सामाजिक सुधारणाविषयक समाज / प्रश्नमंजुषा (१३४)
- 17 May 2021
- Posted By : study circle
- 3243 Views
- 4 Shares
सामाजिक सुधारणाविषयक समाज
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात सामाजिक व धार्मिक सुधारणा करण्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या विविध ”संस्था आणि समाज” यावर अनेक प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी या संबंधित महत्त्वाच्या व्यक्ती, त्यांचे विचार आणि कार्य, प्रश्न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
• राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
१.३.१ सामाजिक - धार्मिक सुधारणांच्या चळवळी - ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन व थिऑसॉफिकल सोसायटी.
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
सामाजिक सुधारणाविषयक समाज
(१) प्रार्थना समाज (१८६७)
१) मुंबई येथे इ. स. १८६७ मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?
१) डॉ. आत्माराम पांडुरंग
२) गोपाळ हरी देशमुख
३) दादाभाई नौरोजी
४) डॉ. सिताराम देसाई
२) प्रार्थना समाज ही महाराष्ट्रातील पहिली संघटित समाज सुधारणा चळवळ या चळवळीचे अगदी सुरुवातीचे सभासद म्हणजे, तीन तर्खडकर बंधू. त्यातील दोन दादोबा व आत्माराम तर तिसरे बंधू कोण होते?
१) बाळकृष्ण
२) श्यामलाल कृष्ण
३) भास्कर
४) वासुदेव
३) परमहंस सभा लयाला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी १८६७ मध्ये ............ यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली.
१) दादोबा पांडुरंग तर्खडकर
२) आत्माराम पांडुरंग तर्खडकर
३) नारायण वामन टिळक
४) भाऊ महाजन
४) परमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते?
१) केशव शिवराम भावलकर
२) कासमभाई महमदजी ढालवाणी
३) गोविंद नारायण मांडगावकर
४) डॉ. रामकृष्णपंत भांडारकर
५) प्रार्थना समाजाची स्थापना कोठे झाली?
१) कलकत्ता
२) मद्रास
३) मुंबई
४) पुणे
६) खालीलपैकी कोणत्या समाजाने वारकरी संप्रदायाची शिकवण आधारभूत मानली?
१) प्रार्थना समाज
२) आर्य समाज
३) ब्राह्मो समाज
४) सत्यशोधक समाज
७) प्रार्थना समाजाबाबत कोणत्या बाबी बरोबर आहेत?
a) प्रार्थना समाजाची स्थापना तर्खडकर बंधूंनी केली.
b) समाजाने सुबोध पत्रिका मुखपत्र चालवले
c) वारसा भागवत धर्मातून घेतल्याचे मानतो.
d) हिंदुत्वाचा प्रगतीच्या प्रवृत्तीशी मेळ घातला.
१) (a), (b), (c)
२) (a), (b), (d)
३) (b), (c), (d)
४) (a), (b), (c), (d)
८) पुढीलपैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते?
१) सुबोध संगीत
२) सुबोध पत्रिका
३) प्रार्थना संगीत
४) प्रार्थना समाजाचा इतिहास
९) १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली.
त्याच्याशी निगडीत पुढीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
a) डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी प्रार्थना समाजाच्या स्थापनेत पुढाकार घेतला.
b) न्या. रानडे, डॉ. भांडारकर व श्री. वामन आबाजी मोडक हे प्रार्थना समाजाचे अग्रगण्य नेते होते.
c) प्रार्थना समाजाची कल्पना बंगालमधील ब्राम्होसमाजाच्या कल्पनेवरून सुचली होती.
d) मूर्तिपूजा व अवतारकल्पनेला या समाजाचा विरोध होता.
पर्यायी उत्तरे :
१) (a),(b) आणि (c)
२) (b),(c) आणि (d)
३) (c),(d) आणि (a)
४) वरील सर्व
१०) कोणत्या समाजाने पंढरपूर येथे अनाथालयाची स्थापना केली ?
१) सत्य शोधक समाज
२) ब्राम्हो समाज
३) आर्य समाज
४) प्रार्थना समाज
११) आर्य महिला समाज ...... ची शाखा होती.
१) सत्यशोधक समाज
२) ब्राह्मो समाज
३) प्रार्थना समाज
४) आर्य समाज
१२) परमहंस सभा महाराष्ट्रात स्थापन झाली होती. तिच्याबाबत काय खरे नाही ?
१) सर्व माणसात कोणताही भेदभाव असता कामा नये असे ती मानावयाची.
२) ही एक गुप्त संस्था होती.
३) ख्रिश्चन समाजाचा तिच्यावर प्रभाव नव्हता.
