महाराष्ट्रातील समाजसुधारक (२) / प्रश्‍नमंजुषा (१३७)

  • महाराष्ट्रातील समाजसुधारक (२) / प्रश्‍नमंजुषा (१३७)

    महाराष्ट्रातील समाजसुधारक (२) / प्रश्‍नमंजुषा (१३७)

    • 17 May 2021
    • Posted By : study circle
    • 2634 Views
    • 7 Shares
     महाराष्ट्रातील समाजसुधारक (२)
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात महाराष्ट्रातील समाजसुधारकया विषयावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी  महाराष्ट्रातील काही समाजसुधारकाशी संबंधित महत्त्वाच्या संस्था,  त्यांचे विचार आणि कार्य, परीक्षेत विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
     
       राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :  
     
    १.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्य - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा.
     
        (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व  चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    १) जगन्नाथ शंकरशेठ (१८०३-६५)
     
    १)  मुंबईचे ’अनभिषिक्त सम्राट’ असे आचार्य अत्रे यांनी कोणास संबोधले आहे?
        १) जगन्नाथ शंकरशेठ
        २) फिरोजशहा मेहता
        ३) दादाभाई नौरोजी
        ४) भाऊ दाजी लाड
     
    २)  खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.
        a) या व्यक्तीस मुंबईचे शिल्पकार (वास्तुविशारद) म्हणतात.   
              b) आचार्य अत्रे यांनी त्यांना शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट (uncrowned Emperor of Mumbai) म्हटले
              c) ते मराठी, इंग्रजी व संस्कृत मध्ये उत्कृष्ट होते.
              d) त्यांचे एलफिन्स्टन कॉलेज वर बरेच उपकार/ऋण आहेत.
        पर्यायी उत्तरे :
        १) दादाभाई नौरोजी
        २) डी. पी. तर्खडकर
        ३) जगन्नाथ शंकर सेठ
        ४) बाळासाहेब ठाकरे
     
    ३)  खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.
        अ) यांना गंगाधर गाडगिळांसारखे अर्थशास्त्राचे विद्वान ’आधुनिक भारताचे शिल्पकार’ मानतात.
        ब) दादाभाई नौरोजी व न्या. रानडे यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया त्यांच्या विचारात आढळतो.
        क) भारतीय जीवनात त्यांनी शेतीचे महत्त्व जाणले होते.
        पर्यायी उत्तरे :
        १) नाना शंकर शेठ
        २) डॉ. भाऊ दाजी लाड
        ३) भास्कर तरखडकर
        ४) दादोबा पांडुरंग
     
    ४)  सतीप्रथा बंद करण्यासाठी १८ जून १८२३ ला एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठविला होता. त्या अर्जावर भारतीय लोकांच्या वतीने पुढीलपैकी कोणी स्वाक्षर्‍या केल्या होत्या ?       
        १) राजा राममोहन रॉय व जगन्नाथ शंकरशेठ
        २) राजा राममोहन रॉय व ईश्‍वरचंद्र विद्यासागर    
        ३) राजा राममोहन रॉय व महादेव गोविंद रानडे
        ४) राजा राममोहन रॉय व विल्यम बेंटिक
     
    ५)  सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना ...... यांनी पाठिंबा  दिला.
        १) नाना शंकरशेठ
        २) भाऊ दाजी लाड
        ३) बाळशास्त्री जांभेकर
        ४) भाऊ महाजन
     
    २) आचार्य बाळशास्त्री जांभेकर  (१८१०-४६)
     
    १)  इंग्रजी शासनाने १८४० मध्ये ‘जस्टीस ऑफ द पीस’ म्हणून कोणाची नेमणूक केली होती?
        १) राजाराम मोहन रॉय
        २) बाळशास्त्री जांभेकर           
        ३) दादोबा पांडुरंग तर्खडकर
        ४) भाऊ महाजन
     
