्य आहेत.                   
     
    १२) महर्षी कर्वे यांनी ......... येथील विधवेशी पुनर्विवाह केला होता.
        १) सेवा सदन
        २) शारदाश्रम
        ३) अनाथ बालिकाश्रम
        ४) मुक्ती सदन
     
    १३) धों. के. कर्वे यांचेबाबत काय खरे आहे?
        a) त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. 
        b) त्यांनी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाची स्थापना केली.
        c) त्यांनी विधवेशी विवाह केला.
        d) त्यांनी सतत संघाची स्थापना केली.
        e) त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखतात.
        f) त्यांना भारतरत्न किताब बहाल करण्यात आला.
        १) (a), (b), (c), (d)
        २) (b), (c), (d), (f)
        ३) (a), (b), (e), (f)
        ४) (c), (d), (e), (f)
     
    १४) इ.स. १९१९ मध्ये सरकारने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणता पुरस्कार दिला होता?
        १) महात्मा
        २) कैसर-ए-हिंद
        ३) भारत पुत्र
        ४) महर्षी
     
    १५) खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी दिले होते ?
        a) भारत रत्न
        b) पद्म विभूषण
        c) डी. लिट
        d) एलएल. डी.
        पर्यायी उत्तरे :                 
        १) (a) फक्त
        २) (a) आणि (b) फक्त            
        ३) (a),(b) आणि (c) फक्त
        ४) (a),(b),(c),(d) 
     
    १६) महर्षि कर्वे यांना मुंबई विद्यापीठाची कोणती सन्मानदर्शक पदवी बहाल केली होती?
        १) एल. एल. बी.
        २) एल. एल. डी.
        ३) डी. लिट.
        ४) पीएच. डी.
     
    १७) १९५८ साली ’भारतरत्न’ हा गौरव मिळविणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण?
        १) विठ्ठल रामजी शिंदे
        २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
        ३) धोंडो केशव कर्वे
        ४) गोपाळ बाबा वळंगर
     
    १८) महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरविले?
        १) पद्मश्री
        २) पद्मविभूषण
        ३) समाज रत्न
        ४) भारत रत्न
     
    १९) १९५८ साली ‘भारतरत्न’ हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण ?
        १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
        २) डॉ. पंजाबराव देशमुख
        ३) धोंडो केशव कर्वे
        ४) मुकुंदराव पाटील
     
    २०) भारत सरकारने १९५८ मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांना ...... देऊन सन्मानित केले.
        १) पद्मभूषण
        २) पद्मविभूषण
        ३) पद्मश्री
        ४) भारतरत्न
     
    २१) खालीलपैकी ‘भारत रत्न’ मिळालेले मानकरी कोण ?
        १) महर्षी धोंडो केशव कर्वे
        २) नामदार गोखले
        ३) वि. रा. शिंदे
        ४) राजर्षी शाहू महाराज
     
    २२) जातिभेद व अस्पृश्यता निवारणासाठी ...... यांनी इ.स. १९४४ मध्ये ‘समता मंच’ स्थापन केला.
        १) गोपाळ कृष्ण गोखले
        २) अ‍ॅनी बेझंट
        ३) महर्षी धोंडो केशव कर्वे
        ४) न्यायमूर्ती रानडे
     
    २३) महर्षी कर्व्यांनी २१ एप्रिल, १९४४ मध्ये स्थापन केलेला ‘समता संघ’ कुठल्या संस्थेत पुढे अंतर्भूत झाला ?
        १) जाती-निर्मूलन संस्था
        २) स्त्री-पुरुष समानता संघ
        ३) स्त्री-पुरुष शिक्षण संघ
        ४) सर्व धर्मीय संघ
     
    २४) ’समता संघा’ची स्थापना कोणी केली?
        १) महर्षी धोंडो केशव कर्वे
        २) डॉ. आंबेडकर
        ३) महात्मा फुले
        ४) न्या. रानडे
     
    २५) महर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली ?
        १) विधवाश्रम
        २) शारदा सदन
        ३) निष्काम कर्म मठ
        ४) महिलाश्रम
     
    २६) विधवा विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी विधवा-विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली ?
        १) सयाजीराव गायकवाड
        २) महर्षी कर्वे
        ३) पंडिता रमाबाई
        ४) विठ्ठल रामजी शिंदे
     
    २७) विधवा विवाहाला चालना मिळावी यासाठी कोणी ’विधवा विवाह विवाहात्तोजक मंडळ’ या संस्थेची स्थापना केली?
        १) कर्वे
        २) आगरकर
        ३) शाहू महाराज
        ४) फुले
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१४३)
    १-१
    २-३
    ३-४
    ४-३
    ५-२
    ६-२
    ७-१
    ८-४
    ९-४
    १०-१
    ११-४
    १२-२
    १३-२
    १४-२
    १५-४
    १६-२
    १७-३
    १८-४
    १९-३
    २०-४
    २१-१
    २२-३
    २३-१
    २४-१
    २५-४
    २६-२
    २७-१

     

Share this story

Total Shares : 10 Total Views : 4407