गोपाळ गणेश आगरकर / पश्‍नमंजुषा (१४०)

  • गोपाळ गणेश आगरकर / पश्‍नमंजुषा (१४०)

    गोपाळ गणेश आगरकर / पश्‍नमंजुषा (१४०)

    • 18 May 2021
    • Posted By : study circle
    • 1756 Views
    • 4 Shares
    गोपाळ गणेश आगरकर

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर अनेक प्रश्‍न विचारले जातात.  गोपाळ गणेश आगरकर यांचे विचार आणि कार्यत्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, त्यांच्यावर परीक्षेत विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
     
    *   राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :  
     
    १.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्य - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा.
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व  चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)

    गोपाळ गणेश आगरकर (१८५६-९५)
     
    १)  जागृत महाराष्ट्राची विचारधारा दर्शविणारी एक जोडी निवडा.
        १)  न्या.तेलंग - भाऊ दाजी लाड -लोकहितवादी      
        २) बाळशास्त्री जांभेकर-गणेश जोशी-सावरकर व्ही.डी.
        ३) बाळ गंगाधर टिळक -आगरकर -रानडे एम.जी.
        ४) गोखले-म. जोतिबा फुले-भाऊ दाजी लाड
     
    २)  गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कर्‍हाडजवळ ....... या गावी झाला.
        १) टेंभू
        २) शेरवली
        ३) दापोली
        ४) खेड
     
    ३)  इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणारहे ब्रीद वाक्य कुणाचे होते?
        १) गोपाळ गणेश आगरकर
        २) डॉ. आंबेडकर
        ३) लोकमान्य टिळक
        ४) महात्मा गांधी
     
    ४)  इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणारहे खालीलपैकी कोणाचे ब्रीद वाक्य आहे?
        १) लोकमान्य टिळक
        २) गोपाळ कृष्ण गोखले
        ३) गोपाळ गणेश आगरकर
        ४) न्यायमूर्ती रानडे
     
    ५)  ‘ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा, पण अंधानुकरण नको’ असे कोण म्हणाले?
        १) न्या. रानडे
        २) विष्णुशास्त्री चिपळूणकर
        ३) गो. ग. आगरकर
        ४) महात्मा जोतिबा फुले
     
    ६)  ‘मराठ मोळा‘ आणि ‘मराठमोळ्यांची पुरवणी‘ हे लेख कोणी लिहिले ?
              १) विष्णुशास्त्री चिपळूणकर
        २) विष्णुशास्त्री पंडित
        ३) गोपाळ गणेश आगरकर
        ४) गोपाळ हरी देशमुख
     
    ७)  ....... म्हणाले की, “सामाजिक सुधारणे शिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे.
        १) आर. जी. भांडारकर
        २) जी. के. गोखले
        ३) डी. के. कर्वे
        ४) जी. जी. आगरकर
     
    ८)  ......... चा आधार घेऊन आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला.
        १) प्रारब्ध
        २) रूढी
        ३) बुद्धिप्रामाण्यवाद
        ४) धर्म
     
    ९)  आगरकरांनी कोणत्या तत्त्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता?
        १) बुद्धिप्रामाण्यवाद
        २) व्यक्तिस्वातंत्र्य
        ३) समाज सुधारणेचा आग्रह
        ४) वरील सर्व
     
    १०) बुद्धिवादाचे जनक कोणास म्हणतात ?
        १) डॉ. भांडारकर
        २) गो. ग. आगरकर
        ३) न्या. रानडे
        ४) गो. कृ. गोखले
     
    ११) गो. ग. आगरकरांच्या बाबतीत कोणते विधान खरे आहे?
        a) त्यांच्यावर चिपळूणकरांचा प्रभाव होता.
        b) टिळकांशी सामाजिक सुधारणांवर झालेल्या मतभेदामुळे त्यांनी केसरीचा राजीनामा दिला.
        c) त्यांनी शेक्सपिअरच्या हॅम्लेटचे मराठीत भाषांतर केले.
        d) ते देव न मानणार्‍यांपैकी होते.
        १) (a), (b) (c)
        २) (b), (c) (d)
        ३) वरील सर्व
        ४) वरीलपैकी एकही नाही
     
    १२) जे. एस. मिल व एच. स्पेन्सर यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाज सुधारक कोण ?
        १) महात्मा फुले
        २) महर्षी कर्वे
        ३) गोपाळ गणेश आगरकर
        ४) न्यायमूर्ती रानडे
     
    १३) गो. ग. आगरकरांविषयी काय खरे नाही?
        १) धर्माच्या चौकटीत राहूनच विवेकाचे पालन केले पाहिजे.
        २) नीतिमान होण्यासाठी ईश्‍वरनिष्ठ असलेच पाहिजे असे नाही.
        ३) प्रखर बुद्धिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
        ४) ’ कवी, काव्य व काव्यरति’ हा त्यांचा निबंध आहे.
     
    १४) गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?
        १) मानवतावाद
        २) समाजवाद
        ३) बुद्धिप्रामाण्यवाद
        ४) सर्वंकषवाद
     
    १५) गोपाळ गणेश आगरकरांचा कशावर विश्‍वास नव्हता व म्हणून त्यांनी त्या विरोधात कार्य केले?
        a) पुनर्जन्म
        b) जाती व्यवस्था
        c) बालविवाह
        d) अस्पृश्यता
        १) (b), (c)
        २) (b), (d)
        ३) (b), (c),  (d)
              ४) वरील सर्व
     
    १६) स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी गोपाळ गणेश आगरकर यांचे काय मत होते ?
        १) मुलींनी केवळ लिहिणे व मोजणे शिकावे.            
        २) मुलींनी फक्त प्रादेशिक भाषा व गृहशास्त्र शिकावे.
        ३) मुलींनी मॅट्रिकच्या परीक्षेस आवश्यक असलेले सर्व विषय शिकावेत.   
        ४) वरीलपैकी एकही नाही.
     
    १७) स्त्री-पुरुष समतेचा व स्त्रीच्या व्यक्ती व व्यवसाय स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना पुढील विचार कोणी व्यक्त केले ?
        “हरएक शास्त्रात, कलेत, धंद्यात स्त्री-पुरुषांची चढाओढ लागून ज्याच्या-त्याच्या व जिच्या-तिच्या योग्यतेनुसार व्यवस्था लागली पाहिजे.
        १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
        २) पंडिता रमाबाई
        ३) गोपाळ गणेश आगरकर
        ४) लोकमान्य टिळक
    उत्तरे : पश्‍नमंजुषा (१४०)
    १-३
    २-१
    ३-१
    ४-३
    ५-३
    ६-३
    ७-४
    ८-३
    ९-४
    १०-२
    ११-३
    १२-३
    १३-१
    १४-३
    १५-४
    १६-३
    १७-३

Share this story

Total Shares : 4 Total Views : 1756