    २)  ‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्याचे नाव ओळखा.
        १) जगन्नाथ शंकर सेठ
        २) बाळशास्त्री जांभेकर
        ३) भाऊ दाजी लाड
        ४) छत्रपती शाहू महाराज
     
    ३)  ख्रिश्‍चन मिशनर्‍यांच्या धर्मप्रसाराला उत्तर देण्यासाठी आपली पारंपारिक धार्मिक पुस्तके छापली पाहिजेत असा विचार करुन ...... यांनी ज्ञानेश्‍वरीच्या संशोधित आवृत्तीचे प्रकाशन केले. ती पहिली छापील ज्ञानेश्‍वरी होय.
              १) त्र्यं. शं. शेजवलकर
        २) वीर सावरकर    
        ३) बाळशास्त्री जांभेकर           
        ४) दादोबा पांडुरंग तरखडकर
     
    ३) दादोबा पांडुरंग तर्खडकर  (१८१४-८२)
     
    १)  .......... यांनी मानव धर्म सभा स्थापन केली.
        १) दादोबा पांडुरंग
        २) गोपाळ आगरकर
        ३) भाऊ महाजन
        ४) विठ्ठल शिंदे
     
    २)  दादोबा पांडुरंग यांचा कोणत्या सामाजिक संस्थेशी संबंध होता?
        अ) मानवधर्म सभा
        ब) परमहंस सभा
        क) मराठी ज्ञान प्रसारक सभा
        ड) आत्मीय सभा
        योग्य पर्याय निवडा :
        १) अ, ,
        २) अ, ,
        ३) ब, ,
        ४) अ, ,
     
    ३)  ‘मानवधर्म’ या संस्थेची स्थापना कोणी केली ?
        १) महात्मा फुले 
        २) गणेश वासुदेव जोशी          
        ३) बाबा पद्मनजी
        ४) दादोबा पांडुरंग तर्खडकर
     
    ४)  ‘मानव धर्म सभे‘चे संस्थापक कोण होते ?
        १) बाळकृष्ण जांभेकर
        २) भाऊ दाजी लाड
        ३) गोपाळ हरी देशमुख           
        ४) दादोबा पांडुरंग तर्खडकर
     
    ४) लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख (१८२३-९२)
     
    १)  लोकानिंदा सहन करुन आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषधपाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली ?           
        १) डॉ. आनंदीबाई जोशी          
        २) अनुताई वाघ                 
        ३) भाऊ दाजी लाड
        ४) लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख
     
    २)  लोकहितवादींच्या बाबत खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
              (a) पुणे येथे जन्म                                                 
              (b) प्रभाकर या वृत्तपत्रातून लेखन
        (c) लक्ष्मीज्ञान, पानिपतची लढाई इ. ग्रंथाचे लेखन
        (d) सर्वांगीण सुधारणांचे आद्य प्रवर्तक
        पर्यायी उत्तरे -
        १) (a) (b) फक्त
        २) (a), (b), (c) फक्त
        ३) (b), (c), (d) फक्त
        ४) वरील सर्व बरोबर
     
    ३)  ‘ईश्‍वराने स्त्री व पुरुष सारखेच निर्माण केले आहेत, म्हणून त्यांचे अधिकारही समान आहेत’ - ह्या शब्दात स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कार पुढीलपैकी कोणी केला?
        १) गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी)
        २) विष्णुशास्त्री चिपळूणकर
        ३) महात्मा फुले
        ४) दादोबा पांडुरंग तरखडकर
     
    ४)  ...... हे लोकहितवादी म्हणून ओळखले जातात.
        १) गोविंद विठ्ठल कुंटे
        २) गोपाळ हरी देशमुख
        ३) विष्णुशास्त्री पंडित
        ४) गोपाळ गणेश आगरकर
     
    ५)  महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक  ‘लोकहितवादी’ या नावाने ओळखली जात होते ?
        १) ज्योतीबा फुले
        २) महादेव गोविंद रानडे
        ३) गोपाळ हरी देशमुख
        ४) गोपाळ गणेश आगरकर
     