४) सभासदांची नावे फुटल्याबरोबर ती बरखास्त झाली.
१३) खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात १८४९ मध्ये स्थापन झालेल्या परमहंस मंडळी चा भर होता ?
अ) जातीबंधने तोडणे
ब) विधवा पुनर्विवाह
क) स्त्री शिक्षण
ड) मूर्तिपूजा बंदी
१) अ फक्त
२) अ आणि ब फक्त
३) अ, ब आणिक क फक्त
४) वरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत.
(२) आर्य समाज (१८७५)
१) १८७५ साली आर्य समाजाची स्थापना ...... यांनी केली.
१) स्वामी विवेकानंद
२) स्वामी दयानंद सरस्वती
३) रामकृष्ण परमहंस
४) राजा राममोहन रॉय
२) ...... यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना आर्यसमाज स्थापनेसाठी मदत केली.
१) विवेकानंद
२) आगरकर
३) गोखले
४) लोकहितवादी
३) ......... या संस्थेचे सुरुवातीला एकेश्वर भक्त मंडळी असे नाव होते.
१) आर्य समाज
२) प्रार्थना समाज
३) मानवधर्म समाज
४) परमहंस सभा
४) पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही संस्था कोणी स्थापन केली होती ?
१) राजाराम मोहन रॉय
२) स्वामी दयानंद सरस्वती
३) रामकृष्ण परमहंस
४) ईश्वर चंद्र विद्यासागर
५) स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म (Aggressive Hinduism) असे कोणी केले?
१) सरोजिनी नायडू
२) भगिनी निवेदिता
३) अॅनी बेझंट
४) वरील सर्व
६) पुढीलपैकी कोणत्या धर्मसुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता ?
१) आर्य समाज
२) सत्यशोधक समाज
३) ब्रह्मो समाज
४) प्रार्थना समाज
७) वेदाकडे वळा कोणी म्हटले आहे?
१) रामकृष्ण परमहंस
२) राजा राम मोहन रॉय
३) स्वामी दयानंद सरस्वती
४) स्वामी विवेकानंद
८) पुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाली की पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय?
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) महात्मा ज्योतीबा फुले
३) स्वामी विवेकानंद
४) स्वामी दयानंद सरस्वती
९) खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
a) स्वामी दयानंद हे ख्रिश्चन धर्म व इस्लामचे कडवे टीकाकार होते.
b) दयानंदांनी मुंबईमध्ये दिलेल्या जवळपास ५० व्याख्यानांचे मराठी भाषांतर म. गो. रानडेंनी संपादित केले.
c) मुंबई आर्य समाजाचे लोकहितवादी काही काळ अध्यक्ष होते.
d) स्वामी दयानंद म्हणावयाचे की विवाहाकरता नैसर्गिक वय मुलींकरिता १४ व मुलांकरता २१ आहे.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (c)
२) (a), (b) आणि (c)
३) (a) आणि (d)
४) (a),(b),(c),(d)
१०) आर्य समाजाविषयी कोणती विधाने योग्य आहेत ?
a) स्वामी श्रद्धानंदानी दलितीद्वार सभा स्थापन केली.
b) त्यांच्या शिक्षणसंस्थामध्ये पौर्वात्य व पाश्चिमात्य शिक्षणक्रमाचा समन्वय साधला गेला नाही.
c) स्वानी श्रद्धानंद व पंडित गुरुदत्त हे पंजाबमधील नेते आर्य समाजाचे अनुयायी होते.
d) अनाथ व विधवा स्त्रियांसाठी आश्रम उभारले.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b)
२) (c) आणि (d)
३) (b) फक्त
४) (a), (c) आणि (d)
११) भारत हा भारतीयांचाच ही घोषणा कोणी दिली ?
१) स्वामी विवेकानंद
२) स्वामी दयानंद सरस्वती
३) रामकृष्ण परमहंस
४) वि. दा. सावरकर
१२) आर्यबांधव समाज .......... येथे होता.
१) कोल्हापूर
२) नागपूर
३) औंध
४) पुणे
१३) आर्य महिला समाज ...... ची शाखा होती.
१) सत्यशोधक समाज
२) ब्राह्मो समाज
३) प्रार्थना समाज
४) आर्य समाज
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१३४)
(१) प्रार्थना समाज (१८६७)
१-१
२-३
३-२
४-२
५-३
६-१
७-४
८-१
९-४
१०-४
११-३
१२-३
१३-४
(२) आर्य समाज (१८७५)
१-२
२-४
३-१
४-२
५-२
६-१
७-३
८-४
९-२
१०-४
११-२
१२-२
१३-३