महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक / प्रश्नमंजुषा (१३६)
- 17 May 2021
- Posted By : vaishali
- 7198 Views
- 9 Shares
महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”महाराष्ट्रातील समाजसुधारक” या विषयावर अनेक प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील काही समाजसुधारकाशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, त्यांचे विचार आणि कार्य, परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
♦ राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
१.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्य - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. बाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा.
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
१) ........... मुळे महाराष्ट्रातील समाज प्रबोधन चळवळ उदयास आली.
a) पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव
b) पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रभाव
c) ख्रिस्ती मिशनर्यांचे कार्य
d) वैज्ञानिक व भौतिक सुधारणा
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (a) व (b) फक्त
३) (a), (b), व (c)
४) (a), (b), (c) आणि (d)
२) जोड्या जुळवा :
a) म. गो. रानडे i) पुणे
b) गो. ग. आगरकर ii) जामखंंडी
c) वि. रा. शिंदे iii) टेंभू
d) गो. ह. देशमुख iv) निफाड
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (ii) (i)
२) (iv) (i) (ii) (iii)
३) (iv) (ii) (i) (iii)
४) (i) (ii) (iii) (iv)
३) खालील घटनांचा कालानुक्रमे क्रम लावा :
अ) पुणे सार्वजनिक सभा
ब) डेक्कन सभा
क) सत्यशोधक समाज
ड) आर्य समाज
योग्य पर्याय निवडा :
१) ब, क, अ, ड
२) क, ब, ड, अ
३) अ, क, ड, ब
४) अ, ड, ब, क
४) खालील I व II यांच्या जोड्या लावा आणि बरोबर उत्तर (पर्याय) ओळखा?
I II
A) आर्य समाज I) आधुनिक मुंबई चे जनक
B) एलफिन्स्टन II) दर्पण या वृत्तपत्राचे संपादक
C) जगन्नाथ शंकर शेठ III) वैदिक तत्त्वज्ञानाचा प्रभाव
D) बाळशास्त्री जांभेकर IV) डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्याला प्रेरणा
A B C D
१) IV III II I
२) II IV I II
३) III IV I II
४) III I IV II
५) जन्मतारखेप्रमाणे योग्य क्रम लावा :
i) गो. ग. आगरकर
ii) धो. के. कर्वे
iii) शाहू महाराज
iv) बाबासाहेब आंबेडकर
१) (i), (ii), (iii), (iv)
२) (i), (iii), (ii), (iv)
३) (iii), (i), (ii), (iv)
४) (ii), (i), (iii), (iv)
६) खालील घटनांच्या जोड्या लावा :
अ) महर्षी डी. के. कर्वे I) खाजगी संपत्तीला विरोध
ब) विष्णुशास्त्री पंडित II) विधवेशी पुनर्विवाह
क) आर. डी. कर्वे III) पुनर्विवाहोत्तेजक मंडळ
ड) विष्णुबुवा ब्रह्मचारी IV) समाज स्वास्थ्य
अ ब क ड
१) III IV I II
२) IV III II I
३) III I IV II
४) II III IV I
७) जोड्या लावा.
a) म. फुले (i) अनाथ बालिका आश्रम
b) धों. के. कर्वे (ii) अभिनव वसतिगृह
c) शाहू महाराज (iii) सत्यशोधक समाज
d) गो. ग. आगरकर (iv) डेक्कन एज्युकेशन सोसायटी
१) (a) - (iii), (b) - (i), (c) - (ii), (d) - (iv)
२) (a) - (i), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (iv)
३) (a) - (ii), (b) - (iii), (c) - (iv), (d) - (i)
४) (a) - (iv), (b) - (i), (c) - (iii), (d) - (ii)
८) खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
१) रयत शिक्षण संस्था - कर्मवीर भाऊराव पाटील
२) जागरूक - वालचंद कोठारी
३) दिन मित्र - मुकुंदराव पाटील
४) मराठा लीग - सयाजीराव गायकवाड
९) अ (संघटना) ब (संस्थापक)
अ) ब्राह्मो समाज I) रमाबाई रानडे
ब) आर्य समाज II) स्वामी दयानंद सरस्वती
क) रामकृष्ण मिशन III) राजा राममोहन रॉय
ड) सेवा सदन IV) स्वामी विवेकानंद
अ ब क ड
१) I II III IV
२) II III I IV
३) III II IV I
४) IV III II I
१०) जोड्या लावा.
a) कर्मवीर भाऊराव पाटील i) आनंदवन
b) डॉ. पंजाबराव देशमुख ii) अभिनव भारत
c) बाबा आमटे iii) शिवाजी शिक्षण संस्था
d) वि. दा. सावरकर iv) रयत शिक्षण संस्था
(a) (b) (c) (d)
1) iii iv i ii
2) i ii iii iv
3) iv iii i ii
4) iv i ii iii
११) सयाजीराव गायकवाड ......... चे शासक होते.
१) सातारा
२) सांगली
३) कोल्हापूर
४) बडोदा
१२) पुढील कोणत्या सामाजिक धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत?
१) परमहंस मंडळी व रहनुमाई मझ्द्यासान सभा
२) प्रार्थना समाज व आर्य समाज
३) इंडियन सोशल कॉन्फरन्स व सोशल सर्व्हिस लीग
४) वरील तिन्हीतील कोणताही पर्याय योग्य नाही.
१३) जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
अ) एम. जी. रानडे I) जमखिंडी
ब) जी. जी. आगरकर II) टेंभू
क) वी. आर. शिंदे III) पुणे
ड) जी. एच. देशमुख IV) निफाड
अ ब क ड
१) II I III IV
२) III I IV II
३) IV II I III
४) II IV III I
१४) जोड्या लावा :
a) दादोबा पांडुरंग तर्खडकर i) यमुना पर्यटन कादंबरीचे लेखन
b) बाबा पद्मजी ii) मुक्ती सदन संस्थेची सुरुवात
c) पंडिता रमाबाई iii) सोशल सर्व्हिस लीग ची स्थापना
d) ना. म. जोशी iv) परमहंस सभेची स्थापना
पर्यायी उत्तरे :
a b c d
१) iii ii iv i
२) ii iii iv i
३) iv i ii iii
४) iii iv i ii
१५) खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळवलेली आहे?
१) निराश्रित साह्यकारी संस्था (डिप्रेस्ड क्लासेस मिशन)- वि. रा. शिंदे
२) प्रार्थना समाज- स्वामी दयानंद सरस्वती
३) मानवधर्म सभा- भाऊ महाजन
४) श्रद्धानंद छात्रालय- लाला हंसराज
१६) जोड्या लावा :
समाज तत्त्वज्ञान
(i) ब्राह्मो समाज (A) विश्वबंधुत्वाची भावना
(ii) आर्य समाज (B) परमेश्वर कोणताही ग्रंथ लिहीत नाही
(iii) प्रार्थना समाज (C) एकेश्वरवाद
(iv) थिऑसॉफिकल सोसायटी (D) परमेश्वर अवतार घेत नाही
पर्यायी उत्तरे :
१) (i) - (A), (ii) - (B), (iii) - (C), (iv) - (D)
२) (i) - (C), (ii) - (D), (iii) - (B), (iv) - (A)
३) (i) - (D), (ii) - (C), (iii) - (B), (iv) - (A)
४) (i) - (B), (ii) - (A), (iii) - (D), (iv) - (C)
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१३६)
१-४
२-१
३-३
४-३
५-१
६-४
७-१
८-४
९-३
१०-३
११-४
१२-४
१३-३
१४-३
१५-१
१६-२