    ६)  कोणाला ‘लोकहितवादी’ म्हणून ओळखले जाते ?
        १) गो. ग. आगरकर
        २) गो. ह. देशमुख
        ३) र. ज. भांडारकर
        ४) म. गो. रानडे
     
    ७)  गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव कोणते?
        १) सार्वजनिक काका
        २) लोकहितवादी
        ३) भाऊ महाजन
        ४) भाऊ दाजी लाड
     
    ८)  गोपाळ हरि देशमुख हे कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध होते ?
        १) सुधारक
        २) न्यायमूर्ती
        ३) लोकहितवादी
        ४) मवाळ नेते
     
    ९)  गोपाळ हरी देशमुखाबंद्दल पुढे दिलेल्या दोन वाक्यात कोणते वाक्य चुकीचे आहे?
        a)  त्यांनी इंदुप्रकाश, लोकहितवादी आणि ज्ञानोदय ही वर्तमानपत्रे सुरू केली.
        b) त्यांचे असे मत होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही म्हणून ब्रिटिशांकडून भारतीयांनी आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a)  आणि (b)  दोन्ही चुकीची आहेत.
        २) (b) फक्त     
        ३) (a) फक्त
        ४) (a) आणि (b) बरोबर आहेत.
     
    १०) गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायांपैकी कोणती?  
        १) ‘दिग्दर्शन’ या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन
        २) वाचनालयाची चळवळ
        ३) विधवा विवाहाचा पुरस्कार
        ४) ‘लोकहितवादी’ या टोपणनावाने लेखन
     
    ५) डॉ. भाऊ दाजी लाड (१८२४-९४)
     
    १)  ‘ज्ञान प्रसारक सभा‘ ही संघटना कोणी विकसित केली?
        १) दादोबा पांडुरंग तर्खडकर
        २) डॉ. भाऊ दाजी लाड
        ३) बाळशास्त्री जांभेकर           
        ४) जगन्नाथ शंकरशेठ
     
    ६) विष्णुबुवा ब्रह्मचारी (१८२५-७२)
     
    १)  .......... हे विष्णुबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जात.  
        १) विष्णुशास्त्री पंडीत
        २) विष्णुशास्त्री चिपळूणकर
        ३) विष्णू शिरवाडकर
        ४) विष्णू भिकाजी गोखले
     
    २)  ख्रिस्ती मिशनर्‍यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज कोणी उठवला ?
        १) बाळशास्त्री जांभेकर
        २) विष्णुशास्त्री चिपळूणकर
        ३) महात्मा फुले
        ४) विष्णूबुवा ब्रह्मचारी
     
    ३)  विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद .......... पुस्तकात आढळतो.
        १)  वेदोक्त धर्मप्रकाश
        २) समुद्रकिनारीचा वाद विवाद  
        ३) अरुणोदय
        ४) धर्म विवेचन
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१३७)
     
    १) जगन्नाथ शंकरशेठ (१८०३-६५)
     
    १-१
    २-३
    ३-१
    ४-१
    ५-१
     
    २) आचार्य बाळशास्त्री जांभेकर  (१८१०-४६)
     
    १-२
    २-२
    ३-३
     
    ३) दादोबा पांडुरंग तर्खडकर  (१८१४-८२)
     
    १-१
    २-२
    ३-४
    ४-४
     
    ४) लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख (१८२३-९२)
     
    १-४
    २-४
    ३-१
    ४-२
    ५-३
    ६-२
    ७-२
    ८-३
    ९-३
    १०-१
     
    ५) डॉ. भाऊ दाजी लाड (१८२४-९४)
     
    १-२
     
    ६) विष्णुबुवा ब्रह्मचारी (१८२५-७२)
     
    १-४
     
    २-४
     
    ३-२

Share this story

Total Shares : 7 Total Views : 2634